Home Blog Page 128

क-हेवडगांवमध्ये भगवे वादळ ; डोळ्याचे पारणे फेडणारा ऐतिहासिक शिवजयंती उत्सव सोहळा ( shivjayanti )

0

 

आष्टी (प्रतिनिधी) – हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तालुक्यातील क-हेवडगांव येथे भव्य दिव्य सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने मोठ्या थाटात संपन्न झाली,

गावातून छत्रपती शिवाजी महाराज व मावळ्यांचे पोशाख परिधान करून विद्यार्थासह हालगी पथक, लेझिम पथक, टाळ मृदंगाच्या गजरात शाही मिरवणूक काढण्यात आली या शोभायात्रेत शालेयविद्यार्थ्यांनी लेझीम सादर करत चिमुकल्यांनी लक्ष वेधले होते.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय घोषणांनी क-हेवडगांव शिवमय झाले होते.

घराघरात ठिकठिकाणी दिमाखात फडकणारे भगवे झेंडे आणि जय भवानी जय शिवाजी’ अशा कणखर घोषणांनी दाहीदिशा दुमदुमत होत्या.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

तालुक्यातील क-हेवडगांव येथे छत्रपतीशिवाजी महाराज यांची जयंती अभुतपुर्व जल्लोष उत्साहात साजरी झाली भगवे झेंडे, आणि भगव्या पताकांनी गाव सजवला होता. शिवरायांच्या गितांचा आवाज दाहीदिशात घुमत होता.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

अभूतपूर्व मिरवणूक निघाली शिवकालीन पोशाखात जि.प.प्रा. शाळेच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी लक्ष वेधून घेतले सायं ४ वाजता महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सुरुवात झाली शिवमय वातावरणात महाराजांची आरती करून मिरवणूक संपली ६ ते ८ या वेळेत उत्सव समितीच्या वतीने ग्रामस्थांना महाप्रसाद भोजन ठेवण्यात आले होते .

shivjayanti:शिवचरित्रकार ह.भ.प दिपालीताई खिळे महाराज यांचे सुंदर किर्तन झाले. गावातील आजी माजी सरपंच, सदस्य, राजकीय, सामाजिक शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील नागरीकांसह तरुण, महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणावर होता.

सर्वे न करता शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या अशी मागणी आप चे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रसाद घेवंदे (farmer )

0

 

इस्माईलशेख बुलढाणा. जि. प्र.

. काल झालेला जिल्ह्यामध्ये तसेच राज्यामध्ये काही ठिकाणी अवकाळी पाऊस व गरपीट झाली आहे.

त्यामधे रबी पिकाचा काढणीचा हगाम चालू असताना पुन्हा एकदा शेतक-यावर अस्मानी मोठे संकट उभे राहले आहे. काल जिल्ह्यातील काही भागामध्ये संध्याकाळी वादळी वाऱ्या सह, गारपीट पण झाली आहे.

त्यामध्ये रब्बी पीक गहू, हरभरा, कांदा, ज्वारी सह फळबागांची सुद्धा मोठा प्रमाणात हानी झाली आहे. बुलढाणा जिल्ह्या मध्ये अवकाळी पावसाने व गारपीट मुळे हाती येणार पीका चे आतोनात नुकसान झाले आहे.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

 

तरी राज्य सरकारचे अधिवेशन चालू असताना त्यामधे अधिवेशनात सरसकट नुकसान भरपाई सर्वे न करताच देण्यात यावी असा ठराव मंजूर करावा, तसेच शेतकऱ्यांच्या शेतातील पिक, टीनशेड चे सुद्धा नुकसान झाले आहे.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

तसेच शेतामधे गारपीट चा खच झाला असून शेतकर्याचे हातीयेणारे पिक सर्व वाया गेले, तरी राज्य सरकारने सर्वे न करताच सरसकट नुकसान भरपाई द्यावी ही मागणी आम आदमी पार्टी चे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख प्रसाद घेवंदे यांनि केले आहे.

farmer:त्यावेळी उपस्थित प्रा. विवेक देवळे सर, सुभाष कडाळे सर, भानुदास पवार, अॅड. दीपक मापरी, राजाराम खांदेभराड, सईद शहा, गणेश सोळंके, दिलीप गुर्हाळकर, नितीन अवसरमोल, विशाल चव्हाण, इरफान शेख, विठ्ठल भिसे, संदीप पांढरे, सुमंता पडघान हे होते.

आईजवळ चुगल्या का केल्या असे म्हणून शिविगाळ, डोक्यात काठी मारून केले जखमी , गुन्हा दाखल ( crimenews )

0

 

भूस्कुटीचा मळा जवळ इंदिरा नगरातील घटना.

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव: माझ्या आईजवळ चुकल्या का करतो असे सांगून शिवीगाळ करीत माझ्या आईला माझ्या दारू पिण्याबाबत काही सांगितलं तर जीवाने मारीन असे सांगून डोक्यावर गाठीने मारून जखमी

केल्याची घटना 26 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजे दरम्यान भूस्कुटीच्या मळ्याजवळ इंदिरानगर येथे घडली. याबाबत प्रफुल्ल किसन विभुते वय 39 याने दिलेल्या तक्रारीनुसार येथील इंदिरानगर भागात राहणार महेश जीवन हिवराडे व 35 वर्षे याने तू माझ्या आईजवळ चुगल्या का करतो.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

असे म्हणून वाद घातला व शिवीगाळ करू लागला त्याला हटकले असता हातातील काठीने डोक्यावर मारून जखमी केले.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

crimenews: मेडिकल सर्टिफिकेट व तक्रारीवरून आरोपी महेश जीवन पस्तीस राहणार इंदिरानगर याच्या विरुद्ध कलम 324 504 506 भावी नुसार गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सरोदे बक्कल नंबर 745 हे करीत आहेत

श्रींच्या दर्शनासाठी शेगाव येथे आलेल्या खामगाव येथील विद्यार्थ्यांची जुनी पोलीस चौकी जवळून दुचाकी लंपास. अज्ञाता विरुद्ध गुन्हा दाखल. ( crimenews )

0

 

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगाव: श्री संत गजानन महाराज मंदिरात दर्शनाकरिता खामगाव येथून आलेल्या विद्यार्थ्यांची हेंडल लॉक करून ठेवलेली गुचकी जुनी पोलीस चौकीजवळ अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ ते दहा वाजून पाच मिनिटाच्या दरम्यान घडली.

याबाबत शेगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे शेगाव शहर पोलीस सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार खामगाव येथील नांदुरा रोडवर

असलेल्या गोकुळ नगर येथील विद्यार्थी महेश गणेशराव वाघमारे वय 27 वर्षे हा 25 फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजे दरम्यान शेगाव येथे श्री संत गजानन महाराज मंदिरात श्रींच्या समाधीचे दर्शनासाठी आपली मोटरसायकल क्रमांक एम एच 28 एसी ८२२१ या दुचाकीने शेगाव येथे आला.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

त्याने मंदिराजवळ असलेल्या जुनी पोलीस चौकी जवळ मोटरसायकल हँडल लॉक करून तो मंदिरात श्रींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी केला दर्शन घेऊन परत जिथे गाडी लावली होती त्या ठिकाणी आला असता.

 बातमी लाईव्ह पाहण्यासाठी इथे क्लिक करा 

त्याला त्याची घडी मिळून आली नाही त्याने सर्वत्र शोध घेतला मात्र दुचाकी दिसून आल्याने याबाबत 27 फेब्रुवारी रोजी महेश वाघमारे यांनी शेगाव शहर पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली.

Crimenews :या तक्रारीवरून शेअर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध कलम 379 भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे अधिक तपास सहाय्यक फौजदार गजानन गावंडे बक्कल नंबर 669 करीत आहेत

सुंदरी’ मालिका पुन्हा एकदा रोमांचक वळणावर; मालिकेतून साहेब उर्फ वनिता खरात घेणार प्रेक्षकांचा निरोप ( entertainment )

0

 

आई आणि मुलीचं नातं हे जगावेगळं असतं. आईसोबत रक्ताचंच नातं असलं की त्यांच्या भावना ख-या असतात.

किंवा तेव्हाचं ते नातं टिकतं असं नसून आई या नात्याने आपुलकीने सांभाळ करणारी एखादी स्त्री पण ख-या आई इतकाच जीव बाळाला लावू शकते हा विचार ‘सन नेटवर्क’च्या ‘सन मराठी’ वाहिनीवरील ‘सुंदरी’ या मालिकेतून मांडला गेला आहे.

सावी ही जरी अनू आणि आदित्यची मुलगी असली तरी सुंदरीने सावीला आईचं प्रेम, आईची माया दिली आहे. त्यामुळे सुंदरी आणि सावी मधलं आई मुलीचं नातं हे दिवसेंदिवस फुलत चाललेलं प्रेक्षकांनी अनुभवलं आहे.

‘सुंदरी’ मालिका पहिल्या एपिसोडपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे, प्रत्येक एपिसोडमध्ये प्रेक्षकांना कथेशी खिळवून ठेवलं जाईल अशा घटना घडताना दाखवल्या आहेत. आता ‘सुंदरी’ ही मालिका पुन्हा एकदा नव्या वळणावर पोहचणार आहे.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

काही महिन्यांपूर्वी ‘साहेब’ या खलनायिकेची एंट्री मालिकेत झाली होती जी भूमिका अभिनेत्री वनिता खरात साकारत होती.

बातमी लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

entertainment: आता साहेब हे पात्रं प्रेक्षकांचा निरोप घेणार असून मालिकेत रोमांचक असे सीन्स पाहायला मिळणार आहेत.नेमकं सर्व काही कसं घडतंय ते पाहण्यासाठी सोमवार ते शनिवार रात्री १० वाजता फक्त सन मराठीवर ‘सुंदरी’ अवश्य पाहा.

अवाढव्य पोट कमी करायचं आहे का? तर मग आहारात करा या पदार्थांचा समावेश.. healthnews

0

 

वजन कमी करण्यासाठी काय खावे आणि काय खावू नये, ही चिंता बहुतांश लोकांना सतावते.

कारण एकदा पोट वाढले की ते कमी होतचं नाही. पण मित्रांनो तुम्ही टेन्शन मुळीच घेवू नका. कारण आम्ही तुम्हांला काही भन्नाट असे घरगुती उपाय सांगणार आहोत,

ज्यामुळे तुमचे पोट तर कमी होईलच पण त्याच बरोबर तुमचे वजन देखील अगदी नियंत्रणात राहील. आजकालची तरुण पिढी देखील पोट कमी करण्याच्या त्रासाने वैतागली आहे. त्यामुळे बहुतेकजण ब्रेकफास्ट करणे टाळतात.

मात्र असे केल्याने त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो.पब्लिक रिसर्चच्या रिपोर्टनुसार साउथ इंडिअन पदार्थांचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो.ज्यामुळे आजारांचा धोका सुद्धा कमी होतो.

वजन कमी होण्यासोबतच डायबिटीसचा धोका देखील टळतो.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

नाश्त्याला या पदार्थांचे सेवन केले तर आपल्या शरीरातील अवाजवी फॅट्स जमा होणं टाळता येवू शकते.

डोसा सांभार वेट लॉससाठी आहारात डोसा-सांभारचा समावेश करू शकता. तांदूळ आणि उडीद डाळीपासून तयार केलेले पदार्थ हे वजन कमी करण्यासाठी खूप फायदेशीर ठरतात.

कारण यामध्ये कमी कॅलरीज असतात. त्यामुळे आपल्या आरोग्याचे नुकसान होत नाही. हा पदार्थ नॉन स्टीक पॅन मध्ये खूप छान बनतो. जे कमी तेलकट आणि हेल्दी असते.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

healthnews:उपमा हा भाज्यांपासून आणि रव्यापासून बनवता येतो. सकाळच्या ब्रेकफास्टसाठी अगदी साधा आणि झटपट बनवू शकता.

यामध्ये कमीत कमी तेल आणि जास्तीत जास्त भाज्यांचा समावेश करावा. नाचणी बॉल्स
आपल्या आहारात नाचणी बॉल्सचा समावेश करू शकता.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

नाचणी आरोग्यासाठी हेल्दी असते. नाचणी बॉल्स हे नाचणीच्या पीठापासून बनवतात. ज्यामुळे लवकर भूक लागत नाही.

इडली वजन कमी करण्यासाठी इडली चटणी आणि मसाला इडलीचा आपल्या आहारात समावेश करावा.

healthnews:इडली बनवण्यासाठी तांदूळ व डाळ वाटून त्याचे एकत्रित मिश्रण करा. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात. त्यामुळे लवकर भूक लागत नाही.

कोलद येथील माजी सरपंचाची हत्या.गावाजवळील शेत रस्त्याच्या बाजूला प्रेत आढळले.. ( Murdernews )

0

 

तामगावं पोलीस घटनास्थळी दाखल,

संग्रामपूर तालुक्यातील श्री संत गुलाब बाबा संस्थान काटेल धाम येथून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या कोलद येथील माजी सरपंच गजानन मोतीराम देऊळकर वय 60 वर्षे यांचा मृतअवस्थेत सकाळी अंदाजे 8 वाजेच्या दरम्यान काही नागरिकांना शेत रस्त्याचे नालीत प्रेत आढळून आले .

माजी सरपंच असलेल्या देऊळकर यांचे त्याच रस्त्यावर शेत असून दररोज शेतात येजा करत असत काल रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे त्याचा कोणीतरी फायदा घेत मारहाण करून त्यांची हत्या केल्याची चर्चा त्या परिसरात होत आहे,

घटनेची माहिती मिळतात तामगाव पोलिस ठाणेदार राजेंद्र पवार, पोलीस उपनिरीक्षक दीपक सोळंके व पोलीस ताफा दाखल झाला आहे, यामागील सत्य काय.?

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

याचा तपास लागल्यानंतरच कळेल..? या घटनेने परिसरात भयभीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

लाईव्ह पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Murdernews :दोन ते तीन इसमांना चौकशीकामी तामगाव पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे पुढील तामगावं पोलीस करीत आहे.

 

विश्वहिंदू परिषदेच्या तालुका अध्यक्षाला मारहाण करणाऱ्या गो तस्कर, गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्याची मागणी ( crimenews )

0

 

इस्माईल शेखबुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

शेगांव : विश्व हिंदू परिषद च्या तालुकाध्यक्षांना मारहाण करणाऱ्या गो तस्करांना अटक करण्याची मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने केला आहे याबाबत गृहमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.

की संत नगरी असलेल्या शेगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातून शनिवार, २४ फेब्रुवारी रोजी अवैध गोवंश वाहतुक होत असल्याची माहिती शहरातील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल संघटनेच्या गौरक्षकांना मिळाली.

त्या माहितीच्या आधारे गौरक्षकांनी संशयित वाहन थांबविले यावेळी गोतस्करांनी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. विश्व हिंदू परिषदचे प्रखंड (तालुका) अध्यक्ष विजय राठी यांनी समजुत घालण्याचा प्रयत्न केला असता.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

त्यांच्यावर काही मुस्लिम युवकांनी अचानक हल्ला केला यामध्ये विजय राठी यांच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे राखी यांना रुग्णालयात दाखल करण्यात हल्ला करणाऱ्या अशा गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी शहरातील विश्व हिंदू परिषद, बजरंग दल संघटनेच्या वतीने तहसीलदार यांचे मार्फत मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

निवेदनात नमुद आहे की दि.२४ फेब्रुवारी २०२४ रोजी गाडी क्र. एम. ०४ एफ.यु. ५५३५ मध्ये स्थानीक छत्रपती शिवाजी महाराज चौकात ५ गोवंश निर्दयतेने कोंबलेले आढळून आले. त्याची माहिती शहर पो.स्टे. ला दिली.

असता पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी ते वाहन पो.स्टे. ला लावन्याचे सांगितले परंतु त्याच वेळेस तेथे जमलेल्या ५० ते १०० मुस्लिमांनी ते वाहन पो.स्टे. ला नेण्यास नकार दिला व पोलीसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली. संघटनेच्या कार्यकर्त्यांनी समजुत घालण्याचा प्रयत्न केला असता मुस्लिम समुदयातील काही युवकांनी शिवीगाळ व धक्का बुक्की करण्यास सुरुवात केली. यामध्ये विश्व हिंदू परिषदचे प्रखंड (तालुका) अध्यक्ष विजय राठी यांनी समजुत घालण्याचा प्रयत्न केला असता. त्यांच्यावर काही मुस्लिम युवकांनी अचानक हल्ला केला यामध्ये त्यांच्या डोक्याला व छातीला गंभीर दुखापत झाली.

आ. लता ताई सोनवणे यांच्या हस्ते कोट्यावधी रुपयांची कामाची भूमिपूजन (mla lata sonawane )

असे प्रकार शहरात यापूर्वी सुद्धा झालेले आहेत. याकडे स्थानिक पोलीस प्रशासन अर्थपुर्ण दुर्लक्ष करत असुन. असेच घडत राहिल्यास शहरात एखादी मोठी अप्रिय घटना घडु शकते व त्यातुन शहराचे सामाजिक सौहार्दास तडा बसुन शहरात कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ शकते. संघटनेने यापूर्वी सुद्धा वारंवार पोलीस स्टेशन व तहसिल कार्यालयास निवेदन देऊन सुद्धा कोणतीही कार्यवाही होतांना दिसुन येत नाही. या निवेदनाच्या माध्यमातुन आम्ही आपणास विनंती करतो की, सदर प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कार्यवाही करावी.

 

crimenews: सदर विषयाकडे आपण वैयक्तीक लक्ष देऊन शहरात व जिल्हात वाढलेल्या गौतस्करीला आळा घालण्यासाठी प्रशासनाला आदेश द्यावा. तसेच राज्यात गौवशं हत्या प्रतिबंधक कायदा २०१५ ची अमलबजावणी करावी. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी गोस्क्वॉडची निर्मिती करावी. तसेच तालुक्याच्या ठिकाणी पशु वैद्यकिय अॅम्ब्युलेंस द्यावी. अन्यथा यासाठी विश्व हिंदू परिषद व बजरंग दल जिल्हाभर अधिक तिव्र आंदोलन उभ करण्यात येईल.असा ईशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

तितिक्षा- सिद्धार्थ ची जोडी विवाहबद्ध, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने घेतली सात वचनं ( titeeksha tawade )

0

 

लोकप्रिय अभिनेत्री तितिक्षा तावडे आणि अभिनेता सिद्धार्थ बोडके या भन्नाट जोडीचा शुभविवाह मोठ्या थाटामाटात पार पडला.

सोशल मीडियावर त्यांच्या लग्नातील काही मनमोहक क्षण वायरल झाले आहेत. त्यांचे चाहते तर शुभेच्छांचा वर्षाव करत आहे.

सिद्धार्थ आणि तितिक्षा मागील काही वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. तेव्हा त्यांनी एक फोटो शेअर करत आपल्या नात्याबद्धल सांगितले होते. अखेर आज ही जोडी विवाहाच्या पवित्र बंधनात बांधली गेली.

तितिक्षा व सिद्धार्थ यांनी आपल्या लग्नासाठी पेस्टल कलर निवडले होते. तितीक्षाने व्हाइट आणि गोल्डन बॉर्डर असलेली नऊवारी नेसली होती.

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

तर सिद्धार्थने ऑफ व्हाईट कलरचा कुर्ता आणि गोल्डन रंगाचं धोतर घातले होते. त्यांच्या या लूकने दोघेही परफेक्ट कपल दिसत होते.

कालपासूनच तितिक्षा आणि सिद्धार्थच्या विवाहाच्या विधींना सुरुवात झाली होती. हळद, साखरपुडा, संगीत हे सर्व कार्यक्रम अगदी छान पार पडले. त्यांनतर ही जोडी विवाहबंधनात अडकली. या हटके जोडीच्या लग्नाला त्यांच्या मित्रपरिवारासह मराठी इंडस्ट्रीमधील अनेक कलाकारांनी उपस्थिती लावली होती.

 

अभिनेत्री अनघा अतुल, रसिका सुनील, ऋतुजा बागवे, एश्वर्या नारकर, सुरुची अडारकर ही सर्व मंडळी आली होती.

सिद्धार्थ बोडके आणि तितिक्षा तावडे यांनी ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेत एकत्र काम केले होते. तर तितीक्षाने ‘असे हे कन्यादान’,’सरस्वती’, ‘तू अशी जवळी रहा’ अशा कित्येक नावाजलेल्या मालिकांमध्ये काम केले आहे.

तर सध्या ती सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेमधून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.

titeeksha tawade :त्याचप्रमाणे सिद्धार्थ बोडके याने ‘दृश्यंम 2’ या बॉलिवूड चित्रपटात व नुकतेच ‘श्रीदेवी प्रसन्न’ या मध्ये देखील झळकला होता.

आ. लता ताई सोनवणे यांच्या हस्ते कोट्यावधी रुपयांची कामाची भूमिपूजन (mla lata sonawane )

0

 

यावल प्रतिनिधी .विकी वानखेडे

आ.सौ. लता ताई चंद्रकांत सोनवणेयांच्या प्रयत्नातुन मंजुर झालेले विकास कामांचाभुमि पूजन सोमवार, दिनांक २६ फेब्रुवारी २०२४भूमिपूजन शुभहस्ते – मा. आ. सौ. लता ताई चंद्रकांत सोनवणे यांच्या विकास निधी मधून माजी आमदार.प्रा.श्री. चंद्रकांत सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.

सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी 24 रोजी भूमिपूजन करण्यात आले चुंचाळे ते गायरान रस्ता व मजबुतीकरण 1.20 कोटी रुपये चुंचाळे सिमेंट साठवण बंधारा बांधणे 29.91 लक्ष सुंचाळे ते गायरान 1.5 किमी रस्ता

मजबुतीकरण व डांबरीकरण 44.64 लक्ष रुपये येथे दलित वस्तीत बौद्ध विहार बांधणे वीस लक्ष रुपये बोराडे येथे सिमेंट नाला बांध बांधणे 22.15 लक्ष रुपये गायरान ते नागादेवी 1.5 रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण 50 लाख रुपये नागादेवी येथे रिमिक्स काँक्रिटीकरण करणे पाच लाख रुपये

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

सावखेडा सिम येथे पुलाचे बांधकाम करणे 1.50 कोटी रुपये नागादेवी येथे मंदिराजवळ लहान पूल बांधणे 1.50 कोटी रुपये नायगाव ते चुंचाळे तीन किलोमीटर रस्त्याची सुधारणा करणे 1.21 कोटी रुपये दहिगाव गावात सातशे मीटर रस्ता रिमिक्स काँक्रिटीकरण करणे 2.44 कोटी रुपये दहिगाव ते मोहराळा डोंगर वाट चार

किमी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण 1.12 कोटी रुपये

कोरपावली ते दहिगाव दोन किमी रस्ता डांबरीकरण व मजबुतीकरण 48.20 लक्ष रुपये सावखेडा सिम येथे सिमेंट साठवण बंधारा बांधणी क्रमांक पाच 24.24 लक्ष रुपये सावखेडा सिम येथे साठवण बंधारा बांधणे क्रमांक सहा 26.55 लाख रुपये सावखेडा सेम येथे

सिमेंट साठवण बंधारा बांधणी क्रमांक सात 24.19 लाख रुपये सावखेडा सिम येथे जि प प्राथमीक शाळा नवीन शाळा खोली बांधणे 11.75 लाख सावखेडा सीम येथे दलित वस्तीत फेवर ब्लॉक बसवणे पाच लाख रुपये सावखेडा सिम गावातल्या ट्रेन बांधणे व गटारीचे बांधकाम करणे 35 लाख रुपये वाघझिरा आश्रम शाळा ते सावखेडा 1.5 किलोमीटर रस्ता

मजबुतीकरण व डांबरीकरण 44.14 लाख रुपये दहिगाव येथे दलित वस्तीत फेवर ब्लॉक बसवणे पाच लाख रुपये दहिगाव येथे दलित वस्तीत बुद्धविहार बांधकाम करणे वीस लाख रुपये गाड्या रस्ता ट्रिमिक काँग्रेसने पाच लाख रुपये ऊस मध्ये रस्ता रिमिक्स काँक्रिटी करणे पाच लाख रुपये ऊस माळी रस्ता ट्रिमिक्स काँक्रिटीकरण करणे पाच लक्ष रुपये लंगडा आंबा येथे

रस्ता ट्रिमिक्स काँक्रिटीकरण करणे दहा लाख रुपये एवढ्या कोट्यावधी रुपयाच्या विकास कामांच्या भूमिपूजन माझी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या शुभहस्ते आज रोजी सोमवारी सर्व गावांमध्ये करण्यात आले या भूमिपूजन प्रसंगी सूर्यभान पाटील सर भरत चौधरी सर बबलू भाऊ कोळी लक्ष्मण बडगुजर विनायक आप्पा पाटील दीपक कोळी

सिंदी(रेल्वे)पोलिसांची धडक कारवाई कारसह १२० लिटर पेट्रोल जप्त ( crimenews )

मनोज धनगर गोटू भाऊ कोडी अण्णाभाऊ कोडी सुधाकर भाऊ पाटील पराग महाजन दिनेश साळुंखे आबा बडगुजर अनिल बडगुजर भरत राजपूत नितीन राजपूत कैलास सिंग राजपूत मुबारक तडवीकुर्बान तडवी कलिंदर तडवी विकी वानखेड भरत चौधरी प्रदीप वानखेडे हे उपस्थित होते

mla lata sonawane: चुंचाळे तालुका यावल येथील लोटू धनगर शांताराम धनगर प्रमोद निळे बबलू धनगर यांनी शिवसेनेत प्रवेश केला माजी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते यांचा सत्कार करण्यात आला व प्रवेश देण्यात आला