Home Blog Page 119

शिवमंगल फाउंडेशन तर्फे जागतिक महिला दिन साजरा.( women,s day )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शिवमंगल फाउंडेशनच्या अध्यक्ष सौ मंगलाताई शिवाजी सोळंके. यांनी जागतिक महिला दिन च्या शुभ दिनी महिलांसाठी नवीन नवीन उपक्रम राबविले आणि सामाजिक कार्यकर्ते सर्व क्षेत्रात उत्कृष्ट समाजकार्य करणाऱ्या महिला यांनी शाल श्रीफळ देऊन सन्मानित केले.

आणि उत्कृष्ट विद्यार्थी यांचाही सत्कार केला. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे. प्रीतीताई शेगोकार माजी नगरसेवक. मायाताई दामोदर लेखिका सुप्रसिद्ध कवयित्री. योगिता ताई पाटील माहीम संचालिका. शितलताई शेगोकार महाराष्ट्र आर एस

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

एस च्या राष्ट्रीय अध्यक्ष. सविताताई झाडोकार. प्रणिता धामंदे अलका बांगर. नीताताई पाटील मंदाकिनी चव्हाण कविता ताई राज वैद्य. काँग्रेस शहराध्यक्ष. लीना भारंबे पुंडे मॅडम नेमाडे मॅडम पद्माताई सोळंके ऋतुजा सोळुंके सांनवी जुमडे

कल्पना लोखंडे इंगळे मॅडम सपकाळ मॅडम रूपाली शिंदे मॅडम सीआरपी. बचत गट महिला आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियाताई जुमडे यांनी केले आणि आभार प्रदर्शन चंदाताई फोकमारे यांनी केले.

लाईव्ह बातमी  पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

women,s day:उमाताई बोजरे केंद्रीय मानव अधिकार महिला संघटनाचे वडनेर भुलजी सदस्य यांनी पण कार्यक्रम उपस्थित दर्शविली होती

महाराष्ट्र बँकेचे एटीएम फोडले; १३ लाख २२ हजारांची रोकड घेऊन चोरटे कारमधून पसार ( ATMnews)

0

 

( सूर्या मराठी न्यूज डेस्क )

मोताळा नांदुरा मार्गावरील शेंबा येथील महराष्ट्र बँकेचे एटीएम अज्ञात टोळीने फोडल्याने पोलीस विभागासह जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.ATMnews

तेरा लाख बावीस हजार रुपयांची रक्कम लंपास करण्यात आली आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार आज रविवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

सुरक्षा यंत्रणेमुळे (अलर्ट अलार्म) बोराखेडी पोलीस अवघ्या पंधरा मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. चोरांच्या टोळीने वापरलेल्या कारचा पोलिसांनी पाठलाग केला.

मात्र कार चा वेग जास्त असल्याने चोरटे पसार होण्यात सफल झाले. ते खैरा- नांदुराच्या दिशेने पसार झाल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले.

प्राप्त माहितीनुसार शेंबा येथील मुख्य रस्त्यावर महाबँकेचे एटीएम आहे. आज रविवारी पहाटे चार वाजताच्या आसपास ते फोडण्यात आले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

प्रथम दर्शनी अंदाजानुसार ‘गॅस कटर’च्या सहाय्याने एटीएम फोडून त्यातील मोठी रक्कम घेऊन चोरांची टोळी पसार झाली. एटीएम संबधित सुरक्षा यंत्रणा (सिक्युरिटी अलर्ट) मुळे पोलिसांना एटीम फोडल्याची माहिती मिळाली.

यानंतर नजीकच्या पोलीस ठाण्याचे पोलीस दल व वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचले. परंतु तोपर्यंत चोर रोख घेऊन घेऊन पसार झाले होते.

ATMnews:सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोर कार चा वापर केल्याचे आढळून आले. परिसरसह जिल्ह्यात पोलिसानी नाकाबंदी केली आहे.

सेंट झेवियर्स इंग्लिश स्कूल चे विद्यार्थ्याचा शोध बंध रिसर्च मध्ये काय मिळाले

0

 

सेंट झेवियर्स इंग्लिश स्कूल शेगाव

येथे होमी भाभा तिसरा स्तर कृती-संशोधन प्रकल्पामध्ये शाळेतील ९ व्या वर्गातील विद्यार्थी भार्गव देशमुख यांचे संशोधन विषय-आंब्याची पाने आणि ते काय सूचित करतात:

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

आंब्याच्या पानांवर मातीतील किंवा इतर कणांचा प्रभाव आणि त्याचे निर्धारण खराब हवेच्या गुणवत्तेचा परिणाम आंब्याच्या पानांवर कसा होतो याबद्दल भार्गव देशमुख याने सहभाग घेऊन आपला शोध निबंध तयार केला.

तर त्या मध्ये त्याने कश्या पद्धतीने वायू प्रदर्शनाचा आंब्याच्या पानावर प्रभाव पडतो हे आपल्या पद्धतीने मांडले आहे

ज्यामध्ये त्याने स्वतः याचा अभ्यास केला आणि प्रत्यक्षात त्यावर रिसर्च केले आणि आपला शोध ,आणि हा अभ्यास करून त्याने प्रत्यक्ष आपला अनुभव मांडला आहे.

ज्या मध्ये त्याने आपल्या अनुभवातून सांगितले की कण द्रव्य आणि खराब हवेच्या गुणवत्तेचा परिणाम आंब्याच्या पानांवर होतो

आयशर कारच्या धडकेत एक ठार; तीन जखमी लव्हाळा मेहकर मार्गावर झाला अपघात ( accdent news )

0

 

बुलढाणा: साखर खेर्डा पोलीस स्टेशन हद्दीत लव्हाळा फाटा जवळीत पावर हाऊस समोर आयशर व कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले. 9मार्च चे उत्तररात्री पावनेतीन वाजता दुर्घटना घडली.

स्टेट बॅंकेचे लॉकर घेऊन धुळे येथून हैदराबाद जाणारा आयशर क्र. एम एच १८ – बी जी ८२२५ चालक सुनिल कोळी रा धुळे याने अवंढानागनाथ येथून दर्शनाहून बुलडाणा येथे निघालेल्या होन्डा एमेझ क्र एम एच 28 २५-बी के १७ ९५ ला जोरदार धडक दिली.

त्यामुळे कार मधील वैभव रामकृष्ण लोखंडे याचा चिखली येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच सागर एकनाथ सुरुशे, आदित्य गजानन सुरुशे सर्व रा सुंदरखेड बुलडाणा हे गंभीर जखमी झाल्याने त्यांचेवर संभाजीनगर येथे उपचार सुरू आहेत.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

अविनाश पंजाब गव्हाने रा सुंदरखेड बुलडाणा हा किरकोळ जखमी आहे.

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

accdent news:  अपघाताची माहिती मिळताच पोहेकॉ कडूबा डोईफोडे, पो कॉ लक्ष्मण ईनामे, पो कॉ. राजेश गीते, पो कॉ मेहेर यांनी घटनास्थळी मदत केली. दरम्यान पोलीसांनी आयशर चालकास ताब्यात घेतले आहे.

रायपुरचे माजी ठाणेदार सुभाष दुधाळ यांनी केली आत्महत्या,रायपूर ठाण्यात शोककळा ( policenews )

0

 

बुलढाणा तालुक्यातील रायपूर पोलीस ठाण्याचे ठाणेदार पदावर कार्यरत राहिलेले सुभाष दुधाड यांनी परळी रेल्वे स्टेशन जवळ रेल्वे खाली आत्महत्या केल्याची घटना आज 9 मार्चला सकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

त्यांच्या जवळ एक सुसाईड नोट मिळाली असून आपण ही आत्महत्या कौटुंबिक कारणाने केल्याचे उल्लेख केले आहे.

सुभाष दुधाड हे शांत, संयमी व मनमिळाव स्वभावाचे होते.कोरोना काळात रायपूर ठाणेदार पदाची जबाबदारी त्यांनी चांगल्या प्रकारे सांभाळली होती.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

त्यांची बदली बीड जिल्ह्यात झाली होती व सद्या ते पुणे येथे सीआयडी मध्ये पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत होते.

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

policenews:त्यांच्या आत्महत्याची माहिती प्राप्त होताच रायपूर ठाण्यात व शोककळा पसरली आहे.

तू माझ्याशी लग्न कर असे बोलून 29 वर्षीय महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तेल्हारा तालुक्यातील युवकाविरुद्ध गुन्हा. ( crimenews )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव: शहर पोलीस स्टेशनचे हद्दीत 29 वर्षीय महिलेचा हा धरून तू माझ्याशी लग्न कर अन्यथा मी आत्महत्या करेल असे बोलून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तेल्हारा तालुक्यातील कवठा येथील युवकाविरुद्ध शहर पोलिसांनी विनयभंग चा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशीही तेल्हारा तालुक्यातील कवठा येथील अनिकेत अनिल हिरोडे हा दारू पिऊन सदर महिलेजवळ आला व तिचा वाईट उद्देशाने हात धरून तू माझ्याशी लग्न कर नाहीतर मी आत्महत्या करेल अशी धमकी दिली.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

यावेळी पीडित महिलेने अडावड केल्याने त्या ठिकाणी पीडीतीची आई आणि भाऊ आले व त्यांनी आरोपीला पोलीस स्टेशनला आणले अशा तक्रारीवरून शेगाव शहर पोलीस स्टेशन मध्ये आरोपी अनिकेत अनिल हिरोडे राहणार कवठा तालुका तेल्हारा जिल्हा अकोलायाच्या विरुद्ध कलम 354 452 506 बदमीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

crimenews:अधिक तपास शेगाव शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार हेमंत ठाकरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल संजय करटले बक्कल नंबर 12 75 पोलीस कॉन्स्टेबल निलेश तायडे करीत आहेत

निसर्गाची किमया न्यारी ; वनोजा परिसरात दुर्मिळ पिवळ्या पळसासोबत च दुर्मिळ सोनसावर फुलला..(Yellow silk cotton tree )

0

 

प्रमोद सावळे, मंगरुळपीर प्रतिनिधी

वनोजा परिसरात निसर्गाची किमया पहायला मिळत आहे. दुर्मिळ पिवळ्या पळसाचे अस्तित्व असलेल्या वनोजा येथून च जवळ असलेल्या काटेपूर्णा वन्यजीव अभयारण्यामध्ये दुर्मिळ असलेला सोनसावर देखील फुलला आहे.

वनोजा येथील च पर्यावरणप्रेमी युवकांनी याचा शोध लावला आहे.याला मराठी मध्ये गणेर ( Yellow silk cotton tree) असे म्हणतात.हा मध्यम आकाराचा असून पानझडी या प्रकारामध्ये मोडतो.

हा वृक्ष भारतात मर्यादित भागात च आढळतो. जानेवारी महिन्यातील या वृक्षाची पानगळ होऊन फेब्रुवारी महिन्यात याला मोठी सोनेरी पिवळ्या रंगांची फुल येतात.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

हा वृक्ष फक्त डोंगरावर वाढणारा असून त्याची रोपे तयार करायची असल्यास ते सहजासहजी तयार होत नाहीत.हा वृक्ष अतिशय उपयुक्त असा आहे इंग्रजी मध्ये याला टॉर्च ट्री असे म्हणतात कारण त्याची वाळलेली लाकडे भुरुभुरू जळतात व खुप वेळ जळतच राहतात.Yellow silk cotton tree

या वृक्षाच्या फांद्यामध्ये विशिष्ठ प्रकारचे तेल असते म्हणून याचा वापर रात्रीची जंगलात भटकंती करताना मशाली म्हणून पूर्वी च्या काळी केल्या जात असे.याचे फळ हे वांग्याच्या आकाराची असून व जांभळ्या रंगाची असतात.फळे पक्व झाल्यावर फळांना करडा रंग प्राप्त होतो.

या फळांमध्ये असलेला कापुस खुप मुलायम व क्रीम रंगाचा असतो. साध्या व काटेसावरा च्या कापसापेक्षा देखील हा सोनसावराचा कापुस मुलायम असतो.या वृक्षाला धार्मिक महत्त्व देखील असून श्रीलंका येथे मोठ्या प्रमाणात आढळतो.या वृक्षाला डिंकाला कथल्या गोंद असे म्हणतात हा डिंक सुद्ध औषधी उपयोगाचा आहे.

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या सोबतच याची साल व पाने देखील औषधी गुणधर्मयुक्त अशी आहेत.यांच्या सालिमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असल्यामुळे यापासून दोरखंड तयार करतात.असा हा सोनसावर वृक्ष वनोजा येथील पर्यावरणप्रेमी आदित्य इंगोले,प्रविण गावंडे,सौरव इंगोले,शुभम हेकड दूर डोंगरावर दिसून आला. निष्पर्ण सागच्या जंगलात दुरून पिवळे सोनेरी फुले अक्षरशः नयनतृप्त करीत होते. वाशिम जिल्ह्यातील ही कदाचित पहिलीच नोंद असावी.

Yellow silk cotton tree:या आधी सुद्धा वनोजा येथे असलेला दुर्मिळ पिवळा पळस देखील याच युवकांनी शोधुन त्याला प्रकाशझोतात आणले. पिवळ्या पळसाच्या संवर्धनासाठी हे युवक गेल्या 3 वर्षापासून वनविभागासोबत झटत आहेत.त्यांनी कारंजा येथे पिवळ्या पळसाचे शेकडो रोपे तयार केली आहे.या सोनसावर वृक्षाच्या संवर्धनाचा त्यांचा मानस आहे.

 

भव्य शिव महापुरान कथेचे आयोजन सालाबादाप्रमाणे गावकऱ्यांचे नियोजन कथावाचक संत दास जी गिरी महाराज ( girimaharaj )

0

 

रत्नाताई डिक्कर खामगाव

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिव महापुराण कथा जलम या गावात मोठ्या थाटात संपन्न होत आहे शिवपुरान कथा वाचक हरिभक्त परायण संत दास जी गिरी माऊली यांच्या मुखातून जलम वासीयांना भरभरून ज्ञान व आनंद प्राप्त होत आहे.girimaharaj

या कथेमध्ये झाकी व संगीत शिव महापुराण कथा असल्यामुळे प्रसन्नाच वातावरण जलम गावात निर्माण झालेला आहे गावातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच पंचक्रोशीतले टाळकरी संध्याकाळी कीर्तनाचा लाभ घेत आहेत.

या कथेचे विशेष म्हटल म्हणजे जास्तीत जास्त महिलावर्ग तरुण वर्ग उपस्थित असतो शिवमहापुरा कथा पुरातन काळापासून चालत आलेली आहे पण या कथेतून जवळच तरुण वर्ग महिला वर्ग संस्कारी होत आहे.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

महादेवाचे मंदिर ओसाड झाली होती पण या महापुराण कथेपासून आता मंदिरात गर्दी मावत नाही आनंद बघण्यासाठी व या सोहळ्याचे जलम गावाचं विशेष कौतुक करण्यासाठी रेड न्यूज सूर्या मराठी न्यूज व गाव माझा न्युज गावात पोचून या महापुराण कथेतील आनंद उत्सव पूर्ण जगभरात प्रसिद्ध करण्यासाठी टीम पोचली होती.

रेड न्यूज सूर्या मराठी न्यूज ने महिलांचा पावली चा आनंद भजनाचा आनंद सूर्या मराठी न्यूज च्या माध्यमातून जिल्हा नव्हेत तर जगभर यांचा महापुराण कथेचा अवलोकिक व दिव्य सोहळा श्रीसंत दास जी गिरी महाराजांच्या मुखातून प्रसारित करण्यात आला.

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

girimaharaj सूर्या मराठी न्युज चे कौतुक महाराजांनी या कथेच्या माध्यमातून केले आहे.

महाशिवरात्री का साजरी करतात, जाणून घ्या यामागील खरं सत्य ( mahashivratri )

0

 

महाशिवरात्रीचा उत्सव हा दरवर्षी हिवाळ्याच्या उत्तरार्धात म्हणजेच फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला येतो.

भगवान महादेव यांना समर्पित केलेला हा दिवस संपूर्ण वर्षभरातून एकदाच येतो. त्यामुळे संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात महाशिवरात्र साजरी केली जाते. या दिवशी भगवान महादेवाचे भक्त त्यांची उपासना करतात.mahashivratri

वेस्ट इंडीज आणि नेपाळ मध्ये महादेवांचे कित्येक भक्त आपल्याला पाहायला मिळतील. महाशिवरात्री या शब्दाचा अर्थ “शिवाची महान रात्र” असा होतो. या रात्री भक्तजण तांडव नृत्य करतातकरतात व आपला आनंद साजरा करतात.
महाशिवरात्रीचे महत्त्व :

महाशिवरात्रीच्या दिवशी कित्येक भाविक उपवास करतात. फक्त आपल्या देशातच नव्हे तर इतर दक्षिण आशियाई देशांमध्ये सुद्धा महाशिवरात्री साजरा केला जाते.mahashivratri

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

महाशिवरात्रीच्या पौराणिक कथांप्रमाणेच शिवरात्री नृत्य परंपरेला देखील खूप महत्त्व आहे. इतकेच नव्हे तर त्याला काही ऐतिहासिक पार्श्वभूमी सुद्धा आहे.

या दिवशी खजुराहो, कोणार्क, पट्टाडकल, चिदंबरम यांसारख्या मोठ्या मंदिरात वार्षिक नृत्य महोत्सव आयोजित केला जातो.

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

mahashivratri:एका पौराणिक कथेनुसार भगवान महादेवांचा देवी पार्वती सोबत विवाह झाला होता, म्हणून हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा करतात. तसेच या दिवसाबद्दल आणखी एक कथा प्रचलित आहे. ती म्हणजे समुद्रमंथनाची…. या कथेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराने समुद्र मंथनातून निघालेले विष प्राशन करून सृष्टीचे संरक्षण केल्याचे समजते.

रविकांत तुपकरांचा झंझावात उद्या ०९ मार्चला संत नगरी शेगावात! निर्धार मेळाव्याला करणार संबोधित ( Ravikant Tupkar )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा

शेगाव: (प्रतिनिधी ता.०७) :- Ravikant Tupkar: शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलडाणा लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर त्यांना जिल्हाभरातून जोरदार समर्थन मिळत आहे.

काहीही झाले तरी यंदा लोकसभा निवडणूक लढवणारच असा निर्धार सर्वसामान्य नागरिक व समर्थकांनी केला आहे.

दरम्यान उद्या, ९ मार्चला रविकांत तुपकर संत नगरी शेगावात निर्धार मेळाव्याला संबोधित करणार आहेत. काळपांडे जिन जवळील पांडुरंग कृपा/ कुणबी समाज मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता हा मेळावा होणार आहे.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकर यांनी गेल्या १३ दिवसांपासून जिल्ह्यात निर्धार परिवर्तन यात्रा सुरू केली आहे. घाटाखालील चार तालुके पिंजून काढून ही यात्रा आता घाटावर चिखली, देऊळगावराजा आणि सिंदखेडराजा तालुक्यांमध्ये धडकली आहे.

प्रत्येक ठिकाणी रविकांत तुपकरांच्या या निर्धार परिवर्तन यात्रेला प्रचंड असा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. ५ मार्च रोजी तुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत चिखलीत पदाधिकारी व समर्थकांचा तातडीची बैठक पार पडली.Ravikant Tupkar

बैठकीत ठरल्याप्रमाणे ७ मार्चपासून निर्धार परिवर्तन अभियानाची सुरुवात झाली आहे. या अभियानांतर्गत तुपकर यांचे शिलेदार गावागावात पोहचून नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत, लोकसभेत परिवर्तन करण्याचा निर्धार देखील गावागावात करण्यात येत आहे.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

या पार्श्वभूमीवर उद्या, ९ मार्चला शेगावात तुपकर यांच्या लढवय्या शिलेदारांचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात तुपकर नेमके काय बोलणार? करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Ravikant Tupkar:या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शेगाव तालुक्यातील रविकांत तुपकर मित्र मंडळाने केले आहे.