घोट:-गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्या अंतर्गत घोट केंद्रातील गरजूवंत विद्यार्थांना आज दिनांक 14/03/2024 रोज गुरुवारला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पेटतळा (माल)येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियान प्रणित,” शिक्षक व समाज सामुहिक दत्तक पालक योजने” अंतर्गत किसन सोनटक्के मुख्याध्यापक यांनी कु. प्रणाली देविदास गेडाम वर्ग ६ वा या हुशार व गरजु विद्यार्थिनीची निवड केली.
मान्यवरांच्या हस्ते NMMS & MTSE चे स्पर्धा परीक्षा तयारी पुस्तक व निवडपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
सदर विद्यार्थिनीला सत्र 2023 – 24 ची जीवन प्रेरणा शिष्यवृत्ती बहाल करण्यात आली.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रकाश तोकलवार,घोट केंद्राचे केंद्रप्रमुख भगवान मेश्राम, महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियान चे राज्य कार्याध्यक्ष बापु भोयर,पेटतळा शाळेचे मुख्याध्यापक किसन सोनटक्के,प्राथमिक शिक्षक,सुरेश झाडे व पुरुषोत्तम किरमे व पालक, विद्यार्थी मोठ्या सख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियान प्रणित “शिक्षक व समाज सामुहिक दत्तक पालक योजने अंतर्गत जास्तीत जास्त समाज घटक तथा शिक्षक बंधु भगिनींनी “गरीब,गरजू, होतकरू व हुशार विद्यार्थ्यांचे जीवन घडविण्यासाठी याजनेमध्ये सहभागी व्हावे,
सुधारित आदेश! ८५ वर्षावरील ज्येष्ठाना घरपोच मतदानाची सुविधा! ( Voternews )
असे आवाहन राज्याध्यक्ष विजय ठाकुलकर,महाराष्ट्र राज्य शिक्षक सन्मान अभियान चे राज्य कार्याध्यक्ष बापु भोयर यांनी केले आहे.
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Gadchirolinews:सोबतच सदर प्रेरणादायी उपक्रमासाठी जिल्हा अध्यक्ष बिदूर अधिकारी व राज्य समन्वयक चांगदेव सोरते यांनी अभिनंदन केले आहे.