Home Blog Page 83

डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत सहभागी व्हा – अनिल वाघमारे ( buldhananews )

0

 

इस्माईल शेख सह अमीन शेख

buldhananews:मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या सुचनेनुसार पुणे येथे येत्या 20 सप्टेंबर 2024 रोजी होत.

असलेल्या अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या राज्यस्तरीय
कार्यशाळे बाबत जिल्ह्यातील डिजिटल मीडिया परिषदेच्या पदाधिकारी व सदस्यांची बैठक परळी वैजनाथ येथील व्हीआयपी विश्रामगृह संपन्न झाली.

या बैठकीत डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांनी राज्यस्तरीय कार्यशाळे संदर्भात माहिती देत आपण आपल्या हितासाठी व यु ट्यूब चॅनल, पोर्टल च्या यशस्वी वाटचाली साठी ही राज्यस्तरीय कार्यशाळा किती महत्त्वाची आहे याची माहिती देण्याबरोबरच आपण व आपल्या सहकार्या सोबत सहभागी होऊन आपलं हित साध्य करावे असे आवाहन केले.

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

याबाबत अधिक वृत्त असे की, अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेची राज्यभरातील डिजिटल मीडिया मध्ये जसे युट्युब, ब्लोगर, डिजिटल न्यूज पोर्टल, डिजिटल प्लॅटफॉर्म इत्यादी डिजिटल माध्यमातून काम करणाऱ्या सर्व पत्रकारांसाठी एक दिवशीय कार्यशाळा पिंपरी चिंचवड पुणे येथे येत्या 20 सप्टेंबर 2024 रोजी आयोजित करण्यात आली आहे.

परळी येथे झालेल्या बीड जिल्हा आढावा बैठकीला बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई,आष्टी,बीड,गेवराई, वडवणी आदी तालुक्यातील डिजिटल मीडिया परिषदेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. यावेळी डिजिटल मीडिया परिषदेच्या अनुषंगाने आजच्या डिजिटल युगात आपल्या यु ट्यूब व पोर्टल च्या माध्यमात काम करताना सर्वांनी संघटनात्मक दृष्ट्या एकत्र असणं किती
आवश्यक आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

याची माहिती देण्याबरोबरच पुण्यात होणाऱ्या डिजिटल मिडिया परिषदेच्या राज्यस्तरीय कार्यशाळेची सखोल माहिती डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष अनिल वाघमारे यांनी दिली. त्याचबरोबर डिजिटल मिडिया परिषदेचे जिल्हाध्यक्ष जितेंद्र सिरसाठ,कार्याध्यक्ष दिनकर शिंदे,उपाध्यक्ष संग्राम धन्वे, उपाध्यक्ष विश्वंभर मुळे,उपाध्यक्ष सय्यद बबलू यांनी देखील सर्वांनी कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन केले.

दरम्यान या आढावा बैठकीनंतर अधिकाधिक संख्येने पुण्यात होणाऱ्या या कार्यशाळेला आम्ही परळीतून ही मोठ्या संख्येने उपस्थित राहु असा विश्वास धनंजय आरबुने व तालुका अध्यक्ष नितीन ढाकणे यांनी व्यक्त केला.

buldhananews:सदर आढावा बैठक यशस्वी करण्यासाठी परळी तालुका अध्यक्ष नितीन ढाकणे मराठी पत्रकार परिषद समन्वयक धनंजय आरबुने, अमोल सूर्यवंशी पत्रकार भगवान साकसमुद्रे आदींनी परिश्रम घेतले.

आ.समीर कुणावर यांचे विश्वभुषण डॅा.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीच्या वतीने अभिनंदन व सत्कार (samirkunavar )

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

samirkunavar:हिंगणघाट : हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे आ समीर कुणावर याना सन 23-24 या वर्षी करीत उत्कृष्ट संसदपट्टू पुरस्कार राष्ट्रपतीं द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते मुंबई येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थिती मिळाल्याने

विश्वभुषण डॅा.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समीतीच्या सर्व सभासदनि आ कुणावर यांचे अभिनंदन केले जिल्हाच्या इतिहासात आ समीर कुणावर हे उत्कृष्ट संसदपट्टू पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले आमदार ठरले त्यानी सभागृहात मतदार संघातील विविध प्रश्न मांडून आपल्या भूमिकेचे उत्कृष्ट सादरीकरण केले.

मुंबई व नागपूर मध्ये होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात त्यानी तालिक अध्यक्ष म्हणून आपली भूमिका चोक पणे बजावली त्यांच्या कामगिरीचे उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी सभागृहात स्तुती ही केली त्यांची विधानसभेतील

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

90%उपस्थिती शेतकऱ्यांच्या समस्या व तालिका अध्यक्ष असताना आमदार पदाची तमा न बाळगता हिंगणघाट येथील वैद्यकीय महाविद्यालय करिता त्यांनी विधानसभेच्या पायऱ्या बसून आंदोलन करून मतदार संघाला न्याय मिळवून दिला.

तसेच विविध प्रश्नांवर आपली परखड भूमिका मांडून शासनाने लक्ष वेधले त्यांच्या संपुर्ण कामगिरीचे मुल्यमापन करून शासनाने त्यांना सन 23-24 चा उत्कृष्ट संसदपट्टू पुरस्काराने सन्मानित केले त्याबद्दल जयंती उत्सव समिती च्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

samirkunavar:यावेळी विजय तामगाडगे,अतुल नंदागवळी,शंकर मुंजेवार,बिंदुसार वावरे,सुरेश गायकवाड,विक्रांत भगत,संजय धाबर्डे,नितीन सुटे,सुरेंद्रकुमार टेंभुर्णे,अनुला सोमकुवर,संध्या जगताप,प्रमोदिनी नगराळे,तेजस्विनी पाटील,हेमंत झाडे,मयूर कांबळे,नरेश तामगाडगे,सुहास जीवनकर,संदीप पाटील,अनिकेत डोंगरे आदी सदस्य उपस्थित होते

खोटे बनावटी चेक तयार करून बॅंकेची फसणुक दोघांन विरोधात गुन्हे दाखल ( Brekingnews)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

Brekingnews:हिंगणघाट :- पंजाब नॅशनल बॅंक, शाखा हिंगणघाट घटना दिनांक 06/09/2024 रोजी सकाळी 11.30 वा. दरम्यान कनक ज्वेलर्स चे मालक अनुप कोठारी हे बॅकेत आले.

व त्यांनी दि. 05/08/2024 रोजीचा पंजाब नॅशनल बॅंकेचा बृदवान मुन्सीपाल्टी, यांचा 48,21,000 रू. चा चेक कनक ज्वेलर्स या नावाचे पंजाब नॅशनल बॅंक खाते मध्ये जमा करण्याकरीता बॅंकेच्या काउंटरवर दिला.

खात्री केली असता 9474040008 मोबाईल वर विचारपुस केली असता त्या नंबर वरून एक व्यक्ती बोलत होता त्यास आम्ही त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव बृदवान म्युन्सीपाल्टी च्या एक्झुक्युटीव ऑफिसर समिर राजन मुखर्जी बोलत आहे.

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

असे सांगुन तो चेक त्यांच्या कडुन कनक ज्वेलर्स यांना दिलेला आहे असे सांगितल्याने चेक आम्ही कनक ज्वेलर्स अनुप कोठारी यांच्या खात्यात रक्कम जमा केली. त्यांनतर अनुप कोठारी याने त्याच्या खात्यातील जमा रक्कम पैकी 48,00,000 रू. श्री. गोल्ड खात्यामध्ये कनक ज्वेलर्स च्या अकाउंटचा चेकने आर.टी.जी.एस. व्दारे ट्रान्सफर केले.

दुपारी अनुप कोठारी हे परत बॅंकेत आले त्यांनी दिनांक 03/09/2024 रोजीचा बृदवान मुन्सीपाल्टी, यांचा 97,52,000 रू. चा चेक बॅंकेत त्यांच्या खात्यात वठविण्याकरीता काउंटरवर जमा केला.

आमच्या सिस्टीम मधुन मिळालेला मोबाईल नंबरवर फोन करून खात्री केली असता, चेक त्यांनी स्वतः अदा केल्याचे सांगुन तुरंत चेक पास करण्यास सांगितले. बृदवान म्युन्सीपाल्टी नावाच्या चेक असलेल्या पंजाब नॅशनल बॅंक, बॅच जि.टी. रोड बृदवान, वेस्ट बंगाल यांच्या ईमेल आयडी bo0541@pnb.co.inवर सदर चेक ची पडताळणी करण्या करीता मेल केला असता,

काही वेळानी त्यांचा आमच्या बॅंकेचा bo0202@pnb.co.in वर रिप्लाय आला व त्यांनी सांगितले कि, दिनांक 03/09/2024 रोजीचा चेक ओरीजनल चेक पंजाब नॅशनल बॅंक, बॅंच जि.टी. रोड बृदवान, वेस्ट बंगाल येथे असुन या प्रकारचा कोणताही चेक आमच्या कडुन जारी केलेला नाही,

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी  येथे क्लिक करा 

तुम्ही त्या बाबत तपासणी करा. असा रिप्लाय आल्याने मनिष उत्तम जिगरोल पंजाब नॅशनल बॅंक प्रबंधक यांना शंका आली झालेल्या प्रकरणाबद्दल दी. 07.09.2024 ला समिर राजन मुखर्जी बृदवान अनुप कोठारी यांनी पंजाब नॅशनल बॅंक चे खोटे बनावटी चेक तयार करून बॅंकेची फसणुक केली.

Brekingnews :सबंधित तक्रारी वरून हिंगणघाट पोलीस स्टेशन ला अप क्र. 1222 /2024 कलम 338,336( कलम,338,336(3),340(2),318(4),319,3, (6) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.

BSF से रिटायर हुए सैनिक मा. दिनेश बापूराव नरड का हिंगणघाट शहर मे जंगी स्वागत.(bsf)

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

BSF से रिटायर हुए सैनिक और हिंगणघाट शहर के वीर पुत्र दिनेश बापुराव नरड का 8 सितंबर को आगमन हुवा. इन्होने 21 साल सीमा सुरक्षा बल मे अपने कर्तव्य का बडी ही निष्ठा से निर्वाहन किया। सेवा के दौरान उन्होने अपने भारत देश की विविध सीमाओ जैसे भारत – पाकिस्तान, भारत-बांगलादेश तथा नॉर्थ ईस्ट के दुर्गम भाग आसाम,मेघालंय,त्रिपुरा और जम्मू कश्मीर काश्मीर,पंजाब,राजस्थान जैसे अतिदुर्गम भाग मे निस्वार्थ भाव से कर्तव्य का निर्वाहन किया

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

उनके आगमन पर पॅरा मिलिटरी मित्रपरिवार हिंगणघाट (तह) की ओर से हिंगणघाट शहर के रेल्वे स्टेशन से भव्य रॅली का आयोजन किया गया.रॅली मे पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट (तह.) के अध्यक्ष विलास भोयर, कोषाध्यक्ष श्री सागर दाते, सचिव राजू साटोने, संपर्कप्रमुख अमोल पवार एवं नितेश लाचारवार, पांडुरंग दानवीज,सतीश दुधे,
अशोक खोडे,मधुकर उईके,सुनील निमजे, योगेश मसराम, गणपत वानखेडे, महेश गंधारे उपस्थित थे. साथ ही शहर की समाजसेवी संघटना जैसे

माजी सैनिक कल्याणकारी ट्रस्ट के अध्यक्ष पुंडलिक बकाने और उनके सदस्य गण,
रुग्ण मित्र फाउंडेशन से श्री गजू कुबडे और उनके साथी,
वृक्षमित्र परिवार की तरफ से नितीन क्षीरसागर और सदस्य , संत ज्ञानेश्वर वॉर्ड की नगरसेविका धनश्री वरघणे,

परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडल शाखा हिंगणघाट की ओर से संतोष पन्नासे तथा संत ज्ञानेश्वर वार्ड मित्र परिवार की और से अतुल जाधव ,सूरज कुबडे प्रशांत लोणकर, अजय ठाकरे,पंकज बढिये प्रवीण दरवेकर,रोशन नगमोते,वैभव बाबर,भूषण डाखोरे,मोहन तुमराम, सचिन इटनकर,भूषण चंदनखेडे, सूरज भोपळे, उमेश निनावे, विठलरावं तळवेकर , पटवारी कॉलनी के सभी आजी/ माजी पटवारी सदस्य ने स्वागतमूर्ती दिनेश नरड जी का स्वागत किया।
इस रॅली मे हिंगणघाट शहर के नागरीक बडी संख्या मे शामिल हुए। रॅली संत तुकडोजी चौक से शुरू हुई ।

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

इस रॅली मे पॅरामिलिटरी मित्र परिवार हिंगणघाट ते छुट्टी पर आये हुए सेवारत और सेवानिवृत्त सैनिक, माजी कल्याणकरी ट्रस्ट हिंगणघाट के माजी सैनिकोने अमर जवानों की याद मे अमर ज्योती स्मारक पर अमर ज्योती जलाकर और पुष्पचक्र अर्पण किये और राष्ट्रगान गाकर अमर जवानों को श्रद्धांजलि दि।
BSF:इसके बाद पॅरामिलिटरी मित्रपरिवार हिंगणघाट तह की ओर से शहर के वीर पुत्र को शॉल आणि श्रीफळ देकर सत्कार किया इस कार्यक्रम का संचालन सुनील निमजे ने किया।

प्रबुद्ध सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या उपसचिवपदी राजेश तायडे यांची निवड .(Yavalnews )

0

 

विकी वानखेडे यावल

Yavalnews:भुसावळ येथील राजेश पंडितराव तायडे (पत्रकार )यांची प्रबुद्ध सामाजिक बहुउद्देशीय संस्था खामगाव अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रभर चालविणाऱ्या संस्थेच्या खान्देश प्रांत उपसचिव व प्रसिद्धी प्रमुख म्हणून संस्थापक अध्यक्ष प्राचार्य आनंदराज वानखेडे यांच्या आदेशानुसार राज्याचे अध्यक्ष संजय भालेराव यांनी नियुक्ती केलेली आहे .

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातुन वझर आघव ते सावरगाव तेली शेत रस्त्याची शेतकर्यांची मागणी ( formernews )

सदर संस्थेच्या माध्यमातून धम्म बंधन मंगल परिणय लावून देणे, वधू वरांचा परिचय मेळावा घेऊन विनामूल्य मार्गदर्शन करणे, सुशिक्षित बेरोजगार तरुणांना तथा परितक्ता महिलांना मार्गदर्शन करून न्याय मिळवून देणे

, तसेच धम्म बंधन दिनदर्शिका काढून संस्थेचा प्रचार व प्रसार करून संस्थेमध्ये निस्वार्थपणे सेवा करणे हेच उद्दिष्ट असून , बौद्ध तरुण- तरुणींना न्याय मिळवून देणे ,हेच ह्या संस्थेचे कार्य आहे. त्याच उद्दिष्टाने संस्थेने राजेश तायडे यांची खान्देश प्रांत उपसचिव तथा प्रसिद्ध प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे .

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

त्यांच्या निवडीबद्दल महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे वरिष्ठ अधिकारी मोहन सरदार , विस्तार अधिकारी आर एस सपकाळे , डॉ.राजेश मानवतकर, वरिष्ठ कायदेशीर सल्लागार तथा सुभेदार रामजी विद्यालयाचे चेअरमन राजेश झाल्टे, संस्थेच्या विदर्भाचे अध्यक्ष संदीप राऊत, आरपीआयचे उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष रमेश मकासरे, भारतीय बौद्ध महासभेचे केंद्र शिक्षक रवींद्र अहिरे ,रेल्वेचे सेवानिवृत्त अधिकारी

Yavalnews :अशोक निकम, ऑ. फॅक्टरी चे अधिकारी रवी मेढे, वर्धा यूनिवर्सिटी चे प्राध्यापक संदीप सपकाळे, ऑ. फँ. एससी / एसटी असोसिएशनचे अध्यक्ष राज निकम ,वंचित चे माजी जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे, भीम आर्मीचे गणेश सपकाळे, समता सैनिक दलाचे युवराज नरवाडे, नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे सुरेश वानखेडे, आदींनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले . ..

पाणीपुरवठा विभाग अभियंताच्या खुर्चीला निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा डॉ. गोपाल बछिरे (Lonarnews)

0

 

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

Lonarnews:मेहकर पाणीपुरवठा विभाग अभियंताच्या खुर्चीला निवेदन देऊन जल जीवन मिशन कामाची माहिती द्या नसतात आंदोलनाचा इशारा शिवसेना उ.बा.ठा. जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांनी दिला.

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

मेहकर व लोणार तालुक्यातील जलजीवन मिशनच्या कामाविषयीची माहिती मागण्यासाठी उपविभागीय अभियंता श्री धाबे साहेब यांच्याकडे सहा तारखेला निवेदन देण्यास गेले असतात तेव्हाही ते उपस्थित नव्हते व आज सुद्धा ते कार्यालयात उपस्थित नव्हते त्यांना भ्रमणध्वनीवर संपर्क साधला असता

अर्ध्या तासात कार्यालयात पोहोचतो असे सांगितले दीड तास वाट पाहून सुद्धा धाबे साहेब कार्यालयात फिरकले नाही म्हणून माहिती मागणीचे निवेदन शिवसेना उबाठा चे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे, शहर प्रमुख गजानन जाधव, शहर उपप्रमुख लुकमानभाई कुरेशी, युवा शहरप्रमुख श्रीकांत मादनकर, किसन आघव, गणेश पाठे यांनी उपविभागीय अभियंता श्री धाबे साहेब यांच्या खुर्चीला निवेदन निवेदन देऊन खालील माहिती मागितली आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

१) जलजीवन मिशनच्या कामे पूर्ण करण्याचाअवधी काय होता व वेळेत कामे पूर्ण न होण्याची कारणे
२) लोणार मेहकर तालुक्यात जलजीवन मिशन चे काम किती प्रतिशत पूर्ण झाली व किती बाकी आहे याविषयीची सविस्तर माहिती देने.

३) सुरुवातीपासून जलजीवन मिशनचे काम कोण कोणत्या व्यक्तीस किती किती रकमेची दिली त्याविषयी सविस्तर माहिती देणे.
४) सुरुवातीपासून जलजीवन मिशनचे काम कोणत्या फर्म ला किती किती दिले त्याचे बजेट किती त्याविषयी सविस्तर माहिती देणे.

Lonarnews :उपरोक्त माहिती तत्काळ देण्यात यावी अन्यथा पाणीपुरवठा विभागाच्या विरुद्धार्थी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला.

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातुन वझर आघव ते सावरगाव तेली शेत रस्त्याची शेतकर्यांची मागणी ( formernews )

0

 

लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर

formernews:देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून शेतकऱ्यांची ओळख आहे.आणी शेतकऱ्यांची रक्तवाहिनी ही शेत रस्ता असते.पण तरी सुद्धा वझर आघाव भुमराळा सावरगाव तेली हा शेत रस्ता पई चालयच्या कामीचा नाही

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

वझर आघाव चे 1960/1961 मध्ये पुनर्वसन झाल्यापासून दुर्लक्षित असुन वझर आघाव येथील शेतकऱ्यांची शेकडो हेक्टर जमीन ही भुमराळा सावरगाव तेली शिवारात आहे.वझर आघाव या गावाला आदर्श ग्राम पुरस्कार महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन कृषी मंत्री दिवंगत भाऊसाहेब फुंडकर साहेब यांच्या हस्ते मीळालेला आहे.

तरी सुद्धा हा शेत रस्ता दुर्लक्षित का आहे.हा मोठा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडलेला आहे.निसर्गाचे अस्मानी संकट आणि रस्त्याची दुरवस्था यामुळे शेतातील कामासाठी लागणारे मजूर यायला तयार नाही.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

यामुळे येथील शेतकऱ्यांना मोठ्या हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहे.सरकारने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून 2021/2022 च्या प्लॅन मध्ये समावेश असलेल्या या प्रलंबीत शेतरस्त्याला मंजूरी देऊन शक्य तितक्या तत्परतेने यावर कार्यवाही करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.यासाठी लागणारे दान पत्रे शपथ पत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रांची पूर्तता स्थानिक लोकप्रतिनिधी मार्फत शासन दरबारी जमा केलेली आहेत.

formernews:तेव्हा सरकारने शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून वझर आघाव भुमराळा सावरगाव तेली शेत रस्ता मंजूर करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या हिंगणघाट शहर बूथ अध्यक्षाची बैठक पार पडली..( sharadpawar )

0

 

प्रतिनिधी सचिन वाघे

sharadpawar:हिंगणघाट – सध्या महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे सर्वच पक्षांकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे.

याच पार्श्वभूमीवर हिंगणघाट शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्त्वात हिंगणघाट शहरातील बुथ अध्यक्षांची बैठक पार पडली.

हिंगणघाट शहरातील नंदोरी रोडवरील साई मंदिर हॉल येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती. येत्या २ महिन्यात विधानसभा निवडणुक लागण्याची शक्यता आहे.

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

त्यात बदल १०० टक्के होणार आहे. त्यामुळे सर्व बुथ अध्यक्षांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन जोमाने कामाला लागावे, या शब्दात राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी या सर्व बुथ अध्यक्षांना प्रेरणादायी मार्दर्शन करत त्यांना आत्मविश्वास वाढवला.

याप्रसंगी सर्व बुथ अध्यक्षांनी आपल्या समस्या आणि मनोगतही मांडले. या सर्व समस्या अतुल वांदिले यांनी ऐकून घेत लवकरच या समस्यांवर तोडगा काढू असे आश्वासनही दिले.

या बैठकीला सामाजिक न्याय विभाग जिल्हा कार्याध्यक्ष प्रलय तेलंग, सहकार नेते वासुदेव गौळकार, शहराध्यक्ष बालु वानखेडे, अल्पसंख्याक प्रदेश सचिव मोहम्मद अली अजानी, वाहतूक सेल जिल्हाध्यक्ष शेखर जाधव, अपंग सेल

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर, जिल्हा प्रचार प्रमुख संतोष तिमांडे, सुनील वांदिले, श्रीकांत भगत, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, अल्पसंख्याक विधानसभा अध्यक्ष जावेद मिर्झा, माजी नगरसेवक बालाजी गहलोत, माजी नगरसेवक नाझीर अली,हेमंत घोडे,अजय पर्बत, जितेंद्र रघाटाटे, संजय गांभुले, अनिल लांबट, अन्सार शेख, राजू मेसेकर, पुरुषोत्तम कांबळे, श्रीधार्थ मस्के, सुभाष सोयाम, परम बावणे, ऋषिकेश मेश्राम, विनोद घिमेकर, प्रशांत एकोणकर, अमोल भिषेकर,

sharadpawar:सुनील घोडखांडे, प्रवीण कलोडे,बबलू शेख, कुणाल येसम्बरे, देवा गवळी, अमित रंगारी, अहमद खान पठाण, गजू लाजूरकर, रंजित भोमले, महिला जिल्हा उपाध्यक्ष शितल तिवारी, जिल्हा सरचिटणीस सुजाता जांभुळकर, जिल्हा सचिव सुचिता सातपुते, तालुका अध्यक्ष शगुप्ता शेख, विधानसभा उपाध्यक्षा विद्या गिरी, शहर संघटिका मिना सोनटक्के, शहर सचिव दिपाली रंगारी, मंगला कुमरे, नालंदा राऊत, सुनिता तामगाडगे यांच्यासह हिंगणघाट शहरातील सर्व बूथ अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सापांना जीवदान द्या – सर्पमित्र वनिता बोराडे ( Snake)

0

 

 

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

Snake:बाल गणेश मंडळाच्या वतीने किनगाव जटुटु येथे 8 सप्टेंबरला राम मंदिरासमोरील सभागृहामध्ये जगातील पहिल्या महीला सर्पमित्र वनिता बोराडे यांच्या मार्गदर्शनाचा कार्यक्रम संपन्न झाला,

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून सरपंच शारदा महाजन, वनिता बोराडे, गायक डी.भास्कर, अजय चौधरी हजर होते, कार्यक्रमाच्या सुरुवातीला बाल गणेश मंडळाच्या वतीने सर्पमित्रांचा सत्कार करण्यात आला.

त्यानंतर गायक डी.भास्कर यांनी बालकांना कविता म्हणून दाखविल्या तसेच सापाविषयी मार्गदर्शन करून माणसाच्या मनामध्ये सपावीषइ जे गैरसमज आहेत.ते दूर केले, त्यानंतर सर्पमित्र वनिता बोराडे यांनी सापाला जीवदान देणे आवश्यक आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

असे सांगितले, साप हा माणसाचा शत्रू नसतो शेतकऱ्याचा एक चांगल्या प्रकारचा मित्र आहे.

याबाबत सविस्तर समजावून सांगितले. प्रत्येक साप हा विषारी नसून साप चावल्यानंतर त्वरित सरकारी दवाखान्यात जाण्याचा सल्ला सुद्धा त्यांनी दिला, सदर कार्यक्रमाला गावकऱ्यांनी भरभरून, प्रतिसाद दिला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन विनोद सातपुते यांनी केले,

Snake:तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाल गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले, या छोट्याशा बालकांनी हा आगळावेगळा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे, गावकऱ्यांनी या बाल गणेश मंडळाचे कौतुक केले ..

शेगाव ग्रामीण पुलिस स्टेशन पदाचा कारभार प्रवीण लिंगाडे साहेब यांनी स्वीकारला..(shegaonnews )

0

 

इस्माईल शेख सह अमीन शेख

shegaonnews:शेगाव: शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार म्हणून प्रवीण लिंगाडे साहेब यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी आज आठ सप्टेंबर रोजी ठाणेदार पदाचा कारभार स्वीकारला.

पोला उत्सवात रोटरी क्लबच्या वतीने भव्य रक्त तपासणी शिबिराचे आयोजन( polanews )

शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनचे तत्कालीन ठाणेदार दिलीप वडगावकर साहेब यांची अमरावती जिल्ह्यात बदली झाल्याने शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन ठाणेदार पद रिक्त होते.

नवनियुक्त ठाणेदार प्रवीण लिंगाडे नांदुरा येथे उप पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होते त्यापूर्वी त्यांनी झेलम पोलीस स्टेशन येथे ठाणेदार पदाचा कारभार सांभाळलेला होता.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

यवतमाळ अमरावती अकोला जिल्ह्यात अनेक पोलीस स्टेशनमध्ये प्रवीण इंगळे साहेब यांनी कार्य केलेले आहे

shegaonnews:पोलीस खात्याचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या प्रवीण इंगळे साहेब यांच्या कार्यकाळात शेगाव ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था सुरळीत होऊन हा परिसर गुन्हेगार मुक्त व्हावा अशी इच्छा ग्रामीण क्षेत्रातील जनतेकडून व्यक्त करण्यात येत आहे