Home Blog Page 464

दारुच्या नशेत गळफास घेऊन एकाची आत्महत्या दगडी येथील घटना

0

 

यावल ( प्रतिनिधी) विकी वानखेडे

तालुक्यातील मनवेल येथून जवळच असलेल्या दगडी येथील ३५ वर्षीय तरुणाने राहत्या घरात दारुच्या नशेत गळफास घेऊन जीवन संपविले.
विजय वंसत ठाकरे वय ३५ या रोजंदारीवर काम करणाऱ्या शेतमजुर तरूणांने त्याचा राहत्या घराच्या पाईपला दारुच्या नशेत दोरखंड बांधुन जीवन संपविले.मयताच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा दोन मुली असा परीवार आहे.मयताचे यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आहे असुन यावल पोलिस स्टेशनला पांडुरंग गणपत ठाकरे यांनी खबर दिल्याने अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे.
गावात सुरु असलेल्या अवैध हातभट्टी दारुच्या आहारी जावुन अनेक तरुण हे व्यसनाधीन होत असल्यामुळे अनेक मोलमजुरी करणाऱ्यांचे घर उध्वस्त होत असल्याने गावातील दारुबंदी झाली पाहीजे अशी संतप्त भावना परिसरातील शेकडो महिलांकडुन व्यक्त केली जात असुन ही हात भट्टीच्या दारूचे धंदे तात्काळ बंद न झाल्यास महीला वर्ग आंदोलनाच्या पवित्र्यात आहे .

यावल शहरातुन दिड वर्षापुर्वी ११ वर्षीय मुलीच्या झालेल्या अपहरणाचे आजोबाला फोन आल्याने उघडकीस आले पोलीस शोध कार्यासाठी उत्तर प्रदेशला रवाना

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

येथील धोबीवाडा परिसरातील एका अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीचे दिड वर्षापुर्वी एका व्यक्तीने अपहरण केल्याची घटना आज उघडकीस आली आहे याबाबत पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असुन पोलीसांचे पथक त्या मुलीच्या शोध कार्यासाठी उत्तर प्रदेश येथे रवाना झाली आहे . या संदर्भात पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीती अनुसार भिमसिंग गंगाराम कोळी , वय ६५ वर्ष , राहणार धोबीवाडा यावल यांची११ वर्षीय टूविंकल किरण कोळी नांवाची नात ही दिनांक १९ / ११ / २o१९ रोजी सकाळी ११ , ४५ वाजता कै. सिताबाई दामोदर देवकर या शाळेत इत्तया चौथीच्या वर्गात शिक्षण घेण्यासाठी गेली असता ती शाळेत वेळेवर पहोचली पण ती दफ्तर ठेवुन बाहेर गेली ती आलीच नाही शाळेच्या इतर विद्यार्थीनी सांगीतले की तिला कुणीतरी व्याक्ती ही ऑटोरिक्शात बसवुन घेवुन गेला नंतर मग ती शाळेत पहोचलीच नसल्याने कुमारी ट्रक्विंकल हीचा सर्वत्र शोध घेण्यात आला मात्र ति मिळुन आली नाही , भिमसिंग कोळी यांनी त्यांच्या जळगाव येथील सुप्रीम कॉलनी राहणाऱ्या त्याचे मुली व जावाई यांच्याकडे ही शोध घेण्यात आले असता त्या ठीकाणी भिमसिंग कोळी यांचे जावाई व मुलगी तिथ त्यांच्या घरी मिळुन आली नाही . वरील घटनेमुळे कोळी व त्यांची पत्नी गेल्या काही दिवसापासुन बिघडलेल्या मानसिक स्थिती होतो , मात्र दरम्यान दिनांक २४ / ४ / २०२१ रोजी अचानक माझी अपहरण झालेल्या नात टूक्विकंल हिचा सकाळी ४ वाजता फोन आला त्यावेळी तिने सांगीतले की मी उत्तर प्रदेश येथील नविनसिंग उर्फ गुड्ड रामा शंकरसिंग , राहणार बलकजगंज देरवा चौक , सरकारी दवाखान्यामागे गौरखपुर येथे असल्याचे तिने सांगीतले , संबंधीत व्याक्ती हा तुझ्या वडीलांकडे सोडतो असे सांगुन त्यांने मला भुसावळ येथुन रेल्वेने ईथ आणल्याचे तिने सांगीतले , या सर्व घटनेची माहीती कुमारी ट्विंकल कोळी हिने आजोबास सांगीतल्याने अखेर त्यांनी यावल पोलीस स्टेशनमध्ये आपली नातचे अपहरण झाल्याची तक्रार दिली असुन , पोलीसांनी गुन्हा दाखल करून या घटनेची गांभीयांने दखल घेत , पोलीसांचे पथक मुलीने सांगीतलेल्या ठीकाणी तिच्या शोध कार्यासाठी पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले आणी सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे यांचे दोन सदस्यी पथक उत्तर प्रदेश येथे रवाना झाले आहे .

राज्यातील अन्नदाता शेतकरी बांधवांना पिकांसाठी लागणारे रासायानिक खतांच्या वाढलेल्या भरमसाठ किमती कमी करा मनसेने पाठविले कृषीमंत्र्यांना पत्र.

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विक्की वानखेड़े

संपुर्ण देशावर कोरोना विषाणुसंसर्गाचे संकट ओढवले असुन , या महामारीच्या काळात सर्वसामान्यापासुन तर देशाचा अन्नदाता बळीराजा देखील दुहेरी आर्थीक संकटात आले असतांना केन्द्र शासनाच्या गोंधळलेल्या व शेतकरी विरोधी धोरणामुळे यंदाचे खरीप हंगामाच्या पिकपेरणीनंतर लागणारी रासायनीक खतांची वाढलेली किमत ही शेतकऱ्यांचे कमरडे मोडणारी आहे . या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांनी राज्याचे कृषीमंत्री ना . दादासाहेब भुसे यांना निवेदन पाठवुन या भरमसाठ वाढलेल्या खतांच्या किमती या नियंणत्रात आणाव्यात अशी मागणी केली आहे . याबाबत दिलेल्या निवेदनात मनसेचे जिल्हाध्यक्ष चेतन अढळ्कर यांनी राज्याचे कृषीमंत्री यांना म्हटले की , यावर्षी सर्वच रासायनिक खतांच्या किमतीत कंपन्यानी भरमसाठ किमती वाढवल्या असुन , पन्नास किलोच्या बॅगवर सुमारे ६००ते ७०० रुपये मोठी वाढ केलेली असुन, ऐरवी रासायनिक खतांची नैसर्गीक वाढ बघता१ooते २ooरूपये प्रमाणे वाढ होणे हे अपेक्षीत होते पण ही मोठया प्रमाणावर वाढलेली खतांची वाढ शेतकऱ्यांची पिकपेरणी संदर्भातील आर्थिक नियोजन कोलमडणारी असुन , या विषयाला घेवुन शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे . इतक्या मोठया प्रमाणावर रासायनिक खतांच्या किमती वाढण्याची ही पहीलीच वेळ असुन पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी किसान सम्मान योजनेअंतर्गत दिलेल्या शेतकऱ्यांना अनुदानात केवळ एकच खताच्या बॅगवर खर्च होणार आहे . खतांच्या वाढलेल्या दिडपट किमतीमुळे शेतकरी बांधव कमालीच्या अडचणी येणार असुन , शेतकऱ्यांच्या पिकवलेल्या मालाला आहे ते आधार भुत किमती मात्र जैसे थेच आहे . राज्याचे कृषीमंत्री म्हणुन शेतकऱ्यांच्या खरीप पेरणीच्या तोंडावर वाढलेल्या किमती मुळे आर्थीक बोजा वाढणार असुन या संदर्भात आपण केन्द्रीय कृषीमंत्री यांच्याशी बोलुन तात्काळ ठोस पाऊल उचलावित अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातुन शेतकऱ्यांसाठी हितासाठी व न्याय मिळुन देण्यासाठी प्रसंगी आंदोलन करण्यात येईल असे मनसेचे चेतन अढळकर यांनी म्हटले आहे .

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

संपुर्ण देशावर कोरोना विषाणुसंसर्गाचे संकट ओढवले असुन , या महामारीच्या काळात सर्वसामान्यापासुन तर देशाचा अन्नदाता बळीराजा देखील दुहेरी आर्थीक संकटात आले असतांना केन्द्र शासनाच्या गोंधळलेल्या व शेतकरी विरोधी धोरणामुळे यंदाचे खरीप हंगामाच्या पिकपेरणीनंतर लागणारी रासायनीक खतांची वाढलेली किमत ही शेतकऱ्यांचे कमरडे मोडणारी आहे . या संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे रावेर लोकसभा क्षेत्र जिल्हाध्यक्ष चेतन अढळकर यांनी राज्याचे कृषीमंत्री ना . दादासाहेब भुसे यांना निवेदन पाठवुन या भरमसाठ वाढलेल्या खतांच्या किमती या नियंणत्रात आणाव्यात अशी मागणी केली आहे . याबाबत दिलेल्या निवेदनात मनसेचे जिल्हाध्यक्ष चेतन अढळ्कर यांनी राज्याचे कृषीमंत्री यांना म्हटले की , यावर्षी सर्वच रासायनिक खतांच्या किमतीत कंपन्यानी भरमसाठ किमती वाढवल्या असुन , पन्नास किलोच्या बॅगवर सुमारे ६००ते ७०० रुपये मोठी वाढ केलेली असुन, ऐरवी रासायनिक खतांची नैसर्गीक वाढ बघता१ooते २ooरूपये प्रमाणे वाढ होणे हे अपेक्षीत होते पण ही मोठया प्रमाणावर वाढलेली खतांची वाढ शेतकऱ्यांची पिकपेरणी संदर्भातील आर्थिक नियोजन कोलमडणारी असुन , या विषयाला घेवुन शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे . इतक्या मोठया प्रमाणावर रासायनिक खतांच्या किमती वाढण्याची ही पहीलीच वेळ असुन पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी किसान सम्मान योजनेअंतर्गत दिलेल्या शेतकऱ्यांना अनुदानात केवळ एकच खताच्या बॅगवर खर्च होणार आहे . खतांच्या वाढलेल्या दिडपट किमतीमुळे शेतकरी बांधव कमालीच्या अडचणी येणार असुन , शेतकऱ्यांच्या पिकवलेल्या मालाला आहे ते आधार भुत किमती मात्र जैसे थेच आहे . राज्याचे कृषीमंत्री म्हणुन शेतकऱ्यांच्या खरीप पेरणीच्या तोंडावर वाढलेल्या किमती मुळे आर्थीक बोजा वाढणार असुन या संदर्भात आपण केन्द्रीय कृषीमंत्री यांच्याशी बोलुन तात्काळ ठोस पाऊल उचलावित अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातुन शेतकऱ्यांसाठी हितासाठी व न्याय मिळुन देण्यासाठी प्रसंगी आंदोलन करण्यात येईल असे मनसेचे चेतन अढळकर यांनी म्हटले आहे .

माझा वार्ड माझी जबाबदारी युवा उद्योजक , समाज सेवक अमोल हरडे मित्रपरिवा कडून स्वीकारले आव्हान !

0

 

 

सचिन वाघे वर्धा
19.5.21
हिंगणघाट :- कोरोना महामारी च्या काळात हिंगणघाट नगरपालिकेकडून दरवर्षीप्रमाणे संत ज्ञानेश्वर वार्ड मध्ये पाण्याचा दुष्काळ असतो याबाबत नगरपालिकेकडून कोणतेही नियोजन होत नाही, ही परिस्थिती लक्षात घेता वार्डातील मित्रपरिवार च्या मदतीने युवा उद्योजक समाजसेवक अमोल हरडे यांनी मोफत पाणी सेवा सुरू केली आहे त्याच्या या कार्याचे वॉर्डातील नागरिका कडून कौतुक होत आहे . मोफत पाणी सेवा संपर्क नंबर 9588648832,9527687818

मतदार संघातील शेत व पांधन रस्त्याचा डी.पी.आर. तयार करून मंजुरीसाठी पाठपुरावा करणार-आमदार राजेश एकडे

0

 

तालुका मलकापुर अंतर्गत धरणगाव ते मेन रोड धरणगाव या पांधन रस्त्याचे भूमिपूजन मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.राजेश एकडे यांच्या हस्ते संपन्न झाले.मतदार संघातील एक-एक शेत रस्ता पूर्णत्वास जात असल्याचा मनस्वी आनंद असून मतदार संघातील शेत व पांदण रस्त्याचा डी.पी.आर. तयार करून सदर डी.पी.आर. मंजूर करण्याच्या अनुषंगाने यापुढे पाठपुरावा करणार अशी प्रतिक्रिया आमदार श्री.राजेश एकडे यांनी यावेळी दिली.सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा व विद्यमान जिल्हा परिषद सदस्या सौ.मंगलाताई संतोष रायपुरे हया होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक डॉ.अरविंदजी कोलते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते श्री.संतोषभाऊ रायपुरे, मलकापुर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री.बंडूभाऊ चौधरी, मलकापूर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष श्री. माधवराव गायकवाड, पंचायत समिती सदस्य श्री.सुरेश पाटील, धरणगावच्या सरपंच सौ.संगीताताई प्रमोद पाटील,उपसरपंच श्री.अमित झनके, श्री.बाळू पाटील, श्री.ज्ञानदेव ढगे, श्री.अर्जुन पाटील, श्री.उमाकांत चौधरी, श्री युवराज रायपुरे, श्री.प्रमोद पाटील,श्री. कृष्णा पाटील.श्री.विजन झनके, श्री.स्वप्नील कोल्हे,श्री.गजानन कोळंबे,श्री.पांडुरंग पाटील व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पदोन्नतीतील आरक्षण देणारा आदेश पुनश्च लागू करा- रामूबकसं

0

 

सचिन वाघे वर्धा

हिंगणघाट- दि.19/05/2021ला राष्ट्रीय मूलनिवासी बहुजन कर्मचारी संघ या केंद्रीय कर्मचारी युनियन ने पदोन्नतीतील आरक्षण देणारा आदेश लागू करण्याचे निवेदन तहसीलदार श्रीराम मुंदडा यांना देण्यात आले.
दि 07/05/2021चा शासनादेश रद्द करून पदोन्नतीच्या कोट्यातील 33टक्के आरक्षित पदे मागासवर्गीय अधिकारी/कर्मचारी यांना पदोन्नती देऊन भरणेबाबत शासन आदेश निर्गमित करावा. भारतीय संविधानाच्या कलम 16 नुसार शासनाला अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती,भटके विमुक्त व इतर मागासवर्गीय यांना शासन सेवेतील रिक्त पदांवर आरक्षण देणारा कायदा बनविण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे परंतु 07/05/2021ला दिलेल्या शासन आदेशाने ही मागासवर्गीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या कोट्यातील33 टक्के आरक्षित रिक्त पदावरील पदोन्नती नाकारली जात आहे आणि रिक्तपदे 33 टक्के आरक्षित कोट्यातील आहेत आणि पदोन्नती मात्र खुल्या प्रवर्गातील अधिकारी, कर्मचारी यांची करावयाची असा हा अनुसूचित जाती-जमाती, भटके विमुक्त जाती जमाती व इतर मागासवर्गीयाशी भेदभाव करणारा हा शासन आदेश आहे, आरक्षित कोट्यातील रिक्त पदांवर खुल्या संवर्गातील कर्मचारी व अधिकारी यांची पदोन्नती करणे हा भारतीय संविधान व मा सर्वोच्च न्यायालयाचा सुद्धा अवमान आहे. असा अन्यायकारक कायदा रद्द न केल्यास याचे देशात तीव्र प्रतिसाद पडतील असे प्रतिपादन पँथर प्रतीक वासेकर यांनी केले.
निवेदन देताना दलित युवा पँथर चे अध्यक्ष प्रतीक वासेकर, एकता प्रतिष्ठान चे अखिल धाबर्डे, बहुजन क्रांती मोर्चा चे इंजि निखिल कांबळे, प्रज्वल गायकवाड, सक्षम मेश्राम, यथार्थ बनमरे, अश्वजित मेश्राम, साहिल जवादे, नितीन अंबाडे, लक्ष्मीकांत जवादे, गेमदेव मस्के, संदेश थुल उपस्थित होते.

जुन्या वादातुन एकमेकांच्या मोटरसायकली जाळल्या

0

 

सचिन वाघे वर्धा
19 .5.21
हिंगणघाट :- मोटरसायकल जाळल्याच्या संशयावरुन परिसरातच रहात असलेल्या मोटरसायकलस्वारांवरती हल्ला करुन त्यांची मोटरसायकल जाळल्याची घटना काल स्थानिक शास्त्री वार्ड येथे घडली.
याचवेळी फिर्यादीने सुद्धा याआधी आरोपीची मोटरसायकल जाळली यावरून त्याला अटक झाली होती या प्रकरणात गुंतागुंत निर्माण झाली आहे.
प्राप्त माहितीनुसार,काल दि.18 रोजी फिर्यादि पीयुष सुनील लोणारे आपल्या मित्रासह सायंकाळी 7 वाजताचे दरम्यान आरोपी देवराव पुरके रा.शास्त्री वार्ड यांचे घरापासून पल्सर मोटरसायकल क्र.एमएच-32 एटी – 6920 ने जात असता परिवारातील बाप-लेकांनी तसेच बहिनीने “आमची मोटरसायकल तुच जाळली” म्हणत चाकू,कुराडीने जीवघेणा हल्ला केला.
या दरम्यान फिर्यादिने आपली मोटरसायकल तेथेच सोडून पळ काढला.परंतु त्याचा मित्र अमित राऊत याला मारहाण करीत फिर्यादिची मोटरसायकल आरोपी देवराव पुरके, सचिन पुरके, सारिका मंडाळे यांनी पेट्रोल टाकून जाळली. आरोपींविरोधात कलम 307, 324, 435, 294, 427, 506 188- 34 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे तर फिर्यादी सौ लक्ष्मी देवराव पुरके हिच्या तक्रारीवरून आरोपी पियुष लोणारे, अमित राऊत यांचे विरोधात कलम 326, 506, 188- 34 नुसार गुन्हा नोंद करून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटणकर करीत आहे.

युवा कवयित्री वर्षा शिदोरे लिखित ‘स्मितरहस्य’ काव्यसंग्रहास पुरस्कार

0

 

साहित्य क्षेत्रात आपली एक आगळी वेळगी ओळख निर्माण करणाऱ्या नाशिक येथील युवा कवयित्री वर्षा शिदोरे यांचा काही दिवसांपूर्वी ‘स्मितरहस्य’ हा काव्यसंग्रह अगदी थाटामाटात प्रकाशित करण्यात आला होता. त्याचबरोबर महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील साहित्यिक व वाचक वर्गांनी हा काव्यसंग्रह वाचून त्याचे छानसे अभिप्रायही पाठवले होते.

नुकताच या काव्यसंग्रास राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याने आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. कवी चंद्रकांत जोगदंड यांच्या काव्यार्चना कवितासंग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त कै गंगाधर श्रावण आबक यांच्या स्मरणार्थ त्यांच्या ‘स्मितरहस्य’ काव्यसंग्रहास विशेष सन्मान देण्यात आला असून सन्मान पत्र व स्मृतिचिन्ह हे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुढील काही महिन्यांत एका कार्यक्रमदरम्यान मान्यवरांच्या हस्ते या पुरस्काराचे प्रदान करण्यात येईल अशी माहिती कवी चंद्रकांत जोगदंड यांनी दिली आहे.

कवयित्री कु. वर्षा बाबासाहेब शिदोरे या उंटवाडी, नाशिक येथील असून वर्तमानपत्रे, इंस्टाग्राम, फेसबुक, ब्लॉग, स्टोरी मिरर तसेच इतर समाजमाध्यमांवर त्यांचे लेखन (लेख, कथा, कविता इत्यादी) प्रदर्शित आहे.
वयाच्या २४व्या वर्षी लिहिलेला पहिला कविता संग्रह ‘स्मितरहस्य’ २८ सप्टेंबर २०१९ मध्ये प्रकाशित करण्यात आलेला आहे.

दरवर्षीप्रमाणे हिंगणघाट शहर परिसरात ‘मनसे’चे मोफत (निःशुल्क) पाणी वाटपाचा शुभारंभ

0

 

सचिन वाघे वर्धा
18.5.21
हिंगणघाट :-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने हिंगणघाट शहर परिसरात ‘मनसे जिल्हाध्यक्ष ‘अतुलभाऊ’ वांदिले यांच्या हस्ते संत तुकडोजी वार्ड, लक्ष्मी मंदीर परिसरात निःशुल्क (मोफत) ट्यंकर ने पाणी पुरवठा करण्यात आला. हिंगणघाट शहरात भीषण पाणीटंचाई पाहून दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा ‘मनसे’ ने निःशुल्क पाणी पुरवठा वार्डा वॉर्डात पोहचl

दुकानदारांनावर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सीलबंद कारवाई करत दंड वसूल

0

 

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

 

जिल्ह्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. आज लॉकडाऊनच्या दुसऱ्या दिवशी नगरपरिषद आणि पोलीस प्रशासनाच्यावतीने केलेल्या कारवाई सहा दुकानदारांनावर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी सीलबंद कारवाई करत दंड वसूल केला असून एका दुकानावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
या दुकानांवर केली कारवाई
१) एस एम बी मार्ट , (सात हजार रुपये )
२) परी कलेक्शन , (पाच हजार रुपये )
३) अभय देवरे सोनार , ( पाच हजार रूपये )
४) सहारा जनरल स्टोअर्स ( पाच हजार रुपये ) ,
५) बसेरा जनरल स्टोसर्स , ( पाच हजार रुपये )
६) सदगुरु बुक स्टॉल जिनिंग प्रेसिंग शॉपींग कॉम्पलेक्स, या दुकानावर सिल करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आज करण्यात आलेल्या या कार्यवाहीत नगर परिषदचे कार्यालयीन प्रशासकीय अधिकारी विजय बडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता निरिक्षक शिवानंद कानडे , मुबिन शेख , संदीप पारधे, र , नितिन पारधे, रवी काटकर यांनी सहभाग घेतला. दरम्यान या कार्यवाहीत पोलीस निरिक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरिक्षक जितेन्द्र खैरनार, पोलीस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले निलेश वाघ आर एम महाजन भूषण चव्हाण यांच्यासह सर्व पोलीस कर्मचारी व गृहरक्षक दलाचे कर्मचारी यांनी महत्वाची भुमीका बजावली .