Home Blog Page 125

महाशिवरात्री का साजरी करतात, जाणून घ्या यामागील खरं सत्य ( mahashivratri )

0

 

महाशिवरात्रीचा उत्सव हा दरवर्षी हिवाळ्याच्या उत्तरार्धात म्हणजेच फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला येतो.

भगवान महादेव यांना समर्पित केलेला हा दिवस संपूर्ण वर्षभरातून एकदाच येतो. त्यामुळे संपूर्ण देशभरात मोठ्या उत्साहात महाशिवरात्र साजरी केली जाते. या दिवशी भगवान महादेवाचे भक्त त्यांची उपासना करतात.mahashivratri

वेस्ट इंडीज आणि नेपाळ मध्ये महादेवांचे कित्येक भक्त आपल्याला पाहायला मिळतील. महाशिवरात्री या शब्दाचा अर्थ “शिवाची महान रात्र” असा होतो. या रात्री भक्तजण तांडव नृत्य करतातकरतात व आपला आनंद साजरा करतात.
महाशिवरात्रीचे महत्त्व :

महाशिवरात्रीच्या दिवशी कित्येक भाविक उपवास करतात. फक्त आपल्या देशातच नव्हे तर इतर दक्षिण आशियाई देशांमध्ये सुद्धा महाशिवरात्री साजरा केला जाते.mahashivratri

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

महाशिवरात्रीच्या पौराणिक कथांप्रमाणेच शिवरात्री नृत्य परंपरेला देखील खूप महत्त्व आहे. इतकेच नव्हे तर त्याला काही ऐतिहासिक पार्श्वभूमी सुद्धा आहे.

या दिवशी खजुराहो, कोणार्क, पट्टाडकल, चिदंबरम यांसारख्या मोठ्या मंदिरात वार्षिक नृत्य महोत्सव आयोजित केला जातो.

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

mahashivratri:एका पौराणिक कथेनुसार भगवान महादेवांचा देवी पार्वती सोबत विवाह झाला होता, म्हणून हा दिवस महाशिवरात्री म्हणून साजरा करतात. तसेच या दिवसाबद्दल आणखी एक कथा प्रचलित आहे. ती म्हणजे समुद्रमंथनाची…. या कथेनुसार महाशिवरात्रीच्या दिवशी शंकराने समुद्र मंथनातून निघालेले विष प्राशन करून सृष्टीचे संरक्षण केल्याचे समजते.

रविकांत तुपकरांचा झंझावात उद्या ०९ मार्चला संत नगरी शेगावात! निर्धार मेळाव्याला करणार संबोधित ( Ravikant Tupkar )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा

शेगाव: (प्रतिनिधी ता.०७) :- Ravikant Tupkar: शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलडाणा लोकसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केल्यानंतर त्यांना जिल्हाभरातून जोरदार समर्थन मिळत आहे.

काहीही झाले तरी यंदा लोकसभा निवडणूक लढवणारच असा निर्धार सर्वसामान्य नागरिक व समर्थकांनी केला आहे.

दरम्यान उद्या, ९ मार्चला रविकांत तुपकर संत नगरी शेगावात निर्धार मेळाव्याला संबोधित करणार आहेत. काळपांडे जिन जवळील पांडुरंग कृपा/ कुणबी समाज मंगल कार्यालयात सकाळी ११ वाजता हा मेळावा होणार आहे.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रविकांत तुपकर यांनी गेल्या १३ दिवसांपासून जिल्ह्यात निर्धार परिवर्तन यात्रा सुरू केली आहे. घाटाखालील चार तालुके पिंजून काढून ही यात्रा आता घाटावर चिखली, देऊळगावराजा आणि सिंदखेडराजा तालुक्यांमध्ये धडकली आहे.

प्रत्येक ठिकाणी रविकांत तुपकरांच्या या निर्धार परिवर्तन यात्रेला प्रचंड असा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. ५ मार्च रोजी तुपकर यांच्या प्रमुख उपस्थितीत चिखलीत पदाधिकारी व समर्थकांचा तातडीची बैठक पार पडली.Ravikant Tupkar

बैठकीत ठरल्याप्रमाणे ७ मार्चपासून निर्धार परिवर्तन अभियानाची सुरुवात झाली आहे. या अभियानांतर्गत तुपकर यांचे शिलेदार गावागावात पोहचून नागरिकांच्या समस्या जाणून घेत आहेत, लोकसभेत परिवर्तन करण्याचा निर्धार देखील गावागावात करण्यात येत आहे.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

या पार्श्वभूमीवर उद्या, ९ मार्चला शेगावात तुपकर यांच्या लढवय्या शिलेदारांचा निर्धार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

या मेळाव्यात तुपकर नेमके काय बोलणार? करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Ravikant Tupkar:या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन शेगाव तालुक्यातील रविकांत तुपकर मित्र मंडळाने केले आहे.

लोकस्वराज्य बांधकाम कामगार समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा व बेमुदत सत्याग्रह (morchanews )

0

 

कामगाराचे विविध मागणी पूर्ण व्हावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

वाशिम जिल्हा प्रतिनिधी मोहम्मद बेग मिर्झा

 

वाशिम जिल्हा हा अतिशय मागास जिल्हा असून नेमकेच आपण प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहाने साजरा केला आणि या प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हाधिकारी मॅडम यांनी अतिशय चांगला निर्णय या प्रजासत्ताक दिनानिमित्त घेतला आहे. तो असा कि, जिल्हा अतिमागास आहे,

परंतु या जिल्ह्यामध्ये शासनाच्या सर्व योजना काटेकोरपणे आमलात आणू व जिल्ह्याचा मागासपणा दूर करू असे आश्वासन दिले. त्या आश्वासनाचा वाशिम जिल्ह्यातील बांधकाम कामगार हे आभार व्यक्त करत आहेत आणि जिल्हाधिकारी मॅडम यांना मनापासून धन्यवाद देत आहेत.morchanews

वाशिम जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी मॅडम यांनी महाराष्ट्र ईमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामध्ये नोंदीत बांधकाम कामगारांना शासनाच्या मिळणा-या योजनांवर लक्ष केंद्रीत करावा, कारण वाशिम जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी बनलेल्या मंडळामध्ये अनेक बांधकाम कामगार सध्या नोंदणीपासून वंचित आहे.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

कारण महाराष्ट्र ईमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंडळामध्ये लागणारे ९० दिवसाचे प्रमाणपत्र ग्रामिण भागामध्ये शासनाचा जि.आर. असून आदेश असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ग्रामसेवकाच्या प्रमाणपत्रावर बांधकाम कामगार नोंद करित आहेत,

पण वाशिम जिल्ह्यामध्ये कोणताही ग्रामसेवक प्रमाणपत्र देण्यासाठी तयार नाही. व वाशिम जिल्ह्यातील कामगार कार्यालयामधून ग्रामसेवकांना कायद्याच्या चौकटीबाहेर काही पत्र व्यवहार करण्यात आले, तो मोठा अडथळा ठरत आहे.

वाशिम जिल्हा कामगार कार्यालयातून काही राजकीय आर्थीक हितसंबंध जपून काम करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यामुळे B.O.C.W. मध्ये आस्थापना नोंद करून प्रमाणपत्र विकण्याचा गोरख धंदा सुरू आहे.

व तसेच बांधकाम कामगारांना लाभ पोहोचवण्यासाठी सुध्दा प्रत्येक योजनेमध्ये अध्यांत आम्ही अर्थात तुम्ही असा आर्थीक हितसंबंधाच्या जोरारदलालशाहीच्या माध्यमातून जिल्हा कामगार कार्यालयाचा कारभार सुरू आहे.

वास्तवीक पाहता आस्थापना नोंद करणाऱ्या आस्थापना मालकाचा कोणताही रेकॉर्ड न तपासता व आस्थापना नोंदणीच्या साईट वर बांधकाम कामगारांना सुरक्षेची संसाधणे व आस्थापनेचा १% उपकर शासनाच्या नियमानुसार भरला का नाही.

व आस्थापना मालकाने प्रमाणपत्र देणा-या बांधकाम कामगारांचे किमान वेतनाचे रेकॉर्ड व भविष्य निवार्ह निधी कापले के नाही, आस्थापना मालक हा बांधकाम कामगारांना कशा पद्धतीने पेमेंट करत आहे.

रितसर त्याच्या जवळ मस्टर आहे की, नाही. हे सर्व कायद्याच्या चौकटीत असलेल्या बाबी तपासल्या जात नाही व सन्हास आस्थापना मालकांना नोंदणी प्रमाणपत्र दिल्या जात आहे.

व त्या नोंदणी प्रमाणपत्राचा आस्थापना मालक वाशिम जिल्ह्यामध्ये सरळ सरळ व्यापार करतांना दिसत आहे. कारण प्रमाणपत्र घेणा-या बांधकाम कामगारांना घाम गाळून त्या आस्थापना मालकांनी प्रमाणपत्र घेण्यासाठी दोन ते तीन हजार रूपये मोजावे लागते.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

आणि शासन म्हणतो की, बांधकाम कामगारांची नोंदणी एका रूपयामध्ये करा. याठिकाणी ही शासनाची जाहीरात खोटी ठरतांना दिसत आहे.

morchanews: तरी मंडळाचे कामकाज हे लोकशाही पद्धतीने व लोकहित जपून करण्यात यावे अन्यथा जिल्हा कामगार कार्यालयासमोर जिल्ह्यातील सर्व असंतोष झालेले कामगार बेमुदत घेराव आंदोलन करतील याची नोंद घ्यावी.

प्रशासन जोमात तर रेती तस्कर कोमात प्रशासनाच्या सक्रियातेने रेती तस्करांचे धाबे दणाणले ( revenuenews )

0

विकी वानखेडे यावल

आज दिनांक 07/3/2024रोजी मा. तहसीलदार सो मोहन माला नाझीरकर यांच्या मार्गदर्शनाखाली

तहसिल कार्यालय यावल येथील गौण खनिज चे पथक हे रात्री दिनांक 6/03/2023रोजी गस्तीवर असतांना त्यांना व्यास मंदिरा जवळ अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर नं. MH 19 BG 5149 वाहन येतांना दिसले.revenuenews

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

त्यांनी त्या ट्रॅक्टरला व्यास मंदिराच्या मागे रोड वरील जवळ पकडले असता त्या वाहन चालक याला वाळू वाहतुकीचा परवाना मागितला असता त्याच्या जवळ परवाना नव्हता त्या मुळे त्याला यावल

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

revenuenews:येथे पकडून तहसील कार्यालय यावल येथे जमा करण्यात आले. सोबत मंडळ अधिकारी सचिन जगताप साखळी तलाठी मिलिंद कुरकुरे , हजर होते.

वाहन मालक साहेबराव उत्तम सोनवणे यांच्या मालकीचे असून त्यात एक ब्रास रेती हे गौणखनिज आढळून आहे.

या गोष्टी स्त्रिया आपल्या जोडीदारापासून हमखास लपवतात, जाणून घ्या नेमकं काय आहे गौडबंगाल ( relationship )

0

 

रिलेशनशिप मध्ये एकमेकांचा एकमेकांवर विश्वास असणे, खूप महत्त्वाचे असते. relationship

मग ते नातं पती-पत्नीचं असो किंवा गर्लफ्रेंड- बॉयफ्रेंडचं. स्त्रिया ह्या स्वभावाने फार हळव्या असतात. त्यामुळे त्या कित्येक गोष्टी आपल्या पतीला आणि बॉयफ्रेंडला सांगत नाही.

एका रिसर्चनुसार स्त्रिया कोणत्या गोष्टी पतीला आणि बॉयफ्रेंडला सांगत नाहीत, हे सिद्ध करण्यात आले आहे.
काही खोट्या गोष्टी :रिलेशनशिप मध्ये स्पेस मिळवण्यासाठी, भांडणासाठी, सेक्ससाठी, स्वत:ला बदलण्यासाठी, मज्जा- मस्तीसाठी बरेच खोटे बोलले जाते.

जे कोणतीच स्त्री आपल्या पार्टनरला सांगत नाही. लग्नापूर्वीचे अफेअर्स :एखाद्या स्त्रीचे लग्नाआधी कोणासोबत अफेअर असेल, तर ती गोष्ट आपल्या पतीपासून लपवते.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

कारण त्यांना त्यांची पर्सनॅलिटीची खूप काळजी असते. चारचौघात आपली इमेज खराब व्हावी, असे त्यांना मुळीच वाटत नाही. आपला संसार त्यांना कोणत्याही परिस्थितीत उद्ध्वस्त करायचा नसतो,

म्हणून अशा गोष्टी लपवणे योग्य समजतात. मनातील अवघड आठवणी : स्त्री च्या मनात काही अशा गडद आठवणी असतात, ज्या ती आपल्या जोडीदाराला सांगणे कठीण समजते.relationship

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

सर्वेक्षणानुसार एक स्त्री आपल्या जोडीदाराला तिच्या भूतकाळाबद्धल सांगायला घाबरते,कारण आपल्या सुखाचे नाते तुटणार तर नाही ना… हा विचार ती करत असते. मेकअपच्या गोष्टी: कोणतीही स्त्री आपल्या बॉयफ्रेंडला किंवा पतीला मेकअप विषयी केव्हाच सांगणे पसंत करत नाही.

relationship: आपण कितपत मेकअप करतो आणि किती महागडे प्रोडक्ट्स वापरतो, हे आपल्या जोडीदाराला समजावे नाही यासाठी ह्या गोष्टी स्त्रिया लपवतात.

कंत्राटी कर्मचाऱ्यांना वीज कंपन्यांतील रिक्त पदांवर सामावून घ्या,! खा.जाधव यांना निवेदन ,शेगांवात १५ कंत्राटी कर्मचारी संपावर, ( prataprao jadhav )

0

 

इस्माईल शेखबुलढाणा जि.प्र.

शेगांव महावितरण, महानिर्मिती, महापारेषण या तिन्ही वीज कंपनीतील कंत्राटी कामगार यांच्या वेतनात वाढ, रोजंदारी कामगार पद्धती द्वारे शाश्वत रोजगार इत्यादी प्रमुख दोन मागण्या सह महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटने कडून खा.प्रतापराव जाधव यांना दि.५/३/२०२४ रोजी निवेदन देण्यात आले.

खा.जाधव हे बचत गटांच्या विक्री केंद्राच्या उदघाटन निमित्त तहसील कार्यालय येथे आले असता त्यांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. निवेदनात नमुद आहे.

की महावितरण, महानिर्मिती, व महापारेषण या कंपनीतील कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत तेथे नियमित पदभरती करू नये आणि ३० टक्के वेतनवाढ देण्यात यावी या कंत्राटी वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्या आहेत.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वात राज्यातील महावितरण,महानिर्मिती आणि महापारेषणचे कंत्राटी कर्मचारी विविध मागण्यांकरिता मध्य रात्रीपासून बेमुदत संपावर गेले आहेत.यामध्ये शेगाव विज वितरण कंपनी चे विनीत मंगलसिंग चव्हाण,राहुल कोकाटे शवशंकर ठाकरे,स्वप्नील ठाकरे,मंगेश वाघमारे परमेश्वर दांडगे,मिलिंद बोदडे,रोहित शिनगारे ऋषिकेश झाडोकार,मनोज तेल्हारकर,राजेश बेलूरकर ,मो.तन्वीर,अविनाश भाकरे,गणेस मुळे,राजेश टाकरडे हे कंत्राटी कर्मचारी सहभागी झाले आहेत. महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये राज्यातील सुमारे ४२ हजार कंत्राटी कर्मचारी आहेत.

त्यांना वीज कंपन्यांतील रिक्त पदांवर सामावून
घ्या, हे कंत्राटी कर्मचारी स्थायी होईपर्यंत तेथे नियमित पदभरती करू नका, यासह इतरही मागण्या या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आहेत.

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

त्या मान्य होत नसल्याने या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी २८ आणि २९ फेब्रुवारीला लाक्षणिक संप केला होता आणि त्यांच्या
मागण्या मान्य न झाल्यास ५ मार्चपासून बेमुदत संपाचा इशारा दिला होता.मागण्या मान्य न झाल्यामुळे सदर कंत्राटी कर्मचारी संपावर गेली आहेत.

Pratapravjadhav : विज वितरण कंपनीच्या व कंत्राटी कर्मचार्यांच्या भांडत मात्र सामान्य नागरिक नाहक भरडल्या जात आहे.

नजर वाढवण्यासाठी तुमच्या आहारात करा या पदार्थांचा समावेश, होतील डोळ्यांच्या समस्या होतील दूर ( Health Eyescare )

0

 

चष्मीश लोकांना आपल्या चष्म्याचा कितीही कंटाळा

Eyescare तरी देखील त्यांना तो रेग्युलर लावावाच लागतो. जर तुम्हांला तुमच्या डोळ्यांना अंधुक दिसत आहे, असे वाटत असेल तर किंवा खाज, जळजळ होणे अशा अनेक समस्या उद्भवत असतील तर त्याचा अर्थ असा होतो की,तुमचे डोळे कमकुवत होत आहेत.

यांपैकी कोणती लक्षणे तुम्हांला जाणवत असतील तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी संपर्क करून आपल्या आहारात नक्की बदल करून घ्याला हवे.

परंतु खरं तर असा कोणताही आहार नाही, ज्यामुळे दृष्टी सुधारेल. योग्य पोषक तत्वांनी आवश्यक पदार्थांचा आहारात समावेश केल्यास तुमच्या डोळ्यांचे आरोग्य चांगले राहील. त्यामुळे वाढत्या वयात मोतीबिंदू यासारखे धोकादायक आजार होण्याची शक्यता असते.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

डोळ्यांच्या कमकुवतपणाची कारणे आणि लक्षणे :
डोळ्यांच्या कमकुवतपणाची अनेक कारणे असू शकतात. ज्यामध्ये थकवा येणे, वय वाढणे, चुकीचे खाणेपिणे आणि डोळ्यांशी संबधीत समस्यांचा समावेश आहे.

अंधुक दिसणे हे, डोळ्यांच्या कमकुवतपणाचे मुख्य लक्षण आहे. डोळ्यांची जळजळ होणे, खाज येणे ही कमकुवतपणाची लक्षणे आहेत.

यामुळे डोळे लाल होणे आणि डोळ्यांमधून पाणी येणे. थोड्या थोड्या वेळाने डोळ्यांना थकवा येतो. डोकेदुखी हे डोळ्यांच्या कमकुवतपणाचे खूप मोठे कारण ठरते. विशेषकरून आपण जेव्हा संगणकाचा वापर करतो.

आपल्या डोळ्यांच्या आरोग्यासाठी ओमेगा -3 फॅटी एसिडस् हे खूप फायदेशीर ठरते. म्हणून तुमच्या आहारात ओमेगा 3 फॅटी एसिड्युक्त पदार्थांचा समावेश असावा. यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास खूप मदत होते.
आंबट फळे :संत्री, लिंबू, द्राक्षे यांसारख्या फळांमध्ये व्हिटामिन सी मोठ्या प्रमाणात असते. हे एंटी ऑक्सिडंट आहे. ज्यामुळे आपल्या डोळ्यांचे नुकसान होत नाही.

Health Eyescare:यासाठी आहारात फळांच्या ज्यूसचा समावेश करणे गरजेचे आहे.गाजर : गाजरात बीटा कॅरोटिन असते. ज्यामुळे आपल्या शरीराला व्हिटामिन ए मिळते. त्याच्या सेवनाने रात्रीच्या वेळी डोळ्यांची पाहण्याची क्षमता सुधारते आणि त्यांचा बाहेरचा पोर्शन सुद्धा चांगला राहतो.

चुकूनही फळे व भाज्या फ्रिजमध्ये ठेवू नका, अन्यथा भोगावे लागतील त्याचे दुष्परिणाम ( health)

0

 

आपल्या फ्रिजमध्ये वेगवेगळ्या वस्तू ठेवण्यासाठी अनेक कप्पे असतात.

जसे की, मसाले, दूध, पाणी, अंडी इ. पदार्थ आपण सर्वजण फ्रिजमध्ये ठेवतो. त्यासोबतच आपण फळे आणि भाजीपाला देखील फ्रिजमध्ये फ्रेश राहण्यासाठी ठेवतोच.

मार्केट मधून हिरवागार भाजीपाला आणला की तो लगेचच वाळून जाण्याची शक्यता असते.healthtips

उन्हाळ्याच्या दिवसांत तर या गोष्टी लवकर खराब होण्याची शक्यता असते. म्हणून आपण ते लगेचच फ्रिजमध्ये ठेवतो.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

परंतु काही वेळा घाईगडबडीत आपण फळे आणि भाजीपाला एकत्रच फ्रिजमध्ये ठेवून देतो. मात्र फळे आणि भाजीपाला फ्रिजमध्ये वेगवेगळे ठेवण्यासाठी तसे कप्पे दिलेले असतात. कारण फळे व भाज्या हे वेगवेगळेच ठेवणे गरजेचे असते.

या दोन्ही गोष्टी एकत्रितपणे ठेवले तर ते खराब होण्याची शक्यता असते. यामागे एक खूप महत्वाचे कारण आहे. ते म्हणजे फळांमधून एकप्रकारचा नैसर्गिक असा इथालियन गॅस तयार होतो.health

फळे नैसर्गिकरित्या तयार व्हावीत, यासाठी या गॅसची निर्मिती होणे आवश्यक असते आणि त्याप्रकारे फळे पिकतात.

लाईव्ह बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

फळे व भाज्या एकत्र ठेवल्याने नेमकं काय होते :सफरचंद, केळी यांसारयांसारख्या काही फळांमधून इतर फळांपेक्षा जास्त प्रमाणात गॅसची निर्मिती होत असते.

त्यामुळे ती खूप लवकर पिकतात आणि फळांमधून निर्माण होत असलेल्या गॅसमुळे भाज्या ताबडतोब खराब होतात. हे दोन्ही एकत्र ठेवल्याने भाज्यांचा टेक्स्चर आणि प्लेवर बदलतो व त्याची मूळ चव जाऊ लागते.

health:जसे की काकडी पिवळी होणे, पालेभाज्यांचा टवटवीतपणा कमी होऊन त्या मऊ पडणे, फळभाज्या वेळेआधीच पिकणे. यासाठी फळे आणि भाजीपाला एकत्र मुळीच ठेवू नये.

नगरपरिषद शिक्षक संघटनेतर्फे मुख्याधिकारी टाले यांचे स्वागत ( Murtijapurnews )

0

 

प्रतिनिधी/मूर्तिजापूर
शाम वाळस्कर

 

महाराष्ट्र राज्य नगरपरिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघातर्फे मूर्तिजापूर नगरपरिषद मध्ये नव्याने रूजू झालेले मुख्याधिकारी एस.एस.टाले यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

यावेळी नगरपरिषद शाळांच्या समस्यांचा मुख्याधिकारी यांनी आढावा घेऊन भौतिक सुविधा पुरविणे,रिक्त पदावर शिक्षक भरती करणेबाबत तसेच शिक्षक-कर्मचा-यांना भेडसावणा-या समस्या टप्प्याटप्प्याने निकालात काढून नगरपरिषद शाळांचा दर्जा वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असे आश्वासन शिक्षक संघाच्या पदाधिकारी यांना दिले.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Murtijapurnews: प्रशासन अधिकारी सुभाष म्हैसने उपस्थित होते.म.रा.नगरपरिषद माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघाचे संस्थापक-प्रदेशाध्यक्ष,प्राचार्य जयदीप सोनखासकर,अकोला जिल्हाध्यक्ष प्रमोद गांजरे,जिल्हा सचीव सुभाष मोहिते,प्रसिद्धीप्रमुख हेमंत शास्त्री,मुदस्सीर खान,स्वप्नील हनवते,विलास वनस्कार आदी उपस्थित होते.

वाशिम येथे स्व. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्राचे लोकार्पण ( eknathshinde )

0

 

प्रशिक्षण व विक्री केंद्र शेतीमालाचे मूल्यवर्धन आणि विपणनासाठी उपयुक्त ठरेल

-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

वाशिम, दि. 4 : शेतकरी बांधवांच्या उन्नतीसाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील असून, अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे.

स्व. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्र स्थानिक शेतीमालाचे विपणन व मूल्यवर्धनासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे व्यक्त केला.

वाशिम येथे स्व. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, खासदार भावना गवळी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार ॲड. किरण सरनाईक, महादेवराव जानकर, गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., पोलीस अधिक्षक अनुज तारे, सहायक जिल्हाधिकारी अपूर्वा बासुर, कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह, ‘आत्मा’च्या प्रकल्प संचालक अनिसा इस्माईल महाबळे आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, शेती क्षेत्राच्या विकासासाठी व शेतक-यांच्या आर्थिक प्रगतीसाठी एक रूपयांत पीक विमा, किसान सन्मान योजना अशा अनेक योजना राबविण्यात येत आहेत

शेतकरी बांधवांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. स्व. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतीमाल विक्री केंद्रामुळे येथील स्थानिक शेतीमालाला विक्रीची सुविधा, तसेच कृषी उत्पादनांचे मूल्यवर्धन होण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

केंद्राच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान तसेच मूल्य साखळी विकासाचे प्रशिक्षण देण्यात येऊन शेतकऱ्यांच्या नैसर्गिक व सेंद्रिय उत्पादित मालाला बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने कोल्ड स्टोरेज, क्लिनिंग, ग्रेडीग, पॅकेजिंगची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मालाला चांगला दर मिळून त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढणार आहे.

सेंद्रिय शेतीमालाची विक्री करणा-या रथाला यावेळी मुख्यमंत्री श्री. शिंदे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. केंद्रासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून ५ कोटी ८४ लक्ष निधी उपलब्ध करून देण्यात आला. त्याचप्रमाणे, अडीच कोटी रुपये निधीतून शेतकरी प्रशिक्षण गृह निर्माण करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांना कृषि व संलग्न विभागाच्या तंत्रज्ञानविषयक गरजेवर आधारित प्रशिक्षण देणे, नाशवंत शेतमालास बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा केंद्राचा उद्देश आहे.

eknathshinde: केंद्राची क्षमता प्रीकूलिंग १० मे.टन, कोल्ड स्टोरेज ४० मे.टन, रायपेनिंग चेंबर १५ मे.टन, ग्रेडिंग अँड पॅकिंग, २ व्यावसायिक गाळे आहेत. जिल्ह्यातील एकूण ९० शेतकरी उत्पादक कंपनी, २ हजार २१४ शेतकरी उत्पादक गटांची स्थापना करण्यात आली आहे. त्याद्वारे ३० हजार २१० शेतकऱ्यांना संघटित करण्यात आले आहे. असे जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार यांनी एका परिपत्रकाद्वारे कळविले.

वाशीम वरून प्रतिनिधी मोहम्मद बेग जमील बेग मिर्झा सह ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर सूर्या मराठी न्यूज वाशिम.