Home Blog Page 582

कुसुमतेल येथे झापास लागलेल्या आगीत वृद्धाचा होरपळून मृत्यू सुमारे दिड लाखाचे नुकसान

0

सचिन पगारे नांदगांव नाशिक

नांदगाव तालुक्यात कुसूमतेल येथे मंगळवारी दि.१७ नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास झापेस आग लागल्याने हरी रामा वाजे (वय ७२ वर्ष) या वृद्धाचा होरपळून मृत्यू झाला, या आगीमुळे सुमारे दिडलाखाचे नुकसान झाले. सदर घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे.
नांदगाव तालुक्यातील कुसुमतेल येथील मयत हरी वाजे गट नंबर ९१ या शेतातील राहण्यासाठी बनविलेल्या झापेस मंगळवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास अचानक आग लागली असताना त्यांना वृध्दपकाळाच्या अशक्तपणामुळे खाटेवरुन उठता आले नसल्याने त्यांचा होरपळून मृत्यू झाला. तर त्यांच्या शेतातील साठवलेला ३० क्विंटल कापूस,१० बाजरीची पोते आणि संसारोपयोगी वस्तू असे एकूण १ लाख ५३ हजार रुपयांची नुकसान झाली असल्याचा येथील तलाठी भेंडाळे यांनी केलेल्या पंचनाम्यात नमूद करण्यात आले. सदर घटना घडली त्यावेळी मयत वाजे यांच्या पत्नी सकुबाई आणि मुलाची पंधरा वर्षाची मुलगी दिड किलोमीटर अंतरावर शेतात कापूस वेचनीसाठी गेलेल्या होत्या तर मुलगा भावडू आणि सुन इंदूबाई हे दोन मुलांना घेऊन दौंड सहकारी साखर कारखाना येथे उस तोडनीसाठी गेलेले होते.सदर आग लागलेल्या झापेने सोबतच शेजारी असलेल्या बाळू महादू मधे यांच्या झापालाही आगीचे भक्ष बनवले त्यात धान्याचे पूर्ण नुकसान झाले.
सदर अग्नितांडवाची माहिती समजताच येथील पोलीस पाटील अशोक पाटील,भय्यासाहेब धिवर, संजय गवांडे, अक्षय धिवर,गोकुळ चव्हाण यांच्यासह नागरिकांनी तात्काळ शेजारील शेतातील विहिरीवरुन पाईपलाईन करुन पाणी आणून आग विझवली .सदर दुर्घटनेची माहिती समजताच सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.डी. सुरवडकर, पोलीस हवालदार रमेश पवार, पोलीस नाईक अनिल गांगुर्डे, वाय एस.भेंडाळे, ग्रामसेवक पुरानीक यांनी पंचनामा करुन नागरिकांच्या सहकार्याने वाजे यांचे शव उत्तरीय तपासणी करुन आणले त्यानंतर वाजे कुटुंबियांकडून मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.नांदगांव तालूका प्रहार शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संदीप सूर्यवंशी यांनी वाजे कुटुंबियांचे सांत्वन करत त्यांना मदतीचे आश्‍वासन दिले आहे.

धानाच्या पूजण्याला आग 3 एकराचे पूंजणे जळून खाक

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

सडक अर्जुनी तालुक्यातील डुग्गीपार पोलीस ठाणेंतर्गत येत असलेल्या सौंदड येथील शेतकर्याचे शेतात असलेल्या धानाच्या पुंजण्याला अज्ञात व्यक्तीने आग लावून जाळल्याची घडना 17 नोव्हेंबरच्या रात्री 12 वाजेदरम्यान घडली. शेतकरी अशोक बनकर यांची शेती राका ते सौन्दड गावच्या मुख्य मार्गावर आहे.त्यातच बनकर यांनी धनाची कापणी करून गंजी तयार करुन ठेवली होती.दिवाळी झाल्यानंतर मशीन द्वारे मळणी करणार होते, मात्र अज्ञात इसमाने 17 नोव्हेंबरच्या रात्रीलाच धानाच्या गंजीला आग लावल्याने बनकर यांचे तब्बल 3 एकराचे पूजंणे जळून खाक झाले. यात अंदाजे शेतकर्यांचे 80 हजार रुपयांचे नुकसान झाले असुन शासनाने भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी बनकर यांनी केली आहे. 4 दिवसा अगोदर तिलक चांदेवार यांचे दिड एकराचे पूजंणे जाळण्यात आले तर अमृत पाखमोडे यांच्या सुद्धा धानाच्या पूजण्याला आग लावून पूजणे जळण्याचे प्रयत्न करण्यात आले होते.त्यांचे 2019 मध्ये सुद्धा तब्बल 5 एकर धानाचे पूजने जाळण्यात आले होते, एकंदरीत सौन्दड परिसरात हा पूंजणे जाळ्या आहे तरी कोण त्याचा शोध चालू आहे.

भारताच्या प्रथम महिला पंतप्रधान स्व.इंदिराजी गांधी यांच्या जयंती निमित्त

0

 

सुनिल,पवार, नादुरा

मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार श्री राजेश एकडे यांच्या जनसंपर्क कार्यालयात पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी बुलढाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री.निलेश पाऊलझगडे,जिल्हा पुनर्वसन समितीचे सदस्य श्री.पुरुषोत्तम झाल्टे,मलकापूर विधानसभा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्री.राजू हाडे पाटील,तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर डांमरे,तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्री. आकाश वतपाळ,तालुका युवक काँग्रेसचे सरचिटणीस श्री.संदीप देशमुख,श्री.रामदास तायडे,श्री.पिंटू काळे प्रामुख्याने उपस्थित होते.

मोठी ब्रेकिंग न्यूज़ दंगल प्रकरणी नगराध्यक्ष अॅड.हरीश रावळांसह सहा जणांना अटक

0

 

सुनील पवार नांदुरा

नगराध्यक्ष हरीश रावळांसह इतर पंचवीस लोकांवर दंगलीचे गुन्हे दाखल प्रकरण,

बुलडाणा जिल्ह्यातील मलकापूर येथील एका व्यक्तीस , त्याने दारू पिऊन अश्लील शिवीगाळ करून घरात घुसण्याचा प्रयत्न केल्यामुळे त्यास नगराध्यक्ष अॅड.हरीश रावळ यांचेसह पंचवीस लोकांनी त्यास बेदम मारहाण केली होती व बेकायदेशिर मंडळी जमा करून पोलिसांचा आदेश धुडकाविल्या प्रकरणी मलकापूर शहर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता, शिवाजी नगर येथील किरण साळुंके हा दि . १७.११.२०२० रोजी रात्री ९ .०० वाजता दारूचे नशेत हरीश रावळ यांच्या घरी आला व अश्लील घाणेरडी शिवीगाळ करू लागला असता , त्यास समजाविण्याचा प्रयत्न केला तरी सुध्दा तो शिवीगाळ करून , धमक्या देवून घरात घुसण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळे त्याला हरीश रावळ , प्रमोद उज्जैनकर , निरंजन लेले , संतोष उज्जैनकर यांचेसह पंचविस लोकांनी लाठया काठयांनी बेदम मारहाण केली त्यावेळी पोलिस उभे असताना पोलिसांचेही काही न ऐकता बेकायदेशिर मंडळी जमवुन हा प्रकार चालुच असल्याने , किरण साळुंके हे जखमी झाले व त्यांनी शहर पोलिस स्टेशन मध्ये रिपोर्ट दिल्यावरून पोलिस स्टेशन , मलकापूर शहर यांनी गुन्हा रजिनं . ६२ ९ / २०२० कलम ३२४ , ३२३ , १४३ , १४७ , १४ ९ , २६ ९ , २७० , १८८ , ५०४ , ५०६ भा.दं.वि तसेच कलम १३५ मु पो का . अन्वयज हरीश रावळ यांचेसह इतर पंचविस लोकांवर दंगल करून बेकायदेशिर मंडळी जमवुन मारहाण केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला होता, सदर गुन्ह्यांच्या आधारे नगराध्यक्ष हरीश रावळांसह सहा जणांना आज सकाळी 11 वाजता अटक करण्यात आली आहे, पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक कैलास नागरे करीत आहे.

कापूस पिकाचे पंचनामे करून हेक्टरी तीस हजार रुपये मदत देण्यात यावी.= सत्याग्रह शेतकरी संघटना

0

 

 

खामगाव=सुरुवातीला चांगला पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या कपाशीला चांगल्या प्रमाणात बोंडे लागले होते परंतु कालांतराने त्याचं रूपांतरण बोंड अळी मध्ये झाल्याने शेतकरी फार चिंतित पडलेला आहे व एकरी दहा क्विंटल येणारे उत्पन्न दोन वर आले एवढी दयनीय अवस्था शेतकऱ्याची झाली आहे तरी शासनाने शेतकऱ्याला दिलासा द्यायचा असेल तर हेक्टरी 30 हजार रुपये मदत व विमा कंपनीने 100% विमा जाहीर केला पाहिजे शेगाव खामगाव तालुक्यात कापसाचे उत्पन्न फार मोठ्या प्रमाणात घेतले जाते परंतु गुलाबी बोंड अळी ने कहर माजवला व शेतकऱ्याचं कापसावरील उत्पन्न फार मोठ्या प्रमाणात घटलं आहे मागील दोन वर्षात कमी जास्त पाऊस झाला यावर्षी कोरोना व गुलाबी बोंड अळी चे संकट यावर्षी जून महिन्यात समाधानकारक पाऊस पडल्याने शेतकऱ्यांनी खरीप पिकाची पेरणी केली सुरूवातीपासून पाऊस सुरळीत येत होता त्यामुळे कापूस सोयाबीन पीक उत्तम राहील अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती मात्र परतीच्या पावसाने हाहाकार माजवला व हातातोंडाशी आलेलं सोयाबीन शेतकऱ्याच्या डोळ्यासमोर सडून व वाहून गेलं तरीही शेतकऱ्यांनी लावलेला पैसा निघणे कठीण झाले आहे तर आता शेतकऱ्यांचे अतिभरवशाची पी क म्हणजे कापूस पीक पहिल्या वेचणी तच उलंगवाडी झाली व काही शेतकऱ्यांनी आता कपाशी उपटायला सुरुवात केली एवढा हताश शेतकरी या गुलाबी बोंड अळी मुळे झाला आहे तरीही कापूस पिकावर आलेल्या बोंड अळीचे पंचनामे करून हेक्टरी 30 हजार रुपये मदत देण्यात यावी अशी मागणी सत्याग्रह शेतकरी संघटना युवा आघाडी शेख आया ज गणेश सडत कार अनिल गव्हांदे संजय फाटे देवीदास फाटे शुभम पहुरकर शेख रब्बानी शिव शंकर वाशिम कार आदी कार्यकर्त्यांनी केली

जिल्हाधिकारी बुलडाणा यांचा जळगाव जामोद तालुक्यात कृषी विभागाच्या कामाचा पाहणी दौरा…

0

 

गजानन सोनटक्के
जळगांव जा.तालुका प्रतिनिधी:-

मा.जिल्हाधिकारी बुलडाणा श्री एस राममूर्ती यांचा तालुक्यातील खेर्डा खु सूनगाव व आसलगाव येथील कृषी विभागाच्या कामाचा पाहणी दौरा केला.खेर्डा खु येथील आत्मा नोंदणीकृत महात्मा फुले सेंद्रिय शेतमाल उत्पादक गटातील शेतकरी श्री.संतोष पुंजाजी ईटनारे यांच्या शेतातील सेंद्रिय पद्धतीने घेत असलेल्या कापूस व मिश्र पिके यांची पाहणी केली गटामार्फत तयार केल्या जाणाऱ्या सेंद्रिय निविष्ठा उत्पादने उदा.दशपर्णी अर्क,निमार्क,पंचगव्य,रायझोबियम इत्यादी बाबत माहिती गटातील शेतकऱ्यांनी दिली मा जिल्हाधिकारी यांनी त्याबाबत घेतल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाची व विक्रीची माहिती जाणून घेतली.

सूनगाव येथील वनोषधी उत्पादक शेतकरी श्री सखाराम पुंजाजी मिसाळ यांच्या शेतातील सफेद मुसळी पिकाला भेट दिली.सफेद मुसळी व इतर वनौषधी उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन काढणीपश्चात प्रक्रिया युनिट उभारणी बाबत मा.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री नरेंद्र नाईक साहेब यांनी मार्गदर्शन केले. सावित्रीबाई फुले महिला बचत गटाच्या वनौषधी उत्पादन व विक्रीबाबत मा.जिल्हाधिकारी यांनी जाणून घेतले.

आसलगाव येथील श्री सतीश शंकर भुसारी यांच्या शेतातील कृषी विभागाच्या माध्यमातून राबवल्या गेलेल्या सीताफळ फळबाग,शेडनेटगृह व त्यातील भाजीपाला उत्पादनाबद्दल मा.जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांशी हितगुज केले. यावेळी मा.जिल्हाधिकारी यांच्या सोबत मा.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री.नरेंद्र नाईक, उपविभागीय कृषी अधिकारी श्री.दीपक पटेल,तालुका कृषी अधिकारी श्री वाकोडे, मंडळ कृषी अधिकारी श्री.निमकर्डे,नायब तहसीलदार श्री खाडे,तालुका तंत्र व्यवस्थापक श्री.राऊत, जामोद मंडळाचे मंडल अधिकारी चोपडे साहेब सूनगावचे तलाठी केदार साहेब, कृषी सहाय्यक पवन नवथळे,कृषीमित्र मोहनसिंह पंचायत समिती उपसभापती महादेवराव धुर्डे रमेश वंडाळे मोहनसिंह राजपूत यांच्यासह कृषी विभागाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

११ लाख ४ ९ हजार रूपयाच्या भारतीय चलना सारख्या दिसणाऱ्या बनावट नोटा बाजारात विक्रीसाठी घेवुन येणाऱ्या ४ आरोपींना खंडणी विरोधी पथक , गुन्हे शाखा , ठाणे कडुन अटक

0

 

ठाणे – ठाणे शहर आयुक्तालयातील मुब्रा पोलीस स्टेशन अंतर्गत मुब्रा रेल्वे स्टेशन समोर दत्त पेट्रोल पंपा जवळ काही इसम भारतीय चलनातील २०० रू , ५०० रू , व २००० रूपये दराच्या भारतीय चलना सारख्या हुबेहुब दिसणाऱ्या बनावट नोटा खऱ्या आहेत असे भासवून , त्या नोटा चलनात वटविण्यासाठी घेवुन येणार आहेत अशी खात्रीशीर बातमी गुप्त बातमीदाराकडून खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री . आर . व्ही . कोथमिरे यांना मिळाल्यानंतर छापा कारवाईसाठी वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली खविप . पथकाचे पोलीस अधिकारी व पोलीस अमलदार यांनी सापळा रचुन नमुद्र ४ आरोपींना भारतीय चलनातील बनावट नोटा जवळ गाळगले असताना रंगेहात अटक केली असुन त्याची नावे खालील प्रमाणे १ ) मुझम्मील मोहोम्मद सालहे सुर्वे वय -४० वर्षे राठि . ग्रीनपार्क बिल्डींग , अमृतनगर , मुंब्रा , ठाणे २ ) मुझफर शौकत पावसकर वय -४१ वर्षे राठि . विभवन चाळ , चिमाट पाडा , मरोळनाका , अंधेरी पुर्व , मुंबई ३ ) प्रविण देवजी परमार वय -४३ वर्षे राठि . तानाजी नगर , साकिनाका पुर्व , मुंबई ४ ) नसरीन इम्तीयाज काझी वय -४१ वर्षे राठि . वसीम बिल्डींग , बॉम्बे कॉलनी , मुंब्रा , ठाणे
वरील आरोपी याचे कब्जात २००,५००,२००० रूपये दराच्या बनावट नोटा मिळुन आल्या त्यामध्ये २०० रू , दराच्या १५ बनावट नोटा , ५०० रूपये दराच्या ९ ४८ बनावट नोटा , २००० रूपये दराच्या ३३६ बनावट नोटा असा एकुण ११ लाख ४ ९ हजार रूपयाच्या भारतीय चलना सारख्या दिसणाऱ्या बनावट नोटा जवळ बाळगताना मिळुन आल्याने त्याचे विरूध्द मुंबा पोलीस स्टेशन येथे गुन्ना रजि ९९३/२०२० भादवि कलम ४८ ९ ( अ ) , ४८ ९ ( क ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . नमुद गुन्हयाचे तपासात आरोपीकडे केलेल्या चौकशीत त्यानी सदरच्या नोटा आरोपी प्रविण देवजी परमार याने स्वतः खांगर प्रिंटरच्या सहय्याने JK बॉन्ड पेपरचा वापर करून छपा करून नोटा बनवुन त्या बनावट नोटा मुबा , ठाणे , नवीमुंबई , मुंबई परिसरात वटविण्याकरीता आणल्या असल्याची कबुल दिली आहे . सदरची कामगिरी मा . पोलीस आयुक्त श्री . विवेक फणसळकर , मा . पोलीस सह आयुक्त डॉ . सुरेश कुमा नेकला . मा . अपर पोलीस आयुक्त श्री . संजय येनपुरे ( गुन्हे ) , मा . पोलीस उप आयुक्त श्री . लक्ष्मीकांत पाटील ( गुन्हे मा . सहा . पोलीस आयुक्त , श्री . एन.टी. कदम , ( गुन्हे ) , यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोल गरीक्षक श्री राजकुमार कोथमिरे , पोनि . श्री . संजय शिंदे , सपोनि . जगदीश मुलगीर , पोउनि . रमेश कदम , मलदार संजय भिवणकर , सत्यवान सोनवणे , सुरेश मोरे , अंकुश भोसले , कल्याण ढोकणे , सुभाष तावडे , सुरेश यात श्वास मोटे , नितीन ओवळेकर , प्रशांत भुर्के , रूपेश नरे , संदिप भांगरे , महेश साबळे , हेमंत महाले , उमेश जाधव , नणे , प्रेरणा जगताप , कल्पना तावरे , निलम वाघचौरे यांनी शिताफीने पार पाडली आहे .

वंचीत बहुजन आघाडी मोताळा नगरपंचायत ची निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार

0

 

अजहर शाह मोताला

पत्रकार परिषदेत जिल्हा नेते प्रशांत वाघोदे यांची घोषणा

 

मोताळा :- नगरपंचायत चे आरक्षण जाहीर झाले असुन गुलाबी थंडी मध्ये मोताळा शहराचे राजकारण तापायला लागले असुन राजकिय घडामोडी ना वेग आला अश्यात च नगरपंचायत ची सत्ता फिरत असलेल्या घराणेशाही विरोधात आमचा लढा असणार असुन मोताळा नगरपंचायत ची निवडणूक पूर्ण ताकदीने वंचित बहुजन आघाडी लढणार असल्याची घोषणा जिल्हा नेते प्रशांत वाघोदे यांनी मोताळा येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात आज 17 नोव्हेंबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेत केली

कोरोना योद्धा तरुणी डॉक्टराचा कोरोनामुळे गोंदिया जिल्ह्यात पहिला मृत्यू

0

 

गोंदिया-शैलेश राजनकर

गोंदिया : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या मध्यंतरी कमी झाली होती पण आता रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.पण कोरोना योद्धा डॉक्टरांची चमू आपली जीवाची पर्वा न करता कोरोना बाधित रुग्णांची सेवा करत असतानाच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बालरोग विभागामध्ये DCH या पदव्युत्तर शिक्षण सुरू असलेल्या ३७ वर्षीय तरुणी डॉ.रोहिणी गजभिये यांचा कोरोनामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू असतांना दुर्दैवी मृत्यू झाला.डॉ.रोहिणीचा मृत्यू हा जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय सेवा देतांना कोरोना योद्धाचा पहिलाच बळी आहे.त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्वत्र शोककळा पसरली आहे.डॉ.रोहिणी ही १३ नोव्हेंबर ला कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या त्यांना उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते पण कोरोनाबधितांची दिवसरात्र सेवा करणारी खरी कोरोना योद्धा आपल्या आयुष्याची लढाई मात्र हरली आणि त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.या खऱ्या कोरोना योद्धा डॉ.रोहिणी गजभिये यांना सुर्या मराठी परिवारा तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
सर्वांनी कोरोना विषयक मार्गदर्शक सूचनांचे पालन करून आपले व आपल्या परिवाराचे कोरोना पासून रक्षण करावे.

सूनगाव येथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी

0

 

गजानन सोनटक्के जळगांव जा

जळगाव जामोद तालुक्यातील सूनगाव येथे स्थानिक बजरंग चौक येथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची ८ वि पुण्यतिथी शिवसैनिकांनी साजरी केली प्रथम शिवसेना शाखा प्रमुख सुनील भाऊ खवले यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केले व त्यानंतर माजी सरपंच पुंडलिक पाटील यांनी प्रतिमेचे पूजन केले यावेळी गजानन भाऊ धुळे माजी उपसरपंच गजानन भाऊ दातीर विनोद ढगे किरण बानाईत हरी हागे निलेश खवले डॉ समाधान कपले श्रीराम मिसाळ पप्पू कळमकर सागर सातपुते नामदेवराव हागे वसंता वंडाळे समाधान पाटील मधुकर ताडे रमेश ताडे व इतर शिवसैनिक व गावकरी हजर होते