लोकसभा : निवडणूक निरीक्षक सेंथील कुमार यांनी केली पोलीस नियंत्रण कक्षाची पाहणी! ( buldhanaLoksabha )

 

buldhanaLoksabha :बुलढाणा : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आयोगाचे निवडणूक निरीक्षक सेंथील कुमार यांनी आज गुरुवारी (दि. १८) निवडणूक प्रक्रियेच्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली व तयारीचा आढावा घेतला.

केंद्रीय निवडणूक आयोगाकडून बुलढाणा जिल्हा पोलीस विभागासाठी श्री सेंथील कुमार यांची नेमणूक करण्यात आलेली आहे.

२ एप्रिल पासून ते बुलढाण्यात आहेत. पोलीस दल व केंद्रीय निवडणूक आयोग यांच्यामध्ये ते समन्वयकाची भूमिका पार पाडत आहेत.

दरम्यान आज त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाची पाहणी करत सुरक्षा व्यवस्थेसाठी आढावा घेतला.

राणा अडसूळाची दिलजमाई मग विरोधाची तलवार म्यान सकाळी टीका दुपारी जाहिर पाठिंबा ( Maharashtra politics )

सर्वत्रिक लोकसभा निवडणूक शांततेत व निर्भय वातावरणात पार पडली पाहिजे यासाठी पोलीस विभागातर्फे स्ट्रॉंग रूम, स्टॅटिक सर्विस्टन टीम, तैनात करण्यात आली आहे

या ठिकाणी जावून सेंथील कुमार यांनी भेट दिली व पोलीस कर्मचाऱ्यांना मार्गदर्शनही केले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील नियंत्रण कक्षात भेट देऊन संपर्क यंत्रणा बाबत माहिती घेतली व बिनतारी संदेश यंत्रणा, डायल ११२ यंत्रणाची पाहणी केली.

buldhanaLoksabha :यावेळी अधिकाऱ्यांशी बोलताना, बिनतारी संदेशाचा अधिक प्रमाणात वापर करावा तसेच सुरक्षितेसाठी मनुष्यबळ वाढवावे अशा सूचना दिल्या.

Leave a Comment