Home Blog Page 502

शिवसेना मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे वतीने..

0

 

सुनील पवार. नांदूरा

दिनांक २५ मार्च रोज रोजी महावितरण कंपनी नांदुरा MSEB अधिकारी मिसाळ साहेब यांना (१) शेतकर्यांच्या शेतातील लाईन कट करु नये (२) मतदार संघातील ग्रा प च्या लाईन कट करु नये (३) शेती पंपाच्या दुरुस्ती करण्यात यावी (४) शेतकऱ्यांच्या शेतातील डि पी जळाल्या तर त्वरित नवीन डि पी देन्यात यावी(५) नांदुरा शहर व तालुक्यातील घरगुती मीटर लवकर देण्यात यावे ह्या व ईतर मागण्या साठी निवेदन देण्यात आले
यावेळी उपस्थित वसंतराव भोजने शिवसेना उपजिल्हाप्रमुख, लालाभाऊ इंगळे शहर प्रमुख,संदीप पाटील प्रशासक बाजार समिती,रविंद्र भोजने युवासेना उपजिल्हाप्रमुख,ईश्वर पांडव विद्याथी सेने उपजिल्हाप्रमुख,गणेश ताठे,संतोष लाहुडकर,संजय गुजर,संतोष डिघे सरपंच वडणेर,महादेव चिमकर,अर्जुन तांगडे,अक्षय सुलताने,ऋषी जुमळे,अनिल देशमुख,दिपक जुमळे, अभिराजे हिवराळे, सोनू चोपडे,सागर वावाटळीकर,जगदीश चोपडे,रामा तंदुळकर,ललित राठी,गोपाळ आंबूस्कर,कैलास भोलनकर,पुरुषोत्तम सोनवणे,अमोल जैन, जितू गोहर,सौरभ पाटील,शुभम लाहुडकर,सुनील तांगडे,त्र्यंबक घनोकर,मनोज जवरे,प्रकाश झांबरे,अरुण बाठे,भागवत रायपुरे,शशिकांत गव्हाड, अशोक जूनगडे,सागर जुमडे,रवींद्र ठाकरे, आदी शिवसैनिक उपस्थित होते

शिवसेनेचे वतीने महावितरण कंपनी नांदुरा ला आज विविध मागण्यांचे ‍निवेदन

0

 

मागण्या पूर्ण न झाल्यास कार्यालय तोडफोडीचा इशारा*

नांदुरा (प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

शिवसेना मलकापूर विधानसभा मतदार संघाच्या वतीने आज दिनांक 25 मार्च रोजी सकाळी 11 वाजता महावितरण कंपनी नांदुरा येथे शेतकऱ्यांच्या शेतातील लाईन कट करू नये, मतदार संघातील ग्रामपंचायतच्या लाईन कट करू नये, तसेच शेती पंपाच्या दुरुस्ती करण्यात यावी, शेतकऱ्यांच्या शेतातील डीपी जळाल्या तर त्वरित नवीन डीपी देण्यात यावी, या व इतर मागण्यांसाठी आज महावितरण कंपनी नांदुरा येथे शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.
वरील निवेदनमध्ये, आमच्या मागण्या रास्त असून महत्त्वाच्या आहे, ह्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर शिवसेनेच्या वतीने आपल्या कार्यालयाची केव्हाही न सांगता नाईलाजाने तोडफोड करण्यात येईल, यानंतरची सर्व जबाबदारी आपणावर राहील. असेही या निवेदनामध्ये सादर केले आहे.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्री.वसंतराव भोजने , लालाभाऊ इंगळे शहर प्रमुख,संदीप पाटील ,रविंद्र भोजने युवासेना उपजिल्हाप्रमुख,ईश्वर पांडव विद्याथी सेने उपजिल्हाप्रमुख,गणेश ताठे,संतोष लाहुडकर,संजय गुजर,संतोष डिघे सरपंच वडणेर,महादेव चिमकर,अर्जुन तांगडे,अक्षय सुलताने,ऋषी जुमळे,अनिल देशमुख,दिपक जुमळे, अभिराजे हिवराळे, सोनू चोपडे,सागर वावाटळीकर,जगदीश चोपडे,रामा तंदुळकर,ललित राठी,गोपाळ आंबूस्कर,कैलास भोलनकर,पुरुषोत्तम सोनवणे,अमोल जैन, जितू गोहर,सौरभ पाटील,शुभम लाहुडकर,सुनील तांगडे,त्र्यंबक घनोकर,मनोज जवरे,प्रकाश झांबरे,अरुण बाठे,भागवत रायपुरे,शशिकांत गव्हाड, अशोक जूनगडे,सागर जुमडे,रवींद्र ठाकरे, आदी शिवसैनिक उपस्थित होते.

शेतकऱ्यांना एकरी 35000.% रु नुकसान भरपाई द्या. राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते अतुलभाऊ भुसारी पाटील यांची मागणी !

0

 

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

नुकत्याच पडलेल्या अवकाळी पावसामुळे सिनखेडराजा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यामध्ये टोळ कांदा ‘ पेरू ‘ डाळिंब ‘गहू ‘हरभरा .पपई ‘इतर फळबाग असतील पिके असतील या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते
देशांत व राज्यात कोरोना सारख्या रोगाच्या नियमात शेतकरी कसुन निघालेला आहे
कोरोनाच्या काळात सर्वात जास्त नुकसान हे शेतकऱ्यांचे झाले आहे मान्य केले पाहिजे रोगाबरोबर निसर्ग देखील शेतकऱ्यांवर उढलेला आहे दोन-तीन दिवसांपासून महाराष्ट्र राज्य सगळीकडे गारपीट होते आहे या गारपीटीमुळे शेतकर्यांचे पिक जमीनिस्त झाले आहे या मध्ये गहू हरभरा ज्वारी बाजरी मका कापूस भाजीपाला इत्यादी पिके आहेत.तरी या सर्व पिकांचे तात्काळ पंचनामे करून एकरी 35000.% रू नुकसान भरपाई द्यावी आशी मागणी.राष्ट्रीय समाज पक्ष चे नेते अतुल भाऊ भुसारी यांनी केले आहे

यावल येथे आज २४ मार्च जागतिक क्षयरोग दिना निमित्त मास्क सेल्फी कॅम्पेनसह विविध उपक्रमांचे आयोजन

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

आज दिनांक २४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिना निमित्त येथील यावल तहसिल कार्यालयासह यावल एसटी आगारातील कर्मचारी क्षयरोग जन जागृती कार्यक्रम अंतर्गत मास्क सेल्फी कॅम्पेनसह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलीत. या कार्यक्रमाची सुरुवात तहसिल कार्यालयातुन करण्यात आली याप्रसंगी प्रभारी तहसीलदार रवीन्द्र पाटील , निवासी नायब तहसीलदार आर के पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.हेमंत बऱ्हाटे, वैद्यकिय अधिकारी डॉ बी बी बारेला , यावलचे मुख्यधिकारी बबन तडवी, फैजपुर चे मुख्यधिकारी किशोर चव्हाण , यावल पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी नईम शेख , पं.स . प्रशासन अधिकारी एम . के . रिढे विविध जिल्हा परिषद शाळाचे केन्द्र प्रमुख आणी मुख्यधिकारी यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते .आरोग्य विभागाचे श्रयरोग पर्यवेक्षक नरेन्द्र तायडे व सर्व आरोग्य कर्मचारी व गटप्रवर्तक कार्यक्रमास हजर होते .क्षयरोग हा मायक्रोबॅक्टेरिमय ट्युबरक्युलोसीस नांवाच्या जंतुमुळे होणारा अत्यंत संसर्गजन्य असा रोग आहे डॉ. रॉबर्ट कॉक यांनी १८८२ साली क्षयरोगाच्या जीवाणुंचा शोध लावला. त्यांच्या प्रबंध जागतिक शास्त्रज्ञांच्या परिषदेत दिनांक २४ मार्च रोजी मांडला होता . असा या महान शास्त्रज्ञ डॉ . रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेला सर्वप्रथम पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. यावल एसटी आगारातील वाहन चालक वाहक तसेच कर्मचारी यांना डॉ हेमंत बऱ्हाटे यांच्या हस्ते मास्क वाटप करण्यात आलीत, याप्रसंगी आगार व्यवस्थापक शांताराम भालेराव , वाहन परिक्षक संजय सावकारे आदी उपस्थीत होते. २४ मार्च जागतिक क्षयरोग दिनाचे घोषवाक्य THE CLOCK IS TICKING वेळ निघुन जात आहे . क्षयरोग उच्चाटंन गाठण्याची हे वेळ असुन, याच धर्तीवर क्षेयरोग दिन राबविण्याचे येत असुन , जागतिक स्तरावर क्षयरोग जनआंदोलन कॅम्पेन राबविले जात आहे . तरी आरोग्य प्रशासनाच्या माध्यमातुन क्षयरोग निर्मुलनासाठी वेगवेगळ्या उपाययोजना या घोषवाक्याच्या अनुषंगाने प्रसारीत करण्यात येत असल्याची माहीती यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ . हेमन्त बऱ्हाटे यांनी दिली .

गाव सांभाळण्या पाठोपाठ ! शेती सांभाळून सरपंच पतीचे पेरू ‘डाळिंब टरबूज ‘चे विक्रमी उत्पादन !

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

शेती हा एक असा व्यवसाय आहे की जिथे शेतकऱ्यांना अहोरात्र शेतामध्ये राब राब राबावे लागते तेव्हाच कुठे त्यांना उत्पादन घेतले जाते ‘शेती आणि फळबाग यामध्ये खूप अंतर आहे फळबाग घेत असताना फळबागांची अहोरात्र काळजी घ्यावे लागतील औषधाची फवारणी करावी लागते ‘गारपीट असेल असे लिहून असेल ज्या नैसर्गिक संकटांना सुद्धा सामोरे जावे लागते ‘परंतु या सर्वांना तोंड देत ‘शिंदी येथील सरपंच पती विनोद खरात यांनी ज्या पडीत जमिनी मध्ये जनावरेसुद्धा चारा खाण्यात जात नव्हते ।अशा पडीत जमीनीतून जमीन कसून मुरमाड जमिनीतून सोन घेतलं असं म्हटलं तर वागवे ठरू नये !त्यांनी मुरमाड जमीन कसून तीन एकर डाळिंबाची लागवड केली ‘त्याच बरोबर साडे चार एकरामध्ये विविध प्रकारच्या जातीच्या पेरूची लागवड केली ‘व त्यामध्येच टरबुजाचे आंतरपीक सुद्धा घेतले ‘अशा पद्धतीने डाळिंबाचे उत्पादन त्यांना सरासरी वर्षाला 40 ते 50 लाख रुपये पर्यंत मिळते ‘शिवाय डाळिंब हे बांगलादेश मध्ये सुद्धा निर्यात होत असते ‘त्यानंतर त्यांनी साडेचार एकरामध्ये पेरूची लागवड केली चार ते पाच फुटापर्यंत पेरूच्या झाडाला दीड ते दोन किलो पेरू फळ येतं ‘सध्या पेरूच्या फळाची विक्री सुरू आहे तर आंतरपीक असलेल्या टरबुजाची विक्री सध्या सुरू आहे पेरू आणि टरबूज मिळून त्यांना खर्च वजा जाऊन दीड ते दोन लाख रुपये नफा मिळत असतो !त्यामुळे विविध प्रकारचे प्रयोग करून सरपंच पती विनोद खरात हे आपल्या शेती व्यवसायासाठी तसेच बागायती पीक घेण्यासाठी सिंदखेडराजा तालुक्यामध्ये प्रसिद्ध आहेत !आतापर्यंत महाराष्ट्रातून दूरदुरून शेतकरी त्यांच्याकडून शेती पाहण्यासाठी व शेतीविषयक माहिती घेण्यासाठी येत असतात !

सिंदखेडराजा तालुक्यामध्ये एकूण 282कोरोनाचे रुग्ण !ग्रामीण भागामध्ये कोरोना चा विळखा अधिक घट्ट !196 ग्रामीण भागामध्ये तर86 रुग्ण शहरी भागातील !!

0

 

सिंदखेडराजा ( सचिन खंडारे )

24 मार्चला कोरोना या जीवघेण्या संसर्ग रोगाला आपल्या देशामध्ये एक वर्ष पूर्ण झाले ‘आणि अजूनही संपूर्ण देश आज कोरोना च्या दहशतीखाली जीवन जगत आहे दिवसेंदिवस कोरोना चा विळखा घट्ट होत आहे !अगोदर शहरी भागांमध्ये कोरोना अधिक घट्ट होत होता ग्रामीण भागामध्ये कमीत कमी कोरोना आढळून येत होता ।परंतु आता ग्रामीण भागातही कोरोणाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत आहे ।सिनखेडराजा तालुक्यामध्ये कोरोना चे एकूण 282 रुग्ण असून .त्यामधील 196 रुग्ण हे ग्रामीण भागातील आहे .तर 86 रुग्ण हे शहरी भागातील आहे ।त्यामुळे ‘ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा कहर सुरू झाला असून ‘नागरिकांनी अजूनही कोरोना या विषाणूला गांभीर्याने घेतली नसून ‘नागरिकांनी तोंडाला मास्क चा वापर व सॅनिटायझर चा वापर करावा असे आवाहन यावेळी तालुका आरोग्य अधिकारी महेंद्र कुमार साळवे यांनी केले आहे ‘त्यामुळे लोकांनी गांभीर्याने घेण्याची गरज निर्माण झाली आहे !

जळगांव जामोद वनपरिक्षेत्र मध्ये 40 हजार रु किमतीचा सलाई गोंद जप्त आरोपी फरार

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जा

दिनांक 23/03/2021 रोजी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना मिळालेल्या
गुप्त माहीतीवरुन, परिक्षेत्रातील क्षेत्रिय कर्मचारी हे करोली भिंगारा जुना रस्ता यावर दबा
धरुन बसले असता,काही लोकांचा पायी चालत येण्याचा आवाज ऐकू आला. त्यावरुन
त्यांना थांबविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी डोक्यावरील ओझे टाकून पळ
काढला.त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला असता,ते जंगलाचा रस्ता व अंधाराचा
फायदा घेवून पळून गेले. त्यांनी टाकलेल्या गोणीची पाहणी केली असता ,त्यामध्ये 16
गोणी अंदाजे 400 किलो वन उपज सालई गोंद असल्याचे दिसून आले व त्याची किंमत
अंदाजे रु.40,000/- एवढी आहे.त्याचा मोका पंचनामा करुन वनगुन्हा क्रमांक 721/13
दि.24/03/2021 जारी करण्यात आला
आहे. मा.श्री.अक्षय
गजभिये,उपवनसंरक्षक,बुलडाणा, मा.श्री.गायकवाड, सहा.वनसंरक्षक (प्रादेशिक व
कॅम्पा), बुलडाणा व मा.श्री.बि.डी.कटारिया, वनपरिक्षेत्र अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली
आरोपींचा शोध घेण्याचे काम श्री.पी.जी.सानप, वनपाल व त्यांची चमू करीत आहे.सदरचे
वनगुन्हे कामात मा.श्री.गिरीश जतकर परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी,
श्री.एस.पी.देवकर, वनरक्षक, श्री.ए.जी.घुईकर, वनरक्षक, श्री.एन.बी.उबरहंडे, वनरक्षक,
श्री.ओ.आर.खेडकर,वनरक्षक व फायर कॅम्पवरील मजुर यांनी मौलाचे सहकार्य केले
आहे.आरोपीचा शोध घेण्याची कार्यवाही सुरु आहे.
वनक्षेत्रामध्ये अवैध वृक्षतोड,अवैध गोंद वाहतुक किंवा वनाचे संबंधात इतर काही
गुन्हे निदर्शनास आल्यास त्यासंबंधी वनपरिक्षेत्र अधिकारी यांचेशी तात्काळ संपर्क
साधण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे.

यावल तालुक्यात कोरोनाचे उच्चाटंन काठण्यासाठी प्रशासनाची बैठक संपन्न आज पासुन रुग्णांची होम टु होम आरोग्य तपासणी मोहीमेस सुरूवात

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

तालुक्यात होम टु होम होणार कोरोना विषाणु संसर्गाच्या संदर्भात नागरीकांची आरोग्य तपासणी याबाबत आज महसुल प्रशासन , आरोग्य विभाग , नगर परिषद तथा शिक्षण विभागाव्दारे घेण्यात आलेल्या तातडीच्या बैठकीत या विषयावर सविस्तर करण्यात आली चर्चा . दरम्यान यावल तहसील कार्यालयाच्या नुतन प्रशासकीय ईमारतीच्या कार्यालयात आज दिनांक २३ मार्च रोजी सकाळी १० , ३०वाजता प्रभारी तहसीलदार आर डी पाटील , निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत कोरोना संक्रमणाच्या वेगाने वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर शासनाच्या आदेशाची तात्काळ अमलबजावणी व्हावी या दृष्टीकोणातुन यावल तालुक्यातील विधिध विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तातडीची बैठक घेण्यात आली . दरम्यान यावल तालुक्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव आणी रुग्णांची वाढती संख्याही प्रशासना करिता चिंतेचा विषय बनले असुन , शासन पातळीवर कोरोना संक्रमणाचे उच्चाटंन गाठण्यासाठी युद्धपातळीवर विविध उपाय योजना राबविण्यात येत आहे . याच पार्श्वभुमीवर आरोग्य प्रशासनाच्या माध्यमातुन गावनिहाय व शहरी क्षेत्रातील होम टु होम प्रत्येक नागरीकांच्या आरोग्याची तपासणीची मोहीम आजपासुन सुरू करण्यात आली असुन या करीता ग्रामीण पातळीवर शिक्षक , आरोग्य सेविका, आशा कर्मचारी यांचे संयुक्तगट या आरोग्य तपासणी मोहीमेत सहभागी झाले असुन , प्रतिदिन सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयास या कोरोना रुग्णांच्या तपासणीचा अहवाल सादर करावा लागणार असल्याचे यावेळी महसुल प्रशासनाच्या वतीने मार्गदर्शनपर माहिती देतांना सांगण्यात आले . या कोरोना रुग्ण तपासणी मोहीम संदर्भातील आढावा बैठकीस प्रभारी तहसीलदार रविन्द्र पाटील , निवासी नायब तहसीलदार आर के पवार , तालुका आरोग्य अधिकारी डॉ . हेमन्त बऱ्हाटे , नगर परिषदचे मुख्यधिकारी बबन तडवी, फैजपुर नगर परिषद मुख्यधिकारी किशोर चव्हाण, यावल ग्रामीण रुग्णालयाचे डॉ .बी बी बारेला, पंचायत समितीचे गट शिक्षण अधिकारी एन के शेख , यावल नगर परिषदचे रमाकांत मोरे , शिवानंद कानडे, पं .स .चे प्रशासन अधिकारी जी एम रिढे, फैजपुरचे कर निरीक्षक बाजीराव नवले , गट समन्यवयक प्रमोद रामा कोळी, एस के शेख , सुभाष प्रकाश तायडे , न्हावीच्या केन्द्र प्रमुख सौ . जयप्रभा पितांबर बोरोले, दहीगाव केन्द्र प्रमुख विजय ठाकुर , किनगावचे केन्द्र प्रमुख प्रमोद सोनार , अंजाळे जि .प . शाळा मुख्यध्यापक मनोहर चौधरी आदींनी या सहभाग घेतला .

कार्यकारी अभियंता बेबंळा प्रकल्प विभाग यवतमाळ येथे घुईखेड वासीयांचे आमरण उपोषण

0

 

 

घुईखेड येथील अनुसूचित जाती बौध्द व वंचित वहुजन समाजातील लोकांना त्यांच्या सुटलेल्या अतिक्रमण व अतिरिक्त बांधकाम केलेल्या घरांचा मोबदला देण्यात यावा या प्रलंबित न्याय मागणीची पुर्तता करण्यात यावी. या करीता सामाजिक कार्यकर्ते आयु.अनिल आर वरघट घुईखेड (अध्यक्ष बेबंळा प्रकल्पग्रस्त संघर्ष समिति अमरावती जिल्हा) यांचे कुशल नेतृत्वात सोमवार दि 22/3/2021 ला सकाळी 10,30 वाजता पासुन कार्यकारी अभियंता बेबळा प्रकल्प विभाग यवतमाळ* यांच्या कार्यालया समोर  आमरण उपोषण  करण्यात आले.
या आमरण उपोषणात सहभागी असलेले खालील अतिक्रमण धारक कार्यकर्ते सर्वश्री किशोर नरगळे, दुर्योधन धाबर्डे, प्रेमदास वरघट, नागोराव डांगे, प्रकाश नाना वरघट, नारायण वरघट, नितीन वरघट, रमेश कवडू धाबर्डे, सुनिल नरगळे, पवन अशोक वरघट, सतिश मारोती मेश्राम, संदिप भालचंद्र गजघाटे ,अमोल देविदास शंभरकर, पदमाकर गजघाटे, दिनेश वरघट, कवडू चद्रभान राऊत, गजानन गिरी, सचिन किसन वरघट, प्रविन रंगारी, विलास मारोतराव मेश्राम, तेजस भिमराव मेश्राम, राजेश न्यानेश्वर वानखडे, आनंद वानखडे प्रविन ना वरघट, नरेश भानुदास खंडारे, कपिल श्रीधर मेश्राम, बजरंग भगवान शिंदे,सुरेश नवघरे,
आदी अतिक्रमण धारक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झालेले होते.

स्वस्त धान्य दुकानदारांची बनवाबनवी च्या गैर कारभारा बाबत आम आदमी पार्टी च्या वतीने वर्धा जिल्हा अधिकारी यांना निवेदन

0

 

सचिन वाघे वर्धा

वर्धा दी.24 मार्च 2021
शहीद दिनाच्या दिवसी वर्धा जिल्हा आप च्या वतीने स्वस्त धान्य दुकान मध्ये होत असलेल्या गैरव्यवहार बाबत निवेदन देण्यात आले,निवेदनात जनतेला निकृष्ठ दर्जाचे मिळत असलेले धान्य,मशीन द्वारे पावती मिळत नाही,फक्त एकच किलो चणा डाळ मिळत असते,मक्का जबरदस्तीने दिला जातो,तो ईच्छेप्रमाणे द्यायला हवा,पावती मशीन 1 वर्षापासुन खराब आहे असे दुकान दाराच्या वतीने सांगितले जाते,ग्राहकाला त्याच्या कोट्या प्रमाणे धान्य मिळाले पाहिजे,ते चांगले प्रतीचे असायला पाहिजे,
आदी प्रकार चे गैर व्यव स्थापन बाबत निवेदन देण्यात आले
त्यात ताबडतोब सुधार झाला पाहिजे असा आग्रह चर्चे दरम्यान धरण्यात आला अती रिक्त जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे सोबत जिल्हा कमेटी च्या वतीने सखोल चर्चा झाली,अधिकारी यांनी कारवाई करण्याची सूचना करतो असे सांगितले
या वेळी जिल्हा प्रमूख प्रमोद भोमले वर्धा जिल्हा आप,ममता कपूर महिला आघाडी अध्यक्षा वर्धा जिल्हा आप,पूनम गुल्हने श्रध्दा तिवारी,रवी बाराहाते मंगेश शेंडे ,दुर्गा प्रसाद मेहरे तुळसीदास वाघमारे,प्रकाश डोडानी, समीर बेग,प्रमोद हजारे, आदी उपस्थित होते
.