Home Blog Page 141

Akolanews | शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार नुकसानीची मदत

0

 

मुर्तीजापुर प्रतिनिधी
शाम वाळस्कर

Akolanews :मुर्तीजापुर तालुक्यातील मधापुरी या भागातील शेतकऱ्यांच्या खात्यात कधी जमा होणार नुकसानीची मदत याची प्रतीक्षा करत असताना शेवटी शेतकऱ्यांनी तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्या दरबारात निवेदनाच्या माध्यमातून आपली कैफियत मांडावी लागली.

Akolanews: मुर्तीजापुर तालुक्यातील मधापुरी,जेठापूर,हयातपूर येथील सर्व शेतकऱ्यांनी तहसीलदार शिल्पा बोबडे यांना निवेदन सादर केले दिलेले निवेदन नमूद केले आहे.की २०२३ मध्ये जुलै ऑगस्ट मध्ये अतिवृष्टी झाली संपूर्ण शेती खरडून गेली अतोनात नुकसान झाले तरी लाभ मिळाला नाही.

शासनाने मंजूर केलेले पीक विकण्याची २५% अग्रीम मदत सुद्धा मिळाली नाही.२०२२ मध्ये जाहीर झालेली मदत आजपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही.

२०२३ जुलै ते ऑगस्ट या दरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिकाचे व जमिनीचे अतोनात नुकसान झाले परंतु चुकीच्या सर्वामुळे जे संबंधित गरजू लाभार्थी आहे.हेतूपुरस्कर वगळता आले असून त्याची चौकशी करण्यात यावी पिक विमा मंजूर झालेले शासनाचे २५% अग्रीम रक्कम अजून पर्यंत विमा काढलेले शेतकऱ्यांना मिळाले नाही.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

 

 

याकडे लक्ष घालून शेतकऱ्यांच्या हक्काचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करावे विमा कंपनीचे अधिकाऱ्यांना सूचना देण्यात यावे २०२२ मध्ये अतिवृष्टी सरसकट शेतकऱ्यांना शासनाने मदत घोषित केलेली होती.

परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे अजून पर्यंत शेतकऱ्यांना याचा लाभ मिळालेला नाही.यादीमध्ये नाव असूनही विशिष्ट क्रमांक वीके अजून पर्यंत आलेला नाही.संबंधित अधिकाऱ्यांनी सूचना देऊन याची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी समस्त शेतकऱ्यांनी केली आहे.

Akolanews : तहसीलदार शिल्पा बोबडे यांच्याशी शेतकरी अमर ठाकरे यांनी सविस्तर चर्चा केली शिल्पा बोबडे यांनी सकारात्मक भूमिका घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी शेतकरी अमर ठाकरे,चंद्रकांत उमक,अमोल पवार, सतीश मालधुरे,गजानन पवार,शंकरराव खरबडे,अश्विन आमटे,देवानंद मेरे,शिवाजी मेहरे, संजय बनाईत,चंद्रकांत गणोरकर,पांडुरंग डहाके,विनोद इंगळे,नरेंद्र दहीकर,कमल आमले व इतर शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

 

 

Ravikanttupkar | १९ जानेवारीला रेल्वे रोको आंदोलन! राजधानी व गुजरातकडे जाणाऱ्या गाड्या रोखणार; शेतकरी नेते रविकांत तुपकर यांची घोषणा

0

 

बुलढाणा: Ravikanttupkar: मागील तीनेक महिन्यापासून आपण शेतकऱ्यांसह रस्त्यावर लढत आहोत. मात्र निवडणूक अभियान राबविणारे मुख्यमंत्री असो वा अन्य सत्ताधारी नेते असो, त्यांना शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी सवड नाही.

यामुळे आमचा संयम संपला असून येत्या १९ जानेवारीला ‘रेल्वे रोको’ आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

येथे प्रसिद्धी माध्यमाशी बोलताना तुपकर यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त करीत नवीन आंदोलनाची घोषणा केली. यावेळी ते म्हणाले की, बुलढाण्यापुरते सांगायचे झाल्यास जिल्ह्यातील मलकापूर रेल्वे स्थानकात आंदोलन करण्यात येईल. १९ जानेवारीला सकाळी ६ वाजताच आंदोलनाला सुरू करण्यात येणार आहे.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

 

यावेळी हजारो पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी मुंबई, दिल्ली व गुजरात राज्याकडे जाणाऱ्या रेल्वे गाड्या रोखणार आहे. जीव गेला तर चालेल, पण स्थानकातून एकही रेल्वे सुटू देणार नाही, असे तुपकर यांनी यावेळी निक्षून सांगितले.

या आंदोलनाची कारण मीमांसा सांगताना ते म्हणाले की, मागील ऑक्टोबर महिन्यापासून आम्ही लाखो सोयाबिन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी विविध टप्प्यात आंदोलने करीत आहे.

एल्गार मोर्चा, रथयात्रा, मंत्रालय ताब्यात घेणे, अन्नत्याग आदी आंदोलनाच्या माध्यमाने आम्ही राज्य व केंद्र शासनाकडे मागण्या रेटल्या.सोयाबिन, कपाशीला दरवाढ, यलो मोझाक, लाल्या, बोण्ड अळी मुळे झालेली नुकसानीची भरपाई, पीकविमा, नैसर्गिक आपत्तीची भरपाई, सोयापेंड, पामतेल आयात बंद करावी या मागण्यांना राज्य व केंद्राने मान्यता दिली.

मात्र कारवाई शून्य असून शेतकऱ्यांना कवडीची मदत मिळाली नाही. शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. शेतकरी चोहोबाजूंनी संकटात सापडला असताना मुख्यमंत्री शिवसंकल्प अभियान राबवून लोकसभेची तयारी करीत आहे.

त्यांना शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला वेळ नाही की मदतीसाठी त्यांच्याजवळ पैसा नाही,असे विचित्र चित्र आहे.

Ravikanttupkar : आता शेतकऱ्यांचा संयम संपल्याने रेल्वे रोको करण्यात येत आहे. सरकारला आम्ही १८ जाने वारीची मुदत दिली आहे. त्या मुदतीत मदत मिळाली नाही तर आंदोलन अटळ असल्याचे तुपकर यांनी स्पष्ट केले.

Crimenews | मुंबई पोलिस कर्मचाऱ्याचा जळगावात खून, हा खून क्रिकेटच्या वादातून प्राणघातक हल्ला

0

 

Crimenews : जळगावातील चाळीसगाव मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. ती म्हणजे मुंबईत नोकरीं पोलिस दलात कार्यरत असलेला तरूण सुट्टीसाठीआपलं गावी आला होता. ती मात्र सुट्टी त्याची अखेरची ठरली आहे.

परंतु आता बऱ्याच वाद क्रिकेट खेळताना झालेल्या या वादातून त्या पोलिस तरूणावर प्राणघात हल्ला केले आणि त्यातच त्याने जीव गमावला. त्या नंतर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्याने अखेरचा श्वास घेतला. शुभम आगोने असे मृत तरूणाचे नाव असून तो चाळीसगाव शहारातील रहिवासी होता.

परंतु त्याचा मृत्यूने गावात सर्वत्र हळहल व्यक्त होत असून मुलाच्या अकस्मात जाण्याने कुटुंबियांना जबर धक्का बसला आहे. आता याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

सुट्टीसाठी गावी आला पण ती सुट्टी अखेरची व शेवटचीच..

या मध्ये मिळालेल्या माहितीनुसार, शुभम आगोने (वय 28) हा मूळचा चाळीसगाव शहरातील रहिवासी आहे. तो पोलिस दलात असून सध्या मुंबई मध्ये कार्यरत होता.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

तो कामाच्या धबाडग्यातून वेळ काढून, घरच्यांना भेटण्यासाठी शुभम काही दिवसांची सुट्टी काढून नुकताच चाळीसगावला आला होता. मुलगा घरी आल्याने सगळेच आनंदी होते, पण त्यांचा हा आनंद क्षणभंगुर ठरला.

हा मयत तरुण हा चाळीसगाव शहरातील रहिवासी आहे तो मुंबई येथे पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत होता. काही दिवसांपूर्वी तो त्याच्या चाळीसगाव या गावी सुट्टीवर आला होता. रविवारी चाळीसगाव तालुक्यातील ओढर येथे क्रिकेटचे सामने झाले.

अखेर त्यावेळीच शुभम याचा एका गटासोबत वाद झाला होता, रविवारी संध्याकाळी तो वाद उफाळून आला. त्या नंतर तेव्हा चार जणांनी शुभमवर पाटणारोड येथे तलावरीने हल्ला केला.

 

हा क्रिकेट मध्ये त्यामध्ये शुभम गंभीर जखमी झाला आणि रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर पडून होता. पण इतर नागरिकांनी त्याच चाळीसगाव शहरातील खासगी रुग्णालयात दाखल केले.

Crimenews : परंतु मात्र तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. परंतु याप्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेत अखेर गु्न्हा दाखल केला. त्या नंतर या खुनाप्रकरणी चार जणांना ताब्यात पोलिसांनी घेतले आहे. पुढील तपास स्थानिक पुलिस करत आहे.

Akolanews | चालक संघटनांशी चर्चा करूनच केंद्र शासन कायद्याबाबत निर्णय घेणार..!वाहनचालकांनी संप मागे घ्यावा- जिल्हाधिकारी अजित कुंभार

0

 

विदर्भ ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर

Akolanews : नवीन ‘हिट अँड रन’ कायदा अद्याप लागू झाला नसून, त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही.

विविध संघटनांशी चर्चा केल्यानंतरच या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे केंद्र शासनाने स्पष्ट केले आहे.

त्यामुळे अकोला जिल्ह्यातील विविध वाहतूक संघटना तसेच चालक यांनी आंदोलन व संप त्वरित मागे घ्यावा आणि जिल्ह्यातील वाहतूक सुरळीत ठेवावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी आज येथे केले.

जिल्ह्यामध्ये पेट्रोल, अन्नधान्य आदी अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू राहण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

त्यात कुणी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला.

प्रशासनाशी सहकार्य करू इच्छिणाऱ्या वाहनचालकांनी अत्यावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी सहकार्य करताना वाहने सुरळीत सुरू राहतील, याची दक्षता घ्यावी.

प्रशासन आपल्या पाठीशी आहे. कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटना जिल्ह्यामध्ये होता कामा नयेत. जिल्ह्यात अत्यावश्यक वस्तूंची कोणतीही अडचण नसून पेट्रोल, डिझेल यांचा पर्याप्त साठा उपलब्ध आहे.

Akolanews :नागरिकांना लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहील, असेही जिल्हाधिकारी कुंभार यांनी सांगितले.
———————–

Wardhanews | सिंदी रेल्वे येथे परमात्मा एक मानव धर्माचे भव्य सेवक संम्मेलन संम्मेलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांची प्रमुख उपस्थिती

0

 

मानव धर्माचे भव्य सेवक संम्मेलनाला हजारोच्या संख्येने सेवकांची उपस्थिती

सिंदी (रेल्वे):- येथे परमात्मा एक सेवक मंडळ द्वारा आयोजित मानव धर्माचे भव्य सेवक संम्मेलनाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एक सेवक मंडळाचे नागपूर अध्यक्ष राजुजी मदनकर, उद्घाटक एक उपाध्यक्ष मनोहरराव देशमुख, मार्गदर्शक सुधाकरराव सोनटक्के, प्रमुख पाहुणे सिंदी शहराचे ठाणेदार वंदना सोनुने, वि.वि.सो. अध्यक्ष अशोकबाबू कलोडे,सभापती केसरीचंद खंगारे,जेष्ठ सेवक युगल अवचट उपस्थित होते.

प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी आपले मनोगत व्यक्त करताना महानत्यागी बाबा जुमदेवजी यांचे कार्य विशद केले बाबा जुमदेवजी यांच्या जन्म नागपूर मधील एका गरीब कुटुंबात झाला त्यांचे वडील विठोबाजी विणकर होते आणि आई सरस्वतीबाई हे ग्रहणी होती.

बाबा जुमदेवजींना बाळकृष्ण नारायण आणि जगोबा असे तीन मोठे आणि मारुती नावाचे धाकटा भाऊ होता. वडील विणकर असल्याने आणि त्यांची घरची आर्थिक परिस्थिती गरिबीची असल्यामुळे बाबा जुमदेवजी आपले शिक्षण चौथीनंतर पुढे करू शकले नाही.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

१९३८ मध्ये वयाच्या १७ वर्षी बाबा जुमदेवजी यांचे वाराणसीबाई यांच्याशी लग्न झालं काही कारणामुळे त्यांनी आपला वडिलोपार्जित विनकामाचे व्यवसाय सोडला आणि त्यांनी सेठ केसरीमल यांच्याकडे काही वर्ष सुवर्ण काम म्हणून काम केले. कालांतराने त्यांनी नागपूर महानगरपालिकेत कंत्राटदार म्हणून काम करण्यास सुरुवात केली.

कालांतराने बाबा जुमदेवजी ने परमात्मा एक सेवक नाम मानव धर्म मंडळाची स्थापना केली. त्यांनी व्यसनमुक्ती, सामाजिक ऐक्य तथा मानवी जीवनातील अंधश्रद्धा यावर मोठ्या प्रमाणात कार्य केले.

त्यांचे काम आज महाराष्ट्र बाहेर अनेक राज्यात पोहोचले आहे असे मनोगत व्यक्त केले.

Wardhanews: यावेळी सेवक मंडळ पदाधिकारी सचिव सुरुजजी अंबुले, संचालक टिकारामजी भेडारकर,सहसचिव मोरेश्वरजी गभने, संचालक वासुदेव पडोळे, कोषाध्यक्ष प्रविनजी उराडे, संचालक संजयजी महाकाळकर, संचालक फकिरजी जिभकाटे, संचालक विठ्ठलराव क्षिरसागर, मंगलरावजी सोनटक्के, विनोदराव गवळी, विजयराव नखाते, विनोदराव कातोरे, प्रभाकरराव काळबांडे, गणेशराव हांडे, विष्णुजी वाघमारे, श्रीरामजी भट्ट, तुषारजी महाकाळकर, सौरभजी कातोरे, अतुलजी काळबांडे, उमेशराव आष्टनकर, हिरामनजी अवचट, मंगेशजी अवचट, नंदूजी भोयर, राकेशजी नखाते, भगवानजी वाघमारे, दिलीपराव रुहारकर, अमोल ढगे, हंसराज सुरकार, पुरुषोत्तम लांजेवार, हनुमान नखाते यांच्यासह सेवक मंडळाचे सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते…

Shegaon news |अनिष्ट रूढी परंपरा यांना फाटा देऊन समाज बळकट करण्यासाठी सर्वांनी एकत्र काम करण्याची गरज – रमेश पाचपोर

0

 

अकोला येथे गोंधळी समाज उपवर युवक युवती परिचय मेळावा उत्साहात..

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

अकोला : shegaon news: परिचय मेळाव्यातून वेळ व पैसा तर वाचतोच शिवाय समाजाचे एकत्रीकरण होते. यासाठी सकल गोंधळी समाजाच्या वतीने उपवर युवक – युवती परिचय संमेलन घेण्यात आले.

असेच उपक्रम नियमित सुरू राहावेत यासाठी समाजाचे संघटन असणे फार महत्त्वाचे असून समाजाच्या प्रगतीसाठी अनिष्ट रूढी परंपरा यांना फाटा देऊन एकत्र व्हा असे मत सकल गोंधळी समाजाचे कार्यक्रम व्यवस्थापक संचालक
रमेश पाचपोर यांनी केले.

अकोला जानोरकर मंगल कार्यालय
येथे दि. १३ जानेवारी रोजी गोंधळी समाज राज्यस्तरीय परिचय संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दामोदरराव शिंदे तर उद्घाटक प्रल्हादराव उगले होते.

प्रमुख अतिथी म्हणून प्रा. राजेश भांडे, डॉ.श्यामसुंदर सोनोने, गणेशराव इंगोले, चंदू महाजन, डॉ. रमेश वेले, माजी नगरसेविका सौ. प्रमिलाताई पु. गिते, रामरावजी सोनारगन, नामदेवराव ढुके, अविनाश नवरखेडे, देविदास पाचपोर, सुधाकर गिते, विजय गीते, योगेश गिते, जीवन पवार, स्वराताई मराठे,माधुरीताई गोरे, डॉ प्रभाकर मुद्गगल,वासुदेव वाघडकर,विजय दुतंडे,गजानन लेखणार यांची उपस्थिती होती.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते तुळजा भवानी माता छ्त्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करुन राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळाव्यास सुरुवात झाली.यावेळी दामोदरराव शिंदे उद्घाटक प्रल्हादराव उगले, प्रा.राजेश भांडे, स्वराताई मराठे आदींनी मनोगत व्यक्त केले.

परिचय मेळाव्यात समाज बांधवांची लक्षणीय उपस्थिती होती यावेळी ६८ मूल २७ मुलींनी आपला परिचय नोंदविला. कार्यक्रमाचे प्रास्तविक डॉ रमेश वेले तर आभार दिनेश महाजन यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशाल पाचपोर, गणेश भागवत, शिवा पाचंगे, रविराज वाघडकर, गोपाल हांडे, शुभम पचांगे, निलेश गंगावणे, शुभम पाचपोर परिक्षीत कानडे आदींनी परिश्रम घेतले.

चौकट..
परिचय संमेलनात गोंधळातून समाज प्रबोधन

गळ्यात संबळ, काखेला झोळी आणि डोईवर बलुत्याचं गाठोडं घेऊन गोंधळी समाज पिढ्यानपिढ्या गावोगाव गोंधळ मांडत राहिले. छत्रपती शिवरायांच्या काळात गोंधळी समाज लोकांच्या समोर पोवाडे गाऊन राष्ट्रभक्ती व धर्मभक्ती याचे महत्त्व सांगत. समाजातील वाईट चालीरितींचा प्रभाव कमी करण्याचा ते प्रबोधनातून प्रयत्न करीत होते.

Shegaon news: कार्यक्रम स्थळी तुळजाभवानी समोर गोंधळ घालून समाज प्रबोधन करण्यात आले. मधुकर गंगावणे, गजानन दोरकर सुखदेव पेंढारी, रामराव सोनारगण, सुखदेव पेंढारी, संतोष पचांगे, दिनेश गंगावणे, युवा कलाकार शिवा पचांगे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.

Akolanews | मुर्तीजापुर शहरात नमो चषक मॅरेथॉन स्पर्धा आमदार हरीश पिंपळे यांनी दिली हिरवी झेंडी

0

 

मुर्तीजापुर प्रतिनिधी
शाम वाळस्कर

Akolanews : मुर्तीजापुर शहरात नमो चषक मॅरेथॉन स्पर्धा भारतीय जनता पार्टीच्या पुढाकाराने घेण्यात आली आहे.या स्पर्धेत मुर्तीजापुर मतदारसंघाचे आमदार हरीश पिंपळे यांनी विविध सामाजिक व सांस्कृतिक व भव्य क्रीडा विविध स्पर्धा मूर्तिजापुर तालुक्यात आयोजित केल्या होते.

आयोजित मॅरेथॉन स्पर्धेला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आमदार हरीश पिंपळे यांनी हिरवी झंडी दिली सदर स्पर्धेत ४०० विद्यार्थ्यांचा सहभाग झाला होता.

कार्यक्रमाला ठाणेदार भाऊराव घुगे,ज्येष्ठ पत्रकार विलास मुलमुले,दीपक अग्रवाल,माजी नगराध्यक्ष मोनाली गावंडे,तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे,शहराध्यक्ष रितेश सबाजकर,राजू कांबे,कमलाकर गावंडे,कोमल तायडे,आयुषी तायडे,अमोल प्रजापती,गोपाल दायमा व इतर अनेक भाजपाचे पदाधिकारी कार्यकर्ते व्यासपीठावर उपस्थित होते.मॅरेथॉन स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक प्रणव खंडोबल्लर याला ५१०० रुपये बक्षीस देण्यात आले.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

तसेच द्वितीय क्रमांक आकाश मोरे याला ३१०० तर तृतीय अजय होले यांना २१०० रुपये बक्षीस आमदार हरीश पिंपळे यांचे हस्ते प्रदान करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता पोलीस विभागातील पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी,क्रीडा क्षेत्रातील विनोद काळबांडे,दिनेश श्रीवास शहरातील क्रीडा क्षेत्रातील युवक शिक्षक यांनी विशेष सहकार्य केले.

Akolanews : विशेष म्हणजे मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांसोबत मनोहर ताकतोडे व ७२ वर्ष हे सुद्धा धावले त्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.

 

Crimenews | अडीच लाख रू साठी विवाहितेचा शाररिक व मानसिक छळ,पतीसह सासरच्या ५ जणांनवर गुन्हे दाखल

0

 

इस्माइल शेख बुलढाणा जिला प्रतिनिधि

शेगांव Crimenews: तुझ्या बापाने अपेक्षा पेक्षा कमी हुंडा दिला.माहेरवरून २ लाख ५० हजार रुपये आण असे म्हणत सासर कडील मंडळीने विवाहितेचा शाररिक व मानसिक छळ केल्याची घटना दि.१३ जानेवारी २०२४ रोजी उघडकीस आली.

सौ. सोनाली सुदर्शन पिसे वय 24वर्षे रा. घरकाम रा. गोमाजी नगर शेगांव ह.मु. मोताळा ता. मोताळा जि.बुलडाणा ह्या विवाहित महिलेने शेगांव शहर पो.स.टे.ला फिर्याद दिली की सुदर्शन शत्रुघ्न पिसे वय ३१ वर्षे ,(पती) शंकुतला शत्रुघ्न पिसे वय ६० वर्षे (सासू) सुरज शत्रुघ्न पिसे वय ४१ वर्षे

(जेठ) आरोपी क्र. १ ते ३ रा. गोमाजी नगर शेगांव , सपना महादेव गाढें वय ३८ वर्षे रा. रोकडीयानगर शेगांव , सौ. स्वाती पंकज भोजने वय ३५ रा. पिंप्री खोद्री पो. पिंपळगांव काळे ता. जळगांव जामोद यांनी संगमत करून दि. ३/२/२०२३ ते दि. ९/११/२०२३ चे ११ वा.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

पर्यत फिर्यादी हिस तुझ्या बाबाच्या कडून २,५० हजार रुपये आण तुझ्या बापाणे अपेक्षा पेक्षा कमी हुंडा दिला असे म्हणत त्रास देऊन मारहाण केली तसेच शिवीगाळ करून जिवाने मारण्याची धमकी दिली.

Crimenews : याप्रकरणी शहर पोलीसांनी उपरोक्त पाचही आरोपी विरुद्ध अप नं.- २३/२०२४ कलम ४९८ अ,३२३, ५०४,५०६,३४ भादंवि अन्वये गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोहेका संजय करुटले हे करीत आहेत.

IND vs ENG | इंग्लंडविरूद्धच्या या कसोटी मालिकेत बीसीसीआयकडून शेवटी ‘या’ तीन खेळाडूंना दाखवले शेवटी बाहेरचा रस्ता

0

 

IND vs ENG: या दिवसात पाच सामन्यांची कसोटी मालिका पार पडणार आहे. व या नंतर या मालिकेतील पहिल्या दोन कसोटींसाठी बीसीसीआयने टीम जाहीर केली आहे. परंतु या मालिकेमधून टीम इंडियाच्या तीन खेळाडूंना डच्चू का देण्यात आला आहे.IND vs ENG

आता यामध्ये टीम इंडियाच्या स्टार ऑल राऊंडरचाही लवकर समावेश आहे. नेमका कोण आहे तो खेळाडू आपण जाणून घेउया.


या टीम मध्ये रोहित शर्मा कर्णधार तर जसप्रीत बुमराह उपकर्णधार असणार आहे. परंतु आता पार पडलेल्या आफ्रिकेविरूद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका 1-1 ने बरोबरीत सुटली होती. या मालिकेमधील तीन खेळाडू ज्यांना इंग्लंडविरूद्ध संघात कायम ठेवलं गेलं नाही त्याना बाहेर काढण्यात येईल.

या टीमने शार्दुल ठाकूर, प्रसिद्ध कृष्णा, अभिमन्यू ईश्वरन यांनी डच्चू देण्यात आला आहे. त्या शार्दुल ठाकूर आणि प्रसिद्ध कृष्ण आपल्या लौकिकाला साजेसा खेळ दाखवता आलेला नाही.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

प्रसिद्ध कृष्णाने कसोटीमध्ये पदार्पण केलं होतं. त्यालाही काही छाप पाडता आली नाही.

IND vs ENG: तर या रोहित शर्मा याने प्रसिद्ध कृष्णा याला दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये खेळण्याची संधी दिली होती. मात्र प्रसिद्धला मिळालेल्या संधीचं सोनं करता आलेलं नाही.

मग तिसरा खेळाडू हा अभिमन्यू ईश्वरन असून त्यालाही वगळण्यात आलं आहे. मराठमोळा खेळाडू ऋतुराज गायकवाड याच्या जागी त्याला संघात जागा मिळाली आहे. आता तिघांनीही संघात आपली जागा तयार करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे.

BCCI: बीसीसीआयने जाहीर केलेल्या टीम इंडियामध्ये चार स्पिनर्सला संधी दिली गेली आहे.

तर ही एक चाल असू शकती कारण या मध्ये भारतामध्ये स्पिनर्सला पिचवर चांगली मदत मिळते. त्यामुळे वींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव यांना संघात स्थान दिलं गेलं आहे.

पहिल्या-दुसऱ्या टेस्टसाठी स्क्वॉड

IND vs ENG: रोहित शर्मा (कॅप्टन), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरैल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार आणि आवेश खान.

Jijamata jayanti | सकल मराठा समाजा कडून सामाजिक कार्यातून राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी शासकीय रुग्णालयाना केले रुग्णांना अन्नदान..

0

 

ब्युरो चिफ प्रतिक कुऱ्हेकर  अकोला.

मूर्तिजापूर:-Jijamata jayanti: सकल मराठा समाजाच्या वतीने मूर्तिजापूर शहरात विविध ठिकाणी सामाजिक कार्यातून राजमाता जिजाऊ यांची 426व्या जयंती निमित्य श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील राजमाता जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली.

स्वराज्य जननी, शेतकऱ्यांच्या कैवारी, ज्यांच्या प्रेरणेतून जगाला अभिमान वाटावा असा राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज मिळाले त्यांनी स्वराज्याची स्थापना करून लोकशाही रुजवली, स्त्रियांना सन्मान मिळवून दिला.

अशा थोर राजमाता जिजाऊ साहेब यांच्या जयंती निमित्य मूर्तिजापूर येथील सकल मराठा समाजाच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वप्रथम माँ जिजाऊंच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

तद-नंतर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा सामान्य रुग्णालयात रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना अन्नदान करून सामाजिक कार्यातून जयंती साजरी करण्यात आली.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

Jijamata jayanti:या वेळी सकल मराठा समाजाचे मुन्ना नाईकनावरे, सुधाकर शेळके, शरद हजबे, शाम वाळसकर, पिंकू शर्मा,पप्पू तिडके, शाम येवले, विष्णू लोडाम, विवेक शिंदे, आकाश चिकणे, जाधाव, प्रदीप माने,चेतन पवार, प्रतिक गांजरे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
————————