Home Blog Page 92

खा. राजू शेट्टींच्या उपस्थितीत काटेल येथे संवाद मेळाव्याचे आयोजन.काटेल येथे बुधवार ७ ऑगस्ट रोजी होत असलेल्या संवाद मेळाव्याला उपस्थित रहा.उज्वल पाटील. ( rajushetti )

0

 

rajushetti:संग्रामपूर/कष्टकरी मायबाप जनतेच्या न्याय हक्कासाठी चळवळ मध्ये राबणाऱ्या पदाधिकाऱ्यांची चर्चा करण्यासाठी स्वाभिमानीचे संस्थापक अध्यक्ष मा. खा.राजू शेट्टी उद्या बुधवार दि. ७ आगस्ट रोजी संग्रामपूर तालुक्यात येत आहेत.

या निमित्ताने श्री संत गुलाबबाबा नगरी काटेल संस्थान येथे संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मा. खा. राजू शेट्टी कार्यकर्त्याशी संवाद साधणार आहेत.

सकाळी ११ वाजता होणाऱ्या या संवाद मेळाव्यासाठी आवश्यक या असे आवाहन स्वाभिमानीचे नेते उज्वल पाटील चोपडे यांनी केले आहे. एक महिन्यापूर्वी बारामती येथे पार पडलेल्या स्वाभिमानीच्या राज्यस्तरीय बैठकीत प्रशांत डिक्कर यांची जळगाव जा. मतदारसंघासाठी घोषणा करण्यात आल्यानंतर या मतदारसंघात स्वाभिमानी तुल्यबळ लढत देणार असल्याचे निश्चित झाली आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

याच निमित्ताने मा. खा. राजू शेट्टी जिल्ह्यात येत आहेत. सवांद मेळाव्याची जय्यत तयारी स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.

rajushetti:याच सवांद मेळाव्यातून खा. राजू शेट्टी जळगाव जा. विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फूंकणार असल्याने या मेळाव्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चक्कर येऊन पडल्याने आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू ( brekingnews )

0

 

यावल( प्रतिनिधी) विकी वानखेडे

brekingnews:तालुक्यातील मनवेल येथील आश्रमशाळेत चक्कर येऊन पडल्याने नऊ वर्षांच्या विद्यार्थाचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

चार ऑगस्टला मेहकर येथे मोफत आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया शिबिरचा लाभ घ्या डॉ. गोपाल बछिरे ( buldhana )

या संदर्भातील माहिती अशी की, मनवेल येथील आदिवासी आश्रमशाळेत फुलसिंग पहाडसिंग बारेला हा नऊ वर्षाचा विद्याथ शिकत होता. आज सकाळी अचानक त्याला चक्कर आल्याने तो खाली पडला. त्याला तातडीने यावल येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून त्याला मृत घोषीत केले.

बातमी लाईव्ह  पाहण्यासाठी येथे क्लिक करा

मयत फुलसिंग बारेला हा हिंगोणा येथील रहिवासी होता. त्याचा अकस्मात मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

brekingnews:दरम्यान, याची माहिती मिळताच
मनसेच्या उपजिल्हाध्यक्ष संजय नन्नवरे ग्रामीण रूग्णालय गाठून या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली.

ठाकरे सेनेचा ढाण्या वाघच गद्दाराला आपली जागा दाखवू शकतो शुभांगी ताई पाटील ( shubhangipatil )

0

 

 

लोणार तालुका प्रतिनिधि सय्यद जहीर

shubhangipatil:ठाकरे सेनेचा ढाण्या वाघच गद्दाराला आपली जागा दाखवू शकतो असे वक्तव्य शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेता शुभांगीताई पाटील यांनी महाआरोग्य शिबिर उद्घाटन प्रसंगी केले.

उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा सप्ताह समाप्ती निमित्त जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे यांनी आयोजित केलेल्या महाआरोग्य रोगनिदान उपचार व शस्त्रक्रिया शिबिरात त्या बोलत होत्या त्यापुढे म्हणाल्या गद्दारांच्या दिम तीला सगळ्यात पुढे असलेल्याला आपली जागा दाखवून देणे शिवसेनेचे आद्य कर्तव्य आहे व डॉ. बछिरे सारखा शिवसैनिक याचं उत्तर देऊ शकतो शिवसेनेचे एक वर्षाचं पीक कापून नेले पण अस्सल बियाणं उद्धव साहेब ठाकरे यांच्या जवळ शिवसैनिकाच्या रूपाने आहे याला कोणी चोरू शकत नाही.

जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत यांनी डॉ. बछिरे यांच्या संघटन कौशल्याचा तोंड भरून कौतुक केले व शिवसेना फुटी नंतर मेहकर लोणार मतदार संघ बांधणीचं काम ज्या पद्धतीने व निर्भिकपणे डॉ. बछिरे ने केले ते कौतुकास्पद आहे त्यांनी अनेक मेळावे, अनेक शिबिर व अनेक आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या ओळखीचा ठसा उमटवला त्यातीललच एक म्हणजे हे महाआरोग्य रोग निदान उपचार व शस्त्रक्रिया शिबिर ज्याचा सर्वसामान्य जन माणसाला फायदा होत आहे.

चार ऑगस्टला मेहकर येथे मोफत आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया शिबिरचा लाभ घ्या डॉ. गोपाल बछिरे ( buldhana )

या शिबिराचे आयोजक डॉ. गोपाल बछिरे यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये म्हटले की, आम्ही उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहोत आम्ही दरवर्षी साहेबांचा वाढदिवस समाज उपयोगी कार्यक्रम घेऊन करतो, आम्ही बाया नाचवत नाही, आम्ही ऑर्केस्ट्रा वाजवत नाही, आम्ही उगाच खर्च करत नाही, आम्ही समाज उपयोगी कार्य करून त्याचा समाजास लाभ देण्याचे प्रयत्न करतो.

वाढदिवस सप्ताह निमित्त आम्ही शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले, छत्रीचे वाटप केले, रेनकोटचे वाटप केले, गोरगरिबांना ब्लॅंकेटचे वाटप केले, सरकारी दवाखान्यात फळांचे वाटप केले,

https://youtu.be/qby74J2cfGg

अनाथांना मिठाईचे वाटप केले आणि हा सप्ताह महाआरोग्य रोगनिदान, उपचार व शस्त्रक्रिया शिबिराने समाप्ती करत आहोत.

अध्यक्षीय समारोपात जिल्ह्याचे संपर्कप्रमुख नरेंद्र खेडेकर यांनी या स्तुत्य उपक्रमाची भरभरून स्तुती केली आणि डॉ. बछीरे यांनी दरवर्षी उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या कार्यक्रमांची तोंड भरून स्तुती केली

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या शिबिरासाठी संभाजीनगर येथील एम हॉस्पिटल, अल्पाइन हॉस्पिटल, सनशाइन हॉस्पिटल व रुणवाल हार्ट केअर हॉस्पिटल ची वेगवेगळी टीम आलेली होती या शिबिरात ५१७ रुग्णांची तपासणी झाली त्यापैकी १२८ रुग्णांचे डोळ्याचे ऑपरेशन करण्याचे, नऊ हृदय शस्त्रक्रिया व अस्थिरोगाचे ४२ शस्त्रक्रियाचे ठरले आहे व संपूर्ण शस्त्रक्रिया ह्या मोफत होणार आहेत

Shubhangipatil :या कार्यक्रमासाठी मेहकर विधानसभा संपर्कप्रमुख नंदलाल जाधव महिला जिल्हा संघटिका जिजाबाई राठोड, उद्योजक भास्कररावजी गारोळे, मेहकर तालुकाप्रमुख लिंबाजी पांडव, शहर प्रमुख किशोर गारोळे, लोणार शहर प्रमुख गजानन जाधव, नगरसेविका सिंधुताई जाधव, संदीप गारोळे, श्रीकांत नागरे, परमेश्वर दहातोंडे, राजीव बुधवत, जीवन घायाळ, श्रीकांत मादनकर, लूकमान कुरेशी, इकबाल कुरेशी, नारायण बळी, रमेशबापू देशमुख एड. संदीप गवई, पोर्णिमाताई गवई, पार्वतीताई सुटे, शालिनीताई मोरे, राजू दहातोंडे, राजू जयस्वाल, डॉ. मोहसीन शेख हे मंचकावर उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना महिला जिल्हा संघटिका संजीवनी वाघ यांनी केले तर आभार युवा तालुका अधिकारी जीवन घायाळ यांनी मानले.

भाजपाचे जिल्हा विस्तारित अधिवेशन लोणार येथे संपन्न ( bjpnews )

0

 

लोणार तालुका प्रतिनिधि सैय्यद जहीर

bjpnews:भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्यस्तरीय मुख्य अधिवेशन नुकतेच केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत 21 जुलै रोजी पुणे येथे पार पडले.

त्यानंतर आता लोणार सरोवर येथील श्री मंगल कार्यालयात भाजप प्रमुख पदाधिकाऱ्यांचे बुलढाणा जिल्हास्तरीय विस्तारित अधिवेशन जिल्हा अध्यक्ष डॉ.गणेश मांन्टे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले.

या अधिवेशनाला प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून भाजपा महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आ.रणधीर सावरकर अधिवेशनाला मार्गदर्शन केले.

चार ऑगस्टला मेहकर येथे मोफत आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया शिबिरचा लाभ घ्या डॉ. गोपाल बछिरे ( buldhana )

यासोबतच माजी आमदार विजयराज शिंदे, जिल्हा समन्वयक मोहन शर्मा,माजी आमदार तोताराम कांयदे, प्रदेश सदस्य विजय कोठारी,प्रताप सिंह राजपूत,उल्हास देशपांडे, विधानसभा निवडणुक प्रमुख प्रकाश गवई, चिखली विधानसभा प्रमुख सुनील वायाळ,जिल्हा सरचिटणीस

गजानन घुले,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विनायक भाग्यवंत, विश्राम पवार,दिपक वारे, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी स्मिता टिकेटकर, अनुसूचित जाती जमाती जिल्हाध्यक्ष
सचिन काळे,सैनिक सेल जिल्हा अध्यक्ष दत्तात्रय जाधव,व्यापार आघाडी प्रविण धन्नावात, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष संतोष देशमुख,सोशल मीडिया जिल्हा संयोजक उद्धव आटोळे यांच्यासह इतर आघाडी जिल्हाध्यक्ष तसेच सर्व मंडल अध्यक्ष व शहर मंडल अध्यक्ष यांची उपस्थिती होती.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

यावेळी नागरिकांना प्रत्येक योजनेचा तत्काळ लाभ मिळवून द्यावा असे निर्देश देण्यात आले, तसेच लाडली बहीण योजना,प्रधानमंत्री पिक विमा योजना, प्रधानमंत्री आवास योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, मध्यान्ह पोषण आहार योजना, राष्ट्रीय ग्रामीण पाणीपुरवठा योजना, अमृत योजना, रोजगार हमी,दीनदयाल विद्युतीकरण योजना, मूलभूत सुविधा प्रकल्प, डिजिटल इंडिया योजना, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, स्वच्छ भारत योजना, उज्वल अशुरंस योजना, सर्वशिक्षा योजना, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन,राष्ट्रीय भूमी अभिलेख यासारख्या विविध केंद्र सरकार पुरुस्कुत योजनांसह दूरसंचार, महामार्ग, रेल्वे, खनिकर्म यासारख्या विविध महत्वपूर्ण विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

bjpnews:या अधिवेशनासाठी बुलढाणा जिल्ह्यातील बुलढाणा, चिखली, सिंदखेड राजा व मेहकर या मतदारसंघातील भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अण्णाभाऊ साठेंचे विचार समाजाला एकसंघ करणारे प्रा.डॉ. गोपाल बछिरे ( lonarnews )

0

 

लोणार प्रतिनिधि सय्यद जहीर

lonarnews:अण्णाभाऊ साठेंचे विचार समाजाला प्रेरीत करून एकसंघ करणारे असे वक्तव्य आपल्या भाषणातून प्रा.डॉ. गोपाल बछिरे यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात केले.

चार ऑगस्टला मेहकर येथे मोफत आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया शिबिरचा लाभ घ्या डॉ. गोपाल बछिरे ( buldhana )

शारा येथेल समाज सभामंडपात साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर गोपाल बछिरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.

याप्रसंगी बोलताना पुढे डॉ.बछीरे म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वातंत्र्य, समता, बंधुत्व, व पुरोगामी विचारांचे अनुयायी त्या कारणाने अण्णाभाऊ साठे ओळखले जातात आणि त्यांनी समाजाला प्रेरित करून एकसंघ करण्याचे मौलिक कार्य केले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

समाजाने एकसंघ राहावं एकमताने राहावं तरच त्या समाजाची किंमत होते अन्यथा, गुच्छात असलेल्या द्राक्षाची किंमत जास्त असते व गुच्छ्यातून तुटलेल्या द्राक्षाची किंमत मातीमोल तशी समाजाची परिस्थिती आहे.

एक संघ असाल तर त्या समाजाची किंमत होईल व वेगवेगळे व्हाल तर मातीमोल. असे अनेक दृष्टांत देऊन त्यांनी समाजएकसंघ राहण्याचे मूलमंत्र दिले याप्रसंगी

lonarnews:कार्यक्रमास लोणारचे पोलीस निरीक्षक निमिश मेहत्रे, शिवसेनेचे लोणार शहर प्रमुख गजानन जाधव, परमेश्वर दहातोंडे, लुकमान कुरेशी, तानाजी मापारी, इक्बाल कुरेशी, सुदन अंभोरे आदींसह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते या कार्यक्रमास यशस्वी करण्यासाठी संदीप साठे संतोष साठे सुभाष साठे उद्धव साठे आदींनी परिश्रम घेतले.

एमआईएम’चे शाकीर रज़ा यांचा शिवेसनेत प्रवेश ( sanjaygaikwad )

0

 

sanjaygaikwad:बुलढाणा: बुलढाणा विधानसभा मतदारसंघ चे आमदार संजय गायकवाड यांचा नेतृत्व मधे इंदिरा नगर येथील रहिवासी तथा शहर एम आय एम चे माजी अध्यक्ष शाकिर रजा यांनी कार्यकर्त्यांसह शिवसेना मध्ये प्रवेश केला आहे.

शिवसेना शहर प्रमुख गजेंद्र दांडले, जावेद शेख यांच्या मार्गदर्शन मध्ये त्यांनी हा प्रवेश घेतला. शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी जाती धर्माचे राजकारण न करता विकासाचे राजकारण केले आणि करीत आहे.

 

चार ऑगस्टला मेहकर येथे मोफत आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया शिबिरचा लाभ घ्या डॉ. गोपाल बछिरे ( buldhana )

त्यांनी बुलढाणा शहर आणि बुलढाणा मतदारसंघात कोट्यवधी रुपये किमतीची विकास कामे केली आहे.

यामुळे बुलढाणा शहर आणि मतदारसंघाचा कायापालट केला आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

विकास कामे करताना आमदार गायकवाड यांनी, जाती, धर्म भेद केला नसून मुस्लिम बहुल प्रभागातही मोठ्या संख्येने विकास कामे केली आहे.

sanjaygaikwad:यामुळे प्रभावित झाल्याने आपण सहकाऱ्यासह शिवसेनेत प्रवेश केल्याचे शाकिर रजा यांनी यावेळी सांगितले.

१५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या महसुल पंधरवाडा या कार्यक्रमांची सुरूवात ( Yavalnews )

0

यावल (प्रतिनिधी)विकी वानखेडे

Yavalnews:यावल महसुल प्रशासनाच्या वतीने तहसील कार्यालयात महसुल पंधरवाडाच्या निमित्ताने तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिरासह मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भात प्रशिक्षण व आदि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

चार ऑगस्टला मेहकर येथे मोफत आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया शिबिरचा लाभ घ्या डॉ. गोपाल बछिरे ( buldhana )

होते यावल शहरात १ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट दरम्यान राबविण्यात येणाऱ्या महसुल पंधरवाडा या कार्यक्रमांची सुरूवात यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आले.

यावेळी निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते यांच्यासह तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी, तलाठी व तहसील कार्यालयातील सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीत तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनासाठी लाभार्थ्यांचे प्राप्त होणाऱ्या अर्जासाठी योजनादुत या साईट बाबत व ईतर विभागा संदर्भात बैठक घेण्यात आली.

महसुल पंधरवाडाच्या निमित्ताने रेड क्रॉस सोसायटीच्या माध्यमातुन रक्तदान शिबिर घेण्यात आले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

यात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, मंडळ अधिकारी, , मिलींद देवरे यांच्यासह सुमारे १५ जणांनी रक्तदान केले.

Yavalnews:दरम्यान मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संदर्भातील शासनाने प्रशासनास दिलेल्या ५० हजार अर्ज स्विकारण्याच्या उद्धीष्टातुन ३४ हजार ५०० अर्ज प्राप्त झाले असुन, अर्ज स्विकारण्याचे जवळपास ८० टक्के काम पूर्ण झाले असल्याची माहीती तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी दिली.

स्व.अशोक भुते मरणानंतरही डोळ्याने राहणार जीवंत. ( Hingnghat )

0

 

मरनोपरांत केले नेत्र दान मोहन सुरकार
सिंदी रेल्वे शहरातील वर्धा नागरी सहकारी बँकेचे डेली कलेक्शन एजंट अशोक भुते यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.मात्र त्यांनी मंरनोपरांत नेत्रदान केल्याने मेल्यानंतरही ते डोळ्यांच्या रुपाने या पुथ्वीतलावर जीवंत राहणार आहे.

स्थानिक नेत्रज्योती मित्र परिवार संघटनेच्या आणि शालीनी मेघे रुग्णालय सावंगी मेघे यांच्या सहकार्याने स्व.अशोक भुते यांचे नेत्रदान त्यांच्या परिवाराने करुन घेतले.

चार ऑगस्टला मेहकर येथे मोफत आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया शिबिरचा लाभ घ्या डॉ. गोपाल बछिरे ( buldhana )

Hingnghat:मागील काही वर्षांपासून नेत्र ज्योती संघटनेच्या माध्यमातून डॉ लीलाधर पालीवाल हे नेत्रदानासाठी मृतांच्या परिवाराला प्रोत्साहित करीत असुन आज पर्यंत ६९ तात्यांनी नेत्रदान केले असुन सर्वांनी मरनोपरांत नेत्रदान आवर्जून करावे असे आवाहन डा.पालीवाल यांनी याप्रसंगी केले.

चार ऑगस्टला मेहकर येथे मोफत आरोग्य तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया शिबिरचा लाभ घ्या डॉ. गोपाल बछिरे ( buldhana )

0

 

 

लोणार प्रतिनिधि सय्यद जहीर

शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राच्या मनातील मुख्यमंत्री उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवस सप्ताह समाप्ती तसेच भगवा सप्ताह निमित्त शिवसेना बुलढाणा जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछीरे आयोजित भव्य महाआरोग्य शिबिर रविवार दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी नगरपालिकेचे स्वातंत्र्य मैदान मेहेकर येथे विधान परिषद विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते माननीय अंबादासजी दानवे यांच्या हस्ते उद्घाटन होऊन

होऊन जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. नरेंद्रभाऊ खेडेकर यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हाप्रमुख जालिंदरभाऊ बुधवत विधानसभा संपर्कप्रमुख नंदलालजी जाधव, युवा जिल्हाप्रमुख नंदूभाऊ कराडे, महिला जिल्हा संघटिका जिजाताई राठोड, यांच्या प्रमुख उपस्थित होत आहे.

 

https://techmaharashtra.in/pikvima/

 

या शिबिरास संभाजीनगरचे एम्स हॉस्पिटल, अल्पाइन हॉस्पिटल, सनशाइन हॉस्पिटल व रुनवाल हार्ट केअर हॉस्पिटल चे तज्ञ डॉक्टर येणार आहेत.

या शिबिरात हृदयरोग, मधुमेह, पोटाचे विकार, किडनीचे आजार, डोळ्याचे विकार, मूळव्याध मुलांची आजार महिलांचे आजार व कॅन्सर सारख्या आजारावर मोफत तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया होणार आहे. या शिबिरात तपासणीस येणाऱ्या रुग्णांना शस्त्रक्रियेची गरज पडल्यास हॉस्पिटलच्या ॲम्बुलन्स द्वारे जाण्या येण्याची व्यवस्था व मोफत शस्त्रक्रिया होणार आहे.

buldhana:या महाआरोग्य शिबिराचा लाभ सर्व गरजू जनतेने घ्यावा असे आवाहन, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा संघटक डॉ. गोपाल बछिरे जिल्हा उपप्रमुख आशिषभाऊ रहाटे, तालुकाप्रमुख लिंबाभाऊ पांडव, लोणार शहरप्रमुख गजानन जाधव सर व मेहकर शहरप्रमुख किशोरभाऊ गारोळे यांनी केले आहे .

साहित्य चळवळीला जीवनदान देण्याचे काम अण्णाभाऊ साठेंचे.=-शुभांगी सरकटे (Jayantinews) .

0

 

 

इस्माईल शेख सह अमीन शेख

शेगाव.तळागाळातील सामान्य माणसाला स्वाभिमानाने जगता यावे म्हणून आपल्या आयुष्यात ज्यांनी साहित्याच्या माध्यमातून जनजागृती केली त्या अण्णाभाऊ साठेंमुळेच सामाजिक समरसतेचा पाया समाजात दृढ झाल्याचे प्रतिपादन बा र्टीच्या शेगाव तालुका समता दूत शुभांगी सरकटे यांनी शेगाव येथे एका कार्यक्रमात बोलताना केले.

सामजिक न्याय विभागाची स्वायत संस्था डॉ बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे अंतर्गत अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. शेगाव येथील मागास वर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृहात
लोकशाहीर अण्णाभाऊ भाऊ साठे जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेऴी वस्तीगृहाच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.

मंत्रीपदाचा लाभ रुग्णनां मिळून देण्यासाठी केदीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयात विशेष आरोग्य कक्षाची स्थापन देशातील कोणत्याही दवाखान्यात उपचारासाठी या आरोग्य कक्षेतुन मिळणार सुविधा ( Pratapraojadhav )

बार्टीच्या शेगांव तालुका समतादूत कु शुभांगी हरीभाऊ सरकटे व इतर मान्यवरांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आल्यानंतर वृक्षारोपण करण्यात आले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मागास वर्गीय मुलींचे शासकीय वसतिगृह शेगांव येथे झालेल्या कार्यक्रमात शासकीय वसतिगृह,( लिपिक प्रभारी गृहपाल )शुभांगी राऊत मॅडम तेथील कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते सदर कार्यक्रम बार्टीचे महासंचालक सुनील वारे विभाग प्रमुख चव्हाण सर व बुलढाणा प्रकल्प अधिकारी महेंद्र शामदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

कार्यक्रमास सुषमा भोसले सुनिता अग्रवाल या कर्मचाऱ्यांसह रवीना वाहने मीनल इंगळे व इतर विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते