Home Blog Page 594

गौताळा व्हॅली इंग्लिश स्कूल कन्नड या शाळेची मूळ मान्यता तत्काळ रद्द करावी कृष्णा गाडेकर यांची मागणी

0

 

सागर जैवाळ सिल्लोड तालुका प्रतिनिधी।

कन्नड तालुक्यातील गवताळा व्हॅली इंग्लिश स्कूल या शाळेच्या व्यवस्थापनाकडून हेतुपुरस्कर पणे सक्तीने ती वसुली केली जात आहे एकीकडे covid-19 चा प्रादुर्भाव लॉक डाऊन बिकट आर्थिक परिस्थिती आणि आता ओला दुष्काळ या सर्व बाबींमुळे नोकरवर्ग सोडला तर शेतकरी शेतमजूर व्यापारी खाजगी कर्मचारी अत्यंत आर्थिक अडचणीत सापडला आहे परंतु दुसरीकडे शालेय शिक्षण विभागातर्फे शक्तीने वसुली करू नये असे आदेश असताना शासनाच्या नियमां ना पायी तुडवून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान करणारे गवताळा व्हॅली इंग्रजी शाळेचे व्यवस्थापन त्यांच्यावर तत्काळ कारवाई करून शाळेची मूळ मान्यता रद्द करावी अन्यथा येत्या आठ दिवसात प्रहार स्टाईलने सदर शाळेच्या व्यवस्थापनाला धडा शिकवू असा इशाराही देण्यात आला

परतीच्या पावसामुळे झालेल्या पिकनुकसानीबाबत सूनगाव येथिल शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांना केले निवेदन सादर

0

 

गजानन सोनटक्के
जळगाव जामोद

परतीच्या पावसामुळे सोयाबीन व कपाशी पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक गर्तेत अडकला असून, त्याला मदत करून तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी सुनगाव येथील शेतकर्‍यांनी उपविभागीय अधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात शेतकर्‍यांनी म्हटले आहे, की यावर्षी सुरुवातीपासून सर्व पिकांवर किडीचे (रोगराई) प्रमाण असल्यामुळे पिकांवर जास्त प्रमाणात औषधीसाठी खर्च करावा लागला. नंतर संततधार पावसामुळे मूग, उडीद पिकाचे पूर्णतः नुकसान झाले असताना आता परतीच्या पावसामुळे हाती आलेले सोयाबीन पिक अक्षरशः जागेवरच सडल्यामुळे त्यापासून कोणत्याही प्रकारचे उत्पन्न मिळाले नाही. उलट त्यासाठी भरपूर प्रमाणात खर्च करावा लागला. आजरोजी सतत आठ दिवसापासून रोज पाऊस सुरू असून कपाशी पिकाचे गोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी वर्गाने केलेला खर्च सुध्दा निघत नसून तो दुहेरी संकटात सापडलेला आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन शेतकर्‍यांना आर्थिक मदत आणि पिक विमाची 100 टक्के रक्कम द्यावी. विमा कंपनीला तसे निर्देश आणि आणेवारी कमी दाखवून शेतकरी वर्गाला आर्थिक संकटातून बाहेर काढावे. मागण्या मार्गी न लागल्यास लागल्यास पर्यायी आम्हाला लोकशाही मार्गाचा अवलंब करावा लागेल व होणार्‍या परिणामास आपण व विमा कंपनी जबाबदार राहील, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत. निवेदनाला पंचायत समिती उपसभापती महादेवराव धुर्डे, जिल्हा परिषद सदस्या सौ. रुपालीताई अशोक काळपांडे यांनी पाठिंबा दिला. निवेदनावर मोहनसिंह राजपूत, गजानन सोनटक्के, गणेश भड, प्रविण धर्मे, संजय निमकर्डे, विजय वंडाले, प्रवीण कापरे, गणेश अंबडकार, समाधान भगत, तुकाराम भगत, मारोती अंबडकार, बळीराम वसुले, तुकाराम मिसाळ, गजानन धुळे, प्रवीण येउल, मारोती मिसाळ, नितीन भड आदींसह शेकडो शेतकर्‍यांच्या सह्या आहेत.

गाव पातळीवर सर्वे करून मदत मिळणे बाबत तलाठ्याला सत्याग्रह शेतकरी संघटनेतर्फे निवेदन.

0

 

खामगाव.=या वर्षी खरीप हंगामातील पिकाला आवश्‍यक असलेल्या पावसापेक्षा अति जास्त पाऊस झाल्यामुळे पहूर जीरा मोरगाव जलंब पारखेड लांजुळ मक्ता शिवारातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहेत आधी मूग उडीद तीड पिकांची नुकसान झाले असून आता सोयाबीन कापूस ज्वारी बाजरी मका सारख्या पिकाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळाला आहे सदर भागातील बहुसंख्य शेतकऱ्याचा चरितार्थ हा शेतीवर अवलंबून आहे वर्षातून एकदाच येणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असणारा परिवार आज निराधार झाला आहे अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे तर काहींना पिक विमा काढणे शक्य झाले नाही आज झालेले नुकसान पाहून अनेकांच्या मनात धास्ती भरले असून धास्तीने जीवन यात्रा संपू शकते किंवा आत्महत्या करून आपल्या जीवन यात्रेला पूर्णविराम देऊ शकतात ह्या घटना टाळण्यासाठी आपली जबाबदारी व अधिकार म्हणून आमची मागणी शासनापर्यंत व पिक विमा कंपनी समोर मांडून आम्हाला झालेली नुकसान भरपाई मिळवून द्यावी करिता आज पहूर जीरा येथे सत्याग्रह शेतकरी संघटना व समस्त शेतकऱ्यांच्या वतीने तलाठ्याला निवेदन देण्यात आले सदर निवेदनात सत्याग्रह शेतकरी संघटना युवा आघाडी गणेश सडत कार अनिल गव्हांदे शेख आयाज संजय फाटे अमीर शाह शेख शब्बीर धीरज फाटे पवन चव्हाण निलेश उचांडे निलेश घो पे तसेच असंख्य शेतकऱ्यांच्या सह्या आहेत

लोणार तहसीलवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आक्रोश मोर्चा

0

 

शेतकऱ्यांना एकरी चाळीस हजार रुपये मदत द्या अन्यथा

अखेर आंदोलनाच्या दरम्यान आंदोलन चिघळु नये म्हणुन पोलीसांनी ब-याच पदाधिकाऱ्यांना घेतले ताब्यात .

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज लोणार तहसील कार्यालयावर विदर्भ कार्यअध्यक्ष राणा चंदण यांच्या नेतृत्वामध्ये जिल्हाअध्यक्ष डाॕ.ज्ञानेश्वर टाले जिल्हाअध्यक्ष अल्पसंख्यांक आघाडी रफिकभाई यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शेतकऱ्यांसह मोठ्या संख्येने मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते सदर मोर्चा खटकेश्वर महाराज मंदिरापासून तहसीलदार कार्यालयापर्यंत घोषणाबाजी देत शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्याची मागणी यावेळी स्वाभिमानी च्या वतीने करण्यात आली, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दिवाळीला मंत्र्यांच्या घरी दिवाळी साजरी करू असा इशारा जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने देण्यात आला राज्य सरकारने तातडीने शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईचे पंचनामे करावेत व शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यामध्ये हेक्टरी ४० हजार रुपये मदत जमा करावी अशी मागणी तहसीलदार यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली यावेळी संघटनेचे विदर्भ कार्याध्यक्ष राणा चंदन यांनी सांगितले कि प्रशासनाने तात्काळ सरसकट पंचनामे करुन जिल्हा प्रशानाच्या मार्फत राज्य सरकारला अहवाल द्यावा अन्यथा मुंबई नागपुर राष्ट्रीय महामार्गवर चक्का जाम करु एकही चाक रस्त्यावर फिरणार नाही असा निर्वाणीचा इशारा दिला.यावेळी जिल्हाअध्यक्ष अध्यक्ष डाॕ.ज्ञानेश्वर टाले जिल्हाध्यक्ष रफिक भाई अल्पसंख्यांक आघाडी तालुकाध्यक्ष लोणार सहदेव लाड तालुका उपाध्यक्ष सुनील मोरे मेहकर तालुका अध्यक्ष नितीन अग्रवाल तालुका उपाध्यक्ष गणेश जुनघरे देवेंद्र आखाडे सतीश वाघ मेहकर शहराध्यक्ष सदाशिव वडुळकर मेहकर शहर अध्यक्ष अल्पसंख्याक आघाडीचे अशफाक शहा धीरेंद्र चव्हाण संजू भाऊ धावडे सनाउल्लाह शहा गणेश मोरे योगेश सोनुने सहा पदाधिकारी शेतकरी उपस्थित होते.

लोणवाडी ते पळशी रस्त्याची दुरवस्था

0

 

सिल्लोड तालुका प्रतिनिधी सागर जैवाळ

लोणवाडी ते पळशी हा रस्ता मागील वर्षी पासुन अपघाताचं माहेरघर बनले आहे.. या रस्त्यावर मागील वर्षी अवजड वाहने… डंपर यांच्या अती वापरामुळे रस्त्याच्या दुतर्फाना खोल खड्डे पडले आहेत तर मधोमध उंच कठडा तयार झाल्यामुळे मोटारसायकल व लहान वाहने यांना खुप कसरत करावी लागत आहे.या रस्त्याचा वापर अंधारी,म्हसला बु, म्हसला खु,मांडगाव, टाकळी व मोहरा येथील नागरीक दवाखाना व शासकीय कामासाठी सिल्लोड येथे जाण्यासाठी वापर करतात परंतु शासन व प्रशासन यांचे या रस्त्याकडे अजून दुर्लक्ष आहे या रस्त्याची लवकर दुरुस्ती करावी अशी मागणी लोणवाडी येथील नागरीक व शेतकरी बांधवांनी केली आहे…

वैजापूर तालुका पोलीस पाटील कामगार संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी- राजू आहेर पाटील

0

 

ऋषी जुंधारे
तालुका प्रतिनिधी

आज वैजापूर येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने वैजापूर तालुका पोलीस पाटील कामगार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी मकरमतपुर वाडी येथील राजु आहेर पाटिल तसेच तालुका उपाध्यक्ष पदी अनिल धिवर पाटिल बेलगाव यांची निवड झाली.त्या अनुषंगाने या दोन्हीही निवडीबद्दल वैजापुर येथे ठक्कर मार्केटमध्ये समता परीषद च्या वतीने सत्कार करण्यात आला याप्रसंगी समता परिषदेचे ज्येष्ठ जिल्हा निमंत्रक आबासाहेब जेजुरकर समता परिषद जिल्हा संघटक जगन्नाथ गायकवाड समता परिषद तालुका सरचिटणीस साहेबराव पडवळ शाहीर अशोक बागुल तसेच नगरसेवक स्वप्निल जेजुरकर ,कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक बद्री अण्णा गायकवाड ,दिगंबर वाघचौरे बाळासाहेब शेवाळे वाल्मीक पठारे पत्रकार दिगंबर भाऊ अण्णा धारबळे आदींची उपस्थिती होती याप्रसंगी सर्वांनी पुढील वाटचालीसाठी दोन्हीही पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

पळशी गावांमध्ये वेगवेगळ्या दोन ठिकाणी वीज कोसळून महिलेचा मृत्यू तसेच एक गाय दगावली

0

 

सिल्लोड तालुका प्रतिनिधी सागर जैवाळ

आज दि.१८ रोजी दुपारी झालेल्या पावसामुळे
सिल्लोड तालुक्यातील पळशी येथील कांताबाई गंगाधर सोनवणे राहणार पळशी (वय 36) यांचा पावसामध्ये वीज कोसळून शेतात राहत्या घरी मृत्यू झाला.त्यामुळे पूर्ण पळशी गावांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात चार मुली,एक मुलगा,सासू-सासरे,असा परिवार आहे.तसेच गावात दुसऱ्या शेतात योगेश त्रिंबक बळे यांची गाय गोठ्यात बांधलेली होती व पाऊस सुरू असतांना अचानक विजेचा वीज गायीच्या अंगावर पडली असता गाय त्यामध्ये दगावली त्यामुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे

अखेर भ्याड हल्ल्यातील त्या आरोपींना अटक.

0

 

सागर जैवाल  सिल्लोड तालुका प्रतिनिधी.

MESTA संघटनेच्या आक्रमक आंदोलनामुळे जैन इंटरनॅशनल स्कूल वरील हल्लेखोरआरोपी अटक. जैन इंटरनॅशनल स्कूल वरील हल्लेखोरांना, अटक करण्यासंदर्भात MESTA संस्थापक अध्यक्ष संजय रावजी तायडे पाटील, यांनी अतिशय आक्रमक व खंबीरपणे शासन, पोलीस प्रशासन यांच्यापुढे भूमिका मांडली, असल्याकारणाने व सर्व शैक्षणिक संस्था ऑनलाईन शिक्षण बंद केले असल्याकारणाने, अखेर पोलीस प्रशासनास हल्लेखोर आरोपींना अटक करण्यास भाग पाडले.
सर्व संस्थाचालक ज्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष MESTAसंघटनेस पाठिंबा दिला. सर्वांचे आभार असेच आपल्या समस्यांसाठी प्रश्नांसाठी MESTAसोबत एकत्र येऊया.त्याचबरोबर माननीय संस्थापक अध्यक्ष संजय रावजी तायडे पाटील यांचे विशेष आभार मानले . कारण त्यांनी अतिशय आक्रमक व ठामपणे संस्थाचालकांच्या प्रश्नांची भूमिका मांडली. यांचे आभारसर्व संस्थाचालकांनी विद्यार्थी हितासाठी उद्यापासून ऑनलाइन शिक्षण व्यवस्था सुरू करावी अशी विनंती मेस्टा चे संस्थापक अध्यक्ष संजराव तायडे पाटील यांनी केली.

जेहूर पाणंद रस्ता दुरुस्ती बाबत प्रहार संघटनेच्या नेतृत्वात तहसीलदारांना निवेदन

0

 

सचिन  पगारे नाशिक

जातेगाव येथील जेहूर पांधी रस्त्याच्या दुरुस्ती बाबत सदर शेतकर्‍याच्या उपस्थितीत प्रहार संघटनेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
नांदगाव तालुक्यातील घाटमाथ्यावरील जातेगांव येथील जेहूर पांधीच्या कच्च्या रस्त्यामूळे शेतकरी, वाहनधारकांचे अतोनात हाल होत आहेत .हा रस्ता शेतकरी, मजूर, विद्यार्थी, रुग्ण, आदींसाठी जीवघेणा ठरत आहे.या रस्त्याचे काम मार्गी लागल्यास नागरिकांचे जीवन गतिमान होईल. अशी मागणी या भागातील नागरिकांची असून सदर शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी तालुका प्रहार संघटने मार्फत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले .सदर निवेदनात म्हटले आहे की, जातेगाव येथील जेऊर पांधी रस्ता चार कि.मी. असून त्या रस्त्याचा क्रमांक १५३ आहे. त्या रस्त्यालगतच गावातील १५० लोकवस्ती असून आज रोजी सदर शेतकऱ्यांचा गावा सोबत संपर्क तुटला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक, फळबाग याची मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सदर रस्त्याची पाहणी करून तात्पुरत्या किंवा कायम स्वरूपी या रस्त्याची कामे करून घेण्यात यावे . संबंधीत अधिकाऱ्यांमार्फत रस्त्याची तात्काळ पाहणी करून सदर रस्त्याची दुरुस्ती करावी तसे न झाल्यास शेतकऱ्यां समवेत तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्यापासून होणार्‍या परिणामास प्रशासन जबाबदार राहील .असा इशारा देण्यात आला .सदर निवेदन नांदगाव तालूका प्रहार संघटनेचे अध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांनी नांदगाव तहसीलदारांना सादर केले. जनार्दन भागवत, निवृत्ती सोनवणे, सोमनाथ पवार ,चंद्रभान झोडगे, , रविकांत भागवत, राहुल पवार, गणेश सोनवणे ,सोनू पवार, नवनाथ थोरात, दत्तू चव्हाण, मारुती चव्हाण, निवृत्ती चव्हाण आदी युवा शेतकरी उपस्थित होते.

रिक्त पदांमुळे चिचगड ग्रामीण रुग्णालयाची आरोग्य सेवा व्हेंटिलेटरवर

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

चिचगड,दि.17:- देवरी तालुक्यातील चिचगड नक्षलग्रस्त व आदिवासी भागातील मुख्य गाव म्हणून ओळखले जाते.त्यातच या भागातील नागरिकांना आरोग्याची सोय चांगली उपलब्ध व्हावी यासाठी ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी सुरु करण्यात आले.मात्र या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारीसह इतर अनेक पदे रिक्त असल्याने रुग्णांना योग्य उपचाराअभावी परत जाण्याची वेळ येऊ लागली आहे.त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरली जावीत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.गेल्या दशकापुर्वी तयार करण्यात आलेल्या या ग्रामीण रुग्णालय परिसरातील लोकसंख्या सुध्दा वाढली असून वाढलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत अधिकारी व कर्मचारी वर्ग अपुरा पडू लागला आहे.त्यातच रुग्णालयातील खाटाही कमी पडू लागल्याने 100 खाटांचे रुग्णालय व्हावे अशी मागणी केली जाऊ लागली आहे.

चिचगड हे त्या क्षेत्रातील मध्यवर्ती ठिकाण असून मोहांडी,ककोडी , केशोरी, अबोंरा, आलेवाडा,परसोडी , कवलेवाडा, सिंदीबीरी या परिसरातील अनेक गावांतून दररोज १०० ते २०० च्या आसपास रुग्ण उपचारासाठी येत असतात.या रुग्णालयात गेल्या अनेक वर्षापासून वैद्यकिय अधिकारी डॉ भोंगाडे हे येथे एकमेव कार्यरत आहेत. त्यांनाच आता अतिरिक्त कामे सांभाळावे लागत आहे.रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता येथे कर्मचारी वर्गाची व सोई-सुविधाचीं गरज आहे. त्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.
अनेक पदे रिक्त
चिचगड ग्रामीण रुग्णालयात संपुर्ण २६ पदे मंजुर असुन फक्त १६ पदे भरलेली आहेत व १० पदे अनेक वर्षापासुन रिक्त आहेत.त्यामध्ये वैद्यकिय अधीक्षक रिक्त,सहाय्यक अधिक्षक रिक्त,कनिष्ट लिपीक २-रिक्त,अधिपरिचारीक ३-रिक्त,
प्रयोगशाळा सहाय्यक १-रिक्त,क्ष-किरण तंत्रज्ञ १-रिक्त,शिपाई १-रिक्त पदे आहेत.