Home Blog Page 82

दोन धर्मियां मध्ये जातीय तेढ निर्मिण करणर्या भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावर गुंन्हा दाखल करा लोणार तालुका कॉंग्रेस कमेटी ( policenews )

0

 

लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर

policenews:दोन धर्मियां मध्ये जाणुन बुजुन जातीय तेड निर्माण करुन धार्मिक कलह द्ववेष पसरण्याचा प्रयन्त करणार्या भाजपा आमदार नितेश राणे यांच्यावर गुंन्हा दाखल करुन तातडीने अटक करण्यात यावे याबाबत लोणार तहसीला निवेदन देऊन लोणार तालुका कॉंग्रेस कमेटीने नितेश राणे यांना अटक करण्याची मागणी केली आहे.

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

 

भाजपा आमदार नितेश राणेनी दि.1.9.2024 रोजी अहमद नगर येथे उपस्थित जनसमुदाय समोर मस्जिद मध्यमे घुसुन मारु एव्हडेच नव्हे तर मुस्लिम समाजाने राम गिरी गुरु नारायण महाराज यांच्या विरोध केला तर त्यांची जिभ कापण्यात येईल आशाप्रकारे बेताल वकतव्य करुन दहशत निर्माण करण्याचे काम नितेश राणे यानी केले मुस्लिम समाजामध्ये प्रचंड रोष निर्माण झाला आहे.

त्यांच्यावर शासनाने गुन्हे दाखल करून त्यांना त्वरीत अटक करण्याची मागणी मोहम्मद तौफीक हाजी अब्दुल कुरेशी तालुका अध्यक्ष भारतीय राष्ट्रीय कांग्रेस अल्पसंख्यक व मुस्लिम समाज बांधवानी केली आहे.

तसेच महाराष्ट्र राज्य हे हिंन्दु मुस्लिम एकतेचा प्रतीक आहे.अश्या राज्य मध्ये महाराष्ट्रचे भाजपा आमदार नितेश राणेनी मुस्लिम धर्म बाबत वादग्रस्त विधान केल्याचे समर्थन खुलेआम केले हे वक्तव्य अतिशय निंदनीय आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तरी त्यांनी त्यांचे कार्यचा गैर वापर करून कर्तव्यात गुन्हा केल्या प्रकरणी त्यांचे विधान सभा सदस्य पदाचा पद रद्द करावा अशी मागनी लोणार तालुका कॉंग्रेस कमेटीने लोणार तहसीलदार साहेब यांच्या कडे निवेदन देऊन मागनी केली आहे.

policenews:यावेळी उपस्थित तालूका अध्यक्ष अल्पसंख्यक कॉंग्रेस कमेटी मो.तौफीक कुरेशी,शहर अध्यक्ष वसीम खान, सामाजिक कार्यकर्ता हारुन भाई, कॉंग्रेसचे जेष्ट नेते प्रकाश धुमाळ,शहर अध्यक्ष कॉंग्रेस कमेटी शेख समद, उपाध्यक्ष बाश्शा खान,युथ कॉंग्रेस जिल्हा अध्यक्ष अनिकेत मापारी, सामाजिक कार्यकर्ता मनीष पाटोळे,मा.नगर सेवक संतोष मापारी,मा.नगर सेवक करामत भाई,मा.नगर सेवक रऊफ भाई,मा.नगर सेवक अंबादास इंगळे,रफीक भाई घरकुल,युवा कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष विकास भाऊ मोरे NSUI विद्यार्थी कॉंग्रेस बुलडाणा जिल्हा उपाध्यक्ष व हिंन्दु मुस्लिम शेकडोच्या संख्यने उपस्थित होते.

गोंदिया-लोणार फेरीचे कामगार बदल बंद करण्याची मागणी(Pratapraojadhav)

0

 

केन्द्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची रास्त मागणी

गोंदिया आणि अमरावती आगाराचे वाहक देतात फक्त अमरावती पर्यंत प्रवाशांना टिकिट”

कटबुकिंग मुळे सदर फेरी अमरावती बसस्थानक येथे थांबते दिड तास प्रवाशांना त्रास”

लोणार तालुका प्रतिनिधी सय्यद जहीर

Pratapraojadhav:भंडारा विभागाअंतर्गत येत असलेल्या गोंदिया आगाराची गोंदिया,लोणार,गोंदिया हि लांबपल्ल्याची एकमेव बसफेरी 12 एप्रिल 2024 पासुन सुरू करण्यात आली आहे,सदर फेरी सुरवातीपासुनच गोंदिया आगाराकडुन थेट जगप्रसिद्ध पर्यटन स्थळ लोणार पर्यंत चालविण्यात येत होती,परंतु काही वर्षापासुन सदर फेरीस अमरावती येथील कामगार बदल दिल्याने हि फेरी प्रवाशांना डोकेदुखी बनली आहे.

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

,सदर फेरीवर कार्यरत असलेले गोंदिया आणि अमरावती आगाराचे वाहक प्रवास करणाऱ्या प्रवाशांना जाताना व येताना फक्त अमरावती पर्यंत टिकिट देतात तसेच सदर फेरीस अमरावती येथे कामगार बदल असल्याने जो पर्यंत दोन्ही आगाराचे कामगार अमरावती बसस्थानक येथे हजर होत नाही तो पर्यंत गोंदियाकडे व लोणारकडे जाणारी व येणारी फेरी अमरावती बसस्थानक येथे दिड तास उभी राहते,राज्य परिवहन महामंडळाच्या सदाउदासिन कारभारामुळे याचा त्रास प्रवाशांना भोगावा लागत आहे,

कारण सदर फेरीवर कार्यरत असलेले वाहक अमरावती पासुन पुढील प्रवास करणाऱ्या प्रवाशांना थेट तिकीट देत नाही तसेच सदर फेरी अमरावती बसस्थानक येथे दिड तास थांबत असल्याने प्रवाशांना अमरावती बसस्थानक येथुन बसफेऱ्या बदलून पुढील प्रवास करावा लागतो या मध्ये लहान-लहान मुलं,महिला,व वयोवृद्ध यांना अत्यंत त्रास सहन करावा लागतो,लोणार येथील प्रवाशी सेवा संघटना यांनी या बाबत राज्य परिवहन महामंडळाच्या संबंधित कार्यालयकडे गत सहा महिन्यापासुन सदर फेरीच्या अमरावती येथील कामगार बदल बंद करून सदर फेरी गोंदिया आगाराच्या दोन चालक व एक वाहक कडुन थेट लोणार पर्यंत चालविण्याची वारंवार मागणी केली आहे.

मात्र त्यांची रास्त मागणीला केराची टोपली दाखविण्यात आली आहे,या बाबत अनेक प्रवाशांनी सदर फेरीची समस्या सोडविण्यामागणी केन्द्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे केली होती,प्रवाशांची रास्त मागणी असल्याने व प्रवाशांना सुखमय प्रवास राज्य परिवहन महामंडळाकडुन उपलब्ध व्हावा या करीता केन्द्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्य परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापक,(वाहतुक) मुंबई यांना दि.10 ऑगस्ट 2024 रोजी सदर फेरीच्या अमरावती येथील कामगार बदल बंद करणे बाबत पत्राद्वारे मागणी केली होती,

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

परंतु त्यांनी कोणतीही कार्यवाही केली नसल्याने राज्य परिवहन महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक,माधव कुसेकर यांना दि.1 सप्टेंबर 2024 रोजी पुन्हा पत्राद्वारे सदर फेरीचे अमरावती येथील कामगार बदल बंद करण्याची मागणी केली असुन सदर पत्राची प्रत महाव्यवस्थापक (वाहतुक) मुंबई आणि प्रादेशिक व्यवस्थापक,अमरावती-नागपुर यांना दिलेली असुन अद्याप पर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही,जर केन्द्रीय राज्यमंत्री यांच्या मागणीची पुर्तता होत नाही.

Pratapraojadhav :तर सामान्य नागरिकांची रास्त मागणीची काय पुर्तता होईल हि बाब राज्य परिवहन महामंडळाच्या हिताची नसल्याने राज्य परिवहन महामंडळाची प्रतिमा प्रवाशांच्या नजरेत मलीन होत आहे हे मात्र खरं!

समृद्धी महामार्गावरील डीझेल चोर जेरबंद( brekingnews )

0

 

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

brekingnews:मागील काही महीन्या पासुन समृद्धी महामार्गावर डिझेल चोरीची घटना वाढली आहे.पन आता समृध्दी महामार्गावर डिझेल चोरी करणारे मोठे रॅकेट बिबी पोलीसांच्या हाती लागले आहे.

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

समृध्दी महामार्गावर डिझेल चोरी करतांना ट्रकच्या चालकाला दि.13.9.24 रोजी 4.30 वास्ता समृद्धी महामार्गावर चेनेल नं.310 मांडवा शिवारा मध्ये इंडीन ऑईल पेट्रोल पंपा जवळ ट्रक एम.एच.15.इ.जी.9513 वाहन चालक प्रदिप सिंग मान रहा.लासल ता.निफाड ट्रक सरव्हीस रोडवर लाऊन आराम करीत असतांना डिझेल टाकीचे झाकण उघडल्याचा आवाज आला.

व चालकाने त्यांना हटकताच त्यांनी इडींकात पळ कढण्याच्या नादात रोडचे बॅरीअरला धडकले त्याच दरम्याण पोलीस स्टेशन बिबी चे पेट्रोलींग वाहन चेकिंग अधिकारी यांना धडकलेल्या वाहनामध्ये 10 प्लॉस्टीक कॅन 50 लिटर डिझेल आढळुन आले चौरट्यानी कबुली दिली व त्यांच्या कुन ईरटिका कार सह 705500/रू किंमतीचा मुददेमाल जप्त करण्यात आला.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

या चोरीचा मास्टर माइंड हर्षद पांडूरंग साबळे रा.डोलखेड ता.जाफ्राबाद याला मांडवा येथील भीमराव दगडु इंगळे यांच्या शेतातील तुरीच्या पाट्या तुन पकडले व पळ कढणारा संकेतला पोलीसानी मलकापुर पांग्रा येथून ताब्यात घेतले.

brekingnews:सदर कार्यवाही बुलढाणा जिल्हा पोलीस अधिक्षक विव्श्र पानसरे,सा.अपर पोलीस अधिक्षक बुलढाणा बि.बि.महामुणी, सा.अपर पोलीस अधीक्षक खामगांव अशोक थोरात, सा.उपविभागीय पोलीस अधीकारी मेहकर प्रदिप पाटील, सा.पो.णी.स्था.गु.शा.अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन बिबी ठाणेदार स.पो.नि.संदीप पाटील,स.फौ.परमेव्श्रर शिंदे, चा.पो.हे.कॉ.अशोक अंभोरे, ना.पो.कॉ.नितीन मापारी,ना.पो.कॉ.अरुण साणप, पो.कॉ.यशवंत जेवळ,पो.कॉ.रविंद्र बोरे पो.कॉ.भारत ढाकणे यांनी केली आहे.

जश्ने ईद मिलादुन्नबी निमित्त मदिना मायनॉरिटी अँड एज्युकेशन मल्टीपर्पज सोसायटी रक्तदान शिबिर आयोजित (Buldhana )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी सहअमीन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी

Buldhana:बुलढाणा, दिनांक 15/9/2024 रोजी,अलमदीना मायनॉरिटी अॅण्ड एज्युकेशनल मल्टीपर्पज सोसायटी, बुलडाणा रजि. नं. 14531 MH867/2012 BLDमानवां मध्ये सर्वोत्कृष्ट तो आहे जो मानवांसाठी उपयुक्त आहे. (प्रेषित हजरत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम)

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

1499 वी जयंती पैगंबर हजरत मोहम्मद यांच्या जयंतीच्या शुभ प्रसंगी (ईद-ए-मिलाद),15 सप्टेंबर रोजी भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले आहे दिनांक ,15 सप्टेंबर 2024 वेळ: सकाळी 9 ते दुपारी 3
जामा मशिदीसमोर, इक्बाल चौक, बुलढाणा,आयोजक: जश्ने

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Buldhana:ईद-ए-मिलादुन्नबी (सल्लल्लाहु अलैहि व सल्लम) निमित्त शेख रफिक समाजसेवक यांनी जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देताना मुस्लिम बांधवांना सांगितले की सर्व युवा पिढी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावे रक्तदान हे जीवनदान आहे

डॉ.प्रविणदादा पाटील वंचित बहुजन आघाडी जळगाव जामोद यांच्यावतीने आदिवासी गाव गोमाल येथे आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबीर (Buldhananews)

0

 

इस्माईल शेख सह अमीन शेख

Buldhananews:आदिवासी गाव गोमाल हे गाव सातपुड्याच्या पायथ्याशी रस्ता नसलेले गाव. रास्ता नसल्यामुळे येथेदळणवळणाची साधन नाहीत.गावातील नागरिकांना रोज जाण्यायेण्यासाठी ५ किमी पायपीट करावी लागते.

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

आपल्याला स्वातंत्र्य भेटून ७७ वर्षानंतरही या गावात आरोग्य सुविधेअभावी आमची महीला भगिनी दुषित पाण्यामुळे साथीचा रोगाची बळी ठरली आहे व अनेक नागरिकांना गावामध्ये साथीच्या रोगाची लागण झालेली आहे.दुषित पाण्यामुळे या गावातील दोन महीला आणी एक मुलाचा असा तीन नागरिकांचा आतापर्यंत मृत्यू झाला.

डॉ. प्रविणदादा पाटील यांनी भेट देवून मृत कुटुंबाचे सांत्वन केले. आपल्या आदिवासी बांधवांना व भगिनींना मोफत वैद्यकीय तपासणी व औषध वाटप करण्यात आले. डॉ प्रविणदादा पाटील यांनी ग्रामस्थांना निःशुल्क तपासणी व शस्त्रक्रिया करण्याचे व सर्वोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Buldhananews :याप्रसंगी उपस्थित गावचे सरपंच जुमानसिंह पावरा, रमेश नाईक, देवाभाऊ दामोदर,यथाऊल्ला खाॅन, साहेबराव भगत पिंन्टुभाऊ पारवे, दिलीप तायडे, रामेश्वर जाधव, प्रमोद कोकाट

हिंगणघाट शहरातील शेकडो तरुणांसह महिलांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश ..( sharadpawar )

0

 

 

प्रतिनिधी सचिन वाघे

sharadpawar:हिंगणघाट : हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात बदलाचे वारे वाहत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेश होत आहेत. आज पुन्हा मोठ्या प्रमाणात महिला आणि तरुणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश केला.

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

राष्ट्रवादी महिला जिल्हा सरचिटणीस सुजाता जामुळकर यांच्या नेतृत्वात आकाश थूल यांच्यासह शेकडो युवकांनी तसेच मंगला कुमरे व विद्या गिरी यांच्या नेतृत्वात शेकडो महिलांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या कार्याने प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

आकाश थूल हा असा एक तरुण आहे, जो नेहमी सामाजिक कार्यात सर्वांच्या पुढे असतो, प्रत्येकाच्या सुखदु:खात सहभागी होतो. अशा या तरुणाच्या नेतृत्त्वात या सर्वांनी आज खऱ्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. येणाऱ्या काळात बदल हा अटळ आहे. आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने परिवर्तन निश्चितच होणार आहे, असा विश्वास व्यक्त करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यावेळी जिल्हाध्यक्ष सूनिल राऊत,प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, श्रीकांत भगत, रवी डेकाटे, अजय पर्बत, शहर कार्याध्यक्ष सीमा तिवारी, जिल्हा उपाध्यक्षा शितल तिवारी, जिल्हा सरचिटणीस सुजाता जांभूळकर, विधानसभा उपाध्यक्ष विद्या गिरी, दिपाली रंगारी, अमिता पूनवटकर यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी आकाश थुल, आदर्श वासेकर, गणेश श्रीरसागर, लकी खंडाळकर, अजय चांदेकर, शुभम परचाके, अक्षय खंडाळकर, सौरभ सालवटकर, योगेश मडावी, करण कांबळे, मिथलेश कांबळे, शेख मुजब्बर, इरीयास शेख, ईरीयास शेख, लखन भरणे, शुभम गुल, जितू गौरकर, शंकर चोले, प्रज्वल मसराम, शुभम जाधव, राकेश आत्राम, कुनाल आत्राम, राहुल मगरे, कुणाल हिवगीरकर, उजर कुरेशां, राजू चालरकुरे, निराकार सुनानी, सारस नाईक, राहुल गुंजेरवार, व्यंकेश कुडमेत्र, राहुल सिदाम, राज कुटमेटने, करन सातपुते, योगेश मडावी, अर्बन टेंभूरकर, विनय सिंग ठाकूर, प्रविण तल्लार, ईश्वर कोल्हे, साहील मगरे, शुभम गेडाम, जितेंद्र वेले, करण मडावी, रिंकेश मगरे, कुणाल गेडाम, प्रणय गेडाम, संजय देवतळे, शुभम कांबळे, रोहित गोते, रविश गोडघाटे, ओम क्षीरसागर, लकी राऊत महिला शुभांगी मडावी, वनीता

sharadpawar:मेश्राम, पूर्वा भगत, सुनीता उजवले, योगिता गजबे, वनमाला भगत, ललीता भोयर, माधुरी वैद्य, पपिता वैद्य, सुधा फुंडे, साधना नाईक, मनिषा हेडाऊ, सविता कुडमते, शाबेरा शेख, रुपाली शेख, रुपाली मेश्राम, सुचिता वासेकर, शितल भेंडारकर, रशिदा पठाण, वंदना शेंद्रे, मुसकान अली, मुमताज शेख, फरीदा शेख, शनिया शेख, संगिता तोडासे, तुडसा नरड, माधुरी ठगले, दुर्गा तोडासे, मुस्कान शोकन अली, मुमताज शेख, शुभांगी मडावी, सुचिता वासेकर, शालीन शेख, ललिता भोय, माधुरी वैद्य, वनिता मेश्राम, शितल भेंडारकर, साधना नाईक, योगिता गजभिये, दुर्गा भगत, वनमाला भगत, सुधा फुंडे, पपिता वैद्य, शितल भेजरकर, माधुरी वैद्य, ललीता भोयर, वनिता मेश्राम, रुपाली मेश्राम, रशीदा पठाण, वंदना शेंद्रे, सुनीता उजवणे, मनीषा हेडाऊ, संगीता तोडांसे, तुळसा नरड, रेखा तुमसरे, दुर्गा तोडासे, सविता कुडमेथे, माधुरी ढगले आदींनी पक्ष प्रवेश केला…

आरपीएफ रंजन तेलंग यांच्या प्रयत्नाने मीसिंग युवती पोलीस व परिवाराच्या ताब्यात ( rpf )

0

 

इस्माईल शेख सह अमीन शेख

rpf:शेगाव.दिनांक 31 ऑगस्ट रोजी भातकुली जिल्हा अमरावती येथून एक युवती गायब होण्याची मीसिंग वळगाव पोलीस ठाण्यात देण्यात आली 11 दिवस या तरुण युवतीचा शोध सुरू होता दिनांक 11 सप्टेंबर रोजी एक युवती संदिग्ध परिस्थिती मध्ये शेगाव रेल्वे स्टेशन च्या बुकिंग परिसरात

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

असून काही युवक तिथे घिरट्या घालत असण्याची माहिती शेगाव चे प्रधान आरक्षक रंजन तेलंग यांना मिळाली त्यांनी लगेच तिथे जाऊन त्या मुलीला चौकशी केली असता तिने उडवा उडवीचे उत्तर दिल्याने तेलंग यांनी तिला आरपीएफ ठाण्यात घेऊन गेले.

तिथे उप निरीक्षक डॉ विजय साळवे यांना सदर हकीकत सांगितले वरून चौकशी दरम्यान ती युवती घरून निघून गेल्याचे समजले नंतर तिच्या परिवारा सोबत बोलणे केल्यावर तिची मीसिंग वळगाव पोलीस ठाण्यात दाखल

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

असल्याचे कळल्याने तिथे सूचित करण्यात आले त्यांनतर पोलीस व युवतीच्या परिवाराने शेगाव गाठले डॉ विजय साळवे यांनी विधिवत कार्यवाही करून मुलीला सुपूर्द केले,

rpf:मुलीच्या शोधासाठी परेशान असलेल्या तिच्या परिवाराने प्रधान आरक्षक रंजन तेलंग व आरपीएफ विभागाचे विशेष आभार मानले

पहाट फाउंडेशन चा 2024 चा समाजभुषन पुरस्कार सागर पनाड यांना जाहीर( lonarnews )

0

 

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

lonarnews:शालेयदशे पासुन शिक्षणा सोबतच सामाजिक कार्याची आवड असणाऱ्या सागर पनाड यांच्या विविध समाज प्रबोधनाच्या उपक्रमां सोबतच सामाजिककार्याची दखल घेत सन 2024 चा राज्यस्तरीय समाज भुषन पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात येणार असल्याने विविध स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे .

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

पहाट फाऊंडेशेन छत्रपती संभाजीनगर च्या वतीने राज्यभरातून विविध प्रकारे सामाजीक कार्यात योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या कार्याचा आढावा घेऊन निवड समितीच्या वतीने ह्या पुरस्काराची घोषणा करण्यात येते.

दि. 14 स्प्टेंबर ला नांदापुरकर सभागृह ,मराठवाडा साहित्य परिषद छ. संभाजीनगर येथे मान्यवरांच्या उपस्थीतीत ह्या पुरस्काराने सागर पनाड यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

यावेळी शासनाचा वन भुषण पुरस्कार प्राप्त जेष्ठ सा. कार्यकर्ते चैत्राम पवार ,जे.जे हॉस्पीटलचे डॉ. जीवन राजपुत , आपत्ती व्यवस्थापन अधिकारी मारूती म्हस्के यांच्या हस्ते प्रधान करण्यात येणार असुन प्रसिद्ध कवि दंगलकार नितीन चंदनशिवे , डॉ.बा.आ. विदयापिठाचे प्राचार्य डॉ.पी.एम.शहापुरकर ,प्रा. रमेश गावीत , दिलीप शिखरे व पहाट फांउडेशन च्या अर्पिता सुरडकर यांची प्रमुख उपस्थिती असणा असल्याचे संयोजक अमोल भिलंगे यांनी निमंत्रण पत्रव्दारे कळविले आहे .

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

सागर पनाड हे सामाजीककार्या सोबतच पत्रकारीता क्षेत्रात मागील २० वर्षापासून कार्यरत असुन अन्याय अत्याचार , भ्रष्टाचाराच्या विरोधात त्यांच्या लेखनीला नेहमीच तिव्र धार असते तर समाजिक सलोखा वृध्दीगत व्हावा , दिनदुबळ्यांची सेवा घडावी , गरजवंताच्या उपयोगी येण्याच्या वृत्तीने ते सर्वदुरपरिचीत आहेत .

lonarnews:सिध्दहस्त पत्रकारीते मुळे शासन आणि प्रशासनातील अधिकाऱ्यां सोबत असलेल्या त्यांच्या सबंधाचा उपयोग ते नेहमी चांगल्या व समाजउपयोगी कामांसाठी करतात या मुळे अनेक समस्यां मार्गी लावत समाजउन्नती च्या कार्यां साठी सागर पनाड यांचे प्रत्येक्ष अपत्येक्ष योगदान असतेच तर सर्व धर्मीय बांधवांच्या सण उत्साहात त्यांची प्रामुख्याने उपस्थिती असते अशा अष्टपैलु व्यक्तीमत्व असलेल्या सागर पनाड यांच्या कार्याची दखल घेत त्यांची राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्करासाठी निवड झाल्याने त्यांचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

रविकांत तुपकरांची राज्य सरकार सोबतची बैठक सकारात्मक..= ( Ravikanttupkar )

0

 

सोयाबीन-कापूस प्रश्नी केंद्रीय मंत्री अमित शहांकडे राज्य सरकारचे शिष्टमंडळ लवकरच जाणार…

बहूतांश मागण्या मान्य…पण रिझल्ट मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार – रविकांत तुपकर

Ravikanttupkar:मुंबई/बुलढाणा, (प्रतिनिधी ता. ११) :- शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी रविकांत तुपकर यांची उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारसोबत आज ११ सप्टेंबर रोजी झालेली बैठक सकारात्मक झाली आहे. बहुतांश मागण्या राज्य सरकारने मंजूर केल्या आहेत, हे आमाच्या आंदोलनाचे यश आहे परंतु आम्ही पूर्णपणे समाधानी नाही, रिझल्ट मिळेपर्यंत लोकशाही मार्गाने आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे रविकांत तुपकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.


सोयाबीन – कापूस दरवाढ, पिकविमा,अतिवृष्टीची १०० % नुकसान भरपाई, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती, जंगली जनावरांपासून सरंक्षणासाठी शेतीला मजबूत कंपाऊंड यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी रविकांत तुपकर यांनी सिंदखेडराजा येथे अन्नत्याग आंदोलन केले होते.

या आंदोलनाची दखल घेत राज्य सरकारच्या वतीने त्यांच्यासमवेत ११ सप्टेंबर रोजी बैठकीचे आयोजन केले होते. मंत्रालयात ११ सप्टेंबर रोजी उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. यावेळी रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळ बैठकीत सहभागी झाले होते तर राज्य सरकारच्या वतीने ना.दिलीप वळसे पाटील, ना.अब्दुल सत्तार, ना.अनिल पाटील, यांच्यासह नियोजन, वित्त,कृषी, सहकार,मदत व पुनर्वसन, रोजगार हमी, उद्योग व ऊर्जा विभागाचे सचिव व लआ. डॉ.राजेंद्रजी शिंगणे या बैठकीला उपस्थिती होते. तब्बल दोन तास ही बैठक चालली.

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

या बैठकीत रविकांत तुपकरांनी शेतकऱ्यांच्या मागण्या आणि समस्या सविस्तरपणे मांडल्या. या बैठकीनंतर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलतांना रविकांत तुपकर यांनी सांगितले की, सोयाबीन- कापसाची दरवाढ किती आवश्यक आहे हे आम्ही बैठकीत राज्य सरकारच्या निदर्शनास आणून दिले.

सोयाबीन – कापसाच्या दरवाढीबाबत देशाचे गृहमंत्री ना. अमित शहा यांच्याकडे राज्यसरकारचे एक शिष्टमंडळ दिल्लीला जाईल केंद्र सरकारशी चर्चा सोयाबीन-कापूस दरवाढीसाठी सकारात्मक निर्णय घेवू, असा शब्द सरकारच्या वतिने ना.अजित पवार यांनी दिला. सोयाबीन – कापसाच्या दरवाढीसाठी राज्यसरकार केंद्र सरकारशी बोलायला तयार झाले हे आमच्या आंदोलनाचे यश असल्याचे तुपकरांनी सांगितले. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना व महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये अनेक शेतकऱ्यांचे पैसे सरकारकडे बाकी आहेत.

या दोन्ही योजनांचे पैसे आम्ही शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतो, असा शब्द राज्य सरकारच्या वतीने ना.अजित पवार यांनी दिला असल्याचे तुपकर म्हणाले. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीबाबत मात्र सरकार सकारात्मक नाही, असेही तुपकर म्हणाले. शेडनेटच्या संदर्भात नुकसान भरपाई बाबत आता लवकरच स्वतंत्र धोरण आणणार असल्याचेही ना. पवार यांनी सांगितले. शेतकऱ्यांना पिकविम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ आणि विलंब करणाऱ्या कंपन्यांवर कडक कारवाई करण्याचेही आश्वासन या बैठकीत उपमुख्यमंत्री ना. पवार यांनी दिले. १५ सप्टेंबरपर्यंत राज्यातले खरीपाचे आणि ३० सप्टेंबरपर्यंत सगळ्या कंपन्या रब्बीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करतील तसेच अतिवृष्टीची नुकसान भरपाई आचारसंहिता लागण्यापूर्वी देण्याचा शब्द या बैठकीत देण्यात आला.

अमरावती- नागपूर पट्ट्यात संत्रा- मोसंबीची मोठी गळती झाली आहे, त्याचे तातडीने पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन ना.पवार यांनी दिले. केंद्र सरकारकडे घरकुलाचे अनुदान, तुषार सिंचन, कृषी अवजारांचे अनुदान तसेच इतर विविध योजनांचे अनुदान थकलेले आहे त्याबाबतीत देशाचे गृहमंत्री ना.अमित शहा यांच्या भेटीत चर्चा करु असा शब्दही राज्य सरकारच्या वतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविकांत तुपकरांना दिला.

सिंदखेडराजा ते शेगाव हा भक्तीमार्ग रद्द करण्याची अधिसूचना लवकरच काढण्याचा शब्द उपमुख्यमंत्र्यांनी यांनी दिला असून जंगली जनावरांच्या त्रासापासून मुक्तता होण्यासाठी शेतीला मजबूत कंपाऊंडची योजना कॅबीनेटमध्ये आणू तसेच शेतमजुरांसाठी स्वतंत्र मजुर महामंडळ स्थापन करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेणार, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अनुदान देण्यासाठी निधी उपलब्ध करुन देऊ, यानंतर पेरणीपूर्ण पिककर्ज उपलब्ध करून न देणाऱ्या बँकांवर कडक कारवाई करू असाही शब्द यावेळी उपमुख्यमंत्री ना.पवार यांनी दिला आहे. ही बैठक शेतकऱ्यांसाठी सकारात्मक ठरली असून हे आमच्या आंदोलनाचे बहूतांशी यश आहे, असेही यावेळी रविकांत तुपकर यावेळी सांगितले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

यावेळी रविकांत तुपकरांच्या शिष्टमंडळात ॲड.शर्वरी तुपकर, डॉ.ज्ञानेश्वर टाले, गजानन कावरखे, नामदेव पतंगे, सतीश इडोळे, बालाजी मोरे, राजीव कसबे, दयाल राऊत, कुलदीप करपे, किरण ठाकरे, सुरेश गवळी,शिवाजी माने, डॉ.विनायक वाघ, विनायक सरनाईक, श्याम अवथळे, बाळू शेवाळे, प्रकाश गीते, कैलास मेहेत्रे, भारत वाघमारे,बालाजी सोसे, नितीन राजपूत, मुकेश वाघ, राम अंभोरे, श्रीराम चलवाड, सहदेव लाड, शुभम राऊत, पवन गाढवे, अनिल लांडगे, रवी वंगवाड, यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.
रिझल्ट मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार; आंदोलनाची दिशा दोन दिवसात ठरवणार – रविकांत तुपकर

Ravikanttupkar:आजच्या बैठकीत बहुतांश मागण्या मान्य झाल्याने बैठक शेतकऱ्यांसाठी सकारात्मक ठरली. पण जोपर्यंत रिझल्ट येत नाही, जोपर्यंत मागण्यांसंदर्भात शेतकऱ्यांच्या पदरात ठोस काही पडत नाही, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे. यापुढे कोणत्या पद्धतीने आंदोलन करायचे,पुढील दिशा काय राहणार आहे हे दोन दिवसांत ठरविणार. मध्यप्रदेशमध्ये जसे आंदोलन सुरु आहे तसेच आंदोलन महाराष्ट्रातही होईल. टप्प्या टप्प्याने आणि लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करणार असल्याचे रविकांत तुपकरांनी सांगितले.

क्रेडिट ,डेबिट कार्ड, UPI payment वर खरच 18% GST लागणार का ?..(GST )

0

 

GST:देशाच्या राजकारणात ज्याप्रमाणं अनेक घडामोडी घडत आहेत त्याचप्रमाणं देशाच्या अर्थकारणातही अनेक घडामोडींना वेग आला असून, नुकतीच पार पडलेली जीएसटी काऊन्सिलची बैठकही त्याचाच एक भाग. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक नुकतीच पार पडली

, जिथं अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. पण, यामध्ये अनेकांचच लक्ष लागून राहिलेला एक निर्णय मात्र मागे घेण्यात आला.

क्रेडिट आणि डेबिट कार्ड (Credit and Debit Card) च्या व्यवहारांमध्ये 18 टक्के जीएसटी लागू करण्यआ संदर्भातील कोणताही अंतिम निर्णय अद्याप झाला नसल्यामुळं आता सामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

जीएसटी परिषद यासंदर्भातील कोणत्याही अंतिम निर्णयावर पोहोचली नसल्यामुळं हा प्रस्ताव आता फिटमेंट कमिटीकडे पाठवण्यात आला आहे. पुढील बैठकीमध्ये हा प्रस्ताव फिटमेंट कमिटीच्या मतासह नव्यानं जीएसटी परिषदेपुढे ठेवला जाणार आहे.

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

समितीकडून मांडण्यात आलेल्या प्रस्तावानुसार अशा प्रकारच्या जीएसटीचा ग्राहकांवर कोणताही प्रभाव पडणार नाही.

दरम्यान बैठकी आधीच या प्रकरणावर बरीच चर्चा झाली. जिथं, डेबिट आणि क्रेडिट कार्डच्या माध्यमातून 2 हजार रुपयांपर्यंतच्या देवाणघेवाणीत Payment Gateway ला जीएसटीतून वगळण्यात येणार की नाही,

हा महत्त्वाचा मुद्दा ठरला. सूत्रांच्या माहितीनुसार जीएसटी परिषदेच्या बैठकीदरम्यान, दोन हजार रुपयांपर्यंतच्या डेबिट किंवा क्रेडिट कार्ड अथवा क्यूआर कोडच्या माध्यमातून होणाऱ्या व्यवहारांवर, जिथं अॅग्रीगेटर शुल्क आकारलं जातं तिथं 18 टक्के जीएसटी आकारला जाईल.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

फिटमेंट समितीच्या निर्णयाकडे लक्ष एका अहवालातून समोर आलेल्या आकडेवारीनुसार देशात, 80 टक्क्यांहून अधिकचे व्यवहार हे 2000 रुपये आणि त्याहून कमी किमतीचे असतात. 2016 मध्ये मोदी सरकारनं नोटबंदी जाहीर केल्यानंतरच एक अधिसूचना जारी केली होती. ज्यानुसार व्यापाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सेवांवर पेमेंट अॅग्रीगेटर कर आकारू शकत नव्हते.

GST :सध्याच्या घडीला अॅग्रीगेटर व्यापाऱ्यांकडून एका ट्रांझॅक्शनसाठी 0.5 ते 2 टक्के इतकी रक्कम आकारली जाते. अशा परिस्थितीत यावर जीएसटी लागू झाला तर, पेमेंट अॅग्रीगेटर हा अतिरिक्त कर त्यांच्या व्यापाऱ्यांकडून वसूल करू शकतात. दरम्यान, या सर्व चर्चांनंतर परिषदेतील अनेक सदस्यांनी ऑनलाईन व्यवहारांवर नकारात्मक सूर आळवत फिटमेंट समितीकडेच हा प्रस्ताव पाठवण्यात आला.