Maharashtra Rahul narvekar | शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून नार्वेेेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन

 

इस्माइल शेख बुलढाणा जिला प्रतिनिधि

Maharashtra Rahul narvekar: शेगाव | शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून आमदार अपात्रतेचा महानिकाल देणार्‍या विधीमंडळ अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करून निषेध नोंदविण्यात आला. आज सकाळी ११.३० वाजता स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात हे आंदोलन पार पडले.

यावेळी शिवसैनिकांनी लोकशाहीचा गळा घोटणार्‍या राहुल नार्वेकर यांचा जाहिर निषेध, नार्वेकर मुर्दाबाद, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे जिंदाबाद अशी घोषणाबाजी केली.


या आंदोलनात उपजिल्हाप्रमुख अविनाश दळवी, कृउबास संचालक तथा माजी तालुकाप्रमुख रमेश पाटील, तालुकाप्रमुख दत्ता पाटील, शहर प्रमुख योगेश पल्हाडे, उपशहरप्रमुख सुधाकर शिंदे, माजी नगरसेवक आशिष गणगणे, माजी नगरसेवक दिनेश शिंदे, तालुका संघटक वासुदेव तायडे, तालुका आरोग्य समन्वयक अरूण सिंहस्थे, ज्येष्ठ शिवसैनिक मारोती लांजुळकर पाटील, उपशहरप्रमुख पवन गवई, उपतालुकाप्रमुख तेजराव घाटे, उपतालुकाप्रमुख हर्षल आखरे,

DNA Test | सासऱ्याने सूनेवर केले संशय मग काय घेतला DNA टेस्ट त्या नंतर जे निघाले ते तर चक्क करणारी गोष्ट आली समोर. सत्य पाहताच सासऱ्याने तर…

युवासेना उपजिल्हाप्रमुख विशाल लहाने, युवासेना शहरप्रमुख शिवा कराळे, विभागप्रमुख पंकज लोखंडे, शाखाप्रमुख मोहन भेंडे, महादेव बावस्कार, मनोज तारापुरे, मनोज रोकडे, नासीर खान, कल्पेश पवार आदी शिवसैनिकांची उपस्थिती होती.

Maharashtra Rahul narvekar: महानिकाल नव्हे महानालायकाचा निकाल – अविनाश दळवी
१६ आमदार अपात्रतेचा महानिकाल हा महानिकाल नसून महानालायकाचा निकाल असल्याची तिखट प्रतिक्रिया शिवसेनेचे माजी नगरसेवक तथा उपजिल्हाप्रमुख अविनाश दळवी यांनी दिली आहे.

 

ते पुढे म्हणाले की, भाजपाने महाराष्ट्राचा पार युपी बिहार केला असून दोन गुजराती खेळ खेळून गेले आहेत. परंतु आजचा त्यांचा जश्न उद्याचा मातम ठरणार आहे.

Leave a Comment