पत्रकार संतोष थोरहाते विश्वकर्मा पुरस्काराने सन्मानित !( journalist )

0
2

 

चिखली तालुका विश्वकर्मा जयंती उत्‍सव समिती विधायक पत्रकारीतेची दखल

 

हिवरा आश्रम ता,२२ः गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या मूल्याधिष्टीत, शोधपत्रकारीता व विधायक पत्रकारीतमुळे परिचित असलेले हिवरा आश्रम येथील पत्रकार संतोष थोरहाते यांना नुकताच प्रभू विश्वकर्मा पुरस्काराने चिखली येथे सन्मानीत करण्यात आले.

चिखली तालुका विश्वकर्मा जयंती उत्‍सव समितीच्या वतीने बुधवारी ता.२१ रोजी चिखली येथील संत खटकेश्वर महाराज संस्थान येथे आयोजित प्रभू विश्वकर्मा जयंती उत्‍सव कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांच्या संतोष थोरहाते यांना विश्वकर्मा पुरस्कार २०२४ प्रदान करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून अत्रिनंदन सिमेंट प्रोडक्टचे संचालक विजयकुमार मेहत्रे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून बुलडाणाचे जिल्हा उद्योग केंद्राचे सुनील पाटील तर प्रमुख पाहूणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष संजय गाडेकर, संपादक पवन वानखेडे,पत्रकार सुधीर चेके,

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

जेष्ठ कामगार नेते सतीष शिंदे, ॲड वृषाली ताई बोंद्रे, गाव माझा च्या महिला प्रमुख अष्टगाथा मॅडम, सीमा मॅडम, मेघा जाधव, मार्गदर्शक,श्रीराम वानखडे, गजानन जवरकर, उत्सव समिती संतोष जगताप, बंडू कदम, राहुल इंगळे, समाधान, भोलवनकर तथा आदि उपस्थित होते.

संतोष थोरहाते यांनी हिवरा आश्रम सारख्या छोटयाशा खेडयापासून पत्रकारितेची सुरुवात केली. गेल्या अनेक वर्षापासून ग्रामीण भागात विधायक व शोधपत्रकारीतेचा वसा घेत कार्य करीत आहे.

त्‍यांनी पत्रकारीतेच्या माध्यमातून समाजातील दुर्बल, वंचित घटकांच्या हक्क व न्यायासाठी पत्रकारीतेच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम केले. अभ्यासपूर्ण लेखन, शोधपत्रकारीता हे त्यांच्या पत्रकारीतेचे मुख्य अंग आहे.

अल्पावधीतच आपल्या विधायक पत्रकारीतेच्या माध्यमातून जिल्हयातील पत्रकारीतेच्या क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली.

 

संतोष थोरहाते यांच्या विधायक पत्रकारीतेची दखल घेत त्यांना विविध सेवाभावी संस्थाकडून पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पत्रकारिते सोबत त्यांनी योगप्रचाराचे मोठे कार्य केले आहे.

journalist: सुप्रसिध्द ग्राफिक्स डिझायनर,व्हिडीओ एडिटर, फाँट डेव्हलपर सुध्दा आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here