आमदार अपात्रतेप्रकरणी मोठी अपडेट, सुप्रीम कोर्टाची शिवसेना शिंदे गटाला नोटीस
Supreme Court: मुंबई सुप्रीम कोर्ट ने शिवसेना आमदार अपात्रतेप्रकरणी सुप्रीम कोर्टाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्यासोबतच्या सर्व 40 आमदारांना आता नोटीस जारी केली आहे.
तर सविस्तर असं यानंतर एकनाथ शिंदे आणि त्यांच्या आमदारांना सुप्रीम कोर्ठात त्यांचं म्हणणं काय आहे ही सर्व सादर करावं लागणार आहे.
तर आता सुप्रीम कोर्ट दोन्ही पक्ष कडून बाजू ऐकून घेतल्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयात पाठवायचं किंवा उच्च न्यायालयातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात ही विचार घ्यायचं? व त्यावर पुढच्या निर्णय घेईल.
तर आता याप्रकरणाची सुनावणी 15 दिवसानंतर होणार आहे, तर येणारी सुनावणी नेमकी कधी होईल हे अजून निश्चित झालेलं नाही.
पण आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 10 जानेवारीला शिवसेनेच्या सर्वच आमदारांना पात्र ठरवण्याचा निर्णय दिला. विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गट सुप्रीम कोर्टात गेला.
मग काय तर ठाकरेंचे आमदार अपात्र न केल्यामुळे शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.
तर आता या सुनावणीदरम्यान सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाला हायकोर्टात का गेला नाहीत? असा प्रश्न विचारला, मग त्या त्यावेळी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी हायकोर्टात गेलो तर आणखी वेळ जाईल, असं स्पष्टीकरण केले व सांगितलं.
तर आता यानंतर सुप्रीम कोर्टाने एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व 40 आमदारांना नोटीस पाठवली आहे.विधानसभा अध्यक्षांचा निकाल
10 जानेवारीला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेना ही एकनाथ शिंदेंचीच असल्याचा निकाल दिला. तर आता हा निर्णय घेताना शिवसेनेच्या घटनेचा आधार घेतल्याचं विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं.
आता तर शिवसेना शिंदे गटाची असल्यामुळे शिंदे गटाने निवडलेला भरत गोगवलेंचा व्हीपही विधानसभा अध्यक्षांनी
दिला.
Supreme Court: तर आता एकीकडे शिंदेंच्या आमदारांना पात्र ठरवत असतानाच विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाच्या आमदारांनाही पात्र ठरवलं.
तर आता विधानसभा अध्यक्षांच्या या निर्णयाविरोधात शिंदे गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली.
Narendra Modi: अयोध्येत राम मंदिरात प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना केल्यानंतर दिल्लीत वापस येताना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी केली मोठी घोषणा . तर पंतप्रधान मोदी यांनी पंतप्रधान सूर्योदय योजनेची ही घोषणा केली आहे.
देशातील नागरिकांच्या घरावर त्यांच्या मालकीचे सोलर सिस्टीम असावी यासाठी ही योजना सुरू करण्यात येणार असल्याचे पंतप्रधानांनी म्हटले.
पीएम मोदी यांनी आपल्या सोशल मीडिया हॅण्डलवर या योजनेची माहिती दिली आहे.
( PM Modi ) की आमचे सरकार 1 कोटी घरांवर छतावर सौरऊर्जा बसविण्याचे लक्ष्य घेऊन “प्रधानमंत्री सूर्योदय योजना” सुरू करणार आहे.तर आता यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीयांचे वीज बिल तर कमी होईलच, पण आता यात ऊर्जा क्षेत्रात भारत स्वावलंबी होईल,असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी आजच्या दिवशी व्यक्त केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे महेश भय्या डोंगरे पाटील यांची मागणी
MIDC: 12जानेवारी ला छावा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अशोक राजे जाधव यांच्या माध्यमातून माननीय महेश भैया डोंगरे पाटील मराठा क्रांती मोर्चा राज्य समन्वयक यांच्या कडे मागनी करण्यात आली होती.
सिंदखेड राजा परिसरात एमआयडीसी (MIDC) उभारून युवकांच्या हाताला रोजगार द्या अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडे महेश भय्या डोंगरे पाटील यांनी केली आहे .
सदर निवेदनात म्हटले आहे की,मातृतीर्य सिंदखेड राजा शहराचा स्वतंत्र परिचय देण्याची गरज नाही,परंतु ज्या शहराने स्वराज्याची प्रेरणा दिली तेथील विकासाचा अनुशेष कायमच वाढत चालला आहे.
शहरातील विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लागावे यासाठी आम्ही सरकार दरबारी प्रामाणिक प्रयत्न करीत आहोत. शहर विकासाच्या दृष्टीकोनातून युवक युवतींना बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी तरुण मुलामुलींना त्यांच्या पायावर उभ करण्यासाठी हाताला काम मिळाल्यानंतर नशापाणी पासून प्रवृत्त करण्यासाठी व भावी आयुष्य सुरळीत व चांगले जाण्यासाठी त्यांच्या हाताला काम देणे महत्वाचे आहे.
MIDC: त्याकरिता सिंदखेड राजा शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर एमआयडीसी (MIDC) उभारून त्यांच्या हाताला रोजगार द्यावा,अशी मागणी महेश भय्या डोंगरे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन केली आहे.
Rahul Gandhi : अयोध्या काँग्रेसची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ सध्या आसाममध्ये पोहचली आहे. तर जिथे काँग्रेस नेते राहुल गांधी वैष्णव संत श्रीमंत शंकरदेव यांच्या जन्मस्थानी पोहोचले आहेत पण त्यांना आता आत जाण्याची परवानगी दिली जात नाही.
तर आता या दरम्यान, राहुल गांधींना परवानगी न मिळाल्यानंतर आता काँग्रेसचे सर्व नेते आणि कार्यकर्ते मंदिराबाहेर धरणे धरून बसले असून आत जाण्याची परवानगी देण्याची मागणी करत आहेत.
आता तर दुसरीकडे तर मंदिरात कोणाला प्रवेश द्यायचा आहे किंवा नाही हे देखील मोदीच ठरवणार का ? असा संतप्त सवाल या ठिकाणी राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.
तर आता आसामच्या बटाद्रवा पोलिस स्टेशनच्या व्यवस्थापनाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना अयोध्येतील राम मंदिराचा ‘प्राण प्रतिष्ठा’ सोहळा संपल्यावरच मंदिरात जाण्यास सांगितले आहे. तर तो पर्यंत मंदिराबाहेर उपस्थित असलेल्या काँग्रेस नेत्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते,राहुल गांधी म्हणतात,
“काय प्रॉब्लेम आहे? मी आत का जाऊ शकत नाही, माझा काय दोष आहे की मी मंदिरात जाऊ शकत नाही. असं काय असा संताप आरोप त्यांनी व्यक्त करताना दिसून येत आहे.
फक्त या वेळेस राहुल गांधी यांना काय अडवले जात आहे असं यावेळी राहुल गांधींसोबत काँग्रेस नेते गौरव गोगोई, जयराम रमेश आणि इतरही दिसत आहेत. जयराम रमेश म्हणाले, “एखाद्या व्यक्तीला मंदिरात जाण्यापासून रोखले जात आहे,
मग काय इथल्या खासदारालाही मंदिरात जाऊ दिले जात नाही, ही लोकशाहीची हत्या आहे. हे का केले जात आहे?”
तर आता जयराम रमेश पुढे म्हणाले, “आपण लोकशाही देशात राहतो. मात्र स्थानिक खासदार गौरव गोगोई यांनाही येथे रोखले जात आहे. हा अन्याय आहे.”
Rahulgandhi : मग आता गौरव गोगोई म्हणाले की, सर्वांना मंदिरात जाण्याची परवानगी आहे, फक्त राहुल गांधींनाच नाही, का? त्याला मंदिरात जायचे आहे, तो भगवान शंकराचा भक्त आहे पण त्याला आत जाण्यापासून रोखले काय जात आहे असं संतप्त सवाल या ठिकाणी व्यक्त केले जात आहे.
Laptop, phon: रीलायन्स जिओनं आता एक उत्तम सेवा सादर केली आहे, ती ज्यामध्ये लॅपटॉप, फोन आणि डेटासाठी एअरफायबर सेवा स्वस्त दरात उपलब्ध करून दिली जात आहे.
तर हा एक रेंटल प्लॅन आहे, तर आपण आता ज्यामध्ये कोणताही लॅपटॉप, फोन आणि Jio AirFiber सारखी भरपूर इतर सेवा खरेदी करण्याऐवजी भाड्यानं घेतली जाऊ शकतात.
ही जिओची फायनान्शिअल सर्व्हिस असून विशेषतः कॉर्पोरेट्ससाठी आहे. याचा अर्थ ही सेवा सामान्य युझर्ससाठी नाही.
काय आहे Daas सर्व्हिस?
आपण पाहू ही सेवा DaaS म्हणून ओळखली जाते. तर आपण ज्यामध्ये डिव्हाइस ठराविक कालावधीसाठी भाड्यानं दिलं जातं, तर जे दर महिन्याला किंवा एका ठराविक हप्त्यात भाड्यानं दिले जाऊ शकतं.
तर या मोठ्या कंपन्यांना एकाच वेळी हजारो लॅपटॉप आणि मोबाइल फोन खरेदी करावे लागतात, तर आता ज्यामध्ये खूप पैसा खर्च होतो, तर नफा मिळविण्यासाठी अनेक वर्षे लागतात, ज्यामुळे कंपन्यांवर खूप आर्थिक भार पडतो.
तर आता अशा समस्यांचा सामना करण्यासाठी जिओनं लॅपटॉप, फोन आणि इतर डिव्हाईसेस रेंटनं देण्याची योजना आणली आहे. तर आता ही योजना कोणत्याही स्टार्टअप किंवा छोट्या कंपनीसाठी खूप उपयुक्त ठरू शकते.
काय आहे जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस?
रिलायन्स जिओच्या मुकेश अंबानींच्या समूह रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नवीन जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसनं DaaS चे फायदे स्पष्ट केले आहेत,
तर आता त्यानुसार DaaS फायनान्शिअल सर्व्हिस कमी जोखमीच्या आहेत.
Laptop, phon: जिओ च्या मुकेश अंबानी यांच्या मते Jio Financial Services (JFS) चं उद्दिष्ट देशातील प्रत्येक क्षेत्रासाठी आर्थिक सेवा प्रदान करणं आहे. तर आता लाभ घेयून आपलं स्वप्न पूर्ण करू सकता.
मुंबई दि. २१ – eknathshinde : मुंबई महानगरात संपूर्ण स्वच्छता मोहीम अखंडपणे राबवण्यात येत असून या मोहिमेंतर्गत आज कुर्ला परिसरातील अनेक मंदिरांची स्वच्छता करण्यात आली.
या मोहिमेमध्ये स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. मुंबईत राबवण्यात येत असलेल्या संपूर्ण स्वच्छता (DEEP CLEAN) मोहिमेमुळे मुंबई शहरातील प्रदूषणाची पातळी घटली असून प्रदूषणाची पातळी ३५० वरून १०० ते ८- पर्यंत खाली आली आहे. हे या संपूर्ण स्वच्छता मोहिमेचे यश असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
कुर्ला परिसरातील शिवसृष्टी येथील श्री गणेश मंदिर, श्री. नंदिकेश्वर मंदिर, श्री हेरंब मंदिर, सिद्धेश्वर सहकारी गृह निर्माण संस्था, श्री शनैश्वर मंदिर, चेंबुर येथे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सपूर्ण स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. खासदार राहुल शेवाळे, आमदार मंगेश कुडाळकर, माजी आमदार तुकाराम काते, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त पी. वेलरासू यांचेसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, संपूर्ण स्वच्छता मोहीम ही एक लोकचळवळ झाली आहे. टप्प्या- टप्प्याने संपूर्ण स्वच्छता मोहीम राज्यात राबवण्यात येत असून या मोहिमेच्या माध्यमातून लवकरच स्वच्छ, सुंदर व हरित महाराष्ट्र होण्यास मदत होणार आहे. या अभियानामध्ये लोक उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचा संदेश दिला आहे.
२२ जानेवारी रोजी होणाऱ्या अयोध्या येथील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने देशभरातील मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्याचे आवाहन पंतप्रधान श्री. मोदी यांनी केले आहे. त्याला देशातील सर्व नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. यामुळे संपूर्ण स्वच्छता मोहिमेला गती मिळाली आहे. मुंबईतही अनेक मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे.
आज कुर्ला येथील अनेक मंदिरांमध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या स्वच्छता मोहिमेचे खरे हिरो हे स्वच्छता कर्मचारी आहेत. दिवस-रात्र हे कर्मचारी मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठी काम करत असल्याचेही सांगून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वच्छता कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
मुंबईची जगभरात एक वेगळी ओळख आहे. या ठिकाणी देश, विदेश तसेच जगभरातून नागरिक येत असतात. म्हणून त्यांना अपेक्षित अशी मुंबई पाहण्यासाठी स्वच्छ मुंबई व सुंदर मुंबई करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून संपूर्ण स्वच्छता मोहीम (Deep Clean Drive) ही मोहीम सुरू केली आहे.
या मोहिमेच्या माध्यमातून सिडको, एमएमआरडीए आणि मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत विविध विकास कामे हाती घेण्यात आली आहेत. या मोहिमेला शालेय आणि महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध सामाजिक संस्था, सफाई कर्मचारी तसेच शासकीय यंत्रणांसह नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत.
यावेळी परिसरातील नागरिक, तरुण मंडळांचे कार्यकर्ते, मंदिरांचे विश्वस्त, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोहिमेदरम्यान मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी स्वच्छता कर्मचारी, परिसरातील नागरिक आणि भाविक यांच्याशी संवाद साधला.
*रस्त्याने जाणाऱ्या मुलांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद*
दरम्यान, कुर्ला पूर्व भागात स्वच्छता मोहीम आटोपून परतत असताना रस्त्याच्या कडेला चालत जाणारी दोन लहान मुले मुख्यमंत्री श्री. शिंदे यांना दिसली. या मुलांच्या हातात गदा होती. रस्त्याने आपल्या आईसोबत चालत जाणारी ही गदाधारी मुले पाहून मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी त्यांचा ताफा थांबवला. स्वतः त्या लहान मुलांना जवळ बोलावले.
त्या लहानग्यांशी त्यांनी संवाद साधला आणि त्यांच्यासोबत फोटोही काढला. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या या आपुलकीच्या वागणुकीने ही लहान मुले भारावून गेल्याचे यावेळी दिसले.
मराठा आरक्षणासंदर्भातील आंदोलन मागे घ्यावे, मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचे आवाहन
मराठा आरक्षणासाठी शासन सकारात्मक आहे. मराठा समाजाला टिकणारे आणि कायद्याच्या कक्षेत बसणारे आरक्षण देण्यासाठी शासन युद्धपातळीवर काम करत आहे. मराठा समाजाला आरक्षण देत असतानाच ओबीसी व इतर कोणत्याही प्रवर्गातील आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही.
eknathshinde : शाश्वत आणि कायद्याच्या चौकटीत टिकेल असे आरक्षण मराठा समाजाला मिळावे ही शासनाची भूमिका आहे. त्यासाठी वेगवेगळ्या आघाड्यांवर शासन काम करत आहे. यासर्व गोष्टींचा विचार करता मराठा आंदोलकांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना केले.
Videoviral: सेलिब्रिटींचे अफेअर्स, व या डेटिंग चर्चा कलाविश्वात कायमच रंगलेल्या पाहायला मिळतात.
पण मागील गेल्या अनेक महिन्यांपासून भारताचा युवा क्रिकेटर शुबमन गिल आणि सचिन तेंडुलकरची लेक साराच्या अफेअरच्या फार मोठ्या प्रमाणात चर्चा रंगल्या आहेत.
आता या शुबमन आणि सारा एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चांना फार उधाण आलं आहे. तर आता अफेअरच्या चर्चांदरम्यानच सारा तेंडुलकरला शुबमनच्या बहिणीबरोबर स्पॉट करण्यात आलं आहे.
तर आता सारा आणि शुबमनची बहीण शहनिल गिल यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत सारा आणि शहनिल एकाच कारमध्ये बाजूला बसल्याचं दिसत आहे. एका पार्टीनंतर त्यांना स्पॉट करण्यात आलं. या व्हिडिओत शुबमनच्या बहिणीने चेहऱ्यावर मास्क लावल्याचं दिसत आहे.
पण, आता पापाराझींचा कॅमेरा समोर येताच साराने तोंड लपवल्याचंही दिसत आहे. तर आता तसेच सारा लाजतानाही दिसत आहे. पण आता वुम्पला या इन्स्टाग्राम पेजवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
तर आता या सारा आणि शहनिलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत.
तर आता या “रिश्ता पक्का समझे”, अशी कमेंट एकाने केली आहे. तर दुसऱ्याने तर “अरे वाह नणंद-भाभी एकत्र” असंही एकाने म्हटलं आहे. मग काय trb”वहिनीला भेटायला आली होती ती”, अशी कमेंटही केली आहे.
मग आता या दरम्यान, ‘कॉफी विथ करण’मध्ये सारा खानने “सारा का सारा इंडिया गलत सारा के पिछे पडा है” असं म्हणत तिच्या आणि शुबमनबद्दलच्या चर्चांना पूर्णविराम दिला होता.
Viralvideo : हा आहे सर्वात खतरनाक व्हिडीओ जे भारतातील सर्वात लांब समुद्री पूल अटल सेतू काही दिवसांपूर्वी खूप चर्चेत आला होता.
तर आता एका अशा पुलाचा व्हिडीओ सोशल मीडिया वर व्हायरल होतो आहे, जो पाहूनच आपण धडकी भरेल. व हा सर्वात जगात अशी काही ठिकाणं आहेत, जिथं जाण्याचं खूप धाडस प्रत्येक जण करत नाही.
पण आता अशाच ठिकाणांपैकी हा एक पूल. जो एक फूट ब्रीज आहे. ते पण हा पूल इतका धोकादायक आहे की प्रत्येकजण त्यावर चढण्याचं धाडस करत नाही.
तर हा पूल दोन पर्वतांच्यामध्ये बांधला आहे. तर या पुलाची उंची 460 फूट आहे, तर लांबी 328 फूट म्हणजे 100 मीटर आहे.
ही माहिती वास्तविक हा पूल दुहेरी काचेचा पूल आहे. पुलाच्या खाली खोल दरी आहे, ज्यात पडलं तर मृत्यू निश्चित. या पुलाचं नाव आहे रुई ब्रीज. यामुळेच हा पूल नुसता बघता धोकादायक वाटतो.
मात्र, इथं अनेक लोक फिरताना दिसतात.
तर आता हा पूल आहे कुठे हे जाणून घेण्याची उत्सुकता तुम्हाला असेल. हा पूल चीनच्या झेनजियांग प्रांतातील शेंगजियानजू व्हॅलीवर बांधला गेला आहे.
मग हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर @gunsnrosesgirl3 नावाच्या आयडीसह शेअर करण्यात आला आहे. अवघ्या 12 सेकंदांचा हा व्हिडिओ आतापर्यंत 73 हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे,
मग हा तर शेकडो लोकांनी व्हिडिओला लाईक करून विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.
Viralvideo: तर हा व्हिडिओ पाहून कोणी म्हणतंय की ‘हा पूल आधुनिक अभियांत्रिकीचं उत्तम उदाहरण आहे’,
तर कोणी म्हणतंय की ‘मी कधीच या पुलावर चढणार नाही’. कारण कि एका युझरनं लिहिलं आहे की, ‘मी जर या पुलावर चढून वरून खाली पाहिलं तर नक्कीच मरेन’. असं कॉमेंट्स येत आहे.
सुरेश वाडकरांच्या जादूई सूरांनी गाजविला महासंस्कृती महोत्सवाचा दुसरा दिवस हजारोंच्या संख्येने श्रोत्यांची उपस्थिती
विदर्भाच्या अयोध्येत आज हंसराज रघुवंशी यांचे भक्तीगीत
नागपूर, दि. 20 – विख्यात गायक सुरेश वाडकर यांच्या जादूई सूरांनी महासंस्कृती महोत्सवाचा दुसरा दिवस गाजवला.रामटेक गडकिल्याच्या पायथ्याशी भक्तीगीत, भजन, गाजलेली चित्रपट गाणी, गझल त्यांनी आपल्या मधूर आवाजात सादर केली.
हजारोंच्या संख्येने उपस्थित रसिक श्रोते आणि मनाला भिडणारा सुमधुर स्वर अशी साद- प्रतिसादाची मैफल रामटेकरांनी अनुभवली.
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्यावतीने व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने रामटेक येथील नेहरू मैदानावर पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाचा शुभारंभ काल करण्यात आला.
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी अभिनेत्री हेमा मालिनी यांनी रामायणावर आधारित नृत्य नाटिकेचे सादरीकरण करीत रसिकांची मने जिंकली होती. त्यानंतर आज दुस-या दिवशी आवाजाचे जादूगर सुरेश वाडकर यांची गाणी श्रोत्यांच्या हृदयाला भिडली.
सुरेश वाडकर यांनी प्रामुख्याने हिंदी आणि मराठी गाणी गायली. अनेक हिट गाण्यांना त्यांनी आपला आवाज दिला आहे.
हिंदी-मराठीच नव्हे तर भोजपुरी, सिंधी आणि कोकणी भाषांमध्येही अनेक गाणी गायली आहेत. आज त्यांच्या याच गाण्यांना पुन्हा एकदा नेहरू स्टेडियमवरील श्रोत्यांची वाहवा मिळविली.
नेहरू मैदानावर त्यांनी सादर केलेल्या ‘मेघा रे मेघा रे’, ‘ए जिंदगी गले लगाले’ , लगी आज सावन की फिर वो झडी है, सांज ढले गगन तले, और इस दिल मे क्या रखा है, मैं हू प्रेम रोगी यांसारख्या त्यांच्या गाण्यांनी प्रेक्षकांच्या मनाला भुरळ घातली.
‘प्रेमरोग’, ‘सदमा’ या चित्रपटातील त्यांच्या गाण्यांनी श्रोत्यांवर अक्षरशः गारूड केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांनी गुरुवंदना गायली.
महोत्सवाच्या दुस-या दिवशी आ. ॲड. आशीष जायस्वाल, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसिलदार हंसा मोहने आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
Sureshvadkar उद्या, दि. २१ जानेवारी रोजी सायंकाळी सात वाजता सुप्रसिद्ध गायक हंसराज रघुवंशी यांच्या गाण्यांचा कार्यक्रम होणार आहे. सर्वांसाठी हा कार्यक्रम निःशुल्क असणार आहे.
आता तर या सरकारमधील नेत्यानंच मोठा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.
आता सरकार म्हणून भूमिका संपली असून एक आंदोलक म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्च्यात सहभागी होणार असल्याचे प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी म्हटले आहे.
हा तर जरांगे पाटलांनी सांगितल्यानुसार सगे-सोयरे या शब्दाच्या दुरूस्त्या केल्या. सरकारने या दुरूस्तीवर सकारात्मक होत सगे सोयरे याचा प्रश्न मिटला असल्याचे जरांगे पाटील यांनी सांगितले.