आमदार गायकवाड म्हणतात, मिरवणुकीत युवकास मारहाणीचा पश्चाताप नाहीच, ती तर भूषणावह बाब! म्हणाले, ‘तो’ दात प्लॅस्टिकचा…MLA sanjaygaikwad )

 

बुलढाणा: शिवजयंती मिरवणुकीत आपण ‘त्या’ युवकास केलेल्या मारहाणीचा, आपणास अजिबात पश्चाताप नसून उलट ती भूषणावह बाब असल्याचे प्रतिपादन आमदार संजय गायकवाड यांनी केले.

आज शनिवारी आपल्या संपर्क कार्यालयात घेतलेल्या’ भरगच्च’ पत्र परिषदेत आमदारांनी या मारहाणीचे ठासून समर्थन करतानाच त्याची कारणमीमांसा केली. बुलढाण्यात गांजा पिऊन मिरवणुकीत माता भगिनीवर चाकूने हल्ले करणारे एक टोळके कार्यरत आहे.

यंदाच्या मिरवणुकीपूर्वी आपण पोलिसांना याची कल्पना दिली होती. मात्र पस्तीस हजराचा मिरवणुकीत पोलिसांना त्यांचा लवकर ‘ट्रेस’ लागला नाही. जयस्तंभ चौकात एक महिला व तिच्या मुलीने याची आपणास माहिती दिली. ‘ते’ चाकूने हल्ला करण्याचा बेतात असल्याचे सांगितल्यावर पोलिसांनी त्यांच्याकडे धाव घेतली.

त्यातील एकाने माझे अंगरक्षक योगेश मुळे यांना खाली पाडले.त्यामुळे मी त्यांच्या हातातील लाठी घेऊन त्या युवकाला मारहाण केली. मात्र मताबहिणीच्या रक्षणासाठी केलेली ती कृती होती, नव्हे तर जयंती समिती अध्यक्ष व आमदार म्हणून ते माझे कर्तव्यच होते.

कारंजा तहसील परिसरात भरदिवसा चाकुने हल्ला ( murdernews )

यामुळे उपद्रवी युवकास केलेल्या मारहाणीचा मला अजिबात

पश्चाताप नसून उलट माझ्यासाठी ती भूषणावह आहे. यापुढे ही कोणी सार्वजनिक कार्यक्रमात कुणी असा उपद्रव केला तर आपण ‘कारवाई’ करणारच असे ते ठासून म्हणाले.

वाघ दंत अन जमीन ताबा

बातमी पाहण्यासाठी एकच क्लिक करा 

जयंती दिनी मी केलेल्या वक्तव्यावरून वन विभागाने गुन्हा दाखल केला, माझ्या गळ्यातील कथित वाघ दंत जप्त केला. मात्र तो दात प्लास्टिक चा असल्याचा दावा करून प्रथमदर्शनी तसे आढळून आल्याचे आमदारांनी स्पष्ट केले.मोताळा तालुक्यातील जमीन ताबा प्रकरणी न्यायालयाच्या आदेशाने माझ्याविरुद्ध गुन्हे दाखल झाले.

MLA sanjaygaikwad:ते ‘क्रॅश’ करण्यासाठी आपण लवकरच ‘हायकोर्टा’त जाणार असल्याची माहितीही आमदारांनी दिली. त्या जमिनीचा वाद फिर्यादी उपाध्याय व चौबे यांच्यातील आहे, माझा त्याच्याशी काही संबंध नसल्याचा खुलासा त्यांनी केला.

Leave a Comment