devendrafadnvis:विधानसभेच्या प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली असून भाजपा कार्यकर्त्यांनी ‘देवा भाऊ देवा भाऊ’ गाण्याच्या तालावर प्रचाराचा ठेका धरत प्रचारात आघाडी घेतली आहे. या गाण्यातून देवेंद्र फडणवीसांचे ब्रॅडिंग करण्याबरोबरच महायुतीच्या अनेक कामांचं श्रेय पदरात पाडून घेण्याचाही हेतू आहे.
देवा भाऊचं गणित काय?
महायुती सरकारची लाडकी बहीण योजना राज्यभरात प्रचंड लोकप्रिय ठरली आहे. योजनेच्या श्रेयासाठी भाजपा, शिवसेना (शिंदे) आणि राष्ट्रवादी (अजित पवार) या तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते उत्साहाने जाहिरातबाजी करत आहेत.
आता बहिणींचा भाऊ ‘देवा भाऊ’ या गाण्यामार्फत भाजपाकडूनही महायुती सरकारच्या कार्याची जाहिरात केली जात आहे. लोकांपर्यंत ही कामे पोहोचवण्यासाठी देवा भाऊ हा सूरमयी ताल निवडण्यात आला आहे.
गाण्यातून फडणवीसांचे आणि सरकारचेही ब्रँडिंग
फडणवीसांचं लक्ष्य नेमकं काय हे सांगताना या गाण्यात दिवसरात्र, एकच लक्ष्य, एकच ध्यास, देश हाच धर्मप्राण आणि श्वास ज्याचा असे प्रेरणादायी बोल आहेत.
devendrafadnvis:तसेच, फडणवीसांनी 2014 ते 2019 या पाच वर्षांत आणि 2022 मध्ये सत्तेत आल्यानंतर काय कामे केली यावर प्रकाश टाकला आहे. मुंबईतील कोस्टल रोड, अटल सेतू, समृद्धी महामार्ग, मुंबईतील विस्तारलेल्या मेट्रोसह फडणवीसांनी राज्याच्या जनतेसाठी काय काय योजना राबविल्या आहेत, यावर भर दिला आहे.
Lonar :सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल लोणार येथे पालक शिक्षक संघ, सखी सावित्री संघ सभा आयोजित केली होती. या सभेचे अध्यक्षस्थान विद्यालयाचे मुख्याध्यापक आर बी डोळे सर यांनी स्वीकारले, प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष ॲडव्होकेट भास्करराव काका सांगळे, विद्यालयाचे पर्यवेक्षक एन बी सांगळे सर, पालक प्रतिनिधी म्हणून श्री वराडे सर, श्री श्रीधर घुगे, सौ गाभणे ताई यांनी आपले स्थान स्वीकारले.
सभेमध्ये पालक आणि शिक्षक यांच्या साधक-बाधक चर्चा झाली संस्थेचे अध्यक्ष श्रीॲडव्होकेट भास्करराव काका सांगळे यांनीसर्वांना मार्गदर्शन केले.
सर्व पालकांच्या समस्या जाणून घेऊन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आर बी डोळे सर यांनी सर्व समस्या निराकरण करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री नखाते सर यांनी केले.
Lonar :सूत्रसंचालन सौ आघाव मॅडम यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन श्री इंगळे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री जागृत सर तथा शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.
Lonar :गरीब, दुर्बल कच्च्या घरात राहणार्या आणि बेघर नागरीकांना अशा सर्वांसाठी घरे हे शासनाचे धोरन आहे.2024 परेंत सर्वाना हक्काचे घर मिळावे त्यानुसार ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार आणी राज्य सरकार विविध योजना राबवत आहे.
अनुसूचित जाति व जमाती प्रवर्गातील पात्र लाभार्थांना लाभ देण्यासाठी राज्याशासना कडुन रमाई आवास योजना तसेच विमुक्त जाति व भट भटक्या जमाती साठी विविध योजना आहे.
पण इतर मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिता अश्या प्रकारच्या कोणत्याही योजना नव्हत्या म्हणुन राज्य सरकारने महाराष्ट्र मोदी आवास घर कुल योजना राबवले परंतु किनगाव जटुटु परिसरातील योंजनेतर्गत मंजूर झालेल्या घरकुलांचे बांधकाम पुर्ण होऊनही लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे.
किनगाव जटुटु येथील लाभार्थ्यांना पहीला हप्ता 15000/- हजार मिळाले असुन त्यांनी अपल्या घराचे काम पुर्णकरण्या साठी ऊधार ऊसने करुन घराचे काम पुर्ण केले त्यांना उर्वरित हप्त्याची प्रतिक्षा आहे.
Lonar:लाभार्थ्यांना त्वरीत अनुदान देण्याची मागणी गटविका अधिकारी पंचायत समिति लोणार यांच्याकडे लेखी निवेदनाव्दारे दि.26.9.2024 रोजी किनगाव जटुटु येथील बेबी पांडुरंग राऊत, रेणुका गणेश जगताप,मंदा शिवाजी जाधव,दारका बाई गबाजी राऊत यानी केली आहे.
Yaval :येणारे नवरात्र उत्सव ,दुर्गादेवी विसर्जनाच्या विधानसभा निवडणुकीची आचार सहीता लागण्याची शक्यता असुन यावेळी सर्व समाजाच्या लोकांनी एकत्र येवुन उत्साहाच्या व शिस्तीने साजरे करावे असे आवाहन फैजपुर
विभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी अन्नपुर्णा सिंग यांनी यावल येथे पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत तालुक्यातील उपस्थित सर्व दुर्गा उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना केले.
दरम्यान दोन समाजात तेढ निर्माण होईल असे सोशल मिडीयाचा चुकीचा वापर करणाऱ्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होतील असे ही पोलिस आधिकारी सिंग यांनी सांगीतले, यावेळी पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांनी शहरातुन निघणाऱ्या दुर्गादेवी विसर्जनाच्या संदर्भातील समस्या व अडचणी मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून समजुन
Lonar :बुधवार ला दुसरबीड येथे गीतांजली मंगल कार्यालय या ठिकाणी श्री वसंतराव नारायणराव उदावंत व श्री बबनराव नारायणराव उदावंत यांच्या मातोश्री पार्वतीबाई नारायणराव उदावंत यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ कार्यक्रम पार पडला.
याप्रसंगी ह.भ.प .उमेश महाराज दशरथे श्री क्षेत्र पंढरपूर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता . महाराजांनी श्री संत तुकाराम महाराज गाथा अभंग १५६५ मातेचिये चित्तीं । अवघी बाळकाची व्याप्ती ॥ १ ॥देह विसरे आपुला । जवळीं घेतां शिण गेला ॥ धृ ॥ दावी प्रेमभाते । आणि अंगावरी चढते ॥३ ॥ तुका संतापुढे ।पायी झोंबे लाडे कोडे ॥४ ॥ या अभंगावर फार सुरेख व मार्मिक अशा शब्दांमध्ये कीर्तन केले .अक्षरशा दोन तास सर्व उपस्थित जण कीर्तनात मग्न झाले होते .
उदावंत घराण्याची आई वरील निष्ठा , संस्कार त्यांच्या वागण्यातून स्पष्ट दिसतात . महाराजांनी आवर्जून सांगितले की मी अनेक मोठी घरे पाहिली पण मोठ्या घरातील माणसाचे मनही तेवढेच मोठे असावे लागते हे मोठेपण मी उदावंत बंधूंमध्ये बघितले या घराण्याचा व महाराष्ट्रातील साधुसंतांचा असा ऋणानुबंध आहे.
की या दुसरबीड नगरीतून जाणारा एकही साधू संत उदावंत बंधूंच्या घरी भेटून गेल्याशिवाय राहत नाही .जणू हे घर संतांचे माहेर आहे असे म्हणायला वावगे ठरणार नाही . या व अशा अनेक प्रसंगाची आठवण महाराजांनी आपल्या कीर्तनातून करून दिली .
उपस्थित सर्व भाविकांना सुद्धा आई व आईचे आपल्या जीवनातील महत्त्व काय ? हे अनेक दृष्टांतातून समजावून दिले . या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून ह .भ. प . सानप गुरुजी नाना श्री क्षेत्र वैष्णव गड , पण हभप वाघ गुरुजी संत तुकाराम महाराज बारागाव मंडळ , झोटींगा . हभप केशव महाराज बुधवत अध्यक्ष संत तुकाराम महाराज संस्थान वीर पांगरा . हभप शिवाजी महाराज मुंडे पळसखेड चक्का . हभप प्रेमानंद महाराज देशमुख माऊली वारकरी शिक्षण संस्था उगले पांगरी . हभप ज्ञानेश्वर महाराज झगरे वाकतकर . हभप सतीश महाराज डोईफोडे वारकरी शिक्षण संस्था शंकर गड . हभप रमेश महाराज जायभाये .श्री क्षेत्र वैष्णव गड . हभप तेजराव महाराज बुरकुल श्रीक्षेत्र वैष्णव गड हभप अतुल आदमाने महाराज श्रीक्षेत्र शनिशिंगणापूर ह भ.प.भगवान महाराज शिंदे..माजी आमदार श्री तोतारामजी कायंदे साहेब .
Lonar :परळी येथील उद्योजक श्री सुरेश आण्णा टाक .तसेच राजकीय सामाजिक अध्यात्मिक वैद्यकीय शैक्षणिक या सर्व क्षेत्रातील सर्व मान्यवर मंडळी कार्यक्रमास उपस्थित होते. माता बहिणी सुद्धा बहुसंख्येने उपस्थित होत्या .सर्वांनी भोजनाचा आस्वाद घेतला.
मेकर विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शेकडो शेतकरी व शेतकरी नेते डॉ बछिरें यांनी जे शेतकरी, कष्टकरी, निराधार, बेरोजगार व महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन व प्रशासनाशी दिलेल्या लढ्याला प्रभावित होऊन तसेच
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हा सहसंपर्कप्रमुख छगनदादा मेहेत्रे, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश घेण्यासाठी लोंढेच्या लोंढे येत आहेत
व डॉ. गोपाल बछिरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश करीत आहे
शिवसेना भवन लोणार येथे हा प्रवेश सोहळा पार पडला याप्रसंगी लोणार शहर प्रमुख गजानन जाधव, शहर उपप्रमुख लूकमान कुरेशी, युवा सेनेचे शहर प्रमुख श्रीकांत मादनकर,
Lonarnews :युवा सेनेचे तालुका उपप्रमुख अमोल सुटे, जेष्ठ शिवसैनिक सुदन अंभोरे शहर संघटक तानाजी मापारी, तानाजी अंभोरे गणेश पाठे प्रसेंजित बछिरे हे या सोहळ्यासाठी प्रामुख्याने उपस्थित होते
Lonar :शहरात स्वच्छ भारत अभियान 2.0 व स्वच्छता ही सेवा अभियान 2024 अंतर्गत मा.मुख्याधिकारी विभा वऱ्हाडे मॅडम यांच्या आदेशानुसार तथा मा. स्वच्छता निरीक्षक योगेश साळवे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषद कार्यालय लोणार द्वारा लोणार शहरतील आठवडी बाजार व बस स्थानक परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
या मोहीम अंतर्गत आठवडी बाजार परिसर व बस स्थानक परिसर येथील संपुर्ण परिसरामधील नगर परिषद सफाई कर्मचाऱ्यांद्वारे साफसफाई करण्यात आली.
Hingnghat :हिंगणघाट – मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देऊन त्यांना सशक्त बनवण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब हिंगणघाटने एक अनोखी आणि प्रेरणादायक योजना राबवली आहे. अलीकडेच आयोजित कार्यक्रमात, हिंगणघाट आणि आसपासच्या गावांमधील 10 शाळांमधील 50 गरजू विद्यार्थिनींना नवीन सायकलींचे वाटप करण्यात आले.
हे वाटप रोटरी क्लबच्या सायकल बँक योजनेचा एक भाग आहे, ज्याचा उद्देश असा आहे की दहावी पास केल्यानंतर विद्यार्थिनींनी सायकली परत कराव्यात, जेणेकरून त्या सायकली इतर गरजू विद्यार्थिनींना उपलब्ध करून देता येतील.
या कार्यक्रमात रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटे. राजेंद्र खुराना, रोटे. किशोर राठी, पोलिस निरीक्षक मनोज गभणे, आणि शाळेचे सचिव रमेशराव धारकर यांसारख्या मान्यवर व्यक्ती उपस्थित होत्या.
त्यांनी या उपक्रमाला समाजासाठी एक महत्त्वाचे पाऊल मानले असून, ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना शिक्षण मिळविण्यात यामुळे मदत होईल, असे मत व्यक्त केले.क्लबचे अध्यक्ष सीए जितेंद्र वर्मा यांनी सांगितले, “आम्ही फक्त सायकली वाटत नाही आहोत,
तर आमच्या मुलींना त्यांच्या स्वप्नांकडे जाण्याचा मार्ग देत आहोत. या सायकली त्यांना आत्मनिर्भर बनवतील आणि त्यांच्या भविष्यासाठी नवी संधी उघडतील.” त्यांनी हे देखील जाहीर केले की रोटरी क्लब सायकलींची देखभाल आणि दुरुस्तीची जबाबदारी स्वीकारेल, जेणेकरून विद्यार्थिनींना सातत्याने मदत मिळत राहील.
क्लबचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मुखी यांनी सांगितले की गेल्या वर्षीही क्लबने 50 विद्यार्थिनींना सायकली दिल्या होत्या, आणि पुढील वर्षी आम्ही सायकल बँकचा विस्तार करून त्याचे आकार 1000 सायकलीपर्यंत वाढवण्याची योजना आखली आहे, जेणेकरून आणखी गरजू विद्यार्थिनींना त्याचा फायदा होऊ शकेल.कार्यक्रमाचे मुख्य अतिथी, डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटे. राजेंद्र खुराना यांनी क्लबच्या या प्रेरणादायक योजनेचे कौतुक करताना सांगितले की, “मुलींच्या शिक्षणासाठी आणि सशक्तीकरणासाठी अशा प्रकारची योजना अत्यंत प्रशंसनीय आहे. या माध्यमातून त्यांना समाजात आपली ओळख निर्माण करण्याची आणि आत्मनिर्भर होण्याची संधी मिळते.” पोलिस निरीक्षक मनोज गभणे यांनी मुलींच्या सशक्तीकरणाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांना संरक्षण आणि पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले.सायकली मिळवताना विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावर दिसणारी आनंद आणि उत्साह ही या दातृत्वाची जिवंत साक्ष होती.
हा उपक्रम त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला सुलभ करण्याबरोबरच, त्यांच्या मनात आत्मविश्वास आणि महत्त्वाकांक्षा निर्माण करत आहे, ज्यामुळे त्या आपल्या उज्ज्वल भविष्याच्या दिशेने एक ठोस पाऊल उचलत आहेत.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रो. जितेंद्र केदार यांनी कुशलतेने केले, तर या योजनेच्या यशस्वी मार्गदर्शनात रो. मुरली लाहोटी, रो. प्रो. राजु निखाडे, आणि रो. मुकुंद मुंधडा यांची महत्त्वाची भूमिका होती. शेवटी, क्लब सचिव उदय शेंडे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
विशिष्ट उपस्थितांमध्ये क्लबचे सचिव सुभाष कटारिया, माया मिहानी, पितांबर चंदानी, पंकज देशपांडे, डॉ. लाहोटी, मितेश जोशी, पुंडलिक बकाने, केदार जोगळेकर आणि इतर मान्यवर सदस्य उपस्थित होते.
Hingnghat :हा कार्यक्रम फक्त सायकलींचे वाटप नव्हते, तर विद्यार्थिनींच्या मनात आत्मविश्वास, महत्त्वाकांक्षा, आणि उज्ज्वल भविष्याची आशा निर्माण करणारा एक महत्त्वपूर्ण आणि प्रेरणादायक प्रयत्न ठरला.
Farmer :गेल्या तीन दिवसापासून सिंदखेड राजा आणि किनगाव राजा महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी झाली असून अद्याप शेतकऱ्यांना कुठल्याही शासनाकडून मदतीचा आश्वासन मिळाले नाही म्हणून आम्हाला एक तर मदत द्या
नाहीतर आमच्यावर गोळ्या झाडा याच्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय नाही म्हणून आज शेतकरी मित्र सिंदखेड राजा आणि शेतकरी योद्धा कृषी समिती बुलढाणा जिल्हा यांच्या वतीने दिनांक 26 सप्टेंबर रोजी तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन या मंडळामध्ये दिनांक 23/9/2024 ते 25/9/2024 या तीन दिवसात सिंदखेडराजा मंडळामध्ये व किनगाव राजा मंडळामध्ये सतत तीन दिवस अतिवृष्टी झालेली आहे.
सदर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची अतोनात नुकसान झालेले आहे सोयाबीनचे नुकसान 100% झाल्याचे दिसत असून कपाशीचे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला असून त्याला या नुकसान भरपाई मिळण्याची गरज आहे.
योग्य ती कारवाई करून सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करण्याचे आदेश देऊन झालेले नुकसान भरपाई शेतकऱ्याला कशी मिळेल यासाठी आपण स्वतः तात्काळ पाठपुरावा करावा अशी विनंती शेतकरी मित्र दिलीप भाऊ चौधरी व शेतकरी योद्धा कृषी समितीचे समन्वयक बालाजी सोसे यांनी केली.
असून या परिसरामध्ये दिनांक 24 सप्टेंबर रोजी 31.5 मिली व दिनांक 25 सप्टेंबर 67.5 मिली दिनांक 26 सप्टेंबर 38.8 मिली या हा रेनफॉल रिपोर्टनुसार अहवाल असून किनगाव राजा महसूल मंडळ येथील पर्जन्यमापक यंत्रणा पूर्णपणे बंद असून संबंधित तालुका कृषी अधिकारी यांनी त्या यंत्रणेचा पंचनामा केला आणि त्याच पंचनामांमध्ये असा उल्लेख करण्यात आला आहे.
की संबंधित सिंदखेडराजा येथील रेन फॉल रिपोर्ट हे किनगाव राजा मंडळाला लागू करण्यात येईल असे आश्वासन दिले होते आणि सिंदखेडराजा महसूल मंडळाचाच नियम लावून किनगाव राजा मंडळाला मदत मिळावी व त्यामुळे आपण संबंधित कर्मचाऱ्यांना पंचनामा करण्याचे आदेश काढण्यात यावे जर आपण या अतिवृष्टीची माहिती शासनापर्यंत पोहचवली नाही किंवा संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत पंचनामे करण्याचे आदेश दिले नाही तर या सिंदखेडराजा मंडळातील व किनगाव राजा मंडळातील शेतकरी ताबडतोब येत्या तीन दिवसांमध्ये सर्व शेतकरी धरणे आंदोलन करणार आहे,
Farmer :तरी आपण योग्य ती काळजी घेऊन या अतिवृष्टी पावसा संदर्भात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेऊन पुढील कारवाई करण्यात यावी करिता आपणास निवेदन देऊन सरकारचे लक्ष वेधले यावेळी शेतकरी मित्र दिलीप भाऊ चौधरी शेतकरी योद्धा कृती समितीचे समन्वयक बालाजी सोसे व शेतकरी गोविंदराव टेके, जनार्दन मुंडे , विशाल मुंडे, उद्धव मुंडे, नरसिंग सोसे ,दत्तात्रय झोरे, दत्तात्रय बोडके ,देवानंद सोसे, गणेश मुंडे ,जगदीश मुंडे, संदीप राऊत, आसन शेख अणि या ठिकाणी असंख्य शेतकरी उपस्थित होते.
Lonar :इमर्जन्सी भारनियमनाच्या नावाखाली रात्री अपरात्री वेळाेवेळी वीजपुरवठा खंडित केला जात आहे. लोणार शहरासह ग्रामीण भागात विद्युत विभागाकडून रात्रीच्या वेळी तब्बल दोन ते तीन तास रात्री वीज बंद ठेवली जाते. या सततच्या इमर्जन्सी भारनियमना मुळे लोणार शहरवासी त्रस्त झाले आहे.
हे इमर्जन्सीच्या भारनियमन तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तथा शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांनी विद्युत वितरण विभागाकडे केली आहे.
पावसाळ्याचे दिवस सुरू असताना एकीकडे सर्व परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे . त्यामुळे मच्छरांचा त्रास वाढ आहे . त्यामुळे डेंगुचे रुग्ण वाढतांना दिसत आहे . वीज गुल झाल्याने रात्रीच्या वेळी घरात नागरिक त्रस्त झाले.
आहे.दिवसभर काम करून थकलेला शेतकरी, शेतमजूर रात्री निवांत झोप मिळेल, या आशेवर असताना वीज गुल होते. लहान बालके, आजारी व्यक्ती तसेच वृद्धांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
लोणार शहर हे जगप्रसिद्ध खाऱ्या पाण्याचे सरोवर असल्याने ‘ अ ‘ वर्ग पर्यटन स्थळ असुन या ठिकाणी मागील काळात विद्युत विभागाकडून भारनियमन बंद करण्यात आले होते .परंतु विद्युत विभागाच्या मनमानी कारभारामुळे पर्यटन स्थळ या ठिकाणी सुद्धा इमर्जन्सी भारनियमना मुळे पर्यटक व शहरवासी त्रस्त झाले आहे .
हे इमर्जन्सी चे भारनियमन तात्काळ थांबवण्यात यावे अशी मागणी शिवछत्र मित्र मंडळाचे अध्यक्ष नंदकिशोर मापारी यांनी केली आहे.मध्यंतरीच्या काळामध्ये भारनियमन सतत सुरू असताना शासनाने जे पर्यटन स्थळे आहेत ते या भारनियमनामधून वगळण्यात आले होते .
यामध्ये लोणार हे ‘अ’ वर्ग दर्जा पर्यटन स्थळ , विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाणारे गजानन महाराजांचे शेगाव , आणि मातृतीर्थ म्हणून ज्याला नावलौकिक मिळालेला आहे . असे सिंदखेडराजा यांना भारनियमानामधून वगळण्यात आले होते . नवीन आलेल्या अधिकाऱ्यांना याबाबत काहीच कल्पना नाही असे ते सांगतात .
Lonar :तरी शासन स्तरावर याची दखल घेण्यात यावी आणि पर्यटन स्थळ असलेले सर्व स्थळे हे भारनियमनामधून वगळण्यात यावी. आणि लोणार वर होणारा भार नियमनाचा सततचा अन्याय दूर करावा अशी मागणी होत आहे.
लोणार विभागामध्ये जी पद रिक्त आहेत ती तात्काळ भरण्यात यावी अशी मागणी सुद्धा होत आहे.