Home Blog Page 122

स्वा. से. श्री. क. रा. इन्नाणी महाविद्यालयामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन अंतरंग २०२४ संपन्न ( karnjanews )

0

कारंजा लाड मोहम्मद बेग मिर्झा

स्थानिक स्वा. से. श्री. क. रा. इन्नाणी महाविद्यालय  कारंजा (लाड) येथे,  मा. प्राचार्य  प्रो. डॉ ए. एन. देवरे सर यांच्या मार्गदर्शना खाली दि. २८ व २९ फेब्रुवारी २०२४ रोजी दोन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले.

या स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे उद्घाटन दिनांक २८ फेब्रुवारी २०२४ ला संपन्न झाले. या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ. ए. एन. देवरे, उद्घाटक आणि मार्गदर्शक म्हणून श्री कुणाल झाल्टे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. अजय कांत, मा. श्री. प्रकाशसेठ गुलेच्छा, मा. श्री. शेखरजी बंग, मा. श्रीमती उर्मिलाताई ठाकूर, उपप्राचार्य डॉ. आर. ए. पाटील, डॉ. एन. जी. जाधव, प्रा. ए. एम. वानखडे, डॉ. के. जी. राजपूत, चंद्रकांत बलंग इत्यादी मान्यवर या कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित होते. श्री कुणाल झाल्टे यांच्या हस्ते स्नेहसंमेलन अंतरंग २०२४ चे उद्घाटन संपन्न झाले.

तसेच दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ ला स्नेहसंमेलन समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. प्राचार्य डॉ. ए. एन. देवरे, प्रमुख अतिथी मा. श्री. रवी  निशिकांत परळीकर कारंजा (लाड), मा. श्री. गोपाल कडू तसेच आमंत्रीत मान्यवर मा. श्री मनोहर वासनकर, मा. श्रीमती उर्मिलाताई ठाकूर, चंद्रकांत बलंग  उपस्थित होते.

महाविद्यालयामध्ये दिनांक २८ व २९ फेब्रुवारी २०२४ ला स्नेहसंमेलन कार्यक्रमामध्ये रांगोळी स्पर्धा, चित्र प्रदर्शनी (विषय भ्रष्टाचार), डिश डेकोरेशन, फ्लॉवर डेकोरेशन, गीत गायन, फॅन्सी ड्रेस स्पर्धा, आनंद मेळावा, वक्तृत्व स्पर्धा, सोलो व ग्रुप डान्स इत्यादी स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

या स्पर्धेमध्ये खालील विद्यार्थ्यांना पुरस्कार प्राप्त झाले.
रांगोळी स्पर्धा:-
प्रथम अंकुश देवकर राऊत बी. ए. भाग ३,
द्वितीय श्रुती रवींद्र मुघल एम. एस. सी. भाग 2 व साक्षी संजय भोसले बी. ए. भाग १,
चित्रप्रदर्शनी:-
प्रथम कोमल साबळे एम. एस. सी.भाग २,
द्वितीय कु. स्नेहा जी गवारे बी. कॉम. भाग १,
डिश डेकोरेशन:-
प्रथम कु. ज्ञानेश्वरी संतोष सावंत, एम. कॉम. भाग 1
द्वितीय कु. खुशबू संजय मेहता बी. एस. सी. भाग 2
फ्लॉवर डेकोरेशन:
प्रथम अंकिता रुपचंद पोटपिटे, बी. कॉम. भाग 3
द्वितीय सतीश अनिल गवारे एम. एस. सी. भाग 2
गीत गायन:-
प्रथम अनुराग सुनील जाधव, बी. एस. सी. भाग 1
द्वितीय प्रतीक विजय कानडे एम. कॉम. भाग 1 व  ईश्वरी दीपक कोल्हे, बी. कॉम. भाग 2
फॅन्सी ड्रेस स्पर्धा:-
प्रथम तुषार भरत घाटे, बी. कॉम. भाग 3
द्वितीय नंदिनी दादाराव सावटे,
वक्तृत्व स्पर्धा:-
प्रथम सार्थक बांन्ते बी. ए. भाग 1
द्वितीय प्रणव ग उपाध्ये बी. ए. भाग ३,
आनंद मेळावा
प्रथम जान्हवी सोनटक्के, बी. एस. सी. भाग 1
द्वितीय सतीश अनिल गवारे एम. एस. सी. भाग 2
सोलो डान्स स्पर्धा:-
प्रथम कु. निमिषा संतोष घारु बी. कॉम. भाग २,
द्वितीय कु. अन्वी नरेंद्र भोयर बी. ए. सी. भाग 2
ग्रुप डान्स:-
प्रथम चेन्नई एक्सप्रेस ग्रुप यामध्ये कु.  खुशी ललित खोना, कु. अन्वी नरेंद्र भोयर, कु. वैष्णवी सतीश जाधव, कु. उत्कर्षा मिलिंद गांजरे, कु. खुशबू संजय मेहता आणि कु. स्नेहा संतोष ढगे
द्वितीय तारवानी सिस्टरस ग्रुप यामध्ये आचल तारवानी आणि चंचल तारवानी इत्यादी स्पर्धक विजय ठरले.

karnjanews:कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता स्नेहसंमेलन समितीचे सर्व सन्माननीय सदस्य, स्पर्धेतील सर्व प्रभारी प्राध्यापक व विद्यार्थी प्रतिनिधी, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, छात्र संघ प्रतिनिधी व सर्व वर्ग प्रतिनिधींनी अथक परिश्रम घेतले.

बालाजी सोसे यांच्या उपोषणाला संदीप शेळकेंचा पाठिंबा!शेतकऱ्यांच्या लढ्यात खंबीरपणे साथ देण्याची दिली ग्वाही  ( sandeepshelkhe )

0

 

सिंदखेड राजा : गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी पळखेड चक्का येथील बालाजी सोसे यांनी पुन्हा एकदा उपोषणास्त्र उपसले आहे. वन बुलढाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांनी २९ फेब्रुवारी रोजी उपोषणाला भेट देऊन पाठिंबा दिला. सोसे यांच्या प्रकृतीची त्यांनी विचारपूस केली. शेतकऱ्यांच्या लढ्यात खंबीरपणे साथ देऊ, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिले.

सिंदखेडराजा, देऊळगावराजा तालुक्यात २६ नोव्हेंबर २०२३ रोजी वादळी वाऱ्यासह प्रचंड गारपीट झाली होती. यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले होते. या भागातील शेतकरी मोठ्या प्रमाणात शेडनेडच्या माध्यमातून बीजोत्पादनाची शेती करतात.

वादळी वारा आणि गारपिटीमुळे शेडनेटचे मोठे नुकसान या भागात झाले होते. शेडनेट उभारणे हे आधीच खर्चिक असताना झालेल्या नुकसानीमुळे या भागातील शेतकरी संकटात आहे. शेडनेटच्या नुकसानीला बागायती क्षेत्रात समाविष्ट करून या नुकसानीचा पीक विमा मिळावा या मागणीसाठी पळसखेड चक्का येथील शेतकरी बालाजी सोसे यांनी डिसेंबर महिन्यात आमरण उपोषण केले होते. त्यावेळी लेखी आश्वासन देऊन सोसे यांचे उपोषण अधिकाऱ्यांनी सोडवून घेतले होते.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

मात्र जवळपास ३ महिन्यांचा कालावधी उलटून देखील सरकारकडून शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार झाला नाही. त्यामुळे बालाजी सोसे यांनी २८ फेब्रुवारीपासून पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

शेतकऱ्यांच्या याच मागण्यांसाठी वन बुलडाणा मिशनने देखील सिंदखेडराजा तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. शेडनेट शेतीच्या नुकसानीला एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे मदत मिळायला पाहिजे.

sandeepshelkhe: संकटात सापडलेल्या शेतकऱ्याच्या पाठीशी मायबाप सरकारने उभे राहिले पाहिजे. जनतेने निवडून दिले लोकप्रतिनिधी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चुप्पी साधतात. त्यांनी सरकारला धारेवर धरले पाहिजे. मात्र असे होतांना दिसत नाही. असे सांगून संदीप शेळके यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले होते.

गजानन महाराज प्रगटदिना निमित्ताने विवीध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन ( gajananmaharaj )

0

 

किर्तन आणि गीत गजानन कार्यक्रमाचे आयोजन

सिंदी रेल्वे ता.२ : स्थानिक श्री गजानन महाराज प्रगटदिन समितीच्या वतीने शेगाव निवासी संत गजानन महाराज यांच्या जन्मोत्सवा निमित्ताने रविवारी (ता.३) भरगच्च विवीध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

शहरातील श्रीगणेश मंदीरात सकाळी ७ वाजता श्री चा शाश्वत अभिषेक सोहळा पार पडणार आहे.
त्यानंतर ९ वाजता टाळमृदगाचा गजरात गणेश मंदीर परिसरातुन श्री च्या पालखी आणि शोभायात्रेला सुरवात होणार आहे. दुपारी १२ वाजता पालखी समारोप महाआरती व कालाप्रसाद वाटपाने होणार आहे.

दुपारी ४ वाजता श्री संत गजानन महाराज प्रगटदिन किर्तनाचा कार्यक्रम नागपूरचे किर्तनकार हभप दिगंबरबुवा नाईक सादर करणार आहेत.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

 

सांयकाळी ७ वाजता श्रीची महाआरती आणि महाप्रसादाचे वितरन करण्यात येणार आहे.यानंतर रात्री ८ वाजता सुरश्री संगीत मंच वर्धा व्दारा प्रस्तुत “गीत गजानन” हा भक्तीमय गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
सादरकर्ते अरविंद बटाले, विजय चांदेकर, आदित्य खंडारे, विशाल शेंडे, प्रवीण पायघन आणि संच सादर करणार आहेत

.बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

gajananmaharaj: आयोजित कार्यक्रमात शहरातील गजानन महाराज भावीभक्तानी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे तसेच पालखी सोहळ्यात परिसरातील भजन मंडळानी टाळमृदगाचा एकच गजर करावा असे आवाहन श्री संत गजानन महाराज प्रगटदिन समितीच्या वतीने करण्यात आले आहे

सारखे भांडण चालू असते रिलेशनशिप मध्ये, तर करा थोडा या गोष्टींचा विचार ( relationship )

0

 

मैत्री असो वा रिलेशनशिप… नातं कोणतंही असो, त्यामध्ये एकमेकांचे विचार न पटणं हे साहजिकच आहे. कित्येक गोष्टींमुळे नात्यावर चुकीचा परिणाम होत असतो. त्यामुळे बरेचदा स्वतःला बदलावं लागतं.

आपल्या जोडीदाराने समजून घ्यावे अशी अपेक्षा असते. त्यामुळे मग नात्यातील आनंद कमी होऊन चिडचिड वाढत जाते. कालांतराने एकमेकांविषयी वाटणाऱ्या भावना ह्या कमी होऊ लागतात.

आज आम्ही आपल्याला नातं दीर्घकाळ टिकवण्यासाठी काही सोप्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्स अगदी शेवटपर्यंत नात्यातील प्रेम टिकवण्यासाठी मदत करतील.
पार्टनरकडे जास्त लक्ष देऊ नका.

आपल्याला आयुष्यात कोणतीही गोष्ट मिळवायची असेल, तर त्या दिशेने पुढे पुढे जात राहावे. यामुळे तुमचं नातं देखील चांगले राहील. आपला संपूर्ण वेळ नात्यासाठी खर्च करू नका.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

थोडक्यात म्हणजे रिलेशनशिप मध्ये असताना वैयक्तिक विकास आणि येणाऱ्या संधींवर पूर्णपणे लक्ष द्यायला हवे. एकमेकांचा आदर करा.
नातं टिकवण्यासाठी सर्वात महत्वाचे म्हणजे एकमेकांचा मान ठेवा. कारण आदर ठेवला नाही, तर कोणतेच नातं टिकू शकत नाही.

म्हणून आपला पार्टनर सर्वात बेस्ट आहे, असे वेळोवेळी म्हणत त्याचे कौतुक करा. काही गोष्टी तिथेच सोडून द्या. नातं म्हटलं की, थोड्याफार चुका या होतच राहतात. एकमेकांना समजून घेत संसाराची नौका पुढे नेणे, हेच तर खरं अवघड काम आहे.

बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्यामुळे ते ज्याला जमलं त्याने जिंकले. भूतकाळ तिथेच सोडून भविष्याच्या दिशेने वाटचाल करा. नात्यात देवाणघेवाण प्रत्येक लहान मोठ्या गोष्टीत आपल्या पार्टनर चे मत घ्यायला विसरू नका.

relationship: त्यानुसार जे कपल करतात, त्यांचे बॉन्डिंग नेहमी छान राहते. लहानसहान गोष्टींमध्ये पार्टनरचा सल्ला अवश्य घेत जा.

बोराखेडी पोलिसांनी दहा दिवस टाळले, मात्र अखेर गुन्हे दाखल केले!आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध जमिनीच्या ताब्याप्रकरणी गुन्हा दाखल; ( sanjaygaikwad )

0

 

न्यायालयाच्या दणक्याने बोराखेडी पोलिस नमले

बुलढाणा: बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध एका महिलेची शेतजमीन हडपून जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोताळा न्यायालयाच्या आदेशावरून बोराखेडी पोलिसांनी तब्बल 10 दिवस उशिरा का होईना ही कार्यवाही केली आहे. यामुळे कायद्यापुढे सर्व समान हे सिद्ध झाले आहे.

यापूर्वी मोताळा न्यायालयाने १७ फेब्रुवारी २०२४ रोजी, आमदार संजय गायकवाड, त्यांचा मुलगा मृत्युंजय गायकवाड आणि अन्य आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते .

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

Sanjaygaikwad:मात्र बोराखेडी पोलीसानी टाळाटाळ केली. रिटा यमुनाप्रसाद उपाध्याय (नागपूर) असे फिर्यादी महिलेचे नाव आहे. फिर्यादीनुसार, राजूर ( ता मोताळा, जिल्हा बुलढाणा) गावात त्यांची दीड एकर शेती आहे.

आमदार गायकवाड यांनी २१ जुलै २०२१ रोजी या जमिनीवर अतिक्रमण केले. तेथे त्यांनी अवैधरीत्या फार्म हाऊस बांधले. फिर्यादीने आक्षेप घेतला असता त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

यावर त्यांनी मागील १२ ऑगस्ट २०२१ रोजी बोरखेडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली . पोलिसांनी काहीच कारवाई केली नाही.

Sanjaygaikwad: त्यामुळे त्यांनी मोताळा न्यायालयात प्रकरण दाखल केले होते. न्यायदंडाधिकारी एस.पी. पांडव यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ च्या अनु.१५६ (३) नुसार कारवाईचे आदेश १७ फेब्रुवारी रोजी दिले.

बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मात्र कारवाई न झाल्याने त्यांनी पुन्हा न्यायालयात जाण्याची तयारी दर्शविली.

Sanjaygaikwad :यामुळे अखेर १४३,१५०, ,३७९,३८५, ४४७, ३४ नुसार आमदार संजय गायकवाड, मृत्युंजय संजय गायकवाड, सोमनाथ चौबे, दिपाली चौबे, ज्ञानेश्वर वाघ यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवकाळी पाऊस आणि गारपीटीने वाताहत झालेल्या कुटुंबांना वन बुलडाणा मिशनच्या वतीने किराणा किटचे वाटप!( Buldhananews )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा

संग्रामपूर: जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत ठिकठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीटीने थैमान झाले. संग्रामपूर तालुक्यातील गावांना याचा सर्वाधिक फटका बसला.

दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे वाताहत झालेल्या कुटुंबांना वन बुलडाणा मिशनच्या वतीने किराणा किटचे वितरण करण्यात आले.

संग्रामपूर तालुक्यातील अनेक गावांत गारपीट आणि अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले आहे.

 

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

काही घरांवरील टीनपत्रे उडाली तर काही घरांत अवकाळीचे पाणी घुसल्याने घरातील जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले.

बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

वन बुलडाणा मिशनचे संकल्पक संदीप शेळके यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने किराणा किट वाटप करण्याच्या सूचना वन बुलडाणा मिशनच्या स्वयंसेवकांना दिल्या.

Buldhananews :वन बुलडाणा मिशनच्या टीमने एकलारा, बानोदा, धामणगाव, गोतमारे यासह परिसरातील गावांत पोहचून गरजू कुटुंबीयांना किराणा कीटचे वितरण केले.

दररोज रिकाम्या पोटी करा या गोष्टींचे सेवन, आरोग्याला होतील कित्येक फायदे ( healthytips

0

 

दिवसाची सुरुवात चांगली असेल, तरच दिवस चांगला जातो असे म्हणतात. त्यामुळे आपल्या दिवसाची सुरुवात ही हेल्दी फूड ने करावी.

त्यामुळे आपलं पोट चांगलं राहतं आणि पचनासंबंधित समस्या निर्माण होत नाहीत. त्यामुळे दररोज ब्रेकफास्टला काय खावे, हे आज आम्ही तुम्हांला सांगणार आहोत.

पपई रिकाम्या पोटी पपई खाल्ल्याने आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते. पपई मध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतात.

त्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यासोबतच इम्युनिटी देखील मजबूत राहते. पपई खाल्ल्याने ब्लोटिंगची म्हणजे पोट फुगण्याची समस्या कमी होते.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

बडीशेपचे पाणी दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट बडीशेपच्या पाण्याने सेवन केल्याने पचनक्रिया चांगली राहते. तसेच वजन कमी होण्यासाठी मदत होते.

हे पाणी प्यायल्याने अपचन आणि पोटातील गॅस कमी होतो. बडीशेपचे पाणी तयार करण्यासाठी एक ग्लास पाण्यात अर्धा चमचा बडीशेप टाकाटाका आणि उकळून घ्या.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

हलकेसे कोमट झाले की पिऊन घ्या.
केळी रिकाम्या पोटी केळी खाल्ल्याने शरीराला खूप फायदे होतात. केळी खाल्ल्याने एनर्जी वाढते आणि ब्लड शुगर लेवल देखील वाढते.

बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तसेच केळी खाल्ल्यावर पोट व्यवस्थित भरते आणि पुन्हा पुन्हा भूक लागत नाही.

healthytips: भिजवलेले ड्रायफ्रूट्स सकाळी रिकाम्या पोटी बदाम, अळशीच्या बिया हे भिजवून खाल्ल्याने स्वास्थ्य सुधारते.यातून शरीराला अनेक पोषकतत्व मिळतात.

मोकाट कुत्र्यांचा हल्ला  आठ वर्षीय बालीका, गंभीर जख्मी, ( Dognews )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जि. प्र.

शेगांव .शहरात मोकाट कुत्र्यांचा हौदोह दिवसेंदिवस वाढत चालला असून अनेक लोकांनवर कुत्र्यांच्या झुंडीने हल्ला चढवून जख्मी केले आहे.

तर दि.२८ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी  कु.रित कन्हैयालाल चौधरी या आठ वर्षीय बालीकेवर चार ते पाच मोकाट कुत्र्यांनी  हल्ला करून  गंभीरपणे जख्मी, केल्याची घटना  धानुका कंम्पाऊंड येथे घडली.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

याबाबत प्राप्त माहिती अशी की आठ वर्षीय रित ही आपल्या आजीसोबत घरासमोरील रोड वर फिरत असतांना अचानकपणे चार ते पाच भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढविला व तीला १० फुटा पर्यंत फरफरट नेले.

यावेळी कुत्र्यांनी सदर बालीकेच्या  डोक्यावरील केस मासासह ओढुन नेले.तेथील लोकांच्या सर्तकतेमुळे मुलीचे प्रणाम वाचले .

बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

जख्मी अवस्थेत सदर बालीकेस प्रथम स्थानिक सराफ यांच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. बालीका गंभीरपणे जख्मी असल्याने पुढील उपचारार्थ अकोला येथील डॉ. एन.आर.सलामपुरीया यांचे श्रीराम रूग्णालयात संध्याकाळी ७ वा नेण्यात आले असू दि.२९/२/२०२४ रोजी दुपारी २ वाजता बालीकेवर शस्त्रक्रिया करण्याचे कार्य सुरु होते.

या घटने नंतर शहरातील मोकाट व पिसाळलेल्या  कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात यावा या मागणीसाठी शेगांव शहर भाजपा चे वतीने मा.मुख्याधिकारी यांना दि.२९/२/२०२४ रोजी निवेदन देण्यात आले.

Dognews:यावेळी भाजपा नेते शरदसेठ अग्रवाल, शहराध्यक्ष ज्ञानेश्वर साखरे,माजी नगरसेवक संदिप काळे,मंगेश फुसे,शेगाव शहर व्यापारी परिषदचे अध्यक्ष शेखर नागपाल,ललित खंडेलवाल आदीसह पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती होती.

क-हेवडगांवमध्ये भगवे वादळ ; डोळ्याचे पारणे फेडणारा ऐतिहासिक शिवजयंती उत्सव सोहळा ( shivjayanti )

0

 

आष्टी (प्रतिनिधी) – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तालुक्यातील क-हेवडगांव येथे भव्य दिव्य सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मोठ्या थाटात संपन्न झाली,

गावातून छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांचे पोशाख परिधान करून विद्यार्थासह हालगी पथक, लेझिम पथक, टाळ मृदंगाच्या गजरात शाही मिरवणूक काढण्यात आली या शोभायात्रेत शालेयविद्यार्थ्यांनी लेझीम सादर करत चिमुकल्यांनी लक्ष वेधले होते.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणांनी क-हेवडगांव शिवमय झाले होते.

घराघरात ठिकठिकाणी दिमाखात फडकणारे भगवे झेंडे आणि जय भवानी जय शिवाजी’ अशा कणखर घोषणांनी दाहीदिशा दुमदुमत होत्या.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

तालुक्यातील क-हेवडगांव येथे छत्रपतीशिवाजी महाराज यांची जयंती अभुतपुर्व जल्लोष उत्साहात साजरी झाली भगवे झेंडे, आणि भगव्या पताकांनी गाव सजवला होता. शिवरायांच्या गितांचा आवाज दाहीदिशात घुमत होता.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

अभूतपूर्व मिरवणूक निघाली शिवकालीन पोशाखात जि.प.प्रा. शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतले सायं ४ वाजता महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरुवात झाली शिवमय वातावरणात महाराजांची आरती करून मिरवणूक संपली ६ ते ८ या वेळेत उत्सव समितीच्या वतीने ग्रामस्थांना महाप्रसाद भोजन ठेवण्यात आले होते .

shivjayanti:शिवचरित्रकार ह.भ.प दिपालीताई खिळे महाराज यांचे सुंदर किर्तन झाले. गावातील आजी माजी सरपंच, सदस्य, राजकीय, सामाजिक शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील नागरीकांसह तरुण, महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता.

सर्वे न करता शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या अशी मागणी आप चे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रसाद घेवंदे (farmer )

0

 

इस्माईलशेख बुलढाणा. जि. प्र.

. काल झालेला जिल्ह्यामध्ये तसेच राज्यामध्ये काही ठिकाणी अवकाळी पाऊस व गरपीट झाली आहे.

त्यामधे रबी पिकाचा काढणीचा हगाम चालू असताना पुन्हा एकदा शेतक-यावर अस्मानी मोठे संकट उभे राहले आहे. काल जिल्ह्यातील काही भागामध्ये संध्याकाळी वादळी वाऱ्या सह, गारपीट पण झाली आहे.

त्यामध्ये रब्बी पीक गहू, हरभरा, कांदा, ज्वारी सह फळबागांची सुद्धा मोठा प्रमाणात हानी झाली आहे. बुलढाणा जिल्ह्या मध्ये अवकाळी पावसाने व गारपीट मुळे हाती येणार पीका चे आतोनात नुकसान झाले आहे.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

 

तरी राज्य सरकारचे अधिवेशन चालू असताना त्यामधे अधिवेशनात सरसकट नुकसान भरपाई सर्वे न करताच देण्यात यावी असा ठराव मंजूर करावा, तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील पिक, टीनशेड चे सुद्धा नुकसान झाले आहे.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तसेच शेतामधे गारपीट चा खच झाला असून शेतकर्याचे हातीयेणारे पिक सर्व वाया गेले, तरी राज्य सरकारने सर्वे न करताच सरसकट नुकसान भरपाई द्यावी ही मागणी आम आदमी पार्टी चे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रसाद घेवंदे यांनि केले आहे.

farmer:त्यावेळी उपस्थित प्रा. विवेक देवळे सर, सुभाष कडाळे सर, भानुदास पवार, अॅड. दीपक मापरी, राजाराम खांदेभराड, सईद शहा, गणेश सोळंके, दिलीप गुर्हाळकर, नितीन अवसरमोल, विशाल चव्हाण, इरफान शेख, विठ्ठल भिसे, संदीप पांढरे, सुमंता पडघान हे होते.