Home Blog Page 149

मुंबईत कशी धडक मारायची ?मनोज पाटलांनी सांगितले प्लॅन Manoj Jarange Patil In Mumbai

0

 

 

मुंबईत कशी धडक मारायची ?मनोज पाटलांनी सांगितले प्लॅन Manoj Jarange Patil In Mumbai

मुंबई : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच प्रकारे तापत चालला आहे. तरी या सरकारने मनोज जरांगे पाटलांना दिलेली तारिख उद्या संपत आहे. पण त्याआधी बीडमध्ये मनोज जरांगे पाटलांची इशारा सभा पार पडली. परंतु या सभेत त्यांनी एक मोठी घोषणा केली आहे.

येत्या २० जानेवारीपासून मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा मनोज जरांगे पाटलांनी केली आहे. परंतु यात मुंबईत येण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला अॅक्शन प्लॅन देखील सांगितला आहे.

बीडमधील झालेल्या इशारा सभेत नव्या वर्षीतील आंदोलनाची दिशा मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केली आहे. स्वत: आंतरवाली सराटीतून मुंबईकडे पायी निघणार आहे.

देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण घेणार आहे. व सर्व जाती पेक्षा मोठा नेता मानू नका. परंतु आपली मते घेण्यापुरता दारी आला तर त्याला चपलेने बडवा. पोरांना अटक झाली तर आमदार आणि मंत्र्यांच्या घरी जाऊन बसा. असं देखील आव्हान करत सरकारने दहा बारा दिवस मिळत आहेत ते बघावते.

हेही वाचा सविस्तर

👇👇👇👇👇👇👇

https://www.suryamarathinews.com/marijuana-2/

एकदा अंतरवालीमधून निघालो तर पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत परत येणार नाही असा इशाराही मनोज पाटील त्यानी दिला आहे.

तर या दरम्यान, पायी मुंबईला जाताना वाटेत लोक सोबत येतील, मुंबईकडे कुच करतील. तर मुंबईला येताना कुणीही हिंसा करायची नाही. परंतु मराठ्यांना कोणताही डाग लागू द्यायचा नाही. व कुणीही जाळपोळ, तोडफोड करायची नाही. असं या शांततेच जायचं. व शांततेच यायचं. जो हिंसा करेल तो आपला नाही.

असं देखील हिंसा करणाऱ्यांना पकडून द्या. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय मागे यायचं नाही. व असंही या सभेत मनोज जरांगे पाटलांनी स्पष्ट भूमिका घेतले आहे. Manoj Jarange Patil In Mumbai

शेतात गांजाची लागवड ते पण अतिक्रमणाच्या जागेत पावणे दोन क्विंटल झाडे जप्त ( marijuana )

0

 

अनिलसिंग चव्हाण ( मुख्य संपादक )

बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर तालुक्यातील हिंगणकाजी शिवारातील पावणे दोन क्विंटल व सुमारे 18 लाख 70 हजार रुपये किमतीचा गांजाचे पीक मलकापूर ग्रामीण पोलिसांनी नुकतच जप्त केलाय शुक्रवार रात्री कारवाई गजाआड केले

 

संपूर्ण माहिती वरून मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन तालुक्यातील हिंगणकाची शिवारात शुक्रवारी रात्री नऊ वाजता पोलिसांनी डाळ टाकली त्यात गट क्रमांक 52 मधील सुभाष भागवत पाखरे त्यांनी अतिक्रमण केलेल्या शेतात अतिक्रमण केलेल्या शेतात कपाशी तूर गहू व पिकासोबत स्वतःची आर्थिक फायद्यासाठी गांजाचे 73 झाडे लावण्याची माहिती समोर आली आहे.

या झाडाचे वजन एक क्विंटल ८५ किलो ७७ ग्राम इतकी आहे तर त्या पिकाची एकूण किंमत 18 लाख 57 हजार 700 रुपये शेतकरी बेकायदेशीरपणे झाडे लावून संवर्धन जोपासन करत असल्याचे पोलीस कारवाईत आढळून आलं या घटनेचे ग्रामीण पोलीस एक सुभाष भागवत पाखरे वय 33 राहणार भालेगाव तालुका मलकापूर यांच्या विरुद्ध बारावीचा कलम 20 एनपीडीस शनिवारी पहाटे तीन वाजता गुन्हा दाखल केला.

Cotton | कापूस 65 ₹ व बकरा मटण ₹600 किलो म्हणून शेतीपूरक व्यवसाय करावा – दिपक साळवे,अंबुजा सिमेंट फाउंडेशन

शेतकऱ्याचे मुद्देमानाचा गजर करण्यात आला ग्रामीण पोलीस स्टेशन संदीप काळे उपनिरीक्षक अधीक्षक प्रशांत राठोड सचिन दासार रघुनाथ जाधव रविकांत बावस्कर गणेश सूर्यवंशी नीता मोरे संदीप राखुंडे सुभाष सरकटे याच पथकाने ही कारवाई करण्यात आलेले आहे  Marijuana

बोगस डॉक्टरच्या विरूध्द आज अखेर कारवाई बाकीच्यांचं बोगस नकली डॉक्टरांचं काय?doctornews 

0

 

यावल तालुका ( प्रतिनिधी) विकी वानखेडे

तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट झाला असतांना आज यावलमध्ये तब्बल दहा वर्षांपासून पदवी नसतांनाही रूग्णांची आर्थिक लूट करणार्‍या मुन्नाभाई टाईप डॉक्टरच्या विरूध्द आज पोलीस कारवाई करण्यात आली आहे.

यावल तालुक्यात बहुतांश गावांमध्ये बंगाली डॉक्टरांचा धुमाकूळ सुरू असून कोणतीही डिग्री व अधिकृत परवाना नसतांना ते रूग्णांच्या जीवाशी खेळत असून त्यांची आर्थिक लूट करत आहे. यानंतर आज यावलमधील अशाच एका बोगस डॉक्टरच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत.doctornews

शहरात गेल्या दहा वर्षापासुन औषद्य उपाचाराच्या नांवाखाली रूग्णांची आर्थिक लुट करणार्‍या बंगाली बिजनकुमार नियमाइचंद राय नांवाच्या व कोलकत्ता ( पश्चीम बंगाल ) येथील मूळ रहिवाशी असणार्‍या बोगस डॉक्टरच्या विरूध्द आज अखेर कारवाई करण्यात आली.

या प्रकरणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ राजु तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली व तक्रारकर्त यावल तालुकामेडिकल असोसिएशनच्या पदाधिकारी संख्या उपस्थित कारवाई करण्यात आली आहे. त्या बोगस बंगाली डॉक्टरला पोलिसांनी ताब्यात घेतले असुन , या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे .

याप्रसंगी डॉ रमेश पाचपोळे, डॉ धीरज पाटील , डॉ तुषार फेगडे , डॉ गणेश रावते ,डॉ मनोज वारके, डॉ. दाऊद खान , डॉ ईमरान शेख, डॉ. कुंदन फेगडे , डॉ सतिष अस्वार आदींची उपस्थिती होती.

येथे क्लिक करून पहा

https://www.suryamarathinews.com/sandeepgawai-2/

दरम्यान, यावलमधील अवैध बंगाली डॉक्टरला अटक करण्यात आली असली तरी तालुक्यातील बहुतांश गावांमध्ये ठाण मांडून बसलेल्यांवर कधी कारवाई होणार ? हा प्रश्‍न आता विचारण्यात येत आहे.doctornews

तथागत ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांचा प्रशासनाला आमरण उपोषणाचा इशारा..

0

बुलढाणा :- मेहकर येथे तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतिने खालील मागण्याकरिता तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी प्रशासनाला इशारा दिला जर आठ दिवसात खालील मुद्यावर कार्यवाही नाही झाल्यास मेहकर तहसील कार्यालय समोर बेमुदत आमरण उपोषणास बसण्यात येईल याकरिता खालील विविध मागण्यासाठी मेहकर येथील उपविभागीय अधिकारी साहेब, तहसिलदार साहेब, मुख्य आधिकारी साहेब नगर परिषद, उपविभागीय पोलीस आधिकारी साहेब, पोलीस निरिक्षक साहेब, पोलीस स्टेशन मेहकर यांना मागील काही दिवसापुर्वी निवेदन देऊन त्यांचा आढावा घेण्यात आला.

या मुद्यावर प्रशासन झोपेच सोंग घेत आहे. व जनतेच्या व युवकांच्या तसेच शेतकर्यांच्या जिवाशी खेळत आहे प्रशासनाने या कडे लक्ष द्यावे तरी ही प्रशासन व स्थानिक नेतेमंडळी या प्रश्नानकडे दुर्लक्ष करत आहे याकरिता तथागत ग्रुपच्या वतीने खालील मागण्याकरिता
1) मेहकर भाग -1 गट नं 21/1अ व जामगाव गट नं 53,37,58 चे ले – आऊट ग्रिन झोन मध्ये असुन उपविभागीय अधिकारी ह्यानी बोगस NAP/34 करुन दीले असुन ह्या अधिकाऱ्यावर चौकशी करण्यात यावी.

2) मेहकर येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या जागेवर अनेकांनी अतिक्रमण केलेले असून मंत्र्यांच्या आदेशानंतर ही अधिकाऱ्यांनी ते हटविले नसून त्या अधिकारी व एमआयडीसी भुखंड हडप करणार्यावर कार्यवाही करण्यात यावी.

3) मेहकर व लोणार उपविभागातील अवैध धंदे तात्काळ बंद करावे यामुळे तरुन युवा पिढी व्यसनाधीन याकडे वळलेली आहेत. तसेच प्रपंच उध्दवस्त होत चाललेली आहेत. यासाठी मेहकर व लोणार तालुक्यामध्ये असणारे सर्व अवैध धंदे, दारु, मटका, क्लब, झुगार, कशिनो, लॉजिंग हे सर्व व्यवसामुळे तरुण पिढी बिघडत चाललेली आहे. व गुन्हेगारी वाढत आहे.

4) मेहकर शहरातील बोगस मिठाई दुकानदारावरती तात्काळ कार्यवाही करावी व अन्न व औषध प्रशासनाच्या मदतीने प्रयोगशाळेत तपासणी साठी पाठविण्यात यावे.
5) मेहकर नगरपरिषद समोरील अतिक्रमण हटवुन झाडे लावण्याचे काम सुरु करावे.

6) मेहकर येथील पोलीस वसाहतीचे बांधकाम तात्काळ सुरु करण्यात यावे.
7) इ.व्ही.एम मशीन हटवुन बँलेट पेपरने मतदान घ्यावे,
8) शाळा बंदचे परिपत्रक रद्द करुन शिक्षणाचे खाजगीकरण थांबवावे,
9) सैन्य भरती अग्निपथ बंद करुन पुर्ववत असलेली जुनीच सैन्यभरती कायम करावी,
10) अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना सरसकट रूपये 50,000/ – नुकसान भरपाई द्यावी.

11) तथागत गौतम बुध्द यांच्या प्रतिमेची दोन कंपन्यांकडून विटंबना केली असता दोन्ही कंपन्या तात्काळ बंद करण्यात याव्यात.
ह्या मुद्दे नुसार या विषयावर आठ दिवसात कार्यवाही नाही झाल्यास तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने मेहकर तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्यात येईल आसा इशारा तथागत ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संदिप गवई यांनी दिला आहे..

देऊळगाव राजा व सिंदखेड राजा तालुक्यातील झोपलेल्या पोलीस प्रशासनाला जागे करण्यासाठी 25 डिसेंबर रोजी छावा संघटनेकडून रस्ता रोको  chhawa sanghatna 

0

 

सिंदखेडराजा सुरेश हुसे

देऊळगाव राजा व सिंदखेड राजा तालुक्यातील देऊळगाव राजा पोलीस स्टेशन सिंदखेडराजा पोलीस स्टेशन व किनगाव राजा पोलीस स्टेशन अंतर्गत वरली मटका अवैध देशी दारू यांना उत आला.

असून हे धंदे तात्काळ बंद करण्यासाठी छावा संघटनेच्या वतीने दिनांक 12 नोव्हेंबर 20 नोव्हेंबर 2023 व 8 डिसेंबर 11 डिसेंबर 2023 रोजी अवैध धंदे बंद करण्यासाठी अर्ज सादर करूनही अद्याप अवैध धंदे बंद करण्यात आले नसल्याने झोपलेल्या पोलीस प्रशासनाला जागे करण्यासाठी आज तारीख 22 डिसेबर रोजी सिंदखेडराजा ताहसीलदार व सिंदखेडा पोलीस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

असून सदर निवेदनात असे म्हटले आहे की देऊळगांवराजा पोलीस स्टेशन सिंदखेडराजा पोलीस स्टेशन व किनगाव पोलीस स्टेशन अंतर्गत अवैध धंदे 25 डिसेंबरच्या आत बंद करून संबंधित बिट जामदार वर कारवाई न केल्यास छावा संघटनेच्या वतीने सिंदखेडराजा येथील छत्रपती शिवाजीनगर टी पॉईंट समोर दिनांक 25 डिसेंबर रोजी दुपारी 12:30 वाजता रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल याला.

सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील याची नोंद घ्यावी असे या निवेदनात म्हटले आहे सदर निवेदनावर बजरंग काळे बहुजन पँथर युथ तालुकाध्यक्ष, बाळासाहेब शेळके विधानसभा अध्यक्ष, अशोकरावजी जाधव जिल्हाध्यक्ष,गोविंद टेके, संजय उगले, यांच्या स्वाक्षरीआहे  chhawa sanghatna

लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकरालाच शासकीय अधिकाऱ्याकडून चुकीची वागणूक मुख्य मंत्र्यांना निवेदन कारवाही ची मागणी

0

 

अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक )

नांदुरा , दिनांक 21 डिसेंबर रोजी राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ न्यु दिल्ली महाराष्ट्र प्रदेश प्रकल्पात शेख सरदार शेख कदिर यांनी
सदर तक्रार तालुका दंडाधिकारी नांदुरा यांच्या द्वारे माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना तक्रार निवेदन देण्यात आले, दिनांक १९/१२/२०२३ रोजी समाज कांती आघाडीचे बि.डी.ओ. पायघन यांना ग्रा.पं. स्तरावरील विविध समस्या बाबत निवेदन देण्यात आले.

असतांना समाज कांती आघाडीचे कार्यकर्त्यांनी डिजीटल मिडीयाचे पत्रकार शे. कादीर शे. दस्तगीर यांना बातमी संकलन करणे करीता सोबत नेले असता गटविकास अधिकारी श्री पायघन यांनी सदर पत्रकाराला अपमानित करून दलना बाहेर काढून दिले लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ असलेल्या पत्रकाराचा मान भंग झाल्यामुळे सदर बि,डी,ओ, पायघन यांच्यावर कारवाही होणे अत्यंत गरजेचे आहे.

करिता सादर निवेदन न्यायास्तव सादर, शेख सरदार शेख कदीर महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ता, श्रीमती उमा ताई बोचरे बुलढाणा जिल्हा अध्यक्षा, अमीन उल्ला खान नांदुरा तालुका अध्यक्ष, शेख वसिम शेख हारुन लेखणीशत्र प्रतिनिधी, शेख राजीक शेख रहीम शब्द की गुंज न्यूज प्रतिनिधी,अ,नजिर अ,कदीर प्रतिनिधी एस,टी न्यूज द हिंदुस्तान टाईम ईरशहाउल्ला खान प्रतिनिधी,राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ न्यू दिल्ली चे सर्व पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, उपस्थित होते press

आरोग्य शिबीर घेत वडिलांना वाहिली आदरांजली

0

 

वडीलांच्या स्मृतीदिनी डॉक्टर पुत्राचे आयोजन

कृष्णा चव्हाण चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी.

गडचान्दुर-

अर्थ फाउंडेशन चे संचालक डॉ.कुलभूषण मोरे सरांनी आपल्या वडिलांच्या द्वितीय स्मृतीदिनी ग्रामीण भागातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन केले व समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला. त्यात तज्ज्ञ डॉक्टरांच्या वतीने रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी ,रक्त तपासणी करण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावत वडिलांना श्रद्धांजली अर्पण करत उपक्रमाचे कौतुक केले.

ज्येष्ठ समाजसेवक माजी आरोग्य सभापती तथा वनसंरक्षक अधिकारी स्वर्गीय हरिभाऊ मोरे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन अर्थ फाउंडेशन द्वारा केले होते. याप्रसंगी मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटक सन्माननीय वामनरावजी चटप साहेब माजी आमदार तथा शेतकरी नेते यांनी कार्यक्रमाचे उद्घाटन केले .

तथा स्वर्गीय हरिभाऊ मोरे यांच्या पुतळ्याला मालारपण करून विनम्र आदरांजली दिली. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर अशोक कटारे (जिल्हा आरोग्य अधिकारी चंद्रपूर ) हे आवर्जून उपस्थित होते.

तर प्रमुख अतिथी मध्ये डॉक्टर स्वप्निल टेंभे तालुका आरोग्य अधिकारी कोरपना डॉ.आशिष बारबदे जिल्हा प्रोग्राम मॅनेजर टाटा कॅन्सर केअर फाउंडेशन चंद्रपूर , डॉ.सुशील भोगावार न्यूरोसर्जन , डॉ.राधिका भोगाववार स्त्री रोग तज्ञ, डॉ. सुहास बेन्दले जनरल फिजिशियन , डॉ.स्नेहा बेन्दले दंतरोग तज्ञ , डॉ.तुषार भागवत बालरोग तज्ञ , डॉक्टर ट्विंकल डेंगळे दन्त रोग तज्ञ , प्राचार्य काळे, प्रा दुधगवळी , अंकुश काकडे , दत्तराज गायकवाड , महेश देवकते , अर्थ फाउंडेशनचे संचालक डॉक्टर कुलभूषण मोरे , डॉक्टर नंदिनी मोरे ,श्रीमती शशिकला मोरे , मनीषा मोरे , आँचल निकाळजे , समाधान निकाळजे एडवोकेट संतोष गायकवाड अनिकेत दुर्गे , शैलेश लोखंडे , सोयाम सर हे उपस्थित होते .

कार्यक्रमाच्या उद्घाटनपर मार्गदर्शनात एड. वामनराव चटप साहेबांनी स्व हरिभाऊ मोरे साहेबांच्या सामाजिक तथा राजकीय कार्याचा उल्लेख केला तसेच डॉ कुलभूषण मोरे हे आपल्या वडिलांचा सामाजिक कार्याचा वारसा सक्षम पने पुढे नेत आहेत आणि या आरोग्य शिबिराच्या उपक्रमाचे कौतुक केले. डॉ अशोक कटारे (जिल्हा आरोग्य अधिकारी) यानी आपल्या मार्गदर्शनात विविध आरोग्य योजनाची माहिती दिली व डॉ मोरे हे अर्थ फाउंडेशन च्या माध्यमातून करत असलेल कार्य उल्लेखनीय आहे असे प्रतिपादन केले.

सूत्रसंचालन अनिकेत दुर्गे यानी केले तर आभार प्रदर्शन गणेश ढगे यानी केले. या आरोग्य शिबिरात जीवति व कोरपना तालुक्यातील दुर्गम भागातील।विविध आजाराच्या 600 च्या वर रुग्नानी मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतला . यात मोफत रक्त तपासणी तथा मोफत औषधि देण्यात आली आणि गंभीर आजार असलेल्या रुग्नाना संदर्भित करण्यात आले .

टाटा ट्रस्ट तर्फे विविध कर्करोग निदान करण्यात आले. बालरोग तदन्य डॉ तुषार भागवत यानी कुपोषित बालकांची मोफत आरोग्य तपासणी करून योग्य पोषण आहार बद्दल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता अर्थ फाउंडेशन चे विविध गावातील आरोग्य दूत यांनी अथक परिश्रम घेतले .

https://www.suryamarathinews.com/cotton/

यामधे साहिल धोटे (तालुका आरोग्यदूत) गणेश ढगे (जिल्हा कोर्डिनेटर) तिलक पाटील ,साईनाथ मोरे, अक्षय सूर्यवंशी ,शुभम खंडाळे, सोमेश्वर भजभुजे , नामदेव नागोसे , दत्ता पेंदोर, शत्रुघन मोरे फार्मासिस्ट , नम्रता मडावी , वैभव यानी परिश्रम घेतले.

Cotton | कापूस 65 ₹ व बकरा मटण ₹600 किलो म्हणून शेतीपूरक व्यवसाय करावा – दिपक साळवे,अंबुजा सिमेंट फाउंडेशन

0

 

कृष्णा चव्हाण चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
====================

जिवती – तालुक्यात मागील बऱ्याच वर्षांपासून अंबुजा सिमेंट फाउंडेशन शेतकऱ्यांसाठी वरदान म्हणून काम करत आहे.त्यात शेतकऱ्यांना कापसाचे उत्पादन वाढले पाहिजे आणि निसर्ग,मानवाचे आरोग्य यावर विपरीत परिणाम होऊ नये.म्हणून बीसी अंतर्गत कापसावर काम सुरू आहे.या अंतर्गत बंधारा गाळ काढून तो शेतात पसरवणे,टेरेस, शेत तळे, अशा विविध प्रकारचे काम सुरू असताना शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले पाहिजे.

यासाठी शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय करावे कारण कापसाच्या उत्पादनावर न राहता त्यांनी बकरी पालन केले पाहिजे मात्र शेतकऱ्यांच्या या व्यवसायात आरोग्यविषयक अडचणी येऊ नयेत म्हणून पशू सखी ना प्रशिक्षित करणे हा हेतू ठेऊन तालुक्याच्या कार्यालयावर दोन दिवस पशू सखी प्रशिक्षण देण्यात आले.

https://www.suryamarathinews.com/buldhana-crime/

त्यावेळी झालेल्या प्रशिक्षण भेटी दरम्यान सांगितले की कापूस हा सरासरी 65-70 रुपये किलो ने विकतो मात्र बकरा मटण हे 600₹ किलो ने विकले जाते त्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय केले पाहिजे.यावेळी उमेद चे बि एम एम दुधे व गायकवाड उपस्थित होते.

यात बकरीचे आजार,लसीकरण,घ्यायची काळजी आदी विषयावर प्रशिक्षण देण्यात आले.यावेळी प्रशिक्षक म्हणून अश्विनी विश्रोजवार ,कल्पना मडावी,कांता मडावी उपस्थित होते.तर प्रशिक्षणात तालुक्यातील पशू सखी उपस्थित होते.

Cotton

Buldhana Crime : मतिमंद मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीला न्यायालयाने चार वर्षे सश्रम कारावास

0

 

 

Buldhana Crime : मतिमंद मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीला न्यायालयाने चार वर्षे सश्रम कारावास

बुलडाणा – येथील मतिमंद मुलीच्या विनयभंग प्रकरणी आरोपीला न्यायालयाने चार वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. व बुलडाणा येथील जिल्हा सत्र न्यायाधीश आर. एन. मेहरे यांनी हा निकाल दिले आहे.

अधीकृत माहिती तुन बुलडाणा जिल्हातील पळसखेड येथील एका मतिमंद मुलगी तिच्या आईसोबत राहत होती. अचानक नातेवाईक मरण पावल्याने आईला बाहेरगावी जावे लागले. व त्यावेळी मतिमंद पीडीता मुलगी ही घरी एकटीच राहत होती.

परंतु ती पायवाटेने बाहेर जात असताना गावातील नितीन प्रेमसिंग राठोड हा तिच्या मागे मागे गेला व अचानक पणे तिचा हात धरून तिला नेऊ लागला. यावेळी तिने आरोपीला झटका देऊन ती त्या ठिकाण वरून पळून आली. व पिडीतेने घडलेली घटना तिच्या नातेवाईक व काकूला सांगितली व दुसऱ्या दिवशी आई परत आल्यानंतर आईजवळ संपूर्ण माहिती सांगितली.

यावरून मुलीच्या आईने 3 ऑगस्ट 2020 रोजी बुलडाणा ग्रामीण पोलिसात तक्रार दाखल केली होती. परंतु पोलिसांनी यावेळी पोक्सो कायद्यानुसार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केले.

या संपूर्ण प्रकरणात पोलीस उपनिरीक्षक सुनील रामराव दौड यांनी आरोपी विरुद्ध पुरावा आढळल्याने दोषारोपपत्र बुलडाणा जिल्ह्यात दाखल केले. सदर प्रकरण विशेष सरकारी वकील संतोष खत्री यांच्याकडे सरकार पक्षाची बाजू मांडण्यासाठी सोपविण्यात आले त्यानंतर.

या संपूर्ण प्रकरणांमध्ये सात साक्षीदार तपासण्यात आले. व सदर मुलगी मतिमंद असल्याची जाणीव पूर्वक आरोपीला असतानाही त्याने तिचा सोबत विनयभंग केला.

https://www.suryamarathinews.com/reservation/

 

ही बाब न्यायालयाला पटवून दिली व साक्षीपुरावांच्या आधारे गुन्हा सिद्ध होत असल्याने न्यायाधीशांनी उपरोक्त निकाल दिला. परंतु या प्रकरणात सरकार पक्षातर्फे अँड संतोष खत्री यांनी काम पाहिले व कोर्ट पैरवी पोलीस हेड कॉन्स्टेबल बोरकर व बंगाळे यांनी त्यांना सहकार्य केले. Crimenews

जिवती येथे आदिवासी नेते स्व. गोदरू पाटील जूमनाके यांच्या तृतीय स्मृती दिनाप्रित्यर्थ पुतळ्याचे अनावरण

0

 

कृष्णा चव्हाण चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी

जिवती या दुर्गम आदिवासी तालुक्यातील आदिवासी नेते स्व.गोदरू पा.जुमनाके यांच्या तृतीय पुण्यतिथी प्रित्यर्थ जिवती येथे गोंडवाना आदिवासी शिक्षण संस्थेचे प्रंगणात समाज प्रबोधन मेळावा व पुतळ्याचे अनावरण (दि.18 डिसेंबर) रोजी कारण्यात आले.

या कार्यक्रमाचे उद्घाटक माजी आमदार सुदर्शन निमकर, कार्यक्रमाचे अध्यक्ष करण पुगलीया, नगराध्यक्ष सौ.कविता आडे, प्रमुख अतिथी गोंडवाना गणतंत्र पार्टीचे तेलंगणा प्रदेशाध्यक्ष आरजू सीडाम, हरीशजी उईके, बँकेचे संचालक पांडुरंग जाधव, सामाजिक कार्यकर्ते आबीद अली, माजी जि.प.सदस्य शिवचंद्र काळे, कामगार नेते वसंत मांढरे, संचालक निशिकांत सोनकांबळे

, प्रा. संभाजी वारकड, वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रा. सोमाजी गोंडाणे, नगरसेविका श्रीमती सतलुबाई गोदरु पाटील जुमनाके, गोंडवाना संस्थेचे अध्यक्ष गजानन जुमनाके, सचिव बापूराव मडावी, विमाशीचे जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, प्रा.डॉ.प्रकाश वट्टी, प्रा.लक्ष्मण मंगाम, भीमराव पा.मडावी, प्रदिप बोबडे सह मान्यवर तथा हजारोच्या संख्येने समाज बांधव व जनसमुदाय तथा पाटलांचे हितचिंतक उपस्थित होते