Home Blog Page 510

लग्नखर्चाला फाटा देत अभ्यासिकेला 10000 रु ची मदत: सचिन आणि पूनम चे स्वागतार्ह पाऊल

0

 

नांदुरा(प्रफुल्ल बिचारे पाटिल):-

खुमगाव येथील श्री अशोक सुखदेव वावगे यांचे चिरंजीव सचिन, व पान्हेरा येथील श्रीराम सखाराम राखोंडे यांची कन्या चि.सौ.कां. पूनम, यांचा शूभविवाह दि. 15 मार्च 2021 रोजी पान्हेरा येथे संपन्न झाला. महापुरुषांना आदर्शस्थानी मानणाऱ्या या नवदाम्पत्याने लग्नातील खर्चाला फाटा देत खुमगावात येथे लोकवर्गणीतून साकारण्यात आलेल्या अभ्यासिकेला मदत देण्याचा आदर्श निर्णय घेतलाय. आज गावात प्रवेश करताच आधी अभ्यासिकेला 10000 रु ची मदत देऊन एक सामाजिक काम करूनच सचिन आणि पूनमताई यांनी गृहप्रवेश केला. गावातील नवीन पिढी शिकावी म्हणून शेतकरी कुटुंबातील नवदाम्पत्याने बाळगलेल्या या भावनेचे सर्वत्र कौतुक होत आहे.

जलजागृती सप्ताहाचे अधिक्षक अभियंता यांच्याहस्ते उद्घाटन 22 मार्च पर्यंत चालणार जलजागृती सप्ताह

0

 

अजहर शाह मोताळा प्रतिनिधी

बुलडाणा:-जागतिक जलदिन 22 मार्च निमित्त दि. 16 ते 22 मार्च 2021 या कालावधीत जिल्हयात जलजागृती सप्ताहचे उदघाटन बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडाचे अधीक्षक अभियंता नितीन सुपेकर यांचे हस्ते मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कोविड-19 नियमांचे पालन करून करण्यात आले. गतवर्षीच्या तुलनेत सिंचनात 10 टक्के वाढ करणे, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी जनप्रबोधन करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.
अधीक्षक अभियंता यांचे दालनात झालेल्या कार्यक्रमात जिल्हयातील खडकपुर्णा, पैनगंगा, वान, मन, नळगंगा, पुर्णा, ज्ञानगंगा, विश्वगंगा या प्रमुख नद्यांचे जलपुजन करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी नितिन सुपेकर यांनी उपस्थितांना जलप्रतिज्ञा वाचन करुन पाणीबचतीचे महत्व जनतेस पटवुन देण्याचे आवाहन केले. या सप्ताहा दरम्यान दि. 17 ते 21 मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह साजरा करतांना स्थानिक प्रशासनाच्या निर्देशानुसार कोव्हीड प्रादुर्भावाच्या लागु असलेल्या निर्बंधाचे काटेकोरपणे पालन करावे, नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याच्या आवाहन अधिक्षक अभियंता नितीन सुपेकर यांनी केले. जलजागृती सप्ताहात पाणीबचती विषयी जनजागृती करणे, विभागाच्या वाहनांवर पोष्टर्स लावणे, पाणीबचती विषयी मान्यवर वक्त्यांचे प्रबोधनपर सेमिनार आयोजित करणे, मान्यवरांच्या पाणी बचत, पाणी वापर संस्था व कालवा स्वच्छता ईत्यादी विषयावर यशोगाथा आयोजित करणे. सोशल मिडीयावर पाणी बचती विषयी जनजागृती करणे अशाप्रकारे जास्तीत जास्त ONLINE स्वरुपात साजरा करण्याचे निर्देश देण्यात आलेत.
यावेळी प्रमुख उपस्थितीत पेनटाकळी पाणी वापर संस्थांच्या महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र गाडेकर यांनी पाणीवापर संस्था व जलसंपदा विभाग यांच्या समन्वयाने केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचे महत्व विषद करुन, पाणी ही काळाची गरज असुन, पाणी बचत करणे आवश्यक असल्याचे सांगीतले. उपकार्यकारी अभियंता श्रीमती क्षितीजा गायकवाड यांनी याप्रसंगी गृहीणींनी दैनंदिन
काम काजासाठी आवश्यक पाण्याचा वापर काटकसरीने करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहा.अधिक्षक अभियंता तुषार मेतकर, शाखा अभियंता अनिल खानजोडे, सहा.अधिक्षक अभियंता अंकुश गावित, लघुलेखक भरत राऊत, करण उमाळे, नितीन डब्बे, शत्रुघ्न धोरण, शेख ग्यासुद्दीन आदींनी प्रयत्न केले. संचालन व आभार प्रदर्शन मनजीतसिंग राजपुत यांनी मानले. या कार्यक्रमासाठी जलसंपदा विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

जळगाव जामोद तालुक्यात कडुनिंबाची झाडांची कत्तल करून तस्करी करणारी टोळी सक्रिय सूनगाव येथे वनविभागाची कारवाई आरोपी फरार

0

 

 

अनिलसिंग चव्हाण बुलढाणा

जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव येथून जळगाव जामोद रोडवर गोरक्षनाथ नदीपात्रात एक भलेमोठे हिरवे कडूनिंबाचे झाड मशिनद्वारे कापून नेत असताना प्रवासी नागरिकांनी व पत्रकारांनी विचारणा केली असता , सदर झाड कापणारे आरोपी पळ काढला. उपस्थित नागरिकांनी व पत्रकारांनी वनविभागाशी सम्पर्क करताच
जळगाव जामोद वनविभागाची वाहन
घटनास्थळी पोचले, या ताफ्यामध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी कटारिया साहेब,वनपाल सानप, वनरक्षक खेडकर व इतर वनकर्मचारी हजर होते.
या अधिकाऱ्यांनी सखाराम वंडाळे यांच्या बांधावरील या कटलेल्या झाडाची पाहणी करून मोजमाप घेतले त्याचप्रमाणे शेतकरी अनिल वंडाळे यास घटनास्थळी बोलवून याबाबतीत जबाब नोंदवून घेतला.
सदर शेतामध्ये दोन अंदाजे 30 ते 40 वर्ष जुने हिरवे कडुनिंब कापलेल्या अवस्थेत आढळून आले.यापैकी एक झाडाचे लाकूड गायब होते ,तर दुसरे झाड कापून नेण्याच्या तयारीत होते.
सम्पूर्ण तालुक्यात बऱ्याच शेतीच्या बांधावरील कडुनिंबाची झाडे गायब होत आहेत, तर ही चोरी की अवैध विक्री हा तपास होणे गरजेचे आहे.
आधीच सातपुडा पर्वत वरील व वनविभागाची वृक्षांची प्रचंड हानी झालेली असताना शेतकऱ्यांनी बांधावर जपलेली ही कडुनिंबाची झाडे अशी वेगाने कमी झाल्यास पर्यावरणाची प्रचंड हानी होणार आहे,
यावेळी उपस्थित पत्रकार व पर्यावरण प्रेमी नागरिकांनी वनाधिकारी कटारिया याना सदर टोळीचा तपास लावण्याची व योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली , कत्तल झालेल्या पैकी एक झाड ची परीघ 3.2मीटर असल्याचे वनधिकारिणी सांगितले.
याविषयी शेतकऱ्यांशी व नागरिकांशी चर्चा केली असता अशी माहिती समोर येत आहे की, बांधावरील हिरवी झाडे खरेदी करणारी एक परप्रांतीय टोळी सक्रिय असून तालुक्यातील काही एजंट शेतकऱ्यांना काही पैसे चे अमिष दाखवून झाडांचा सौदा घडवून आणतात व त्यानंतर रातोरात मशिनद्वारे कापून वाहनाने जिल्हाबाहेर नेण्यात येते.
असे फिल्म् स्टाईलवृक्षतस्कर तयार झाल्याने जळगाव जामोद वनविभासमोर आव्हान उभे ठाकले आहे. याविषयीचे आरोपींचे व्हीडिओ व गाडीची नंबर प्लेट यांचा फोटो समाजमाध्यमात व्हायरल झाल्याने
आता या प्रकरणी वनविभाग काय कारवाई करते याकडे सर्व तालुक्यातील वणप्रेमींचे लक्ष लागले आहे.
बातमी लिहेपर्यंत पंचनाम्याव्यतिरिक्त कोणतीही ठोस कारवाई वनविभागाने केली नाही

सूनगाव येथे सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन

0

 

गजानन सोनटक्के जळगाव जामोद

आज दिनांक 16मार्च रोजी ग्रामपंचायत वार्ड क्रमांक 1 व 6 ला लागून असलेला जिल्हा परिषद शाळा समोरील रस्ता या रस्त्याचे भूमिपूजन सरपंच रामेश्वर अंबडकार यांच्या हस्ते करण्यात आले रस्त्याचे बांधकाम हे जिल्हा परिषद सदस्य रुपलीताई काळपांडे यांच्या विकास निधीतून होणार आहे यावेळी जिल्हा परिषद सदस्य रूपालीताई काळपांडे यांनी भूमिपूजन केले यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष गुणवंतराव कपले माजी पंचायत समिती सदस्य अशोक काळपांडे ग्रामपंचायत सदस्य राहुल इंगळे संतोष वंडाळे योगिताताई कुर्वाडे विमलताई काळपांडे दिनेश ढगे आला सिंह राजपुत विजय वंडाळे उमेश कुर्वाडे लक्ष्मण काटोले ग्रामपंचायत सचिव चौधरी साहेब ग्रामपंचायत कर्मचारी व गावकरी हजर होते

न्हावी येथे एका आदीवासी शेतमजुराची विहीरीत उडी घेवुन आत्महत्या पोलीसात अक्समात घटनेची नोंद . .

0

 

, यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

, तालुक्यातील न्हावी येथे शेतातील विहीरीत उडी घेवुन एका आदीवासी शेतमजुराची. आत्मह्त्या पोलीसात अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली आहे . दरम्यान फैजपुर पोलीस सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीनुसार न्हावी तालुका यावल येथील प्रगतीशील शेतकरी टेनु डोंगर बोरोले यांच्या न्हावी शिवारातील शेतात काल दिनांक १५ मार्च रोजी रात्री ११, ३० वाजेच्या सुमारास त्याच शेतात कामास असलेले प्यारसिंग रेमसिंग बारेला वय४५ वर्ष राहणार माळीवाडा न्हावी यांनी शेतातील विहीरीत उडी घेवुन पाण्यात बुडुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे . प्यारसिंग बारेला याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावलच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ .बी बी बारेला यांनी केले असुन ,या संदर्भात फैजपुर पोलीस स्टेशनला अक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन , घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रकाश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत असुन मयतास पत्नी , दोन विवाहीत मुली आणी एक मुलगा आहे .

यावल महसुल पथकाची वाळु माफीयाच्या विरूद्ध डांभुर्णी परीसरात कारवाई ट्रॅक्टर चालकाने केला अयशस्वी पळुन जाण्याचा प्रयत्न , . .

0

 

यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

, तालुक्यातील डांभुर्णी गावातुन अवैध वाळुची वाहतुक करणारे ट्रॅक्टर वाहन महसुलच्या धडक मोहीमेत पकडण्यात आले असुन , महसुल प्रशासनाने आठ दिवसात केलेली पाचव्या कारवाईमुळे विना परवाना वाळुची वाहतुक करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे . दरम्यान या संदर्भात मिळालेली माहीती अशी की आज दिनांक १६मार्च रोजी सकाळी ५ , ३० वाजेच्पा सुमारास डांभुर्णी गावातुन गावाजवळच्या नाल्यात साठवण करून ठेवलेल्या अवैद्यरित्या ट्रॅक्टर वाहन क्रमांक एमएच १९ सियु९८०२यातुन कोळन्हावी येथील राहणार पिंताबर समाधान सोळुंके हे महसुल प्रशासनाच्या नायब तहसीलदार आर के पवार , फैजपुर मंडळातील तलाठी पी पी जावळे , आमोदे येथील तलाठी एम पी खुर्दा, पोलीस कर्मचारी भुषण चव्हाण तहसीलदारांचे वाहन चालक हिरामण सावळे यांनी विनापरवाना वाळुची वाहतुक करतांना ताब्यात घेतले असुन, सदरच्या विनापरवाना वाळुची वाहतुक करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांनी दिली असुन, महसुलच्या वाळु माफीयाच्या विरुद्ध सुरू केलेल्या मोहीमेअंतर्गत आठ दिवसातील पाचवी कारवाई झाल्याने वाळु माफीयावर चांगला वचक बसल्याचे दिसुन येत आहे . यावेळी महसुलच्या पथकाने घटनास्थळी जावुन वाळुचा पंचनामा करून ट्रॅक्टर वाहन जमा केले आहे . दरम्यान वाळुची वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांने कारवाईच्या भितीने वाहन घेवुन पळुन जाण्याचा देखील प्रयत्न केला मात्र महसुलचे वाहन चालक हिरामण साळवे यांनी समय सुचकता बाळगुन वाळुची वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अत्यंत खडतर मार्गावरून सुमारे पाच किलोमिटर पाठलाग करून वाहनास पकडण्यात यश मिळवले .

यावल येथे उत्तर प्रदेश शिया वक्फ बॉर्डाचे अध्यक्ष रिजवी यांच्याविरुद्ध मुस्लीम युवकांनी केली गुन्हा दाखलची मागणी .

0

 

. यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे

, उत्तर प्रदेश येथील शिया वक्फ बॉर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी पवित्र धर्मग्रंथ कुरानच्या आयात वगळण्यात याव्यात अशी मागणीची याचिका सर्वोच्च न्यायलयात दाखल केली असुन, रिजवी यांनी दाखल केलेली याचिका सर्वाच्च न्यायलयाने फेटाळुन लावावी अशी मागणी यावल येथील मुस्लीम युवकांच्या वतीने करण्यात आली आहे .दरम्यान यावल शहर मुस्लीम समाज युवकांनी यावलचे पोलीस निरिक्षक सुधिर पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की , उत्तर प्रदेश राज्यातील शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिजवी यांनी त्यांच्या वतीने सर्वाच्च न्यायलयात एक याचिका दाखल केली असुन या याचिकेत त्यांनी म्हटले आहे की मुस्लीम पवित्र धर्मग्रंथामधील २ ६ आयात वगळण्यात यावी असे बोलुन ईस्लामचे पहीले तिन खलिका यांच्या विरूद्ध अनेक बिनबुडाचे आरोप लावुन म्हटले आहे की पवित्र धर्मग्रंथ कुरान हे आंतकवादाची शिकवण देतो ,सुरूवातीच्या मुस्लीम खलिका यांनी हा फैलाव केला असल्याचे म्हटले असून, कुराण मुळेच मुस्लीम युवक हे आंतकवादाकडे वळत आहे असे त्यांनी म्हटले आहे . सदरची वसीम रिजवी यांनी केलेले कुरान बाबतचे वक्तव्य हे सोशल मिडीयाच्या माध्यमातुन सर्वत्र पसरले असुन या प्रकारामुळे देशातील मुस्लीम समाज बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या जात आहे . अशा प्रकारे ईस्लाम धर्माबाबत गैरवक्तव्य व अपप्रचार करून धार्मिक भावना निर्माण करून तेढ निर्माण करण्याचा हा वसीम रिजवी यांचा खेळ असुन , त्यांच्या विरूद्ध भादवी कलम२९५अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली असुन या निवेदनावर अजहर शेख , कदीर खान नसीर खान , तौसीफ शेख नजमोद्दीन ,अल्ताफ शेख समद, पप्पु बिल्डर , जावीद शेख , आसीफ शेख , अनिल जंजाळे , नगरसेवक अस्लम शेख नबी , जहीर खान , आसिफ शेख शरीफ आणी ईमरान पहेलवान यांच्या स्वाक्षरी आहे .

यावल तहसील कार्यालयात पोलीस पाटीलासह दोन दारूड्यांचा दांगडो शांततेचा भंग पोलीसात गुन्हा दाखल. . .

0

 

, . यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

,येथील तहसील कार्यालयात पोलीस पाटीलासह दोन दारूड्यांचा दारूच्या नशेत दांगडो या दोघांविरूद्ध पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या संदर्भात मिळालेली माहीती अशी की दिनांक १५ मार्च रोजी यावल येथील तहसील कार्यालयातील तहसीलदार यांच्या दालनात अकलुुद तालुका यावल येथील कार्यरत असलेले पोलीस पाटील किरण मधुकर वानखेडे वय४४ वर्ष आणी दिपक विश्वनाथ झाल्टे वय४९ वर्ष राहणार अकलुद तालुका यावल यांनी दुपारी १२ , ५० वाजेच्या सुमारास दारूच्या नशेत झिंगलेल्या अवस्थेत आरडाओरड करीत तहसील कार्यालयात शांततेचा भंग करीत असल्याची माहीती तहसीलदार महेश पवार यांनी पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांना भ्रमणव्दारे सदरची माहीती कळविली असता पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांनी पोलीस कर्मचारी यांनी तात्काळ शासकीय वाहनाने तहसील कार्यालय पाठवले व या दोघ तळीरामांना बेधुन्द अवस्थेत ताब्यात घेतले , या घटने बाबतची माहीती सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी यांनी दिल्याने पोलीसांनी पोलीस पाटीलासह दोघांविरूद्ध शांततेचा भंग महाराष्ट्र प्रोव्हीशनल अँक्ट८५ (१ ) महाराष्ट्र पोलीस कायदा कलम११७ , ११२प्रमाणे गुन्हा दाखल केला आला असुन , पुढील तपास पोलीस निरिक्षक सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी , पोलीस कर्मचारी निलेश कैलास वाघ, रोहील देवीदास गणेश हे करीत आहे .

सोमनाथ चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त विविध ठिकाणी मास्क वाटप..  

0

 

बोरगाव बु!! येथील सोमनाथ चव्हाण यांनी त्यांच्या वाढदिसानिमित्त बोरगाव, जाफराबाद व माहोरा या ठिकाणी मास्क वाटप केले. त्यांनी जिल्हा परिषद शाळा बोरगाव, श्री शिवाजी विद्यालय बोरगाव, ग्रामपंचायत कार्यालय बोरगाव तसेच माहोरा व जाफराबाद या सार्वजनिक ठिकाणी मास्क वाटप करून अनोख्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा केला.सोमनाथ चव्हाण यांनी याअगोदर सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम राबून जनजागृती केली आहे.
सोमनाथ चव्हाण हे नेहमीच वेगळ्या पद्धतीने समाज जागृती करण्याचे काम करत असतात परंतु आज तर त्यांनी वाढदिवसाच्या दिवशी केक न कापता कोरोणा रोगापासून लोकांचा बचाव व्हावा या हेतूनं विविध ठिकाणी मास्क वाटप केले.या वेळी सोमनाथ चव्हाण,संदीप पाटील जाधव,विनोद पाटील फदाट ग्रामपंचायत कार्यालयाचे विविध कर्मचारी, जिल्हापरिषद शाळेचे मुख्याध्यापक,शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी तसेच शेतकऱ्यांचे आणि विद्यार्थ्यांचे युवा नेते हर्षल फदाट ,मधुकर जाधव, सचिन फदाट प्रदीप चव्हाण व गावकरी उपस्थित होते.

यावल येथे तहसील कार्यालयात आज जागतिक ग्राहक दिनानिमित्त ऑनलाईन कार्यक्रमासंपन्न,. 

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे,

येथील तहसील कार्यालयात आज जागतिक ग्राहक दिन निमित्ताने महसुल विभागाच्या विविध अधिकारी यांच्या उपस्थितीतऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. दरम्यान १५ मार्च या जागतिक ग्राहक दिनानिमित्त साजरा करण्यात येत असतो यावर्षी देखील राज्य शासनाच्या वतीने जागतिक ग्राहक दिन साजरा करण्याच्या सुचना प्राप्त झाल्या होत्या, यावेळी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर राज्य शासनाने जिल्हास्तरिय वेबिनारद्वारे १५ मार्च रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव येथे आयोजीत करण्यात आले होते . यासाठी या कार्यक्रमास जळगाव जिल्ह्यातील तालुक्याल विविध विभागातील तहसीलच्या अधिकारी यांनी ऑनलाईन उपस्थित राहण्याच्या सुचना जळगाव जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी यांनी सुचना दिल्या होत्या , त्या अनुषगांने आज यावल तहसील मधील निवासी नायब तहसीलदार आर के पवार यांच्या मार्गदर्शनाखाली यावल पुरवठा विभागाचे अव्वल कारकुन तथा करमणुक निरिक्षक राजेश भंगाळे, पुरवठा हिशोबनिस कारकुन सकावत तडवी , सुयोग्य पाटील संगणक संचालक योगेश्वरी ताडे , प्रविण तायडे यांच्यासह खातेनिहाय विविध प्रशासकीय अधिकारी आदीनी या जागतिक ग्राहक दिनानिमित्त संपन्न झालेल्या ऑनलाईन कार्यक्रमात आपला सहभाग नोंदविला .