शेगाव रेल्वे स्टेशनवर लिफ्ट सुविधा सुरू: प्रवाशांसाठी आनंदाची वार्ता (relvenews)

 

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी शेगाव

relvenews:शेगाव – शेगाव रेल्वे स्टेशनवर लिफ्ट सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, यामुळे स्थानकावरील प्रवाशांच्या सोयी-सुविधांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे.

या सुविधेच्या उद्घाटनाचे वैशिष्ट्य म्हणजे, लिफ्टचे उद्घाटन रेल्वे विभागातील दिव्यांग कर्मचारी गणेश बेलोकर यांच्या हस्ते करण्याचा निर्णय शेगाव रेल्वे स्टेशनचे प्रबंधक मोहन देशपांडे यांनी घेतला, जो अत्यंत कौतुकास्पद ठरला. त्यांच्या या निर्णयाने उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि प्रवासी वर्गाने त्यांचे अभिनंदन केले.

वाशीमच्या बुलढाणा अर्बन शाखेत शेतकऱ्यांची व व्यापाऱ्यांची फसवणूक…!(Buldhanaurbanbank)

लिफ्टच्या उद्घाटन सोहळ्यात रेल्वे स्टेशनचे ट्रॅफिक इन्चार्ज पी.एम. पुंडकर, स्टेशनचे एसएसई (इलेक्ट्रिकल) शुभम डाखोडे, डेप्युटी एसएस राजेश देशपांडे, सिटीआय एन.आर. कराळे, जॉन्सन लिफ्ट कंपनीचे एमडी बाला ,शेगाव रेल्वे पोलीस स्टेशनचे ठाणेदार विवेकानंद राळेभात, भिका

बनकर, रमेश उबाळे,राष्ट्रीय रेल्वे महिला प्रवासी संघटनेच्या राष्ट्रीय अध्यक्ष माधुरी शर्मा, विदर्भ प्रदेशाध्यक्ष मनीषा टाकसाळ, शेगाव तालुका अध्यक्ष प्रीती तिवारी, मलकापूर तालुका अध्यक्ष वैशाली जोशी, परतवाडा तालुका अध्यक्ष रुपाली डांगे ,राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार व्यास, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जवाहरलाल थानवी आदी मान्यवर उपस्थित होते

relvenews:या लिफ्ट सुविधेमुळे प्रामुख्याने वृद्ध, दिव्यांग, महिलांसह सर्वसामान्य प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. स्टेशनवर असलेल्या विविध प्लॅटफॉर्म्सवर जाण्यासाठी ही लिफ्ट अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.

Leave a Comment