आज मुर्तीजापुर शहरात श्री राम नवमी जन्मोत्सव निमित्त भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन…!( ramnavami )

प्रतीक कुऱ्हेकर अकोला

ramnavami: मूर्तिजापूर :- येथील सार्वजनिक श्री राम नवमी जन्मोत्सव समिती व सकल हिंदू समाज मूर्तिजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात श्री रामनवमीनिमित्त भव्य मोटर सायकल रॅलीचे व शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

सार्वजनिक श्री राम नवमी जन्मोत्सव समिती व सकल हिंदू समाज मूर्तिजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम नवमी निमित्त शहरातील जुनी वस्ती स्थित असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिर येथून सकाळी 9 वाजता भव्य मोटार सायकल रैली चे आयोजन करण्यात आले.

असून सदर मोटर सायकल रॅली श्री स्वामी समर्थ मंदिर येथून जुनी वस्ती येथे टांगा चौक मार्गे, मोरारजी चौक, भगतसिंग चौक, मुख्य मार्गस्थ स्टेशन

शुल्लक कारणावरून शेजार्यांमध्ये मारहाण, दोघे जख्मी, परस्पर विरोधात तक्रारीवरून दोन्ही कडील सात जणांविरोधात गुन्हा दाखल ( crimenews )

विभाग स्थित असलेला श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, रेल्वे स्टेशन चौक सुभाष चौक च्या मार्गाने रेल्वे स्टेशन परिसरातील श्रीराम मंदिर येथे संपन्न होईल तर सायंकाळी 6 वाजता याच मार्गाने शहरातून प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरित्रावर आधारित विविध चित्ररथांसह शोभायात्रा संपन्न होणार आहे.

यामध्ये प्रामुख्याने टाळमृदुंगासह भजणी मंडळ, दिंड्या,डी. जे साउंड, लेझीम पथक, ढोल पथकाचे सादरीकरण होणार असून भव्य मोटर सायकल रॅली ला व शोभा यात्रेस शहरातील राम भक्तांनी व हिंदू ज्ञाती बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

ramnavami: उपस्थित राहण्याचे आवाहन सकल हिंदू समाज व सार्वजनिक श्री राम नवमी जन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Comment