Home Blog Page 480

सामान्य माणसाची लॉकडावून मध्ये जगण्यासाठी धडपड सुरू । हातामध्ये चार तास शिल्लक असल्यामुळे पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर तसेच किराणा दुकानसमोर गर्दी !

0

 

सिंदखेड राजा (सचिन खंडारे )

राज्यसरकारने दिनांक22 एप्रिलच्या रात्री 8 वाजेपासून
राज्यामध्ये कडक लॉकडाऊन ची अंमलबजावणी सुरू झाली .

त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना यामुळे आळा बसेल ‘वाढता कोरोणा चा संसर्ग बघता तसेच संपूर्ण दवाखाने हाऊसफुल्ल झाले असल्यामुळे रुग्णांना बेड उपलब्ध नाहीत इंजेक्शन उपलब्ध नाही ऑक्सिजन उपलब्ध नाही

अशा परिस्थितीमध्ये लोक विनाकारण फिरत असल्यामुळे कोरोना चा संसर्ग दिवसेंदिवस वाढत आहे ‘
आणि याला आळा घालण्यासाठी कडक लॉकडाऊन करण्यात आला आहे ‘
व अत्यावश्यक सेवा वगळता ‘सर्व दुकाने सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत उघडे राहतील ‘
त्यामुळे 15 ते 16 दिवसाचा कडक लॉकडावून असताना .
आणखी लॉकडाऊन वाढू शकते ‘
अशी शक्यता असल्यामुळे ‘
दिवसभरात उरलेल्या चार तासांमध्ये ‘
संसाराचा गाडा हाकलण्यासाठी आपला परिवार जगवण्यासाठी .
सामान्य लोक चार तासांमध्ये धडपडताना दिसत आहे ‘
यामध्ये साखरखेर्डा येथील पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी सकाळपासून लांबच लांब रांगा दिसून आल्या .

तसेच किराणा दुकान वर सुद्धा गर्दी दिसून आली .फळाची दुकान असेल स्वीट मार्ट ची दुकान असतील .या सर्वच ठिकाणी सकाळी गर्दी दिसून येते ‘
तसेच अकरा वाजल्यानंतर सर्व सामान्य माणसांना पोलिसांचा सुद्धा धाक असतो ‘त्यामुळे वेळेच्या आत सर्वसामान्य माणसे आपले कामे घाई गडबडीत करताना दिसत आहे ‘

सांगायचे तात्पर्य एवढेच की कोरोनाच्या या महाभयंकर संकट यामध्ये सर्वसामान्य माणूस भरडला जात असून आपल्या परीवारा सोबत जगण्यासाठी धडपडताना दिसत आहे ‘आणि म्हणून सर्वांनी वेळेच्या आत कामे झाल्यानंतर घरीच रहावे तोंडाला माक्स बांधावे हाताला सॅनिटायझर लावावे गर्दीत जाणे शक्यतो टाळावे ‘हीच आपली व आपल्या कुटुंबाची काळजी ठरेल ,

नांदगाव खडेश्वर तालुक्यात कविड-१९ या लसीकरणाच्या तुटवडा

0

 

संपूर्ण देशात कोरोनाची महामारी सुरू असून शासनाने लसीकरणा वर भर दिला असून अशातच आठ ते दहा दिवसापासून नांदगाव खंडेश्वर तालुका लसीकरणा पासून वंचित आहे.या संधार्बत आज दि.२२ एप्रिल रोजी पंचायत समिती मध्ये माझी आमदार वीरेंद्र भाऊ जगताप यांनी पत्रकार परिषद आयोजित केली.या परिषद मध्ये आरोग्य अधिकारी साहेबराव इंगळे यांनी दुर्लक्ष केल्यामुळे नांदगाव खंडेश्वर आणि ग्रामीण भागातील नागरिक लसीकरणा पासून वंचित आहे.त्यामुळे काँग्रेस कार्यकर्ते आणि माझी आमदार वीरेंद्र भाऊ जगताप आक्रमक अशा कर्मचाऱ्यास बडतर्फ करावी अशी मागणी केली.यामध्ये ग्रामीण भागासाठी ४१०० लसी मागितल्या होत्या त्यामध्ये १६९ wasted गेल्या आणि ६३० वापस आल्या.१३५० पापड साठी,१३५० लोणी टाकली साठी,६०० मंगरूळ चव्हाला ,३०० धामक,२४० सातरगाव अशी मागणी होती.जो अधिकारी लोकांच्या जीवनाशी खेळत असेल अशा अधिकाऱ्यांना पदावरून काढून टाकावे आणि कार्यक्षम अधिकाऱ्याची नेमणूक करावी.यावेळी माझी आमदार वीरेंद्र भाऊ जगताप, प.स.सभापती वैशाली रिठे,अक्षय पारसकर,अमोल धवसे,फिरोझ खान,सचिन रिठे, प.स.सदस्य आशाताई सोनोने,रणजित मेश्राम इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.तालुका प्रतिनिधी नंदकिशोर इंगळे.

यावलच्या नगरसेवकांनी फैजपुर येथील कोवीड सेन्टर उभारणीसाठी केली ७६ हजारांची मदत तहसीलदारांच्या स्वाधीन

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

संपुर्ण राज्यात कोरोना संसर्गाच्या वाढत्या महामारीने जळगाव जिल्ह्यात मोठया प्रमाणावर बाधीत रुग्णांची संख्याही सातत्याने वाढत असुन , आरोग्य प्रशासन हे रूग्णांच्या सेवेसाठी अधिक सज्ज व सर्तक झाले असुन , या पार्श्वभुमीवर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांनी रावेर यावल तालुक्यातील कोवीड रूग्णांच्या मदतीसाठी प्रशासनाच्या वतीने भावनिक आवाहन केले आहे . मोठया प्रमाणावर रुग्णांची संख्याही वेगाने वाढत असुन , कोरोना बाधीत रुग्णांना ऑक्सीजन बेड अभावी मोठया प्रमाणावर उपचाराअभावी भटकंती होत असुन, प्रसंगी अनेक रूग्णांना आपला जिव गमवावा लागत असुन , यासाठी प्रशासनाने लोकसहभागातुन ५० ऑक्सीजन बेडच्या कोवीड सेन्टर ची उभारणी करण्यात येत असुन, फैजपुर विभागाचे प्रांत अधिकारी कैलास कडलग यांच्या आवहानास प्रतिसाद देत साठी आज यावल नगर परिषदचे नगरसेवक प्रा . मुकेश येवले यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक राकेश मुरलीधर कोलते , नगरसेवक असलम शेख नबी , नगरसेवक अभीमन्यु (हेन्द्री ) चौधरी , उपनगराध्यक्ष रुख्यमाबाई भालेराव ( महाजन ) , नगरसेविका सौ . देवयानी धिरज महाजन , नगरसेवक समीर शेख मोमीन यांनी आपल्या वतीने तहसीलदार महेश पवार , निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांची भेट घेवुन ७६ हजार रूपयांची रोकडा मदत त्यांच्या स्वाधीन केली. यावेळी महसुल प्रशासनाच्या वतीने दानसुर नागरीकांनी व सामाजिक संघटनांनी रुग्णसेवेसाठी मदत करावी असे आवाहन करण्यात आले आहे .

यावल येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन मान्यवरांची उपस्थिती युवकांचा सहभाग

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

राज्यात सर्वत्र कोरोना महामारीच्या संसर्गाने थैमान घातले असता यात रूग्णांसाठी आवश्यक हवा असलेला रक्तचा साठा हा अत्यल्प असुन या पार्श्वभुमीवर येथील भारतीय जनता पक्षाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते . यावल येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आज सकाळी १oवाजता आयोजीत भारतीत जनता पक्षाच्या वतीने आयोजीत या रक्तदान शिबीरा प्रसंगी रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे , भाजपाचे जिल्हा अध्यक्ष आमदार सुरेश भोळे , जिल्हा परिषदच्या अध्यक्ष सौ .रंजना पाटील, जिल्हा परिषदचे आरोग्य व शिक्षण समिती सभापती रविन्द्र ( छोटु ) पाटील , जिल्हा परिषद सदस्या सौ . सविता भालेराव , पंचायत समितीच्या सभापती सौ. पल्लवी चौधरी , माजी जिल्हा परिषद शिक्षण सभापती हर्षल गोवींदा पाटील , सरपंच संघटनेचे जिल्हा अध्यक्ष पुरूजीत चौधरी आदी पक्षाच्या पदाधिकारी यांनी या रक्तदान शिबीरास भेट दिली, या रक्तदान शिबीरात युवकांचा मोठा सहभाग दिसुन आला असुन दुपारपर्यंत एकुण ३५ जणांनी या शिबीरात आपले रक्तदान केले . रक्तसंकलना करीत माधवराव गोळवलकर स्वयंसेवी रक्तपेढी जळगाव चे तंत्रज्ञ विलास सपकाळे, मदतनिस रामचंद्र पोतदार व सागर खर्चाने यांनी कार्य केले , रक्तदान शिबीरास यशस्वी करण्यासाठी भाजपाचे तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे , तालुका सरचिटणीस विलास चौधरी, उज्जैनसिंग राजपुत , भाजपाचे शहराध्यक्ष डॉ निलेश गडे , नगरसेवक डॉ .कुंदन फेगडे , युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष रितेश बारी , युवा मोर्चाचे सरचिटणीस व्यंक्टेश बारी, युवा मोर्चाचे शहर सरचिटणीस परेश नाईक , सागर कोळी, भुषण फेगडे , हेमन्त चौधरी यांनी परिश्रम घेतले .

श्री राम जन्मोत्सव समिती सेलू तर्फे दर वर्षी राम नवमी निमित्य निघणाऱ्या शोभायात्रा चे यंदा स्वरूप बदलत गरजवंतान साठी प्रभू श्रीराम”अन्नछत्र

0

 

उपक्रमाचा उपजिल्हाधिकारी यांच्या हस्ते शुभारंभ
अजहर पठाण
सेलू परभणी

मागील ५ वर्षांपासून सेलू शहरात दरवर्षी भव्य दिव्य शोभयात्रेचे आयोजन श्रीराम जन्मोत्सव समिती सेलूच्या वतीने करण्यात येते.मात्र मागील वर्षांपासून कोरोना वायरस ने संपूर्ण जगावर धुमाकूळ घातला आहे.यावर्षी सुद्धा कोरोना संक्रमण अधिक प्रमाणात वाढल्यामुळे शोभायात्रा रद्द करत
गरजू नागरिकांनसाठी प्रभू श्रीराम *”अन्नछत्र”* हा अभिनव उपक्रम समिती तर्फे राबविण्यात येत असून श्रीराम नवमीच्या शुभ दिनाचे औचित्य साधून श्रीराम भक्तांच्या व समितीच्या सहकार्यातुन २११ गरजू कुटुंबांना ३० दिवस पुरेल एवढे धान्य (किट)वाटपाचा शुभारंभ आज मा.उपजिल्हाधिकारी श्री उमाकांत पारधी, नगराध्यक्ष श्री.विनोद बोराडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक श्री संजय हरबडे,श्री संजय लोया यांच्या हस्ते गरजवंतांना धान्य सामग्री(किट)प्रदान करुन करणात आला.
हा उपक्रम प्रशासनाने दिलेल्या निर्देशाचे पालन करत राबविण्यात येत असल्यामुळे मा.उपजिल्हाधिकारी व नगराध्यक्ष यांनी श्री राम जन्मोत्सव समितीच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन केले..
समितीच्यावतीने गरजवंत कुटुंबीयांना घरपोच धान्य सामग्री(किट) देणार आहे.

समिती तर्फे शासनाच्या नियमांचे पालन करत कोरोना काळात समाजातील गरजवंतांन साठी विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहे.
असे समितीच्या वतीने सांगण्यात आले

नांदुरा तालुक्यात सुरू असलेले अवैद्य धंदे तात्काळ बंद करा- किशोर इंगळे यांची विभागीय पोलीस आयुक्तांकडे तक्रार

0

 

नांदुरा :- दि,23/04/2021 शहरासह तालुक्यात फार मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू आहे यामध्ये वरली मटका, जुगार, अवैद्य दारू यासारख्या धंद्यांचा समावेश आहे. हे धंदे तात्काळ बंद करण्यात यावे अशी तक्रार राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष किशोर इंगळे यांनी विभागीय पोलीस आयुक्त अमरावती तसेच जिल्हा पोलिस अधीक्षक बुलढाणा यांच्याकडे केली आहे. सदर तक्रारीच्या प्रति आज २३ एप्रिल रोजी पोस्टाद्वारे त्यांना पाठविण्यात आल्या आहेत.
दिलेल्या तक्रारीत नमूद आहे की नांदुरा शहरासह तालुक्यातील फार मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू आहेत. यामध्ये वरली मटका, अवैद्य दारू, जुगार यासारख्या धंद्याचा समावेश आहे. मात्र नांदुरा येथील पोलिस निरीक्षक सुरेश नाईक नवरे यावर कुठल्याही प्रकारची कारवाई करीत नाही. दिनांक ६ एप्रिल २०२१ रोजी तालुक्यातील ग्राम दहिगाव येथील महिलांनी गावात सुरू असलेली अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी अशा आशयाचे निवेदन ठाणेदारांना दिले होते. मात्र ठाणेदार सुरेश नाईक नवरे यांनी कुठल्याच प्रकारची दखल घेतली नाही. त्यांच्याच कृपेने तालुक्यात अवैध धंदे सुरू आहे की काय?असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होते.
तालुक्यातील वडनेर भोलजी, चांदुर बिस्वा, निमगाव, खुमगाव, दहिगाव, टाकळी वतपाळ या गावांमध्ये वरलीमटका सर्रासपणे सुरू आहे. हा धंदा करणाऱ्यांना पोलिसांचा कुठलाच धाक उरलेला नाही या अवैध धंद्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील अनेक कुटुंब उध्वस्त होत आहे,तरुण पिढी व्यसनाधीन होत आहे तरी मा. महोदय सदर बाबींचा विचार करून याला जबाबदार असलेल्या संबंधित निष्क्रिय अधिकाऱ्यावर आपल्या स्तरावरून कारवाई करून नांदुरा शहरासह तालुक्‍यात सुरू असलेले अवैध धंदे तात्काळ बंद करावे अशी मागणी केली आहे.सदर तक्रारीच्या प्रति गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई, पालक मंत्री बुलढाणा, जिल्हाधिकारी बुलढाणा यांनासुद्धा पाठवण्यात आल्या आहेत.

समीर कुणावार (आमदार )यांनी हिंगणघाट उपजिल्हा सरकारी रुग्णालय इथे उपलब्ध करून दिले ऑक्सिजन सिलेंडर

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट 22.4.21.तालुक्यात कोरोना महामारी मुळे दिवसें दिवस रुग्णांची संख्या वाढत असून हिंगणघाट उपविभागीय कार्यालय येथे आढावा बैठकीमध्ये डॉक्टर चाचारकर यांनी ऑक्सीजन सिलेंडरची कमतरता आहे सांगितले त्यानुसार हिंगणघाट येथील उद्योजकांना व इतर व्यावसायिकांना आमदार समीर कुणावार यांनी विनंती करून त्यांच्याकडून औद्योगिक वापरात येत असलेले जंबो सिलेंडर ची मागणी केली त्यानुसार त्यांनी उपजिल्हा सरकारी रुग्णालय हिंगणघाट मध्ये 20 सिलेंडर जुळवले असून त्यातले 12 सिलेंडर उपजिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये दिले आणि भरून आणून लावण्यात आले उर्वरित 8 सिलेंडर त्यांना लवकरच मिळणार आहे . ऑक्सिजन सिलेंडर मुळे रुग्णांना फार मोठा दिलासा मिळाला. समीर कुणावार यांनी
उपजिल्हा सरकारी रुग्णालयामध्ये जाऊन ऑक्सीजन सिलेंडर ची पाहणी करून तेथील अधिकारी व डॉक्टर यांच्याकडून ऑक्सीजन सिलेंडर ची माहिती घेतली व रुग्णांना ऑक्सिजन पुरवठा सुरू केला . यावेळी उपविभागीय अधिकारी मा. श्री. चंद्रभानजी खंडाईत, तहसीलदार मा. श्रीरामजी मुंधडा, श्री. कोडापे , डॉ.चाचरकर , डॉ. प्रफुल पारखे, बांधकाम विभागाचे मा. श्री. पोफळे उपस्थित होते

वनविभागाकडून सात ते आठ महिने होऊनही नुकसान भरपाई मदत मिळाली नाही

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

सुनगाव येथील शालिग्राम लक्ष्मण भगत यांचे शेतामध्ये सात ते आठ महिन्यापूर्वी वन्यप्राण्यांनी शेती पिकाचे नुकसान केले होते याबाबत त्यांनी वनविभाग जळगाव जामोद यांना तक्रार दिली होते त्या तक्रारीवर वनविभागाकडून पंचाणामा देखील झाला होता तरी सात ते आठ महिने होऊन शेतकऱ्याला अद्याप नुकसान भरपाई मिळाली नाही सुनगाव येथील शेतकऱ्यांने गोराळा प्र जामोद या शिवारात असलेल्या गट नंबर 184 या शेतात सन 2019 20 या वर्षात कपाशी व भुईमुंग पिकाची लागवड केली होती परंतु ऑगस्ट महिन्यात परिसरात असलेल्या वन्य प्राण्यांनी या पिकाची नासधूस केली होती व त्या बाबतीत वनविभागाला तक्रार करून सात ते आठ महिन्यापासून कोणतीच नुकसान भरपाई मिळाली नाही व वनविभागाने याची कोणती दखल घेतली नाही तरी मला नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सुनगाव येथील शेतकऱ्यांने केली आहे

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील दहा ठीकाणी जनरेशन प्लांट उभारणी करणार यावल येथे पत्रकार परिषदेत जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ .एन .एस . चव्हाण

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील ग्रामीण रुग्णालयास जिल्हा शल्यचिकीत्सक एन एस चव्हाण यांनी भेट देवुन कोरोना विषाणुसंसर्गाच्या पार्श्वभुमीवर तालुका आरोग्य प्रशासनाच्या कार्याचा आढावा घेतला व कोरोनाच्या वेगाने वाढत्या संसर्गामुळे प्रशासनास सद्याच्या परिस्थितीवर अधिक सर्तक राहुन नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सुचना ही डॉ.एन एस चव्हाण यांनी दिल्यात . दरम्यान आज गुरुवार दिनांक २२ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता यावल येथील ग्रामीण रुग्णालयास जिल्हा शल्यचिकित्सक डॉ . एन .एस .चव्हाण यांनी भेट देवुन तालुका पातळीवरील आरोग्य प्रशासनाच्या कार्याचा आढावा घेतला यावेळी यावल चे तहसीलदार महेश पवार , ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ बी. बी .बारेला, नगर परिषदचे कार्यालयीन अधिक्षक विजय बढे यांच्यासह रुग्णालयातील सर्व कर्मचारी याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित होते . यावेळी पत्रकारांशी बोलतांना डॉ .एन.एस . चव्हाण यांनी रावेर , फैजपुर , यावल तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी उभारण्यात आलेल्या कोवीड सेन्टर उभारणी व रुग्णांची सातत्याने वाढणारी संख्या या संदर्भात आरोग्य प्रशासनाच्या कार्याचा आढावा देतांना जळगाव जिल्ह्यातील दहा जनरेशन प्लांटची उभारणी करीत असुन या मुळे आपल्याला हवेतुन वायु जामनेर , पारोळा, चोपडा ,अमळनेर , चाळीसगाव , मुक्ताईनगर , भुसावळ , रावेर आदी दहा सेन्टरची आपण निवड केली असुन डीपीसीच्या माध्यमातुन हा खर्च करण्यात येणार आहे .येत्या एक दोन दिवसात भुसावळच्या प्लांटचे कार्यआरंभ होणार असल्याचे डॉ एन एस चव्हाण यांनी सांगीतले . सदरचे हे सेन्टर कार्यवत्नीत झाल्यास कोरोना रुग्णाची होणारी ये रुग्णालयातुन त्या रुग्णालयात पाठवण्यासाठी होणारी हेळसांड थांबेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केले . यावेळी यावल ग्रामीण रुग्णालयात लोकसहभागातुन उभारण्यात आलेल्या ऑक्सीजन बॅड हे कार्यावत्नीत करण्या संदर्भात पत्रकारांनी विचारले असता , आपण प्रसंगी रुग्णसंख्येच्या आधारावर यावलच्या ऑक्सीजन बॅडची संख्या वाढवुन तिला रूग्णसेवेसाठी उपलब्ध करू असे त्यांनी सांगीतले . शेवटी डॉ .एन एस चव्हाण यांनी आरोग्य कर्मचारी यांची आस्थेने विचारपुस करून त्यांच्या पगार हे वेळेवर मिळत आहे किंवा नाही या प्रश्नावर त्यांनी विचारणा केली.

परीक्षा रद्द विघार्थाचि फीस वापस करण्यात यावी वंचित बहूजन आघाडी मागणी…..

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट 22.4…21
CBSE 10 वी च्या परीक्षा होणार होता कांही दिवसात कोरोणाचे पेशन्ट वाढला मुळे या परिक्षा रद्द करण्यात आला . परिक्षा फी 1850रू वेगवेगळ्या शाळे मधे सर्व पालकांनी भरले असता ती वापस करण्यात यावी अशी मागणी वंचित बहूजन आघाडी चे नेते डाॅ उमेश वावरे यानच्या नेतृत्व मा.SDO साहेब हिंगणघाट यांनच्या मार्फत मा. रमेश पोखरियाल शिक्षा मंत्री भारत सरकार यांना निवेदन देण्यात आले .त्या प्रसंगी मनीष कांबळे. दिलिपभाऊ कहूरके. राजेश खानकूरे. चारूआटे.प्रा.मनोहर भगत. देवेंद्र त्रिपल्लीवार.महेंद्र हाडे. उपस्थित होते