Home Blog Page 57

रमाई घरकुल योजनेचा दुसरा हप्ता द्या नसता ठीया आंदोलन करू शिवसेना उ.बा.ठा.(gharkulyojna)

0

 

लोणार सय्यद जहीर

gharkulyojna :लोणार रमाई घरकुल योजनेचा दुसरा हप्ता त्वरित घ्या नसता नगर परिषदेमध्ये ठिय्या आंदोलन करू असा इशारा शिवसेना उ.बा.ठा. च्या वतीने मुख्याधिकारी नगरपरिषद लोणार यांना देण्यात आला

त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana)

लोणार येथील रमाई घरकुल योजनेअंतर्गत मुख्याधिकारी यांनी विधान सभा निवडणुकीच्या अगोदर घाई घाईने पन्नास हजार रुपयांचा पहिला हप्ता सदरील घरकुलधारकांना दिला त्यानंतर लाभार्थ्यांनी आपले घर पाडले व नव्याने बांधकाम करण्यास सुरुवात केली.

या घटनेस पाच महिने उलटून गेले तरी अद्याप पुढील हप्ता त्यांना मिळालेला नाही नगरपरिषदेने पहिला हप्ता विधानसभा निवडणुकी अगोदर गडबडीत का होत नाही पण दिला आणि तो दिला म्हणजे प्रशासनाने सर्व कागदपत्रांची पूर्तता, नियम अटी घरांचे सर्वे करूनच व संपूर्ण अभ्यासुनच दिलेले आहे मग दुसरा हप्ता देण्यास काय हरकत आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

सदरील लाभार्थी यांच्या डोक्यावरचे छत हिरावलेले आहे, त्यांचे संसार उघड्यावर आले आहे करिता आपण त्यांचा पुढील हप्ता येत्या पंधरा दिवसाच्या आत देण्यात यावा.

gharkulyojna:नसता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तसेच लाभार्थी यांच्यासह नगरपरिषद कार्यालयावर ठिय्या आंदोलन करण्यात येईल याची आपण गांभीर्याने नोंद घ्यावी असा इशारा शिवसेना उबाठाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछीरे तालुकाप्रमुख एड. दीपक मापारी, शहर प्रमुख गजानन जाधव, महिला तालुकाप्रमुख तारामती जायभाये, शहर संघटक कैलास अंभोरे, शहर उपप्रमुख लुकमान कुरेशी, विभागप्रमुख गोपाल मापारी, सुदन अंभोरे, युवा सेना शहर प्रमुख श्रीकांत मादनकर, विनायक मापारी, अमोल सुटे, फहीम खान, ज्ञानेश्वर दूधमोगरे, सचिन सरदार, गुलाब सोनवणे आदींनी दिला

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या समुद्रपूर शहराध्यक्ष पदी मधुकर कामडी यांची नियुक्ती..(sharadpawar)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

sharadpawar:समुद्रपूर: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या समुद्रपूर शहराध्यक्ष पदी मधुकर कामडी यांची नियुक्ती करण्यात आली.सदर नियुक्ती कार्यक्रम वर्धा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार अमर काळे,जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, तालुका अध्यक्ष महेश झोटींग पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नियुक्ती करण्यात आली.

त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana)

मधुकर कांबळे समुद्रपूर नगर पंचायतिचे गटनेता म्हणून त्यांनी काम केले आहे.त्यांची समुद्रपूर शहर तसेच ग्रामीण भागात मजबुत पकड असून त्यांच्या नियुक्तीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संघटन अधिक मजबूत होणार आहे. नवनियुक्त शहराध्यक्ष मधुकर कांमडी यांनी पक्षाचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील,

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या मार्गदर्शनात पक्ष संघटन अधिक मजबूततीसाठी व पक्ष विस्तारासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

sharadpawar:या प्रसंगी समुद्रपूर तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, जिल्हा सरचिटणीस गजानन शेंडे, जिल्हा सरचिटणीस सुभाष चौधरी, गणेश वैरागडे, प्रदीप डगवार, युवक तालुकाध्यक्ष तुषार थूटे, सोनू मेश्राम, सुरेश भगत आदी उपस्थित होते..

ट्रकमध्ये संसार मांडलेले दाम्पत्य: सिंदखेड राजा तालुक्यातील एकनाथ पवार यांची संघर्षमय कहाणी(Truck driver)

0

 

अनिलसिंग चव्हाण (संपादक )

Truck driver:सिंदखेड राजा तालुक्यातील जनुना गावचे रहिवासी एकनाथ तुकाराम पवार आणि त्यांची पत्नी ललिता पवार यांची जीवनकथा ही एका अनोख्या संघर्षाची आहे. गेल्या दहा वर्षांपासून हे दाम्पत्य आपल्या कुटुंबासह ट्रकमधून प्रवास करीत आहे, ज्यामध्ये त्यांच्या तीन मुली देखील सोबत असतात. या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती इतकी बेताची आहे की दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी ललिता पवार देखील ट्रक चालविण्यात मदत करते.

एकनाथ पवार यांनी सांगितले की, आर्थिक परिस्थितीमुळे त्यांना पत्नीचा हातभार लागावा लागतो. त्यांच्या तीन मुलींपैकी दोन, ७ वर्षाची आणि ५ वर्षाची मुलगी, ट्रकमध्ये राहतात, तर ९ वर्षाची मोठी मुलगी गावात राहते. वडधामना येथे पवार कुटुंब आपल्या मुलींना घेऊन ट्रक भरण्यासाठी आले असताना ही संघर्षमय कहाणी समोर आली.

त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana)

 पुणे ते नागपूर: मालाची वाहतूक आणि संघर्ष

पवार कुटुंब पुणे ते नागपूर दरम्यान मालाची वाहतूक करते. अनेक वेळा दोन वेळच्या जेवणाची सुद्धा सोय होत नसल्याचे त्यांनी सांगितले. २०२३ मध्ये त्यांनी महिंद्रा कंपनीचा कर्ज काढून ट्रक विकत घेतला, मात्र ट्रकमधील तांत्रिक बिघाडांमुळे अनेकदा ट्रक रस्त्यात उभा करावा लागतो. यामुळे त्यांच्या उत्पन्नाच्या साधनावरही परिणाम होतो.

कर्ज आणि आर्थिक आव्हाने

ट्रकचे कर्ज फेडण्यासाठी महिन्याला ६८ हजार ५०० रुपयांचा हप्ता भरावा लागतो. इतके उत्पन्न मिळत नसल्यामुळे कुटुंबाला पैशे देऊ शकत नाहीत, त्यामुळे कुटुंबच सोबत ठेवल्यामुळे पैशाची बचत होत असल्याचे एकनाथ पवार यांनी सांगितले. एकनाथ पवार सांगतात की, कधी कधी त्याच्यावर इतका मानसिक दबाव येतो की ते आत्महत्या करण्याचा विचारही करतात.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

ललिता पवार: ट्रक चालविणारी आणि मुलींना अभ्यासासाठी प्रेरित करणारी आई

Truck driver:ललिता पवार याही ट्रक चालवण्यात त्यांना साथ देतात. याशिवाय ती मुलींना अभ्यासासाठी प्रेरित करते. मात्र, रस्त्यावर राहून मुलींना शिक्षण देणे आणि त्यांचे योग्य संगोपन करणे ही आव्हाने वाढत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

बुलढाणा जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर भीषण अपघात(samruddhi mahamarg)

0

 

अनिलसिंग चव्हाण ( संपादक )

समृद्धी महामार्ग:बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड जवळील समृद्धी महामार्गावर एक भीषण अपघात घडला, ज्यामध्ये दोन जणांचा जागेवरच होरपळून मृत्यू झाला आणि एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडला, जेव्हा मुंबईतून अकोल्याकडे जात असलेल्या कारचा अचानक स्फोट होऊन ती पेट घेतली.

त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana)

अपघाताची घटना अशी घडली की नागपूर कॅरिडोरवरून जात असलेल्या कारचे चालक अभिजीत अर्जुन चव्हाण (वय ३५) यांचे नियंत्रण सुटले, ज्यामुळे कार मिडीयममधील क्रॅश बॅरिअरला धडकून त्याची पट्टी कारच्या समोरील भागातून घुसून आरपार निघाली.

यानंतर कारने तात्काळ पेट घेतले आणि प्रवाशांना बाहेर निघता न आल्याने अकोला येथे बहिणीच्या घरी जात असलेले गणेश सुभाष टेकाळे (वय ४०) व राजू महंतलाल जयस्वाल (वय ३२, दोन्ही रा. मुंबई) यांचा जागेवरच होरपळून मृत्यू झाला. चालक अभिजीत हा गंभीर जखमी झाला आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

अपघातानंतर महामार्ग ॲम्बुलन्सचे डॉ. वैभव बोराडे, डॉ. यासीन शहा, चालक दिगंबर शिंदे यांनी तात्काळ जखमीला बीबी ग्रामीण रुग्णालय येथे उपचार कामी घेऊन गेले. अपघातातील मृत्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधून पुढील कारवाई करण्यात येत आहे. समृद्धी महामार्ग क्यूआरव्ही टीम व महामार्ग पोलीस तात्काळ घटनास्थळ गाठून सदर मृतदेह जळालेल्या अवस्थेत कारमधून बाहेर काढले.

समृद्धी महामार्ग:किनगाव राजा पोलीस स्टेशनचे ठाणेदार नरवाडे व देऊळगाव राजा उपविभागाचे मनीषा कदम यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पुढील कारवाई करीत आहेत. अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिस तपास करत आहेत.

परोपकारीवृत्ती जोपासत दिव्यागांना साहीत्यवाटप करून शिवरायांची जयंती साजरी(Hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:हिंगणघाट : शिवजयंती निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार – दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर द्वारा आयोजित दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला.

त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana)

याकार्यक्रमाला वर्धा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार अमर काळे, जिल्हाध्यक्ष सुनिल राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या प्रमुख उपस्थितीत दिव्यांग बांधवांना साहित्य वाटप करण्यात आले.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर यांनी दिव्यांग बांधवांसाठी साहित्य वाटप कार्यक्रम आयोजित करून दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण करण्याचे कार्य केले आहे.

बातमी  लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Hingnghat:त्यांचे खासदार अमर काळे यांनी अभिनंदन करीत शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटिल,शहराध्यक्ष बालू वानखेडे, सहकार नेते वासुदेव गौळकर,समाजसेवक सुनील डोंगरे, वाहतूक जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अमोल बोरकर,साहेबराव येडे,महिला शहर कार्याध्यक्ष सीमा तिवारी,सुचिता सातपुते, मीनाक्षी सोनटक्के, मीनाक्षी धाकने,विद्या गिरी, आचल वकील, दिपाली रंगारी, यांच्यासह सर्व प्रमुख पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते..

रामदेव बाबांची घोड्यासोबत रेस: श्वास रोखणारा व्हिडिओ व्हायरल(ramdev-baba-60-years-old-horse-race)

0

 

ramdev-baba-60-years-old-horse-race:चिमूर क्रांती येथे घोडा यात्रा दरम्यान 60 वर्षीय रामदेव बाबा यांनी घोड्यासोबत रेसिंगचा एक अनोखा प्रयत्न केला, ज्यामुळे सर्व प्रेक्षकांचे ध्यान वेधले गेले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि लोकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

घटनेची पार्श्वभूमी चिमूर क्रांती येथे दरवर्षी घोडा यात्रा आयोजित केली जाते, ज्यामध्ये लोक विविध स्पर्धा आणि कार्यक्रमांमध्ये भाग घेतात. या वर्षी 60 वर्षीय रामदेव बाबा यांनी घोड्यासोबत रेसिंगच्या स्पर्धेत भाग घेतला, ज्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले.

भ्रष्ट यंत्रणेचा गोंधळ जलजीवन विस्कळीत योजना ठरली पोल टाकी कशी कोसळली ग्रामस्थ हैराण!(brekingnews)

घटनेचे विवरण रामदेव बाबा यांनी त्यांच्या घोड्यासोबत रेसिंगच्या ट्रॅकवर धाव घेतली आणि त्यांच्या ऊर्जा आणि उत्साहाने प्रेक्षकांना आश्चर्यचकित केले. या स्पर्धेत अनेक तरुण आणि अनुभवी घोडेस्वार भाग घेत होते, परंतु रामदेव बाबा यांची धैर्यशीलता आणि कौशल्याने त्यांना विजेता बनवले.

प्रतिक्रिया आणि विश्लेषण
“रामदेव बाबा यांची ही कामगिरी खरोखर अद्भुत आहे. त्यांच्या वयातही त्यांनी घोड्यासोबत रेसिंग केली आणि विजय मिळवला, हे खरोखर प्रेरणादायी आहे,” असे एका प्रेक्षकाने सांगितले.

रामदेव बाबा यांनीही त्यांच्या यशाबद्दल बोलताना सांगितले, “मी ही स्पर्धा जिंकण्यासाठी खूप मेहनत केली आहे. माझ्या वयाची पर्वा न करता मी हे साध्य करण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या कुटुंबीयांचा आणि मित्रांचा पूर्ण पाठिंबा मिळाला.”

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

व्यापक परिणाम या घटनेने समाजात वयाची मर्यादा नसण्याची जाणीव करून दिली आहे. रामदेव बाबा यांच्या यशाने अनेक लोकांना प्रेरणा दिली आहे आणि त्यांनी दाखवून दिले आहे की वय ही कोणत्याही गोष्टीची मर्यादा नाही.

ramdev-baba-60-years-old-horse-race: श्वास रोखणारा व्हिडिओ रामदेव बाबा यांच्या रेसिंगचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि लोक त्याचे खूप कौतुक करत आहेत. या व्हिडिओने रामदेव बाबा यांना रातोरात प्रसिद्धी मिळवून दिली आहे.

भ्रष्ट यंत्रणेचा गोंधळ जलजीवन विस्कळीत योजना ठरली पोल टाकी कशी कोसळली ग्रामस्थ हैराण!(brekingnews)

0

 

खामगाव ( इस्माईल शेख ): ग्रामस्थांना शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा व्हावा या उद्देशाने केंद्र व राज्य सरकार ग्रामीण भागात जलजीवन योजना राबवित आहे. मात्र संबंधित ठेकेदार भ्रष्ट यंत्रणेमुळे सरकारच्या उद्देशाला छेद देत आहे.

मागीलवर्षी संग्रामपूर तालुक्यातील चिंचारी येथील पाण्याची टाकी कोसळल्यानंतर प्रकरण निस्तारण्याचे प्रकार सुरू झाले होते. परंतु याबाबत बिंग फुटल्याने कंत्राटदाराने पुन्हा पाण्याच्या टाकीचे बांधकाम करण्याचा करारनामा जि.प. पाणी पुरवठा विभागाला करून दिला होता. याचे काय झाले याची माहिती मिळाली नाही.

त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana)

पण खामगाव तालुक्यातही असाच प्रकार घडल्याने भ्रष्ट यंत्रणेमुळे जलजीवन योजनेचा ब‌ट्ट्याबोळ होत असून ही योजनाली

ग्रामस्थांच्या मुळावर उठत असल्याचे बोलले जात आहे. यासंदर्भात वृत्त असे की,

जलजीवन मिशन योजने अंतर्गत खामगाव तालुक्यातील अंत्रज या गावामध्ये पाण्याचे

टाकीचे बांधकाम सुरू असताना १५ फेब्रुवारी रोजी बांधकाम कोसळले. निकृष्ट दर्जाचे साहित्या वापरल्यानेच हा प्रकार झाला असावा. या घटनेने जिवितहानी झाली नसली तरी एकदोघांना दुखापत झाल्याचे समजते. या अगोदर सुद्धा २० – २० फ टाचे बांधकाम केल्यानंतर पिंजरा पाडण्यात आला होता.

या योजनेसाठी शासनाने ५ कोटी निधी उपलब्ध करून दिलेला आहे. या निधीचाही गैरवापर चालू आह. एका पावसाच्या पाण्याने पाईपलाईन उघडी पडली आहे. यापूर्वी यामध्ये एक बैलजोडी अडकून मृत्यूमुखी पडली असल्याचे सांगण्या येत आहे.

brekingnews:याबाबत सखोल चौकशी करून संबंधित दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

शिवजयंती निमित्त जय राजे मित्र मंडळाच्या वतीने भव्य ऐतिहासिक मिरवणूकीचे आयोजन(shivjayanti)

0

 

बुलडाणा जावेद शहा

shivjayanti:रायपूर प्र. दि. 17 फेब्रु शिवजयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी भव्य ऐतिहासिक मिरवणूक लवाजम्यासह जय राजे मित्र मंडळ यांचे वतीने रायपूर ता बुलडाणा येथे काढण्यात येणार आहे.

त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana)

सविस्तर वृत्त असे की, जय राजे मित्र मंडळ रायपूर यांच्यावतीने दरवर्षी मोठ्या उत्साहात शिवजयंती महोत्सवाचे आयोजन केले जाते. यामध्ये विविध व्याख्याने, विविध स्पर्धा घेण्यात येतात. एका आठवड्यापासून शिवजयंती उत्सवाला सुरुवात केली जाते. तसेच यावर्षी मोठ्या उत्साहामध्ये आपल्या राजाची जयंती साजरी करण्यात येणार आहे.

या मिरवणुकीचे विशेष म्हणजे आम्ही चिखलीकर ढोल पथक, महीला मावळे, घोडयावर विराजमान मा. जिजाऊ, छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी राजे, मावळे, चोपदार, भजन, विविध रथ, राजमुद्रा व भव्यदिव्य छत्रपती शिवाजी महाराज यांची सिंहासनावर आरूढ मुर्ती अशी ऐतिहासिक मिरवणूक काढली जाणार आहे.

shivjayanti:शिवजयंती विशेष म्हणजे रायपूर या गावात दिवाळी प्रमाणे दिपोत्सव करुन राजांचा उत्सव साजरा केला जातो. सर्व हिंदू -मुस्लिम बांधवांचा व सर्वधर्मीय समाजाचा सहभाग या जयंती मध्ये असतो. तरी सर्वांनी या सांस्कृतिक महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

गुरुदेव सेवा मंडळ द्वारा भव्य भजन खंजेरी स्पर्धा आयोजित(Hingnghat)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Hingnghat:हिंगणघाट:- गुरुदेव सेवा मंडळ हिंगणघाट द्वारा आयोजित विदर्भ स्तरीय भव्य खंजेरी भजन स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या हस्ते पार पडले.

कार्यक्रमाची सुरुवात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार त्यांच्या काळापासून ते आतापर्यंत प्रेरणा देत आहे.

त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana)

दरवर्षी नवीन लोक त्यांच्या विचारांना प्रेरित होऊन सामाजिक कार्यात सहभागी होतात.राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार सर्व धर्म समभाव विचार आहेत. ग्रामगीतेच्या माध्यमातून त्यांचे कार्य गुरुदेव सेवा मंडळाच्या माध्यमातून तरुण पिढी आत्मसात करीत आहे. असे मनोगत राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी व्यक्त करीत खंजेरी भजन स्पर्धेच्या सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.

Hingnghat:याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे विधानसभा बूथ अध्यक्ष अमोल बोरकर, गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष धनराज डंभारे, उपाध्यक्ष दादाराव कुबडे, सचिव मूलचंद खंदार, गजानन फाले, डॉ. संजय हिवरकर, नारायणराव खाडे, राजू चौधरी, श्याम कोरडे, दीपक वांढरे, दिनेश नेवारे, सुनिता हिवज यांच्यासह गावातील ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेगांव डिजीटल मिडिया परिषद उपाध्यक्ष शेख अमीन यांचा उत्साहात झाला वाढदिवस साजरा..(shegaonnews)

0

 

डिजिटल मीडिया परिषद शेगाव तालुका उपाध्यक्ष तसेच सहसंपादक मराठी समाचार 24 न्युज, शेगांव तालुका प्रतिनिधी सूर्या मराठी न्यूजचे शेख अमीन यांचा आज विश्राम भवन शेगांव येथे वाढदिवस साजरा करण्यात आला.

यावेळी अमीन शेख यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती जिजाऊ ज्ञान मंदिरात संपन्न(buldhana)

shegaonnews:यावेळेस डिजीटल मिडिया परिषद बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष नारायण दाभाडे, शेगांव तालुका अध्यक्ष विवेक शेगावकर, उपाध्यक्ष इस्माईल शेख, सचिव विजय खंडेराव, कोषाध्यक्ष गजानन ददगाळ, कार्याध्यक्ष संजय सुरवाडे, सहा संघटक अर्जुन कराळे.समाजसेवक प्रविण इंगळे, यशस्वी उद्योजक निखिल कांबळे, अल्पसंख्यांक नेते अस्लम साबरी, रियाझ जमदार हे उपस्थित होते..