मराठी इंडस्ट्रीमधील सुप्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचे संपूर्ण जगभरात प्रचंड चाहते आहेत. सोनालीने आज चाहत्यांच्या मनात स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.
तिचा मोठ्या प्रमाणात चाहतावर्ग निर्माण झालेला आहे. सोनालीने नुकतेच “झी मराठी” चित्र गौरव पुरस्कार सोहळ्याला प्रमुख उपस्थिती लावली होती.
या पुरस्कार सोहळ्यात सोनालीचा मराठमोळा अनोखा अंदाज सर्वांना पाहायला मिळाला. यादरम्यान सोनालीने तिला इंडस्ट्रीमधील मुळीच पटत नसलेल्या गोष्टी सांगितल्या.
मराठी मनोरंजनसृष्टीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कलाकारांना “झी मराठी चित्र गौरव” पुरस्कार सोहळ्यात सन्मानित करण्यात आले. २०२४ च्या पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी देखील सहभागी झाली होती. यादरम्यान सोनाली एका अप्रतिम लूकमध्ये सर्वांना दिसली.
सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )
सोनालीने मीडियाशी बोलताना अनेक गोष्टींवर चर्चा केली. यावेळी सोनाली म्हणाली, “या प्रोफेशन मधील सर्वात कंटाळवाणी गोष्ट म्हणजे मेकअप करणे. मला मेकअप करायला भयंकर कंटाळा येतो. मला जर खरंच शक्य झाले असते तर मी मेकअप न करताच साध्या कपड्यांवर रेड कार्पेटवर हजेरी लावली असती.
असे बरेचजण करतात, त्यामुळे मलाही तसे करायला नक्कीच आवडेल.”अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही खूप सुंदर व सुरेख अभिनेत्री आहे.( sonaleekulkarni )
बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आतापर्यंत तिने कित्येक चित्रपटांत काम केले आहे. त्यापैकी हिरकणी, मितवा, धुरळा, तमाशा लाईव्ह, नटरंग हे तिचे गाजलेले काही चित्रपट आहेत.
sonaleekulkarni:सोनाली ही संपूर्ण महाराष्ट्रात अप्सरा म्हणून ओळखली जाते. नुकतीच ती साऊथ चित्रपटात दिसली आहे. तर आता लवकरच ‘मोगल मर्दिनी ताराराणी’ या चित्रपटात देखील झळकणार आहे.