अवैध वाळू वाहतूकीच्या वाहनाने कोतवालाचा मृत्यू ( accidentnews )

 

फरार झालेल्या आरोपीला ताब्यात घेण्यास तामगाव पोलिसाच्या शोधमोहिमेला यश

accidentnews : संग्रामपूर तालुक्यातील कोलद गावालगत असलेल्या वान नदी पात्रातील दी.16 एप्रिल रोजी रात्री सुमारे संध्याकाळी 8 वाजे दरम्यान अवैध वाळू तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टरने कारवाई करण्या करिता आलेल्या महसूल विभागाच्या कोतवालाच्या अंगावर ट्रॅक्टर चढवून चिरडून त्यात कोतवालाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे…..

मिळालेल्या माहितीनुसार दी 16 एप्रिल रोजी कोलद वान नदीपात्रात रेती उपसा सुरू असल्याची पूर्व सूचना संबंधित महसूल पथकाला मिळाली असता…

वान नदिच्या पुलाजवळ तलाठी व त्यांचे 2 सहकारी ट्रॅक्टर पकडण्यात गेले असता , ट्रॅक्टर चालकाने कोतवाल मृतक लक्ष्मण अस्वार वय अंदाजे चाळीस .राहणार एकलारा यांच्या अंगावर ट्रॅक्टर चालकाने जबर धडक दिली…..

Mahindra Thar ला force Gurkha चे आव्हान या फिवचर पाहून कलिजा खलास ( MahindraThar )

व ते गंभीर जखमी झाले….तेथे असलेल्या उपस्थितांनी कोतवाल-अस्वार यांना प्राथमिक उपचाराकरता वरवट बकाल ग्रामीण रुग्णालयात दाखल केले…..

मात्र जबर धडक लागल्याने परिस्थिती चिंताजनक असताना डॉक्टरांनी त्यांना अकोला येथे हलविण्याचे सांगितले….

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

अकोला येथील मेन हॉस्पिटल मध्ये दाखल केल्यानंतर काही क्षणातच अकोला येथील डॉक्टरांनी कोतवाल हे मृत झाल्याचे घोषित केले…..

कोतवाल यांच्या मृत्यूची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली…..

त्यामुळे तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे..

accidentnews: तामगाव पोलीसांनी घटनेतील फरार ट्रॅक्टर चालक, ट्रॅक्टर, वाळू ने भरलेली ट्राली दुसऱ्या दिवशी जप्त करून व फिर्यादी तलाठी देवेंद्र श्रीकृष्ण बोडखे यांच्या रिपोर्ट नुसार आरोपी नामे संतोष पारिसे राहणार खळद तालुका संग्रामपूर यांच्यावर तामगाव पोलिसांनी अप नं 140/2024 कलम 307,302,379,353, भादवी सहकलम 21 [ 1 ] खान व खनिज अधिनियम अंतर्गत गुन्हा नोंद केला असून पुढील तपास ठाणेदार राजेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात पीएसआय विलास बोपटे करीत आहेत….

Leave a Comment