चितोडा जिल्हा परिषद शाळेचा शैक्षणिक दर्जा घसरला गटविकास अधिकारी यांना निवेदन ( Zilla Parishad )

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

चितोडा या गावांमध्ये जिल्हा परिषद मराठी मुलां मुलीची शाळा असून या शाळेची स्थापना 14/01/1913 साली झाली आहे या जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेला तब्बल 111 वर्ष पूर्ण झाले असून.

या गावात शैक्षणिक दर्जा घसरलेला दिसून येतो असे लेखी निवेदन यावल येथील गटविकास अधिकारी व शिक्षण विभागातील गटशिक्षणअधिकारी यांना तक्रारीचे निवेदन किरण मुलचंद तायडे रा. चितोडा ता यावल यांनी दिले आहे या शाळेत पहिले ते चौथीपर्यंत विद्यार्थ्यांना एक ते शंभर पर्यंत अंक सुद्धा येत नाही . तसेच बाराखडी सुद्धा वाचता येत नाही.

अशी परिस्थिती शिक्षण क्षेत्रात झाली आहे त्यातच यावल तालुक्यातील चितोडा येथे जिल्हा परिषद मराठी मुला मुलींची शाळा असून या ठिकाणी सध्या 44 विद्यार्थी शिक्षण घेत आहे .44 विद्यार्थ्यांसाठी येथे दोन शिक्षकांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.

भाड्याचे पैसे मागीतल्याने ऑटो चालकास मारहाण, एका विरूध्द गुन्हा दाखल ( crimenews )

परंतु वास्तविक पाहता एकाही विद्यार्थ्याला एक ते शंभर पर्यंत बाराखडी सुद्धा वाचता येत नाही.यावरून असे सिद्ध होते की या शाळेत शैक्षणिक दर्जा घसरला असून शिक्षकांचे विद्यार्थ्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे .Zilla Parishad

शैक्षणिक दर्जा वाढण्यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत परंतु या ठिकाणी त्या उपक्रमांची देखील पायमल्ली होताना दिसत आहेत मुलांच्या पिण्याच्या पाण्याची टाकी देखील बऱ्याच दिवसापासून साफ केली नसून टाकीमध्ये सुद्धा घाण साचली आहे .

बऱ्याच विद्यार्थ्यांचे पालक हे मोलमजुरी करणारे आहेतअशिक्षित असल्यामुळे ते विद्यार्थ्यांकडे लक्ष देऊ शकत नाही परंतु ज्या शिक्षकांवर विश्वास ठेवून त्यांनी शाळेमध्ये प्रवेश घेतला ते शिक्षक आज राजपत्री अधिकारी झालेले दिसून येतात त्यांच्या मर्जीनुसार शाळेमध्ये ये जा करतात आपल्याला एक ते दीड लाख रुपये पगार मिळतो.

आपल्याला या गोरगरीब विद्यार्थ्यांचे काय घेणेदेणे आहे अशा बोगस शिक्षकांचे संपूर्ण कागदपत्रे तपासण्यात यावे तसेच हे शिक्षक कोणत्या वर्षी जिल्हा परिषद मध्ये रुजू झाले यांच्या संपूर्ण कागदपत्राची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पडताळणी करावी व यांच्या सेवा पुस्तकांमध्ये तशी नोंद घ्यावी.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोरगरीब पाल्यांचे विद्यार्थी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या संकल्पनेतून माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम प्रथम राज्यात राबवण्यात आला या चितोड्या गावामध्ये जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेची दयनीय अवस्था आज रोजी आपल्याला पाहायला मिळत आहे.

माननीय मुख्यमंत्री यांच्या आदेशाला चितोडा जिल्हा परिषद च्या शाळेने दिली केराची टोपली शिक्षण क्षेत्रात खळबळ अशा शिक्षकांवर कारवाई होणे गरजेचे असे निवेदनामध्ये म्हटले आहे चितोडा येथील शिक्षक वर्ग विद्यार्थ्यांकडे लक्ष देत नसतील तर गरीब विद्यार्थ्यांनी करायचे काय हा प्रश्न उपस्थित होत आहे.

तरी या गंभीर विषयाकडे यावल येथील गटविकास अधिकारी व गटशिक्षणाधिकारी श्री विश्वनाथ धनके साहेब व जळगाव येथील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव या विभागाने लक्ष देण्याची गरज आहे .

Zilla Parishad: यामुळे गोरगरीब पाल्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा दर्जा हा इतर शाळांपेक्षा दर्जेदार व्हायला पाहिजे इतर शाळेतील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी जिल्हा परिषद मध्ये प्रवेश घेतील याची व जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा शिक्षणाच्या दर्जा वाढेल अशी शिक्षकांनी सुद्धा दक्षता घ्यावी

Leave a Comment