Home Blog Page 444

रुग्णमित्र गजु कुबडे यांच्या पाठपुराव्याने हिंगणघाट मतदार संघातील समस्यांची ना.बच्चूभाऊ यांनी घेतली दखल !

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट हिंगणघाट मतदार संघातील लाल नाला व पोथरा प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांचे निवारण होण्यासाठी येथील प्रहारचे धडाडीचे कार्यकर्ते श्री गजू कुबडे हे सन 2013 पासून सातत्याने सनदशीर मार्गाने विविध अभिनव आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेत होते.पण कुंभकर्णी झोपेत असलेल्या प्रशासनाने या न्याय्य मागण्याची कधी दखल घेतली नाही.मात्र या प्रश्नाची माहिती गजू कुबडे यांनी ना.कडू यांना करून दिली व या विभागाचे जलसंपदा राज्यमंत्री ना.बच्चूभाऊ कडू यांनी त्वरित या प्रकरणाची दखल घेत या संदर्भात विदर्भ पाटबंधारे विभागाचे कार्यकारी संचालक, नागपूर,यांना हिंगणघाट येथे होणाऱ्या संभाव्य आढावा बैठकीच्या कार्यवाहीसाठी तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
या संदर्भात मिळालेल्या माहिती नुसार,हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील समुद्रपूर तालुक्यातील पोथरा व लाल नाला प्रकल्पात तेथील शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्याने अनेक शेतकऱ्यांचे योग्य त्या स्वरूपात पुनर्वसन न झाल्याने तेथील भूमिपुत्र प्रचंड त्रासात जीवन जगत आहेत.या प्रकल्पग्रस्तांनी मागील 40 वर्षात विविध आमदार ,खासदार ,मंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांना निवेदन दिले,साकडे घातले पण त्याचा उपयोग झाला नाही.अखेर शेवटी हे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांनी ही बाब प्रहारचे गजू कुबडे यांना सांगितली मागील आठ वर्षांपासून श्री कुबडे हे सातत्याने या प्रकल्पग्रस्तांसाठी झटत आहेत.त्यांनी या न्यायोचित मागणी साठी विविध अभिनव आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले.या मागणी साठी त्यांनी २०१३ ला समुद्रपूर तहसील कार्यालयात दीड तास निबाच्या झाडाला उलटे टांगून घेतले.२०१४ मध्ये कडाक्याच्या थंडीत एसडीओ कार्यालय हिंगणघाट समोर उघड्यावर सत्त्याग्रह केला होता.या आंदोलनाची दखल घेत या विषयांवर अनेकदा जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकी घेण्यात आल्या पण बैठकीत घेण्यात आलेल्या निर्देशांचे कोणतेही पालन आजवर झालेच नाही.प्रश्न तसेच पडून होते.या बाबत दि २५ फेब्रुवारी २०२१ ला जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.जुन्या बैठकीत झालेल्या निर्णयाची अमंलबजावणी करण्याची मागणी केली त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी या विषयावर बैठक लावण्याचे आश्वासन दिले परंतु पाच महिने होऊनही अजून पर्यत बैठक लावण्यात आली नाही.सरतेशेवटी दि २४ जूनला गजू कुबडे यांनी ना बच्चूभाऊ यांची अचलपूर येथे भेट घेतली व त्यांना या प्रकल्पग्रस्तांच्या मागणीचे निवेदन दिले. ना.बच्चूभाऊ यांनी तातडीने या निवेदनाची दखल घेत त्याच दिवशी विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक नागपूर यांना एक पत्र देऊन हिंगणघाट येथे संभाव्य आढावा बैठक संदर्भात या प्रश्नावर आजपर्यंत केलेल्या कारवाईचा अहवाल तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
ही आढावा बैठक जलसंपदा राज्यमंत्री ना.बच्चूभाऊ कडू यांच्या अध्यक्षतेखाली येथील उपविभागीय कार्यालय हिंगणघाट येथे होणार आहे.
या प्रकल्पग्रस्तांच्या काही वाढीव मागण्या असून त्यात लिफ्ट इरिगेशन,पोथरा प्रकल्पाच्या डावा कालवा दुरुस्ती,लाल नाला व पोथरा प्रकल्पाचा उपसा केल्यास पाण्याच्या पातळीत वाढ होईल.लाल नाला प्रकल्प अंतर्गत खापरी,चापापूर,गिरगाव कोसरसार येथे मायनर इरिगेशन करून देण्यात यावे, पोथरा प्रकल्प अंतर्गत उजव्या कालव्यावरून वेस्टर्न मायनर इरिगेशन रूनका,निंभा,आरंभा, किन्ही,कवठा, नंदोरी वरून देण्यात यावे ,पोथरा प्रकल्पाच्या वरती वेस्ट विव्हरच्या मार्गावर पुलाचे बंधकाम किंवा कवठा पोच रस्त्यांचे डांबरीकरण करून नदीवर पूल बांधण्या संदर्भात डोंगरगाव पुनर्वसन संदर्भात मंजुरी झालेल्या आठ हजार रुपयांचे वाटप करण्यात यावे व लाल नाला व पोथरा प्रकल्प मधील काही उर्वरित प्रकल्प ग्रस्तांना प्लॉट मिळण्यात यावे इत्यादी या प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या आहेत.
या विषयावर होणाऱ्या बैठकीकडे सर्व प्रकल्पग्रस्तांचे लक्ष लागलेले आहे.

यावल येथे छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशन व करिअर अकॅडमी सामान्य ज्ञान स्पर्धला विद्यार्थीनी व विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील विरावली येथील छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशन संचलित संकल्प करिअर अकॅडमी यावल येथे आज सामान्यज्ञानची सराव परीक्षाचे आयोजन करण्यात आले होते, यात परिसरातील सुमारे १५० विध्यार्थी – विद्यार्थिनी यांनी आपला सहभाग घेतला या वेळेस कार्यक्रमात यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थीनींना सन्मानपत्र आयोजकांच्या हस्ते वितरण करण्यात आले, या कार्यक्रमात प्रमुख म्हणून यावल रावेर विधानसभेचे आमदार शिरीष मधुकरराव चौधरी यांचे चिरंजीव धनंजय शिरीष चौधरी व छत्रपती शिवाजी महाराज फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादी युवक चे अध्यक्ष अॅड देवकांत बाजीराव पाटील ,कोरवापलीचे सरपंच विलास नारायण अडकमोल, यांचे उपस्थितीत बक्षीस वितरण कार्यक्रम झाला .कार्यक्रमात उपस्थिती बद्दल करिअर अकॅडमी चे संचालक बादल तायडे व सावन तायडे यांनी आभार मानले .बक्षीस वितरणा पूर्वी कार्यक्रमात अॅड . देवकांत पाटील व धनंजय चौधरी यांनी विद्यार्थांना मार्गदर्शन करून करिअर अकॅडमी ला मदती साठी नेहमी तत्पर राहू असे आश्वासन दिले , अकॅडमीचे संचालक बादल तायडे (राष्ट्रीय खेडाडू )मुंबई पोलीस यांचे या अभिनव उपक्रमा चे कौतुक करत अल्पशा: फीज मध्ये राबवत असलेल्या बद्दल या कार्याला त्यांनी शुभेच्छा दिल्यात . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संचालक बादल तायडे सावन तायडे आणि त्यांच्या सर्व सहकार्याने महत्वाचे परिश्रम घेतले.

किनगाव येथे पोलीस अधिक्षक यांच्या पथकाने टाकला जुगार अड्डयावर छापा पाच लाख रुपयांचे मुद्देमाल केले जात अवैद्य व्यवसीकांमध्ये खळबळ

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्‍यातील किनगाव- इचखेडा रस्त्यावरील दगडू विश्राम पाटील यांचे शेताजवळील बखळ जागेवरील पत्री शेडमध्ये बावन्न पत्त्याचा खेळ(झन्ना-मन्ना ) खेळ सुरू असतांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकत ११ जुगार खेळणाऱ्या संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांचेकडून पंधरा हजार वीस रुपये रोकड व सहा मोटर वाहने व मोबाईल असा पाच लाख ४२ हजार ५२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे एकाच आठवड्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शहरासह तालुक्यात टाकलेला हा दुसरा मोठा छापा आहे. त्यामुळे तालुक्यातील अवैधधंदे वाल्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
यावल तालुक्यातील किनगाव – इचखेडा रस्त्यावरील दगडू विश्नाम पाटील यांचे शेताजवळील पत्री शेडमध्ये गुरुवारी सायंकाळी बावन पत्त्याचा खेळ सुरू असतांना जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने छापा टाकला . या वेळी किनगाव येथील राजू तडवी नावाचे व्यक्ती हा जुगार खेळवत असल्‍याचे तक्रारीत म्हटले आहे याप्रकरणी कडू साळुंके, संजय कोळी, वासुदेव कोळी, रवींद्र पाटील, ज्ञानदेव पाटील , रफिक शहा, शेख शरीफ शेख हसन , गणेश भंगाळे विजय साळुंखे, इस्‍माईल तडवी, विलास पाटील अशा अकरा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर दहा ते बारा इसम पोलीस पथक आल्याचे पाहून पसार झाले, संशयिताकडून पंधरा हजार वीस रुपयांची रोकड ४ लाख १५ हजार रुपये किमतीच्या मोटरसायकली व मोबाईल्स असा मुद्देमाल जप्त केला आहे. कार्यवाही केलेल्या या पथकात जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे वाचक तथा सपोनि एस .एच .अखेगावकर, हे. कॉ. प्रवीण पाटील, जमील अहमद खान, भूषण मांडोळे, रवींद्र पाटील ,आसिफ पिंजारी ,भरत डोके, यांचा समावेश आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम येथील यावल पोलिस स्टेशनला सुरू होते.

नगरसेवकाचे दुर्लक्ष वॉर्डातील रहिवासी यांचे नगराध्यक्षास वार्डातील समस्या बद्दल निवेदन !

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट दि.1.7.21  शास्त्री वार्ड व डॉ. मुजुमदार वार्ड येथील स्थानिक रहिवासी यांना गीमाटेक्स कंपनी च्या बाजूला असलेल्या रोडवर गड्डे पडल्याल्यामुळे पावसाळ्यात त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे कधी पण अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रोडची दुरुस्ती करण्यात यावी , रोडला लागूनच मोठा नाला असल्यामुळे जाण्या येणाऱ्यांना जीव मुठीत घेऊन जाणे-येणे करावे लागते तसेच या नाल्याची साफसफाई होत नसल्यामुळे परिसरात मच्छराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत त्यामुळे रोगराई पसरण्याची दाट शक्यता असल्यामुळे फवारणी करण्यात यावी संबंधित निवेदन नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांना देताना वार्डातील अश्विन ढाले, संदीप ठमके, रवी अवघडे, गजानन वाकडे, नरेश रामटेके , संजय सरपाते , विनोद नारनवरे, सचिन कापसे, बबलू शेख, ताराचंद देव्हारे व इतर नागरिक उपस्थित होते

हिंगणघाट शहरात मोठ्या प्रमाणात रोगराईत वाढ होत आहे ? वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद कडून मुख्याधिकारी यांना निवेदन .

0

 

सचिन वाघे वर्धा

दि.1.7.21हिंगणघाट शहरामध्ये गेल्या एक महिन्यापासून डेंगू या विषाणू जन्य आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. सध्या पावसाळा सुरू आहे त्यामध्ये काही दिवस पडणाऱ्या पावसाने उघडीप घेतल्यामुळे जागोजागी साचून राहिलेल्या पाण्यात डेंगू चे विषाणू वाढतात. इडास जाती च्या डासांमुळे हा आजार पसरतो. डेंगू हा विषाणूजन्य आजार असून हा तीव्र फ्लू सारखा आजार आहे आणि या मध्ये मृत्यू ओढवण्याची शक्यता असते. त्यामुळे या आजारांवर वेळीच नियंत्रण आणणे गरजेचे आहे.
त्याकरिता संपूर्ण शहरात नाली सफाई, धूर फवारणी व साचलेल्या पाण्याच्या डबक्यामध्ये आणि नाल्यामध्ये विषानुनाशक औषधी ची फवारणी करण्या संबंधी चे निवेदन देण्यात आले व उपाययोजना करण्या संबंधी चर्चा करण्यात आली. मा. मुख्याधिकारी साहेबांनी त्वरित निवेदनावर विचार करून पुढील कार्यवाही करिता पाठविले व लवकरच सुचवलेल्या उपाय योजनां करण्यात येईल याबद्दल आश्वासन दिले. यावेळी संघटनेचे विधानसभा अध्यक्ष अक्षय थूटे, तालुका अध्यक्ष दिनेश काटकर, तालुका सचिव गौरव गोहाडे, अभिजीत साबळे, रजत मोगरे, शुभम घोडे आदि पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

समाजसेवक विठ्ठल गुळघाणे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा. वृक्षपरिवाराचेवतीने वृक्षारोपण करीत साजरा केला जन्मदिन

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट दि.०१ जुलै निसर्गाचे आपल्याला काही देणे लागते,ही भावना जोपासत कोणत्याही प्रसंगी वृक्षारोपण करुन प्रत्येकाने पर्यावरणाप्रती आपले योगदान द्यावे,असे आवाहन आपल्या वाढदिवसप्रसंगी समाजसेवी विठ्ठल गुळघाणे यांनी सत्कारसमयी केले.
शहरातील सुपरिचित व्यक्तिमत्व तसेच माजी नगरसेवक विठ्ठल गुळघाणे यांचा वाढदिवस स्थानिक वृक्षमित्र परिवाराचेवतीने साजरा करण्यात आला.याप्रसंगी त्यांचा सत्कारही करण्यात आला.
यावेळी फक्त वृक्षारोपण न करता लावलेली झाडे सुरक्षित राहवी यासाठी श्रीयुत गुळघाणे यांनी ५१ मोठ्या लोखंडी ट्री गार्डची व्यवस्था केली असून त्यांचे जन्मदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या झाडांची काळजीसुद्धा वृक्षपरिवाराचेवतीने घेण्यात येणार आहे.
श्रीयुत गुळघाणे हे समाजसेवी म्हणून सुपरिचित व्यक्तिमत्व असून कोरोनाप्रादुर्भावाचे काळात त्यांनी कोणताही गवगवा न करता शेकडो निराधार,गरजु नागरिकांना जीवनावश्यक साहित्यांचा पुरवठा केला.
श्रीयुत गुळघाणे यांचे हे समाजकार्य सतत सुरुच असून तालुक्यातील ग्रामीण भागातसुद्धा त्यांचेकडून कोरोनाकाळात गोरगरीब,निराधारांना जीवनावश्यक साहित्यांचे वितरण करण्यात येत आहे.
त्यांचे अभिनंदन पर कार्यक्रमात राजु रुपारेल,नितिन क्षीरसागर,सुरेंद्र टेंभुर्णे,देवा बोरकर,शंकर झाडे,ज्वलंत मुन,आशिष खिळेकर,गणपत नेहारे,दर्शन बाळापूरे,गोपाल मांडवकर,गुंणवंत कोठेकर, हुलके सर, भोमले सर , सिडाम सर,आडे सर ,नरवटे सर,शंकर मुंजेवार ,चंद्रकांत घुसे,सतिश धोबे ,बंटी वाघमारे,एड.ऋषि सुटे, एड.अशोक काकडे, एड ढेकले इत्यादि मान्यवर उपस्थित होते.

विनापरवाना दारू वाहतूक करणाऱ्या चौघांना अटक सहा लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

जळगाव जामोद पोलीस विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या चौघांना बुधवार दिनांक 30 जून रोजी अटक करण्यात आली याबाबत जळगाव जामोद पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अरविंद चावरिया जिल्हा पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक हेमराज सिंह राजपूत आणि बनसोडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यांना माहिती मिळाली की पळशी फाट्यावर विनापरवाना अवैधरित्या दारूची चौघेजण वाहतूक करीत आहेत या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक गीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक निलेश शेळके श्रीकांत जिदमवार श्रीकृष्ण चांदुरकर पोलीस कॉन्स्टेबल गजानन गोरले विजय सोनोने सचिन गुंजकर यांनी फरशी फाटा येथे सापळा रचला त्या वेळी समोरून येणाऱ्या चार चाकी वाहन आणि मोटर सायकल पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला यावेळी तपासणी केली असता त्यांच्याकडून 4 बाॅक्स देशी दारू किंमत 13 हजार 440 रुपये विनापरवाना मिळून आली यावेळी पोलिसांनी सागर वासुदेव कोकाटे व 26 राहणार पळशी सुपो अतुल अरुण मानकर वय 30 राहणार पिंपळगाव काळे विवेक प्रल्हाद श्रीनाथ वय 21 वर्षे राहणार शिव शंकर नगर तालुका नांदुरा आणि श्याम कैलास घटे वय पंचवीस वर्ष राहणार पिंपळगाव काळे या चौघांना ताब्यात घेतले यावेळी नगदी 6000 चारशे रुपये चार चाकी वाहन एक मोटर सायकल किंमत 6 लाख 50000 रुपये 4 मोबाइल हँडसेट किंमत 26 हजार रुपये असा एकूण सहा लाख 95 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला चौघा आरोपींना अटक करून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे

नगरपरिषद प्रशासनाने महिला व बाल रुग्णालय सुरू करावे , विदर्भ विकास आघाडीचे अनिल जवादे यांची मागणी

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट शहराची लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे. आज घडीला ते दोन लाखाच्या वर पोहोचली असतानाही शहराची सार्वजनिक आरोग्यसेवा मात्र जेमतेम आहे. खरे तर सुमारे दोन लाखाची लोकसंख्या असलेल्या हिंगणघाट शहरात नगरपरिषदेचे स्वतःच्या मालकीचे सुसज्ज असे रुग्णालय असणे गरजेचे होते परंतु याकडे नगरपरिषद प्रशासनाचे कित्येक वर्षांपासून दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या शहरात एकच सरकारी रुग्णालय असून तेही शहराच्या एका टोकाला असल्यामुळे सर्वसामान्य गरीब माणसाला ऑटो रिक्षाचे पैसे खर्च करून उपचारासाठी रुग्णालयात जाणे शक्य नाही. सार्वजनिक रुग्णालयांमध्ये उपचाराकरिता सर्वसामान्य गरीब माणूस जात असतो. सध्याची एकंदर परिस्थिती पाहता गरीब माणूस हा आर्थिक दृष्ट्या पूर्णपणे पिचल्या गेलेला आहे आणि यापुढे तो कित्येक वर्ष आर्थिक चक्रात भरडला जाणार आहे. याचा सर्वात जास्त त्रास हा महिलांचे मानसिकतेवर होऊन त्यांना अनेक आजारांचा सामना करावा लागतो आहे. हायपरटेन्शन ,मधुमेह, कर्करोग , कॅन्सर अशा अनेक गंभीर आजाराशिवाय पाठ दुखी, सांधेदुखी, श्वसनाचे आजार, युरिन इन्फेक्शन इत्यादी आजारांना गरीब स्त्रियांना बळी पडावे लागत आहे. वातावरणातील बदल आणि प्रदूषण यामुळे लहान मुलांनाही डेंगू ,मलेरिया, निमोनिया, विषाणूजन्य ताप अशा विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. जगभरात थैमान घालणारा कोरोना विषाणू वेगवेगळी रूपे धारण करून नागरिकांच्या आरोग्यावर घाला घालीत आहे. त्यातलाच एक डेल्टा प्लस हा सर्वात घातक विषाणू लहान मुलांसाठी अतिशय घातक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सूचित केले आहे. गरीब वर्ग नेहमी आर्थिक विवंचनेत असल्यामुळे तो खाजगी दवाखान्यात महागडी फी देऊन आपल्या आरोग्यावर खर्च करू शकत नाही. त्यामुळे हिंगणघाट शहरातील नागरिकांना महिला व बाल रुग्णालयाची नितांत आवश्यकता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर शहरातील स्त्रियांचे आणि बालकांचे आरोग्य नीट राहता यावे. आणि कमी दरात त्यांना उपचार घेता यावे यासाठी नगरपरिषद प्रशासनाने शहराच्या मध्यभागी स्वतःच्या मालकीचे महिला व बाल रुग्णालय सुरू करण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करून तो शक्य तेवढ्या लवकर मंजूर करून घ्यावा अशी मागणी विदर्भ विकास आघाडी यांच्यावतीने करण्यात येत आहे. दरम्यान केंद्रीय मंत्री माननीय नितीनजी गडकरी हे हिंगणघाट ला उड्डाणपुलाचे उद्घाटन करण्याकरिता आले असता आमदार समीर कुणावर साहेब यांनी त्यांना वैदयकीय महाविद्यालय सुरू करणे संदर्भात निवेदन दिले. हिंगणघाट शहरात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणे हे अत्यंत आवश्यक आहे. परंतु सध्या हिंगणघाट शहराच्या वैदयकीय परिस्थितीचा विचार करता महिला व बालरुग्णालयांची नित्तांत आवश्यकता आहे. कोरोनमुळे सर्वसामान्य व्यक्ती आर्थिक विवंचनेत सापडलेला आहे अश्या परिस्थितीत त्याला उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा देने गरजेचे आहे. आणि नगरपालिकेची आरोग्य सेवा शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत तोकडी पडत आहे .माननीय आमदार साहेबांची सत्ता असलेल्या व त्यांचे अधिकारांमध्ये असलेल्या हिंगणघाट नगरपरिषदे द्वारे एक महिला व बाल रुग्णालय हिंगणघाटच्या मध्य भागांमध्ये सुरू करण्याची शिफारस त्यांनी करावी. अशी विनंती त्यांना विदर्भ विकास आघाडी तर्फे करण्यात येत आहे . संबंधित निवेदन मुख्याधिकारी साहेब हिंगणघाट आणि नगर परिषद अध्यक्ष प्रेम बसंतानी यांना विदर्भ विकास आघाडी चे वतीने देण्यात आलेले आहे. यावेळी अनिल जवादे यांच्यासोबत महेश माकडे ,दिनेश वाघ, राजू कुरेकार, जयंत धोटे ,अजय मुळे ,गोलू भोंगाडे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते

डोंगर कठोरा येथे झन्नामन्ना जुगारीच्या अडुयावर यावल पोलीसांची कारवाई १० जणांसह तिन मोटरसायकल असे एक लाख ३ हजाराचे साहीत्य जप्त

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील डोंगर कठोरा येथे एका मंदीरा जवळ सार्वजनिक ठीकाणी झन्नामन्ना हा पत्त्याचा जुगार खेळतांना पोलीसांनी धाड टाकुन ११ जणांसह ५२पत्त्याचे साहीत्य हिरो कंपनीच्या ३ मोटरसायकलीसह ५० हजार रुपये रोख असे १ लाख३ हजाराहुन रक्कम जप्त केली आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहितीनुसार दिनांक ३० जुन रोजी १७ वाजेच्या सुमारास डोंगर कठोरा गावातील डोंगर कठोरा ते यावल रस्त्यावरील खंडेराव मंदीरा जवळील खुल्या पटांगणावर सार्वजनिक ठीकाणी जगदीश रतन धनगर, राहणार सांगवी बु॥तालुका यावल , मिलींद संतोष कोळी , राहणार डोंगर कठोरा ता . यावल , तुषार वसंत फेगडे , रा . अट्रावल ता . यावल , प्रदीप रवीन्द्र भालेराव , राहणार कोळवद ता . यावल , गोवींदा सुरेश कोळी, रा . अट्रावल ता . यावल ,नितिन पंढरीनाथ चौधरी , राहणार अट्रावल ता . यावल,अन्वर फकीरा तडवी, राहणार डोंगर कठोरा ता . यावल , सुशाल अशोक कोळी , रा .डोंगर कठोरा ता . यावल , दिलीप कृष्णा तेली राहणार सांगवी बु॥ तालुका यावल , चंदन भिमराव अढाईगे राहणार कोळवद ता . यावल , असा दहा जणांना झन्नामन्नाचा जुगार खेळतांना पत्ता जुगारीचे साहित्य साधनासह तिन मोटरसायकली सह एकूण एक लाख तिन हजार५५oरुपयांचे म्हणुन जुगारीच्या ठीकाणाहुन जप्त करण्यात आले असुन, यासंदर्भात यावल पोलीस स्टेशनला नेमणुकीस असलेले पोलीस अमलदार सुशिल रामदास घुगे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस स्टेशनमध्ये मुबंई जुगार अॅक्ट प्रमाणे १२प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन , पोलीस निरिक्षक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सहाय्यक फौजदार मुजफ्फर खान हे आपले सहकारी पोलीस कर्मचाऱ्यांच्या सोबत करीत आहे. दरम्यान जिल्हा पोलीस अधिक्षक प्रविण मुंडे यांच्या आदेशाने चार दिवसापुर्वीच यावल शहरातील एका जुगारीच्या अड्डेयावर धाड टाकण्यात आली होती त्यानंतर यावल पोलीसांनी जुगारीच्यावरील दुसरी कार्यवाही असुन या कार्यवाहीचे विशेष करून महीला वर्गाकडुन स्वागत करण्यात येत असुन , याचप्रमाणे तालुक्यातील आणखी कुठअशा प्रकारे जुगारीचे अड्डे चालत असतील तर ते देखील बंद करावे अशी अपेक्षाकृत मागणी नागरीकांकडुन होत आहे .

मुख्य रस्ता पाण्याखाली येत असल्याने सामजिक कार्यकते व ग्रामस्थ यांचे खड्यात बसून आंदोलन …

0

 

सार्वजनिक बांधकाम विभाग यावल चे अधिकारी अजीत निंबाळकर यांची आंदोलनास्थळी भेट

 

यावल तालुका (प्रतिनिधी) विकी वानखेडे

तालुक्यातील साकळी गावापासून ते साकळी फाट्यादरम्यान रस्त्यावर पावसाचे पाणी तुंबत असल्याने पाण्याची कायमस्वरूपी समस्या सोडविण्यात यावी हा मुख्य रस्ता पाण्याखाली येत असून मोठ्या प्रमाणावर लोकांची रहदारी तसेच उर्दू शाळेच्या मुलांना देखील हा एकमेव रस्ता आहे त्यामुळे मोठी अडचण निर्माण झाली आहे यासाठी साकळी येथील सामाजिक कार्यकते मिलिंद जंजाळे यांनी संबधित अधिकारी व प्रशासन यांना निवेदन दिले होते मात्र तरी सुद्धा प्रशासनाने याची दखल घेतली नाही त्यामुळे आज साकळी गाव ते साकळी फाट्या दरम्यान मेन रस्त्यावरील साचलेले पाणीच्या खड्यात बसून निंद्र अवस्थेत असलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी सामाजिक कार्यकते मिलिंद जंजाळे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग,स्थानिक ग्राम पचायत प्रशासनच्या भोंगळ कारभाराच्या विरोधात घोषणा देत आंदोलन केले या आंदोलनाला गावातील उर्दू शाळा शिक्षक पालक तसेच रिक्षाचालक मालक व स्थानिक ग्रामस्थ यांनी संपूर्ण पाठींबा दिला यात सामाजिक कार्यकते मिलिंद जंजाळे,विजय जंजाळे आकाश जंजाळे उर्दू शाळेचे शिक्षक फैसलखान सर रिक्षा चालक युनियनचे अध्यक्ष अकबर शेख फरीद खान, सैय्यद अजगर सैय्यद अझहर, लाला डायव्हर,अंजुम शेख, पिंटू तडवी, अरुण भोई ,न्याजोद्दिन तडवी, आदी ग्रामस्थ व वाहन चालकांनी उपस्थित राहुनआंदोलनात सहभाग घेतला .
दरम्यान सार्वजनिक बांधकाम विभाग यावल चे अधिकारी अजीत निंबाळकर यांनी आंदोलना स्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांच्या अडचणी व ग्रामस्थांच्या समस्या जाणून आंदोलनकर्त्यांना रस्त्याच्या बाजुस असलेल्या अपुर्ण गटारींच्या कामाबाबत लक्ष देणार असल्याचे लेखी आश्वासन दिले तसेच ग्राम पचायत प्रशासनास तात्काळ अतिक्रमण काढण्याच्या नोटीसा देऊन अतिक्रमण काढावे जेणे करून पाणी साचणार नाही असे आदेश दिले व त्या खड्यावर मुरूम टाकून सध्या स्थितीत रस्ता दुरुस्थ करून देतो व येणाऱ्या काळात निधी वापरून कायमस्वरूपी रस्त्याचे काम मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले ज्यामुळे सामाजीक कार्यकर्त मिलींद जंजाळे यांनी ग्रामस्थाच्या न्याय हक्कासाठी आपल्या सहकार्यांच्या सोबत केलेल्या आंदोलनाची दोन तासांनी यशस्वी माघारर घेण्यात आली .