Home Blog Page 115

आमदाराच्या गाडीसमोर ट्रक झाला पलटी; आमदार संजय गायकवाड आले मदतीला धावून…( sanjaygaikwad )

0

 

बुलढाणा जिल्ह्यातील अजिंठा घाटामध्ये एक मालवाहू ट्रक भरधाव वेगाने जात होता.

अचानक वळणावर ट्रकचालकाचा ताबा सुटला आणि ट्रक पलटी झाला. विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय गायकवाड हे जळगाव खान्देश येथे जात असताना त्यांच्या समोरच हा अपघात घडला.sanjaygaikwad

या अपघातामध्ये एक कार आणि दुचाकीस्वार थोडक्यात बचावलेत. हा अपघात संजय गायकवाड यांच्या डोळ्यासमोर घडला.

त्यांनी तत्काळ वाहनाजवळ जाऊन त्या वाहनातील ड्रायव्हरला सुखरुप बाहेर काढलं. ड्रायव्हरला पुढील प्राथमिक उपचारासाठी दवाखान्यात दाखल केलं.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

विशेष म्हणजे ट्रक पलटी होण्याच्या काही क्षण आधीच तिथून दोन दुचाकी स्वार आणि एक कार जात होती. यात ते देखील बचावले आहेत. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

sanjaygaikwad: या थरारक घटनेचा व्हिडिओ आमदार संजय गायकवाड यांच्या गाडीच्या कॅमेऱ्यात कैद झालाय.

घाटबोरी, खामगाव वनपरिक्षेत्राच्या सीमा वरती भागात जंगलाला मोठे आग ( foreshtnews )

0

 

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील घाटबोरी आणि त्याच्या लगतच्या खामगाव वन परिक्षेत्राच्या सीमावर्ती भागातील जंगलाला ६ एप्रिल रोजी दुपारी आग लागली.
त्यामुळे लाखो रुपयांची वनसंपदा नष्ट झाल्याचा अंदाज आहे.

मात्र या दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले असल्याचे वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

ही आग नेमकी कशामुळे लागली ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही. देऊळगाव साखर्शा गावाजवळ पिंपरी धनगर परिसरातील जंगलाला ही आग लागली. यामध्ये जवळपास चार एकरातील वनसपंदा नष्ट झाली.

मेहकर तालुक्यातील घाटबोरी वन परिक्षेत्रातील या आगीचे लोण नंतर खामगाव वन परिक्षेत्रातही पसरले. त्यामुळे त्या भागातही नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

मात्र वनपाल व्ही. टी. मापारी यांनी या विषयाकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. देऊळगाव साकर्शा बीटचे वनपाल असतानासुद्धा जानेफळ येथूनच ते कामकाज पाहतात.foreshtnews

मात्र या आग लागल्यानंतर त्यांनी घटनास्थळी हजर न होता एका कर्मचाऱ्यास बोलावून त्याच्याकडून माहिती घेतल्याचे स्थानिकांनी सांगितले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मात्र आता सर्व याप्रकरणी घाटबोरी वन परिक्षेत्र अधिकारी ए. बी. येवले यांना विचारणा केली असता आग आटोक्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र नायगाव देशमुख येथील वन विभागाच्या जमिनीवरील ते अतिक्रमण काढत होते.

foreshtnews: याच कालावधीदरम्यान देऊळगाव साकर्शा, पिंपरी धनगरजवळच्या पट्ट्यात ही आग लागली होती. मात्र त्यांनी त्वरित वन कर्मचारी अंकुश खेनटे यांना संपर्क करून योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

आळसणा दोन एरातील उस जाळुन २५ हजाराचे नुकसान ,अज्ञात विरूध्द गुन्हा दाखल ( crimenews )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगांव तालुक्यातील आळसणा शेत शिवारातील दोन एकरातील ऊसाला आग लाऊन २५ हजार रू चे नुकसान केल्याची घटना दि. ६/३/२०२४ रोजी सकाळी उघडकीस आली.crimenews

हकीकत – अशा प्रकारे आहे की, आळसणा येथील अनिल साहेबराव लांजुळकर यांचे गट नंबर ५९ मध्ये पाच एक्कर शेतामध्ये उप पिकाची लागवड केलेली असुन.

अज्ञात आरोपीने फीर्यादीचे ताब्यातील दोन एकर शेतातील कोणीतरी अज्ञात इसमाने दि.५/४/२०२४ रोजी रात्री १ ते २ वाजता दरम्यान उस जाळुन अंदाजे २० ते २५ हजार रुपयाचे नुकसान केले आहे.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

crimenews:याप्रकरणी अनिल साहेबराव लांजुळकर यांनी ग्रामीण पो.स्टे ला दिलेल्या तोंडी रिपोर्ट वरुन पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुध्द अप क्र, १२३/२४ कलम ४३५ भा द वी अन्वये गुन्हा दाखल करुन तपास मा. पो नी सा आदेशाने बीट पोहेका अनिल बरींगे यांचेकडे देण्यात आला आहे.

 

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आमदार श्वेता महाले, जिल्हाध्यक्ष गणेश मानटे यांची भाजप बंडखोर शिंदेंशी बंदद्वार चर्चा! तिघांना उध्या नागपुरात येण्याचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचे फर्मान ( loksabha )

0

 

बुलढाणा: बुलढाणा लोकसभा मतदारसंघात दस्तुरखुद्द भाजप लोकसभा प्रमुखांनी बंडाचे निशाण फडकविले आहे.

यामुळे युतीमधील धुसफूस चव्हाट्यावर आल्याने आज संध्याकाळी चंद्रशेखर बावनकुळे यांनी संपर्क करून शिंदेंना उध्या रविवारी नागपुरात पाचारण केले आहे.loksabha

आज शनिवारी संध्याकाळी जिल्हाध्यक्ष गणेश मानटे व आमदार श्वेता महाले यांनी घेतलेल्या भेटी नंतर प्रदेश कडून हे फर्मान देण्यात आले आहे.

शिस्तबद्ध समजल्या जाणाऱ्या भाजपात बुलढाणा लोकसभा निवडणूक प्रमुख विजयराज शिंदे यांनी अर्ज भरला आहे. शुक्रवारी (दि ५) झालेल्या छानणीत त्यांचा भाजपचा अर्ज बाद झाला, पण अपक्ष म्हणून भरलेला अर्ज आणि बंड खोरी कायम आहे.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

यामुळे वरील दोन नेत्यांनी आज संध्याकाळी ६ वाजता बुलढाण्यातील विष्णुवाडी स्थित शिंदेंचे निवासस्थान गाठले! या तिघांमध्ये चाललेली दीर्घ चर्चा रात्री ८ वाजता आटोपली.

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

यादरम्यान बावनकुळे यांनी शिंदे व महाले यांच्यासमवेत चर्चा केली. मात्र तोडगा न निघाल्याने शिंदे, महाले ,मानटे, दीपक वारे, यांना थेट नागपुरात पाचारण करण्यात आले आहे.

loksabha:उध्या रविवारी दुपारी बावनकुळे यांच्या निवासस्थानी ही निर्णायक बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले.

मित्रानेच केले मित्रावर अनैसर्गिक कृत्य ..आरोपीवर गुन्हा दाखल ( crimenews )

0

 

जळगाव तालुक्यातील भेंडवळ बु. येथील घटना….

जळगाव जामोद तालुक्यातील भेंडवळ बुद्रुक येथील एका युवकाने आपल्या मित्रासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची तक्रार जळगाव जामोद पोलीस स्टेशनला प्राप्त झाली आहे….

या संदर्भात पोलीस सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील भेंडवळ बुद्रुक येथील 23 वर्षीय युवकावर गावातील त्याचा मित्र भगवान प्रमोद वाघ वय सत्तावीस वर्षे याने मागील एक वर्षापासून फिर्यादी याच्यावर बळजबरीने अनैसर्गिक संभोग केल्याची तक्रार दाखल केली आहे…

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

या घटनेतील फिर्यादी व आरोपी दोघेही चांगले मित्र असून आरोपीने वर्षभरापासून वारंवार केलेल्या लैंगिक त्रासाला कंटाळून फिर्यादी युवकाने अखेर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला….crimenews

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

crimenews:सध्या पीडित अकोला येथील सामान्य रुग्णालयात उपचार घेत असून सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याचे समजते….. दरम्यान जळगाव जामोद पोलिसांनी याप्रकरणी आरोपी भगवान प्रमोद वाघ यांच्या विरुद्ध अप क्र. 204 / 2024 कलम 377 भादवि, सहकलम अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास sdpo गवळी यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे।

जिल्हाभरातून संदीप शेळकेंना ७० हजार पत्रे! जिल्ह्याच्या विकासाच्या सांगितल्या संकल्पना ( sandeepshelke )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

बुलडाणा: जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केली आहे. जनतेचा जाहीरनामा कार्यक्रमातून त्यांनी जिल्हावासियांना विकासाच्या संकल्पना मांडण्याचे आवाहन केले होते.

त्यानंतर गेल्या ६ महिन्यांत जिल्ह्यातील तब्बल ७० हजार ७३३ जणांनी संदीप शेळके यांना पत्र लिहून विकासाच्या संकल्पना सांगितल्या. तसेच लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आग्रह केला.

गेल्या वर्षभरापासून संदीप शेळके यांनी वन बुलडाणा मिशन ही राजकीय लोकचळवळ सुरू केली. जिल्ह्याच्या शाश्वत व सर्वांगीण विकासासाठी संदिप शेळके कटिबद्ध आहेत. त्यासाठी त्यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

संदिप शेळके यांनी लोकसभेसाठी अर्ज भरावा ही जिल्ह्यातील जनमानसाची भावना होती. तशी भावना हजारो नागरिकांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Sandeepshelke :आपले सामाजिक काम मोठे आहे. जिल्ह्यातील हजारो तरुणांना आपण रोजगार उपलब्ध करून दिला आहे. जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन आपल्याकडे आहे.

 

sandeepshelke:तुमच्यासारखा माणूस संसदेत पोहचला तर जिल्ह्याचा कायापालट होईल. त्यामुळे तुम्ही लोकसभा निवडणुकीत उभे रहावे, आमचे तुम्हाला पूर्ण सहकार्य राहील, असाच बहुतांश पत्रांचा आशय आहे.

खामगाव एमआयडीसीतील पुन्हा एका इंडस्ट्रीजला लागली मोठी आग ( midcnews)

0

 

आगीत सरकी व मशिनरी जळून कोट्यावधी रुपयाचे नुकसान

खामगाव – एमआयडीसी भागातील गोयनका यांच्या अथर्व इंडस्ट्रीजला आग लागल्याची घटना आज ६ एप्रिल रोजी सकाळी 6 वाजेदरम्यान घडली.

या घटनेची माहिती मिळताच खामगाव नगर परिषदेचे अग्नीशमन दल एमआयडीसीमधील गोयनका यांच्या अथर्व इंडस्ट्रीजमधे दाखल झाले होते.

नगर परिषद अग्नीशमन दलाचे कर्मचारी हे आग विझविण्याचे प्रयत्न करीत होते. सरकी असल्यामुळे आजीने रुद्ररूप धारण केले.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

आग भीषण असल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्याकरिता मलकापूर, नांदुरा,शेगाव, जळगाव जामोद, बुलढाणा व इतर ठिकाणावरून अग्निशामक दलास प्राचारण करण्यात आले होते.

सदर आगीत सरकी मशनरी इतर साहित्य जळून कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले. सदर आग कशामुळे लागली समजले नाही.

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

midcnews:एमआयडीसीमधे स्वातंत्र्य अग्निशामक दलाचे वाहन नगरपालिकेने उपलब्ध करून द्यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे..

रविभाऊ जिंकल्यावरच चप्पल घालणार, तुपकर समर्थकाचा अनोखा संकल्प! एक हाताने कार चालविणारा सारथी म्हणतो गुलाल घेतल्यावरच इलाज, सिंदखेडराजा मधील कार्यकर्त्यांचा जिद्दबाज प्रचार (Ravikanttupkar)

0

 

Ravikanttupkar:बुलढाणा: निवडणूक म्हणजे प्रचार ओघाने आलाच. सर्वच कार्यकर्ते ते करतातच. मात्र रविकांत तुपकरांच्या चार जिद्दबाज कार्यकर्त्यांचा प्रचार अफलातून असाच म्हणावा लागेल.

हे शूर मावळे एकाच गावचे आहेत. त्यातील राम वसंतराव देवरे याने मागील एकदीड महिन्यापासून पायात चप्पल घालणं सोडलं! सध्या सूर्य आग ओकू लागला आणि सिंदखेडराजा तालुक्यातील तापमान ४२ डिग्रीच्या आसपास आहे. जमीनपण तापली आहे.

या भीषण तापमानातही ह्यो गडी बिना चप्पल, गावोगावी फिरत आहे. रविभाऊ लोकसभा जिंकले, खासदार झाले, गुलाल अंगावर घेतल्यावरच पायात चप्पल घेईल. राम भाऊचा असा अनोखा निर्धार अन अनोखे ‘अनवाणी व्रत! सोबतीला संदीप देवरे, अनिल देवरे आणि गजानन डीघोळे हे जिवाभावाचे सवंगडी.Ravikanttupkar

सगळे काळ्या आईची सेवा करून पिकं घेणारे युवा शेतकरी. मात्र तुपकरांची रथ यात्रा सुरू झाल्यापासून ते २६ एप्रिलला होणाऱ्या मतदान पर्यंत त्यांनी’ सुट्टी’ घेतली आहे.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

आमच्यासाठी, जिल्ह्यातील आणि राज्यातील शेतकऱ्यांसाठी २२ वर्षांपासून घरावर तुळशीपत्र ठेवून आंदोलन करणारा आमचा नेता रविभाऊ लोकसभा लढतोय. मग त्यासाठी तर एवढं करावंच लागेल अशी या चमुची भूमिका आहे. डीघोळे यांची कार, सर्वांनी मिळून त्यात इंधन टाकायचे आणि सकाळी सहाला प्रचाराला भिडायचं अशी त्यांची स्टाईल.

सोबतीला घरच्या शिदोऱ्या, नाहीतर कोणत्याबी पाव्हन्याच्या दोन घास खायचे अन पुढच्या गावाला सुटायचं. राम ला तर पायाला आलेल्या फोडाची, वेदनांची बी काळजी नाही!
एक हाताने सारथ्य!

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Ravikanttupkar :दरम्यान या कारचा चालक मालक म्हणजे गजानन डीघोळे म्हणजे लय भारी! खांद्याची नस दबल्याने, इलाज घेऊनही त्याचा उजवा हात ३ वर्षांपासून निकामी आहे.मात्र हा पठ्ठा एका हाताने मारुती अल्टो कार चालवितो.बारा तेरा तास प्रचार केल्यावर ही टीम माहेरखेड ला रात्री बेरात्री परत येते अन पहाटे दिस उजाळला की प्रचाराला भिडते…

दिव्यांग जोडप्यांच्या अश्रू ला आनंदात बदलले. आरपीएफ रंजन तेलंग यांची मर्मस्पर्शी कामगिरी ( Shegaonnews )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव.सविस्तर वृत्त असे की दिनांक 04 एप्रिल ला एक दिव्यांग जोडपे शेगाव रेल्वे स्टेशन ला आले होते त्यांच्या जवळ च बसलेल्या एका दुसऱ्या दिव्यांग व्यक्ती ने त्यांची बैग चुकीने आपल्या सोबत घेऊन गेला.

आयुष्य भराचे महत्वपूर्ण कागदपत्रे 03 मोबाईल व 1000 रु रोख गेल्याने ते दोघेही रडत असतांना तेलंग यांच्या नजरेत आले.तेलंग यांनी विचारपूस केली.

असता वरील हकीकत त्यांना माहिती पडली, तेलंग यांनी लगेच सीसीटीव्ही च्या माध्यमातून बैग नेणारा हेरला व तो ज्या ट्रेन मध्ये बसला ती ट्रेन बडनेरा येथील सहायक उप निरीक्षक भाऊ साहेब पवार यांना माहीती देऊन त्याच्या जवळून बैग ताब्यात घेतली.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

Shegaonnews :व लगेच शेगाव ला परत पाठवली ,रंजन तेलंग यांनी बैग मिळाल्याचे सांगताच दोघे ही आनंदाने भारावून गेले व वरील सर्व मुद्देमाल सह तेलंग यांनी कायदेशीर कारवाई करत आज दिनांक 05 एप्रिल रोजी बैग त्यांना परत केली . रंजन तेलंग यांच्या कामगिरी ने स्टेशन वरील यात्रेकरू सुद्धा भावुक झाले.

लग्नाचे आमिष दाखवून युवतीचे लैंगिक शोषण अत्याचार युवतीच्या तक्रारीवरून युवकाविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल ( crimenews )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

crimenews:शेगाव.प्रेम संबंध प्रस्थापित करत लग्नाचे आमिष देऊन युवकाने एका युवतीस येथील लॉजवर नेऊन तिचे वारंवार लैंगिक शोषण केल्याची घटना दि. ३ एप्रिल रोजी उघडकीस आली आहे.

या प्रकरणी अकोला जिल्ह्यातील पिडीत मुलीच्या तक्रारीवरून शेगाव पोलिसांनी सदर युवकाविरूध्द बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. अकोला जिल्ह्यातील कळमेश्वर येथील कृष्णा शंकर कदम (२४) या युवकाने गावातीलच एका वीस वर्षीय मुलीसोबत प्रेम संबंध प्रस्थापित केले.

मागील दोन वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. फिर्यादी ही अनुसूचित जातीची आहे हे माहीत असूनही फिर्यादीला लग्नाचे आमीष दाखवून कृष्णा याने सदर मुलीस लग्नाचे आमिष देऊन शेगाव येथील राजश्री पॅलेस लॉज मध्ये आणून वारंवार इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच त्याने त्याच्या मोबाईलमध्ये असलेले मुलीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देखील मुलीला दिली.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

crimenews:याबाबत पिडित मुलीने येथील शहर पो.स्टे.ला तक्रारी दिली असून त्यावरून पोलिसांनी कृष्णा शंकर कदम यांच्या विरूध्द अप नंबर १९१/२४ कलम ३७६ (२) (n) ४१७, ५०६, Ipc, ३ (१)(w) (i) (ii), ३ (२) (v) अजाज अत्याचार

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

crimenews:प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल केले असून पुढील . तपास उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव यांनी उपविभागीय पोलीस अधिकारी गवळी मलकापूर यांच्याकडे वर्ग केला आहे