Home Blog Page 494

यावल शहर व परिसरात वाळु माफीयाने शासकीय सुटीची संधी पाहुन केली लाखो रुपयांच्या वाळुची तस्करी स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष.

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील स्थानिक महसुल प्रशासनाच्या डोळेझाक कारभारामुळे मागील तिन दिवसात शासकीय सुटीची संधी पाहुन वाळु माफीयाचा परिसरात धुमाकुळ लाखो रुपयांच्या वाळुची सर्रासपणे चोरट्या मार्गाने विक्री . या संदर्भातील वृत्त असे की , यावल शहरात व परिसरात गेल्या शुक्रवार , शनिवार , रविवार या तिन दिवसांपासुन शासकीय सुटीची संधी पाहुन शहरात व तालुक्यात सक्रीय असलेल्या वाळु माफीयाने काही प्रशासकीय यंत्रणेला हाताशी धरून शहरातील विविध ठिकाणी साठवण करून ठेवलेली वाळु ही विनापरवाना चढत्या भावाने विक्री करून लाखो रुपयांचा व्यवहार केल्याचे वृत्त हाती आले असुन , कार्यतत्पर तहसीलदार महेश पवार हे मागील काही दिवसांपासुन वैद्यकीय रजेवर असल्याने याचा फायदा घेत काही हप्तेखोर कर्मचाऱ्यांच्या सहभागाने मोठया प्रमाणावर अवैध मार्गाने जमा केलेली वाळु व पारिसरातील नद्यांमधुन उपसा केलेली वाळु ही खाजगी बांधकाम व्यवसायीकांना बंदी ची संधी पाहुन चढत्या भावाने विकण्यात येत असुन , या सर्व प्रकाराकडे स्थानिक महसुल प्रशासनाचे अर्थपुर्ण दुर्लक्ष होत असल्याची माहीती समोर येत आहे . दरम्यान अवैधगौण खनिजच्या अशा प्रकारच्या अनधिकृत धंद्यामुळे शासनाच्या लाखो रुपयांच्या महसुल चुना लागत आहे . या संदर्भात एका वाळुवाहतुक करणाऱ्या कळुन मिळालेल्या माहीतीनुसार असे कळते की ज्या वाळु माफीयाचे सॅटींग झालेले नसते त्याच वाळु वाहतुक करणाऱ्या प्रशासन कार्यवाही करीत असते आणी झालेली कार्यवाही ही निव्वळ देखाव्याची असतेअसे समजते, एक वेळा कार्यवाही झाली की मग सर्व काही सुरळीत सुरू असते , जिल्हाधिकारी यांनी या प्रश्नाकडे गांर्भीयाने लक्ष देणे अत्यंत गरजे आहे तरच या सर्व प्रकारास प्रतिबंधीत करता येईल .

सरकारकडून नियमावली जाहीर, वाचा उद्यापासून काय सुरु व काय बंद

0

 

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

मोताळा:- कोरोनाचा झपाट्याने वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य मंत्री परिषदेने आज काही कडक निर्बंध लावण्यावर शिक्कामोर्तब केले आहे. सोमवार 5 एप्रिल रात्री 8 पासून 30 एप्रिलपर्यंन्त याची अंमलबजावणी केली जाईल. हे निर्बंध लावतांना एकीकडे राज्याच्या अर्थचक्राला धक्का न लावणे तसेच कामगार व श्रमिकांना त्रास न होण्याची काळजी घेण्यात आली असून लोकांची गर्दी होणारी ठिकाणे बंद करण्यावर भर देण्यात आला आहे. शेतीविषयक कामे , सार्वजनिक व खासगी वाहतूक सुरळीतपणे सुरूच राहील मात्र खासगी कार्यालये, उपाहारगृहे, चित्रपटगृहे, गर्दीची ठिकाणी बंद राहतील. आठवड्याच्या शेवटी म्हणजे शुक्रवार रात्र ते सोमवार सकाळ असा दोन दिवसांचा संपूर्ण लॉकडाऊन लावण्याचाही निर्णय झाला.
या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या निर्बंधांचे काटेकोर पालन करण्यात सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन करताना आपण विरोधी पक्षांशी देखील बोललो असून त्यांनी देखील याबाबत सहकार्य करण्याची तयारी दर्शविल्याचे सांगितले. यापुढे या आदेशांना मिशन बिगीन अगेन ऐवजी ब्रेक दि चेन असे संबोधण्यात येईल.
यातील कोणत्या गोष्टी सुरु राहतील आणि कशावर निर्बंध राहील याची माहिती पुढीलप्रमाणे:

शेतीविषयक कामे सुरु-
शेती व शेतीविषयक कामे, अन्नधान्य व शेतमालाची वाहतूक नेहमीप्रमाणे सुरळीतपणे सुरू राहील.

रात्री संचारबंदी, दिवसा जमावबंदी-

राज्यात 144 कलम लागू केले जाईल. सकाळी 7 ते रात्री 8 जमावबंदी म्हणजे 5 पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास मनाई राहील तसेच रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत कोणत्याही व्यक्तीस योग्य कारणाशिवाय बाहेर पडता येणार नाही.यातून वैद्यकीय व इतर अत्यावश्यक सेवा वगळण्यात येतील.

बागा, चौपाट्या, समुद्र किनारे आदी सार्वजनिक ठिकाणे रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत पूर्णतः बंद राहतील. दिवसा दिवसा या सार्वजनिक ठिकाणी लोकं आरोग्याचे नियम न पाळता गर्दी करीत आहेत असे लक्षात आले तर स्थानिक प्रशासन ते ठिकाण पूर्णपणे बंद करू शकते

आवश्यक सेवेतील दुकानेच सुरु-
किराणा, औषधी, भाजीपाला आदी जीवनावश्यक व आवश्यक वस्तू सोडून इतर सर्व प्रकारची दुकाने, मॉल्स, बाजारपेठा, 30 एप्रिलपर्यंत बंद राहतील. अत्यावश्यक वस्तू व सेवांच्या दुकानातील दुकानदार व कर्मचाऱ्यांनी लवकरात लवकर लसीकरण पूर्ण करावे तसेच स्वत: व ग्राहकांकडून नियमांचे पालन होते किंवा नाही ते पाहावे
सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच-
सार्वजनिक व खासगी अशी सर्व प्रकारची वाहतूक नियमितपणे सुरूच राहील. रिक्षांमध्ये चालक व दोन प्रवासी, टॅक्सीमध्ये चालक आणि निश्चित केलेल्या प्रवाशांपैकी 50 टक्के प्रवासी प्रवास करू शकतील.
सार्वजनिक व खासगी बसेसमध्ये उभे राहून प्रवास करता येणार नाही. आसनांवर बसलेल्या प्रवाशांनाच परवानगी आहे. प्रवाशांनी मास्क घातलेला हवा.
बस चालक, वाहक व इतर कर्मचारी यांनी आपले लसीकरण पूर्ण करावे किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बाळगावे. बाहेरगावी जाणाऱ्या रेल्वेमध्ये सर्वसाधारण डब्यात उभ्याने प्रवासी असू नयेत तसेच प्रवासी मास्क घालतील याची काळजी रेल्वे प्रशासनाने घ्यायची आहे.
वित्तीय सेवा सोडून इतर खासगी कार्यालये बंद-
खासगी कार्यालयांनी पूर्णपणे वर्क फ्रॉम होम करणे बंधनकारक राहील. केवळ बँका, स्टॉक मार्केट, विमा, औषधी, मेडिक्लेम, दूरसंचार, अशी वित्तीय सेवा देणारी तसेच स्थानिक आपत्ती व्यवस्थापन, वीज , पाणी पुरवठा करणारी कार्यालये मात्र सुरू राहतील
शासकीय कार्यालये- ५० टक्के उपस्थितीत-
शासकीय कार्यालये जी थेट कोरोनाशी संबंधित नाहीत तेथील कर्मचारी उपस्थिती 50 टक्के मर्यादेपर्यंत राहील
शासकीय कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश नसेल. आवश्यक असेल तर कार्यालय किंवा विभाग प्रमुखाचा प्रवेश पास लागेल. कार्यालयांतील बैठका ऑनलाईनद्वारे घ्याव्यात. केवळ कार्यालय परिसरातल्या कर्मचाऱ्यांना वैठकीस प्रत्यक्ष उपस्थित राहता येईल
मनोरंजन, सलून्स बंद-
मनोरंजन व करमणुकीची स्थळे बंद राहतील. चित्रपटगृहे, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहे, व्हिडीओ पार्लर्स, क्लब्स, जलतरण तलाव, क्रीडा संकुले, सभागृहे, वॉटर पार्क्स पूर्णपणे बंद राहतील.
प्रार्थना स्थळे दर्शनार्थीसाठी बंद-
सर्वधर्मीयांची स्थळे, प्रार्थना स्थळे बाहेरून येणारे भक्त व दर्शनार्थीसाठी बंद राहतील मात्र याठिकाणी काम करणारे कर्मचारी , पुजारी वगैरे यांना दैनंदिन पूजा अर्चा करता येईल. या कर्मचाऱ्यांचे लसीकरण देखील लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे
उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद-
उपाहारगृहे व बार पूर्णतः बंद राहतील. पण उपाहारगृह एखाद्या हॉटेलचा भाग असेल तर ते तेथे राहणाऱ्या अभ्यागातासाठीच सुरू ठेवता येईल, बाहेरील व्यक्तीसाठी प्रवेश असणार नाही. मात्र टेक अवे किंवा पार्सलची सेवा सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरू राहील
खाद्य विक्रेत्यांसाठी पार्सल सेवा-
रस्त्याच्या कडेला असणाऱ्या खाद्य विक्रेत्यांना सकाळी ७ ते रात्री ८ केवळ पार्सल सेवेसाठी व्यवसाय सुरू ठेवता येईल. पार्सलची वात पाहणाऱ्या ग्राहकांना सुरक्षित अंतर नियमांचे पालन करावे लागेल. मात्र नियमांचे पालन होत नाही असे दिसले तर स्थानिक प्रशासन ते पूर्णपणे बंद करता येईल
ई कॉमर्स सेवा सुरु-
ई कॉमर्स सेवा नियमितपणे सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत सुरूच राहील. होम डिलिव्हरी देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण झालेले असणे अत्यावश्यक आहे. अन्यथा त्या व्यक्तीस 1000 रुपये आणि संबधीत दुकान किंवा संस्थेस 10 हजार रुपये दंड ठोठावण्यात येईल
सर्व कटिंग सलून्स, ब्युटी पार्लर्स, स्पा बंद राहतील. याठिकाणच्या कर्मचाऱ्यांनी देखील लवकरात लवकर लसीकरण पूर करावे
वृत्तपत्रे छपाई आणि वितरण सुरु-
वृत्तपत्रे छपाई आणि वितरण नेहमीप्रमाणे सुरू ठेवण्यात येईल मात्र विक्रेत्यांनी लसीकरण करून घ्यावे
शाळा- महाविद्यालये बंद राहतील. मात्र 10 व १२ परीक्षांचा अपवाद असेल. सर्व खासगी क्लासेस बंद राहतील.
उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरू-
उद्योग व उत्पादन क्षेत्र सुरूच राहील, मात्र याठिकाणी आरोग्याचे नियम पाळले गेलेच पाहिजेत याची काळजी व्यवस्थापनाने घ्यावी.
चित्रीकरण सुरु ठेवता येईल मात्र गर्दीचा समावेश असलेली चित्रीकरणे करू नये तसेच सर्व कर्मचारी व चित्रीकरण स्थळावरील लोकांची आरटीपीसीआर चाचणी प्रमाणपत्र बंधनकारक आहे. 10 एप्रिलपासून याची अमलबजावणी होईल.
आजारी कामगाराला काढता येणार नाही-
बांधकामे सुरू असलेल्या ठिकाणी मजूर, कामगारांनी राहणे गरजेचे आहे. केवळ साहित्याची वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात येईल. कोणत्याही कामगारास कोविड झाला या कारणासाठी काढून टाकता येणार नाही. त्याला आजारी रजा द्यायची आहे. रजेच्या काळात त्याला पूर्ण पगार द्यावा लागेल कामगारांची आरोग्य तपासणी ठेकेदाराने करायची आहे
तर सोसायटी मिनी कंटेन्मेंट-
5 पेक्षा जास्त रुग्ण एखाद्या सोसायटीत आढळल्यास ती इमारत मिनी कंटेन्मेंट म्हणून घोषित करणार. तसा फलक लावणार , बाहेरच्या लोकांना प्रवेश बंदी.

कोव्हीड लस घेण्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ परेश जैस्वाल यांचे आवाहन

0

 

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

मोताळा ग्रामीण रुग्णालयात लस उपलब्ध

मोताळा:- जागतिक महामारी असलेल्या कोरोना या जिव घेण्या आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या वतीने युद्ध स्तरावर विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत तर आरोग्य विभाग आपल्या जिवाची पर्वा न करता कोरोना या जिव घेण्या आजाराला सामोरे जात आहे त्याचाच एक भाग म्हणुन शासनाच्या वतीने कोरोना आजाराला आटोक्यात आणण्यासाठी स्थानिक पातळीवरील प्राथमिक आरोग्य केंद्र तथा ग्रामिण रुग्णालयात कोविड लस उपलब्ध करुन देण्यात आली असुन मोताळा ग्रामीण रुग्णालयात लसिकरण करण्यात येत आहे
मोताळा शहरासह ग्रामीण भागात ही कोरोना चांगलाच हात पाय पसरवत असुन तालुक्यात कोरोनाचा रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे हा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाच्या वतीने उपाय योजना म्हणुन कोरोना लसीकरणाची मोफत सुविधा मोताळा ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध करुन दिली असुन नागरिकांनी कोरोनाची लस घेण्याचे आवाहन मोताळा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ परेश जैस्वाल यांनी केले आहे मोताळा शहरातील नागरिकाना आता स्थानिक ग्रामीण रुग्णालयात येथे कोव्हीड लस मोफत देण्यात येणार आहे ६० वर्षावरील नागरिक तसेच ४५ ते ५९ वयातील शुगर BP किडनी हृदय रोग,कॅन्सर इत्यादी यापैकी दुर्धर आजार असलेल्यांचा समावेश असुन कोरोना लस टोचुन घेण्यासाठी येताना मतदार कार्ड व आधार कार्ड असे दोन्हीही सोबत घेऊन यावे.
सदरची लस घेण्यापुर्वी लस पोटभर जेवण करणे अनिवार्य आहे.
तसेच ज्या व्यक्तींना सर्दी,ताप, खोकला,श्वास घ्यायला त्रास असेल अश्या नागरिकांना ४ते ५ दिवस बरे होई पर्यंत तसेच ज्यांना नुकताच कोरोना आजार होऊन गेला आहे अश्या रुग्णांना बरे झाल्यानंतर ही पुढील १ ते दीड महिन्यापर्यंत लस देता येणार नसल्याने अन्य नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयात सुरू असलेल्या मोफत लसीकरणाचा लाभ घ्या असे आवाहन ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ .परेश जैस्वाल यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी युनियन र.नं.NGP4511शाखा नांदगाव खंडेश्वर यांचा आझाद मैदानावर मुंबई येथे दिनांक 19एप्रिल 2021पासुन बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला

0

 

भगवंत ब्राम्हणवाडे नांदगाव खंडेश्र्वर तालुका प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी युनियन र.नं.NGP4511ची आज दि.4.4.2021रोजी सकाळी ठिक 11.30वा. नांदगाव खंडेश्वर येथे श्री.मंगेश भाऊ ढोरे जिल्हा यांचें अध्यक्ष ते खाली सभा आयोजित केली असता खालील विषयांवर चर्चा करण्यात आली.
विषय.ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांना वेतन श्रेणी निव्रृती वेतन सुधारीत किमान वेतन व इतर प्रलंबित मागण्या बाबत तालुक्यांतील सर्व ग्राम पंचायत कर्मचाऱ्यांनी दि.19.4.2021रोजी चा बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिला.त्या करिता मंगेश भाऊ ढोरे जिल्हा अध्यक्ष अमरावती
आकाश भाऊ गुळसुंदरे जिल्हा सचिव अमरावती
श्री अमोल पां मेटकर तालुकाध्यक्ष तथा जिल्हा संघटक अमरावती
सागर भाऊ गोंडाणे तालुका उपाध्यक्ष तुळशीदास भाऊ गोळंबे तांलुका सचिव हरिदास ‌भाऊ शेटे तालुका संल्लागार
संतोष भाऊ कोकाटे सदस्य गणेश भाऊ बोरकर कोषाध्यक्ष
सुमित लोंढे प्रसिद्धी प्रमुख शरद घाटोळे.अंकुश गांडोळे. मयूर खोपळकर.संजय खोपळकर.किशोर भाऊ कापडे . विशाल मेश्राम.इतर सर्व ग्राम पंचायत कर्मचारी नांदगाव खंडेश्वर येथे हजर होते.

शहरातील राम मंदिर ट्रस्टचे नावावर असलेल्या चल-अचल संपत्तीच्या चौकशीची धर्मदाय आयुक्तांकडे मागणी

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट : शहरातील पुरातन राम मंदिर देवस्थानच्या नावावर असलेल्या चल-अचल संपत्तिमधे ट्रस्टचे पदाधिकाऱ्यांनी घोळ केला असल्यावरुन याची धर्मदाय आयुक्तांनी चौकशी करण्याची मागणी शहरातील पत्रकार तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते सचिन वाघे यांनी केली आहे.
या प्राचीन राममंदिर देवस्थान ट्रस्टकड़े जवळपास दोनशे एकर शेत जमीन असल्याची माहिती ऑनलाइन चौकशीतुन मिळाली आहे तसेच राम मंदिर च्या नावे हिंगणघाट शहरात करोडो रुपयांची संपत्ती, सोने-चांदी असतानासुद्धा मंदिराच्या स्थितीमध्ये कोणतीही सुधारणा होत नसल्याचे दिसुन येत आहे. यासंबंधी श्री राम मंदिर देवस्थान अध्यक्षांना विचारणा केली असता त्यांनी धर्मदाय आयुक्तांकड़े संपर्क साधुन माहिती घेन्यास सांगितले.
संबंधित व्यक्तीनी धर्मदाय कार्यालय वर्धा येथे प्रत्यक्ष भेट दिली असता देवस्थानचे अध्यक्षानी दिलेल्या नोंदणी क्र.359 श्री राम मंदिर देवस्थानबद्दल विचारपूस केली असता धक्कादायक माहिती समोर आली, श्रीराम मंदिर देवस्थान हिंगणघाट या ट्रस्टचे 359 याची नोंदणी नाही .
श्री राम मंदिर देवस्थान अध्यक्ष यांनी दिलेली माहिती चुकीची आहे हे लक्षात आल्याने एकप्रकारे राम भक्तांनी दिलेले दान – संपत्तीबद्दल मोठा घोळ झाला असावा अशी जनमानसात चर्चा आहे.
देवस्थानाला दिलेले दान याच्या व्यवहार व हिशोब याची माहिती जनतेला ट्रस्टी देत नसल्यामुळे मंदिराच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी, अशी तक्रार धर्मदाय आयुक्त,वर्धा पत्रकार सचिन वाघे यांनी तक्रार केली आहे.

जिगाव प्रकल्प अंतर्गत पुनर्वसनाची कामे गुणवत्तापूर्ण करावी-आमदार राजेश एकडे

0

 

मलकापूर विधानसभा मतदार संघाचे कर्तव्यदक्ष आमदार मा.श्री.राजेश एकडे  यांनी आज शनिवार,दिनांक ०३ एप्रिल २०२१ रोजी जिगाव प्रकल्प अंतर्गत पुनर्वसनाची कामे सुरू असणाऱ्या टाकळी वतपाळ, पलसोडा, पातोंडा, कोदरखेड, खरखुडी,बेलाड व हिंगणा इसापूर येथे सुरू असलेल्या पुनर्वसनाच्या कामाची पाहणी करून आढावा घेतला. जिगाव प्रकल्प अंतर्गत सुरु असलेल्या पुनर्वसनाची कामे दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करावी अश्या सूचनासह पलसोड येथील भूखंड वाटपाची प्रक्रिया नव्याने करावी, अवार्ड झालेल्या गावांचे भूखंड वाटप त्वरित करावे,जुन्या गावांमध्ये ज्या सोयी-सुविधा उपलब्ध आहेत त्या नवीन गावामध्ये उपलब्ध करून द्याव्यात, पुनर्वसन अंतर्गत सर्व शासकीय इमारतींना संरक्षण भिंत बांधावी,गावठाणा बाहेरील व गावठाणाआतील अतिक्रमणधारकांना त्यांच्या मूल्यांकनानुसार मोबदला अदा करावा अशा सूचना आमदार राजेश एकडे यांनी यंत्रणेस केल्या यावेळी त्यांनी हिंगणा इसापूर येथे वृक्षारोपण देखील केले तसेच या प्रसंगी जिगाव प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता श्री. श्रीराम हजारे, उपकार्यकारी अभियंता श्री.चोपडे, श्री.यमाजी,श्री.निखाडे,यांच्यासह जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री निलेश पाऊलझगडे, जिल्हा पुनर्वसन समितीचे सदस्य श्री.पुरुषोत्तम झाल्टे, तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री.आकाश वतपाळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे नवनियुक्त प्रशासक श्री.राम पांडव,मलकापूर विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री.राजू पाटील हाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक श्री.संदीप हाडे पाटील,पलसोडा येथील श्री.राजेंद्र चांभारे, श्री.पाहाडसिंग सुरडकर,श्री.दिलीपसिंग राजपूत, श्री.अतुल पाटील- येरळीकर, श्री.गणेशभाऊ पाटील,श्री.सुनील वेरुळकर,श्री.नारायण झाल्टे,खरकुंडी येथील श्री.सचिन साबे, श्री.अरुण साबे, श्री.राजाराम भामद्रे, बेलाड येथील श्री.वैभव साबे,श्री.मोहन पाटील, श्री.अशोक साबे, श्री.निखिल साबे,हिंगणा इसापूर येथील संदीप देशमुख,श्री.हरिदास अवचार प्रामुख्याने उपस्थित होते.

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतड्याला जागा मिळणे बाबत बेमुद्दत उपोषणाचा आज पाचवा दिवस

0

 

मोताळा प्रतिनिधी
अजहर शाह

बुलढाणा:-भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा व स्मारकासाठी शहरातील जयस्तंभ चौकातील हीरोळे पंपा शेजारील जागा मिळण्यासाठी माजी नगरसेवक आशीष खरात यांनी बुलडाणा नगर परिषदे समोर पाच दिवसांपासून उपोषण सुरु केले आहे.आज या उपोषणास लोकनेते विजयराजजी शिंदे यांनी भेट देऊन सदर मागणीस भाजपा च्या वतीने जाहिर पाठिंबा दर्शविला आहे.यावेळी नगरसेवक अरविंद होंडे,कोंग्रेस शहराध्यक्ष दत्ता काकस यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

वंचित बहुजन आघाडी च्या सिंदखेडराजा तालुका अध्यक्षपदी मधुकर शिंदे यांची निवड !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका डोळ्यासमोर ठेवून वंचित बहुजन आघाडीची सिंदखेडराजा तालुका कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे ‘वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी ही कार्यकारिणी जाहीर केली आहे ‘यामध्ये तालुका अध्यक्ष म्हणून सोनोशी येथील सामाजिक कार्यकर्ते मधुकर शिंदे यांची निवड करण्यात आली आहे .तर त्यांच्या सोबत ‘सात तालुका उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे .दोन महासचिव ‘चार सचिव ‘तीन संघटक .एक सहसंघटक ।हे पदाधिकारी मधुकर शिंदे यांच्या दिमतीला राहतील ‘
तर आपण जोमाने कामाला लागू व प्रत्येक खेड्यापाड्यांमध्ये वंचित बहुजन आघाडीची कार्यकारणी तथा शाखा स्थापन करू ‘व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचे हात बळकट करू .असा विश्वास यावेळी वंचित बहुजन आघाडी चे नवनियुक्त तालुका अध्यक्ष मधुकर शिंदे यांनी दैनिक भारत संग्राम ना बोलताना दिला !

आशिष खरात बाबा यांच्या उपोषणाची यशस्वी सांगता !विशेष सभा आयोजित करून कायदेशीर कारवाई करु नगराध्यक्षा यांच्या लेखी पत्रामुळे उपोषणाची सांगता !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

हिरोळे पेट्रोल पंपा जवळील जागा डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी व स्मारकासाठी तसेच गरजू विद्यार्थ्यांच्या अभ्यासिका साठी नगरपालिकेने समाज बांधवांना द्यावी या मागणी साठी गेल्या 30 मार्च पासून नगर परिषद बुलढाणा यांच्या कार्यालयासमोर आशिष बाबा खरात यांनी बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली होती ‘परंतु पाच दिवस होऊनही नगरपरिषदेने साधी त्यांचे विचारपूसही केली नव्हती ‘परंतु बुलढाणा शहरातूनच नाही तर संपूर्ण जिल्ह्यातून अनेक राजकीय पक्षांनी ‘ सामाजिक संघटनेने . वार्डा -वॉर्डातून नगर परिषदेला लोकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले ‘व अक्षरशा निवेदनांचा पाऊस नगर परिषदेमध्ये पडला !व नगरपरिषदेवर भीम सैनिकांचा प्रचंड दबाव वाढला ‘त्याचाच परिणाम म्हणून ‘
दिनांक 3 एप्रिल रोजी ‘बुलढाणा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा नजमुन्निसा बेगम मो .सजाद व त्यांचे पती सज्जादयांनी आशिष खरात यांच्या उपोषण मंडपास भेट दिली व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या ‘व नगर परिषदेची विशेष सभा .दिनांक ८ एप्रिल रोजी घेऊन .डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी असलेल्या जागी संदर्भामध्ये योग्य निर्णय घेऊ असे लेखी आश्वासन आशिष बाबा खरात यांना दिले .व दिनांक 5 एप्रिलला तसेच सूचना देखील काढू असे सांगितले व उपोषण मागे घेण्याची विनंती केली ‘यावेळी नगराध्यक्ष मो . सज्जाद यांनी लिंबू पाणी देऊन आशिष खरात यांचे उपोषण सोडले ‘यावेळी माजी आमदार विजयराज शिंदे ‘मो . सज्जाद,दत्ता काकस ,अरविंद हाडे, मंदार बाहेकर ,सत्तार कुरेशी, निलेश जाधव, वंचित बहुजन आघाडी चे बाला राऊत ‘गजानन पाखरे राऊत दिलीप राजभोज, उदय , भीमराव सुरडकर ,हरिभाऊ मोरे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक अशोक हिवाळे गजानन झिने, राजेश गवई, अनिल बावस्कर शहराध्यक्ष राष्ट्रवादी ।भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष अनंता मिसाळ ‘समाधान जाधव तालुका अध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा ‘गौरव हिवाळे शंतनू सरदार निर्मलाबाई जाधव नगरसेविका वंचित बहुजन आघाडी ची नाना साळवे, संतोष राव जाधव, मंगेश इंगळे ,आकाश लोखंडे ,किसन धुरंधर ‘पंजाबराव गवई . विनोद गवई रविकिरण मोरे किशोर सुरडकर . राजेश सरकटे . गजानन गवई ‘आधी युवक-युवती नागरीक हजर होते ‘

कोविड ची लस गावात उपलब्ध करून द्यावी ! नागरीकांची मागणी ‘वयोवृद्ध लोकांची लस घेण्यासाठी धावपळ ! :तासन तास ताटकळत बसावे लागते -साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्रकार

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

सध्या सिंदखेडराजा तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लसीकरणाला सुरुवात झाली असून 60 वर्षावरील नागरिकांनी लस घेण्याचे आव्हान प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे त्याला प्रतिसाद म्हणून अनेक वयोवृद्ध नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने कोविड ची लस घेतली आहे ‘परंतु कोविड लसीकरणाचे वर्गिकरण केल्यामुळे ६० वर्षावरील वयोवृद्ध नागरिकांची लस घेण्यासाठी धावपळ होत आहे ‘साखरखेर्डा प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अनेक गावे येत असल्यामुळे जास्त गर्दी होत आहे ‘यामध्ये शिंदी ‘ सवडद ‘ रताळी ‘ मोहाडी ‘ पिंपळगाव सोनारा ‘ सांवंगी भगत ,साखरखेर्डा, गुंज ‘गोरेगाव ‘ उमनगाव ‘असे अनेक गावे आहेत प्राथमिक आरोग्य केंद्र मध्ये लस घेण्यासाठी गर्दी वाढत असल्यामुळे वयोवृद्ध नागरिकांना तासनतास ताटकळत बिना पाण्यावाचून बसावे लागत आहे ‘त्यामुळे नागरिकांची प्रचंड प्रमाणामध्ये गैरसोय होत असून ज्या नागरिकांना लस घ्यायची आहे असे नागरिक सर्व कामे धंदे सोडून लस घेण्याकरता उन्हां मध्ये साखरखेर्डा येथे त्यांना यावे लागते ‘त्यामुळे त्यांचा वेळही जातो व आज अनेक महिला या शेतातील कामे सोडून दिवसभर साखरखेर्डा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लस घेण्याकरता ताटकळत बसत आहे ‘त्यामुळे आरोग्य विभागाने साखरखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रांअंर्तगतातील खेड्यापाड्यांमध्ये गावात जाऊन लस द्यावी अशी मागणी ज्येष्ठ नागरिकांनी यावेळी केली आहे ‘
त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होईल व लोकांचा वेळही वाचेल ‘त्यामुळे आरोग्य विभागाने तातडीने गावात जाऊन लसीकरणाला सुरुवात करणे गरजेचे आहे !त्यामुळे गर्दी ही होणार नाही !