Home Blog Page 442

यावल पोलीसांच्या कार्यपद्धतीमुळेच गुन्हेगारांना पावले दोन दिवसातील रस्तालुट व दरोड्याची घटना :गृहमत्र्यांकडे तक्रार करणार जलील पटेल

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

तालुक्यातील सातोद रस्त्यावर काल भरदिवसा झालेली एका व्याक्तीची झालेली लुट व आज शहरात भर दुपारी सोन्या चांदीच्या दुकानात पडलेला दरोडा हे यावल पोलिसांचे अपयश असुन , स्थानिक पोलीस प्रशासनाच्या अशा प्रकारच्या कार्यपद्धतीच्या विरूद्ध वारिष्ठ पातळीवर लक्ष केन्द्रीत व्हावे यासाठी आपण प्रसंगी आमरण उपोषण ही करू,,, असा ईशारा काँग्रेस सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष जलील पटेल यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे .
यावल शहरात भर दुपारी बाजारपेठेत वर्दळीच्या ठिकाणी खुलेआम सोन्या चांदीच्या दुकानात दरोडा पडतो आणि यावल पोलीस स्टेशन येथील काही अधिकारी हे फक्त सट्टा, पत्ता , देशी विदेशी हातभट्टी दारू विक्रीला समर्थन करून हफ्ते वसुलीच्या नादात मग्न असतात , पोलीसांच्या अशा प्रकाराच्या कार्यपद्धीती…मुळे गुन्हेगारांना व चोरट्यांना पाठबळ मिळत आहे कायदा आणि सुवेवस्था हाताळण्यात यावल पोलीस स्टेशनचे काही अधिकारी हे सपशेल अपयशी ठरत असून त्यांच्यावर योग्य ती चोकशी करून कठोर कार्यवाही करावी अन्यथा उपोषणाला बसू असा गंभीर इशारा काँग्रेस सेवा फौंडेशनचे जिल्हाध्यक्ष तथा कोरपावली गावचे माजी सरपंच जलील पटेल यांनी केली आहे .तसेच त्यांनी यावल पोलीस प्रशासनाचे काही अधिकारी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून किरकोळ भाजीपाले विक्रतेसह इतर व्यावसायिकांना कायदाचा धाक दाखवुन त्रास देत असून अवैध धंदेवल्याना मात्र पाठीशी घालत असून, अशा पद्धतीचा भेदभावचा कारभार करत आहे तरी स्थानिक पोलीस प्रशासनाच्या अशा प्रकारच्या दूटप्पी भूमिका बाबत आपण तात्काळ लिखितपत्राद्वारे तक्रार मुखमंत्री उद्धव ठाकरे , गृहमंत्री ना . दिलीप वळसे पाटील तसेच काँग्रेस कमेटीचे प्रदेश अध्यक्ष नानाजी पटोले यांच्याकडे करणार असल्याचे जलील पटेल यांनी संगीतले आहे .

यावल शहरातील सराफा दुकानावर भरदिवसा दरोडा दरोडेखोरांनी बन्दुकीच्या धाकाने केली १२ते १३ लाख रुपयांच्या सोना दागीन्यांची लुट स्थानिक पोलीसांना दिले दरोडेखोरांनी आव्हान

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील मुख्य बाजारपेठेतील सराफा बाजारात भरदिवसा एका सराफा दुकानात चार अज्ञात दरोडेखोरांनी देशी रिवॉल्वरचा धाक दाखवुन सराफा व्यापाऱ्यांच्या दुकानातुन सुमारे १२ते १३ लाख रुपयांचे सोन्याचे दागीने लुटल्याची घटना घडली असुन या घटनेमुळे शहरात व परिसरात एकच भितीचे वातावरण पसरले असुन सर्वत्र खळबळ उडाली असुन पोलीसांना मोठे आव्हानच चोरटयांनी उभे केले आहे . या संदर्भात मिळालेल्या माहीतीनुसार आज दिनांक ७ जुलै बुधवार रोजी दुपारी एक ते दिड वाजेच्या सुमारास यावल शहरातील कोर्ट रोड मुख्य बाजारपेठेतील सराफ बाजारातील सराफा व्ववसायीक बाजीराव काशीदास कवडीवाले सराफ यांच्या दुकानात चार अज्ञात लुटारू एकाच पल्सर मोटरसायकलवर आलेत त्यापैक्की एक हा वस्तु घेण्याने बहाण्याने दुकानात शिरला त्यापाठोपाठ त्याच्या सोबत असलेले तिघ जणं ही दुकानात शिरले त्यापैक्की एकाने त्याच्या जवळील रिवॉल्वर काढुन दुकान मालकांचे चिरंजिव जगदीश कवडीवाले यांच्या छातीवर लावली आणी सोबतच्या दोघा चोरटयांनी दुकानाचे शटर बंद करून दुकानातील विक्री करीता असलेले सुमारे २४०ग्रॅम सोने किमत११ लाख रुपये व५५ हजार रुपये रोख काउन्टरच्या ड्राप मधुन काढले तसेच सोन्याचे दागिने असलेले सोगलांस फोडुन सर्व दागीने जमा करून बाहेर निघाले बाहेर सोबत असलेला एक चोरटा हा त्यांच्या येण्याची वाट बघत होता , दरोडेखोरांनी पाच मिनिटात ही सर्व लुटीचे प्रकार करून दुकानातुन बाहेर येवुन मोटरसायकलवर बसुन पळ काढण्याचा प्रयत्न केला असता , दुकानदार जगदीश कवडीवाले यांनी चोर चोर अशी आरडाओरड करताच दुकानाच्या थोडया अंतरावर उभे असलेल्या राजु नामक नागरीकाने त्यांना धाडस दाखवुन पकडण्याचा प्रयत्न केला असता दरोडेखोरांनी आपल्याकडील रिवॉत्वरने फायर करण्याचा प्रयत्न केला असता देशी रिवॉल्वर मध्ये गोळी अडकल्याने फायर होवु शकली नाही मात्र या झटापटीत त्या दरोडेखोरानी त्याच्या हातातील बन्दुक ही पकडणाऱ्यांना नागरीकाच्या दिशेने मारून फेकली यावेळी थोडयाच अंतरावर आयडीबीआय बँकेजवळ ऊभे असलेल्या तरुणांनी या दरोडेखोराना पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याच वेळी त्याच्या कडील एकाने पकडणाऱ्यांच्या दिशेने गोळी झाडण्याचा प्रयत्न केले असता त्याच्या हातातुन ती रिवॉल्वर खाली पडली व ते दरोडेखोर मोटरसायकलीने मिळेल त्या मार्गाने पळवुन जाण्यात ते यशस्वी झालेत .घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीसानी धाव घेतली मात्र शोधाशोध घेतली असता काहीही निष्पन्न झाले नाहीत . घटनेचे गांर्भीय लक्षात घेता पोलीस अधिक्षक डॉ . प्रविण मुंडे , अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी , विभागीय पोलीस अधिकारी नरेन्द्र पिंगळे यांच्या चौकशी पथक यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली आणी लुट झालेल्या सराफा दुकानांची पाहणी करून पोलीसांना कार्यवाही ची दिशा व मार्गदर्शन सुचना दिल्यात . दिनांक ६ जुलै रोजी यावल सातोद मार्गावर झालेली रस्तालुट व आज दुसऱ्या दिवसी झालेल्या सराफा दुकानावर पडलेला दरोडा या दोन्ही घटना दुपारी १२ते २ वाजेच्या दरम्यान घडल्या असुन सतत दोन दिवस झालेल्या या घटनेमुळे स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत . या घटनांमुळे व्यापारी वर्ग आणी सर्वसामान्यामध्ये भितीचे वातावरण पसरले आहे . घटनास्थळावरून दरोडेखोरांनी वापरलेल्या दोघ रिवाल्वर पोलीसांनी जप्त केल्या आहेत

मारहाणीची घटनेचा व्हायरल व्हिडिओ व पत्राद्वारे दुय्यम निबंधक कार्यालयातील भोंगळ कारभार उघड !

0

 

सचिन वाघे वर्धा

दिनांक 7.7.21हिंगणघाट :– दुय्यम निबंधक कार्यालयात 6 जुलैला वकील स्वप्निल धारकर हे सर्टीफाईड कॉपी घेण्यासाठी गेले असता त्यांना शिविगाळ करीत कैचीने मारण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दुय्यम निबंधक श्री.धार्मिक हे धावून गेल्याने मोठा अनर्थ टळला. दुय्यम निबंधक श्री. धार्मिक यांना देखील जिवे मारण्याची धमकी शिपाई उमेश नवणागे नी दिली आहे. याप्रकरणी दुय्यम निबंधक श्री धार्मिक अ‍ॅड. स्वप्नील धारकर यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी शिपाई उमेश नवनागे याच्या विरोधात 294 ,324,504 कलमांतर्गत गुन्हा दाखल करून ताब्यात घेतले आहे. या घटनेच्या व्हायरल व्हिडिओ व पत्रामुळे दुय्यम निबंधक कार्यालयाच्या आत मध्ये दलाल हे सक्रिय असतात या कार्यालयात वरिष्ठांकडून लक्ष देण्याची गरज आहे .

शिवशाही कोकण कलामंच मुंबई आयोजनात कलांश स्पर्धा संपन्न

0

 

 

प्रियंका पवार (मुम्बई प्रतिनिधि)

शिवशाही कोकण कलामंच मुंबई आयोजित ऑनलाइन कलांश स्पर्धेचे आयोजन केले गेले होते आणि या स्पर्धेसाठी आम्हाला खुप स्पर्धकांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचा कालावधी हा ०१ जून २०२१ ते ३० जून २०२१ पर्यंत होता आणि या स्पर्धेचा निकाल हा दिनांक ०५ जुलै २०२१ रोजी सकाळी ०९ वाजता जाहीर करण्यात आला. यामध्ये १५० स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता आणि आपल्या कलेचे चांगल्या प्रकारे सादरीकरण केले आणि या स्पर्धेला वेगळं रंग रूप आणले.
प्रथमत: या स्पर्धेमध्ये विजेते ठरलेल्या सर्व स्पर्धकांचे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन…! यामध्ये सोलो डान्स स्पर्धा प्रथम क्रमांक:- अनुष्का दत्तात्रेय भंडारे ( विभागून ), महेंद्र बनसोडे ( विभागून ), द्वितीय क्रमांक:- अभिषेक घवाळी, तृतीय क्रमांक:- सुलोचना अनिल प्रभू… सोलो गायन स्पर्धा प्रथम क्रमांक:- अलका गोडबोले, द्वितीय क्रमांक:- अन्वयी कुष्टे, आणि एकपात्री अभिनय स्पर्धा प्रथम क्रमांक:- आर्या सुधीर गजेंद्रगडकर, द्वितीय क्रमांक:- हर्षला गणेश पेडणेकर … तसेच या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले व सर्व स्पर्धकांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा…!
डान्स स्पर्धे साठी सहभागी झालेले स्पर्धक पुढीलप्रमाने अदिती कुर्ले, तृप्ती कशिद, साक्षी पाचकळे, पूजा गुरव, ऐश्वर्या कदम, रिद्धी कदम, अमोल देवरुखकर, निकेतन नंदूरबारे, दिक्षा गावडे, रुद्रा नवाळे, मिहिर पूरात, कुणाल पाटील, ऋतुजा शिनगारे, आरुशी रावणंग, किरण सुर्वे, सनिक चव्हाण, स्वरा मालणकर, आचल धुरी, तनया फडणीस, शर्वरी तायडे, जिज्ञासा कुरतडकर, तन्वी नाचणेकर, प्रिनल मनवरे, स्नेहल जावकर, ऋतिक निकम, निधी रेवाळे, शुभ्रा आंबेरकर, आकांक्षा वडके, संपदा मोरे, शिवम गोस्वामी, सलोनी कदम, रिया जाधव, मधुरा कुलकर्णी, अनुष्का दळवी, सुलोचना प्रभू, तन्वी तवटे, प्राप्ती आरोसकर, वैष्णवी पेडणेकर, पूजा नाकटे, वैदही कारेकर, महेन्द्र बनसोडे, अभिषेक घवाळी, प्रशांत रहाटे, समृद्धी वालंज, प्रतिक अलई, जान्हवी नातू, रोहित कुमार, वैभव वाघ, सानिका बने, आश्विनी तवटे, सिद्धी लोळगे, गौरी रहाटवळ, सृष्टी कोठावदे, प्राची केसारकर, स्वर्णी लाड, कुंजल सौंदाळकर, अनुष्का भंडारे, राहुल उजगांवकर, गौरी शिरूडे, महिमा वाडये, लावण्या पवार, रिया परब, सूंदर मधाळे, क्षितिजा पिसे या सर्वांनी उत्तम प्रकारे आपल्या डान्स च सादरीकरण केलं. तसेच गायन स्पर्धे साठी देखील मोठ्या संखेने स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता त्यामध्ये सुशील गुरव, प्रिती भोवड/ वीर, तनुजा पाजवे, सुरज धनावडे, सिद्धेश दिवेकर, शैलेश कुवार, अभिषेक खापरे, सुनिल करगुटकर, रोहित तूपट, ध्रुवा नेमळेकर, गौरव दिपक नंदूरबारे, ओंकार मांजरेकर, मयूरी गावडे, श्रेया आग्रे, संदेश पालकर, प्रशांत मेस्त्री, श्रिया सावंत, स्वप्नील कुंभार, श्रुती जाधव, अन्वयी कुष्टे, साक्षी घाड़ी, विशाखा शिंदे, अलका गोडबोले, रेखा शिरोडकर, शिवानी उतेकर, सागर घाड़ी, केतकी काळे-मंडपे, माधवी जोशी, दीपक पांचाळ, सिद्धी लोळगे, ओवी आरोसकर, स्वाती कानिटकर, आचल आरोसकर, युवराज बांडागळे, सुनिल घाणेकर, संकेत हातणकर, सचिन बेंद्रे, सुनील डावल, सिद्धेश पंगेरकर, दिव्या भस्मे, प्रमोद गोवळकर, तेजस गुरव, माधुरी बेन्द्रे- लोणकर, लक्ष्मी वाघमारे, सायली जोशी, विमल कोरपड, वैशाली शिरूडे, श्रिनिका चव्हाण, विशाल घवाळी, सौरभ वाणी, सुलोचना प्रभू, स्वप्नील जोशी, लक्ष्मी महात्मे, सुप्रिया दाणी, राहुल उजगांवकर, मंगेश वाडये, दीपक गोताड या सर्वांनी उत्तम प्रकारे गायन सादर केलं. तसेच एकपात्री अभिनय स्पर्धा मध्ये ऋतुराज दिवेकर, विजया माणगावकर, सानिका साळुंखे, निकेतन नंदूरबारे, जिज्ञासा कुरतडकर, संजय पवार, दीपाली शिरढोणकर (जोशी), हर्षला पेडणेकर, साई पवार, केतकी काळे-मंडपे, संकेत हातणकर, गौरवी एखंडे, गौरी रहाटवळ, सौरभ वाणी, लक्ष्मी महात्मे, रतन लिंबेकर, सिद्धी पारकर, तन्वी तवटे, आर्या गजेंद्रगडकर, सुनिल घाणेकर, ओम कांबळी, भाग्यश्री बागड, निशांत गौड़ या सर्व सहभगी स्पर्धकांचे मनःपूर्वक आभार…
आपल्याला स्पर्धेसाठी लाभलेले परीक्षक सोलो डान्स स्पर्धा:- गणेश पुजारी सर ( नवतरंग कलामंच मुंबई नृत्यदिग्दर्शक/काळेश्वरी नाट्य नमन मंडळ नृत्यदिग्दर्शक ), सोलो गायन स्पर्धा:-प्रकाश पांजणे सर ( बुलंद आवाजाचा बादशाह ), एकपात्री अभिनय स्पर्धा:-रमेश पवार सर ( बत्तकु – एक वास्तविकता- मराठी चित्रपट लेखक/दिग्दर्शक ), या स्पर्धेसाठी लाभलेले परीक्षक या सर्वांचे देखील मनःपूर्वक आभार…
शिवशाही कोकण कलामंच मधील सदस्य सुरज हातणकर, सिद्धेश घाडी, अक्षय घाडी,भूपेश पड्यार, प्रमोद सूर्यवंशी, भूषण हातणकर, सुरज कुवार, प्रथमेश घाडी, प्रशांत हातणकर, किरण हातणकर, धीरज हातणकर, महेश पुजारी, तनुजा चोरगे, दिक्षा लाड, नेहा बारसकर, कुंजल सौंदाळकर, हेमलता गोंडाळ, स्वप्नाली सरवनकर या सर्वांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं त्यामुळे सर्वांचे मनःपूर्वक आभार..
विशेष आभार म्हणजे या स्पर्धकांच्या व्हिडीओ आपल्या पर्यंत पोहचल्या ते RAINBOW CREATION चे चालक अमर फटकरे, तसेच आमच्या समूहाला नविन नविन संकल्पना देणारी आणि सर्व गोष्टीमध्ये सहकार्य करणारी पूजा जाड्यार , तसेच विशेष मार्गदर्शक आम्हाला लाभलेले ( बात्तकु – एक वास्तविकता ) मराठी चित्रपट लेखक / दिग्दर्शक श्री रमेश पवार सर या सर्वांचे आम्ही खूप खूप आभारी आहोत…
यापुढे ही अशाच प्रकारचे नवीन नवीन उपक्रम आम्ही राबवू, आणि जसं आता प्रतिसाद दिलात तसाच प्रतिसाद यापुढे ही द्याल अशी आम्ही आशा बाळगतो.
धन्यवाद..!

बंदूक दाखवून सोने-चांदीचे ज्वेलर्स  दुकानदाराची लूट

0

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

 

शहरातील नगरपालिका रोडवरच्या एक सरफ दुकानावर चार दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवत सोन्याचांदीचे दागिने यां सह रोकड लंपास केल्याची घटना आज दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली असून दुकानदाराचे नाव जगदीश कवडीवालेi. रा यावल यांची मुख्य बाजारपेठ बाजीराव काशिनाथ कवडीवाले या ज्वेलर्स दुकान आहे आज नेहमीप्रमाणे सकाळी दहा वाजता त्यांनी दुकान व्यवहार केले दरम्यान दुपारी एक वाजेच्या सुमारात टू व्हीलर पल्सर गाडीवर चार अज्ञात दरोडेखोरांनी येऊन दागिने बनवायचे आहे सांगितल्याची बहाने केला

त्याच्या पाठोपाठ चोथाही आला त्यानंतर चौघापैकी एकाने दुकानदार जगदीश कवडीवाले बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्या दुकानातील सोन्याचे दागिने आणि काही रोकड असा ऐवज लंपास केल्याची घटना घडली

आज घडलेल्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा नागरिकांनी सांगितले की या दरोडेखोरांनी पैकी 1 हवेत फायरिंग देखील केली होती घटनेची माहिती मिळताच यावल पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, उपनिरीक्षक, विनोद खांडबहाले जितेंद्र खैरनार ,घटनास्थळी दाखल झाली असून चौकशी काम सुरू आहे नेमकी किती मला दरोडेखोरांनी नेले आहे लगेच संमजू शकत नाही असे ज्वेलर्सचे मालक सांगत आहे

भाजपा आमदारांच्या निलंबनाच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारच्या पुतळ्याचे दहन

0

 

प्रतिनिधी
अजहर शाह

भाजपा आमदारांचे निलंबन ही लोकशाहीची गळचेपी
मा.आमदार विजयराज शिंदे

बुलडाणा:-
ओबीसी आरक्षणाबाबत आक्रमक झालेल्या १२ भाजपा आमदारांचा आवाज दाबत त्यांना सूडबुद्धीने निलंबित केल्याच्या निषेधार्थ बुलडाणा तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने भाजपा नेते मा. आमदार विजयराज शिंदे व युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांच्या नेतृत्वात आज दि.6.7.2021 रोजी भाजपाच्या वतीने बुलडाणा शहरातील स्व.वसंतरावजी नाईक चौकात महाविकास आघाडी सरकारचा रावण रुपी प्रतिकारात्मक पुतळ्याचे दहन करून निषेध करण्यात आला.

भाजपा च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालया पुढे जोरदार निदर्शन करत महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली. “महाविकास आघाडी सरकारचा करायचं काय खाली मुंडक वर पाय,”
“बारा आमदारांचे निलंबन करणाऱ्या आघाडी सरकारचा धिक्कार असो,”
“भारतीय जनता पक्षाचा विजय असो” अश्या अनेक विध घोषणांनी जिल्हाधिकारी परिसर दणानून गेला होता.

यावेळी राज्याचे राज्यपाल यांना जिल्हाधिकारी यांच्या मार्फत निवेदन सादर करून निलंबित केलेल्या 12 भाजपा आमदारांचे निलंबन तात्काळ रद्द करून महाविकास आघाडी सरकार बरखास्त करण्याची मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे.

यावेळी महाविकास आघाडी सरकारच्या गलथान कारभारा मुळे एम.पी.एस.सी परीक्षा पास होऊन आत्महत्येचा बळी ठरलेल्या स्व.स्वप्नील लोणकर यांच्या आत्महत्येस महाविकास आघाडी सरकार जबाबदार असून त्यांच्या कुटुंबियांना तात्काळ आर्थिक मदत मिळण्याची मागणी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सचिन बापू देशमुख यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलतांना केली आहे.

ओबीसी समाजाच्या हक्कासाठी सभागृहात बाजू मांडणाऱ्या भाजपा पक्षातील आमदारांचे निलंबन करून आघाडी सरकारने सत्तेचा गैरवापर केला आहे.
हा निलंबनाचा आदेश म्हणजे विरोधी पक्षाची मुस्कटदाबी असून लोकशाहीची गळचेपी आहे.
“भाजपा या धोरणाचा तिव्र निषेध करीत असून महाविकास आघाडी सरकार त्वरित बरखास्त करावे व भाजपच्या सदर 12 आमदारांचे निलंबन मागे घ्यावे अन्यथा याही पेक्षा तीव्र आंदोलन छेडले जाईल” असा आक्रमक इशारा भाजपा नेते मा.आमदार विजयराज शिंदे यांनी भाजप च्या वतीने आघाडी सरकारला दिला आहे.

यावेळी आंदोलनात किसान मोर्चा प्रदेश सचिव दीपक वारे,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम लाखोटीया,जिल्हा उपाध्यक्ष सौ.विजयाताई राठी,युवा मोर्चा तालुकाध्यक्ष योगेश राजपूत,भाजपा जिल्हा उपाध्यक्ष देविदास जाधव, मा.नगराध्यक्ष विठठलराव येवले,तालुका सरचिटणीस अर्जुन दांडगे,गजानन देशमुख, महिला मोर्च्या जिल्हा सरचिटणीस अल्काताई पाठक,महिला मोर्च्या तालुकाध्यक्ष सौ.मायाताई पदमने,डॉ.राजेश्वर उबरहंडे,विनायक भाग्यवंत, कुलदीप पवार ,बाळू ठाकरे,हरिभाऊ सीनकर, गणेश देहाडराय,किसान मोर्चा तालुकाध्यक्ष सुभाष जगताप,युवा मोर्चा जिल्हा संघटक मयूर बघे,भुजंगराव सावळे, सुमंता चव्हाण, अनंता शिंदे,यश तायडे, गोपाल तायडे,नितीन हिवाळे, यतीन पाठक, संजय अग्रवाल, किरण नाईक, सोनू बाहेकर,शनिराज सौदे,नितीन बेंडवाल,ईश्वरसिंग चंदेल,विठ्ठल नरोटे,अण्णा पवार,भारत गव्हाणे, प्रदीप तोटे,समाधान मोहिते,संजय जुंबड,प्रदीप सोनटक्के,राहुल वायकोस,पवन बगाडे, भिकाजी पदमने,आशिष व्यवहारे,युवा मोर्चा शहाराध्यक्ष सोहम झालटे, हर्षल जोशी,गणेश पांडे,मोहित भंडारी,किशोर गवळी,विनोद आडवे,शेख रशीद,विलास पालकर,विजय मोटे यांसह असंख्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

श्रीमती कमलाबाई पाटील या नंदुरबार रेल्वेच्या आयओ डब्लू विभागाच्या आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर झाल्या सेवानिवृत्त

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील उंटावद येथील पत्रकार महेश भागवत पाटील यांच्या सासूबाई श्रीमती कमलबाई जनार्दन पाटील या दि.३० जुन रोजी २७ वर्षे ७ महीणे आणी ९ दिवसांच्या प्रदिर्घ सेवेनंतर नंदुरबार रेल्वेस्टेशनच्या आयओडब्लू या विभागातून सेवानिवृत्त झाल्यात , याआधी त्यांचे पती जनार्दन पाटील यांनी ५ वर्षे १० महीने रेल्वेत बुकींग क्लार्क म्हणून आपली सेवा दिली होती मात्र त्यांचे आकस्मात निधन झाल्याने त्यांच्या जागी कमलबाई पाटील यांना रेल्वेत सेवा करण्याची संधी मिळाली होती.कमलबाई पाटील या मुळ शिंदखेडा जिल्हा नंदुरबार येथील रहिवाशी आहेत पतीच्या निधना नंतर कमलाबाई पाटील यांनी आपल्या कार्यकतृत्वाच्या बळावर सक्षमरित्या कुटुंबाचा सांभाळ करीत कुटुंबाच्या कार्यासाठी त्यांनी स्वताहास वाहुन घेतले. सेवानिवृत्तीच्या कार्येक्रमा प्रसंगी आयओडब्लू विभागाचे आधीकारी व कर्मचारी यांनी कमलबाई पाटील यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत त्यांना निरोप दिला.यावेळी आयओडब्ल्यु विभागाचे अधीकारी सुनिल पगारे,शिरसाठ साहेब, ओम साहेब,योगेश वाणी,कपील भाई,सुरेश हसरत,महेश भाई,सुनिल साहेब,शरद चौधरी,बालमुकुंद पाटील,केतन पाटील,विकास पाटील,बिपीन पाटील,गणेश पाटील,बबलू पाटील,सुभाष सुर्यवंशी,नारायण सुर्यवंशी आदीसह मान्यंवर या कार्यक्रमास उपस्थीत होते.

नागपूर येथील घरफोडीचे अटल सराईत चोरटे हिंगणघाट पोलिसांच्या जाळ्यात

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट दि.६ शहरातील संत तुकडोजी वार्ड परिसरात एकाच रात्री तब्बल ४ घरी घरफोड़या करुन सोन्याचांदीचे दागिन्यासह नगदी रक्कम लंपास केल्याप्रकरणी हिंगणघाट पोलिसांनी नागपुर येथील रहिवासी असलेल्या दोन सराइत गुन्हेगारांना अटक करण्यात आली.त्यांचेकडून सोन्याचांदीचे दागिने व नगदी रक्कमेसह ४९ हजार,९६० रुपयाचा ऐवज जप्त करण्यात आला.
सदर गुन्हेगारांवरती चंद्रपुर,भंडारा,नागपुर जिल्ह्यात अनेक चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.
नागपुर येथील घरफोडीचे अट्टल सराईत चोरटे हिंगणघाट पोलीसांच्या जाळयात.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि.३ ते ४ जुलै रोजी रात्री शहरातील संत तुकडोजी वार्ड,येथे एकाच रात्री येथील रहिवासी उमेश उत्तम फुलकर, सिद्धार्थ काशिनाथजी गायकवाड ,श्रीमती राणी विलास झाडे तसेच दिपक गायधने यांच्या
घरी अज्ञात चोरटयांनी घरफोड्या केल्याची तक्रारी हिंगणघाट पोलिसांत दाखल करण्यात आल्या.
माहीती मिळताच लागलीच पोहवा शेखर
डोंगरे यांचे पथकाने परिसरात आरोपी व चोरीचा मालाचा शोध घेत असता त्यांच्या पथकांन माऊली पार्क, हिंगणघाट येथे दोन संशयीत इसमांना ताब्यात
घेतले, त्यांना पोलिसी ख़ाकया दाखवून चौकशी केली असता त्यांचे ताब्यातुन चोरीस गेलेल्या मालापैकी नगदी रक्कम,सोन्याचे दागिणे व जेन्ट्स घड्याळ जप्त केले.व त्यांना सदर गुन्हयात अटक करण्यात आली.चौकशीकरीता त्यांना स्थानिक न्यायालयाने ३ दिवस पोलिस कोठड़ी मंजुर केली,या काळात चौकशी दरम्यान
गुन्हयाचा चोरीस गेलेला माल सोन्याचे व चांदीचे दागिणे तसेच नगदी रक्कम असा एकुन ४९ हजार ९६० रुपयाचा
मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
सदर गुन्हयात अटक करण्यात आलेले आरोपी राहुल कमल माणिकपुरे(२८) वर्षे रा. योगी अरविंद नगर,यशोधरा चौक, नागपूर, नितेश अशोक गिरावकर(२०)रा.
गिट्टी खदान,नागपूर यांना ताब्यात घेण्यात आले होते.
सदरची कामगीरी पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर, उपविभागिय पोलिस अधिकारी दिनेश कदम,ठाणेदार संपत चव्हाण यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोहवा शेखर डोंगरेनापोशी. निलेश तेलरांधे, सचिन घेवंदे, विषाल बंगाले, सचिन भारशंकर यांनी केली.

दुबार पेरणीसाठी शेतकऱ्यांना मोफत बि-बियाणे व आर्थिक मदत द्या

0

 

प्रतिनिधी
अजहर शाह

पिक विम्यासाठी इतर कंपन्याना संधी द्या व नुकसान भरपाई न देणाऱ्या पिक विमा कंपन्यावर बहिष्कार टाका”_ _ _
भाजपा नेते मा.आमदार विजयराज शिंदे

सोयाबीन बियाणांची बोनस रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ जमा करा; अन्यथा आंदोलन भाजपा किसान मोर्च्यांचा ईशारा

बुलडाणा:-
शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी मोफत खते बी-बियाणे व आर्थिक मदत मिळणे या प्रमुख मागणी सोबत पीकविमा,सोयाबीनची बियानांची बोनस रक्कम या प्रश्नां बाबत आज दि.5.7.2021 रोजी भाजपा नेते मा.आमदार विजयराज शिंदे यांनी भाजपा किसान मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष गजानन बापू देशमुख,किसान मोर्चा प्रदेश सचिव दिपकजी वारे,की.मो.चे जिल्हा सरचिटणीस चक्रधर लांडे,किसान मोर्च्या महिला जिल्हाध्यक्ष संगीताताई उंबरकार,बाळासाहेब पाटील,की.मो.जिल्हा सरचिटणीस बळीराम लाहुडकर,की.मो.जिल्हा सचिव संदीप जोशी, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष संजय ठोंबरे,आशिष दोडे, दत्ता पाटील, ई प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या समवेत जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे आग्रही मागणी केली आहे.

निवेदनात पुढील मुद्द्यांकडे मागणी लावून धरण्यात आली आहे.
1)जून महिना उलटून गेला तरी वरून राजाने बुलडाणा जिल्हयातील शेतकऱ्यांवर अद्याप पर्यंत आपली कृपा दाखविलेली नाही.जून च्या सुरवातीला एक दोन वेळेस पावसाने हजेरी लावली. हवामान खात्याने सुद्धा यावेळी मान्सून चा पाऊस वेळेवर येत असल्याचे सूचित केलेच होते, यामुळे जिल्हयातील बहुतांश शेतकऱ्यांनी आपल्या शेतात मोठ्या उत्साहात पेरणी केली.
मात्र पेरणी केल्यानंतर 15 ते 20 दिवस झाले शेतकरी राजा पावसाची चकोर पक्षाप्रमाणे आस लावून बसला होता.परंतु पावसाने अचानक दडी मारल्याने जमिनीचीच्या पोटातून पिक उगवले नाही,पहिली पेरणी नेस्तनाबुत होऊन शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचे संकट आले आहे.त्यामुळे जिल्हातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
बुलडाणा जिल्हा हा अवर्षण ग्रस्त असून जिल्ह्यात सिंचनाच्या सोयी सुविधांचा अभाव आहे.जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची आणेवारी पन्नास पैश्या पेक्षा खाली आहे.त्यातच लॉकडाऊन मुळे शेतकऱ्यांचेही कंबरडे मोडले असून शेतकऱ्यांनी उसनवारी, सावकारी ने पैसे घेऊन पहिली पेरणी केली होती.त्यातच भर म्हणून शेतकऱ्यांना शासनाच्या गलथान धोरणांमुळे कर्जमाफी झालेली नाही, शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट अद्याप पर्यंत 30 टक्के सुद्धा झालेले नाही,बँका पीक कर्ज वाटपात उदासीन पणा दाखवत आहे,शेतकऱ्यांच्या पिक कर्जाच्या पुनर्गठनात सुद्धा विविध अडचणी आहेत,मागील वर्षीच्या खरीप हंगामातील पीक विम्याची नुकसान भरपाई ची रक्कम विमा कंपन्यांच्या लबाड धोरणामुळे शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत मिळालेली नाही,पिक कर्जाचा नियमित भरणा करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केल्या प्रमाणे प्रोत्साहणपर बक्षीस म्हणून मिळणारी रक्कमही अजून पर्यंत देण्यात आलेली नाही अश्या अनेक विविध आस्मानी व सुल्तानी संकटांचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांवर आता आत्महत्येची वेळ आली आहे.
तरी मायबाप समजल्या जाणाऱ्या सरकारने जिल्हयातील दुबार पेरणीचे संकट आलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करून शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या थांबवाव्या. अशी आग्रही मागणी निवेदनात नमूद आहे.

2) संपूर्ण राज्यात फक्त ठराविक चार पिक विमा कंपन्यांशी शासनाने करार करून या कंपन्या शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा काढत असतात. सदर पिक विमा योजनेत केंद्रशासन,राज्य शासन व शेतकऱ्यांचा वाटा असतो.मागील वर्षीच्या खरीप हंगामात पीक विमा
कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या नावावर 5000 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमविला आहे.
पिक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी असली तरी त्याची अंमलबजावणी करताना सदर पिक विमा कंपन्या ह्या शासनाची व शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करत असल्याची बाब उघड झाली आहे.
सन 2020-21 च्या खरीप हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेले होते. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे शासकीय यंत्रणांनी ग्रामस्तरीय पंचनामे करून तसा अहवाल सुद्धा शासनाकडे व पिक विमा कंपन्या कडे सादर केला होता.नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 अंतर्गत सदर पंचनामे प्रमाणभूत मानून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आदेश कृषी आयुक्त यांनी कंपन्यांना दिलेले असताना सुद्धा ह्या आदेशाला केराची टोपली पिक विमा कंपण्यांनी दाखविली आहे.ही बाब नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापण कायद्याचा भंग करणारी असून फ़ौजदारी गुन्हा दाखल करण्यास पात्र आहे. मात्र अद्याप पर्यंत ह्या पिक विमा कंपन्यांवर राज्य सरकारने कोणतीही कारवाई केलेली नाही.यामध्ये वरिष्ठ अधिकारी यांचे पिक विमा कंपन्या सोबत साटे लोटे असल्याची शक्यता नाकारता येत नाहीये.
राज्यात शेतकऱ्यांचा पिक विमा उतरविण्याचे काम सद्य स्थितीत फक्त चार कंपन्यांकडे देण्यात आलेले आहे.त्यामुळे ह्या कंपन्या मुजोर झालेल्या असून शेतकऱ्यांची पिकविम्याची नावावर फसवणूक करीत आहे.त्यामुळे शासनाने पिक विमा उतरविण्यासाठी फक्त काही ठराविक कंपन्यांना संधी न देता याबाबत खुल्या बाजारात ईतर विमा कंपन्याना औक्षण पद्धतीने निविदा बोलावून संधी द्यावी जेणेकरून ह्या कंपन्यांच्या मुजोरीला प्रतिबंध घालता येईल.
तसेच सद्यस्थितीत मागील खरीप हंगामातील शेतकऱ्यांची हक्काची नुकसान भरपाई जो पर्यंत ह्या विमा कंपन्या देत नाही तो पर्यंत शेतकऱ्यांनी ह्या कंपन्यांवर बहिष्कार घालत ह्या वर्षी पिक विमा उतरवू नये,असे आवाहन सुद्धा विजयराज शिंदे यांनी निवेदना द्वारे शेतकऱ्यांना केले आहे.

3) 2021-22 चालू खरीप हंगामात जिल्ह्यातील सोयाबीनचे महाबीज मंडळा कडून दरवर्षी चांगल्या प्रतिचे शेतकऱ्यांना बियाणे बाजारभावा पेक्षा कमी दराने बियाणे उपलब्ध करून दिले जातात यावर्षी मात्र शेतकऱ्यांना महामंडळाने बियाणे उपलब्ध करून न दिल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. सोयाबीनला महामंडळा कडून प्रति थैली मिळणारा भाव हा 2200 रु. तर त्याच बियानांचा बाजारभाव हा 3300 ते 3800 रु असल्याने या वर्षी शेतकऱ्यांना प्रती थैली मागे 1100 ते 1600 रु जास्त मोजावे लागले आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे बाजार भावाने खरेदी केले आहे अश्या शेतकऱ्यांना शासकीय भाव व बाजारभाव यातील फरकाची रक्कम बोनस म्हणून त्यांच्या खात्यात जमा करावी अशी आग्रही मागणी सुद्धा भाजपा किसान मोर्च्याचे जिल्हाध्यक्ष गजाननबापू देशमुख यांनी लेखी निवेदना द्वारे जिल्हाधिकारी यांच्याकडे लावून धरली आहे.
तसेच सदर मागण्या पूर्ण झाल्यास भाजपाच्या वतीने आंदोलनात्मक पवित्रा घेतला जाईल असा इशारा सुद्धा निवेदना अंती देण्यात आला आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थामधील रद्द केलेले ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवावे तसेच ओबीसिंची जातीनिहाय जनगणना करन्यात यावी

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगांव जामोद:-दिनांक 5 जुलै 2021रोजी बारी समाज जळगांव जामोद व संग्रामपूर तालुक्याच्या वतीने मा ना श्री उद्धवजी ठाकरे साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना स्थानिक उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत उपरोक्त मागण्या संदर्भात निवेदन देण्यात आले.
संपूर्ण भारतात बारी समाजाचे कमी अधिक प्रमाणात वास्तव्य असून महाराष्ट्र राज्यातील बहुसंख्य बारी समाज हा शेती व मजूरी करून आपला उदरनिर्वाह करतो. बारी समाजाचे उत्पन्न अत्यल्प आहे.बारी समाज आर्थिकदृष्ट्या,शैक्षणिकदृष्टया,सामजिकदृष्टया,व राजकीय दृष्ट्या अत्यंत मागासलेला आहे.बारी समाजाचे देशात व राज्यात राजकीय अस्तित्व नगण्य आहे,.
थोडयाफार प्रमाणात बारी समाज ओबीसी प्रवर्गमध्ये येत असल्याने ओबीसी आरक्षणाचा लाभ समाजाला मिळू शकतो.
परंतु ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द झाल्यास त्यापासून बारी समाजाचे अस्तित्व धोक्यात येईल.
तरी कृपया स्थानिक स्वराज्य संस्थामधिल रद्द केलेले ओबीसींचे आरक्षण अबाधित ठेवण्यासाठी आवश्यक इंपीरिकल डाटा सुप्रीम कोर्टात सादर करून ओबीसी आरक्षणाचा स्थगिती आदेश रद्द करावा व केंद्र/राज्य सरकार द्वारा ओबीसींची जातीनिहाय जनगणना करून ओबीसी आरक्षणाचा कायदा संमत करावा तसेच मंडल आयोग लागू करान्यात यावा.
अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले.या निवेदनाच्या प्रतिलिपी मा ना श्री अजित पवार साहेब,उपमुख्यमंत्री,मा ना श्री विजय वटेड्डीवार साहेब मंत्री ओबीसी विभाग, मा श्री देवेंद्र फडणवीस साहेब विरोधी पक्षनेते विधानसभा, मा श्री नानाभाऊ पटोले साहेब प्रदेशाध्यक्ष भा रॉ काँग्रेस, मा श्री चंद्रकांत पाटील साहेब प्रदेशाध्यक्ष भा ज पा, मा ना श्री डॉ राजेंद्र शिंगणे साहेब पालकमंत्री बुलढाणा,मा श्री प्रतापराव जाधव खासदार बुलढाणा, मा श्री संजय कुटे साहेब आमदार जळगांव जामोद, मा श्री बबनराव तायवाडे साहेब राष्ट्रीय अध्यक्ष ओबीसी महासंघ, मा श्री रमेशचंद्र घोलप साहेब राष्ट्रीय उपाध्यक्ष ओबीसी महासंघ, मा जिल्हाधिकारी साहेब बुलढाणा यांना निवेदनाच्या प्रतिलिपी देण्यात येतील असे आयोजकांनी कळविले.
या निवेदनावर श्रीकृष्णभाऊ केदार, सुभाषभाऊ हागे, पांडुरंगभाऊ हागे,श्यामभाऊ डाबरे, सखारामभाऊ ताडे, अर्जुनभाऊ घोलप, रमेशभाऊ ताडे, अशोकभाऊ काळपांडे, सुरेशभाऊ हागे,महादेवभाऊ धुर्डे,गुणवंतभाऊ कपले,बाळूभाऊ धुळे,डॉ गणेश दातीर, रमेशभाऊ कोथळकर,महेंद्रभाऊ बोडखे,पुंडलिकभाऊ पाटील,संतोषभाऊ टाकळकर,रामेश्वरभाऊ केदार, शत्रुघ्नभाऊ मिरगे, रमेशभाऊ बानाईत,राजुभाऊ हिस्सल,पांडुरंगभाऊ म्हस्के,मोहनभाऊ वंडाळे,गोपालभाऊ कोथळकर, श्रीकृष्णभाऊ गाडगे,भास्करभाऊ पाटिल, विजुभाऊ गाडगे,बळीरामभाऊ धुळे विलासभाऊ हागे, रवींद्रभाऊ बोडखे,अर्जुनभाऊ रौदळे,बाळूभाऊ पाटिल, संतोषभाऊ हागे, मोहनभाऊ सांगळे, समाधानभाऊ नानकदे,श्रीरामभाऊ मिसाळ, शंकरभाऊ म्हस्के, सुरेशभाऊ काळपांडे, ज्ञानदेवभाऊ काळपांडे, गोपालभाऊ ढगे, सोमेशभाऊ लाड, अनीलभाऊ ढगे,वसंतभाऊ अंबडकार,राजुभाऊ मिसाळ व असंख्य समाज बांधव उपस्थित होते.