उपोषणाच्या आठव्या दिवशी जिवतीतील आठवडी बाजारही भरला नाही uposhan 

 

जिवती,शेणगाव,पाटण, बाजारपेठ पूर्णपणे बंद
• उपोषण कर्त्यांना चर्चेसाठी पालकमंत्र्यांचे पाचारण
====================
✍️ कृष्णा चव्हाण चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
====================

जिवती :- गेल्या आठवडाभरापासून जिवती तहसील कार्यालया समोर शेतकऱ्यांच्या जमिनीच्या पट्ट्यांच्या व इतर मागण्या घेऊन जिवती तालुका भुमिहिन शेतकरी बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली अन्नत्याग आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून या आंदोलनाची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी जिवती तालुक्यातील वन जमिनीच्या पट्यां संदर्भात नागपूर येथे बैठक आयोजित केली असून या बैठकीला जिवती येथे बसलेल्या उपोषण कर्त्यांना चर्चेसाठी नागपुरात पाचारण केले आहे.

या बैठकीसाठी पाच उपोषण कर्ते व जिवती येथील शिष्टमंडळ नागपूर रवाना झाले आहेत चर्चेत सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा आहे मात्र या चर्चे दरम्यान योग्य न्याय न मिळाल्यास उपोषण कर्ते व शेतकरी बांधव आक्रमक भूमिका घेतील असेही बोलले जात आहे.
मराठवाड्यातून विविध जिल्ह्यांतून स्थलांतरित होऊन जिवती तालुक्यात स्थाही झालेल्या नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती असून नागपूर खंडपीठाने जिवती तालुक्यातील संपूर्ण जमिनच वनविभागाची असल्याचा निर्णय दिल्यामुळे येथील नागरिकांना जमिनीच्या पट्टयांचा प्रश्न व विकासात्मक कामात अडथळे निर्माण झाले आहेत.

जमिनीच्या पट्टयांचा प्रश्न व इतर मागण्या कायमच्या निकाली काढण्यात यावे यासाठी मागील आठ दिवसांपासून जिवती येथील तहसील कार्यालया समोर सुग्रीव गोतावळे,सुदाम राठोड,लक्ष्मण मंगाम, शब्बीर जागीरदार,मुकेश चव्हाण, विनोद पवार,प्रेम चव्हाण,विजय गोतावळे, दयानंद राठोड, वाघमारे या भुमिपुत्रांनी अन्नत्याग आमरण उपोषणाला बसले आहेत.

या उपोषणाला बसलेल्या अनेक शेतकरी पुत्रांची प्रकृती खालावली गेली असुन त्यांच्या लढ्याला यश मिळो यासाठी पाठिंबा दर्शविण्यासाठी दररोज विविध गावांतील शेकडो शेतकरी बांधव दिवस रात्र उपस्थित राहत आहेत.शेतकऱ्यांच्या जमिनीच्या पट्ट्यांच्या प्रश्न कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी गावा-गावातून जमेल तशी आर्थिक मदतही केली जात आहे.

उपोषण स्थळी शेकडो शेतकरी उपस्थित राहून आपल्या वेदना कुणी गीतातून तर कुणी आपल्या मनोगतातून व्यक्त करीत आहेत.रात्रोला कधी भजन तर कधी कीर्तनातून शेतकऱ्यांच्या वेदना गायल्या.उपोषणाच्या आठव्या दिवशी टेकामांडवा येथील जोंदळी(गोंधळी) यांनी सुध्दा उपोषण स्थळी गीतातून शेतकऱ्यांचे गह्राणे मांडत उपोषण कर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे मात्र नागपूरच्या बैठकीत शेतकय्रांना योग्य न्याय न मिळाल्यास पहाडावरील शेतकरी आक्रमक पवित्रा घेतील असेही बोलले जात आहेuposhan

Leave a Comment