परिवर्तन जनसवांद यात्रा हमदापूर सर्कल मध्ये दाखल

 

हमदापूर सर्कलमध्ये परिवर्तन जनसंवाद यात्रेला उत्कृष्ट प्रतिसाद

राष्ट्रवादीचे अतुल वांदिले यांनी परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून २५ दिवसात २४६ गावांना दिली भेट

हमदापूर :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिवर्तन जनसवांद यात्रा पोहना (वडणेर) येथून २० नोव्हेंबरला प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात निघाली असून या यात्रेचे हमदापूर सर्कलमध्ये आगमन झाले आहे.

२५ दिवसात परिवर्तन यात्रेने २४६ गावांना भेट दिली असून शेतकऱ्याच्या समस्या जाणून त्यांच्याशी संवाद साधण्यात येत आहे. दि.१४ डिसेंबर रोज गुरुवार ला हमदापुर सर्कल मध्ये परिवर्तन जनसंवाद यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले.शेतकऱ्यांच्या भावना समजण्यासाठी त्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी व त्या मार्गी लावण्यासाठी कुणी तरी आपल्यापर्यत येत आहे ,

आपल्या घरपर्यत पोहचत आहे त्यामुळे शेतकरी सुखावला असून गावोगावी उत्साहाने वातावरण आहे. आनंदाने परिवर्तन यात्रेचे स्वागत करताना दिसून येत असून शेकडो शेतकरी स्वंयप्रेरणेने उत्स्फूर्तपणे या यात्रेमध्ये सहभागी होत आहे..

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रवीण पाटील,घनश्याम डाखोरे,गजानन धाबडधुसंके,उपसरपंच शारदाताई बोरकुटे, कांढळी सर्कलचे महादेव वांदिले,जिल्हा सरचिटणीस दरथत ठाकरे, राजुभाऊ धोटे, धीरज येळणे, सुभाष चौधरी, संदीप उईके, प्रा.गोकुळ टिपले, सुधाकर वाढई, राजू मेसेकर,माजी सरपंच तुळसाताई मांडे, माजी उपसरपंच बाबाराव कुडमते,माजी उपसरपंच अमोल कांबळे,भोजराज चौधरी,धनराज गिरी, भोला शेखजी, रामचंद्रजी शेंडे , किशोर पाटील, प्रमोद शेंडे, दूध डेरी अध्यक्ष रत्नाकर भट्ट,प्रेमजी आखूड, भोजराजजी चौधरी,दारूबंदी अध्यक्ष मालाबाई खडतकर, मनोज देवतळे,अतुल बोरकुटे,बंढुजी लोणकर पुष्पताई बोरकुटे,दिनेश चाफले, दिनेश आमले, अनिल पिसुडे, समीर कुबडे, सचिन आमले, सुनील गोल्हर, कुलिम शेख, रफिक शेख, प्रणय बोरकुटे, ग्रा.प.सदस्य गंगाधर कुबडे, ग्रा.प.सदस्य प्रेमीला ईरपाची,माजी ग्रा. प.सदस्य प्रमोद देवतळे,सुरेश नखाते, विशाल आमने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यासभेचे आयोजन पळसगाव येथे गजानन धाबडधुसंके, प्रणय बोरकुटे, हमदापुर येथे प्रवीण पाटील, धिरज येळणे यांनी केले होते….

Leave a Comment