हत्येचा कटरचनेसह विविध गून्हे दाखल..
व्हायरल रेकॉर्डिंग ची उच्चस्तरीय चौकशी होणार..
आरोपी वाढण्याची शक्यता.
बुलढाणा: Crime news | ३० डिसेंबर रोजी आझाद हिंद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.सतीशचंद्र रोठे यांना जीवे मारण्याचा कट बुलढाणा जिल्हा व सत्र न्यायालयातच कुख्यात गुंड गणेश परसे व गँगकडून रचन्यात आला होता. हत्येच्या कटाची ३२ मी. रेकॉर्डिंग व्हायरल झाल्यामुळे खळबळ जनक माहिती समोर आली आहे.
पुढील अनर्थ टाळण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पक्षीय, सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी तथा पोलीस अधीक्षकांना भेटून सदर घटनेची चौकशीची मागणी केली आहे.
त्यानुसार शहर पोलीस स्टेशन बुलढाणा ने अप क्र.005/2024 नुसार हत्त्येचे कट कारस्थान रचने, सार्वजनिक ठिकाणी अश्लील भाषेचा प्रयोग करणे, जीवे मारण्याची धमकी देणे यासह विविध कलमांन्वये एक जानेवारीला गुन्हे दाखल केले आहे.
LPG Price: ग्राहकांसाठी गुड न्यूज सिलिंडरच्या दरात आता ‘इतकी’ कपात; काय आहे नवीन दर जाणून घ्या
त्यामुळे कुख्यात गुंड गणेश परसे व गँगणे शहरातून स्थलांतर केल्याची गोपनीय माहिती समोर येत आहे.
हत्येसह सदर रेकॉर्डिंग मध्ये एका पीडित महिलेला नग्न करून चौकात मारने, आमदार, खासदार व ईतर लोकप्रतिनिधींच्या नावासह कुख्यात गुंडांचा समावेश,स्वतः मोठा गुन्हा करून ऍड.रोठेंना सह आरोपी बनवणे,दहा लाख रुपये देऊन परराज्यातील गुंडांना सुपारी देने,50 गुंडांची गॅंग कामाला लावने,गॅंगस्टार मो.जावेदचाही सहभाग, कारागृहातही मो.जावेदची दहशत, बडतर्फ पोलीस कटात सहभागी,अँड.रोठेंची सामाजिक प्रतिमा खराब करण्यासाठी व्युव्हरचना यासह गंभीर घटनाक्रम सदर कटात समावीष्ट आहे.
अवैध व्यवसायिकांच्या विरोधातील आंदोलन तथा पीडित महिलेला मदत केली म्हणून कुख्यात गुंड गणेश परसे व गँग कडून आझाद हिंद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.सतीशचंद्र रोठे यांना जीवे मारन्यात येत असल्याचे समोर येत आहे.
Crime news | तीस वर्षापासून आझाद हिंद च्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात जनहितार्थ आंदोलन उभारणारे अँड सतीशचंद्र रोठे यांच्यावर यापूर्वीही पाच वेळा प्राण घातक हल्ला झालेला आहे. त्यातून ते सुदैवाने बचावले तर यावेळी हत्त्येचाकट उघडकीस झाल्याने अँड रोठेंच्या जीवीत्वास धोका असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.