Home Blog Page 46

AkolaNews / अकोल्यातील आश्चर्यकारक जप्ती: एका सायकल दुकानातून 1.15 कोटी रुपये

0

 

AkolaNews:अकोला शहरात एका नवीनवातेराने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे.

गोरक्षण रोडवरील एका सायकल व फिटनेस सामान दुकानात ‘खदान पोलिसांची जप्ती’ची तातडीची कारवाई झाली. 23 मार्च 2025 रोजी झालेल्या या कारवाईत 1 कोटी 15 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.

MurderNews / नवरा कोरोनात गेला, सासऱ्याची नग्न अवस्थेत हत्या, पोलिसांच्या तपासाची सुरुवात 

ही कारवाई या रोख रकमेच्या स्त्रोताबाबत स्पष्टीकरण न मिळाल्याने झाली आहे, ज्यामुळे ही रक्कम हवालाची असल्याचा प्रबळ संशय व्यक्त केला जात आहे.

दीपक घुगे नावाच्या व्यक्तीकडे पांढर्‍या रंगाच्या कापडी पिशव्या सापडल्या, ज्यात 500 आणि 100 रुपयांच्या नोटांचे बंडल होते. या प्रकरणी पुढील तपास करण्यात येत आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

AkolaNews:पोलिसांनी नागपूर येथील आयकर विभागाला या रकमेच्या बाबतीत तपशीलवार माहिती दिली आहे

Accdent / कंत्राट दाराच्या चुकीच्या नियोजनामुळे आज एका तरुणाचा दुचाकीला अपघात झाल्याने दुदैवी मृत्यू

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट

Accdent:बस स्थानक परिसरात रस्त्याचे कडेला तसेच बस स्थानकावर विकासकामे सुरू आहेत.
या विकास कामामुळे वाहतूक कोंडी होत प्रशासनाने कंत्राटदाराच्या मदतीने दोरखंड बांधून वाहतूक बंद केली.

Brekingnews / शॉटसर्किटमुळे दुकानाला लागलीय भीषण आग आगीत लाखों रुपायांचे नुकसान; जीवित हानी टळली

आज भल्या पहाटे आपल्या पल्सर बाईकने जातांना बाईकस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतक स्थानिक महात्मा फुले वार्ड येथील रहिवासी असून अंतरिक शैलेश वालदे असे या १८ वर्षीय तरुणाचे नाव आहे.

कंत्राटदाराचे चुकीच्या नियोजनाचा तो बळी ठरला असून रस्ता अडविण्याकरिता बांधलेल्या दोरखंडात अडकुन पडल्याने तो गंभीर जखमी झाला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Accdent / कंत्राट दाराच्या चुकीच्या नियोजनामुळे आज एका तरुणाचा दुचाकीला अपघात झाल्याने दुदैवी मृत्यू

Accdent:दोरखंडाला अडकुन अपघात झाल्याने त्याच्या मानेला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. उपरोक्त प्रकरणी जबाबदार असलेल्या कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी त्याचे कुटुंबियांनी केली आहे.

Hingnghatnews/ भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात सौदर्यीकरणाकरीता १कोटी रूपये

0

 

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghatnews:हिंगणघाट :- वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. पंकज भोयर यांचा पुर्व नियोजित दौरा होता याप्रसंगी हिंगणघाट येथे प्रथम आगमनाप्रसंगी आमदार समीर कुणावार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतल्यानंतर ते थेट भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून पुतळा परिसरातील सौंदर्यीकरणाची माहिती कार्यकारी अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभाग वर्धा,मुख्याधिकारी नगरपालिका हिंगणघाट व संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली.

या वेळी तेथील रंग रंगोटी,दुरुस्ती करणे, नविन चौथा-या निर्माण करणे, सभोवताली ओटा मोठा करणे, नविन टाईल्स लावणे,येण्या जाण्याचा रस्ता मोठा करणे, नविन स्टील रेलिंग लावणे, नविन झाडें व लाॅन ,पुतळा समोर नवीन कारंजे लावणे, ग्लास मोझक टाईल्स लावणे,डेकोरेटीव्ह काम करणे इलेक्ट्रिक काम करणे व इतर महत्वांची कामे समजवून घेत त्यांना कामाबद्दल योग्य ती सुचना दिली असून या कामाकरीता निधीची कमतरता पडू देणार नसल्याची ग्वाही त्यांनी दिली आहे.

MurderNews / नवरा कोरोनात गेला, सासऱ्याची नग्न अवस्थेत हत्या, पोलिसांच्या तपासाची सुरुवात 

यावेळी त्यांनी आमदार कुणावार यांच्या पाठपुराव्यामुळेच हा निधी प्राप्त झाल्याचे आवर्जून नमूद केले तसेच यावेळी नगर परिषद हिंगणघाटला दोन जेटींग मशीन प्राप्त झाल्या आहेत त्या जेटींग मशीनचे लोकार्पण ना.भोयर यांच्या हस्ते संपन्न झाले हिंगणघाट येथे अमृत योजनेतंर्गत २४ हजार चेंबरचे काम झाले असून ते सफाई करण्यासाठी नागपूर वरून भाडेतत्त्वावर जेटींग मशीन आणावी लागत होती.

ही बाब आमदार कुणावार यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करत दोन जेटींग मशीन मंजूर करून घेतल्या आणि आज त्या जेटींग मशीन वाहनांचे लोकार्पण झाल्यानंतर आमदार कुणावार यांनी मा.मुख्यमंत्री ,मा.उपमुख्मंत्री तथा नगरविकास मंत्री व पालकमंत्री वर्धा यांचे आभार मानले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्याचप्रमाणे हिंगणघाट येथे वर्धा येथील सुप्रसिध्द सोनार यांच्या प्रतिष्ठानाचे लोकार्पण ना.भोयर , आमदार समीर कुणावार यांच्या हस्ते तथा माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी, बाजार समिती सभापती सुधीर कोठारी, अतुल वांदीले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

Hingnghatnews :त्यानंतर ते हिंगणघाट येथील डॉ, बाबासाहेब आंबेडकर शाळा येथील शासनाच्या नव साक्षर अभियानांतर्गत सुरू असलेल्या वर्गाला भेट देत नव साक्षरांना शुभेच्छा दिल्यात या दौऱ्या प्रसंगी हिंगणघाट येथील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Brekingnews / शॉटसर्किटमुळे दुकानाला लागलीय भीषण आग आगीत लाखों रुपायांचे नुकसान; जीवित हानी टळली

0

 

Brekingnews:देऊळगाव मही : राष्ट्रीय महामार्गांवरील चिखली- जालना रोडवर संदीप किराणासह अन्य तीन दुकानाला आज दि. 23 मार्च रोजी रविवारला सकाळी 6:00 वाजता इलेक्ट्रिक शॉटसर्किटमुळे अचानक लागलेल्या भीषण आगीत लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे.

या आगीच्या घटनेमुळे स्थानिक नागरिकांची एकच तारांबळ उडाली होती. या घटनेचे सविस्तर वृत्त असे की,श्री शिवाजी विद्यालया समोर विजय श्रीराम शिंगणे यांच्या मालकीचे संदीप होलसेल व चिल्लर विक्रीचे किराणा दुकान आहे तर संजय प-हाड यांचे फायबर फर्निचर दरवाजे विक्रीचे दुकान तसेंच शेख.नसीम यांचे सायकल स्टोअर व सुनिल शिंगणे यांचे गोळ्या बिस्कीट अंडे पाणी होलसेल विक्रीचे दुकान आहे.

Brekingnews / बुलढाणा येथे ऑक्सीजन सिलेंडर स्फोटामुळे एक जण ठार, दोघे जखमी

संदीप किराणा दुकानासह अन्य तीन दुकानें जवळ जवळ असल्यामुळे कुठल्यातरी एका दुकानात शॉट सर्किट झाले. या शॉटसर्किटमुळे हळू हळू आगीने पेट घेतलेल्या आगीचे भीषण आगीत रूपांतर होऊन काही क्षणातचं होत्याचे नव्हते झाले.

चारही दुकानातील किराणा माल,नव्या जुन्या सायकल,टायर,ट्यूब मोटार सायकल टायर ट्यूब रिंगा फर्निचर दरवाजे, गोळ्या बिस्कीट पाणी बॉटल यासह अनेक साहित्य जळून खाक झाले आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

याप्रसंगी आग विझाविण्यासाठी पाण्याच्या टँकरने गावातील नागरिकांनी मोठ्या धाडनाने आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशमन गाडीला देखील पाचरण करण्यात आले होते. यावेळी महसूल विभागाचे तलाठी संदीप वायाळ यांनी सदर घटनेचा पंचनामा केला असून प्राथमिक पंचनाम्यात अंदाजे 35 ते 40 लाखांचे नुकसान झाल्याचे समजते.

 

आगीच्या घटनेमुळे संदीप किराणा मालकाची प्रकृती खराब

Brekingnews:अचानक लागलेल्या आगीमुळे किराणा दुकानातील किराणा माल व साहित्य पूर्णपणे आगीत जळून खाक झाल्याचे पाहून विजय श्रीराम शिंगणे वय 45 यांना चांगलाच धक्का बसला असून त्यांना छातीमध्ये तीव्र अशा वेदना जाणू लागल्या होत्या.त्यांच्यावर प्राथमिक देऊळगाव मही ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी जालना हलविण्याचे सांगितले.

Brekingnews / बुलढाणा येथे ऑक्सीजन सिलेंडर स्फोटामुळे एक जण ठार, दोघे जखमी

0

 

Brekingnews:बुलढाणा जिल्ह्यातील लक्ष्मीनगर येथे 23 मार्च रोजी दुपारी चालत्या ऑटोमध्ये ऑक्सीजन सिलेंडर टाकत असताना अनपेक्षितपणे स्फोट झाला. या अपघातात एक जण दुःखद गμοठा ठार झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

 

Brekingnews / बुलढाणा येथे ऑक्सीजन सिलेंडर स्फोटामुळे एक जण ठार, दोघे जखमी

 

MurderNews / नवरा कोरोनात गेला, सासऱ्याची नग्न अवस्थेत हत्या, पोलिसांच्या तपासाची सुरुवात 

स्थानिक लोकांनी तात्काळ मदत केल्याने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा स्फोट ऑक्सीजन गळतीमुळे किंवा तांत्रिक बिघाड  झाला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

प्राथमिक माहिती आणि नागरिकांची मदत

स्फोटाच्या घटनेची माहिती मिळताच लोकांनी झपाट्याने जखमींची सायास केली. पुढील उपचारासाठी त्यांना लवकरच रुग्णालयात हलविण्यात आले.

लाईव्ह  बातमी पाहन्यासाठी येथे क्लिक करा 

Brekingnews:ऑटोमध्ये सिलेंडर ठेवण्याच्या प्रक्रियेत गॅसची गळती किंवा अन्य तांत्रिक बिघाडामुळे हा धक्कादायक अपघात घडल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या अपघातामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

MurderNews / नवरा कोरोनात गेला, सासऱ्याची नग्न अवस्थेत हत्या, पोलिसांच्या तपासाची सुरुवात 

0

MurderNews:उत्तर प्रदेशातील गाझियाबाद शहरातील गोविंदपुरम डी ब्लॉक परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका निवृत्त आरोग्य कर्मचाऱ्याची त्यांच्या सून आणि तिच्या चुलत बहिणीने निर्घृणपणे हत्या केल्याचं प्रकरण पohlिसांसमोर आलं आहे.

ही घटना नुकतीच शुक्रवारी रात्री घडली, जेव्हा निवृत्त कर्मचाऱ्याचा नग्न अवस्थेतील रक्ताने माखलेला मृतदेह त्यांच्या घराच्या खालच्या मजल्यावर सापडला.

AjitPawar/ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती 

पाती सिंग (६८) हे त्यांच्या घरी एकटे राहत होते. त्यांच्या पत्नीचे काही वर्षांपूर्वी निधन झालं, तर त्यांचा मुलगा जितेंद्र कोरोना काळात वारला.

जितेंद्राची पत्नी आरती ही घराच्या वरच्या मजल्यावर राहते. पोलिसांनी अद्याप आरोपींना अटक केलेली नाही, मात्र आरती आणि तिच्या चुलत बहिणीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

घटनेची माहिती दिल्यावर पोलिसांनी दखल घेतली आणि शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांच्या तपासानुसार, हत्येच्या दिवशी रात्री पाती सिंग यांच्याशी आरती आणि तिच्या चुलत बहिणीचं भांडण झालं, ज्यात ती क्रिकेट बॅटने मारहाण केली होती. पोलिसांना प्रॉपर्टीवरून झालेलं भांडण मारण्याचा संशय आहे.

MurderNews::शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, काही महिन्यांपूर्वी पाती सिंग एका महिलेसोबत राहत होते. त्याची माहिती मिळताच आरती त्यांच्या दोन्ही मुलांसह १५ मार्च पासून दुसऱ्या मजल्यावर राहू लागली. त्यानंतरच त्यांच्या चुलत बहीण तिथं येऊन राहू लागल्या. पोलिसांनी या दोन्ही महिलांना ताब्यात घेतलं आहे आणि तपास सुरू आहे.

RapeNews / संतापजनक अत्याचाराचा प्रकार: जालना जिल्ह्यातील एका तरुणीवर तीन आरोपींनी केला सामूहिक बलात्कार

0

 

RapeNews:जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कठोरा बाजार येथे एका धक्कादायक घटना घडली आहे.

येथे जळणासाठी लाकडे तोडण्यासाठी गेलेल्या एका मतिमंद महिलेवर तीन आरोपींनी केलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेमुळे स्थानिक नागरिक संतापले आहेत.

cbse-curriculum-in-maharashtra-schools / राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये CBSE अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय: एक नवीन दिशा

ही घटना निरनिराळ्या पातळीवरून टोचणारी आहे, कारण त्यातील तिन्ही आरोपींनी महिलेच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतला आहे.

त्यांची नावे सद्दाम खान अजमेरखान पठाण, सादिकखान शरीफखान पठाण, फारुखखान जिलानीखान पठाण अशी आहेत.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

प्रकरणाचा मुख्य तपशील:काय घडले?: महिला जळणासाठी लाकडे तोडण्यासाठी शेतात गेली होती, तेव्हा तिचा पाठपुरावा करून आरोपींनी अत्याचार केला. ही घटना शेतातील एकान्त ठिकाणी घडली.

RapeNews:साक्षीदारांची भूमिका: या घटनेतील एका साक्षीदाराने आरोपींच्या अत्याचाराचा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता, ज्याचा वापर तपासात करण्यात येईल.पोलीस कारवाई: पीडित महिलेच्या पतीने तक्रार

Policenews / आंदोलनाच्या मागण्यांची पूर्तता नाही तर आंदोलन तीव्र होईल

0

 

 

बुलढाणा जिल्ह्यातील नागरी समस्यांवर आंदोलनाचा जोर

Policenews:बुलढाणा जिल्ह्यातील विविध नागरी समस्यांवर आंदोलनाची चळवळ जोरात सुरू आहे. महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर, आझाद हिंद शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सय्यद युसुफ यांनी जिजामाता स्टेडियमवरील प्रांगणात 22 मार्चपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.

cbse-curriculum-in-maharashtra-schools / राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये CBSE अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय: एक नवीन दिशा

या आंदोलनात जिल्ह्यातील अवैद्य धंद्यांसह एकूण अकरा ज्वलंत समस्यांचा समावेश आहे.

आंदोलनाच्या मागण्या

आंदोलनाच्या मागण्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यासाठी घातलेली बंदी त्वरित उठवणे, जिल्ह्यातील अवैद्य धंदे बंद करणे, शहरातील प्रत्येक चौकात महिलांसाठी मोफत शौचालयाची व्यवस्था करणे, गहाळ झालेल्या मुलामुलींचा शोध घेणे, जिल्ह्यातील क्राईम रेट कमी करणे, उपवनसंरक्षक कार्यालयातील गैरकारभाराची चौकशी करणे, अनधिकृत रेती वाहतूक बंद करणे आणि सामाजिक कार्यकर्त्यांवरील खोटे गुन्हे वापस घेणे यांचा समावेश आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आंदोलनाला पाठिंबा

आंदोलनाला आझाद हिंद शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सतीशचंद्र रोठे पाटील, प्रदेश महासचिव संजय येडोले, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष याकुब खा पठाण, अल्पसंख्यांक पीछडा वर्ग संघटनेचे प्रदेशाध्यक्ष शेख सईद, रमाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष सुरेखाताई निकाळजे आणि आझाद हिंद महिला संघटनेच्या पंचफुलाबाई गवई यांनी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला आहे.

Policenews :48 तासात मागण्यांची पूर्तता न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे

जिजाऊ ज्ञान मंदिरातून उद्याचे शास्त्रज्ञ घडतील- मालतीताई शेळके.(BuldhanaNews)

0

 

जावेद शहा बुलडाणा

BuldhanaNews:राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज पळसखेड भट मध्ये आज भव्य विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते.

सविस्तर वृत्त असे की, जिजाऊ ज्ञान मंदिरामध्ये दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा विज्ञान प्रदर्शनी चे आयोजन करण्यात आले होते. सर्वप्रथम कार्यक्रमाचे अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

प्रेमाच्या विरहातून आत्महत्या; बुलढाण्यातील धक्कादायक घटना (instagram video Live)

याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय मालतीताई शेळके होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून गजानन वतपाव सरपंच मातला, विशाल कार्ले सरपंच माळशेंबा त्याचबरोबर मंचकावर योगेश चव्हाण, अंजुम बी परविन, किरणताई चव्हाण, शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट आदी उपस्थित होते. तर यावेळी कार्यक्रमासाठी दीपक मस्के, जाबीर खान, सरफराज खान, सुनिल काळे, सुनिल पाटील आदींची उपस्थिती होती.

यावेळी प्रायमरी गटात प्रथम क्रमांक ईश्वरी बांन्डे इयत्ता तिसरी हिच्या ”सोलर सिस्टीम” या प्रकल्पाला मिळाला, तर द्वितीय क्रमांक अर्शील जाबीर खान इयत्ता चौथी याच्या “हायड्रोलिक प्रेस मशीन” मिळाला तर तृतीय क्रमांक ईश्वरी मोळवंडे इयत्ता दुसरी हीच्या “ज्वालामुखीचा उद्रेक” या प्रकल्पाला मिळाला.

cbse-curriculum-in-maharashtra-schools / राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये CBSE अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय: एक नवीन दिशा

तर माध्यमिक गटामध्ये प्रथम क्रमांक तन्मय सुनील काळे इयत्ता 9 वी यांच्या “स्मार्ट फार्मिंग” या प्रकल्पाला मिळाला तर द्वितीय क्रमांक मो. अयान मो. जावेद इयत्ता सहावी याच्या “प्रॉब्लेम सोल्विंग ऑटोमॅटिकल स्ट्रीट लाईट” या प्रकल्पाला मिळाला तर तृतीय क्रमांक ऋतुजा सोळंके इयत्ता सातवी या विद्यार्थिनीच्या “वॉटर रिसायकलींग” या प्रकल्पाला मिळाला.

यावेळी अध्यक्षीय भाषणामध्ये मालती ताई शेळके यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाल्या की, जिजाऊ ज्ञान मंदिर ग्रामीण भागातील शाळा असून आजच्या विज्ञान प्रदर्शनी मध्ये अतिशय उत्कृष्ट प्रकल्प विद्यार्थ्यांनी सादर केले, ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. आजच्या युगामध्ये शाळेमध्ये विज्ञान प्रदर्शनी भरवणे काळाची गरज आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होणे.

शास्त्रज्ञांबद्दल जिज्ञासा निर्माण व्हावी, नवनवीन शोध लावावे, यासाठी विद्यार्थी वेगवेगळा प्रयोग करतात, त्याचीच प्रतिकृती आजच्या विज्ञान प्रदर्शनामध्ये दिसली. उद्याच्या शास्त्रज्ञ होण्या मध्ये जिजाऊ ज्ञान मंदिराचे मोठे योगदान असेल यात तीळ मात्र ही शंका नाही. आज आपण भारतरत्न डॉक्टर ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन केले ते यासाठी की, आपण त्यांच्याकडून वैज्ञानिक दृष्टिकोन अंगिकारला पाहिजेत.

या विज्ञान प्रदर्शनामध्ये सर्वच विद्यार्थ्यांनी अतिशय छान प्रकल्प सादर केले. बरेच प्रकल्प हे अपेक्षे पेक्षाही चांगले होते, असे प्रकल्प पालकांनी सुद्धा पाहिले पाहिजेत. यामध्ये “स्मार्ट फार्मिंग” आज काळाची गरज आहे तसेच ग्लोबल वार्मिंग च्या काळामध्ये पर्यावरणाचा समतोल राखणे ही सुद्धा काळाची गरज आहे. यासाठी विद्यार्थ्यांच्या कल्पना विकसित होणे आवश्यक आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

यासाठी पालकांनी सुद्धा विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभे राहिले पाहिजेत. आज ज्यांच्या क्रमांक आला. ज्यांना पारितोषिक मिळाले. त्या सर्वांचे खूप खूप अभिनंदन! तसेच यासाठी मेहनत घेणाऱ्या सर्व शिक्षकांचे सुद्धा मी आभार व्यक्त करते, असे त्या आपल्या भाषणात म्हणाल्या.
या कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष मा. संदीप दादा शेळके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

BuldhanaNews :यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य किशोर सिरसाट यांनी केले व सूत्रसंचालन राजेश गायकवाड तर आभार प्रदर्शन शितल पाटील यांनी केले या कार्यक्रमासाठी विज्ञान विभाग प्रमुख अविनाश शेळके व शाळेचे सर्व कर्मचारी यांनी मेहनत घेतली.

cbse-curriculum-in-maharashtra-schools / राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये CBSE अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय: एक नवीन दिशा

0

 

cbse-curriculum-in-maharashtra-schools:राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये CBSE (केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ) अभ्यासक्रम लागू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे.

या निर्णयानुसार, 2025-26 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीसाठी CBSE पॅटर्न लागू केला जाणार आहे. पुढील दोन वर्षांत, दोन टप्प्यांमध्ये दुसरी, तिसरी आणि चौथीच्या वर्गांसाठीही हा अभ्यासक्रम राबवला जाणार आहे

प्रेमाच्या विरहातून आत्महत्या; बुलढाण्यातील धक्कादायक घटना (instagram video Live)

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी ही घोषणा केली आहे. या निर्णयामागे राज्यातील शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावणे आणि विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्तरावर दर्जेदार शिक्षण मिळवून देणे हे मुख्य उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्रातील अनेक पालक आणि विद्यार्थी सीबीएसई अभ्यासक्रमाच्या दर्जामुळे त्याकडे आकर्षित होत असल्याने सरकारने हा निर्णय घेतला आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

शिक्षक आणि पालकांमध्ये या निर्णयाबद्दल संभ्रम आहे.

काही प्रश्नांमध्ये स्पष्टता येणे बाकी आहे, जसे की राज्य मंडळाचा अभ्यासक्रम कायम राहणार का? सीबीएसई परीक्षा पद्धती आणि वेळापत्रकाचा अवलंब केला जाणार का? या प्रश्नांची उत्तरे मिळणे महत्त्वपूर्ण आहे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या निर्णयावर टीका केली आहे. त्यांनी राज्य शिक्षण मंडळ बंद करणार का? मराठी भाषेचे काय होणार? असा सवाल विचारला आहे