Home Blog Page 150

गट साधन केंद्र चामोर्शीच्या वतीने समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत “दिव्यांग विद्यार्थ्यांसांठी समता सप्ताह” कार्यक्रम उत्साहात संपन्न.

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

चामोर्शी:-समग्र शिक्षा जिल्हा परिषद गडचिरोली, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली व गट साधन केंद्र चामोर्शीच्या संयुक्त विद्यमाने समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत दिव्यांग विद्यार्थ्यांसांठी गट साधन केंद्र चामोर्शीच्या वतीने जिल्हा परिषद नुतन शाळा चामोर्शी येथे शाळेतील सर्व विद्यार्थी, पालक,गट साधन केंद्र चामोर्शी येथील सर्व कर्मचारी यांच्या वतीने जागतिक दिव्यांग दिनाच्या पर्वावर दिनांक ३ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०२३ या कालावधीत समता सप्ताह कार्यक्रम साजरा करावयाचे असल्याने विशेष गरजा असणाऱ्या बालकांसाठी व पालकांसाठी जनजागृती करण्यासाठी चामोर्शी शहरात प्रभातफेरी काढण्यात आली.

सर्व विद्यार्थ्यांना शिकण्याची समान संधी, मानवी अधिकारात समान दृष्ट, भेदभाव विरहित वातावरण आणि सामाजिक संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी खेळीमेळीच्या वातावरणातून प्रेरणादायी ठरावे यासाठी परिसंवाद,चर्चासत्र,रांगोळी स्पर्धा,संगीत खुर्ची,क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गट साधन केंद्र चामोर्शीचे गट समन्वयक चांगदेव सोरते, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती नगराळे,सहायक शिक्षक प्रभाकर गजभिये,विजुधर मडावी, श्रीमती उराडे, विषय साधनव्यक्ती घनश्याम वांढरे, विवेक केमेकर, विशेषतज्ञ सुशिल गजघाटे,विशेष शिक्षक श्रीमती मेघा कोहपरे,कु रिता चव्हाण,दशरथ गहाणे,रवी खेवले,जीवन शेट्टे,उमेश पोहाणे,हिमदेव पिपरे व इतर कर्मचारी यांनी सहकार्य केले.

farmer / शेतकऱ्याने दहा एकरातील हरभाऱ्यावर फिरवला रोटावेटर! अवकाळीने पिकच उध्वस्त केल्याने उचलले टोकाचे पाऊल

0

 

बुलढाणा: वादळी वारे व गारपीट सह झालेल्या अवकाळी पावसाने तब्बल १० एकरावर पेरलेल्या हरभरा पिकाला उद्धवस्त केले. डोळ्यादेखत पिकाचा चिखल अन हिरव्या स्वप्नांचा चुराडा झाल्याने अखेर हतबल शेतकऱ्याने पिकावर रोटावेटर फिरविला आहे.
बुलढाणा तालुक्यातील चिखला येथे आज रविवारी संध्याकाळी हा धक्कादायक घटनाक्रम घडला.

जमिनीतील पिकावर नव्हे तर आमच्या हृदयावरच ट्रॅक्टर फिरल्याची भावना झाल्याचे हरिदास खांडेभराड या शेतकऱ्याने मोबाईल वरून बोलताना सांगितले.

शेतकऱ्यांवरील संकट कमी होण्याऐवजी उलट वाढतांना दिसत आहे. अस्मानी सह सुलतानीने शेतकरी पुरता हताश होताना दिसत आहे. अशातच खरीप पिक हातातून निघून गेल्यानंतर आता अवकाळी पाऊस आणि वातावरणात झालेल्या बदलामुळे रब्बी पिकावर देखील विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे हरिदास भाऊंनी हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी आपल्या दहा एकर हरभरा पिकावर रोटावेटर फिरवला आहे.

हरिदास खांडेभराड यांच्याकडे १४ एकर जमीन आहे. त्यांनी खरीपामध्ये सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र उत्पन्नात मोठी घट झाल्याने त्यांचा जेमतेम खर्च निघाला. त्यांना आता रब्बी पिकांवर मोठी आशा होते त्यामुळे त्यांनी आपल्या दहा एकर शेतात जास्त उत्पन्न देणाऱ्या डॉलर जातीच्या हरभरा पिकाची लागवड केली. त्याला जवळपास पावणेदोन लाख रुपये खर्च आला.

https://www.suryamarathinews.com/bjpnews/

मात्र अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणामुळे पिकावर बुरशी दह्या रोग आणि अळीचा प्रादुर्भाव झाल्याने त्यांचे उभे पीक जळत आहे. त्यामुळे छातीवर दगड ठेवून या संपूर्ण दहा एकरातील हरभरा पिकात रोटावेटर घालून पीक उध्वस्त केले आहे. खांडेभराड यांच्यावर विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे साडेतीन लाख रुपये व खाजगी पतसंस्थेचे दोन लाख रुपयांचे कर्ज आहे. रब्बीमधील पावणेदोन लाख रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. त्यामुळे आता बँकेचे कर्ज कसे फेडायचे असा यक्ष प्रश्न त्यांना पडला आहे. शासनाने भरीव मदत करण्याची मागणी त्यांनी केली आहे…

farmer

BULDHANA /भाजपाच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत शिस्त पाळण न केल्याने सहा पदाधिकार्याना 6 वर्षासाठी पक्षातून केले निलंबीत…

0

 

BULDHANA /भाजपाच्या दोन गटात झालेल्या हाणामारीत शिस्त पाळण न केल्याने सहा पदाधिकार्याना 6 वर्षासाठी पक्षातून केले निलंबीत…

मेहकर भाजपमध्ये झालेल्या राड्याप्रकरणी भाजपच्या ६ पदाधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटें यांनी तडकाफडकी ही कारवाई केली आहे.

शिव ठाकरे, प्रल्हाद अण्णा लष्कर, अक्षत दीक्षित, चंदन आडलेकर, रोहित सोळंके, विकास लष्कर यांचे भाजपातून ६ वर्षांसाठी निलंबन करण्यात आले आहे. पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

मेहकरात तालुकाध्यक्ष निवडीवरून दोन गटात आज दुपारी राडा झाला. जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद लष्कर यांच्या गटाने नवनियुक्त तालुकाध्यक्ष सारंग माळेकर, विधानसभा संपर्क प्रमुख प्रकाश गवई, जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनराव वानखेडे भाजपा कार्यालयात उपस्थित असताना त्यांच्यावर हल्ला चढवला.

यात तिघांचे डोके फुटले होते. माध्यमांत या बातम्या प्रसारित झाल्यानंतर आता भाजपने कठोर पावले उचलली आहेत. ६ पदाधिकाऱ्यांचे भाजप जिल्हाध्यक्ष डॉ मांटे यांनी निलंबन केले आहे.. Bjp

महाराष्ट्रात पत्रकार, पोलिस व सफाई कामगार यांची आरोग्य तपासणी शिबिर राबविणारा वडवणी हा पहिला तालुका आहे – एस.एम.देशमुख.

0

 

वडवणीत मराठी पत्रकार परिषद वर्धापन दिनानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

वडवणी :- मराठी पत्रकार परिषदेचे वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण महाराष्ट्रात आज 3 डिसेंबर रोजी पत्रकारांची आरोग्य तपासणी शिबिर राबविले जाते परंतु पत्रकार, पोलिस व सफाई कामगार यांचे आरोग्य तपासणी शिबिर राबविणारा वडवणी तालुका हा संपूर्ण महाराष्ट्रात पहिला तालुका आहे असे मराठी पत्रकार परिषद वडवणी तालुक्याच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मयुरेश्वर हॉस्पिटल येथील आरोग्य तपासणी शिबिराच्या वेळी बोलताना मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी सांगितले.

मराठी पत्रकार परिषदेचे वर्धापन दिनानिमित्त 3 डिसेंबर रविवार रोजी वडवणी शहरातील डॉ.विजयकुमार निपटे यांच्या मयुरेश्वर हॉस्पिटल येथे पत्रकार,पोलीस कर्मचारी व नगरपंचायत कर्मचारी,सफाई कामगार यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी या कार्यक्रमाचे उद्घाटन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष शेषेराव जगताप, सहायक पोलिस निरीक्षक अमन सिरसट, डॉ विजय कुमार निपटे,तर प्रमुख उपस्थिती म्हणून डॉ.दिनकर बोंगाने, डॉ.जगदिश टकले, राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे, जेष्ठ पत्रकार सुभाषराव वाव्हळ,प्राचार्य धुराजी राऊत, समाजसेवक युवराज शिंदे यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

प्रथम बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांनी व्यक्त केले.तसेच सामाजिक कार्यकर्ते युवराज शिंदे,डॉ विजयकुमार निपटे यांनी हि आपले मनोगत व्यक्त केले.यावेळी बोलताना सपोनि अमन सिरसट म्हणाले की मराठी पत्रकार परिषद वडवणी तालुका यांच्या वतीने आज आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार, पोलिस कर्मचारी, नगर पंचायत कर्मचारी यांच्या आरोग्य तपासणी शिबिराचा कार्यक्रम हा अत्यंत चांगला व कौतुकास्पद असून त्यांच्या या कार्याला आमच्या शुभेच्छा असल्याचे सांगितले.

त्याचबरोबर नगराध्यक्ष शेषेराव जगताप म्हणाले की पत्रकार हा समाजाचा आरसा असुन पत्रकार यांनी समाजातील चांगले कामाचे बातमीचे माध्यमातून कौतुक करावे व समाजात घडणाऱ्या वाईट घटना या समाजापुढे लेखणीतून मांडुन नागरिकांना न्याय मिळवून देण्याचे प्रमाणिकपणे काम करावे तसेच विकास कामांसाठी सहकार्य करावे व ज्या ठिकाणी भष्टाचार होत असेल त्याठिकाणी लेखणीतून आवाज उठवावा तसेच मराठी पत्रकार परिषद वडवणी तालुक्याच्या वतीने जो आरोग्य तपासणी शिबिराचा कार्यक्रम घेण्यात आला तो अत्यंत चांगला आहे.तसेच मराठी पत्रकार परिषद मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, पत्रकार संरक्षण कायदा असेल किंवा इतर पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी आयुष्य घातले आहे. मराठी पत्रकार परिषद हि सन 1939 साली स्थापन झालेली देशातील मराठी पत्रकारांची पहिली संघटना आहे व यामध्ये गेल्या 10 वर्षांपासून पत्रकार आरोग्य तपासणी शिबिर हे 3 डिसेंबर संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त संपूर्ण 354 तालुका व 36 जिल्ह्यात राबविले जाते.

यामध्ये गेल्या वर्षी 7 हजार पत्रकारांची एकाच दिवशी आरोग्य तपासणी शिबिरातुन करण्यात आली होती. यावर्षी 10 हजार पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवलेले आहे. पत्रकार हा समाजासाठी सदैव रस्त्यावर असतो व तो या धकाधकीच्या जीवनात आपल्या आरोग्याची हि काळजी घेत नाही. पत्रकारांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आम्ही परिषदेच्या माध्यमातून अशा शिबिरांचे आयोजन करत असतो.

तसेच मोठ्या आजाराच्या उपचारासाठी हि संघटनेचे माध्यमातून आर्थिक मदत व्हावी यासाठी आम्ही नियोजन करत आहोत. सरकार पत्रकारांच्या वैद्यकीय उपचारांसाठी 2 लाख रुपये आर्थिक मदत करते परंतु ते मिळण्यासाठी पत्रकार यांना अडचणी येतात त्यामुळे सरकारवर अवलंबून न राहता संघटनेचे माध्यमातून पत्रकारांचा विमा काढणे तसेच आर्थिक 50 हजार रुपये पर्यंत मदत करण्याचा आमचा मानस आहे.असे ते म्हणाले.यावेळी या आरोग्य तपासणी शिबिर कार्यक्रमात उपस्थित पत्रकार, पोलिस कर्मचारी, नगर पंचायत कर्मचारी यांची डॉ विजय कुमार निपटे, डॉ.बोंगाने , डॉ.जगदिश टकले यांनी मशिन व्दारे आरोग्य तपासणी केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मराठी पत्रकार परिषदेचे अनिल वाघमारे, वडवणी तालुका अध्यक्ष अँड विनायक जाधव, माजी तालुकाध्यक्ष सुधाकर पोटभरे, सचिव सतिष सोनवणे, कोषाध्यक्ष शांतिनाथ जैन, पत्रकार धम्मपाल डावरे,संपादक ओमप्रकाश साबळे, पत्रकार अर्जुन मुंडे, पत्रकार महेश सदरे, पत्रकार हरिभाऊ पवार, पत्रकार शंकर झाडे, पत्रकार सतिष मुजमुले,पत्रकार वाजेद पठाण, पत्रकार अतुल जाधव, पत्रकार संभाजी लांडे, पत्रकार गीतांजली लव्हाळे मॅडम इत्यादींनी परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अँड विनायक जाधव यांनी तर आभार प्रदर्शन पत्रकार सतिष सोनवणे यांनी मानले. या कार्यक्रमाला पत्रकार, पोलिस कर्मचारी नगर पंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री.गाडगे महाराज गोरक्षण संस्था मुर्तिजापुर येथे काकड आरती समाप्ती सोहळा

0

 

गोरगरीब कुष्ठरोगी दिव्यांग वृध्दमायबापांचे अभ्यंगस्नान,अन्नदान व वस्त्रदान

प्रतिनिधी/मूर्तिजापूर
शाम वाळस्कर

अखिल विश्वाला दशसुत्रीच्या माध्यमातून महानतेचा संदेश देणारे, कर्मयोगी संत गाडगेबाबा यांच्या पदस्पर्शाने पावन पुण्यभूमी असलेल्या,श्री गाडगे महाराज गोरक्षण संस्था मुर्तिजापुर येथे,गेल्या ४५ वर्षापासुन कोजागिरी पोर्णीमा ते कार्तीक पोर्णिमा पर्यंत संत गाडगेबाबांच्या विचारांना अभिप्रेत सेवाभावी काकड आरतीचे संस्थेचे सर्वेसर्वा तथा नागरवाडी इंद्रभुवनाचे शिल्पकार,बापुसाहेब देशमुख यांच्या प्रमुख मार्गदर्शनात संचालक सागर देशमुख यांच्या वतीने विशेष आयोजन करण्यात येते.

प्रामुख्याने गाडगेबाबांच्या विचारांचा वारसा जोपासत सन १९७८ पासुन गोरक्षण संस्थेत स्व.डॉ.वासुदेवराव भुगूल यांच्या प्रेरणेतून आजतागयात सेवाव्रती बापुसाहेब देशमुख यांच्या पुढाकारातून भजन-किर्तन-हरीनाम व जनता-जनार्दनाच्या सेवेचेकार्य काकड आरतीतून अविरतपणे सुरु आहे.दरम्यान संस्थेतर्फे पंचक्रोशीतील गोरगरीब दिव्यांग कुष्ठरोगी बाधवांचे सुंदर सुवासिक उटने लावून अभ्यंगस्नान घालून औक्षवण करत त्यांना नविन वस्त्र परिधान करत,मान्यवरांच्या हस्ते उबदार ब्लॅंकेट,महिलांना साड्या,टॉवेल,आदिंचे वितरण करत त्यांना सुंदर मिष्ठान्नाचे भोजन यावेळी देण्यात आले.

विशेषत: या सेवाभावी सोहळ्याकरीता आ.हरिषजी पिंपळे,दानवीर नितीन दळवी,प्रसिध्द दुग्ध व्यावसायिक प्रशांत हजारी,अशोक बठेजा,सच्चीदानंद मालाणी,सौरभ मालाणी,कमल कटलरीचे संचालक अग्रवाल शेठ,संचालक कुणाल देशमुख,आदि दानशुर मंडळींचे मोलाचे सहकार्य लाभले.समाप्ती सोहळ्याला सेवाव्रती बापुसाहेब देशमुख यांच्या मार्गदर्शनात भव्य मिरवणुकीचे आयोजन करत संपुर्ण गोरक्षण नगरीत ‟गोपाला गोपाला देवकी नंदन गोपालाचा” गजर करण्यात आला.यानंतर काकड आरतीत महिनाभर सातत्याने सेवा देणाऱ्या सेवकांना सुंदर उबदार ब्लॅंकेट,शर्ट पीस,टॉवेल,मिठाई सह जिवनावश्यक साहित्याचे दानशुर नितीन दळवी यांच्या हस्ते वितरण करण्यात आले. तद्नंतर काकड आरतीच्या स्वागताकरीता गोरक्षणातील महिलांनी व मुलींनी आकर्षक अशा संदेशात्मक रांगोळ्या व दीपोत्सव साकारणाऱ्या मुलींना संस्थेतर्फे रोख पारितोषीक रक्कम देवून त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

प्रामुख्याने या कार्यक्रमाला आ.हरीषजी पिंपळे, आ.बळवंतराव वानखडे,समाजसेवी बबनराव दाभेराव,कमलाकर गावंडे,प्रशांत हजारी,अशोक बठेजा,संचालक गजानन देशमुख,व्यवस्थापक प्रशांत देशमुख,संचालक कुणाल देशमुख,ह.भ.प.सर्जेराव देशमुख,व्यवस्थापक प्रकाश महात्मे,सुखदेवशेठ भुतडा,प्रविण देशमुख,प्रा.रवीराज देशमुख, मुख्याध्यापक भुगूल,गजानन जवंजाळ, ऋणमोचन संस्थेचे विश्वस्त शरद पाटील, दिनेश पाटील आदिंसह श्री बाबांची भक्तमंडळी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थीत होते.सरतेशेवटी संचालक सागर देशमुख यांनी आनंदमय सोहळ्याला उपस्थीत सर्व मान्यवर तसेच दानशुर मंडळी, विशेषत: पहाटे दररोज काकड आरतीमधील सहभागी भाविकांचे मोठ्या उत्साहात स्वागत व अल्पोपहार देणाऱ्या मंडळींचे त्यांनी यावेळी आभार मानले.या सेवाभावी काकड आरतीच्या यशस्वीतेकरीता सागर देशमुख यांच्यासह मुर्तिजापुर व नागरवाडी येथील सेवकांनी विशेष परिश्रम घेतले. Murtijapurnews

Yaval /यावल तालुका भाजपा दिव्यांग आघाडी तर्फे दिव्यांग बचत गट अभियान राबवीणार अरुण पाटील

0

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

यावल = ३ डिसेंबर जागतीक दिव्यांग दिना निमित्ताने यावल तालुका भाजपा दिव्यांग आघाडी तर्फे प्रथम यावल तालुका कार्यक्षेत्रातील गावनिहाय बुथ वर किमान ५ दिव्यांगाचे बचत गट स्थापन करण्याचा निर्धार भाजपा दिव्यांग आघाडीचे तालुका अध्यक्ष श्री अरुण पाटील यांनी केलेला आहे जिल्हा परिषद समाज कल्याण दिव्यांग विभांग शासन जिर ५ % निधी अंतर्गत दिव्यांग बांधवासाठी १) वैयक्तीक योजना = ३५ असुन २) सामुहीक योजना = २५ अश्या ६० योजना राबवील्या जात असल्याचे नमुद आहे पण या सर्वच योजनाचा लाभ दिव्यांगा पर्यत पोहचत नसल्याची खंत श्री अरुण पाटील यांनी व्याक्त केलेली आहे.

पण या योजना पैकी दिव्यांग बांधवा साठी बचत गट तयार करून त्यांना त्वरीत अर्थसहाय्य उपलब्ध करून त्यांना आत्मनिर्भर बनविणे ही सामुहीक योजने चा भाग असुन याकडे विशेष लक्ष देण्यासाठी अगोदर सुरुवातीस सर्वप्रथम यावल तालुक्यातील भाजपाच्या सर्व बुथ केंद्रांवर बुथ अध्यक्ष व बुथ वरील सदस्य समीती यांना सोबत घेऊन गावनिहाय प्रत्येक बुथ केद्रावर किमान ५ दिव्यांगाचा बचत गट तयार करून त्यांना त्वरीत अर्थसहाय्य उपलब्ध करून देणे कामी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे अश्वासन श्री अरुण पाटील यांनी दिले आहे.

याबरोबरच दिव्यांग बाधवाना जि प समाज कल्याण दिव्यांग विभाग मार्फत वैयक्तीक बिजभांडवल साठी २०% सबसीडी नुसार दिड लाख रु पर्यतचे कर्ज तसेच विविध साहित्य उद: शिलाई मशीन इ चे वाटप तसेच दिव्यांग महामंडळ मुंबई मार्फत १ ते ५ लाखा पर्यतचे थेट योजने अंतर्गत कर्ज यासह विविध योजनाचा लाभ बचतगटाच्या माध्यमातुन दिव्यग बांधवाना देऊन त्यांना स्वताच्या पायावर उभे करून आत्मनिर्भर बनवण्याचा सकल्प असुन अधिक माहीती साठी प्रत्यक्ष पणे किंवा मो नं 9767372017 या फोनवर सपर्क साधावा असेही अवाहन श्री भाजपा दिव्यांग आघाडी तालुका अध्यक्ष श्री अरुण पाटील यांनी केलेल आहे.

या कामी प्रामुख्याने मा ना श्रीयुत गिरीश भाऊ महाजन (ग्रामविकास मंत्री म राज्य मुंबई ) मा श्री अमोल भाऊ जावळे ( जिल्ह अध्यक्ष रावेर लोकसभा ) मा खा श्रीमती रक्षाताई खडसे ( खासदार रावेर लोकसभा ) मा श्री राजुमामा भोळे ( भाजपा आमदार जळगांव ) मा श्री हिरालाल भाऊ चौधरी / मा श्री शरद भाऊ महाजन ( भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ) मा श्री उमेश भाऊ फेगडे ( भाजपा यावल तालुका अध्यक्ष ) मा श्री विलास भाऊ चौधरी ( तालुका सरचिटणीस ) मा श्री उजैन भाऊ राजपुत ( तालुका सरचिटणीस ) मा श्री हर्षेल पाटील ( सभापती मार्केट कमेटी यावल ) मा श्री रविद्र पाटील ( जिं प सदस्य ) मा सौ सविता भालेराव ( जि प सदस्या ) मा सौ पल्लवी ताई चौधरी प स सदस्या यावल ) या सर्वाचे अनमोल अस माहीती व मार्गदर्शन मिळणार आहे Yavalnews

Krushi Yojana 2023 / विहिरीसाठी चार लाख तर,फळबागसाठी दोन लाख अनुदान असं करावे ऑनलाईन अर्ज

0

 

 

अहमदनगर जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी सिंचन विहिरी व फळबाग साठी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी केले आहे तर या योजनाच सर्व शेतकरीने लाभ घ्यावं.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पंचायत समितीच्या माध्यमातून सिंचन विहीर आणि फळबाग योजनेचा लाभ शेतकऱ्यांना दिला जातो. तर या लाभ साठी त्वरित अर्ज करावे.

या सिंचन विहिरीसाठी चार लाख रुपये तर फळबागेसाठी दीड ते दोन लाख रुपये असं अनुदान दिले जाते.

यापूर्वी पण या शेतकऱ्यांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागत असे. पण आता यामध्ये वेळेचा अपव्यय होत असे. तसेच आपला अर्ज कोणत्या स्तरावर प्रलंबित आहे याची माहिती लाभार्थ्यांना मिळत नसे. तर त्यामुळे शासनाने सिंचन विहीर व फळबाग योजनेचे अर्ज करण्यासाठी शासनाने एक अॅप तयार करण्यात आले आहे.

तर या अॅप च्या माध्यमातून लाभार्थ्यांना घरबसल्या ऑनलाइन अर्ज करून योजनेचा लाभ घेता येणार आहे. या अॅपच्या माध्यमातून ऑनलाईन पद्धतीने मोबाईलवरून अर्ज करता येणार असून

तर या कमी वेळात अर्जपंचायत समितीकडे दाखल होणार आहे. ऑनलाईन अर्जावर तात्काळ कार्यवाही केली जाणार असून, अर्जाची सद्यस्थिती लाभार्थ्यांला समजणार असल्याची माहिती गटविकास अधिकारी पोळ यांनी दिली आहे. अधिक माहिती साठी भेट द्यावे..  Krushi Yojana 2023

प्रधानमंत्री पीक विमा योजने अंतर्गत १ रुपयात काढण्यात आलेल्या पीक विम्याने केली शेतकऱ्यांची फसवणूक ?

0

 

परिवर्तन जनसंवाद यात्रे दरम्यान अनेक शेतकऱ्यांनी अतुल वांदिले यांच्या कडे मांडली समस्या…

वर्धा जिल्हयात अडीच लांखा पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी काढला पीक विमा…

राष्ट्रवादीचे अतुल वांदिले यांनी परिवर्तन जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून १३ दिवसात ११३ गावांना दिली भेट …

हिंगणघाट :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी हिंगणघाट, समुद्रपूर, सिंदी रेल्वे विधानसभा क्षेत्रात परिवर्तन जनसवांद यात्रा काढली असून या यात्रेने १३ दिवसात १३ गावांना भेटी दिल्या.

परिवर्तन यात्रे दरम्यान शेतकऱ्याचा भेटी घेत असताना शेतकऱ्यांची मूळ समस्या लक्षात आली ती म्हणजे शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत एक रुपया मध्ये पीक विमा काढला असून त्यांचा लाभ अजून पर्यंत शेतकऱ्यांना मिळाला नाही राष्ट्रवादीचे अतुल वांदिले यांनी परिवर्तन जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्याशी संवाद साधत त्यांची समस्या जाणून घेतली.

परिवर्तन जनसंवाद यात्रा मागील तेरा दिवसामध्ये पोहणा, शेकापूर(बाई), पिपरी, वडणेर, बुरकोनी, फुकटा, वाघोली, आजंती,सावली, नांदगाव, नंदोरी, सावंगी झाडे, समुद्रपूर सर्कल मधील एकशे तेरा गावामध्ये भेटी झाल्या असून मुख्यत्वे शेतकरी,मजूरवर्ग ,युवावर्ग याच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा संकल्प या यात्रेतून होत आहे. शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत एक रुपयामध्ये पीक विमा काढला आहे.जिल्ह्यात एकूण अडीच लाखापेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे.

परंतु त्या पीक विमाचा लाभ आता पर्यंत अनेक शेतकऱ्यांना मिळाला नसून अनेक शेतकरी पीक विम्याच्या लाभापासून वंचित असून शेतकरी सरकार बाबत रोष व्यक्त करत आहे.

शेतकऱ्यांच्या भावना समजण्यासाठी त्यांच्या व्यथा ऐकण्यासाठी व त्या मार्गी लावण्यासाठी कुणी तरी आपल्यापर्यत येत आहे ,आपल्या घरपर्यत पोहचत आहे त्यामुळे शेतकरी सुखावला असून गावोगावी मोठया उत्साहाने ,आनंदाने परिवर्तन यात्रेचे स्वागत करताना दिसून येत असून शेकडो शेतकरी स्वंयप्रेरणेने उत्स्फूर्तपणे या यात्रेमध्ये सहभागी होत आहे

Rohinitai khadse /महिला प्रदेशाध्यक्षा रोहिनीताई खडसे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

0

 

प्रतिनिधी/मूर्तिजापूर
शाम वाळस्कर

वाढदिवसाला “बुके नको, बुक द्या” या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा आ. रोहिनीताई खडसे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत त्यांचा वाढदिवस जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समशेरपूर ता. मूर्तिजापूर येथील विध्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून व मिठाई भरवत उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी गीत गाऊन रोहिनीताई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

अकोला जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस महीला आघाडी जिल्हाध्यक्ष सुषमा जयकिरण कावरे यांच्यातर्फे स्थानिक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा समशेरपूर ता. मुर्तिजापूर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात शाळेतील बाळगोपाल,शिक्षकवृंद,गावकरी महिला भगिनी, महिला आघाडीच्या व पक्षाच्या विविध नेते व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत

उत्साहात साजरा करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समशेरपूर गावच्या सरपंच मीनाताई वानखडे तर प्रमुख उपस्थिती रामकृष्ण गावंडे, जिल्हा महासचिव आनंद वानखडे,जिल्हा उपाध्यक्ष शामराव वाहूरवाघ,सामाजिक न्याय महिला जिल्हाध्यक्ष कोकिळा वाहूरवाघ, महिला महासचिव मनीषा महल्ले,महिला जिल्हा सदस्य पवित्रा जाधव,मुर्तिजापूर महिला तालुकाध्यक्ष रंजना सदार,अकोला महिला ता.अध्यक्षा संगिता दाळू,महिला ता.उपाध्यक्ष अनिता शिंगनाथ गजानन वाकोडे, योगेश सोनोने, विध्यार्थी जिल्हाध्यक्ष अक्षय भगेवार, ओबीसी तालुकाध्यक्ष विष्णू लोडम, संजय वानखडे, अरविंदभाऊ आटोटे,विष्णु खोत,ग्रा.पं.सदस्य अनुराधा थोप,ज्योत्स्ना थोप यांची होती.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक प्रकाश रेवस्कर सर, इर्शाद खान सर, शिलाताई गावंडे यांचे विशेष सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक महिला जिल्हाध्यक्ष सौ सुषमा कावरे यांनी व सूत्र संचालन विष्णू लोडम यांनी आपल्या बहारदार शैलीत केले तर जिल्हाभरातील महिला पदाधिकाऱ्यांचे आयोजनाकरिता सहकार्य मिळाले.Rohinitai khadse

मेहकर जामगाव ले आऊट मध्ये ग्रीन झोन प्रतिबंध असुन ले- आऊट रोड व लाईन डेव्हलपमेंट नसुन त्या लोकांची फसवणूक व दिशाभुल..

0

 

बुलढाणा- मेहकर भाग-1 मध्ये गट नं 21/1 अ व जामगाव मध्ये गट नं. 37/- व 53, शासन नियमानुसार ले आउट झालेले नाही याबाबत मा. उपविभागीय अधिकारी साहेब यांना निवेदनाद्वारे या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आशी मागणी उपविभागीय अधिकारी मेहकर यांना करण्यात आली.

असता यावेळी उपविभागीय अधिकारी ह्यांनी NAP/34 बोगस करुन दिल्याबाबत हे सर्व गट 21/1- अ मेहकर भाग-1 जामगाव गट न. 37, व 53 मध्ये सुद्धा शासनाच्या अट व नियमानुसार ले आऊट झालेले नाही.

व त्या ले आऊट मध्ये ग्रीन झोन प्रतिबंध असुन ले- आऊट रोड व लाईन डेव्हलपमेंट नसुन त्या लोकांची फसवणूक व दिशाभुल करीत आहे. तरी ह्या सर्व प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी आशी मागणी तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. संदिप भाऊ गवई यानी केली आहे.