vidhansabha:हिंगणघाट :- हिंगणघाट, समुद्रपूर, सिंधी रेल्वे विधानसभेत समीर कुणावार यांनी 2014 मध्ये( 90000 ) मतदान घेतले, 2019 मध्ये (103000)मतदान घेतले
, 2024 मध्ये (114578) मतदान घेतले वर्ष 2014,2019,2024 मध्ये तिसऱ्यांदा आमदारकीची हॅट्रिक करून हिंगणघाट विधानसभेत आमदारकीची हॅट्रिक करून हिंगणघाट विधानसभेत प्रथमच रचला इतिहास या.
Hingnghat:हिंगणघाट – रोटरी क्लब हिंगणघाटने गीमाटेक्स कंपनीत तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांमुळे होणाऱ्या गंभीर आजारांविषयी जनजागृती करण्यासाठी एक महत्त्वाचा कार्यक्रम आयोजित केला.
या कार्यक्रमात प्रसिद्ध डॉक्टर प्रशांत कोठारी यांनी कामगारांना तंबाखू सेवनाचे दुष्परिणाम समजावून सांगितले आणि कॅन्सरसह शरीरावर होणाऱ्या इतर गंभीर परिणामांविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
डॉ. कोठारी यांनी तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या कॅन्सर आणि इतर विकारांची लक्षणे स्पष्ट केली, तसेच हे आजार मृत्यूला कारणीभूत ठरू शकतात, हे कामगारांना समजावून सांगितले. रोटरी क्लब हिंगणघाटचे उपाध्यक्ष श्री शाकीर खान पठाण, सचिव श्री उदय शेंडे, प्रा. उदय भोकरे यांच्यासह गीमाटेक्सचे कामगार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
Hingnghat:रोटरी क्लब हिंगणघाटने हा अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण कार्यक्रम आयोजित करून कामगारांमध्ये तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण केली, ज्यामुळे तंबाखूचे सेवन टाळण्यासाठी प्रेरणा मिळेल.
policenews:हिंगणघाट :- दि 22/11/24 रोजी स्थानिक गुन्हे शाखा जिल्हा वर्धा चे पथक पोलीस स्टेशन हिंगणघाट परीसरात अवैध धंद्यावर कार्यवाही करणेकरीता पेट्रोलिंग करीत असतांना, त्यांना मिळालेल्या गोपणीय माहितीच्या आधारे मौजा रिमडोह हॉटेल रायगड समोर, एन.एच. 44 सर्व्हिस रोडवर सापळा रचुन एका काळ्या रंगाचा ऑटो क्र. MH-31/CV-5949 यावर दारूबंदीबाबत प्रो.रेड कार्यवाही केली असता,
सदर ऑटोमध्ये चालक 1) नारायण शंकर शहारकर, रा. माता मंदिर वार्ड हिंगणघाट, एक ईसम 2) आनंद नंदु भाट, रा. कंज्जर मोहल्ला, जलनगर वार्ड चंद्रपुर व एक महिला 3) मंदाबाई शामकिशोर कंज्जर, रा. कंज्जर मोहल्ला, जलनगर वार्ड चंद्रपुर हजर मिळुन आले असुन, ऑटोमध्ये मोठ्या प्रमाणात देशी-विदेशी दारूचा मुद्देमाल मिळुन आला असुन, सदर दारूचा माल हा 4) सारंग बागडी रा. राममंदिर वार्ड हिंगणघाट याचे मालकिचा असुन, दारूचा माल 5) राधा आनंद भाट, रा. कंज्जर मोहल्ला, जलनगर वार्ड चंद्रपुर हिने दिल्याचे सांगितल्याने,
जागीच मोक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून आरोपीतांचे ताब्यातुन 1) एक काळ्या रंगाचा ऑटो क्र. MH-31/CV-5949 किं. 1,20,000 रू. 2) 02 एअरबॅग व 01 स्कुलबॅग मध्ये देशी दारूने भरलेल्या एकुण 500 सिलबंद शिशा कि. 50,000 रू 3) 02 एअरबॅगमध्ये विदेशी दारूने भरलेल्या 96 सिलबंद शिशा कि. 33,600 रू, 4) 03 अॅन्ड्रोईंड मोबाईल कि. 45,000 रू व 05 बॅग कि. 2,500 रू असा जु.किं. 2,51,100 रू चा मुद्देमाल जप्त करून, 05 आरोपीतां विरूध्द पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
policenews:सदरची कार्यवाही पोलीस अधिक्षक अनुराग जैन सा., अपर पोलीस अधिक्षक डॉ सागर कवडे सा., यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा जि. वर्धा चे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी सा. यांचे निर्देशाप्रमाणे,, पो.अं. मनोज धात्रक, अरविंद येनुरकर, रवि पुरोहित, अभिषेक नाईक, विनोद कापसे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.
policenews:हिंगणघाट प्रतिनिधी, दि.२२गोवंशाची अवैध वाहतूक करताना १४ जनावरे कत्तलीसाठी जात असल्याचे संशयावरुन बजरंग दलाचे कार्यकर्त्यांनी वाहन अडवून हिंगणघाट पोलीसांच्या ताब्यात दिल्याची घटना काल गुरुवारी रात्री उघडकिस आली.
पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली असता एका ट्रकमध्ये जवळ्पास १४ गोवंशाची विना परवानगी वाहतूक करीत असल्याने पोलीसांनी कारवाई करीत ही जनावरे ताब्यात घेतली, यावेळी एक बछडा मृत्यूमुखी पडल्याचे आढळून आले.
काल दि.२१ रोजी राष्ट्रीय महामार्गावरील रिमडोह परिसरात गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यावरुन बजरंग दलाचे कार्यकर्त्यांनी हे चारचाकी वाहन अडवून धरले, त्यात गोमातेची क्रूरतेने कोंबून वाहतूक करीत असल्याने पोलीसांना कळविण्यात आले, पोलीसांनी वाहन ताब्यात घेऊन या जनावरांची सुटका करीत गोशाळेत रवानगी केली तसेच मृत बछड्याचे शवाची उत्तरीय तपासणी करण्यात आली.
सदर पशुधन गुजरात येथील भटक्या गोपालकांचे असल्याची माहिती पोलीसांनी दिली असून हे पशुधन हिंगणघाट नजिकच्या नांदगांव येथे घेऊन जात होते. हे गोधन नागपूर जिल्हयातील बेला परिसरातून वाहतूक करीत आणताना हिंगणघाट शहरानजिक रात्री ११.३० चे दरम्यान उपरोक्त कारवाई करण्यात आली.
policenews:सदर जनावरे हे शेतकऱ्याचे असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश जायभाई यांनी दिली.
यावल-फैजपूरच्या रॅलीला लाडक्या बहिणी आणि तरुणांचा उस्फुर्त प्रतिसाद
यावल (प्रतिनिधी) विकी वानखेडे
vidhansabha:रावेर यावल मतदारसंघातील प्रचार दौऱ्याला मिळालेल्या उस्फुर्त प्रतिसादाने विजयाची खात्री असल्याची भावना अमोल जावळे यांनी यावल आणि फैजपूर येथील रॅलीत व्यक्त केली. “घरोघरी जाऊन लाडक्या बहिणींचे औक्षण आणि तरुणांनी दिलेल्या स्वागताने मला अनमोल प्रेम दिले आहे. हे प्रेम आयुष्यभर विसरणे अशक्य आहे,”
असे त्यांनी यावेळी सांगितले. गेल्या ११-१३ दिवसांच्या प्रचार दौऱ्यात ज्येष्ठ नागरिक, तरुण वर्ग, आणि महिलांनी केलेले प्रेम आणि स्वागत अविस्मरणीय असल्याचे नमूद करत, “पद-प्रतिष्ठा येत-जात राहील, पण हे प्रेम चिरकाल टिकणारे आहे,” असे भावनिक वक्तव्य त्यांनी केले.
अमोल जावळे यांनी मतदारसंघातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी स्वतःला समर्पित करण्याचे वचन दिले. “रावेर आणि यावल मतदारसंघ सुजलाम-सुफलाम होण्याच्या दिशेने काम करण्याची माझी बांधिलकी आहे,” असे ते म्हणाले. त्यांनी सर्वसामान्यांच्या अपेक्षांना पूर्ण करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावल आणि फैजपूर येथील रॅलीत महिलांनी औक्षण करून आणि तरुणांनी फुलांचा वर्षाव करत अमोल जावळे यांचे जंगी स्वागत केले. या उत्साहवर्धक रॅलीत समाजातील सर्वच घटकांचा सहभाग दिसून आला. प्रचंड संख्येने उपस्थिती असलेल्या रॅलीने रावेर मतदारसंघातील निवडणूक प्रचाराला एक वेगळेच बळ मिळवून दिले.
Yavalnews:रावेर विधानसभा मतदारसंघात बाहेरून येऊन गुंडागर्दी करणारे आणि एकेकाळी हद्दपार झालेले काही लोक निवडणुकीत उतरले आहेत, तर दुसरे उमेदवार केवळ वडिलांची परंपरा सांगून, कोणतेही स्वकर्तृत्व नसताना मत मागत आहेत.
पण मी मतदारसंघाचा सखोल अभ्यास केला असून येथे कोणत्या विकासकामांची आवश्यकता आहे, याची मला जाण आहे. राज्यात महायुतीचेच सरकार येणार आहे, आणि माझा विजय निश्चित आहे. या विश्वासासह मी मतदारसंघात नव्या विकासाची मुहूर्तमेढ रोवणार आहे, असे महायुतीचे उमेदवार अमोल जावळे यांनी सांगितले. कठोरा, विरोदा, पिंपरूड आणि अन्य गावांमध्ये त्यांच्या प्रचार दौऱ्यादरम्यान नागरिकांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले.
प्रचारादरम्यान अमोल जावळे यांचे गावोगावी उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले, आणि मोठ्या संख्येने युवा कार्यकर्ते प्रचारात सहभागी झाले होते, तर ज्येष्ठ मतदारांनी आशीर्वाद दिले. जावळे म्हणाले की, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आमदार होण्याची स्वप्ने पाहत आहेत, पण ती पूर्ण होणार नाहीत.
जनता सुज्ञ आहे आणि केवळ परंपरेच्या नावावर मत मागणाऱ्यांनाही यश मिळणार नाही. “मला एकदा संधी देऊन बघा, विकास काय असतो ते दाखवून देईन,” असे त्यांनी सांगितले. रावेरच्या जनतेने इतिहासात कधीही आमदाराला पुन्हा निवडून दिले नाही, त्यामुळे यावेळी मतदारसंघात बदल होणार असून, जनतेची मला साथ मिळेल, हा आत्मविश्वास आहे, असे जावळे यांनी सांगितले.
Yavalnews:प्रचारात हिरालाल चौधरी, हर्षल पाटील, उमेश पाटील, सविता भालेराव, जयश्री चौधरी, पुरोजित चौधरी, पांडुरंग सराफ, सागर कोळी, तेजस पाटील, योगराज बऱ्हाटे, शाम महाजन, भरत पाटील, विलास कोळी, रामा कोळी, पंकज मोरे, अक्षय चौधरी, अमोल वारके, चेतन राणे, प्रकाश चौधरी, सतीश चौधरी, वसीम पिंजारी, योसेफ चौधरी यांसह महायुतीचे पदाधिकारी, बूथ प्रमुख, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
policenews:हिंगणघाट :- पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्हे प्रगटीकरन पथकाचे अंमलदार हे दिनांक 14/11/2024 रोजी पोस्टे परिसरात विधानसभा निवडणूक संबंधाने पोलीस ठाणे परिसरात वॉश आऊट मोहीम राबवित असताना मीना सुनील भोसले तसेच रंजित भुजंग पवार दोन्ही राहणार खैराटी पारधी बेडा हे त्यांच्या बेड्या जवळील नाल्या जवळ अवैध्यरित्या गावठी मोहा दारू काढण्याकरिता दारूभट्या लाऊन मोहा दारू गाळीत आहे.
अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने सदर माहीती ठाणेदार मनोज गभने यांना देवून त्यांचे आदेशाने मौजा उमरी पारधीबेडा येथे पो. स्टॉप सह रवाना होवून मिळालेल्या माहीती प्रमाणे पारधीबेडा येथे रेड केला असता पहिल्या कारवाईत मीना सुनील भोसले हिच्या ताब्यातून प्लास्टिक लोखंडी मोठया ड्रम मधे 1900 लिटर कच्चा मोहा रसायन सडवा, 200लिटर उकळता मोहा रसायन सडवा, 90 लिटर मोहा दारू, दारूभाट्टीचे साहित्य व दारुविक्री नगदी रोख असा एकूण जु. कीं. 1,97,150 रू चा मुद्देमाल मिळुन आला.
तसेच दुसऱ्या कारवाईमध्ये रंजीत भुजंग पवार व 25 वर्ष राहणार शिवनी पारधी वेडा मुक्काम खैराटी पारधी बेडा याच्या ताब्यातून प्लास्टिक व लोखंडी ड्रम मध्ये 2000 लिटर कच्चा मोहा रसायन सडवा, उकळता मोहा रसायन सडवा, 120 लिटर गावठी मोहा दारू, दारू भट्टीचे साहित्य, दारू विक्रीचे नगदी रोख असा एकूण जुमला किंमत 2,11,520 /- रू चा माल जप्त करण्यात आला. तिसऱ्या कारवाईत तरोडा पारधी बेडा येथे शोभिता चरण भोसले व 39 वर्ष राहणार तरोडा पारधी वेडा हिच्या ताब्यातून 1000 लिटर कच्चा मोहा रसायन सडवा, दारू भट्टी करता वापरलेला 200 लिटर उकळता मोहा रसायन सडवा, 60 लिटर गावठी मोहा दारू, दारूभट्टी चे संपूर्ण साहित्य व ड्रम असा एकूण जुमला किंमत 1,06,800/- रुचा माल जप्त करण्यात आला.
तिन्ही कार्यवाही मध्ये एकूण जु. कीं. 5,15,470 /- रू चा मुद्देमाल पंचासमक्ष मौक्का जप्ती पंचनामा कार्यवाही करून जप्त करून सदर कच्चा मोहन रसायन सडवा, उकळता मोहा रसायन सडवा, दारूभट्टी चे संपूर्ण साहित्य व ड्रम, गावठी मोहा दारू नाश करून करून आरोपी1) मीना सुनील भोसले, 2)रंजीत भुजंग पवार दोन्ही रा खैराटी पारधीबेडा 3) शोभिता चरण भोसले रा.तरोडा पारधीबेडा यांचे विरूध्द पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला..
policenews:ही संपूर्ण कार्यवाही पोलीस अधीक्षक अनुराग जैन , अप्पर पोलीस अधीक्षक डॉ . सागर कवडे,उपविभागीय पोलीस अधिकारी रोशन पंडीत यांचे निर्देशानुसार मनोज गभने, पोलीस निरीक्षक . हिंगणघाट यांचे आदेशाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील सपोनि आळंदे डि.बी. पथकाचे पोलीस हवालदार प्रशांत ठोंबरे, पो.ना. राहुल साठे, पोना विवेक वाकडे,पो.शी मंगेश वाघमारे पोशी आशिष नेवारे,पो.शि. विजय काळे यांनी केली.
जळगाव जा. ते शेगाव रॅलीचे गावफाट्यावर उत्स्फुर्त स्वागत
vidhansabha:शेगांव/- जळगाव जामोद मतदार संघातील परिवर्तन महाशक्तीचे अधिकृत उमेदवार प्रशांत काशीराम डिक्कर यांना आमदार बनविण्याचा विडा छत्रपती संभाजी राजे यांनी उचलला आहे.
यापूर्वी जळगाव जामोद येथे झालेल्या विशाल सभेत राजे यांनी प्रशांत डिक्कर यांना मतदारांनी त्यांना बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे. तर आज 15 नोव्हेंबर रोजी परत प्रशांत डिक्कर यांच्या निवडणूक प्रचारार्थ आयोजित जळगाव जा. ते शेगाव रॅलीसाठी हजेरी लावून छत्रपती घराणे प्रशांत डिक्कर यांच्या पाठिशी असल्याचे सांगून मतदारांना राजेंनी भावनिक साद घातली आहे.
तसेच पँथर सेनेचे दीपक भाई केदार यांनी सुध्दा गोरगरीब, सर्वसामान्य व शेतकरी, शेतमजुरांच्या समस्या निवारण करण्यासाठी झटणाऱ्या प्रशांत डिक्कर यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
प्रशांत डिक्कर यांच्या प्रचारार्थ आज 15 नोव्हेंबर रोजी छत्रपती संभाजी राजे व पँथर सेनेचे दीपकभाई केदार यांच्या नेतृत्वाखाली जळगाव जामोद येथून भव्य दुचाकी व चारचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 12 वाजता रॅलीला सुरूवात झाली.
ही रॅली संग्रामपूर-वरवट मार्गे शेगाव येथे सांयकाळी 5 वाजताचे सुमारास पोहोचली. रॅलीमध्ये सुमारे 2 हजार दुचाकी व 600 चारचाकीचा ताफा सहभागी झाला होता. या रॅलीचे प्रत्येक गावाच्या फाट्यावर जेसीबीने पुष्पवृष्टी करून भव्य स्वागत करण्यात आले. न भूतो न भविष्य अशी ही महारॅली निघाली होती. शेगाव येथील स्व.गजानदादा पाटील कृउबास मार्केट यार्ड येथे रॅलीचे सभेत रूपांतर झाले.
यावेळी उपस्थित प्रचंड जनसमुदायाला संबोधित करताना राजे छत्रपती संभाजी महाराज व दीपकभाई केदार यांनी उपरोक्त आवाहन केले. छत्रपती घराणं हे प्रशांत डिक्कर यांच्या पाठीशी आहे. त्यामुळे प्रशांत डिक्करला कुठलीही चिंता करायची गरज नाही. प्रशांत डिक्कर 100% आमदार होणार असे छत्रपती संभाजी राजे यांनी यावेळी सांगितले.
या सभेमध्ये कुणबी युवा मंच वतीने प्रशांत डिक्कर यांना एक लाख रुपये वर्गणी देण्यात आली. याशिवाय अनेक युवा शेतकऱ्यांनी सुध्दा आपल्या परीने अशी एकुण 6 लाख 22 हजार देणगी देऊन निवडणूक निधीस हातभार लावला.
Vidhansabha :-महाविकास व महायुती सोबतच- प्रशांत डिक्कर जळगाव जामोद मतदार संघात महाविकास आघाडीचे उमेदवार आणि महायुुतीचे उमेदवार यांची मैत्रीपूर्ण लढत होत असल्याने त्यांची युती आहे. कारण यापूर्वी त्यांनी जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोबत निवडणूक लढवली आणि आता पण सुद्धा ते सोबतच आहेत अशी टीका प्रशांत डीक्कर यांनी यावेळी केली.
चिखलीत ‘श्वेता ताई’ आणि ‘भाऊ’ची प्रतिष्ठा पणाला; तुल्यबळ लढतीत कोण बाजी मारणार? श्वेता ताई आणि भाऊ मधील जहाल संघर्ष, टोकाचा विरोध, ‘अरे ला कारे’चे राजकारण याचे प्रतिबिंब प्रचारातही दिसून येत आहे.
Vidhansabha :-बुलढाणा : जिल्ह्याची राजकीय राजधानी ही चिखलीची पारंपरिक ओळख. संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून दोन टोकाच्या विचारधारांचे येथे अस्तित्व राहिले. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महत्त्वाचे केंद्र. मात्र आता तर यामुळे १९६२ च्या निवडणुकीपासून प्रत्येक लढतीत काँग्रेस विरुद्ध (प्रारंभी) जनसंघ आणि कालांतराने भाजप असा संघर्ष पाहवयास मिळाला.
नव्वदीच्या दशकात जिल्ह्यात दमदार आगमन करणारी शिवसेना किंवा अलीकडच्या काळातील राष्ट्रवादी काँग्रेसला येथे फारसा थारा मिळाला नाही. अजूनही हीच स्थिती आहे.
मागील काँग्रेसची दोन शकले झाल्यावरही इंदिरा काँग्रेस विरुद्ध भारतीय राष्ट्रीय काँग्रेस विरुद्ध जनसंघ अशीच लढत झाली. या संघर्षाची टोकाची चुरस १९७८ च्या लढतीत पाहवयास मिळाली.
ती लढत जिल्ह्यातील आजवरची सर्वाधिक चुरशीची तिरंगी लढत ठरली. इंदिरा काँग्रेसकडून लढणारे जनार्दन बोन्द्रे (२७, ७८५मते), भाराकाँचे भारत बोन्द्रे (२७,६०७) आणि भाजपतर्फे लढणारे जनसंघाचे केशवराव बाहेकर ( २७४४७) यांच्यातील विक्रमी लढतीत विजयी उमेदवाराने जेमतेम १३८ मतांनी बाजी मारली. विजयी उमेदवार आणि तिसऱ्या क्रमांकारील बाहेकर यांच्यात ३३८ मतांचा फरक होता.
Vidhansabha :-काँग्रेसचे वर्चस्व मोडीत काढत भाजपच्या रेखा खेडेकर यांनी १९९५ ते २००४ अशी सलग बाजी मारली. त्यांना भाजपने तिकीट नाकारल्यावर २००९ आणि २०१४ च्या लढतीत राहुल बोन्द्रे हे आमदार झाले.
brekingnews:-यावल शहरातील एका बियरच्या दुकानात दारू पिण्यासाठी आलेल्या चार ग्राहकांकडून बिलापोटी ५०० रुपयांच्या बनावट नोटा चलनात येत असल्याचे लक्षात आल्याने बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या २ जणांना दुकानदारांनी पोलिसांच्या ताब्यात दिले, तर यातील दोनजण दुचाकीवरून पसार झाल्याची घटना बुधवारी समोर आली आहे. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे
यावल शहरातील मुख्य रस्त्यावरील बाजारपेठेत असलेल्या एका बियर शॉप मध्ये बुधवारी १३ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजेच्या दरम्यान संबधीत बिअरबारमध्ये चारजण बियर पिण्यासाठी आले असता त्यांचे बियर पिणे झाल्यानंतर त्यांनी त्यांच्याकडील असलेल्या नोटांच्या बंडलातुन दुकानदारास बिलापोटी दिले.
दरम्यान ५०० रुपयांच्या चलनी नोटा या बनावट असल्याचे संशय दुकानदारास आल्याने संबंधित बिअरशॉपवरील व्यक्तीच्या चलनी नोटा बनावट असल्याचे निर्दशनास आले. दुकानदार तडकाफडकी दुकान बंद करून या बनावट नोटा चलनात आणणाऱ्यांच्या सोबत असलेल्या दोन जणांचा सेटर बंद करून पकडून या दोघांना पोलिसांच्या ताब्यात देण्यात.
दरम्यान यातील दोन जण दुचाकीवरून फरार होण्यात यशस्वी झाले. या संदर्भात यावल पोलिसांकडून या दोन जणांकडून कसून चौकशी करण्यात येत आहे.
brekingnews:-दरम्यान यावल शहरात बनावट नोटा चलनात येण्याची या महिन्यातील ही दुसरी घटना असल्याचे प्रकार आले आहे. रावेर यावल विधानसभा मतदारसंघ हा मध्य प्रदेश आणि गुजरात या दोन परप्रांतीय राज्याच्या सीमेला लागून असून निवडणुकीच्या काळात अशा प्रकारे बनावट नोटा चलनात येत असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.