Home Blog Page 109

पश्चिम बंगालच्या कामगाराची हत्या करणाऱ्या दोघांना जन्मठेप! गुन्हेगारांना जरब बसविणारा निकाल ( highcourt )

0

 

highcourt:बुलढाणा:दारु पिवून आला असल्याने कामावर न घेण्याचे वादातून कंपनीतील सफाई कामगाराचा खून करण्यात आल्याची घटना २०२२ रोजी घडली होती. आज सोमवार २९ एप्रिलला प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश स्वप्निल सी. खटी यांनी निकाल दिला.

यामध्ये प्रकरणातील दोन्ही खूनी आरोपींना जन्मठेपेची व प्रत्येकी ५०० रू.दंड अशी शिक्षा सुनावली आहे. मोहम्मद हुसेन मोहम्मद असे मृतक सफाई कामगाराचे नाव आहे.

मुकादम हसमुख उर्फ मोहम्मद इमदादुल लष्कर (३२ वर्ष) तसेच सुपरवाइझर मुन्नाभाई उर्फ मुजमिल शेख आबिद हुसेन असे दोघा खुनी आरोपींची नावे आहेत.

चिखली तालुक्यातील बेराळा येथे ‘जस्ट फूड कंपनी’ आहे. यामध्ये कामगार लोकांसाठी भोजन तयार करण्यात येते व डब्यांद्वारे पुरविण्यात येते. या कंपनीमध्ये मोहम्मद हुसेन मोहम्मद हा सफाई कामगार म्हणून कार्यरत होता. तो मूळचा बोन्हा बिरभुम, (पश्चिम बंगाल ) येथील रहिवासी होता.

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

मात्र २ जून २०२२ पासून तो बेराळा येथील कंपनीत कामाला होता. दरम्यान १५ ऑगस्ट २०२२ रोजी तो रात्री नऊ वाजता दारू पिऊन आला. गेट समोर आल्यानंतर, दारू पिऊन आल्याने तेथील वॉचमनने ही बाब मुकादम हसमुख आणि सुपरवायझर मुन्नाभाई याला सांगितले व मोहम्मद हुसेन याला कंपनीच्या आत घ्यायचे की नाही ? अशी विचारणा केली. त्यावेळी त्याला कामावर घेण्यास नकार देण्यात आला.

त्यांनतर मृतक मोहम्मद याची मुन्नाभाई याच्याशी बोलचाल झाली होती. रात्री ९ते १० वाजेच्या दरम्यान मृतक मो. हुसेन याने वॉचमनची नजर चुकवून कंपनीच्या किचन हॉलमध्ये गेला असता त्याचे मागोमाग आरोपी हसमुख हा देखील त्याठिकाणी गेला. त्यावेळी त्यांचेमध्ये परत कामावर न घेण्याच्या कारणावरून वाद झाला व हसमुख याने मृतक मोहम्मद हुसेन यास सिमेंटच्या पाय-यावरून भांडे धुण्याच्या मशिनपर्यंत ओढत नेवून फावडयाने त्याचे डोक्यात वार केले. त्यांनतर परत दुसऱ्या दिवशी म्हणजेच १६ ऑगस्टला सकाळी साडेपाच वाजेच्या दरम्यान दोन्हीही आरोपींनी पुन्हा याच कारणावरून कंपनीच्या गेटसमोर मृतक मो. हुसेन यास चापटा बुक्क्यांनी मारहाण केली.

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

व त्याचे दोन्ही पाय धरून ओढले व हसमुखने स्टीलचे रॉडने त्याचे डोक्यात वार करून दोघांनीही मोहम्मदला जिवानिशी ठार मारले. सदर गुन्हाची फिर्याद कंपनीचे वॉचमन सुखदेव नरसिंग साळोख यांनी १६ ऑगस्ट २०२२ रोजी चिखली पोलीस स्टेशनला दाखल केली होती. त्याआधारे दोन्ही आरोपींविरूध्द खुनाचा नोंदविण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास पोलीस उपनिरिक्षक राजेश चव्हाण यांच्याकडे सोपविण्यात आला होता. तपासा दरम्यान सगळ्या गोष्टींची पुर्तता झाल्यानंतर संबंधीत तपास अधिकारी यांनी दोषारोप पत्र विद्यमान न्यायालयात दाखल केले.

सदरचा खटला चालविण्याकरिता प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश बुलढाणा स्वप्नील खटी यांचे न्यायालयात वर्ग करण्यात आला होता.सदर प्रकरणात अभियोग पक्षातर्फे एकुण आठ साक्षीदारांचे साक्षीपुरावे नोंदविण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार वॉचमन सुखदेव नरसिंग साळोख, वॉचमन दिपक लालसिंग पवार, पंच शेख अज शेख रशिद पटेल, सुनिल प्रकाश पाटील, कामगार सिताराम ललीतरॉय, पोलीस कॉन्स्टेबल अशोक गायकवाड, वैद्यकिय अधिकारी ग्रामीण रूग्णालय चिखली डॉ. अमोल प्रतापसिंग राजपूत व तपास अधिकारी पोलीस उपनिरिक्षक राजेश चव्हाण यांच्या साक्षी अतिशय महत्वपूर्ण, एकमेकांना पुरक व एकमेकांशी सुसंगत असल्याकारणाने विश्वासार्ह ठरल्या.

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

शिवाय मृतकाच्या संपूर्ण अंगावर आढळून आलेल्या जखमेच्या अनुषंगाने व शवविच्छेदन अहवालाच्या आधारे वैद्यकिय अधिकारी यांची साक्षदेखील अतिशय महत्वपूर्ण ठरली व या सगळ्या पुराव्याचे आधारे विद्यमान प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, बुलढाणा श्री. स्वप्नील चंद्रकांत खटी यांनी दोन्हीही आरोपींना भांदविचे कलम ३०२ , ३४ अन्वये दोषी ठरवून दोघांनाही जन्मठेप व प्रत्येकी ५०० रू दंड अक्षी शिक्षा सुनावली आहे.

highcourt:सदर प्रकरणात फिर्यादी पक्षातर्फे सरकारी वकील ॲड सोनाली सावजी देशपांडे यांनी योग्य प्रकारे सांगड घालून सरकार पक्षाची बाजु भक्कमपणे वि. न्यायालयासमोर मांडली. तर पो.हे.कॉ. नंदाराम इंगळे, पो.स्टे. चिखली यांनी कोर्ट पैरवी म्हणून पुर्णपणे सहकार्य केले.

शेगाव रेल्वे स्थानकावर मारवाडी युवा मंचच्या वतीने प्रवाशांच्या सोयीसाठी लावण्यात आलेल्या शुद्ध व आरोचे जल कुंभाचे माजी मंत्री रमेश बंग यांच्या हस्ते लोकार्पण..( shegaonnews )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव: मध्य रेल्वेच्या मुंबई कलकत्ता लोहमार्गावरील भुसावळ रेल्वे डिव्हिजन मध्ये ऐ दर्जा प्राप्त शेगाव रेल्वे स्थानकावर मारवाडी युवा मंच अकोला या सामाजिक संस्थेने प्रखर उन्हामध्ये रेल्वे प्रवाशांना थंड व शुद्ध आरूचे प्रियजल

उपलब्ध व्हावे यासाठी अमृतधारा या जल कुंभाचे लोकार्पण सोहळा राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री रमेश बंग यांच्या हस्ते माजी मंत्री जयप्रकाश जी मुंदडा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रविवार 28 एप्रिल रोजी पार पडला.

मारवाडी युवा मंचचे राष्ट्रीय उपाध्यक्ष निकेश गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमाला नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष शरद शेठ अग्रवाल शेगाव रेल्वे स्टेशनचे प्रबंधक मोहन देशपांडे, एडवोकेट पुरुषोत्तम डांगरा, यांच्यासह इतर अनेक मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

यावेळी अध्यक्ष पदावरून बोलताना निकेश गुप्ता यांनी सांगितले की मारवाडी युवा मंच विशाखा अकोला आपल्या अमृतधारा या स्थायी प्रकल्पांतर्गत शेगाव सारख्या संतनगरी असलेल्या पवित्र भूमीच्या रेल्वे स्थानकावर श्रींच्या

दर्शनासाठी शेगाव रेल्वे स्टेशनवर येणाऱ्या भाविकांना प्रखर उन्हामध्ये थंड व शुद्ध पेयजल मिळावे या उद्देशाने मारवाडी युवा मंच अकोला च्या सौजन्याने गुप्ता परिवार अकोला यांच्या वतीने स्वर्गीय विद्यादेवी भिकुलालजी गुप्ता यांच्या स्मृती प्रित्यर्थ शेगाव रेल्वे स्टेशनवर अमृतधारा शितल जलश्री आरो फिल्टर वॉटर कुलर प्लांट लावण्यात आल्याची माहिती निकेश जी गुप्ता यांनी दिली.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या कार्यक्रमाला माजी मंत्री रमेश बंग, माजी मंत्री जयप्रकाश जी मंडळ यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला अकोला येथील रोहित रूमता सुरज काबरा ,नमन खंडेलवाल, राष्ट्रीय रेल्वे प्रवासी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजकुमार व्यास, शेगाव येथील मारवाडी युवा मंच चे विनोद शर्मा, एडवोकेट मनोज मल, सुरेश धूत, वरून नागपाल, मयूर मुना, विश्व हिंदू

shegaonnews:परिषदेचे शेगाव शहर प्रखंड प्रमुख विजयकुमार राठी शेगाव संघर्ष समितीचे सचिव विजयकुमार मिश्रा, यांच्यासह शेगाव रेल्वे स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते

एकल वनवासी सेवा समिती द्वारा संचालित एकलव्य आश्रम शाळेच्या वतीने गुरुवार दोन मे पासून शिशु संस्कार विधी शिबिराचे आयोजन( shegaonnews )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

shegaonnews: शेगाव: चिमुकल्यांना लहानपणापासूनच संस्काराचे धडे मिळावेत या उद्देशाने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी पर्यंतच्या बालक,

बालिकां साठी गुरुवार दोन मे पासून एकल वनवासी सेवा समिती द्वारा संचालित एकलव्य आश्रम शाळेच्या वतीने जनता विद्यालय जामोद येथे शिशु संस्कार विधी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

एकल वनवासी सेवा समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक एकलव्य आश्रम शाळा या ठिकाणी पार पडली त्या बैठकीमध्ये संस्कारीत पिढी निर्माण करण्याच्या उद्देशाने दोन

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

मे पासून शिशु संस्कार शिबिर घेण्याचे ठरले 11 मे पर्यंत चालणाऱ्या या शिबिरामध्ये पालकांनी आपल्या इयत्ता पहिली ते इयत्ता पाचवी पर्यंतच्या चिमुकल्या पाल्यांना

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

shegaonnews:संस्कार मिळावे या उद्देशाने जास्तीत जास्त संख्येने सहभागी करावे असे आवाहन एकल वनवासी सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे

इंस्टाग्रामवर ओळख, प्रेमाचा बनाव अन् लग्नाचे आमिष!३२ वर्षीय विवाहितेवर वारंवार अत्याचार ,गुन्हा दाखल ( whatsapp news )

0

 

whatsapp news:शेगाव :शेगाव शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे.एका तरुणाने इंस्टाग्रामच्या ओळखीतून ३२ वर्षीय विवाहितेशी प्रेम संबंध प्रस्थापित केले. त्यांनतर लग्नाचे अमिष दाखवून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवून लैंगिक शोषण केल्याचा घृणास्पद प्रकार उघडकीस आला आहे.

प्रकरणी पिडीतेच्या तक्रारीवरून पोलिसांनी सदर युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

समीर शाह अनिस शाह ३२ वर्ष असे आरोपीचे नाव आहे. पीडित विवाहितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, जून २०२३ पासून २२ एप्रिल २०२४ पर्यंत समीर शाह याने वारंवार इच्छेविरुद्ध बलात्कार केला आहे. इंस्टाग्राम या ॲपच्या माध्यमातून त्याच्याशी ओळख झाली होती. त्यातूनच एकमेकांशी व्हाट्सअप व इंस्टाग्राम वर चॅटिंग होत होती. ”

माझे तुझ्यावर प्रेम आहे, मी तुझ्या सोबत लग्न करतो” असे म्हणून समीर शाह हा भेटायला यायचा. व इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवायचा. त्यानंतर देखील तुझ्यासोबत लग्न करतो असे म्हणत त्याने अनेक वेळा शारीरिक संबंध ठेवले.

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

त्यानंतर पीडितेच्या पतीला दोघांच्या संबंधाची माहिती झाल्याने, पीडितेच्या पतीने तिला खामगाव येथे राहण्यासाठी नेले. परंतु त्या ठिकाणीही समीर शाह याने शारीरिक संबंध प्रस्थापित केले.

व आक्षेपार्ह फोटो, व्हिडिओ व्हायरल करण्याची तसेच पतीला जीवाने मारण्याची धमकी दिली. असे पिडीतेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

whatsapp news:प्राप्त तक्रारीवरून पोलिसांनी समीर शाह अनिसशाह याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गीता वि. तांगडे करत आहेत.

त्यांनी’ हल्ला केला अन नाचणारे वऱ्हाडी सैरावैरा पळाले ; बुलढाण्यातील थरारक घटना ( buldhananews )

0

 

buldhananews:बुलडाणा: लग्नाची वरात निघाली, डीजेच्या आवाजावर सगळी वऱ्हाड मंडळी थिरकत होती. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता, उत्साह होता पण तितक्यातच असं काही घडलं की सगळ्या वऱ्हाड मंडळीला वरातीतून पळाव लागल.

.हा सगळा अचंबित करणारा प्रकार घडला तो काल रविवार रात्री बुलढाणा शहरातील जांभरुण रोड परिसरात.

ज्या ठिकाणाहून वरात निघालेली होती तिथे एका झाडावर मधमाशांच अगडबंब पोळ जमलेल होत. इकडे वरातीत डीजेचा आवाज अन् आवाजाच्या तालावर वऱ्हाडी नाचत होते.

पण डीजेच्या आवाज व कंपनामुळे मधमाशांचे पोळ उटले आणि या मधमाशांनी वऱ्हाडी मंडळींवरच हल्लाबोल केला. त्यामुळे एका मिनिटातच नाचत असलेल्या मंडळीच्या आनंदाचे वेदनेत रुपांतर झाले.

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

सगळी मंडळी सैरावैरा करत पळत सुटली, अनेकजण मधमाशांच्या हल्ल्यात जखमी झाली. यामुळे लग्न सोडून अनेकांना दवाखाना गाठावा लागला.

 बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

buldhananews:दरम्यान, या वर्दळीत नवरदेव सुरक्षित असल्याने मांगल्याचा क्षण शुभ झाला अन् अखेर शुभमंगल झालं.. सध्या जखमी वऱ्हाडींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत, जखमींची संख्या दहा आहे.

महाराष्ट्रात चालला तरी काय? 1300 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं धक्कादायक खुलासा ( Maharashtra farmers )

0

 

Maharashtra farmers: महाराष्ट्र मध्ये आता पर्यंत या दुष्काळ, नापिकी, अवकाळी अशा नैसर्गिक आपत्तींचा सामना करून थकलेल्या शेतकऱ्यांना ही वेळ का आली.

एक हजार ३७० शेतकऱ्यांनी राज्यात दुष्काळ जाहीर झाल्यापासून म्हणजेच ऑक्टोबर २०२३ ते मार्च २०२४ या काळात जगाचा निरोप घेतल्याची धक्कादायक खुलासा माहिती समोर आली आहे.

 

तर आता या राज्याच्या मदत व पुनर्वसन विभागाकडील आकडेवारीनुसार जानेवारी २०२३ ते मार्च २०२४ या १५ महिन्यांत तब्बल साडेतीन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.

मात्र आता या राज्यात दररोज सरासरी सात शेतकरी आत्महत्या करतात, तरी शासन झोपत आहे की काय अशी मागील काही वर्षांची स्थिती आहे.

 

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

तर आता पर्यंत अमरावती व छत्रपती संभाजीनगर येथे हे प्रमाण जास्त आहे.

 बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Maharashtra farmers:मग काय तर यंदा ऑक्टोबर महिन्यात दुष्काळ जाहीर झाल्यापासून एक हजार ३७० शेतकऱ्यांनी जगाचा निरोप घेतल्याचेही मोठा खुलासा आकडेवारीतून स्पष्ट होते.

पंजाब डख यांचा मे महिन्याचा हवामान अंदाज आला समोर कसं राहणार अवकाळी पाऊस बरसणार का ( Panjab Dakh )

0

 

Panjab Dakh Havaman Andaj : आता मात्र या एप्रिल महिना आता संपण्यावर आला आहे. मात्र आता येत्या तीन दिवसात एप्रिल महिना संपेल. परंतु आता मात्र एप्रिल महिन्याचा शेवट हा देखील अवकाळी पावसाने होणार असे चित्र तयार होताना स्पष्ट दिसत आहे.

तर आता भारतीय हवामान विभागाने आणखी काही दिवस राज्यात अवकाळी पावसाचे सत्र सुरू राहणार असे अंदाज वर्तवण्यात म्हटले आहे.

 

तर आता हवामान खात्याने आज राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट येणार असा अंदाज दिला आहे. मात्र आता तसेच आज मराठवाडा आणि विदर्भातील 14 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती.

पण आज बीड, धाराशीव, लातूर, बुलढाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस होणार असा अंदाज देण्यात आला होतं.

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

मात्र आता अशातच आता जेष्ठ हवामान अभ्यासक पंजाबरावं डख यांचा देखील एक नवीन हवामान अंदाज समोर आला आहे. मात्र आता या नवीन अंदाजात पंजाब रावांनी आणखी किती दिवस वादळी पाऊस सुरू राहणार, परंतु या तसेच मे महिन्यातील पहिला आठवड्यात हवामान कसे राहणार या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

मग काय तर महाराष्ट्रात आणखी किती दिवस वादळी पावसाचे लाट सावट आहे

परंतु आता पंजाबरावांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज आणि उद्या उत्तर महाराष्ट्र मराठवाडा तथा पश्चिम विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची नक्की शक्यता आहे.

मग काय तर आज 28 एप्रिल आणि उद्या 29 एप्रिल पर्यंत उत्तर महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील पश्चिम भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

मात्र आता देखील 30 एप्रिल पासून मात्र राज्यातील हवामान कोरडे होणार आहे की काय आहे.

आतां तर कस राहणार मे च्या पहिल्या आठवड्याच हवामान

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

पंजाब डख यांनी सांगितल्याप्रमाणे, एक मे पासून राज्यात उन्हाची तीव्रता देखील वाढणार आहे. मे महिन्याचा पहिला आठवडा राज्यात कुठेच अवकाळी पाऊस होणार नाही अशी शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

Panjab Dakh: मात्र आता एकंदरीत, एप्रिल महिन्याचा शेवट अवकाळी पावसाने होणार आहे. परंतु आता मात्र पण पुढल्या महिन्याच्या सुरुवातीला वादळी पावसाचे सावट दूर होणार आहे. मग काय तर निश्चितच राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही बातमी दिलासादायी राहणार आहे हे नक्की.

लग्नाच्या वरातीत डीजेवर आक्षेपार्ह गाणे दोन गट भिडले; तिघे जखमी, चार ताब्यात ( crimenews )

0

 

crimenews: बुलढाणा: जिल्ह्यातील टूनकी (तालुका संग्रामपूर) या गावात लग्नाच्या मिरवणुकीत किरकोळ कारणावरून झालेल्या वादावरून दोन गट एकमेकांना भिडले.

यात तिघेजण जखमी झाले असून पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. गावात तणावपूर्ण शांतता असून पोलीस परिस्थिती वर लक्ष ठेवून आहे.


प्राप्त प्राथमिक माहितीनुसार गावातील लग्नाच्या वरातीत डीजेवर आक्षेपार्ह गाणे वाजविण्यात आले.

प्रकरणी दोन गटात राडा होऊन तीन जण जखमी झाले आहेत. यावेळी दगडफेक करण्यात आल्याने डीजे च्या वाहनाचे नुकसान झाले.संग्रामपूर व सोनाळा पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

त्यांनी दोन्ही गटाची समजूत घालून कडक बंदोबस्त तैनात केला. चौघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले. यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. टूणकी या गावाला कडक बंदोबस्तमुळे पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

दोन्ही गटाविरुद्ध सोनाला पोलीस ठाण्यात कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

crimenews:त्यानंतर अटकेची कारवाई करण्यात येईल असे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले.

या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार लोक वर्गणीतून भरला उमेदवारी अर्ज (Loksabhanews)

0

 

Loksabhanews: सध्या लोकसभेचे रणधुमाळी सुरू असताना सातपुड्याच्या पायथ्याशी असलेला बढाईपाडा येथे एका झोपडीत राहणारा २८ वर्षीय तरुण युवराज देवसिंग बारेला याने रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

मात्र या विशेष म्हणजे, समाजबांधवांनी या उमेदवारासाठी वर्गणी काढून त्याची डिपॉझिटची रक्कम भरली आहे.

मात्र युवराज सध्या वकिलीच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी आहे. परंतु बदल घडविण्यासाठी तो राजकारणात उतरल्याचे त्यांनी हा निर्णय घेतले आहे असं सांगतो.

लोकसभा उमेदवार सर्वात तरूण उमेदवार आहे.

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

मग काय तर लोकसभा साठी युवराजची परिस्थिती गरिबीची असून त्याने शिक्षणाची कास धरली आहे.

परंतु त्याला राजकारणाचीही आवड आहे.तर त्याचे गावातील चांगले संबंध पाहता बिडगाव ग्रुप ग्रामपंचायतीमध्ये बिनविरोध सदस्य म्हणून तो निवडून आला. मात्र एकूण २९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून सर्वात कमी वय लोकसभा उमेदवार युवराजचे आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तर आता बदलाचा ध्यास सातपुड्याच्या अगदी पायथ्याशी असलेल्या बढाईपाडा या आदिवासी पाड्यावर गवती छपराच्या झोपडीत युवराज राहतो.

मात्र शिक्षण घेत असतानाच परिसराच्या विकासाचा ध्यास त्याने घेतला आहे. परंतु राजकारणातून विकास साधता येईल,

Loksabhanews : मग असं निर्णय या आशेतून कसलीही पार्श्वभूमी आणी आर्थिक परिस्थिती नसताना तो निवडणुकीला का उभा राहिला आहे असा प्रश्न निर्माण होत आहे.

व्हाट्सअप व ईस्टाग्राम वर चॅटींग करुन लग्नाचा आमिश दाखवून फिर्यादीचे ईच्छेविरुध्द शारीरिक संबंध केले ( crimenews )

0

 

 

ईस्माइल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सह अमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी

crimenews:शेगाव, शेगाव शहर पोलिस स्टेशन मध्ये फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून,आरोपी. समीर शहा अनिसशहा वय 32 वर्ष रा. ईदगाह प्लॉट, शादी हॉल जवळ शेगाव
घटनास्थळ- जमजमनगर, शेगांव घटना ता वेळ- जून 2023 पासुन ते दिनांक 22/04/2024 तिथे 11/00 वा. दरम्याण
दाखल ता वेळ- दिनांक 26/04/2024 चे 19/47 वा.
हकिकत अशा प्रकारे आहे.

की नमुद घतावेळी व ठीकाणी यातील फिर्यादी व आरोपी यांची इंस्टाग्राम वरुन ओळख झाली. त्यातूनच फिर्यादी व आरोपी हे एकमेकांशी व्हॉटसअॅप व इंस्टाग्राम वर चाटींग करीत होते. यातील आरोपी याने फिर्यादीस माझे तुझयावर प्रेम आहे. मी तुझ्या सोबत लग्न करतो.

असे म्हणून भेटण्यास बोलावले. व फिर्यादीचे ईच्छेविरुध्द शारीरिक संबंधे केले व त्यानंतर फिर्यादीस मी तुझया सोबत लग्न करतो असे म्हणून फिर्यादी सोबत वारंवार शारिरीक संबंध केले. फिचे पतीस आरोपी व फीचे संबंधाबाबत माहीती मिळाल्याने त्याने फिर्यादीला खामगाव येथे राहण्यास घेवून गेला तेथे सुध्दा आरोपीने जावून फिर्यादीसोबत शारिरीक संबंध केले.

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

व फिर्यादीस तिचे व्हिडीओ व फोटो व्हायरल करण्याची तसेच फिर्यादी व तिच पतीला जिवाने मारण्याची धमकी दिली.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

crimenews:अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरून कलमअप नं243/2024/कलम 376(2)(N)506भा,द,वि,सदरचा गुन्हा दाखल करुन मा.पो.नी.सा. आदेशाने सदर गुन्हयाचा तपास स.पो. नी. गिता वि. तांगडे यांचेकडे देण्यात आला.