भाड्याचे पैसे मागीतल्याने ऑटो चालकास मारहाण, एका विरूध्द गुन्हा दाखल ( crimenews )

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

crimenews:शेगांव भाडयाचे ठरवलेले 200 रुपये दे असे म्हटले असता आरोपी याने ऑटो चालकास बाजुला पडलेली विटेचे तुकडा हातात घेवून फि चे कपाळावर उजव्या डोळ्याच्यावर मारून जख्मी केल्याची घटना दि. १८ मार्च २०२४ रोजी रात्री ८ वा सुमारास सुरभी कॉलनी येथे घडली.

हकीकत अशी आहे की, ऑटो चालक संजय उत्तम माळी वय- ३८ वर्षे रा.झाडेगांव हे शेगांव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हजर असतांना प्रकाश सुरेश मेतकर रा. सुरभी सुरभी कॉलनी शेगांव हा या ठिकाणी आला व फिला म्हणाला की मला नविन कुलर घ्यायचे आहे ट्रिप मारता काय असे म्हटले त्यावेळी फि ने त्याला हो म्हणूण त्याचे सोबत भाड्याचे २०० रुपये ठरवले होते.crimenews

त्याचे सोबत फि चे अॅटोने खामगाव रोडवर असलेल्या मोहता यांचे गोडावून वर गेलो तेथून त्याने कुलर घेतला व सदर कुलर आम्ही माझे अॅटोमध्ये टाकून त्याचे घरी सुरभी कॉलनी येथे गेलो.

इंडस्ट्रीमधील या एकाच गोष्टीचा अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला आहे प्रचंड तिरस्कार ( sonaleekulkarni )

कुलर अॅटोमधून खाली उतरल्यावर त्याला फि ने भाड्याचे पैसे मागीतले असता त्याने फिला ५० रुपये दिले. त्यावर फि ने त्याला २०० रुपये ठरवले होते असे म्हटले असता त्याने फिला घ्यायचे असतील तर घे नाहीतर निघ ईथून असे म्हणून शिवीगाळ केली.फि ने त्यास शिवीगाळ करुन नको माझे भाडयाचे ठरवलेले २०० रुपये दे असे म्हटले असता आरोपी याने फिला बाजुला पडलेली विटेचे तुकडा हातात घेवून फि चे कपाळावर उजव्या डोळ्याच्यावर मारले .

परत पैसे मागशिल तर तूला जिवाने मारुन टाकील अशी धमकी दिली.या प्रकरणी – संजय उत्तम माळी वय- ३८ वर्षे, व्यवसाय ऑटो चालक रा. झाडेगांव ता. शेगांव यांनी शहर पोलीस स्टेशनला दिलेल्या तोंडी रिपोर्ट व मेडीकल प्रमाणपत्रावरून वरुन आरोपी

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

crimenews:सुरेश मेतकर रा. सुरभी सुरभी कॉलनी शेगांव ता शेगाव याचे विरुद्ध अप नं १३३/२०२४ कलम ३२४,५०४,५०६ भादवि अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ सुनील सुसर हे करीत आहेत.

Leave a Comment