Home Blog Page 113

जलद गतीने प्रकरण चालवून कठोर कारवाई व्हावी. न्याय द्यावा.देशमुख हत्याकांड प्रकरणी( mudernews )

0

 

रामेश्वर गायकी /संग्रामपूर बुलढाणा

निषेध करुन जिल्हाधिकारी यांना निवेदन.]

mudernews:संग्रामपूरः- बजाज नगर अमरावती येथील देशमुख परिवारातील दोघांची निर्घून हत्या करण्यात आली.ह्या घटनेचा तीव्र निषेध करुन प्रकरण जलद गतीने चालवून मारेक-यांवर कठोर कारवाई करुन न्याय द्यावा.

असे निवेदन संग्रामपूर तालुका मराठा महासंघ व शिवसेच्या पदाधिकारी यांचे वतीने आज दि.३/५/२०२४ रोजी जिल्हाधिकारी बुलढाणा यांचे नावे संग्रामपूर तहसिलदार यांचे मार्फत देण्यात आले.

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

अमरावती मधील बालाजी नगर मंगलधाम काॕलनी येथील सौ,कुंदाताई विजय देशमुख व सुरज देशमुख यांची दि.२९/४/२०२४रोजी निर्घुण हत्या केली.ही कृरपणे निर्दयी सुनियोजित हत्या असून उपर्डी कृत्य कांडातील घटनेची पुनरावृत्ती दिसणारी घटना दिसते.

आम्ही ह्या घटनेचा तीव्र निषेध करीत आहोत.घटनेतील आरोपी व सहकारी यांचेवर कठोर गुन्हे दाखल करुन केस जलदगतीने चालवून कारवाई व्हावी व देशमुख मराठा समाजाला न्याय द्यावा आसे निवेदन संग्रामपूर तहसीलदार यांचे मार्फत जिल्हाधिकारी यांना दिले आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

mudernews:निवेदनावर जळगाव जामोद विधान सभा शिवसेनेचे मा. विलासराव भास्करराव देशमुख,मराठा महासंघाचे युवा राष्ट्रीय अध्यक्ष स्वप्नील देशमुख ,अनंतराव देशमुख ,ज्ञानेश्वर दांदळे,असलमभाई, चेतन देशमुख ,प्रणवा देशमुख ,दिपक अढाव,चेतन बकाल,रवि पा. नंदू खानझोड शेख कदिर भाई यांचेसह इतरांच्या सह्या आहेत,

आमदार यांचे गाडीचा भीषण अमोरासमोरा अपघात कुटुंबातील पाच जणांचा जागीच मृत्यू (breakingnews )

0

 

 

ही गाडीचं झालं अपघात शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील गाडीचा शुक्रवारी आज दुपारी अचानक भीषण अपघात झाला आहे. तर मात्र या अपघातामध्ये आमदार किरण सरनाईक यांच्या कुटुंबातील व्यक्तींसह पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

तर या अकोला जिल्ह्यातील पातूर शहराजवळ हा अपघात झाला आहे. मात्र या अपघातामध्ये किरण सरानाईक यांचे पुतणे रघुवीर सरनाईक यांचा मृत्यू झाला आहे. तर या अपघातामध्ये जखमी झालेल्या लोकांना अकोला येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आता या दोन गाड्यांची समोरासमोर धडक झाल्यामुळे हा मोठं अपघात झाला आहे. Kiransarnaik

तर या दोन कारची समोरासमोर जोरदार धडक झाल्यामुळे हा अपघात झाला आहे. मात्र या कारमधून किरण सरनाईक यांचा भाऊ, भावाचा मुलगा, मुलगी आणि नात प्रवास करत होते.

मात्र हा हा अपघात इतका भीषण होता की दोन्ही कारचा चक्काचूर झाला आहे. तर आता पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

आमदार गाडीचं अपघात मृतांमध्ये या लोकांचा समावेश

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

परंतु है वाशिम रोडवर दोन कारची एकमेकांना जोरदार धडक बसल्यानं ही घटना घडल्याचं सांगितलं जात आहे. या अपघातात किरण सरानाईक यांचे पुतणे रघुवीर सरनाईक (वय २८) यांचा मृत्यू झाला आहे.

मात्र आता तसेच शिवाजी आमले (वय ३०) सिद्धार्थ यशवंत इंगळे (वय ३५), तसेच एका नऊ महिन्यांच्या मुलासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या अपघातामध्ये तीन जण जखमी झाले आहे. मात्र आता त्यात पियुष देशमुख (वय ११), सपना देशमुख आणि श्रेयस इंगळे यांचा समावेश आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु झाले आहे.

तर अचानक अपघात.गावकऱ्यांची मदतीसाठी धाव

मात्र या अपघाताची माहिती मिळताच मदतीसाठी गावकऱ्यांनी धाव घेतली. तातडीने रुग्णवाहिका आणि पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली.

breaking news:तातडीने घटना स्थळ पोलीस दाखल झाल्यावर मदतकार्य सुरु झाले. रुग्णांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

इस्लामपूर जि.सांगली येथे माननीय आमदार विजयराव शिंदे यांनी महायुतीचे उमेदवार खासदार संजय काका जाधव यांना प्रचंड बहुमताने विजय करण्याचे आवाहन केले ( bjpnews )

0

 

ईस्माइल शेख बुलढाणा जि, प्रति सह अमीन शेख शेगाव ता, प्रति

सांगली ,बुलढाणा जिल्हा मा आमदार विजयराव शिंदे यांनी सांगली येथे लोकसभा मतदार संघाचे भाजपा महायुतीचे उमेदवार श्री संजयकाका जाधव यांच्या प्रचार व नियोजनार्थ

लोकसभा क्षेत्रात निरीक्षक म्हणून आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या 400 पार करून त्यांना परत पंतप्रधान मंत्री कुर्सी वर बसवण्या करिता दबंग नेते

मा.आमदार विजयराज शिंदे यांनी महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या समवेत भेटी गाठी घेऊन मतदारांशी संवाद

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

साधला अनेक ठिकाणी कॉर्नर मिटिंग घेऊन महायुतीचे उमेदवार खा.संजयकाका जाधव यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

यावेळी माजी गृहराज्य मंत्री रणजित पाटील, मा.आ.धैर्यशील माने, माजी मंत्री सदाभाऊ खोत ई प्रमुख मान्यवरांची उपस्थीती होती.

माननीय यश संचेती बुलढाणा जिल्हा अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा मलकापूर यांच्या च्या वतीने नमो चौपाल अभियान संपन्न( bjpnews )

0

 

अमिन शेख शेगाव तालुका प्रतिनिधी

bjpnews:मलकापूर ,लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर काल मलकापूर मधील रणगाव आणि शिवनी येथे भाजपा युवा मोर्चा द्वारा आयोजित नमो चौपाल कार्यक्रमाच्या माध्यमातून रावेर लोकसभा मतदारसंघ महायुतीच्या उमेदवार श्रीमती रक्षाताई खडसे ह्यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा आयोजित करण्यात आली होती. ह्या प्रसंगी युवा वॉरियर्स शाखेच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

ह्या कार्यक्रमात गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या 13 मे 2024 रोजी कमळ चिन्हासमोरील बटण दाबून जास्तीत जास्त मतदान महायुतीच्या उमेदवाराला करावं असं आवाहन केलं.

आगामी काळात होणार्‍या लोकसभा निवडणुकांमध्ये युवकांची जबाबदारी आणि संघटन आदरणीय पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी ह्यांच्या 400+ व्हिजन वर चर्चा करणे ह्या उद्देशाने ठीक ठिकाणी होणाऱ्या नमो चौपालच्या माध्यमातून युवकांसोबत संवाद साधण्यात येत आहे.

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

युवा वर्ग आदरणीय पंतप्रधान मा.नरेंद्र जी मोदी यांना पुन्हा एकदा पंतप्रधानपदी विराजमान करण्यासाठी आग्रही आहे.

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

bjpnews:ह्या प्रसंगी सोबत मा.शुभम दादाराव पाटील, तालुकाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा मलकापूर, भाजपा युवा मोर्चा मलकापूर शहर तसेच मतदारसंघातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते

नराधम बापानेच केलं पोटच्या मुलीवर अत्याचार? आरोपी विरुद्ध पोक्सो अॅक्ट गुन्हा दाखल ( Crime News )

0

 

Crime News | पुणे येथील पोटच्या अल्पयीन एका मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मात्र या याप्रकरणी नराधम बापावर समर्थ पोलिसांनी आरोपी विरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत (POCSO Act) गुन्हा दाखल केला आहे.

परंतु हा सर्व प्रकार जानेवारी 2024 ते एप्रिल 2024 दरम्यान नानापेठेत घडला आहे.(Pune Crime News)

सविस्तर याबाबत पीडित मुलीच्या 31 वर्षीय आईने समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मात्र आता त्यानुसार नराधम आरोपी बापावर आयपीसी 354(अ), 323 सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मात्र आता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांची मुलगी घरातील बेडवर मोबाईल बघत होती. मग काय तर त्यावेळी आरोपीने मुलीसोबत अश्लील चाळे करुन तिचे लैंगिक शोषण केले. मात्र आता तसेच आरोपीने दारु पीऊन घरी आल्यानंतर मुलीला मारहाण करत असल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

अवैध बायोडिझेलसह तब्बल सतरा लाखांचा मुद्देमाल जप्त; लाजवाब धाब्याजवळ नांदुरा पोलिसांची कारवाई ( dieselnews )

कसा झालं अल्पवयीन मुलीचा विनयभंग

माहिती नुसार हडपसर : 19 वर्षीय तरुणाने अल्पवयीन मुलीचा वारंवार पाठलाग करुन तिला लग्नाची मागणी करुन विनयभंग केला. मात्र या याप्रकरणी तरुणावर विनयभंग व पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. परंतु हा प्रकार मांजरी बुद्रुक येथे सोमवारी (दि.29) दुपारी दीडच्या सुमारास घडला आहे.

मात्र आता याबाबत पीडित 16 वर्षाच्या मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. परंतु आता यावरुन निखील शिरीष थोरात (वय-19 रा. मांजरी बुद्रुक, पुणे) याच्यावर आयपीसी 354, 354(ड) सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मात्र आता पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे आई-वडील व भाऊ बाहेर गेल्यानंतर आरोपी पीडित मुलीच्या घरी आला. त्याने पीडित मुलीला लग्नाची मागणी घालून स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.

Crime News:मात्र आता आरोपी मागील काही दिवसांपासून वारंवार पाठलाग करत असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. आत या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास हडपसर पोलीस करीत आहेत.

अवैध बायोडिझेलसह तब्बल सतरा लाखांचा मुद्देमाल जप्त; लाजवाब धाब्याजवळ नांदुरा पोलिसांची कारवाई ( dieselnews )

0

 

सूर्या मराठी न्यूज ब्युरो /बुलढाणा

dieselnews:बुलडाणा : नांदुरा मलकापूर रोडवरील लाजवाब धाब्याच्या जवळील एका टीनपत्रात अवैधरित्या बायोडिझेल साठवून ठेवल्याची माहिती नांदुरा पोलिसांनी मिळाली. दरम्यान, मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे छापेमारी केली असता पोलिसांना बायोडीजेलसह एकूण १७ लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे.

आज गुरूवार, (दि.२) मे रोजी सकाळी ८ वाजेच्या आसपास नांदुरा पोलिसांनी ही कारवाई केली. कारवाईनंतर सरकारच्या वतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश आडे यांनी फिर्याद दिली. त्यावरून अब्दुल हमीद अब्दुल बासीत (४२ वर्ष) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस पथकासह नांदुरा मलकापूर रोडवरील एका टिनशेड मध्ये छापा मारला असता ५ लाख ७४ हजारांचा पेट्रोल सदृश्य द्रव पदार्थ अंदाजे ८२०० लिटर तसेच जीजे १५ एक्स ८१३१ क्रमांकाचा ट्रक किंमत १० लाख , १४ हजार

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

किंमतीचे मोठे पांढऱ्या रंगाचे ७ बॅरेल, निळ्या रंगाचे सहा बॅरेल किंमत ६ हजार, ५ हजार किमतीची एक इलेक्ट्रिक मोटर, डिझेल काढण्यासाठी वापरल्या जाणारा ३० फूट

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

dieselnews:पाईप किंमत १५०० रुपये , esaar कंपनीची दोन नोझल असलेली डिझेल मशीन असा एकुण १७ लाख ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पुढील तपास एपीआय सतीश आडे हे करीत आहेत.

जळगाव (जामोद) येथे माळीखेल मधील विहीर चे काम रखडले ( vihir news )

0

 

विहिरीचे काम पूर्ण करावे.नागरिकांची मागणी.

रामेश्वर गायकी / बुलढाणा

vihir news:जळगाव जा :- जळगांव जामोद शहरातील माळीखेल मधील विहीर चे काम रखडले आहे एखादे वेळी जिवीत हानी होवू शकते त्याकरीतासदर विहरीचे काम पूर्ण करावे.

अशी मागणी त्या भागातील नागरिकांनी केली आहे. ह्या बाबत प्राप्त माहिती आशी की, जळगाव जामोद शहरातील वार्ड नं.१४ माळीखेल भागातील सार्वजनिक विहिरीचे काम गेल्या ४ते५ महि न्यापासून रखडलेले आहे.अद्यापही काम पूर्ण झाले नाही.

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

तसेच विहिर पूर्णपणे उघडी असून विहिरीवर कुठल्याही प्रकारचे झाकण सुद्धा नाही.नगर परिषदला वारंवार तक्रार करूनही त्यांनी लक्ष दिले नाही.

उडवा उडविचे उत्तर देऊन काम रखडवले आहे. सदर काम लवकरात लवकर पूर्ण करण्याची स्थानिक नागरिकांनी मांगणी केली आहे. सदर काम का व कोणत्या कारणाने थांबले आहे?.असा प्रश्न नागरिकांना पडला आहे .

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

vihir news:सदर काम लवकर पूर्ण करावे. अन्यथा सदर विहीर मध्ये काही जिवीत हानी झाल्यास नगर परिषद व संबंधित अधिकारी जबाबदार राहील.असे नागरिकांनी सांगितले .

यश हे परिश्रमपूर्वक वारंवार केलेल्या छोट्या प्रयत्नांचे परिणाम आहे–आयुषी सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांचे मुख्याध्यापक आढावा व प्रेरणा कार्यशाळेत प्रतिपादन. Gadchirolinews

0

 

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक

Gadchirolinews:गडचिरोली-शिक्षण विभाग जिल्हा परिषद गडचिरोली आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीच्या वतीने गडचिरोली जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक,सर्व केंद्र प्रमुख यांच्या करीता दिनांक २८ एप्रिल ते २ मे २०२४ या कालावधीत विद्यार्थी,शिक्षक व शाळांच्या समग्र गुणवत्ता वाढीसाठी शैक्षणिक सत्र २०२४-२५ चे पूर्वनियोजन करण्याच्या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख यांच्या आढावा सभा घेऊन जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक यंत्रणेला प्रेरीत करीत आहेत.

आज दिनांक २ मे रोजी चामोर्शी-मुलचेरा,गडचिरोली व धानोरा तालुक्यातील सर्व मुख्याध्यापक व केंद्र प्रमुख यांची कारमेल हायस्कूल गडचिरोली यांच्या सभागृहात बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीचे अध्यक्ष आयुषी सिंह मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली ह्या होत्या तर प्रमुख अतिथी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीचे प्राचार्य धनंजय चापले, शिक्षणाधिकारी प्राथमिक पवार,शिक्षणाधिकारी माध्यमिक वासुदेव भुसे, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक विवेक नाकाडे,उपशिक्षणाधिकारी माध्यमिक अमरसिंग गेडाम, गडचिरोली गटशिक्षणाधिकारी हेमलता परसा,चामोर्शी गटशिक्षणाधिकारी नरेंद्र मस्के, धानोरा गटशिक्षणाधिकारी सुधीर आखाडे,शिक्षण विस्तार अधिकारी दिपक देवतळे प्रामुख्याने उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना म्हणाले की शंभर टक्के विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी कसोशीने प्रयत्न करणे गरजेचे आहे, वर्गखोल्या सुंदर आणि स्वच्छ करणे, प्रधानमंत्री पोषण आहार योजनेची व्यवस्थितपणे अंमलबजावणी करणे, परसबाग फुलवीने, नवोदय आणि शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थी अधिकाधिक उन्नत करणे,युडाईस आणि सरल प्रणाली अद्यावत करणे, शिक्षण परिषदांना नियमित उपस्थित राहुन स्वतः शिकणे व इतरांना शिकण्यासाठी मदत करणे, फुलोरा शालेय परिपाठातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवणे,माता पालकांसाठी सभा घेऊन प्रगतीचा आलेख सादर करणे, शाळा व्यवस्थापन समितीचा सहभाग घेणे, पर्यवेक्षणिय यंत्रणेनी शाळाभेटीतून शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी मदतगार ठरणे, शैक्षणिक वातावरण आनंददायी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे,NAS,PGI मध्ये जिल्ह्याचा शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख उंचाविणे, फुलोरा उपक्रमाची प्रभावी आणि परिणामकारक अंमलबजावणी होण्याच्या दृष्टीने सर्वांनी एकत्र मिळून प्रयत्न केले पाहिजेत.

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

कार्यशाळेत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोलीचे प्राचार्य धनंजय चापले यांनी निपुण भारत अभियानांतर्गत पायाभूत साक्षरता आणि संख्या ज्ञान विकसित करण्यासाठी प्रत्येक वर्गाच्या आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या अध्ययन निष्पत्ती येण्यासाठी मुख्याध्यापकांची भुमिका महत्वाची असते यावर प्रकाश टाकला.सोबतच भाषा,गणित व इंग्रजी विषयांमध्ये जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शाळा कोणत्या स्तरावर आहेत?टाप टेन आणि बाटम टेन चा संपूर्ण गोषवाऱ्यासह अहवाल याबाबत मार्गदर्शन केले.अध्यापन पद्धती, शिक्षक कौशल्य आणि मूल्यमापन यावर सविस्तर मार्गदर्शन केले.
शिक्षकांनी संकल्प करून गुणवत्ता उंचावण्यासाठी प्रयत्न करावा असे उपशिक्षणाधिकारी विवेक नाकाडे यांनी आवाहन केले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा

Gadchirolinews:आढावा व प्रेरणा कार्यशाळेत गडचिरोली-धानोरा-चामोर्शी-मुलचेरा तालुक्यातील जवळपास सातशे मुख्याध्यापक,फुलोरा समन्वयक, सर्व केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी,गट साधन केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.कार्यशाळेचे सूत्रसंचालन गट साधन केंद्र चामोर्शीचे गटसमन्वयक चांगदेव सोरते यांनी केले.

या तारीख ला होणार भेंडवळची घटमांडणी ?घटमांडणीला आता पर्यंत तीनशे वर्ष पेक्षाची जास्त परंपरा ( bhendvalnews )

0

 

bhendvalnews : बुलढाणा): येत्या पीक परिस्थिती, पाऊसपाणी त्याचबरोबर सामाजिक, आर्थिक आणि देशाच्या राजकीय परिस्थितीचा अंदाज सांगणारी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेली भेंडवळची या घटमांडणी ला यावर्षी १० मे रोजी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर केली जाणार आहे.

मात्र आता यावर्षी पावसाचे अंदाज काय राहतील याकडे संपूर्ण शेतकरी वर्गाचे लक्ष लागले तर आहे.

परंतु या पीक परिस्थितीचा अंदाज, अतिवृष्टी, दुष्काळ, देशाची आर्थिक परिस्थिती, राजकीय भाकीत, पृथ्वीतलावर येणारी संकटे, परकीय शत्रूपासून होणारे धोके अशा अनेक प्रश्नांचे अंदाज मांडणाऱ्या भेंडवळ मांडणीच्या भाकिताकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असते. मात्र आता या घटमांडणीचे भाकीत ११ मे रोजी वर्तविले जाणार आहे.

परंतु या पाणी पाऊस, पीक परिस्थिती, राजकीय स्थिती तसेच आर्थिक संकटे याबाबत ठोकताळे या घटमांडणीतून वर्तविले जातात.

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

त्यामुळे सामान्य जनतेतही आणि राजकीय लोकांनाही या मांडणीची प्रचंड उत्सुकता असते. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ या गावी घटमांडणीची ही परंपरा तीनशे वर्षापासून सुरू आहे. पण आता या भेंडवळची घटमांडणी १० मे रोजी अक्षय तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी केली जाईल. मांडणीचे भाकीत ११ मे रोजी पहाटे चंद्रभान महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज जाहीर करणार आहेत.

तर आता या घटमांडणी नेहमीप्रमाणे शेतकऱ्यांच्या उपस्थितीत केली जाणार आहे. परंतु आता या शेतकरी वर्ग मोठ्या उत्साहाने या घटमांडणीचे आपलीच हजरी लावत या भाकीत ऐकण्यासाठी उपस्थित असतात. परंतु घटांमध्ये झालेल्या बदलानुसार भाकिते वर्तविण्यात येतात.

मग या घट मांडणी अशी केली जाते भेंडवळची घटमांडणी

बातमी लाईव्ह. पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आता या अक्षय्य तृतीयेच्या दिवशी संध्याकाळी गावाबाहेर बस स्टॅन्ड शेजारच्या शेतामध्ये घटाची मांडणी करण्यात येते. मात्र आता या घटामध्ये गहू, ज्वारी, तूर, उडीद, मूग, हरभरा, जवस, तीळ, भादली, बाजरी, तांदूळ, अंबाडी, सरकी, वाटाणा, मसूर, करडी इत्यादी अठरा प्रकारची धान्य ठेवण्यात येतात.

bhendvalnews:मात्र आता या घटाच्या मध्यभागी मातीची ढेकळे त्यावर पाण्याने भरलेली घागर ठेवतात. पानसुपारी, पुरी, पापड, सांडोळी- कुरडई हे खाद्यपदार्थ ठेवले जातात. रात्रभर त्या ठिकाणी कोणीही थांबत नाही. दुसऱ्या दिवशी पहाटे या घटांमध्ये झालेल्या बदलाचे निरीक्षण केले जाते. त्यानंतर भाकीत वर्तविण्यात येते.

जळगाव जामोद शहर पोलीस स्टेशन दबंग कामगिरी वाहनचे डीजे बनविण्यात असल्याचे निदर्शनास आल्याने सदर वाहनास डीटेन.करण्यात आले होते ( policenews )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा .जि. प्र

policenews:दि. 30/04/2024 रोजी जळगांव जामोद शहरात रात्री DJ वाहन क्र. MH04 DS 8968 मध्ये मूळ स्वरूपात बदल करून DJ बनविण्यात आल्याचे निदर्शनास आल्याने सदर वाहनास पो.स्टे. ला डिटेन करण्यात आले होते,


सदर वाहनाची आज रोजी RTO च्या अधिकाऱ्यांना पाचारण करून तपासणी केली असता त्यांनी ₹ 33,500/- ची दंडात्मक कारवाई करण्यात आली.

असून,सदर वाहन पूर्ववत दुरुस्त करून दोन दिवसात RTO बुलढाणा कार्यालयात नेऊन पुन्हा नोंदणी करण्यासाठी RTO च्या सूचनेनुसार सोडण्यात आले आहे.

दुचाकी चोरट्यांची टोळी गजाआड! चार लाखांचा मुद्देमाल जप्त! बोराखेडी पोलिसांची कारवाई ( crimenews )

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री सुनील कडासने सो., मा. अपर पोलीस अधीक्षक श्री अशोक थोरात सो., मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री देवराम गवळी सो. यांच्या

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

policenews:मार्गदर्शनाखाली जळगांव जामोद पो.स्टे. चे पो.नि. आनंद महाजन, पो.उ.नि. सरकटे, पो.उ.नि. पंडित, पो.ह. शेगोकार, पो.शि. राजपूत तसेच RTO चे मोटार वाहन निरीक्षक भंडारे साहेब यांनी केली.