Home Blog Page 118

एल.टी.टी ते थिविम जादा रेल्वेची सुविधा.( rail news )

0

 

‘कोकण रेल्वे’ प्रशासनाचा निर्णय उन्हाळी हंगामात प्रवाशांना आधार..

प्रतिक कुऱ्हेकर. अकोला

rail news :मुंबई (वि. प्रतिनिधी):-उन्हाळी हंगामामध्ये कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने अतिरिक्त विशेष गाडी धावणार आहे. लोकमान्य टिळक (एलटीटी) ते थिविम, अशी ही जादा गाडी आहे. कोकण रेल्वे प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली.

गाडी क्र. ०११८७ लोकमान्य टिळक (एलटीटी) ते थिविम विशेष साप्ताहिक गाडी एलटीटी येथून १८ एप्रिल ते ६ जूनपर्यंत दर गुरुवारी रात्री १०.१५ वाजता सुटेल. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी ९.५० वा. थिविमला पोहोचेल.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

परतीसाठी गाडी क्र. ०११८८ थिविम ते लोकमान्य टिळक विशेष साप्ताहिक गाडी १९ एप्रिल ते ७ जून पर्यंत दर शुक्रवारी थिविम येथून सायंकाळी ४.३५ वा. सुटेल.

ही गाडी दुसऱ्या दिवशी लोकमान्य टिळक येथे पहाटे ३.४५ वाजता पोहोचेल. ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड स्थानकावर थांबेल.

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तसेच गाडी क्र. ०११२९ एलटीटी ते थिविम विशेष साप्ताहिक एलटीटी येथून २० एप्रिल ते ८ जून पर्यंत दर शनिवारी रात्री १०.१५ वाजता सुटेल. परतीसाठी गाडी क्र. ०११३० थिविम ते एलटीटी ही गाडी थिविम येथून २१ एप्रिल ते ९ जून पर्यंत दर रविवारी सायंकाळी ४.१५ वाजता सुटेल.

ही गाडी ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड स्थानकावर थांबेल. या गाडीचे तिकिट बुकिंग १३ एप्रिलपासून सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली, इंटरनेट आणि आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर सुरू झाले आहे.
——————————–
कोकण रेल्वेचा गुरुवारी मेगाब्लॉक…

कोकण रेल्वे मार्गावरील मडगाव ते कुमटा या विभागात मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक १८ एप्रिल रोजी दुपारी १२ ते ३ या वेळेत आहे. मडगाव कुमटा विभागादरम्यान मालमत्तेच्या देखभालीसाठी तीन तासांचा मेगाब्लॉक चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे काही रेल्वे सेवेवर परिणाम होणार आहे.

rail news :गाडी क्र. ०६६०२ मंगळुरु सेंट्रल ते मडगाव विशेष गाडीचा प्रवास १८ रोजी कारवार स्थानकावर अल्पावधीत थांबेल. तसेच कारवार ते मडगाव विभागादरम्यान अंशतः रद्द होईल. गाडी क्र. ०६६०१ मडगाव ते मंगळुरू सेंट्रल या गाडीचा प्रवास १८ रोजी कारवार स्थानकापासून नियोजित वेळेवर सुरू होईल. मडगाव ते कारवार विभागादरम्यान अंशतः रद्द होईल, अशी माहिती कोकण रेल्वेने प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

1 मे पासून आता वनप्लसचे मोबाईल मिळणार नाही शॉपीमध्ये ( oneplus mobaile )

0

 

oneplus mobaile : मात्र आता वनप्लस या प्रिमिअम ब्रँडकडून भारतातील करोडो ग्राहकांना धक्कादायक बातमी येत आहे.

तर आता लवकरच येत्या १ मे पासून वनप्लसचे स्मार्टफोन, टॅब्लेट ऑफलाईन स्टोअर्स म्हणजेच मोबाईल शॉपींमध्ये मिळणार नाहीत.

तर मात्र यामुळे हे फोन ग्राहकांना केवळ ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरच विकत घ्यावे लागणार आहेत.

तर aatabवनप्लस आणि रिटेल स्टोअर विक्रेत्यांमध्ये वाद सुरु आहे. या वादावर तोडगा न निघाल्याने रिटेल स्टोअर संघ ORA कडून वनप्लस डिव्हाईसची विक्री येत्या १ मे पासून रोखण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

महसुलाचे अधिकार वापरणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची शेख सईद शेख कदीर यांची मागणी,!! ( foreshtnews )

मात्र आता सर्व कंपनी त्यांना दिलेली आश्वासने पूर्ण करू शकली नाही यामुळे ही विक्री बंद करण्याचा निर्णय घेतल्याचे संघटनेने सांगितले आहे.

येत्या १ मे पासून आंध्रप्रदेश, तेलंगाना, तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरातच्या जवळपास २३ रिटेल चेन आणि ४५०० स्टोअर्सवर वनप्लसचे फोन मिळू शकणार नाहीत.

One plus वनप्लसच्या मार्जिनमधील नफ्याचे प्रमाण सातत्याने घसरत चालले आहे. यामुळे वनप्लचे फोन विकणे फाय़देशीर ठरत नाहीय.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तर आता तसेच सेवा आणि वॉरंटीदेखील ग्राहकांना वेळेवर दिली जात नाही.

मात्र यामुळे फोन विकलेल्या ग्राहकांकडून अनेक तक्रारी येत होत्या, असा आरोप विक्रेत्यांनी केलेला आहे. यामुळे वनप्लस आणि दुकानदारांमध्ये वाद सुरु आहेत.

Oneplus mobaile :सन २०२२ च्या तुलनेत २०२४ मध्ये वनप्लसच्या फोनच्या विक्रीत 3.68 टक्क्यांवरून 4.82 टक्के एवढी वाढ झाली आहे.

महसुलाचे अधिकार वापरणाऱ्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची शेख सईद शेख कदीर यांची मागणी,!! ( foreshtnews )

0

 

foreshtnews: मेहकर चे तत्कालीन सहाय्यक उपवन संरक्षक अधिकारी व घाटबोरी वन परक्षेत्र अधिकारी,वनपाल,वनरक्षक,यांनी अवैध्य रेती वाहतूक प्रकरणी आपल्या अधिकाराचा केला दुरुपयोग,

शेख सईद शेख कदिर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय अल्पसंख्यांक पिछडा वर्ग संघटना नई दिल्ली चे वतीने दिनाक,15/4/2024 रोजी उप वन संरक्षक अधिकारी बुलडाणा यांचे दालनात निवेदन सादर केले निवेदनात गेल्या कित्तेक वर्ष पासून वन्य प्राण्यांच्या संरक्षणार्थ जंगल वाचविण्याचे व वन विभागातील होत असलेला भ्रष्टाचार शासणास्मोर व जनतेसमोर उघड करण्याचे कार्य आमची संघटना करत आहे,

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील घाटबोरी वन परिक्षेत्र कार्यालयात अवैध रेती वाहतूक प्रकरणी मोठ्या प्रमाणात भ्रष्टचार झाल्याचे माहिती अधिकारातून उघड झाले,
घाटबोरी वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या देऊळगाव सकर्षा,मांडवा, वडळी,या नियत क्षेत्रात वनरक्षक, वनपाल,यांनी राखीव वन जमिनीतून अवैध्य रेतीची वाहतूक केल्या प्रकरणी विविध ठिकाणी चार वनगुन्हे जारी करून ट्रॅक्टर ट्रॉली जप्ती,प्रकरणी वन गुन्हा नोंदविताना जी,पी,एस,फोटो प्रकरणात नोंदवले नाही,

अवैध्य रेती वाहतूक ही खाजगी व मालकी क्षेत्रातील असल्याचे दाखवत राखीव वन जमिनीतून वाहतून केल्या प्रकरणी दंड आकारण्याचा प्रताप वनाधिकारी यांनी केला,प्रत्यक्षात मात्र रेती उपसा वाहतूक प्रकरण मालकी क्षेत्रात येत असल्याने प्रकरण महसूल विभागाकडे वर्ग करणे अपेक्षित होते परंतु तत्कालीन वन परिक्षेत्र अधिकारी यांनी उपरोक्त प्रकरणी वाहन चालक मालक यांचे सोबत मोठ्या प्रमाणात आर्थिक देवाण घेवाण करून अवैध्य रेती प्रकरणी कंपाऊंड केस करण्याची शिफारस वरिष्ठांकडे करण्यात आली असता.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

तत्कालीन सहाय्यक उप वन संरक्षक अधिकारी मेहकर यांनी प्रकरणी चौकशी करून केस कंपाऊंड न करता महसूल विभागाकडे वर्ग करणे अपेक्षित होते परंतु महसुली अधिकार नसताना आपल्या पदाचा गैर वापर करत मेहकरचे सहाय्यक उपवन संरक्षक अधिकारी यांनी प्रकरण केस कंपाऊंड करून वाहतूक दंड आकारून वाहन सोडण्याचे आदेशित केले,

यावरून रेती माफिया सोबत संगनमत करून आर्थिक देवाण घेवाण करून आरोपींना अभय देणाऱ्या तत्कालीन सहाय्यक उपवन संरक्षक अधिकारी मेहकर,वन परिक्षेत्र अधिकारी व वनरक्षक पनपाल यांनी महसुली अधिकार स्वतः वापरून आपल्या पदाचा गैर वापर केला,

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

प्रकरणी वरिष्ठ स्तरावरून चौकशी करून वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा व महसूल विभागाचे झालेले नुकसान दोषी अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक मलमत्ते तून कपात करण्याचे आदेश देण्यात यावे असे उप वन संरक्षक अधिकारी बुलडाणा यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे

Foreshtnews :निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई,वन मंत्री मुंबई,प्रधान मुख्य वनसंरक्षक प्रा वनबल नागपूर, मुख्य वनसंरक्षक प्रा अधिकारी अमरावती,जिल्हा अधिकारी बुलडाणा,वन परिक्षेत्र अधिकारी घाटबोरी यांना देण्यात आल्या,,

आज मुर्तीजापुर शहरात श्री राम नवमी जन्मोत्सव निमित्त भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन…!( ramnavami )

0

प्रतीक कुऱ्हेकर अकोला

ramnavami: मूर्तिजापूर :- येथील सार्वजनिक श्री राम नवमी जन्मोत्सव समिती व सकल हिंदू समाज मूर्तिजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात श्री रामनवमीनिमित्त भव्य मोटर सायकल रॅलीचे व शोभयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

सार्वजनिक श्री राम नवमी जन्मोत्सव समिती व सकल हिंदू समाज मूर्तिजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीराम नवमी निमित्त शहरातील जुनी वस्ती स्थित असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिर येथून सकाळी 9 वाजता भव्य मोटार सायकल रैली चे आयोजन करण्यात आले.

असून सदर मोटर सायकल रॅली श्री स्वामी समर्थ मंदिर येथून जुनी वस्ती येथे टांगा चौक मार्गे, मोरारजी चौक, भगतसिंग चौक, मुख्य मार्गस्थ स्टेशन

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

विभाग स्थित असलेला श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, रेल्वे स्टेशन चौक सुभाष चौक च्या मार्गाने रेल्वे स्टेशन परिसरातील श्रीराम मंदिर येथे संपन्न होईल तर सायंकाळी 6 वाजता याच मार्गाने शहरातून प्रभू श्रीरामचंद्रांच्या चरित्रावर आधारित विविध चित्ररथांसह शोभायात्रा संपन्न होणार आहे.

यामध्ये प्रामुख्याने टाळमृदुंगासह भजणी मंडळ, दिंड्या,डी. जे साउंड, लेझीम पथक, ढोल पथकाचे सादरीकरण होणार असून भव्य मोटर सायकल रॅली ला व शोभा यात्रेस शहरातील राम भक्तांनी व हिंदू ज्ञाती बांधवांनी जास्तीत जास्त संख्येने

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

ramnavami: उपस्थित राहण्याचे आवाहन सकल हिंदू समाज व सार्वजनिक श्री राम नवमी जन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

वनपरीक्षेत्रात अवैध डांबरी रस्त्याच्या प्रकरणातील तो भ्रष्ट वनरक्षक अध्यापही मोकाटच.?( foreshtnews )

0

तक्रारदाराची चिरी-मिरी देऊन केले तोंड बंद.

 या प्रकरणात वरिष्ठ अधिकारीयांनी चौकशी करून संबंधित वनरक्षक यांना तात्काळ निलंबित करावे

 या प्रकरणात होणार लवकरच तक्रार भ्रष्ट वनरक्षक प्रदीप मुंडे यांचेवर टांगती तलवार 

foreshtnews :बुलढाणा :- जिल्ह्यात येत असलेल्या तरोडा ते तारापूर वनपरीक्षेत्रातून जाणाऱ्या अवैध डांबरी रस्त्याची चौकशी करण्याची मागणी गेल्या वर्षभरा पासून शासनाच्या दारी रेटून धरण्यात आली आहे.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

बुलढाणा जिल्ह्यातील येत असलेल्या वनपरीक्षेत्रात सण 2023 मध्ये तरोडा ते तारापूर या वनविभागाच्या परिसरात अवैध रित्या डांबरी रस्ता बांधकाम करण्यात आल्याने या भ्रष्टाचारात समाविष्ट असलेल्या प्रदीप मुंडे नामक वनरक्षकाची संबंधित विभागाने सखोल चौकशी करण्याची मागणी सर्व दुरून रेटून धरण्यात आली होती.

दरम्यान काही तक्रारदात्यांनी या करीता आंदोलन ही केले होते त्या आंदोलना वेळी उपवनसंरक्षक बुलढाणा च्या वतीने 28 ऑगस्ट 2023 रोजी आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तर या वेळी उपवनसंरक्षक यांच्या वतीने यावेळी आंदोलकांना आश्वासन देत संबंधित प्रकरणातील भ्रष्ट वनरक्षक प्रदीप मुंडे यांच्यावर कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले होते.

मात्र हे नावापुरतीच 2023 पासून ते अध्याप पर्यंत या अवैध डांबरी रस्त्याची चौकशी अथवा संबंधित भ्रष्टअधिकाऱ्यांवर कुठलीही कार्यवाही न झाल्याने यातील मुख्य भ्रष्टवनरक्षक प्रदीप मुंडे हा अध्यापही मोकाटच असल्याचे चित्र दिसतं असून आपल्यावर कुठलीही कार्यवाही होत नसून आपले कोणीही काही करत नाही.

असे इतरांना सांगत सदर वनरक्षक फिरत असून याची मज्जाव वाढली आहे. यामुळे मात्र वन विभागाच्या कार्यावर प्रश्नचिन्हच उभे राहत असून विविध चर्चेला उधाण आले आहे.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

विशेष म्हणजे वनरक्षक प्रदीप मुंडे हे वादग्रस्त म्हणून सर्वत्र चर्चेत असून हे महोदय जिथे ही जातात तिथे वादग्रस्त करता आपले नाव लौकिक करतात असे नाव न सांगण्याच्या अटीवर संबंधित विभागाच्याच एका कर्मचाऱ्यांनी सांगितले.

foreshtnews :या वनरक्षकाने एका विशिष्ट समुदायातील गरीब लोकांना हाताशी धरून लाखो रुपयांची अफरा-तफर केल्याचे ही गांभीर्य जनक बाब समोर येत आहे.

शुल्लक कारणावरून शेजार्यांमध्ये मारहाण, दोघे जख्मी, परस्पर विरोधात तक्रारीवरून दोन्ही कडील सात जणांविरोधात गुन्हा दाखल ( crimenews )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

Crimenews : शेगांव .शेजारी राहणारे डोंगे व यादव परिवारात शुल्लक कारणावरून मारहाणीत दोघे जन जख्मी झाल्याची घटना दि.१४ एप्रिल २०२४ रोजी रात्री ९ वा चे सुमारास संगमनेर येथे घडली

याबाबत प्राप्त माहिती अशी की संगमनगर येथील रहिवासी सौ.आशा बबलू यादव हया घरी हजर असतांना यातील आरोपी क्र-१ ते ३ हे फिर्यादीचे घरी आले लोखंडी गेटला लाथा मारुन शिवीगाळ केली. फिर्यादीचा लहान मुलगा अजय हा बाहेरून आला असता आरोपी यांनी त्यास चापटबुक्यानी मारहाण केली तेव्हा फिर्यादी हा आवरण्यास गेली असता फिर्यादीस सुध्दा शिवीगाळ करुन चापटाबुक्क्यांनी मारहाण केली.

फिर्यादी मोठा मुलगा आकाश यादव यास आरोपी तसेच शाम विठठल डोंगे याने त्याचे हातात असलेले काहीतरी वस्तू फिचे आकाश याचे डाव्या खांदयावर पाठीवर मारुन जखमी केले. त्यामुळे त्यातून रक्त निघाले. तसेच त्यांनी त्याचे डोक्यावर सुध्दा मारहाण केली.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

व जिवाने मारण्याच्या धमक्या दिल्या. याप्रकरणी सौ.आशा यादव यांचे तोडी रिपोर्ट व मेडी सर्टीफिकेट वरुन शहर पोलीसांनी आरोपी विठठल डोंगे,राम विठठल डोंगे, शाम विठठल डोंगे सर्व रा. संगमनगर शेगाव यांचे विरुद्ध अप नं. २२७/२०२४ कलम४५२ ,३२४,३२३,५०४,५०६,३४ भादंवि अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

तसेच – सौ. कल्पना विठठल डोंगे यांनी फिर्यादीत म्हटले आहे की आकाश बबलू यादव याने फिर्यादीचे मुलासोबत वाद केल्याने सदर घटणेबाबत समजावण्यासाठी फिर्यादी ही आरोपीच्या घरी गेली असता आरोपी क्र १ ते ४ यांनी शिवीगाळ केली व केस धरुन ओढताण केले तसेच फिर्यादीचे मुलांना चापटाबुक्यांनी मारहाण केली तसेच आरोपी क्र ३ व ४ यांनी घरात पळत जावून हातात लोखंडी पाइप आणून फिर्यादीचे मुलगा शाम व राम यांच्या डोक्यावर मारुन जखमी केले.

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Crimenews: व जिवाने मारण्याच्या धमक्या दिल्या. अशा तोडी रिपोर्ट व मेडी सर्टीफिकेट वरुन शहर पोलीसांनी आरोपी सौ. आशा बबलू यादव, बबलू यादव, आकाश बबलू यादव,अजय बबलू यादव सर्व रा. संगमनगर शेगाव यांचे विरुद्ध अप नं. २२८/२०२४ कलम ३२४,३२३,५०४,५०६,३४ भादंवि अन्वये गुन्हे दाखल केले असून दोन्ही घटनेचा तपास पोना. निलेश गाडगे हे करीत आहेत.          

हीच आहे ती खुर्ची आणि टेबल ड्रा. बाबासाहेब आंबेडकराबद्दल गौरव मोरेचे भावनिक पोस्ट ( dr babasaheb ambedkar )

0

 

 

dr babasaheb ambedkar : या संपूर्ण देशभरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या साजरी केली जात आहे.

परंतु यानिमित्त सोशल मीडियावर अनेकांनी पोस्ट लिहिले आहेत. मात्र यात कलाकारांचाही समावेश आहे.

तर आता या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमधून घराघरात पोहोचलेला विनोदवीर गौरव मोरे यानेसुद्धा सोशल मीडियावर एक खास पोस्ट लिहिली आहे.

त्या पोस्ट त्याच्या या पोस्टने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.तर गौरवने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

मात्र आता या फोटोमध्ये तो एका खुर्ची आणि टेबलासमोर उभं असल्याचं पहायला मिळतंय. ही कोणती सर्वसामान्य खुर्ची नाही, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडनमध्ये याच खुर्चीवर बसून अभ्यास केला होता.

परंतु त्याठिकाणी गौरवने दोन वर्षांपूर्वी भेट दिली होती. तोच फोटो त्याने इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

गौरव मोरेची ही ती पोस्ट-

‘हीच ती खुर्ची आणि टेबल ज्याच्यावर बसून बाबासाहेबांनी लंडनमध्ये अभ्यास केला होता.

मात्र त्या पवित्र वास्तुला 2022 मध्ये भेट दिली होती. मग आज 14 एप्रिल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती. थँक यू बाबासाहेब, तुमचे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही,’ अशा शब्दांत त्याने भावना व्यक्त केल्या आहेत.

मात्र या गौरवच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

तर या गौरव लवकरच ‘महापरिनिर्वाण’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर आता भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीमध्ये उल्लेखनीय योगदान असलेले, दलितांच्या हक्कांसाठी लढलेले, समाजाच्या विविध क्षेत्रातील लोकांची जात, धर्माचा विचार न करता, सामाजिक न्याय आणि समतेसाठी लढणारे दूरदर्शी नेते आणि समाजसुधारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या निधनानंतर लाखो लोकांनी शोक व्यक्त केला होता.

तर ‘महापरिनिर्वाण’ हा चित्रपट या ऐतिहासिक प्रसंगाचा समाजावर आणि त्या व्यक्तीच्या जीवनावर झालेल्या खोल परिणामांवर प्रकाश टाकणारा आहे.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मात्र आता या चित्रपटात गौरवसोबतच प्रसाद ओक, अंजली पाटील, कमलेश सावंत, दीपक करंजीकर, प्रफ्फुल सावंत , विजय निकम , हेमल इंगळे, कुणाल मेश्राम यांसारख्या नामवंत कलाकारांच्या भूमिका आहेत.

Dr babasaheb ambedkar :तर आता या ‘महापरिनिर्वाण’ या चित्रपटाचं दिग्दर्शन शैलेंद्र बागडे यांनी केलं आहे.

मोताळा तालुक्यात तासभर धोधो बरसला पाऊस,गारपीटही झाली!शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान ( Farmer loss )

0

 

दिनांक १२ एप्रिलला दुपारी मोताळा तालुक्यात प्रचंड गारपिटीसह वाऱ्या सहित अवकाळी

Farmer loss :दुपारी २:३० ते ३:३० वाजेच्या कालावधीत मोताळा तालुक्यात विविध ठिकाणी अवकाळी पावसाने धुवाधार फटकेबाजी केली.

दरम्यान, मोताळा तालुक्यातील वासियांना भरपूर दिवसानंतर गारवा जाणवला. मोताळा तालुक्यातील गावांमध्ये रस्त्यारस्त्यांत पाणी साचले, नाले वाहू लागले व परिसरातील शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले असून काही ठिकाणी पिके जमिनदोस्त झाले आहेत.

गेल्या दोन तीन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर आहे. बुलढाणा, खामगाव, तालुक्यात शेतकऱ्यांना अवकाळीचा जोरदार तडाखा बसला.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

यामध्ये मका, भुईमूग, ज्वारी, बाजरी, कांदा अशा पिकांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातात आलेले पीक मातीत मिळाले.

Farmer loss :अजूनही दमट वातावरण असल्यामुळे पावसाची शक्यता नाकारता येणे शक्य नाही.

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा https://youtu.be/I-3zEiICGck

माहितीचा अधिकार झाला डोकं दुःखी .आणि प्रशासन मात्र फार सुखी संबंधित प्रकरणात कारवाही तर नाहीच उलट सुलट चर्चेला उधाण ( foreshtnews )

0

 

माहिती अधिकारातील माहिती प्राप्त होऊन कारवाई शुन्य.प्रकरणात अनेक चर्चेला उधाण.

अनिल सिंग चव्हाण / बुलढाणा

foreshtnews: बुलडाणा:-तरोडा ते तारापूर वनक्षेत्रातून झालेल्या अवैध डांबरी रस्त्याची चौकशी करून माहे एप्रिल मे २०२३ मध्ये बिटावर कार्यरत प्रदीप मुंडे वनरक्षक पश्चिम कोथळी यांना निलंबित करणे बाबत माहिती माहिती अधिकारांतर्गत मांगीतल्या गेली होती.

परंतु सदर प्रकरणाची कोणतीही चौकशी झाली नाही अथवा कुणावरही अजूनही कारवाई करण्यात आली नाही.त्यामुळे सदर प्रकरणात पाणी कुठे मुरत आहे हे चर्चेचा विषय ठरला आहे.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

आपण दि. २८/०८/२०२३ रोजी मी अमरावती येथील आंदोलन स्थगित करणे संदर्भात दूरध्वनी वरून संपर्क करून योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिले व तक्रारींचे निराकरण करण्याचा शब्द दिला आहे.

तरी आपले निदर्शनास आणून देऊ इच्छितो की,प्रदीप मुंडे वनरक्षक हे आपल्या बुलडाणा विभागात कार्यरत आहेत तसेच त्यांची कारकीर्द अत्यंत वादग्रस्त राहिलेली असून त्याचेकडे असलेल्या प्रत्येक अतिरिक्त कार्यभारातील र्त्यांचा भ्रष्टाचाराचा आलेख चढता आहे

,त्यांनी मोताळा येथील एका विशिष्ठ समुदायातील गरीब लोकांना हाताशी धरून लाखो रुपये त्यांचे नावावर काढले आहेत वास्तविक त्यांचेपैकी कोणीही वन विभागाचे कामावर नव्हते.

हा घोटाळा कोट्‌यावधी रुपयांमध्ये असल्याने त्याची सविस्तर तक्रार मी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांचेकडे लवकरच दाखल करणार आहे परंतु तत्पूर्वी त्यांनी त्यांचे कार्यकाळात तरोडा ते तारापूर हा रस्ता राखीव वनातून जात असुन सुद्धा कोणतीही कार्यवाही केलेली नाही.

त्यामध्ये त्यांनी ठेकेदार यांचेकडून लाखो रुपये घेतले असल्याची चर्चा परिसरात आहे व या घटनेमध्ये वन संवर्धन अधिनियम १९८० अनुसार कार्यवाही झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत नाही. त्याकरिता प्रदीप मुंडे हे वन विभागाची संपत्ती नष्ट करण्यास जवाबदार असून त्यांची चौकशी करून वस्तू स्थितीवर दोषी असणाच्या वनरक्षकाचे निलंबन करणे आपले अधिकार क्षेत्रात येते.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्याशिवाय या प्रकरणाची भी यापूर्वी सविस्तर तक्रार आपले वरिष्ठ कार्यालयाकडे दाखल करून त्याची एक प्रत आपल्या कार्यालयास पोच केली आहे. मोताळ्यामधील भ्रष्ट वनपरिक्षेत्र अधिकारी मुरकुटे यांचा निलंबनाचा प्रस्ताव आपण मा. मुख्य वनसंरक्षक अधिकारी प्रा अमरावती यांच्याकडे पाठविलेला आहे.

foreshtnews :परंतु या बाबतीत काहीही कारवाई करण्यात आली नाही.माहितीदार मेनेज झाला की काय? अशी जनमानसात चर्चा सुरू आहे.

उसने पैसे परत मागीतले असता पती पत्नीस अश्लिल शिवीगाळ, एका विरूध्द गुन्हा दाखल ( crimenews )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

Crimenews:शेगांव .उसनवारीचे ५० हजार रुपये मागण्यासाठी गेलेल्या पती पतनीस अश्लिल शिवीगाळ केल्याची घटना दि. १२/४/२०२४ रोजी रात्री दरम्यान तिनपुतळे परिसरात घडली.


हकीकत अशा प्रकारे आहे की-गजानन नानाराव शेगोकार व 39 वर्ष धंदा खाजगी नोकरी राहणार तीन पुतळे परिसर शेगाव ह मु पुणे यांनी अंबादास भगवान गवई यास पन्नास हजार रुपये उसने दिले होते.

घेतलेले उसने पैसे परत मागण्यासाठी फिर्यादी घरासमोर गेला असता आरोपीने फिर्यादीला आई वरून अश्लिल शिवीगाळ करून लोटपोट केली.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

तुझे पैसे देत नाही तुझ्याकडून जे होते ते करून घे आरोपी व फिर्यादी यांचा वाद होत असताना फिर्यादीची पत्नी स्वाती ही समजावण्यासाठी गेली असता आरोपी याने फिर्यादीच्या पत्नीला सुद्धा शिवीगाळ केली.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Crimenews :व पत्नीला जीवाने मारण्याचे धमकी दिली .याप्रकरणी गजानन नानाराव शेगोकार ३९ वर्ष धंदा खाजगी नोकरी राहणार तीन पुतळे परिसर शेगाव ह मु पुणे यांनी शहर पो.स्टे ला दिलेल्या रिपोर्टवरून पोलिसांनी आरोपी अंबादास भगवान गवई वय ४० राहणार ३ पुतळे परिसर शेगाव याचे विरूध्द अप २२१/२४ कलम २९४,३२३,५०४,५०६ भादवी अन्वये गुन्हा दाखल करून तपास मा पोलिस निरीक्षक यांचे आदेशाने पोहेकाँ विनायक सरोदे यांच्याकडे देण्यात आला आहे.