Home Blog Page 146

पातुर्डा येथील महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद / sharadpawar

0

 

 

प्रतिनिधी/
लोकनेते खा. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त १६ डिसेंबर रोजी पातुर्डा येथे जि. हायस्कुल प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या भव्य आरोग्य तपासणी शिबिरास शेकडो नागरिकांनी आरोग्य तपासणी केल्याने उस्फुर्त प्रतिसाद लाभला

भव्य आरोग्य शिबिराचे अध्यक्ष रा कॉ चे जिल्हा कार्याध्यक्ष प्रसन्नजीत पाटील तर उदघाटक
मा. आमदार नानभाऊ कोकरे , मा.जि प सदस्य ज्योतीताई खेडेकर यांनी महापुरुषांच्या प्रतिमेचे पूजन करून केले तर मंचावर पराग अवचार जिल्हा अध्यक्ष रायुकाँ बुलढाणा, एम .डी. साबीर भाई अ जि कार्यध्यक्ष रा कॉ, नारायण ढगे, संजय मारोडे ताअध्यक्ष, तुकाराम घाटे माजी नगर अध्यक्ष, लीलाताई दामधर माजी सभापती , शिवहरि खोंड मा. संचालक रामदास धर्माळ, मिलिंद वानखडे, इंद्रभान वानखडे, अशोक खोंड , नंदू अढाव, बिस्मिल्ला खान, मुन्ना बोराखडे, श्याम देशमुख, यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रेसन्नजीत पाटील यांनी मार्गदर्शन करताना
या धकाधकीच्या काळात प्रत्येक व्यक्ती प्रकृती कडे दुर्लक्ष करीत असतो आरोग्य तपासणी व निशुल्क उपचारा करिता आपल्या गावातील आणी परिसरातील लोकांना आरोग्याची सेवा मिळावी या सेवाभावी वृत्तीने संगीतराव भोंगळ आरोग्य शिबिर घेत असतात ,

आरोग्य शिबिरात हजारो रुग्णांच्या तपासण्या होत असतात व ज्या रुग्णाना आरोग्याच्या काही समस्या आहेत आजार आहे अशा शेकडो रुग्णाच्या शस्त्रक्रिया सुद्धा होत असतात ही खूप मोठी सेवा असल्याचे मत व्यक्त केले तर जी. प सदस्या ज्योतीताई खेडेकर यांनी दरवर्षी आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करणारे संगीतराव भोंगळे यांचे कार्य अतुलनीय असल्याचे मत व्यक्त केले.

आरोग्य तपासणी शिबिरात शेकडो रुग्णाची डोळे, ईसीजी, इको, नाक, कान, घसा, महिलांच्या आरोग्य तपासणी सह इतर सर्व तपासण्या व रक्त चाचण्या डॉ. रत्नशेकर जैन व सहकारी जळगाव खान्देश, डॉ. विलास चौधरी व त्यांचे सहकारी, डॉ योगेश नायसे,डॉ.तायडे, डॉ. वानखेडे यांचेकडून करण्यात आल्या आरोग्य शिबिरात सकाळ पासून नागरिकांची, वृद्ध, मुले व महिला यांची आरोग्य तपासणी साठी मोठी रांग होती हे विशेष या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हा दिनेश वानखडे, गजानन पुंडे, विष्णू पाटील, ज्ञानेश्वर बोपले, प्रघोष झाडोकार, रामदास ठाकरे, प्रशांत आढाव, पंजाब वानखडे, गिरीश देवगिरीकर, आकाश गोमासे , नंदू आढाव, मोहन सोनोने, बाळू म्हसाळ, हरिभाऊ पुंडे ,बिस्मिल्ला खान ,नागो पाटील, शेख दावल, फकृदिन मिस्त्री, दिनकर दातकर, संजय बापट, उत्तमराव हातेकर, इनायत खान, कुर्बान अली, दिनकर इंगळे, कैलास चंदनशिव, संतोष दाने, रवींद्र दाणे, अजय काळे सागर भाकरे

@चौकट
आरोग्य शिबीर आयोजन प्रशंसनीय कार्य.मा.आ.कोकरे
अशा शिबिरांमुळे सामान्य लोकांचा आर्थिक व शारीरिक, मानसिक त्रास कमी होतील आणि काही व्याधी असल्यास अल्पावधीतच लक्षात येईल अशा शिबिर आयोजित करणाऱ्या संगीतराव भोंगळ यांची करावी तेवढे कौतुक कमीच असल्याचे मत मा.आ.नानभाऊ कोकरे यांनी व्यक्त केले.

@चौकट
व्याधी मुक्त रुग्णांचे चेहऱ्यावरील समाधान सेवा करण्याचे अधिक बळ देते-संगीतराव भोंगळ
शेतकरी ,कष्टकरी, सामान्य व्यक्तीं यांचे मध्ये आरोग्य तपासणी बाबत जागरुकता व्हावी, काही आजार असल्यास त्याचे निदान वेळेवर होऊन निशुल्क उपचार व्हावे या करिता रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा या हेतूने आरोग्य शिबिर आयोजित केल्या जाते. रुग्ण व्याधीमुक्त झाल्यावर त्यांचे चेहऱ्यावरचे समाधान दरवर्षी आरोग्य शिबीर आयोजित करण्याचे बळ देते असे मत प्रास्ताविक पर बोलतांना आयोजक संगीतराव भोंगळ व्यक्त केले / sharadpawar

श्री गजानन महाराज इंग्लिश स्कूलद्वारा आयोजित आंतरशालेय किडा स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न

0

 

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

श्री ग. म. इ. स्कूल शेगांव तर्फे विविध आतंरशालेय किडा स्पर्धांचे आयोजन दि. १३/१२/२०२३ ते १५/१२/२०२३ यादरम्यान श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविदयालयात करण्यात आले. या स्पर्धेचे उद्घाटन श्री गजानन शिक्षण संस्थेचे सचिव यांच्या हस्ते झाले व श्री ग.म. अभियांत्रिकी महाविदयालयाचे प्राचार्य, व श्री ग.म. इंग्लिश स्कूलच्या प्राचार्या यांच्या सोबतच तालुका किडा अधिकारी श्री. लक्ष्मी शंकर यादव व मा. आदित्य जोशी सर यांची विशेष उपस्थिती लाभली.

शाळेतर्फे प्रथमच विविध आतंरशालेय किडा स्पर्धाचे आयोजन करण्यात आले व त्यास उत्सफुर्त असा प्रतिसाद मिळाला. शेगांव व परिसरातील विविध १४ शाळांच्या जवळपास ७०० खेळांडूनी सहभाग घेतला. यामध्ये वयोगटानुसार किकेट, कबड्डी, खो-खो, धावणे (१००/२०० मी.), बुध्दीबळ अशा वैयक्तिक व सांघिक किडाप्रकाराचा समावेश होता.

सांघिक किडाप्रकारात विजेता व उपविजेता संघाना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच वैयक्तिक किडाप्रकारात विजेत्यानां सुवर्णपदक, रजतपदक व कांस्यपदक देउन गौरविण्यात आले. हे सर्व श्रींच्या कृपाआर्शिवादातून होत आहे.

डिजिटल मिडिया परिषदेच्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष पदी अमर बोरसे यांची नियुक्ती 

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव.मराठी पत्रकार परिषद मुंबई संलग्नित डिजिटल मिडिया परिषद बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून दै सकाळचे पत्रकार अमर बोरसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख सर यांच्या आदेशानुसार,विश्वस्त किरणजी नाईक, अध्यक्ष शरदजी पाबळे,डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिलजी वाघमारे,मराठी पत्रकार परिषद चे विभागीय सचिव अमरजी राऊत राजेंद्रजी काळे,बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष चंद्रकांतजी बरदे यांच्या मार्गदर्शनात तसेच

विभाग संघटक राजेशजी चौधरी,शेगाव तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष फहिमभाई देशमुख,सचिव नंदु कुळकर्णी,डिजिटल मिडिया परिषदेचे जिल्हा संघटक नारायणजी दाभाडे यांच्या शिफारशीनुसार डिजिटल मिडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष अनिलजी उंबरकर यांनी ही नियुक्ती केली आहे. Dijitalmidiya

दुधलम येथील पाण्याच्या टाकीत दूषित पाणी / Water

0

 

*प्रतिनिधी*/ मूर्तिजापूर
शाम  वाळस्कर

 

दुधलम गावातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीत २ मृत साप आढळून आल्याने गावकऱ्यात भीतीयुक्त वातावरण पसरले असून, काही जागरूक नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा प्रकार उघडकीस आला.

सुमारे ८ ते ९ दिवसांपासून गावातील सामान्य नागरिकांना पाण्याचा वास येत होता. गुरवारी नळ योजनेमार्फत पुन्हा पाणी सोडण्यात आले असता,पाण्याची टाकी तपासणी करण्याकरीता ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश सुभाष महल्ले,ग्रा.स. प्रभा तुकाराम दाभाडे,पंकज तुकाराम दाभाडे,रंजना पंडित,शुधोधन पंडित,रमा शंकर पंडित यांचे पती शंकर भीमराव पंडित,माजी सरपंच रवींद्र नामदेव पंडित,माजी उपसरपंच मंगेश पंडित व गावकऱ्यांच्या उपस्थितीत घडलेल्या अवस्थेत दोन मृत साप आढळले.

त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दुधलम ग्रामपंचायत मधील सचिव,सरपंच,उपसरपंच यांच्या या भोंगळ कारभारामुळे दूषित पाणी प्यावे लागल्याची गावकऱ्यांमध्ये चर्चा असून,संताप व्यक्त होत आहे.

जिवती येथे अन्नत्याग आमरण उपोषणाच्या नवव्या दिवशी उपजिल्हाधिकारी माने यांच्या हस्ते उपोषणाचा समारोप

0

✍️ कृष्णा चव्हाण चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
====================
जिवती –

चंद्रपूर जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग म्हणून ओळख असलेल्या जिवती तालुक्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या मालकीतील जमिनीचे पट्टे त्यांना मिळाले पाहिजे व अन्य मागण्या घेऊन मागील नऊ दिवसापासून जिवती तालुका भूमिहीन शेतकरी बचाव संघर्ष समिती तर्फे अन्नत्याग आमरण उपोषण सुरु होते, या समितीत कोणताही पक्षपात व जातीभेद वगळून सर्व पक्षीय सामाजिक कार्यकर्ते तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागण्या घेऊन उपोषणाला बसले होते,

उपोषणकर्ते सुग्रीव गोतावळे, सुदाम राठोड, शबीर जहागीरदार, विनोद पवार, प्रेम चव्हाण,विजय गोतावळे,लक्ष्मण मंगाम, दयानंद राठोड, मुकेश चव्हाण व बालाजी वाघमारे हे दहा जन मागील नऊ दिवसापासून जिवती येथे अन्नत्याग उपोषणाला बसले होते,

या आंदोलनाची दखल घेत राज्याचे वनमंत्री व चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दि.14-12-2023 ला नागपूर येथे महसूल विभाग, वनविभाग व जिवती तालुक्यातील शेतकरी बांधव यांना बोलावून बैठक घेतली व सहा महिण्याच्या आत जिवती तालुक्यातील जमीन पट्याचा व इतर प्रश्नांचा हल करू असे आश्वासन दिले

बैठकीत या बैठकीत राजुरा विधानसभेचे आमदार श्री सुभाष भाऊ धोटे श्री संजय भाऊ धोटे श्री सुदर्शन निमकर श्री देवराव भोंगळे इत्यादी उपस्थित होते तसेच उपोषणकर्ते सुग्रीव गोतावळे, सुदाम राठोड, शबीर जहागीरदार, मुकेश चव्हाण, दयानंद राठोड व तालुक्यातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपोषणाच्या नवव्या दिवशी आज दि.15-12-2023 सकाळी 11 वाजता चंद्रपूर जिल्हाचे उपजिल्हाधिकारी श्री.माने साहेब तहसीलदार श्री सेंबटवड यांच्या हस्ते निंबू पाणी देऊन उपोषणाला समारोप देण्यात आला.

या वेळी तालुक्यातील आजी-माजी सर्व पदाधिकारी व्यापारी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी जिवती येथील नगरसेवक सर्व गावातील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गाव पाटील व हजारोच्या संख्येने शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी अनेकांनी आपले विचार व्यक्त केले या कार्यक्रमाचे संचलन प्रा. सावंत सर यांनी केले तर आभार श्री पांडुरंग जाधव यांनी मांनले.

परिवर्तन जनसवांद यात्रा हमदापूर सर्कल मध्ये दाखल

0

 

हमदापूर सर्कलमध्ये परिवर्तन जनसंवाद यात्रेला उत्कृष्ट प्रतिसाद

राष्ट्रवादीचे अतुल वांदिले यांनी परिवर्तन यात्रेच्या माध्यमातून २५ दिवसात २४६ गावांना दिली भेट

हमदापूर :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची परिवर्तन जनसवांद यात्रा पोहना (वडणेर) येथून २० नोव्हेंबरला प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात निघाली असून या यात्रेचे हमदापूर सर्कलमध्ये आगमन झाले आहे.

२५ दिवसात परिवर्तन यात्रेने २४६ गावांना भेट दिली असून शेतकऱ्याच्या समस्या जाणून त्यांच्याशी संवाद साधण्यात येत आहे. दि.१४ डिसेंबर रोज गुरुवार ला हमदापुर सर्कल मध्ये परिवर्तन जनसंवाद यात्रेचे भव्य स्वागत करण्यात आले.शेतकऱ्यांच्या भावना समजण्यासाठी त्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी व त्या मार्गी लावण्यासाठी कुणी तरी आपल्यापर्यत येत आहे ,

आपल्या घरपर्यत पोहचत आहे त्यामुळे शेतकरी सुखावला असून गावोगावी उत्साहाने वातावरण आहे. आनंदाने परिवर्तन यात्रेचे स्वागत करताना दिसून येत असून शेकडो शेतकरी स्वंयप्रेरणेने उत्स्फूर्तपणे या यात्रेमध्ये सहभागी होत आहे..

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक प्रवीण पाटील,घनश्याम डाखोरे,गजानन धाबडधुसंके,उपसरपंच शारदाताई बोरकुटे, कांढळी सर्कलचे महादेव वांदिले,जिल्हा सरचिटणीस दरथत ठाकरे, राजुभाऊ धोटे, धीरज येळणे, सुभाष चौधरी, संदीप उईके, प्रा.गोकुळ टिपले, सुधाकर वाढई, राजू मेसेकर,माजी सरपंच तुळसाताई मांडे, माजी उपसरपंच बाबाराव कुडमते,माजी उपसरपंच अमोल कांबळे,भोजराज चौधरी,धनराज गिरी, भोला शेखजी, रामचंद्रजी शेंडे , किशोर पाटील, प्रमोद शेंडे, दूध डेरी अध्यक्ष रत्नाकर भट्ट,प्रेमजी आखूड, भोजराजजी चौधरी,दारूबंदी अध्यक्ष मालाबाई खडतकर, मनोज देवतळे,अतुल बोरकुटे,बंढुजी लोणकर पुष्पताई बोरकुटे,दिनेश चाफले, दिनेश आमले, अनिल पिसुडे, समीर कुबडे, सचिन आमले, सुनील गोल्हर, कुलिम शेख, रफिक शेख, प्रणय बोरकुटे, ग्रा.प.सदस्य गंगाधर कुबडे, ग्रा.प.सदस्य प्रेमीला ईरपाची,माजी ग्रा. प.सदस्य प्रमोद देवतळे,सुरेश नखाते, विशाल आमने आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यासभेचे आयोजन पळसगाव येथे गजानन धाबडधुसंके, प्रणय बोरकुटे, हमदापुर येथे प्रवीण पाटील, धिरज येळणे यांनी केले होते….

उपोषणाच्या आठव्या दिवशी जिवतीतील आठवडी बाजारही भरला नाही uposhan 

0

 

जिवती,शेणगाव,पाटण, बाजारपेठ पूर्णपणे बंद
• उपोषण कर्त्यांना चर्चेसाठी पालकमंत्र्यांचे पाचारण
====================
✍️ कृष्णा चव्हाण चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
====================

जिवती :- गेल्या आठवडाभरापासून जिवती तहसील कार्यालया समोर शेतकऱ्यांच्या जमिनीच्या पट्ट्यांच्या व इतर मागण्या घेऊन जिवती तालुका भुमिहिन शेतकरी बचाव संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली अन्नत्याग आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून या आंदोलनाची दखल घेत जिल्ह्याचे पालकमंत्री सुधिर मुनगंटीवार यांनी जिवती तालुक्यातील वन जमिनीच्या पट्यां संदर्भात नागपूर येथे बैठक आयोजित केली असून या बैठकीला जिवती येथे बसलेल्या उपोषण कर्त्यांना चर्चेसाठी नागपुरात पाचारण केले आहे.

या बैठकीसाठी पाच उपोषण कर्ते व जिवती येथील शिष्टमंडळ नागपूर रवाना झाले आहेत चर्चेत सकारात्मक निर्णय होईल अशी अपेक्षा आहे मात्र या चर्चे दरम्यान योग्य न्याय न मिळाल्यास उपोषण कर्ते व शेतकरी बांधव आक्रमक भूमिका घेतील असेही बोलले जात आहे.
मराठवाड्यातून विविध जिल्ह्यांतून स्थलांतरित होऊन जिवती तालुक्यात स्थाही झालेल्या नागरिकांचा मुख्य व्यवसाय शेती असून नागपूर खंडपीठाने जिवती तालुक्यातील संपूर्ण जमिनच वनविभागाची असल्याचा निर्णय दिल्यामुळे येथील नागरिकांना जमिनीच्या पट्टयांचा प्रश्न व विकासात्मक कामात अडथळे निर्माण झाले आहेत.

जमिनीच्या पट्टयांचा प्रश्न व इतर मागण्या कायमच्या निकाली काढण्यात यावे यासाठी मागील आठ दिवसांपासून जिवती येथील तहसील कार्यालया समोर सुग्रीव गोतावळे,सुदाम राठोड,लक्ष्मण मंगाम, शब्बीर जागीरदार,मुकेश चव्हाण, विनोद पवार,प्रेम चव्हाण,विजय गोतावळे, दयानंद राठोड, वाघमारे या भुमिपुत्रांनी अन्नत्याग आमरण उपोषणाला बसले आहेत.

या उपोषणाला बसलेल्या अनेक शेतकरी पुत्रांची प्रकृती खालावली गेली असुन त्यांच्या लढ्याला यश मिळो यासाठी पाठिंबा दर्शविण्यासाठी दररोज विविध गावांतील शेकडो शेतकरी बांधव दिवस रात्र उपस्थित राहत आहेत.शेतकऱ्यांच्या जमिनीच्या पट्ट्यांच्या प्रश्न कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी गावा-गावातून जमेल तशी आर्थिक मदतही केली जात आहे.

उपोषण स्थळी शेकडो शेतकरी उपस्थित राहून आपल्या वेदना कुणी गीतातून तर कुणी आपल्या मनोगतातून व्यक्त करीत आहेत.रात्रोला कधी भजन तर कधी कीर्तनातून शेतकऱ्यांच्या वेदना गायल्या.उपोषणाच्या आठव्या दिवशी टेकामांडवा येथील जोंदळी(गोंधळी) यांनी सुध्दा उपोषण स्थळी गीतातून शेतकऱ्यांचे गह्राणे मांडत उपोषण कर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहे मात्र नागपूरच्या बैठकीत शेतकय्रांना योग्य न्याय न मिळाल्यास पहाडावरील शेतकरी आक्रमक पवित्रा घेतील असेही बोलले जात आहेuposhan

चंद्रलोक सोसायटी परिसरात बंद घराचे कुलूप तोडून दोन लॅपटॉप आणि वस्तू असा 47 हजार रुपयांच्या मुद्येमाल लंपास.crimenews 

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव: स्थानिक शहर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चंद्रलोक सोसायटी परिसरात नवरात्री दसऱ्यासाठी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेलेल्या राजवैद्य परिवाराच्या बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने 47 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला या प्रकरणी शहर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार शेगाव येथील परिसरात अजय रामचंद्र राजवैद्य वय 54 वर्षे हे त्यांच्या कुटुंबियांसह नवरात्र दसरा सणासुदी निमित्त घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले होते 11 डिसेंबर रोजी घरी परतआल्यावर त्यांना घराच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले दिसले व आत मध्ये जाऊन बघितले असता घरातील सामान असते व्यस्त पडलेल्या आढळून आले.

यावेळी पाहणी केली असता एक डेल कंपनीचा व एक एसपी कंपनीचा असे दोन लेपटाप किंमत प्रत्येकी 20000 यासह घड्याळ , मशीन ,चांदीच्या तुरड्या ,तांब्याचे गंगाड, मोठी समई, सह एकूण 47 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला अशा तक्रारीवरून शहर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध आपला नंबर 613 ऑब्लिक 23 कलम 454 457 380 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://www.suryamarathinews.com/crimenews-24/

शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील आंबुलकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल गणेश वाकेकर बक्कल नंबर 12 44 करीत  आहेत crimenews

२२ वर्षिय सौरभ शिंदे यांचा धारदार हत्यारांने कपाळावर करून खुण…मोहिदेपुर येथील घटना…crimenews 

0

 

 

इस्माईल शेख.बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

जळगाव जामोद पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या मोहिदेपुर या गावात दिनांक 10 डिसेंबर रोजी बावीस वर्षीय सौरभ शिंदे या तरुण युवकाचा धक्कादायक घटना उघडकीस आली असून याबाबत इंदुबाई विजय विकास वय ४५ वर्ष यांनी दिनांक ११ डिसेंबर रोजी जळगाव जामोद पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे.

तसेच तक्रार मध्ये म्हटले आहे की जळगाव जामोद तालुक्यामधील सुलज शिवारा मध्ये सात सव्वा सात च्या दरम्यान आरोपी धनराज शेषराव सावंत राहणार मोहीदेपूर बाबुराव भाऊराव सावंत राहणार उसरा, तेजराव दादाराव सोळंके मोहिदेपूर राहणार तालुका जळगाव जामोद या वरील आरोपीनी संगणमत करुन फिर्यादी इंदुबाई विजय शिंदे यांचा मुलगा मृतक सौरव विजय शिंदे वय २२ वर्ष याला आसलगाव येथे नेवुन त्याला आरोपींनी दारु पाजुन आरोपी धनराज शेषराव सावंत चा मोबाईल फुटल्याचे कारणा वरुन कोणत्यातरी धारदार हत्याराने कपाळावर वार मारुन गंभीर जखमी करुन जिवानीशी ठार मारले केले.

येथे क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇👇👇

https://www.suryamarathinews.com/andolan/

अशा मृतक सौरभ शिंदे यांच्या आईने पोलीस स्टेशनला दिलेल्या रिपोर्ट वरुन आरोपींविरोधात कलम 302, 34 भादवी नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना पोलिसांनी पकडून जेरबंद केले असुन सदर गुन्हयाचा तपास ठाणेदार दिनेश झांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक नारायण सरकटे करीत आहेत.crimenews

आंदोलनाचा सहावा दिवस : शेतकरी उतरले रस्त्यावर, आंदोलनाला तीव्र स्वरूप andolan

0

 

चार आंदोलकांची प्रकृती चिंताजनक
तालुक्यातील शाळा, महाविद्यालय, बाजारपेठ कडकडीत बंद
====================
✍️ कृष्णा चव्हाण चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
====================

जिवती (ता.प्र.) : तालुका भूमिहीन शेतकरी बचाव संघर्ष समितीतर्फे दिनांक ०७ डिसेंबर पासून तहसील समोर शेतीच्या पट्ट्यासह एकूण १३ मागण्या घेऊन सुरू असलेल्या अन्नत्याग आमरण उपोषणाच्या सहाव्या दिवशीही शासन, प्रशासनानी दखल घेतली नसल्याने मंगळवारी तालुक्यातील शेतकरी पेटून उठून रस्त्यावर उतरले. मंगळवारी तालुक्यातील शाळा, महाविद्यालय व सर्व बाजारपेठा कडकडीत बंद ठेवण्यात आल्या असून जो पर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत सर्वच कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय सर्व तालुकावासीयानी घेतला आहे.

सहाव्या दिवशी आंदोलनाला तालुक्यातील व्यापारी संघटना, अंगणवाडी सेविका संघटना, आशावर्कर संघटना, ऑटो चालक मालक संघटना, शाळा, विद्यालय, महाविद्यालयातील विद्यार्थी, विविध सामाजिक संघटना, सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांचा जाहीर पाठिंबा मिळाला असून मागण्या नाही झाल्यास तालुक्यातील सर्व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देऊन तालुक्याला जोडनाऱ्या मुख्य रस्ते बंद पाडून कोणत्याही पक्षांच्या राजकीय नेत्यांना तसेच सर्व शासकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना तसेच महामंडळच्या बसेसला सुध्दा तालुक्यात बंदी घालण्यात येईल असे तालुक्यातील शेतकऱ्यांनी ठरविले आहे. आंदोलन चिघळल्यास होणाऱ्या परिणामास शासन प्रशासनच जबाबदार असतील असाही इशारा उपस्थित शेतकरी बांधवांनी दिला.

उपोषणकर्त्यांची तब्येत दिसेंदिवस खालावत आहे. लक्ष्मण मंगाम या उपोषणकर्त्याला उपचारासाठी दवाखान्यात हलविण्यात आले. त्यामुळे उपोषणकर्ते सुदाम राठोड, मुकेश चव्हाण, विनोद पवार, प्रेम चव्हाण, यांची प्रकृती चिंताजनक श्री सुग्रीव गोतावळे,विजय गोतावळे, दयानंद राठोड, शब्बीर जागीरदार,बालाजी वाघमारे यांनी आमच्या जीवाचे बरे वाईट झाल्यास त्यास सर्वस्वी जबाबदार शासन प्रशासन राहील असे सांगितले.andolan

येथे क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇

https://www.suryamarathinews.com/crimenews-23/

– राज्याचे वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे प्रतिनिधी म्हणून देवरावभाऊ भोंगळे हे उपोषण स्थळी हजर झाले. त्यांनी उपोषण कर्त्यांसोबत चर्चा केली आणि उपोषणस्थळावरून सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना स्पीकरऑन करून फोन लावला असता सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी उद्या किंवा परवा महसूल मंत्री, महसूल व वनविभागाच्या वरिष्ठ पदाधिकारी यांच्यासोबत उपोषणकर्ते यांच्या शिष्टमंडळासोबत शेतीच्या पट्यासह इतर महत्वाच्या विषयावर नागपूर येथे मीटिंग लावण्याचे आश्वासित केले. मात्र जोपर्यंत मार्ग निघणार नाही तोपर्यंत उपोषणकर्ते आंदोलनावर ठाम आहेत.andolan