चर्मकार समाजाच्या तरुणांनी व्यावसायिक शिक्षण घ्यावे – प्रशांत सोनवणे धानोऱ्यात संत रोहिदास जयंती साजरी. ( sant ravidas jayanti )

0
2

 

प्रतिनिधी l विकी वानखेडे

ग्रामीण भागातील सर्व समाज एकोप्याने रहात असल्याने आपली भारतीय संस्कृती टिकून आहे. आज सर्वच समाजात प्रत्येक बाबतीत प्रचंड स्पर्धा पाहण्यास मिळते.

यातून आपण आपली प्रगती साधत शिक्षणाबरोबर व्यावसायिक शिक्षण घेणे गरजेचे आहे. यातून उन्नती साधता येत असते. पूर्वी संतांचे महान कार्य ही आजच्या समाजात आपले आदर्श ठरत आहेत.

यामुळे संताच्या जयंती व पुण्यतिथी साजरी करुन त्यांच्या कार्याचा एक संदेश अवलंबला पाहिजे, याच बरोबर तरुणांनी स्पर्धा परीक्षेचा चांगला अभ्यास करुन प्रशासकीय सेवेत येऊन काम करावे, आपणास मिळत असलेल्या सवलतींच्या चांगला फायदा करून घेतला.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

पाहिजे तसेच समाजकारण डोळ्यांसमोर ठेऊन राजकारणात यावेत असे प्रतिपादन भुसावळ माध्यमिक शिक्षक पतपेढीचे खजिनदार प्रशांत सोनवणे यांनी आयोजित कार्यक्रमात केले.

येथे संत शिरोमणी संत रोहिदास महाराज यांची जयंती निमित्त प्रतिमापूजन करून प्रसाद यांचे वाटप करण्यात आले.यावेळी अडावद पोलिस ठाण्याचे उपनिक्षक राजू थोरात,माजी उपसभापती माणिकचंद महाजन, सरपंच रज्जाक

तडवी,राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष रविंद्र चौधरी, दूध संस्थेचे उपाध्यक्ष प्रवीण ठाकूर ,ग्राम पंचायत सदस्य रवींद्र शिरसाठ, मुक्तार अली, अतुल पाटील ,अशोक चौधरी ,सामाजिक कार्यकर्ते वासुदेव महाजन,अमोल महाजन, प्रशांत चौधरी ,राजेंद्र बोदडे ,अब्दुल कादीर ,आरिफ तडवी, जयदीप पाटील , चर्मकार समाजाचे सुरेश सोनवणे ,भास्कर

सोनवणे ,लक्ष्मण सोनवणे ,परशुराम सोनवणे ,चंद्रकांत सोनवणे ,विलास सोनवणे ,शांताराम सोनवणे ,लोटन सोनवणे, गणेश सोनवणे ,दिलीप सोनवणे , परशुराम दांडगे ,अनिल निभोरे,प्रविण सोनवणे, वैभव निंबाळकर, पराशर सुरवाडे, चेतन सोनवणे ,अविनाश वानखेडे, रोहन सोनवणे ,अजय निंबाळकर, राहुल सोनवणे महिला समाज बांधव आदि उपस्थित होते.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

यावेळी धानोरा सरपंच रज्जाक तडवी यांना महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार मिळाल्याने चर्मकार समाजाकडून सन्मान करण्यात आला.

sant ravidas jayanti:यावेळी त्यानी चर्मकार वाड्याचा विकास तसेच समाज कार्यालयासाठी प्रयत्नशील असल्याने लवकरच कामास सुरुवात करणार असल्याचे सांगितले सूत्रसंचन भुमी फुटवेअर चे दिलीप सोनवणे आभार लोटन सोनवणे यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here