तर हा प्रकार शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने व्यापाऱ्याला चांगलाच चोप दिला आहे.
सुयासगाव या ठिकाणी गेल्या महिन्याभरापासून कापूस व्यापाऱ्याने जवळपास चार ट्रक भरून कापूस खरेदी केला होता.
परंतु सदर व्यापारी हा मापात पाप करत असल्याचा प्रकार शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. मग काय तर या नंतर सर्व शेतकऱ्यांनी एकत्रित येत या व्यापाऱ्यास व त्याच्या सहकाऱ्यांना चांगलाच चोप दिला.
मात्र ही सदर व्यापारी हा कापूस उत्पादक शेतकऱ्यांची लूट करत असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर गावातील शेतकऱ्यांनी या व्यापाऱ्यास चांगलाच चोप दिला आहे.
तर हा सर्व या व्यापाऱ्याने महिनाभरात गावातून घेतलेल्या सर्व कापूस उत्पादक शेतकऱ्यांना भरपाई पोटी ५ लाख १० हजार रुपये परत केल्यानंतर या व्यापाऱ्याची सुटका गावातील शेतकऱ्यांनी केली आहे.
मग काय तर त्याचबरोबर गावात या व्यापाऱ्यास कायमस्वरूपीची बंदी करण्यात आली आहे.
CottonNews: तर आता यामुळे या व्यापाऱ्याला शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करताना मापात पाप करणं चांगलंच महागात पडल आहे. तर आता व्यापाऱ्याला गाव बंदी सुद्धा केले आहे.
crimenews: बुलढाणा: वयोवृद्ध इसमाने आपल्या गर्भवती सुनेचा व नातूची निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना आदिवासीबहुल संग्रामपूर येथे आज घडली.
यामुळे तालुक्यासह बुलढाणा जिल्हा हादरला आहे.
याप्रकरणी तामगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
यामुळे घटनेचा तपशील कळू शकला नाही. प्राप्त प्राथमिक माहितीनुसार
संग्रामपूर शहरात आज २३ जानेवारी रोजी ही घटना घडली. यामध्ये ६५ वर्षीय आरोपी नारायण गायकी याने राहत्या घरातच आपली गर्भवती सून अश्विनी देवानंद गायकी व नातू समर्थ गायकी यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले.
यामुळे ८ वर्षिय नातू जागीच ठार झाला तर सून गंभीररीत्या जखमी झाली. अश्विनीला रुग्णवाहिका द्वारे प्रथम वरवट बकाल येथे व नंतर शेगाव येथील सईबाई मोटे उप जिल्हा रुग्णाला नेण्यात आले होते.
crimenews: मात्र अखेर तिचा मृत्यू ओढवला.आरोपी नारायण गायकी याला पोलिसांनी अटक केली आहे. तपास ठाणेदार सुरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक दिपक सोळंके करीत आहे. वृत्त लिहे पर्यत गुन्हा नोंदविण्यात आला नव्हता .
मुंबई, : अवयवदानात देशात सर्वोत्तम कामगिरी केलेल्या पाच राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश असून राज्यातील १४९ अवयदात्यांनी केलेल्या अवयदानामुळे शेकडो रुग्णांचे प्राण वाचले आहेत.
अवयदान चळवळीला यश येत आहे. यासाठी अवयवदात्यांचे कुटुंब, डॉक्टर, परिचारिका, रुग्णालये, समुपदेशक, पोलीस या यंत्रणांचे अभिनंदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.
यासंदर्भात आरोग्य विभागाला दिलेल्या पत्रात मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रातील अवयवदानाची आकडेवारी वाढली असली एवढ्यावर समाधान न मानता राज्यात अवयवांची गरज असणाऱ्यांची मोठी प्रतीक्षा यादी आहे. ज्या तुलनेत अवयवांची गरज आहे,
त्या तुलनेत आपल्याकडे मेंदूमृत व्यक्तीचे अवयवदान होणे आवश्यक आहे. अवयवदान जनजागृतीची गरज आहे.
वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातून अवयदानासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. गेल्या काही वर्षात अवयव निकामी झालेल्या रुग्णांत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशा रुग्णांची राज्यातील प्रतीक्षा यादी महिन्यागणिक वाढत आहे.
त्यामुळे अवयवदानाची वृत्ती वाढीस लागण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत, असे मुख्यमंत्र्यांनी या पत्रात म्हटले आहे.
Eknathshinde : अवयवदात्याचा मृत्यू झाल्यास आरोग्य विभागातील अधिकाऱ्याने त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन राज्य शासनातर्फे श्रद्धांजली अर्पण करावी, अशी सूचनाही मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला केली आहे.
००००
बुलढाणा:advocate: गर्भवती सुनेसह नातुची निर्घृण हत्या करणाऱ्या आरोपीचे वकीलपत्र न घेण्याचा ठराव संग्रामपूर वकील संघाने घेतला आहे. दरम्यान आरोपीला आज तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
संग्रामपूर येथे काल जिल्ह्याला हादरविणारे हत्याकांड घडले. आरोपी नारायण भिकाजी गायकी ( वय ७०) याने काल २३ जानेवारीला आपली गर्भवती सून अश्विनी गायकी( २८) व नातू समर्थ गायकी(९) यांची कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या केली. यात समर्थ याचा जागीच तर अश्विनीचा शेगाव येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता.
आरोपीविरुद्ध कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
या घटनेने संग्रामपूर तालुक्यासह जिल्ह्यातील समाजमन सुन्न झाले असून आरोपीविरुद्ध तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे.
वकील संघाचा एकमुखी निर्णय
याला संग्रामपूर वकील संघही अपवाद ठरला नाही. आज अध्यक्ष ऍड. एस. एम. गोतमारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत या घटनेवर साधक बाधक चर्चा करण्यात आली. या घटनेचा निषेध करण्यात आला.
advocate: तसेच आरोपीचे वकीलपत्र न घेण्याचा निर्णय घेण्यात आला. ऍड. सातव यांनी मांडलेल्या ठरावाला ऍड. गिरजापुरे यांनी अनुमोदन दिले. बैठकीला वकील सर्वश्री चिकटे, खंडेराव, बावस्कर, वानखेडे, कीर्तने, क्षीरसागर, बावणे, बेग आदी हजर होते.
नांदुरा, राज्यातील शुरू असलेल्या मागासवर्गीय आयोगाकडून करण्यात येत असलेल्या मराठा व खुल्या प्रवर्गासाठी मिशन सर्वेक्षण मोहिमेस २३ जानेवारी पासून सुरूवात झाली आहे.
हे सर्वेक्षण ३१ जानेवारी पर्यंत होणार आहे, राज्यातील मुस्लिम समाजाने सर्वेक्षणात जास्तीत जास्त प्रमाणात नोंदी कराव्यात असे आवाहन.
मौलाना आझाद विचार मंच चे जिल्हा अध्यक्ष हाजी मुज़म्मिल अली खान यांनी केले आहे, विशेष की मिशन सर्वेक्षण मोहीम ही डिजिटल स्वरूपात होत असल्याने याची नोंद थेट राज्य मागासवर्ग आयोगाकडे जमा होणार आहेत ज्याचा फायदा समाजाला भविष्यात होऊ शकते कारण असे की या अगोदर अनेक सर्वेक्षण झालेले आहे जसे न्याय.
सच्चर समिती, न्याय. रंगनाथ मिश्रा आयोग, न्याय महेमुदुर रहेमान समिती व अशा अनेक समित्या कडून देशात व राज्यात मुस्लिम समाजाला शिक्षण, आर्थिक व नौकर्यात दलित आदिवासी समाजा पेक्षा मागासलेला आहे अशा अनेक रिपोर्ट शासना कडे असुन.
Muslimnews :तरी या शासनाने आजपर्यंत समाजाला आरक्षण दिले नाही तरी सर्वेक्षणाचा फायदा घेऊन मुस्लिम समाजातील संघटनांनी पुढे येऊन समाजातील खुल्या प्रवर्गातील मुस्लिम समाजाला नोंदी साठी जागरुत करावे व या मोहिमेत सहभागी व्हावे.
संग्रामपूर : Bailgada Sharyat: शर्यत ही प्राचीन संस्कृती आणि पारंपरिक प्रथेचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ओळखली जाते.
ग्रामीण अर्थकारणाला गती देण्याचे काम यामधून होते. वेगवेगळ्या गावांतील बैलजोडी स्पर्धेत उतरत असल्यामुळे एकोपा वाढीस लागतो, असे प्रतिपादन दिशा बुलढाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा तथा काँग्रेसच्या प्रदेश सचिव जयश्रीताई शेळके यांनी केले.
तालुक्यातील चांगेफळ येथे २४ जानेवारी रोजी जोड छकडा शर्यतीचा त्यांच्या हस्ते शुभारंभ झाला. यावेळी त्या बोलत होत्या.
कार्यक्रमाला पोलीस पाटील मंगला अवचार, माजी सरपंच विश्वास पाटील, बाजार समिती संचालक भाऊराव पाटील, दत्ता पाटील, राजेश्वर देशमुख, दत्ता इंगळे, नमन इंगळे, आकाश बोरसे, दादाराव धंदर, मनोज वाघ, अशोक सरदार, मधुकर पाटील आदींची उपस्थिती होती.
तर निवाना, रुधाना, वकाना, सावळा, मडाखेड, चांगेफळ, चाकोती, भेंडवळ, टूनकी, बावनबीर, शेगाव, संग्रामपूर, जळगाव जामोद यासह तेल्हारा, अकोला येथूनही नागरिक उपस्थित होते.
पुढे बोलतांना जयश्रीताई शेळके म्हणाल्या, ग्रामीण भागातील बैलगाडा शर्यत लोकप्रिय आहेत. उच्चभ्रूंच्या घोड्याच्या शर्यतींचे जितके वेड असते तितकेच वेड बैलगाडा शर्यतींचे आहे.
शेतीची कामे संपली की, मनोरंजनाचे, खेळीमेळी आणि उत्साह कायम ठेवण्याचे साधन म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पाहिले जाते. धार्मिक यात्रा, जत्रा, मोठे कार्यक्रम किंवा ऊरुस यामध्ये बैलगाडा शर्यतींचे आयोजन करण्यात येते.
Bailgada Sharyat : मध्यंतरी बरीच वर्षे बैलगाडी शर्यतीवर बंदी होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही बंदी उठवल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
yavalnews: शहरातील फैजपूर मार्गावर असलेल्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल येथे मंगळवारी पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न झाला.
या मेळाव्यास तरूणांनी मोठा प्रतिसाद दिला. यावल येथे संपन्न झालेल्या मोठया संख्येत बेरोजगार तरूणांनी विविध ११ कंपनीच्या व्यवस्थापिकीय मंडळास मुलाखती दिल्या. यातील काही गरजूंना जागेवरचं नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.
या मेळाव्याचे आयोजन आश्रय फाउंडेशन, महाविद्यालय व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व मॉडेल करिअर सेंटर, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
शहरात फैजपूर रस्त्यावर जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचालित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आहे. महाविद्यालयाच्या प्रांगणात मंगळवारी जळगाव जिल्हातील सुशिक्षित बेरोजगार तरूणांकरिता पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. करण्यात आले होते.
या मेळाव्या करीता जिल्ह्याभरातून तरूणांनी मोठी उपस्थिती दिली. मेळाव्यापूर्वी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला.
या कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. संध्या सोनवणे होत्या, तर मेळाव्याचे उद्घाटन आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. कुंदन फेगडे यांच्या हस्ते करण्यात आले,
या मेळाव्यात प्रमुख पाहूणे म्हणून जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेचे संचालक सुनील भोईटे, यावल पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी डॉ. मंजुश्री गायकवाड, कौशल्या विकास विभागाचे सहायक आयुक्त विजय रिसे, श्रीकांत लांबोळे, आश्रय फाउंडेशनचे सचिव डॉ.पराग पाटील, कौशल्य विकास मंत्रालय मुंबईचे प्रतिनिधी दिनेश बारेला, अरुण ठाकरे, सुभाष कदम, महेश चौधरी, दिपक बोरसे, उपप्राचार्य प्रा.एम .डी. खैरणार, उपप्राचार्य अर्जुन पाटील, प्रा. सी.के.पाटील, प्रा.आर. एस. तडवी, प्रा.ए.जी.सोनवणे, प्रा. इ. आर. सावकार, प्रा.एम.एच पाटील, प्रा.एस.व्ही.कदम, प्रा.आर.एस. थिगळे, प्रा.नंदकिशोर बोदडे, प्रा.डॉ. संतोष जाधव, प्रा.सी.के.वसाने, सागर लोहार,मनोज बारी यांच्यसह महाविद्यालयातील शिक्षक व इतर कर्मचारी उपस्थित होते.
या रोजगार मेळाव्यात ६९४ च्या वर रिक्त जागे करीता जळगाव जिल्ह्यातील स्पेक्ट्रम इलेक्ट्रिकल लिमिटेड बाबा राजपूत, हिताची अष्टमी इंडिया हितेश नन्नवरे, जैन फार्म फ्रेश फड्स भीकेश जोशी, सुप्रीम इंडस्ट्रीज, क्रेडिट एक्सेस ग्रामीण राजू पाटील, स्टार फेब्रीकेटर्स कॅटर्स एम आय. डी. सी.
Yavalnews : जळगाव, सिग्मा फॅसिलिटी जळगाव सचिन पवार, एल.आय.सी.ऑफ इंडिया जळगाव जितेंद्र सैदाने, राईट सिस्टीम अँन्ड सॉफ्टवेअर जळगावचे मंदार व्ही शांडिल्य, आय.टी.एम.जळगाव अविनाश भडाने, समर स्टील इंडस्ट्रीज या कंपनीच्या प्रतिनिधींनी उपस्थित तरूणांच्या मुलाखती घेतल्या.
Shegaon news: शेगाव.गट ग्रामपंचायत शिरसगांव निळे ता. शेगांव च्या वतीने 17 दिव्यांग बांधवाना ब्लॅंकेट व किराणा किट वंचीत बहुजन आघाडी चे पार्लमेंट बोर्ड सदस्य व भारिप बहुजन महासंघ चे प्रदेश अध्यक्ष लोकनेते अशोकभाऊ सोनोने यांचे शुभहस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्तिती शेगांव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश देशमुख,वंचीत बहुजन युवा आघाडी जिल्हाध्यक्ष अनिल वाकोडे, वंचीत बहुजन आघाडीचे शेगांव शहराध्यक्ष मो.सलमान, वंचीत चे जिल्हाउपाध्यक्ष सोपान लाजुळकर, शेगांव शहर युवा अध्यक्ष संदेश शेगोकार, वंचीत चे तालुका उपाध्यक्ष सुनील निळे, हे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सरपंच रिजवाना बी शेख नासीर हे होते .कार्यक्रमाला उपसरपंच संघमित्रा ईखारे,सदस्य मनोज दहिवाल, सौ. कमल गवई मा.उपसरपंच, अलीम साहेब शेख नासीर, कृष्णा गवई, राहुल ईखारे,उमेश इंगळे, दीपक विरघट, विजय संदुर,बाळू ईखारे,
Shegaon news: आकाश ईखारे,राजेश निळे, प्रशांत निळे, अनिल निळे,हजर होते कार्यक्रमाचे सूत्र संचालन श्रीकृष्ण गवई यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रा.प.सचिव आर. पी. गावडे यांनी केले.
एल्गार परिवर्तन मेळाव्याला संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर व सॊनाळा येथे प्रचंड प्रतिसाद
ravikant tupkar: संग्रामपूर, दि. २३ ( प्रतिनिधी) :- शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी गेल्या ३ महिन्यांपासून आम्ही रस्त्यावरची लढाई लढत आहोत. या लढाईत आम्हाला शेतकरी, तरूण व सर्वसामान्यांचा भरभक्कम पाठिंबा मिळत असल्याने अनेकांच्या पाया खालची वाळू सरकली आहे.
त्यामुळे आमच्यावर खोटे गुन्हे केले जात आहेत. काही सत्ताधारी नेत्यांच्या आदेशावरून खोटे गुन्हे दाखल करून अटक करण्याचा घाट घातला जात आहे.
परंतु असे कितीही खोटे गुन्हे दाखल केले, तरी शेतकऱ्यांचा हा आवाज दाबता येणार नाही,असे प्रतिपादन शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर व सोनाळा येथील ‘एल्गार परिवर्तन मेळाव्यां’त केले.
रविकांत तुपकरांच्या संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर व सोनाळा येथील २१ जानेवारीच्या ‘एल्गार परिवर्तन मेळाव्यां’ना गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अतिशय उत्साहात फटाक्यांची अतिषबाजी करत गावकऱ्यांनी तुपकरांचे स्वागत केले.
तर काकनवाडा बु. येथे ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढून गावकऱ्यांनी स्वागत केले. बावनबीर व सोनाळा येथील परिवर्तन एल्गार मेळाव्याला शेतकरी, शेतमजूर गावगाड्यातील सामान्य नागरिक महिला तसेच तरुणांची मोठी संख्या होती, यावेळी बोलतांना रविकांत तुपकर यांनी सांगितले की.
शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा मानले जाते, पण जागच्या पोशिंदा असलेल्या शेतकऱ्यांची घोर थट्टा राज्यात केली जात आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहे. खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न देखील काही सत्तेतील नेत्यांनी लावला आहे.
परंतु शेतकऱ्यांचा हा लढा आपण सुरूच ठेवणार असून किती गुन्हे दाखल केले, आणि कितीही दबाव आणला तरी शेतकऱ्यांचा हा लढा सोडणार नाही. काही नेत्यांचा अन्याय आणि ही हुकूमशाही उलथवून टाकण्यासाठी आता गावगाड्यातील शेतकरी, शेतमजूर, नागरिक, महिला आणि युवकांनी एकत्रित येऊन परिवर्तनाची लढाई लढणे गरजेचे आहे.
शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्यासाठी या परिवर्तनाच्या लढ्याला तन-मन- धनाने ताकद द्या. काळ्या मातीत राबणाऱ्या हातांचा आशीर्वाद घेऊन हा सर्व सामान्यांचा लढा आपल्याला जिंकायचा आहे, त्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन यावेळी रविकांत तुपकर यांनी केले.
ravikant tupkar : दरम्यान बावनबीर येथे झालेल्या मेळाव्यात श्री.मधुकरकाका आढाव यांनी रविकांत तुपकर यांना लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी लागणार्या खर्चात लोकसहभाग म्हणून रु. ५१ हजारांचा धनादेश दिला.
ravikant tupkar: तर श्री.सचिनजी कोरडे यांनीही रु. २१ हजारांचा निधी दिला. त्यांनी टाकलेला हा पाठीवरील हात, शेतकरी-कष्टकऱ्यांसाठी ताकदीने काम करण्याची ऊर्जा देणारा आहे, अशी भावना रविकांत तुपकरांनी यावेळी व्यक्त केली…
crimenews: सातपुड्यात अंबाबरवा व्याघ्र अभयारण्य आहे. त्यातील पिंगळी हे बफर जंगल आहे.
या जंगल क्षेत्रात एका ३० वर्षीय आदिवासी युवकाने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार २१ जानेवारीच्या सकाळी ९ वाजेच्या दरम्यान उघडकीस आली आहे.
आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव दिनेश झिना बोंडळ असे आहे. तो लगत असलेल्या पुनर्वसित आदिवासी गाव शेंबा (रोहिणखिडकी) येथील रहिवाशी आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.
जोखलाल मुकुंद बोंडळ वय ४०वर्षे यांचे फिर्यादीवरून सोनाळा पोस्टेमध्ये मर्ग नं ०३ /२४ नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत हकीकत अशी की, पंडू कालूसिंग चव्हाण रा. गुंमठी हा वनमजूर पिंगळी जंगलात सकाळी ८ वाजता गस्त करित असतांना बफर क्षेत्रातील कंपार्टमेट नं. ४५४ मध्ये दिनेश बोंडळ हा झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकलेला आढळून आला. असे फिर्यादीत नमूद आहे.