Home Blog Page 445

कोरोना लसीकरण मोहिमे संदर्भात जाहिरातबाजी जास्त लसीकरण केंद्र बंद.

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट दि.30.6.21 कोरोनापासून मुक्त होण्यासाठी नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसिकरण करवून घेण्याचा प्रचार शासनाचे वतीने करण्यात येत असला तरी लसिकरणासाठी आवश्यक असलेल्या लसिच्या मात्रा सरकारकड़े पाहिजे त्या प्रमाणात उपलब्ध नसल्याचे निदर्शनास येत आहे.
लसिकरण मोहिमेसंदर्भात माहिती घेतली असता तालुक्यातसुद्धा आज लसिचा तूटवडा असल्याने लसिकरण केंद्रांवर जावून नागरिक परत येतांना आढळले.
जिल्हा पातळीवरुन लसिचा पुरवठा संपला असल्याने सर्वच वयोगटातील लसिकरण बंद असल्याचे दिसुन येत आहे.
आरोग्य प्रशासनाकडून माहिती घेतली असता कोरोना लस संपल्याने लसिकरण केंद्रे बंद असून पुढील 1 – 2 दिवसात जिल्हा पातळीवरुन लसिचा पुरवठा झाल्यावर लसिकरण तात्काळ सुरु करण्यात येईल,अशी माहिती तालुक्याच्या आरोग्य अधिकारी डॉ.माधुरी कुचेवार(दिघे) यांनी दिली.

नवीन नियमानुसार मतदार यादीत नावासोबत छायाचित्रअसणे आवश्यक आहे नसल्यास मतदानापासून वंचित !

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट :- 30.6.21  लोकशाही प्रक्रियेत मतदानाचा हक्क बजावने कर्तव्याचे मानले जाते परंतु नवीन नियमानुसार मतदान यादीत फोटो असणे अनिवार्य करण्यात आले आहे मतदान यादीत फोटो नसलेल तर मतदाराचे मतदार यादीत नाव वगळले जाईल अशी माहिती उपविभागीय अधिकारी हिंगणघाट मतदार नोंदणी अधिकारी हिंगणघाट विधानसभा मतदार यांनी दिली हिंगणघाट विधानसभा मतदार संघामध्ये मतदार यादीत फोटोसह पूर्णनिरीक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे .46 हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ अंतर्गत हिंगणघाट तालुक्यात एकूण 166 मतदान केंद्र असून त्यापैकी 150 मतदान केंद्राच्या यादीत पाच हजार 979 त्यांचे छायाचित्र नाही यांच्या बाबतीत मतदान केंद्रीय अधिकारी यांच्यामार्फत ग्रुप भेटीदरम्यान फोटो नसलेल्या मतदारांची तिथे राहत नसल्याचे समोर आले आहे त्यांची नावे कटाक्षाने वगळले जाईल मतदानाचे कर्तव्य पुढेही सहजतेने करता यावे यासाठी मतदारांनी मतदार यादीत आपले छायाचित्र आहे किंवा नाही याची खात्री करून तहसील कार्यालयात जाऊन यादी पाहून व त्याच्या नावापुढे छायाचित्रे नाही अशी मतदारांनी 10-7-2019 पर्यंत आपला फोटो मागे नाव लिहून हिंगणघाट येथील तहसील कार्यालयातील निवडणूक विभागात फोटो जमा करा असे आव्हान हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्री चंद्रभान खंडाईत यांनी केली आहे

यावल तालुक्यातून सावखेडासिम प्रा.आरोग्य केंद्रातील आदिवासी भागात कोविड लसीकरणास प्रारंभ

0

 

यावल (प्रतिनिधी ) विकी वानखेडे

यावल :- प्रा. आ. केंद्र सावखेडासिम कार्यक्षेत्रातील आदिवासी भागात यावल तालुक्यातुन कोविड लसीकरणाचा प्रारंभ करण्यात आला.
नवसंजीवनी कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील प्रा. आ. केंद्र सावखेडासिम कार्यक्षेत्रात येणारे सातपुडा पर्वतातील, राज्याच्या सीमेवर, अतिदुर्गम व आदिवासी भागातील जामन्या तसेच हरिपुरा व परसाडे येथे कोविड लसीकरणास प्रारंभ करण्यात आला.
ता. आरोग्य आधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे, प्रा.आ. केंद्र सावखेडासिम चे वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे व डॉ. नसीमा तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली आदिवासी भागात लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले.
आदिवासी भागात लसीकरणात अल्प प्रतिसाद मिळत असून १८ वर्षावरील व ४५ वर्षावरील जामन्या येथे १५, हरिपुरा येथे १२, तर परसाडे येथे १४० असे एकूण १६७ नागरिकांना आदिवासी भागात कोविशील्ड लसीचा पहिला डोस देण्यात आला.
जामन्या येथे ता. आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत ब-हाटे वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे, मानसेवी डॉ. प्रवीण ठाकरे, आरोग्य सहाय्यक लुकमान तडवी, आरोग्य सेवक अरविंद जाधव, आरोग्य सेविका शाबजान तडवी, शिवप्रताप घारू, व समीर तडवी तर परसाडे येथे सरपंच बबीताताई तडवी, उपसरपंच रुस्तम तडवी, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ.साजिद तडवी व डॉ.राहुल गजरे. आरोग्य पर्यवेक्षिका शोभा चौधरी, आरोग्य सेवक भुषण पाटील,आरोग्यसेविका महमुदा तडवी, गटप्रवर्तक सरला तडवी, ग्रामसेवक मज्जित तडवी, ग्रा. पं. सदस्या रहिमत तडवी, व हुसेन तडवी तर हरिपुरा येथे मोहराळा-हरिपुरा ग्रुप ग्रा. पं. सरपंच नंदाताई महाजन, उपसरपंच जहांगीर तडवी, समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. रोशनआरा शेख, आरोग्य सेवक बालाजी कोरडे, आदी पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
लसीकरण शिबिरास आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी व जामन्या येथील वनाधिकारी अक्षय म्हेत्रे यांचे विशेष सहकार्य लाभले.

यावल तहसील कार्यालयात पावसाळ्याच्या पार्श्वभुमीवर आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्ष स्थापन२४ तास कक्ष कार्यरत

0

 

 

यावल तालुका (प्रतिनिधी) विकी वानखेडे

 

येथील तहसीलच्या नवीन प्रशासकीय ईमारतीत २४ तास असणारे नियंत्रण कक्ष ( कंट्रोल रूम ) स्थापन करण्यात आले असुन, अवर्गवारीत ३१तर ब वर्गवारीत १२ अधिकारी व कर्मचारी यांच्या नियुक्त्या जिल्हाधिकारी जळगाव यांच्या पत्रानुसार करण्यात आल्या आहेत . पावसाळयाच्या पार्श्वभुमीवर येणाऱ्या अतिवृष्टी व पुर परिस्थिती व येणाऱ्या संकटांवर नियंत्रण ठेवण्या करीता जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या प्राप्त पत्रानुसार फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग व तहसीलदार महेश पवार तसेच निवासी नायब तहसीलदार आर .के .पवार , एस.डी . पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचारी यांच्या पुढीलप्रमाणे आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षा करीता नेमणुका करण्यात आल्या आहे , महसुल सहाय्यक म्हणुन तहसील कार्यालय यावल मधील राखीव कर्मचारी म्हणुन डी .एस . बाविस्कर , ए .डी . बनकर , एस .डी . जाधव , डी .पी . भुत्तेकर , एच.एम . कांबळे , एल .आर . तडवी , एस. डी . पाटील अशी नांवे असुन दिनांक १ जुन२o२१ ते३० सप्टेंबर २०२१या कालावधीत येणाऱ्या प्रत्येक शनीवार व रविवार शासकीय सुटीच्या दिवशी नियंत्रण कक्षा करीता हजर राहण्यासाठी नेमणुका करण्यात आल्या आहेत . दरम्यान एम .बी . पाटील , आर. डी. अहीरे, ( पंचायत समिती यावल ) , ए .यु . कदम , व टी .आर . हिवाळे , एस .डी . मावळे , ( भुमि अभिलेख कार्यालय यावल ) , दस्तगीर जोहरबक्ष तडवी, जी .एम . चौधरी , ( सहाय्यक निबंधक सह . संस्था यावल ) , आर .एस . वाघ व आर .एस . बावस्कर एम .ए .बजाज ( परिचर पंचायत समिती यावल ) , जी .एस . जावळे ( वरिष्ठ सहाय्यक ग्रामीण पाणीपुरवठा यावल ) , एस .जे . सोनवणे, सां बा. वि . यावल व एम .एच. हिरवळकर (परिचर पं .स . यावल ) , जी .आर . कोळी , व बि .एस . सोनवणे ( सां . बां .विभाग यावल ) , एम .एफ . तडवी, (कनिष्ठ सहाय्यक जि .प .ग्रा . पु. यावल ) , डी. पी . अडकमोल ( शिपाई सा . बां यावल ) , व्ही.बी . जंजाळे , ( वरिष्ठ लिपीक सा . बां. वि. यावल ) , ए .बी . चव्हाण ( सा .बां यावल ) आर .डी . राऊत , ( कनिष्ठ लिपीक स . नि. स . संस्था , यावल ) , एस. बी . तायडे , ( परिचर पं .स . यावल ) जी .एम .चौधरी , के .बी .राठोड , एम .एस. येवले , के .एच .तडवी , एम टी . कोल्हे .एस .एम . कोळी , ए .एन . तहासे , आर .आय . तडवी , एस .डी . कुमावत , ए .बी . तडवी , ए .एच . पिंजारी, पी.एन . दुसाने , बी .व्ही . मेढे , आर .एल . महाजन , एच .व्ही .सनंसे, एस .आर . वराडे , एम.आय. तडवी , एस.एस . तडवी , जी .डी . देवराज आणी डी.के . नेहते, तर परिशिष्ठ ब मध्ये एस .एस . सोनवणे , एफ.आर .भादले, श्रीमती वाय . ई . जंजाळकर , श्रीमती ए .एम . तडवी , श्रीमती एम .बी . चौधरी , आय .आर . तडवी , के .एस . भंगाळे , वाय . वाय . खान , पी .डी . ठाकरे , एस .एम . कोळी , जे .व्ही . टापरे, बी.के . पाटील , के .पी. तायडे , ए .बी .पाटील , सलीम शेख अस्लम शेख , बी .एन . इंगळे , आर .डी . कोळी , यु .एम . हनवते , आय .आर . तडवी, श्रीमती आर .पी . पाटील , वाय . वाय . खान, पी .डी .ढोके आणी आर. डी . कोळी यांच्या आदेशाव्दारे तहसीलच्या आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षात देण्यात आलेल्या तारखेनुसार नेमणुका करण्यात आल्या आहेत .

तृतीय पुण्यस्मरण कै. वासुदेव माधव कुरकुरे

0

 

(कालवा, निरीक्षक ,पाटबंधारे उप विभाग यावल)

(तृतीय पुण्यस्मरण दि , २९/०६/२०१८)

तुमच्या कर्तृत्वाची प्रेरणा आजही साथ देत आहे तुमच्या मायेचे क्षण आजही रूदयात आहे तुम्ही प्रत्यक्षात नाही पण आशीर्वाद रूपात सोबत आहेत

आपले शोकाकुल
कुंदा वासदेव कुरकुरे ,पत्नी

मिलिंद वासुदेव कुरकुरे, मुलगा

वसुंधरा वासुदेव कुरकुरे, मुलगी

संध्या वासुदेव कुरकुरे, मुलगी

मीसाबंदिंचा श्री. मोहन गणपतराव जगताप यांचा सत्कार करतेवेळी आमदार समीर कुणावर

0

 

सचिन वाघे वर्धा
हिंगणघाट 29.6.21
राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आल्याचे कारण पुढे करून तसेच जनतेचे सर्व मूलभूत अधिकार गोठवून करून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५जून १९७५ रोजी देशावर आणिबाणी लादली.तत्कालीन सरकारने राष्ट्रीय सुरक्षा कायदा अर्थात मिसा अंतर्गत राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी लावून देशभऱ्यातील विरोधकांना तसेच संघ स्वयंसेवकांना तुरुंगात डांबले.
हिंगणघाट विधानसभा क्षेत्राअंतर्गत हिंगणघाट,समुद्रपुर,सिन्दी परिसरातील अनेकांनी देशहितासाठी तुरुंगाची वाट पत्करली.
लोकशाहीच्या इतिहासातील या काळ्याकुट पर्वाला शुक्रवार, २५ जून रोजी ४६ वर्षे पूर्ण होत झाल्याने विधानसभाक्षेत्राचे आमदार समिर कुणावार यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मीसाबंदिंचा गौरव केला आहे.
पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी गावागावातून संघ स्वयंसेवकांना शोधून १८ महिन्या करिता तुरुंगात डांबले होते. संघ संपवण्याचा त्यांचा प्रयत्न होता परंतु संघ कार्यकर्त्यांनी आपले काम सुरूच ठेवले. त्यांनी केलेल्या त्यागामुळेच भाजपा सत्तास्थानी पोहचली आहे, सदर मिसाबंदीच्या योगदानामध्ये
हिवरा येथील मोहन गणपतराव जगताप यांनी दिलेल्या योगदानाची आठवण म्हणून भारतीय जनता पक्षा तर्फे आमदार श्री.समीर कुणावार, यांनी त्यांचा हॄदय सत्कार केला. सत्कार करते वेळी मा. आमदार समीर कुणावार, नगरसेविका रवीला आखाडे, नगरसेवक राहुल सोरटे , समाजसेवक शिवाजी आखाडे, भाजपा शहर कोषाध्यक्ष गणेश ऊगे तसेच नगरसेवक व नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.

काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ संघटक पदी पुरुषोत्तम आकारामजी मून यांची नियुक्ती

0

 

सचिन वाघे वर्धा
हिंगणघाट , २९ /. काँग्रेस चे शहर अध्यक्ष पंढरी कापसे यांच्या नेतृत्वात पुरुषोत्तम आकारामजी मुन याना काँग्रेस पक्षा मध्ये ज्येष्ठ संघटक म्हणुन नियुक्ती पत्र देण्यात आले. पुरुषोत्तम मुन हे युनायटेड ईनसुरन्स कंपनी वर्धा येथे ब्राॅन्च मॅनेजरपदी कार्यरत होते.
त्यांचे कार्यकाळात समाजिक कार्यकर्ते म्हणून काम करीत होते .त्यांची नियुक्ती झाल्याने काँग्रेस पक्षात कार्यकर्त्यांना बळ मिळेल.
श्री मून यांना नियुक्ती देतांना काँग्रेस चे पदाधिकारी ज्वलत मुन किसान काँग्रेस चे शहर अध्यक्ष गुणवंत कारवटकर शहर उपाध्यक्ष सुनिल हरबुडे जेष्ठ कांग्रेस कार्यकर्ते , इकबाल पहेलवान अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष सैय्यद मेराज अल्पसंख्याक शहर अध्यक्ष अब्दुल अमीन अल्पसंख्याक सचिव इत्यादिसर्व पदाधिकारी उपस्थित होते

कृषी संजीवनी मोहिमेअंतर्गत सूनगाव येथे पीक उत्पन्न वाढीबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

सुनगाव येथे आज दिनांक 29/6/2021 रोजी कृषि संजीवनी मोहिमेअंतर्गत , पिकाचे उत्पादन वाढीसाठी रिसोर्स बँक शेतकरी(नावीन्यपूर्ण
उपक्रम राबविणारे) सहभाग कार्यक्रम राबविण्यात आला ,उपरोक्त कार्यक्रम सुनगाव येथे श्री मोहनसिंह राजपूत यांचे शेतात आयोजित करण्यात आला होता, सदर कार्यक्रम प्रसंगी मका पिकाचे उच्चतम उत्पन्न घेणारे श्री मोहनसिंह राजपूत यांनी मका पिकाचे पेरणी पासून ते काढणी पर्यन्त चे त्यांचे अनुभव उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले, पट्टा पद्धत वापरून ठिबक वर एका एकरमध्ये त्यांनी 40 क्विं मका उत्पादन घेतले आहे,कार्यक्रम प्रसंगी शेतकरी वसंत कल्पांडे,शिवलाल चव्हाण, किशोर येऊल,शाबीर तडवी हे उपस्थित होते, तसेच कृषी विभाग जळगाव जामोद येथील कृषि पर्यवेक्षक श्री. पी. के .बंड सर,व कृषि सहायक एस .एस. सिनगारे मॅडम सुनगाव ह्या उपस्थित होत्या.

जामुनझीरा येथे अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग शेजारी राहणाऱ्या संशयीत आरोपी विरूद्ध पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील दुर्गम भागातील जामुनझीरा या आदिवासी वस्तीवर अल्पवयीन मुलीचा विनयभंग करत तीच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्यावरून एका विरुद्ध येथील पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेली माहीती अशी की ,तालुक्यातील जामुनझीरा या आदिवासी गाव वस्तीवर २३ जून रोजी दुपारी अडीच ते चार वाजेच्या दरम्यान मुलीची आई ही आपल्या शेतात पेरणीसाठी गेली असता १२ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही घरात एकटी असल्याचे पाहून आमच्या घराच्या शेजारी राहणारा रमा देवसिंग बारेला याने १२ वर्षीय मुलगीही आपल्या घरात लहान मुलासह घरात असतांना संशयीत आरोपीने घुसून फिर्यादीची पुतणी तिचा हात धरून तिला घराच्या बाजुस असलेल्या चाऱ्याच्या खोली घेवुन जावुन तिला लज्जा वाटेल असे अश्लील कृत करून तिचा विनयभंग करून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, पीडित बालिकेच्या आईने सोमवारी येथील पोलिस स्टेशनमध्ये या गुन्ह्यातील संशयित आरोपी रमा देवसिंग बारेला याचा विरुद्ध तक्रार दिल्यावरून विनयभंगासह पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे . गुन्हा केल्यापासुन सदर आरोपी संशयीत आरोपी हा फरार झाला आहे .

किनगाव डांभुर्णी मार्गावरील रस्त्यावर डांबरीकरण साहीत्य वाहतुक वाहनाचा भिषण अपघात एक गंभीर जख्मी

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यातील डांभुर्णी गावाजवळ एका डांबरीकरणाचे हॉट मिक्स वाहतुक करणाऱ्या डंपर वाहनाचा अपघात होवुन त्यात वाहन चालक गंभीर जख्मी झाल्याची घटना घडली आहे . या संदर्भात मिळालेली माहीती अशी की दिनांक २८ जुन रोजी किनगाव ते डाभुर्णी मार्गा वरील डाभुर्णी गावा जवळ किनगाव कडुन डांभुर्णी गावाकडे जाणारा डंपर वाहन क्रमांक एम एच १९वाय५७१८हे चारचाकी वाहन डांबरीकरण कामाचे हॉट मिक्स हे साहीत्य घेवुन जातांना पाऊस सुरू असतांना वाहनचालकाचा ताबा वाहनाचे तोल बिघडल्याने वाहन रस्त्याच्याकडे जावुन पलटी होवुन झालेल्या अपघातात वाहनचालक हा गंभीर जख्मी झाला असुन , वाहनचालकास उपचारासाठी जळगाव येथे दाखल करण्यात आले आहे . दरम्यान या अपघातासंदर्भात पोलीसात अद्याप कुठलीही नोंद झाली नसल्याचे वृत्त असुन, या भिषण अपघातातुन केवळ सुदैवाने चालक बचावल्याचे प्रत्येक्ष पाहणाऱ्यांनी म्हटले आहे . अधिक माहीती घेतली असता सदरचे वाहन भुसावळ येथील एका मोठया प्रसिद्ध बांधकाम ठेकेदाराचे असल्याचे कळते .