Home Blog Page 31

Devendrafadnvis / माझ्या वाढदिवसाच्या निमीत्ताने लावलेल्या संञाची फळ खाण्यास मी नक्की येईल मुख्यमंत्री देवाभाऊ यांचं आश्वासन

0

 

असं म्हणताच कार्यकर्त्यांच्या चेहर्यावर पाहायला मिळाले स्मितहाश्य

प्रतिनिधी सय्यद जहीर

Devendrafadnvis:लोणार तालुक्यातील युवा शेतकरी तथा भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष देवानंदजी सानप यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 2022 साली त्यांच्याच शेतात 700 संत्र्याच्या झाडांची लागवड केली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनातर्फे स्वागत ( Devendrafadnvis )

त्यावेळी बर्याच वर्तमान पत्रात बातमी प्रसिद्ध झाली होती
सदर वर्तमान पत्र घेऊन देवानंदजी सानप यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.देवेन्द्रजी फडणवीस यांना आठवण करून दिली की साहेब तुम्ही महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांना आवाहन केले होते.

की वाढदिवसानिमित्त बॅनर बाजी न करता सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करावा हे तुमचं वाक्य ऐकून मी पाच एकर क्षेत्रावर संत्रा लागवड केली होती आता आमच्या शेतात संञा खाण्यासाठी आमंञण देतोय असं म्हटल्यावर देवा भाऊंनी तात्काळ होकार दिला व मी तुमच्या शेतावर नक्की येईल असे अश्वस्त केले.

Devendrafadnvis:त्यामुळे सोबतच्या कार्यकर्त्यांनी आंनद व्यक्त केला यामुळे गोपाल काबरा, प्रविण धाईत,सागर मुर्तडकर,सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनातर्फे स्वागत ( Devendrafadnvis )

0

 

अनिलसिंग चव्हाण  (मुख्य संपादक )

बुलढाणा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज शुक्रवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास बुलढाणा शहरात आगमन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांचे जिल्हा प्रशासनातर्फे स्वागत करण्यात आले.Pratapraojadhav

FarmerNews / शिवरस्ता मोकळा करा अन्यथा आमरण उपोषण समाजसेविका सुनिता भांड

बुलढाणा येथे आज भारतीय जनता पार्टीच्यानियोजित जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन करण्यात आले. यानिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांचे आज बुलढाण्यात आगमन झाले.यावेळी कामगार मंत्री आकाश फुंडकर, भाजपचे नेते, पदाधिकारी, हजर होते.Devendrafadnvis

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचा सातबारा वैद्यकीय विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे समीर कुणावार (आमदार ) यांनी केला सुपूर्द (Sameerkumawar)

मुख्यमंत्री छत्रपती संभाजीनगर येथून हेलिकॉप्टर ने बुलढाण्यात आगमन झाले. बुलढाणा मलकापूर राज्य m
राज्य परिवहन महामंडळ कार्यशाळा, कऱ्हाळे ले आऊट येथे तयार करण्यात आलेल्या हेलिपॅड येथे आगमन झाले. यावेळी प्रशासनातर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.

Devendrafadnvis:याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आमदार चैनसुख संचेती, श्वेता महाले, संजय गायकवाड, विभागीय आयुक्त श्वेता सिंगल, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे उपस्थित होते.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचा सातबारा वैद्यकीय विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे समीर कुणावार (आमदार ) यांनी केला सुपूर्द (Sameerkumawar)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

हिंगणघाट :- मुंबई येथे आमदार समीर कुणावार यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांची भेट घेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जाम च्या जागेचा सातबारा त सुपूर्द केला.

FarmerNews / शिवरस्ता मोकळा करा अन्यथा आमरण उपोषण समाजसेविका सुनिता भांड

वैद्यकीय महाविद्यालयाची जाम येथील जागा हि कृषी विभागाकडून वैद्यकीय शिक्षण विभागाला हस्तांतरीत करण्याकरीता आमदार कुणावार यांचा शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता त्याचं अनुषंगाने मागील महिन्यात जाम येथील कृषी विभागाची जागा वैद्यकीय शिक्षण विभागाला हस्तांतरीत करण्याचा शासन निर्णय पारित झाला होता.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयचा सातबारा वैद्यकीय विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे समीर कुणावार (आमदार ) यांनी केला सुपूर्द (Sameerkumawar)

व मा.जिल्हाधिकारी वर्धा यांनी जागेचा फेरफार करून सदर जागा अधिष्ठाता वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट यांच्या नावाने करण्याबाबत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या सदर जागेची फेरफार नोंद झाली असून त्याची प्रत आज आमदार कुणावार यांनी वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे सुपूर्द केली आहे.

Sameerkumawar / शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जाम च्या निर्मितीचा मार्ग मोकळा झाला असून महत्वाचा आणि निर्णायक टप्पा पार पडला आहे आता लवकरच सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन वैद्यकीय महाविद्यालय निर्मितीचा मार्ग मोकळा होणार आहे अशी माहिती आमदार समीर कुणावार यांनी दिली आहे

FarmerNews / शिवरस्ता मोकळा करा अन्यथा आमरण उपोषण समाजसेविका सुनिता भांड

0

 

प्रतिनिधी सय्यद जहीर

FarmerNews:लोणार तहसील अंतर्गत बीबी व मांडवा या शिवरस्ता शंभर दिवसाच्या कृती आराखडा मधून रस्ता मोकळा करावा अन्यथा दिनांक 20 मे रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा त्यांच्या कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा येथील समाजसेविका सुनिता भांड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे देण्यात आला.

याबाबत सविस्तर माहिती असे की निवेदनात नमूद असे की मौजे बीबी आणि मांडवा येथील 20 ते 25 शेतकऱ्यासह वरिष्ठांना या शिव रस्ता व शिव सरळ करण्यासाठी निवेदना वर साक्ष दिले असून या निवेदनामध्ये मांडवा बीबी असा शिव रस्ता आहे हा रस्ता नागमोडी सारखा झालेला आहे.

तहसीलदारांवर शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी: वाळू माफियाची दादागिरी (revenue)

शासनाने नियमानुसार हा रस्ता 33 फूट रुंदीचा आहे परंतु त्या रस्त्यावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रम केल्यामुळे अवघा सात फुटाचा रस्ता शेतकऱ्यांच्या वहिवाटी साठी बाकी आहे शेतकरी गेल्या पन्नास वर्षापासून हा रस्ता शासनाच्या रेकॉर्डवर आहे तेवढा खुला करून घेण्यासाठी झटत आहेत.

परंतु काही शेतकरी याला विरोध करून वाद घडून आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि रस्ता खुला करण्यास अडथळा निर्माण करत आहे या अगोदर लोणार तहसील कार्यालय यांना शिव रस्ता खुला करून देण्यासाठी विनंती अर्ज सादर केला होता आमच्या अर्ज ची दखल घेऊन दिनांक नऊ चार 2025 रोजी आणि नऊ पाच 2025 रोजी तहसील कार्यालयाचे संबंधित सर्व अधिकारी शिव रस्त्यावर रस्ता खुल्ला व दुरुस्त करण्यासाठी आले होते.

परंतु भूमी अभिलेख चे संबंधित अधिकारी गैरहजर असल्यामुळे आम्हाला रस्ता खुल्ला करून देण्यात आला नाही कारण काहि शेतकऱ्यानी वाद घातल्यामुळे हा रस्ता खुल्ला करण्यासाठी भूमी अभिलेख आल्याशिवाय आम्ही काही करू शकत नाही असे तहसील व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले भूमी अभिलेख वाल्यांनी तहसील कार्यालयाचे दोन वेळेस पत्र व्यवहार करून सुद्धा जाणून बुजून हेतूपूर्वक भूमि अभिलेख कर्मचारी हजर राहिले नाही.

FarmerNews:परंतु या शंभर दिवसाच्या कृती आराखड्यामध्ये आम्हाला जर शिव रस्ता दिनांक 19 5 2025 पर्यंत खुला करून दिला नाही तर आम्ही दिनांक 20. 5. 2025 पासून जिल्हाधिकारी बुलढाणा येथे अमरन उपोषण करण्यात येईल असा इशारा सौ भांडताई यांनी वरिष्ठांना निवेदनद्वारे देण्यात आला प्रतिलिपी मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महसूल राज्यमंत्री महाराष्ट्र जिल्हाधिकारी बुलढाणा पोलीस अधीक्षक बुलढाणा व लोणार तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले

board exam result / सहकार विद्या मंदिर बीबी शाळेची 100% निकालाची परंपरा कायम

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

board exam result:एसएससी परीक्षा फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल 13 मे 2025 रोजी जाहीर झाला असून ही परीक्षा म्हणजेच शालेय जीवनाचा महत्त्वाचा टप्पा पार करून महाविद्यालयीन शिक्षणाकडे वाटचाल करण्याचा प्रारंभ आहे.

तहसीलदारांवर शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी: वाळू माफियाची दादागिरी (revenue)

यामध्ये बुलढाणा जिल्ह्याचा निकाल हा 95.62% लागला असून निकालाच्या बाबतीत जिल्हा तृतीय क्रमांकावर आहे त्याचप्रमाणे लोणार तालुक्यातील येणारे गाव बीबी येथील सहकार विद्या मंदिर वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकाचे मार्गदर्शन.सततचा सराव व परिश्रमाच्या जोरावर मागील काही वर्षापासून ची परंपरा कायम ठेवत याही वर्षी शंभर टक्के निकाल ठेवून जिल्हाभरात नाव चमकवले आहे.

 

शैक्षणिक सत्र 2024 25 मध्ये 109 विद्यार्थी परीक्षेला बसले होते 90% च्या वरती 18 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे त्यामध्ये तनुश्री हजबे,राज खंदारे यांनी 96% गुण मिळवून संयुक्त प्रथम क्रमांक मिळवला आहे द्वितीय क्रमांक सुवर्णा सोळंके 95.20% व तृतीय क्रमांक आकांक्षा देशमुख 94.20% घेऊन प्राविण्य मिळवले आहे.

board exam result:सहकार विद्या मंदिर बीबी शाळेचे यशाबद्दल सर्व स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे सहकार विद्या मंदिर बीबी शाळेची यश म्हणजे विद्यार्थ्यांची चिकाटी कर्मचारी वर्गाची मेहनत पालकांचा शाळेवरती असलेला विश्वास या त्रिसूत्रीचे फलित असल्याचे शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश इंगळे उपमुख्याध्यापक आर जी राठोड सर यांनी मत व्यक्त केले आहे

तहसीलदारांवर शिवीगाळ व जिवे मारण्याची धमकी: वाळू माफियाची दादागिरी (revenue)

0

 

 

अनिलसिंग चव्हाण (मुख्य संपादक )

वाळू माफियाला थांबवण्याचा प्रयत्न, तहसीलदारांवर शिवीगाळ व धमकी

महाराष्ट्रातील संग्रामपूर तालुक्यात अवैध वाळू वाहतूक थांबवण्यासाठी तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या नेतृत्वातील महसूल पथकाने नदी पात्रात धाव घेतली. त्यांना एक ट्रॅक्टर पळून जाण्यात यशस्वी झाला,

अंबाबरवा अभयारण्यात बौद्ध पौर्णिमेनिमित्त प्राणी गणनेत ४६१ वन्यजीवांचे दर्शन; दोन वाघांचीही नोंद (ambabarwa buldhana)

पण त्या ठिकाणी तीन ईसम संशयास्पद रित्या वाळुच्या ढिगाऱ्या आढळून आल्या. त्यांपैकी दोघांनी नाव सागर उमाळे व नामदेव थारकर हे पहुरपुर्णा येथील निवासी असल्याचे सांगितले, तर तिसऱ्याने नाव लपवले.

या घटनेत, सागर उमाळे याने अश्लील शिवीगाळ करून नदी काय तुमच्या बापाची आहे काय? असे सांगितले, तर नामदेव थारकर याने दम असेल तर १० मिनिट येथेच थांबा, तुम्हाला विना नंबरच्या वाहनांनी चिरडतो.

आणि खोटे विनयभंगाचे आणि अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करतो असी धमकी दिली. त्यानंतर ते दोघेही दोनचाकी गाडीवर निघून गेले.

revenue:या प्रकरणी तामगाव पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (बीएनएस) २०२३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अंबाबरवा अभयारण्यात बौद्ध पौर्णिमेनिमित्त प्राणी गणनेत ४६१ वन्यजीवांचे दर्शन; दोन वाघांचीही नोंद (ambabarwa buldhana)

0

 

बुलढाणा जिल्ह्यातील अंबाबरवा अभयारण्यात बौद्ध पौर्णिमेच्या हळवी चंद्रकिरणांतर्गत प्राण्यांची वार्षिक गणना पार पडली.

या निसर्ग अनुभव कार्यक्रमात १२ मे दुपारी २ वाजल्यापासून १३ मे सकाळी ९ वाजेपर्यंत २७ मचानांवर वन्यप्राण्यांची निरीक्षणे करण्यात आली. या काळात दोन वाघांसह एकूण ४६१ वेगवेगळ्या प्राण्यांचे दर्शन झाले,

Ladkibahinyojna / महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी उद्योग सुरू करण्याचा नव्या कर्जाचा अवसर; 40 हजारांपर्यंत कर्ज मिळणार

ज्यात बिबट्या, अस्वळ, निलगाय, सांबर, भेडकी, गवा, रानडुक्कर, लंगूर, माकड, रानकोंबडी, मोर, आणि इतर प्राणी होते.

अंबाबरवा अभयारण्य हा सातपुडा पर्वतरांगांमध्ये महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेजवळ १५,८३९.७५ हेक्टर क्षेत्रफळाचा निसर्ग वैभवाचा ठिकाण आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अंतर्गत येणाऱ्या या अभयारण्यात वन्यजीवांची निरंतर गणना आणि संरक्षणावर भर दिला जातो.

या कार्यक्रमात निसर्गप्रेमी आणि वन्यकर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदवला, ज्यामुळे अभयारण्यातील जैवविविधतेचा जास्त अचूक अंदाज मिळाला.

वरील प्राणी गणनेमध्ये २ वाघ, ३ बिबट, ७ अस्वळ, २८ निलगाय, ३९ सांबर, १० भेडकी, ३१ गवा, २४ रान डुक्कर, ३० लंगूर, १६३ माकड, १४ मसान्यादेखील, ३० रानकोंबडी, १० रान मांजर, ५५ मोर, ३ ससा, २ चांदी अस्वल, ५ मुंगुस, ४ सायळ आणि १ साप अशा एकूण ४६१ प्राणी नोंदविण्यात आले आहेत.

अंबाबरवा अभयारण्यात बौद्ध पौर्णिमेनिमित्त प्राणी गणनेत ४६१ वन्यजीवांचे दर्शन; दोन वाघांचीही नोंद (ambabarwa buldhana)

अंबाबरवा अभयारण्यातील ही प्राणी गणना स्थलांतरित प्राणी संरक्षणासाठी आणि जैवविविधता संवर्धनासाठी महत्त्वाची आहे.

ambabarwa buldhana:वन्यजीव विभागाच्या कार्यान्वयनाखाली या प्रकारच्या गणना नियमितपणे होतात, ज्यामुळे अभयारण्यातील वन्यजीवांची स्थिती जाणून घेता येते आणि संरक्षणासाठी योग्य उपाययोजना करता येतात

Hingnghat / ज्ञानदीप विद्यानिकेतन, हिंगणघाट विद्यालयाचा एस.एस.सी बोर्ड परीक्षेत 100% निकाल.

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:हिंगणघाट :- एस.एस.सी बोर्ड मार्च 2025 ला घेण्यात आलेला परीक्षेचा निकाल आज दिनांक14/04/2025 मंगळवार रोजी जाहीर झाला. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा ज्ञानदीप विद्यानिकेतन विद्यालय हिंगणघाट येथील विद्यार्थ्यांनी शंभर टक्के निकाल देऊन शाळेची उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली.

एकूण 19 विद्यार्थ्यांनी 90% च्या वर गुण प्राप्त केले असून 75% च्या वर गुण प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 54 आहे. उर्वरित सर्व विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीतील गुण प्राप्त केले आहे. कुमारी यशोदा राजुरकर या विद्यार्थ्याने 95.60% टक्के गुण प्राप्त करून शाळेत पहिला क्रमांक पटकावला.

वाढदिवसाला अंगणातच कुटुंब कार्यकर्ता सह अन्नत्याग; रविकांत तुपकरांचा नवीन संकल्प चर्चेत ( Ravikanttupkar )

तसेच1) यशोदा राजुरकर 95.60 2) देवयानी धोंगडे 94.40% 3) प्रज्ञा महाकाळकर 93.00
4) मंथन खउट 93.00 5) रोशन हुलके 92.60 6)पलक जामुनकर 92.40
7)गायत्री चंदनखेडे 92.40 8) अदिती चामचोर 92.40 9) हर्षल टिपले 92.00
10) वेदांत ब्राह्मणकर 91.60 11)वेदांत कावळे 91.40 12)संस्कृती खोडणकर 91.40
13) विष्णू सातारकर 90.80 14) नील गाखरे 90.80 15) इशा बाकडे 90.60
16) कल्याणी राऊत 90.20 17) क्षितिज तळवटकर 90.20 18) प्रणव किन्हेकर 90.00
19) समीक्षा महाकाळकर 90.00 20) पूर्वज धोटे 89.69 21) वेदांत सोनटक्के,89.40
22) आदित्य गवळी 89.40 23) हर्षल लडी 89.40.

Hingnghat:रोशन हुलके या विद्यार्थ्याने गणित या विषयांमध्ये 100 गुण प्राप्त केले असून यशोदा राजूरकर आणि गायत्री चंदनखेडे या विद्यार्थिनींनी गणित या विषयात 99 गुण प्राप्त केले. यातील बऱ्याच विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती कमकुवत असल्यामुळे त्यांना शाळेने दत्तक घेतले होते. तसेच कोणत्याही प्रकारची व्यक्तिगत शिकवणी नसताना सुद्धा 90% च्या वर गुण प्राप्त केले.

ही खास उल्लेखनीय बाब. विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय गिरधर राठी( संस्थापक व सचिव हिंगणघाट बहुउद्देशीय शिक्षण विकास संस्था हिंगणघाट) अर्पणा रशेश राठी( अध्यक्षा ज्ञानदीप विद्यानिकेतन हिंगणघाट) रशेश राठी( सहसचिव हिंगणघाट बहुउद्देशीय शिक्षण विकास संस्था, हिंगणघाट) प्रवीण धोबे( कोषाध्यक्ष) अभिनव जयस्वाल( मुख्याध्यापक ज्ञानदीप विद्यानिकेतन हिंगणघाट) नितीन ढबाले( मुख्याध्यापक ज्ञानदीप विद्यानिकेतन वाघोली) शिल्पा पंकज जयस्वाल ( उप- मुख्याध्यापिका ज्ञानदीप विद्यानिकेतन हिंगणघाट) यांना दिले. तसेच आपल्या सर्व विषय शिक्षक तसेच पालक यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Hingnghat :सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करून पुढील वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या तसेच भविष्यात ज्ञानदीप विद्यानिकेतन ची परंपरा अविरत सुरू ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला.

वाढदिवसाला अंगणातच कुटुंब कार्यकर्ता सह अन्नत्याग; रविकांत तुपकरांचा नवीन संकल्प चर्चेत ( Ravikanttupkar )

0

 

अनिलसिंग चव्हाण ( मुख्य संपादक )

स्वाभिमानी शेतकरी क्रांतिकारी संघटनेचे संस्थापक रविकांत तूपकर

Ravikanttupkar:तुपकर यांचा आज १३ मे रोजी जन्मदिवस आहे. आपला जन्मदिन साजरा न करता, शेतकरी व जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करीत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत एक दिवसीय उपोषण सुरू केले आहे. बुलढाणा येथील चिखली रोड मार्गावरील निवासस्थाना समोर हे उपोषण सुरू आहे.

Brekingnews/चोर पांगरा येथील महिलेच्या अंगावर वीज पडून मृत्यू

सकाळपासूनच रविकांत तुपकर यांच्या उपोषणात सहभागी होण्यासाठी जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून शेतकरी तुपकर यांच्या निवासस्थानी जमले आहेत. शहीद भगतसिंग व भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करून सकाळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली.Ravikanttupkar

दरम्यान, पहेलगाम दहशतवादी हल्ल्यात ठार झालेल्या पर्यटकांना व शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी, शेतकऱ्यांशी संवाद साधताना तुपकर म्हणाले, आज दिवसाला दहा शेतकरी राज्यात आत्महत्या करत आहेत.

सोयाबीन कापसाला भाव व शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा विषय प्रलंबित आहे, यावर राज्य सरकार लक्ष देत नसल्याने नेहमीप्रमाणे आपण शासन दरबारी शेतकऱ्यांच्या समस्या मांडणार आहोत.

Ravikanttupkar :शेतकरी संकटात असताना जन्मदिवस साजरा करणे हे उचित वाटले नाही, या कारणाने एक दिवसीय उपोषणाचे आयोजन करून शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत असल्याचे रविकांत तुपकर यांनी सांगितले.

Brekingnews/चोर पांगरा येथील महिलेच्या अंगावर वीज पडून मृत्यू

0

 

प्रतिनिधि सैय्यद जहीर

Brekingnews:लोणार तालुक्यातील चोरपांग्रा गोवर्धन नगर येथील महिला शेतामध्ये काम करत असताना अंगावर वीज पडून मृत्यू झाला ही घटना दिनांक 12 मे रोजी दुपारी तीन वाजेच्या दरम्यान घडली याबाबत सविस्तर होत

असे की चोरपांग्रा गोवर्धन नगर येथील महिला रंजना संदीप चव्हाण वय 35 वर्षे व पती व दोन मुले हे आपल्या शेतामध्ये काम करत असताना दुपारी तीन वाजेच्या दरम्यान अवकाळी

Ladkibahinyojna / महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी उद्योग सुरू करण्याचा नव्या कर्जाचा अवसर; 40 हजारांपर्यंत कर्ज मिळणार

पाणी वाऱ्यासह विजाच्या खरखड्यात या महिलेवर विज पडल्याने महिला जागीच मृत्यू पडली सुदैवाने पती व दोन मुले काम करत असताना ते वाचले

Brekingnews :ही घटना कळताच गावातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व तिला ग्रामीण रुग्णालय मध्ये दाखल केले पुढील तपास बिबि पोलिसटेशन करत आहे