Home Blog Page 116

प्रशासनाच्या वतीने मतदार जनजागृती रॅली( Yavalnews )

0

 

 

यावल(प्रतिनिधी )विकी वानखेडे

Yavalnews:यावल येथील महसुल प्रशासनाच्या वतीने शहरांमध्ये नागरिकांमध्ये मतदान विषयी जनजागृती करण्यासाठी रॅली व प्रबोधनाचे कार्यक्रम घेण्यात आले.

या जनजागृती रॅलीत ह. भ. प. संचित कोळी महाराज, यावलच्या सरस्वती विद्यामंदिर शाळा व इतर शाळांमधील विद्यार्थी यांनी सहभाग घेतला या रॅलीतून मतदानाच्या हक्का संदर्भात कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती केली.

याप्रसंगी यावल शहरातील शाळेतील सर्व विद्यार्थी सहभागी होते. या मतदानाविषयी जनजागृती कार्यक्रमाला फैजपुर विभागाच्या प्रांताधिकारी देवयानी यादव, यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, यावल पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, रशीद तडवी, मुख्याध्यापक गजानन कुलकर्णी, मुख्याध्यापक एम. के. पाटील, विलास काटकर, यावल उर्दू विभागाचे केंद्रप्रमुख शाकीर शेख व यावल शहरातील शाळांमध्ये शिकवत असणाऱ्या शिक्षकांची उपस्थिती होती. सर्वप्रथम गावातून रॅली काढून झाल्यानंतर यावल बस स्थानक येथे कीर्तनाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी कीर्तनाच्या माध्यमातून मतदानास साठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

डॉ नरेंद्र महाले सरस्वती विद्यामंदिर यावल हे सुद्धा व त्यांचे सहकारी विद्यार्थी यांनी कीर्तनामध्ये सहभाग घेऊन उत्तम प्रबोधनाचे कार्य केले. कार्यक्रमाला उदंड अशा प्रकारचा प्रतिसाद मिळाला.

यावलच्या बस स्थानक परिसरात विविध गावातून आलेले प्रवाशी नागरिक जे मतदार म्हणून आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यांची या कीर्तनाला खूप मोठ्या प्रमाणात दाद मिळाली. तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी मतदानाचे कार्य पवित्र कार्य आहे

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

व यासाठी सर्वांनी मतदान करून आपला मतदानाचा हक्क बजावा या संदर्भात मतदारांना मार्गदर्शन केले. गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके यांनी विद्यार्थ्यांना आपण देखील प्रबोधनाच्या या कार्यामध्ये सहभाग घेऊन,आपल्याला शक्य असेल तितके मतदानासाठी आपल्या गावातील नातेवाईकांना, मित्रमंडळींना, घरातील सदस्यांना ज्यांना मतदानाचा हक्क आहे त्यांना मतदान करण्यासाठी जागृत व प्रवृत्त करायचे असल्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. या संदर्भात मतदारांना विशेष आवाहन केले.

Yavalnews:या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ नरेंद्र महाले यांनी केले. कार्यक्रमाचे आभार यावलच्या साने गुरुजी उच्च माध्यमिक महाविद्यालयाचे मुख्याध्यापक एम. के. पाटील यांनी मानले

तूमचा मोबाईल नंबर द्दया ,मी तुम्हाला लाईक करतो ,असे बोलून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी स्रीलंपटा विरुद्ध गुन्हा दाखल ( crimenews )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगांव तूमचा मोबाईल नंबर द्दया ,मी तुम्हाला लाईक करतो ,असे बोलून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी शेख इरफान शेख दिलदार या स्री लंपटा विरूध्द शहर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे.


हकिकत अश्या प्रकारे आहे की श्री.गजानन महाराज इंजिनिअरिंग कॉलेज जवळ आरोपी हा विवाहित महिलेस वाईट उद्देशाने पाहून म्हणाला की तुम्ही मला चार-पाच दिवस झाले दिसले नाही व मला तुमच्या मोबाईल नंबर द्या.

असे म्हणून मी तुम्हाला लाईक करतो तुम्ही मला लाईक करता का तेव्हा मी त्याला म्हणाले की मला मुले बाळे आहेत तो सुद्धा मला म्हणाला की मला सुद्धा मुली आहेत असे म्हटल्यानंतर फि ने झालेली घटना पतीला घरी येऊन सांगितली की आरोपी याने.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

माझी इच्छा नसताना माझ्यासोबत मैत्री करण्याचा प्रयत्न केला म्हणून फि ही पतीसोबत येऊन शहर पो.स्टेला येऊन त्याच्याविरुद्ध तक्रार दिली.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

crimenews:याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शेख इरफान शेख दिलदार राहणार बाजार फाईल शेगाव याचे विरुद्ध अप न. १८९/२०२४ कलम ३५४ (a) भादवि अन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास मा पोलिस निरीक्षक हेमंत ठाकरे यांचे आदेशाने बिट पोहेका करूटले यांच्याकडे देण्यात आला आहे.

अकोल्यातील महिला पोलीस प्रशिक्षण केंद्रातील 30 विद्यार्थिनींना काविळची लागण ( Akolanews )

0

 

प्रतिनिधि सचिन वानखडे
सूर्या मराठी न्यूज अकोला.

Akolanews:अकोला येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रशिक्षण घेणाऱ्या 700 महिला पोलीस प्रशिक्षणार्थींपैकी 30 महिला प्रशिक्षणार्थींना दूषित पाण्यामुळे काविळची बाधा झाल्याची घटना समोर आली आहे..

महिला प्रशिक्षणार्थींवर अकोल्यातील खाजगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू असून सर्वांची प्रकृती स्थिर आहे.याबाबत आज पोलीस प्रशिक्षण विभागाचे पोलीस उपमहासंचालक राजकुमार भटकर यांनी अकोल्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्राला भेट देऊन आढावा घेतला..

30 मार्च रोजी अकोल्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्रातील प्रशिक्षण घेणाऱ्या महिला पोलिसांची दुषीत पाणी पिल्यामुळे अचानक प्रकृती बिघडल्याचे निदर्शनास आले आहे.त्यातील 30 महिलांना काविळची बाधा झाली आहे.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

दूषित पाण्यामुळे ही कावीळ झाली असावी असे वाटते.पिण्याचे पाणी व बाथरुमच्या पाण्याची लाईन झिरपुन त्यात पाणी एकत्र झालेले अनेकदा पहायला मिळते .

पाणी जरी आर ओ चे पिण्यासाठी असेल तरी स्वयंपाकासाठी दुसरे पाणी वापरले जाते का? तसेच स्वयंपाक शुद्ध केला जातो का त्याची तपासणी झाली पाहिजे. तसेच तापमान वाढलेले असल्यामुळे मोठ्या प्रमाणात असा काही मुलींना त्रास झाला आहे का?

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

प्रशिक्षण केंद्रांमध्ये जंतुनाशके व पेस्ट कंट्रोल करुन बाकीची स्वच्छता आणि या सगळ्या गोष्टींबरोबर पाण्याचा सोर्स तपासून घेतला पाहिजे. तेथील महिला पोलिस अधिकाऱ्यांची प्रशिक्षण केंद्रावर एक समिती करावी.

अशा प्रकारच्या घटना घडू नये म्हणून प्रशिक्षण केंद्रात वारंवार तपासणी करण्यात यावी तसेच सदर घटनेचा कसून तपास करुन संबंधित महिलांना न्याय मिळवून देण्यात यावा. हलगर्जीपणा झाला असल्यास चौकशी करून कडक कारवाई करावी. अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी गृहमंत्री उपमुख्यमंत्री यांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे

तर विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी सदर प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

 

Akolanews :पोलीस प्रशिक्षण केंद्रातील काही मुलींना दूषित पाणी किंवा दूषित अन्नामुळे कावीळची लागण झाली असून संबंधित प्रशिक्षणार्थींच्या इलाजाचा खर्च पोलीस प्रशिक्षण केंद्र अंतर्गत करण्यात येणार असून या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेतली जाणार असल्याची माहिती पोलीस प्रशिक्षण विभागाचे पोलीस उपमहासंचालक राजकुमार भटकर यांनी दिली .

धार्मिक भावना दुखावणारे आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या विरुद्ध शेगाव येथे गुन्हा दाखल.( Crimenews )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

धार्मिक भावना दुखावणारी पोस्ट टाकणाऱ्या विरुद्ध शेगाव शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत शेगाव शहर पोलीस मित्राकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील डगडाळीपुरा मोहम्मद अली चौक येथील रहिवासी असलेल्या अमीर खान हुसेन खान वय 26 वर्षे याने शेगाव शहर पोलीस स्टेशनला तक्रार दिली.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

की तो त्याच्या मोबाईलवर इंस्टाग्राम वर व्हिडिओ पाहत असताना त्याला 9356812540 या मोबाईल नंबर वरून धार्मिक भावना दुखावणारे पोस्ट माझ्या मोबाईलवर आली

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Crimenews :या तक्रारीवरून शेगाव शहर पोलिसांनी मोबाईल क्रमांक 93 56 8125 40 या क्रमांकाच्या मोबाईल धारक विरुद्ध भादविच्या कलम 295 एक, आणि 505 (2) नुसार गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पीएसआय गंदरे साहेब करीत आहेत

दोन महिन्यानंतर कामरगाव चोरी प्रकरणातील आरोपी जेरबंद करण्यात पोलिसांना यश ( vashimnews )

0

 

कामरगाव प्रतिनिधी कासिम बेग

vashimnews:धनज बु पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कामरगाव येथे 18 जानेवारीला पहाटे 3 वाजता अज्ञात चोरट्यांनी जिल्हा परिषद विद्यालया मागील शर्मा हार्डवेअर हे दुकान फोडून 1 लाख 10 हजार रुपयांची रोकड लंपास केली होती. सदर प्रकरणी दुकान मालकाच्या फिर्यादीवरून पोलिसांनी


अज्ञात आरोपी विरुद्ध भा.द.वि.च्या कलम 461 व 380 नुसार गुन्हा दाखल करून प्रकरणाचा तपास सुरू केला होता अशातच अकोला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी 24 मार्चला फरहान अहमद अब्दुल गफ्फार वय 30 वर्ष रा. चंद्रगुट्टा हैदराबाद, ह. मु. कापूसतळणी, ता. अंजनगाव, जि. अमरावती याला 24 मार्च रोजी ताब्यात घेतले.

त्यानंतर त्याची कसून चौकशी केली असता कामरगाव येथील शर्मा हार्डवेअर फोडून त्यातील नगदी रोकड चोरल्याची कबुली आरोपीने दिल्याने.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

आरोपीला ताब्यात घेण्यासाठी कामरगाव पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक अंकुश बडतकार व पोलीस कर्मचारी रवाना झालेत. म 45 हजार रुपये किमतीचे 10 रुपयाचे शिक्के, 15 हजार रुपयाच्या 50 रुपयांच्या नवीन करकरीत नोटा आणि म उर्वरित दहा व वीस रुपयांच्या नोटा असे तब्बल एक लाख दहा हजार रुपये व चोरट्यांनी लंपास केले होते.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

vashimnews:आरोपीला म ताब्यात घेतल्यानंतर त्याची कसून चौकशी केल्या जाईल. आणि त्यातून व कामरगावातील आणखी काही चोरीत त्याचा समावेश आहे का हे स्पष्ट होणार आहे.

यावल ग्रामीण रूग्णालयात रूग्णांशी एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उद्धटपणाच्या वागणुकीमुळे रूग्णांमध्ये प्रचंड नाराजगी. ( Yavalnews )

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

Yavalnews:येथील ग्रामीण रुग्णालयात कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी नसल्याने व तात्पूरत्या स्वरूपात आलटून पालटून येणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांमुळे आरोग्य सेवे चे तिन तेरा वाजले असुन.

यातच एका महिला वैद्यकीय अधिकारी यांच्या रुग्णांशी उद्धटपणाच्या वागणुकीमुळे आरोग्य प्रशासनाच्या अशा दुर्लक्षीत कारभारा बद्दल प्रचंड नाराजी नागरीकांमध्ये व्यक्त करण्यात येत असुन,

आरोग्य प्रशासन व लोकप्रतिनिधी रूग्णांशी निगडीत या प्रश्नाकडे लक्ष देणे अत्यंत गरजे आहे . यावल शहर हा आदिवासी क्षेत्रातील तालुक्यातील प्रमुख शहर म्हणुन ओळखले जाते ,

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

या ठीकाणी असलेल्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी रूग्णांची मोठी गर्दी असते परन्तु असे असतांना यावल ग्रामीण रुग्णालयाला मागील दोन वर्षापासुन कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी पदाची चार पदे ही रिक्त असल्याने तातपुरत्या स्वरूपात वैद्यकीय सेवा बजावणाऱ्या डॉक्टरांकडून रुग्णांचे अर्धवट उपचार होत आहे.

असुन,दरम्यान भुसावळ येणाऱ्या एक महिला डॉक्टर या रुग्णांशी अत्यंत निंदनीय व उद्धटपणाची वागणुक देत असल्याने रुग्णांमध्ये त्यांच्या कार्यपध्दीतीबद्दल प्रचंड नाराजी रूग्णांमध्ये व त्यांच्या नातेवाईकांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे .

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Yavalnews:दरम्यान लोकप्रतिनिधी यांनी प्रसिध्दी लाटण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात वारंवार आरोग्य शिबीर घेण्याएवजी यावल ग्रामीण रूग्णालयात मागील दोन वर्षापासुन रिक्त असलेल्या वैद्यकीय अधिकारींची पदे भरल्यास अशा प्रकारे शिबीरांचे प्रसिद्धीसाठी गोंधळ घालण्याची गरज पडणार नाही अशी संत्पत प्रतिक्रिया रूग्णांमध्ये व त्यांच्या नातेवाईकांमध्ये व्यक्त करण्यात येत आहे .

मराठी सॉंग मुळे प्रेक्षकांचे मन जिंकले आभिनेञी नितल शितोळेनी (  nitalshitole )

0

 

प्रतिनीधी पुणे स्नेहा उत्तम मडावी

झगा फेम नितल शितोळे, अभिनेत्री नितल आणि संगीताशी नाळ जोडलेली असून , तसेच आपल्या कलेतील निष्ठेने, व्यक्तिमत्वाने, आणिअभिनयाच्या क्षमतेने लोकांचं ह्रदय मोहतं.तिची कलेशी निष्ठा आणि अद्यापी अभिनयाच्या वाचवणीत, तिची कलेतून बाहेर पडणारं काहीही असो आपल्या सर्वांच्या मनात घर केलं आहे.

झगा फेम नितल शितोळे यांनी कलेतील निष्ठेने आणि आदर्शपणाने संगीत , नृत्य, आणि अभिनयाच्या जगात आपला ठसा वाढवली आहे.तिच्या प्रतिभेने, अद्यापी विविध कलाकृतींमध्ये तोडफोड केली आणि आपल्याला नक्कीच चार्मिंग आणि प्रेरणादायी अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झाली आहे.तिच्या व्यक्तिमत्वात, उत्कृष्ट अभिनयाच्या क्षमतेत, आणि मनोवैज्ञानिक अभिनयाच्या प्रतिभेत, झगा फेम सुपरस्टार नितल शितोळे यांनी लोकांना आपल्या कलेच्या साधनेने चकित केले आहे.

तिच्या अभिनयाच्या माध्यमातून, तिची कलेशी निष्ठा आणि विश्वासणारी व्यक्तिमत्व तिची कलाकृतींना वाचवणारी आणि प्रेरणादायक बनवते.

निकृष्ट केळी दिल्याची माहिती पालकांना दिल्यामुळे संतापलेल्या मुख्याध्यापिकेने ८ वर्षीय विद्यार्थ्यांचा केला लैंगिक छळ, ( crimenews )

झगा फेम सुपरस्टार नितल शितोळे यांचे यश आणि महत्त्व तिच्या कलेशी निष्ठेच्या, व्यक्तिमत्वाच्या, आणि अद्यापी अभिनयाच्या प्रतिभेच्या उत्कृष्टतेने निर्मित झाले आहे.तिचा अभिनयाचा चमक, तिच्या कलेच्या साधनेच्या प्रत्येक धडधडाटीत, आणि तिच्या संगीताच्या स्वरांमध्ये, तिच्या यशाचा प्रत्येक ध्वनीत आहे.

अशी आपली सर्वांची लाडकी झगा फेम सुपरस्टार नितल शितोळे जिने आपल्या कमी वयामध्ये फिल्म इंडस्ट्री मध्ये एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.आज पर्यंत तिच पहिलं गाणं म्हणजे एक मराठी अल्बम त्या गाण्याच नाव होतं ज्याच्या पाशी गाडी बंगला! या गाण्याची निर्मिती प्रथम त्यांनी केली आणि ते गाणे एका म्युझिक कंपनीला विकले. आणि ते गाणे इतके सुपरहिट झाले आणि त्या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

नंतर पुढे त्यांच्या कलाक्षेत्राचा खऱ्या अर्थाने त्यांचा प्रवास सुरू झाला तो त्यांच्या लोकप्रिय आणि अजूनही प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे गाणं त्यांना मिळाले ते म्हणजे तुझा झगा ग! या गाण्यावरती झगा फेम सुपरस्टार नितल शितोळे यांनी मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावरती राज्य केले.

व या गाण्यामुळे त्यांना झगा फेम ही प्रसिद्धी मिळाली आणि त्यांनां स्वप्नात देखील वाटले नव्हते की एवढं हे गाणं हिट होईल की आजही लग्नाच्या मिरवणुकीच्या ठिकाणी हे गाणं आवर्जून लावल जात.हे सुपरहिट सॉंग झगा फेम नितीन शितोळे यांच्या भाग्यात आले.तसंच त्यांचा यशाचा आणखी प्रवास सुरू झाला सुपरहिट आणखीन एक गाणं त्यांना मिळाले ते गाणं म्हणजे “नको नादाला लागू माझ्या “या गाण्यांमध्ये सुद्धा त्यांना मुख्य भूमिकेमध्ये घेऊन चित्रीकरण करण्यात आले व हे पण गाणे इतकं फेमस झालं की अनेक लोकांच्या तोंडामध्ये हे गाणं आहे.

आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद प्रेम आशीर्वाद शुभेच्छा मिळत गेल्या व सर्वांच्या आशीर्वादाने बिग बॉस फेम अभिजीतजी बिचकुले यांनी स्वतः गायलेले एक सॉंग मध्ये मुख्य भूमिका झगा फेम सुपरस्टार नितल शितोळे चित्रीकरण करण्यात आले.

nitalshitole:तसेच या कलेच्या जीवन प्रवासात चार ते पाच चित्रपट देखील त्यांनी केलेले आहे पहिला चित्रपट त्यांचा देखनी बाई सासऱ्यांची घाई ” तसेच कसे काय मामा बरं आहे का नागराज मंजुळे यांचा चित्रपट तसेच झुंड यामध्ये सुद्धा छोटीशी भूमिका छान निभावली आहे तसेच साईबाबांची एका चित्रपटामध्ये लक्ष्मीची भूमिका पार पडले आहे.

निकृष्ट केळी दिल्याची माहिती पालकांना दिल्यामुळे संतापलेल्या मुख्याध्यापिकेने ८ वर्षीय विद्यार्थ्यांचा केला लैंगिक छळ, ( crimenews )

0

 

जवळा बु जि.प.शाळेच्या मुख्याधिपीकेवर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल . शैक्षणिक क्षेत्रात खळबळ..

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगांव .तालुक्याहतील जवळा बु. येथील जि.प.मराठी प्राथमीक शाळेत विद्यार्थ्याला काळी पडलेली निकृष्ट केळी देण्यात आली याबाबत विद्यार्थ्यांच्या पालकाने मुख्याध्यापिकेला जाब विचारला म्हणून याचा राग मनात धरून मुख्याध्यापिकेने ८ वर्षीय विद्यार्थ्याचा लैंगिक छळ केल्याची लाजीरवाणी घटना दि.२१ मार्च २०२४ रोजी घडली.

याप्रकरणी मुख्याध्याप के विरुद्ध शेगाव ग्रामीण पोस्टे मध्ये पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हकीकत अशाप्रकारे आहे की जवळा येथील आठ वर्षीय विद्यार्थी हा जि प मराठी प्राथमीक शाळा जवळा बुद्रुक येथे शिक्षण घेत आहे. आरोपी ही सदर शाळेची मुख्याध्यापीका असून १५ /३/२०२४ रोजी शाळेत मुलांना केळी वाटण्यात आली ती केळी फिर्यादी यांनी आरोपी हीस काळी पडलेली केळी का वाटप केली या बाबत विचारणा केली असता आरोपी हीने केळी चांगलीच आहेत असे म्हणुन वाद घातला.

 

पोलीस हक्क संघर्ष संघटना शेगाव तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध ( shegaonnews )

. यानंतर जि.प.मराठी माध्यमिक शाळा येथे आरोपी हीने यातील फिचा मुलगा पिडीत वय ८ वर्षे याला वर्ग खोलीत तुझ्या बापाला कंम्पलेंट करायले लावतो काय माझी बदली करायला लावतो काय ?असे म्हणुन त्याची पॅन्ट सोडली व (लींग) ओढले व थांब तुला आता दाखवते त्यावेळी पिडीत हा पळत निघाल्याने शाळेत पडला व त्याचे पायाला मार लागला आहे .

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

crimenews:याप्रकरणी २१ /३/२०२४ रोजी शेगांव ग्रामीण पो.स्टे ला फिर्याद दिल्यावरून पोलीसांनी आरोपी रेखा मानकर, मुख्याध्यापीका जि.प. मराठी प्राथमीक शाळा जवळा बु रा. अकोला यांचे विरूध्द अप नं. ९४ /२०२४ कलम ३२३,५०६ भा.द.वि. सहकलम ८, १० बालकांचे लैंगीक अत्याचार प्रतिबंधक अधि , सहकलम ३(१)(r), ३(२),(va) अ. जा.ज.अ. प्र. कायदा अन्वये गुन्हा दाखल केला असून सदर गुन्हाचा तपास मा. उपविभागीय पोलिस अधिकारी खामगावं हे करीत आहेत

पोलीस हक्क संघर्ष संघटना शेगाव तालुक्याच्या वतीने जाहीर निषेध ( shegaonnews )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव.नागपूर येथील सहाय्यक पोलीस प्रफुल धर्माळे यांच्यावर प्राण घातक हल्ला करण्यात आला असल्याने यांचे संदर्भात शेगाव तालुका पोलीस हक्क संघर्ष संघटनेच्या वतीने शेगाव येथील तहसील कार्यालयात निवासी तहसीलदार पाठक साहेब यांना निवेदन देऊन जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी शेगाव तालुका अध्यक्ष अर्जुन कराडे तालुका उपाध्यक्ष आनंद जंजाळ इस्माईल शेख इराणी शेगाव शहराध्यक्ष सुभाष वाकोडे तालुका सचिव बुलढाणा जिल्हा अध्यक्ष नारायण दाभाडे यांच्या निवेदनावर स्वाक्षरी आहेत पोलीस आयुक्ताच्या वाहनचालका वर कुराडीने हल्ला करण्यात आला.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

shegaonnews :पोलीस स्टेशनच्या आवारातच ही घटना घडली आहे या घटनेचा शेगाव तालुका च्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला

मोताळा: जेसीबी व गौण खनिज उत्खनन वरून झालेल्या वादाचे पर्यवसन दोन गटातील हाणामारीत झाले. बोराखेडी पोलिसांनी 18 इसमाविरुद्ध गुन्हे दाखल केले आहे.( crimenews )

0

 

Crimenews :जेसीबी चालविण्यासाठी द्यावा लागणारा हप्ता व तसेच अवैध मुरुमाच्या वाहतुकीवर छापा टाकण्यासाठी महसूल पथकाला बोलवल्याच्या संशयावरून दोन गटात ही तुंबळ हाणामारी झाल्याची घटना.

मोताळा तालुक्यातील कोथळी येथे घडली. कोथळी येथील आरीफ खान अहेमद खान यांनी बोराखेडी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्याकडे असलेल्या जेसीबीमध्ये शे. इरफान शे. प हाशम आणी अ. जमील अ. रशीद हे भागीदार आहेत. १९ मार्च रोजी सकाळी सय्यद युसूफ सय्यद मुसा आणी कुर्बान न शाह मिस्कीन शाह या दोघांनी आरीफ खान आणि साक्षीदारांना जेसीबी चालवायची असेल तर हप्ता देण्याचे म्हटले होते.Crimenews

अन्यथा जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्याची धमकी दिली होती. २० मार्च रोजी सकाळी सय्यद युसूफ सय्यद मुसा, कुर्बान शाह मिस्कीन शाह, मिस्कीन शाह हैदर शाह, तसलीम शाह मिस्कीन शाह, आरीफ शाह मिस्कीन शाह आणी सय्यद समीर सय्यद युसूफ या सहा जणांनी गैर कायद्याची मंडळी जमवून अ. जमील अ. रशीद यांना मारहाण केली.

मध्यस्थीसाठी गेलेल्यांना ही त्यांनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यावरून पोलिसांनी उपरोक्त सहा जणां विरुध्द गुन्हा दाखल केला.

 

आपल्या फॅनच्याच प्रेमात पडला हा अभिनेता, खूपच रोमॅन्टिक आहे यांची लवस्टोरी ( lovestory )

दुसऱ्या गटातील कोथळी येथील कुर्बान शाह मिस्कीन शाह यांनीही पोलिसात तक्रार दिली.शे. इरफान शे. हाशम, आरीफ खान अहेमद खान, शे. जमील शे. रशीद यांच्याकडे जेसीबी असून ते रात्री सरकारी जमिनीतून जेसीबीने मुरुमाचा उपसा करून विक्री करतात. १९ मार्च रोजी रात्री मोताळा तहसील कार्यालयाचे पथक आल्याने नमूद आरोपींनी त्यांचे जेसीबी आणी ट्रॅक्टर घेऊन पळ काढला होता

बातमी  लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Crimenews :तहसील कार्यालयाचे पथक फिर्यादी व साक्षीदार यांनी पाठविले असे वाटल्याने आरीफ खान अहमद खान, शे. जमील शे. रशीद, शे. इरफान शे. हाशम, शे. करीम शे. रशीद, शे. रशीद शे. गणी, शे. नईम शे. रशीद, नाशीर खान नसीम खान व अन्य काहींनी यांनी तक्रारदार व साथीदारांवर राग धरून २० मार्च रोजी शे. जमील शे. रशीद याने फोन करून सय्यद युसूफ यांना कोथळी येथे बोलावले व मारहाण केली. प्रकरणी १२ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.