Home Blog Page 145

महाआरोग्य शिबीरात तपासणी कलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी रवानगी / sangtiraobhongal

0

 

संगितराव भोंगळ यांनी लक्झरी बसला दिली झेंडी

संग्रामपुर(राष्ट्रवादी काँग्रेस चे सर्वेसर्वा खा.शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने १६ डिसेंबर रोजी महाआरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. बुलढाणा जि.प.चे मा.उपाध्यक्ष संगितराव भोंगळ उपाख्य राजु पाटिल तथा डाॕ.उल्हास पाटिल वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय.जळगांव (खान्देश) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य महाआरोग्य तपासणी व उपचार शिबीर पार पडले.

या शिबीरात रुग्णांनी हृदयरोग तपासणी,2D इको ईसीजी,शुगर तपासणी,नाक,कान,घसा तपासणी,मोतीबिंन्दु शस्त्रक्रिया,महिलांच्या सर्व प्रकारच्या आजाराची तपासणी करण्यात आल्या होत्या.या महाआरोग्य शिबीरात बहुसंख्य रुग्णांनी उपचार घेतले त्या रुग्णांना पुढिल उपचारासाठी पाठविण्यात आले.

शिबीरात शस्त्रक्रियेसाठी निवड झालेल्या रुग्णांना पुढील उपचार व शस्त्रक्रिया करण्याची आज दि.१९ डिसेंबर रोजी.रुग्णांना लक्झरी बस ने डाॕ.उल्हास पाटिल वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगांव (खान्देश) येथे पाठविण्यात आले.

https://www.suryamarathinews.com/crime-news-2/

यावेळी लक्झरी बस ला संगितराव भोंगळ यांनी झेंडी दिली. यावेळी रुग्णांचे नातेवाईक व गावकरी बहुसंख्यने उपस्थित होते.sangtiraobhongal

Crime News | निकाह होण्यास साठी फक्त काही तास असतानाच वधुची गळफास घेऊन आत्महत्या

0

 

Crime News | निकाह होण्यास साठी फक्त काही तास असतानाच वधुची गळफास घेऊन आत्महत्या

 

सोलापूर येथे विवाहासाठी सर्व पाहुणे घरी आले असतानाअचानक निकाह साठी काही तासात होणार असताना नवरी मुलीने आपलेच राहत्या घरी बेडरुम मधील सिलिंग फॅनला ओढणीने साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर उघडकीस आला आहे.

सोलापूर येथील सालिया महेबुब शेख (वय २५, रा. ओम नम : शिवाय नगर, कुमठेगाव रोड, सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या नवरीच्या नाव आहे. हा प्रकार सकाळी पावणेसहा वाजता उघडकीस आल.

सोलापूरची सालिया शेख हिचा विवाह आज होणार होता. पण घरी पाहुणेही आले होते. पण या दरम्यान, सकाळी पावणेसहा वाजण्याच्या सुमारास आपलेच राहत्या घरी बेडरुममधील सिलिंग फॅनला तिने ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे आढळून आले.

तिच्या नातेवाईकांनी तिला तातडीने खाली उतरवुन बेशुद्धावस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच तिचा मृत्यु झाल्याचे सांगितले.

https://www.suryamarathinews.com/amravtinews/

व तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. पण या घटनेची माहिती मिळताच शेख कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात गर्दी केली होती. पण विजापूर नाका पोलीस पुढील तपास करीत आहेत. Crimenews

धारणी प्रकल्प कार्यालयात कार्यरत पुरवठा अधिकारी गिरडकर यांची विभागीय चौकशी करावी

0

 

आदिवासी विकास उपायुक्तांचे धारणी प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्र

धारणी-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धारणी अंतर्गत शासकीय अनुदानित आश्रमशाळेच्या 2023-24 च्या प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा परस्पर रद्द केल्याप्रकरणी आदिवासी विकास उपायुक्त जागृती कुमरे यांनी पुरवठा अधिकारी गिरडकर यांची विभागीय चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

या संदर्भात एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.


या पत्रानुसार 2019 ते 2023 या कालावधीत झालेल्या क्रीडा स्पर्धांची सविस्तर चौकशी आणि तात्काळ अहवाल मागवण्यात आला आहे. गिरडकर यांनी कारकून म्हणून काम केल्याचे अनेक किस्से प्रसिद्ध असल्याचे सांगितले जाते. मेस आणि खाद्यपदार्थ पुरवठ्याचे कंत्राट सांभाळणारी व्यक्ती त्यांच्या गाडीतून गिरडकर यांच्याकडे छोट्या भेटीसाठी जाते.

नोव्हेंबर महिन्यात क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेदरम्यान कोणत्याही आदिवासी सामाजिक संस्थेला किंवा महिला बचत गटाला निविदा देण्यात आल्या नाहीत. स्पर्धेदरम्यान भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत बिरसा क्रांती दलाने उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांना निवेदन दिले होते.

https://www.suryamarathinews.com/crimenews-27/

एवढेच नाही तर गिरडकर यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी न झाल्यास बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला होता. आदिवासी विकास उपायुक्तांनी गिरडकर यांची विभागीय चौकशी करण्याच्या सूचना दिल्यानंतर प्रकल्प कार्यालयात खळबळ उडाली असून याप्रकरणी गिरडकर यांना संरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू झाल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.amravtinews

माणुसकीचा धर्म सोडलेला पालिकेचा कारभार , गावातील नागरिकांना मृत्य नंतर ही न्याय नाही ,crimenews 

0

*मृत्यूनंतरही मरणयातना; रस्ता नाही*

पुणे आंबेगाव खुर्द सच्चाई माता आगम परिसर अटल 12 येथे  विविध समस्येला नागरिक तोंड देत असताना शासन अधिकारी झोपेचे सोंग घेत आहे. नागरिकांचा मोठा टॅक्स पालिकेने दरोडा टाकून गोळा केला .

सुविधा देत नसल्यामुळे हा दरोडाच आहे. असे सिद्ध होत आहे. असा आरोप आम आदमी पार्टीचे शहराध्यक्ष सामाजिक न्याय विभागाचे प्रशांत कांबळे यांनी केला त्याचे कारण असे की नागरिकांना कुठली सुविधा शासन पूर्वत नाही.

आज झालेली घटना वृद्ध मयत विमलबाई धडे यांना ने आन करण्यासाठी सुद्धा  रस्ता नाही. नागरिकांनी स्वतःहून रस्ता तयार केला तरी देखील मयत नागरिकांना गाडीमध्ये घेऊन जाता आले नाही.

परिणामी ॲम्बुलन्स रस्त्यामध्ये फसली,  2017 मध्ये पुणे महानगरपालिकेमध्ये आलेला हा भाग अजूनही आदिवासी सारखा वाटतो असे वाटते हा भाग शहराच्या लगत असला तरीसुद्धा अधिवासी पाडा म्हणून पुणे महानगरपालिकेने घोषित केले की काय असाही आरोप इथले नागरिक करत आहे.

येथे क्लिक करावे

https://www.suryamarathinews.com/crimenews-26/

सतोष शेंबडे, ऍड.प्रदीप माने, ऍड. महादेव कापरे, राज पाटील, धीरज शर्मा, सागर जाधव, राम वानखेडे, बालाजी बिराजदार, लक्ष्मण केकान यदि मयत नातेवाईक नागरिक करत होते.crimenews

शेणगावचा माजी उपसरपंचाला विनयभंग व अँट्रासिटीचे गुन्ह्यात जिवती पोलिसांकडून अटक crimenews 

0

कृष्णा चव्हाण चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी
====================
जिवती -शेणगावचा माजी उपसरपंच व ताडी हिरापुर येथील रहिवाशी असलेले दिगंबर अप्पाराव पोले वय 45 वर्ष यांना आदिवासी महिलेचा विनयभंग केलेचे प्रकरणात जिवती पोलिसांकडून अटक करणेत आली आहे.

दिनांक,17/12/2023 रोजी मौजा ताडी हिरापुर येथे दिगंबर पोले चे घराजवळ राहणारी महिला ही तिचे घरात नातवांसोबत झोपली असताना दिगंबर अप्पाराव पोले याने मध्यरात्रीचे सुमारास महिलेचे घरात प्रवेश करून हात पकडून तिचा विनयभंग केला .

https://www.suryamarathinews.com/jansavandyatra/

अशा महिलेच्या तक्रारीवरून दिगंबर पोले याचे विरुध्द जिवती पोलिस ठाणेत विनयभंग व ॲट्रॉसिटीच्या गुन्हा दाखल झाला आहे. व दिगंबर पोले याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास डी. वाय .एस .पी .गडचांदुर करीत आहे. Crimenews

परिवर्तन जनसंवाद यात्रेचे सिंदी रेल्वे शहरात जेसीपी द्वारे पुष्पवर्षाव करीत भव्य स्वागत / jansavandyatra

0

 

दिवसाला १२ तास वीज उपलब्ध करून दिल्याबद्दल अतुल वांदिले यांचे सिंदी रेल्वे शहरात भव्य स्वागत

संघर्षातून निर्माण झालेले नेतृत्व म्हणजे अतुल वांदिले – सलील देशमुख

सिंदी रेल्वे :-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात हिंगणघाट विधानसभा क्षेत्रात परिवर्तन जनसंवाद यात्रेची सुरुवात २० नोव्हेंबर रोजी पोहना येथील महादेव मंदिरातून सुरूवात झाली होती. या यात्रेचे १७ डिसेंम्बर रोज सिंदी रेल्वे शहरात आगमन झाले असता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंदी शहर द्वारा जेसिपी द्वारे पुष्पाचा वर्षाव करीत ढोल ताशांच्या गजरात भव्य स्वागत करण्यात आले.

परिवर्तन जनसंवाद यात्रेच्या २८ व्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते सलीलजी देशमुख यांनी उपस्थित राहुत परिवर्तन जनसंवाद यात्रेचा सभेला संबोधित केले.संघर्षातून निर्माण झालेले नेतृत्व म्हणजे अतुल वांदिले आहे.

परिवर्तन जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून अतुल वांदिले व त्यांच्या सहकार्याने २८ दिवस घरी न जाता २८८ गावांना भेट देऊन त्यांच्या समस्या जाऊन घेतल्या आहे.त्यांच्या या संघर्षाला २०२४ मध्ये यश नक्की मिळेल असे प्रतिपादन युवा नेते सलील देशमुख यांनी व्यक्त केले.

यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, जिल्हा निरीक्षक राजाभाऊ टाकसाळे, प्रदेश सरचिटणीस किशोरजी माथनकर, माजी नगराध्यक्ष बबनराव हिंगणेकर, समुद्रपूर तालुका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक अशोकजी वांदिले,सामाजिक न्याय विभाग जिल्हा कार्याध्यक्ष प्रलय तेलंग,महिला जिल्हाध्यक्ष ज्योतिताई देशमुख,जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे,माजी नगराध्यक्ष संगीताताई शेडे, माजी उपाध्यक्ष सुधाकरजी खेडकर,शहराध्यक्ष गंगाधर कलोडे, बबनरावजी दाभणे गुरुजी, प्राचार्य अशोक कलोडे,मोहन अंबीरे,बाजार समिती संचालक गणेश वैरागडे,

https://www.suryamarathinews.com/homeguard/

महादेव वांदिले,ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष प्रशांत घवघवे, शिवसेनेचे सचिन लांबट, सामाजिक कार्यकर्ते राजुभाऊ तळवेकर,फिरोज बेरा, युवक शहराध्यक्ष तुषार हिंगणेकर, सुनीलजी शेंडे,माजी नगरसेवक सुमनताई पाटील, कमलेश डगवार,गजानन धाबडधुसके, हेमराज झाडे, नितेश झाडे, जगदीश बोरकर, अफजल बेरा, बबलू खान, वसंतराव सिरसे, नितीन देशमुख, जावेद मिर्झा, संदीप उईके,

सुधाकर वाढई, राजू मेसेकर, बंडु लोणकर,नदीम भाई, बबलू भाई, अनिल लांबट,गणपत ढगे,अजय पर्बत अरुण सावरकर, घोडे पाटील, सिमा तिवारी, सुचिता सातपुते, सुजाता जांभुलकर, सविता गिरी, विद्या गिरी, वकीलताई, मिनाक्षी ढाकणे, दिपाली रंगारी
सुमित तळवेकर,निलेश तकवेकर, बंटी बेलखोडे,सुमित शेंडे, अतुल कारवडे, सोनू बोरकर, राहुल बेले, रवी राणा,

अनुप वाघमारे, सुमित वाघमारे, सुनील सोनटक्के, हेमंत झाडे,सोनू झाडे, रवी वाघमारे,रोशन तडस जगदीश बोरकुटे दीपक अग्रवाल यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते..jansavandyatra

हिवाळी अधिवेशनातुन सुध्दा होमगार्ड चे प्रश्न दुर्लक्षित- सोनु मोहोड /homeguard

0

 

इस्माईल शेख बुलढाणा .जि. प्र.

होमगार्ड संघटनेकडुन लोकप्रतिनिधींसह विविध पक्षातील सत्ताधारी व विरोधी पक्षातील नेते मंडळींना होमगार्ड च्या समस्या व प्रश्न लेखी स्वरुपात कळवुन सुध्दा सर्वांनीच दुर्लक्ष केले. हा प्रश्न चालु अधिवेशनात तरी मांडल्या जाणार ही अपेक्षा असतांना कुठल्याही नेत्यांनी या संदर्भात सकारात्मक भुमिका मांडली नसल्याचे दिसुन येते. असा,आक्षेप सोनु मोहोड यांनी घेतला आहे.

मोहोड यांनी म्हटले की, राज्यात ४८ हजार होमगार्ड महिला व पुरुष कार्यरत आहेत.त्यांच्या वर कौटुंबिक जबाबदाऱ्या आहेत. त्यांचे प्रश्न समजुन घ्यावे व चालु हिवाळी अधिवेशनात त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधींची भुमिका असायला हवी होती.

मात्र,नागपुर येथे हिवाळी अधिवेशन सुरु असतांना सुध्दा विदर्भातील एकही आमदार किंवा मंत्री याप्रश्नांवर बोलायला तयार नाही. होमगार्ड प्रश्न मांडतांना मोहोड यांनी म्हटले की,निष्काम सेवा हे वाक्य हटवुन नियमित सेवा करावे,३६५ दिवस होमगार्डला काम द्यावे,सेवा निवृत्ती ५८ वरुन ६० करावे,निवृत्तीनंतर भत्ता देण्यात यावा,

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार होमगार्ड सैनिकांना सातव्या वेतन आयोगानुसार मानधन वाढवुन देण्यात यावे,महिला होमगार्डला महिला पोलिस प्रमाणे प्रसुती रजा मिळुन इतर सुविधा द्याव्यात,होमगार्ड यांची दर ३ वर्षांनी होणारी पुनर नोंदणी प्रक्रीया बंद करण्यात यावी.अशा स्वरुपाच्या मागण्यांचे यापुर्वी लोकप्रतिनिधींना देवुन सुध्दा दुर्लक्ष करण्यात आले.

 

 

येथे क्लिक करावे

 

https://www.suryamarathinews.com/avedhdaru/

हिवाळी अधिवेशनात होमगार्ड चे प्रश्न मांडल्या जातील अशी अपेक्षा असतांना सुध्दा सरकारमध्ये असलेल्या लोकप्रतिनिधी सह विरोधकांची भुमिका सुध्दा सकारात्मक नाही. असे सोनु मोहोड यांनी म्हटले / homeguard

दारूचा सर्रासपणे विक्री..!शासनाच्या आदेशाला केराची टोपली..!

0

 

पोलिस प्रशासनाना समोर मोठे आव्हान?लक्ष देणार काय?

अनिल सिंग चव्हाण मुख्य संपादक.

संग्रामपूर:-संग्रामपूर तालुक्यातील आदिवासी बहुल मानलेल्या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेले टूनकी नावाचे गाव आहे.येथील सरकार मान्य देशी दारूचे दुकान हे जळगाव जामोद रोडवर असून त्या ठिकाणी लावलेले फलकावर सकाळी देशी दारूचे दुकान उघडण्याची व बंद करण्याची वेळ स्पष्ट स्पष्टपणे लिहिलेली असून सुद्धा शासनाच्या नियमाला केराची टोपली दाखवण्यात आली आहे.

नियमानुसार सकाळी आठ वाजता ते रात्र दहा वाजेपर्यंत आणि किरकोळ विक्रेता लिहिलेले असून सुद्धा संबंधित देशी चे दुकान सकाळी सात वाजताच दुकान उघडून त्या दुकानांमधून चोरी,चोरी, अवैध” रीतीने सकाळी कॉटरी चिल्लर व ठोक पेट्यांची विक्री केली जात असल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखविली आहे.

तसेच दुकानांमधून सकाळी पेट्या बाहेर काढून मोटरसायकल द्वारे तालुक्यामधील छोटे-मोठे खेड्यापाड्यात दारू पोहचवली जाते.तर या नियमबाह्य प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन की दुर्लक्ष?या सर्व गोष्टींचा नागरिकांमध्ये चर्चा सुरू आहे. शासनाच्या नियमांचे उल्लंघन होत असून अवैध दारूचा व्यवसाय अधिक जोर धरत असून तसेच तरुण पिढी व्यसनाधीन होऊन त्यांच्या संसारातील छोट्या मोठ्या मुलांच्या भविष्याची राखरांगोळी होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

या प्रकरणामुळे परिवारांची आयुष्याची राख रांगोळी होत असून आई-वडिलांच्या व आजी,आजोबांच्या नजरेसमोर त्यांचे भविष्य अंधारामय झाल्याचे दिसत आहे.याचे जिम्मेदार कोण?असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

तर आदिवासी भागामध्ये लोक शेतीमध्ये काम करतात रात्र दिवस त्यामध्ये शेतीचे नुकसान कपासी खराब झाल्या तुरी पसरल्या हरभरा खराब झाला मजुरी निघेना आणि जवान तरुण हा व्यसनाधीन होऊन संसाराची राख रांगोळी होत आहे आणि अधिकारी सुद्धा या अवैध्य दारू वाहतूक करणाऱ्यांवर लगाम लावत नाही? की कुणाच्या तरी आशिर्वादाने दारू विक्री होत आहे? असाही प्रश्न निर्माण झाला आहे.

उघडपणे सर्रास मोटरसायकलवरून दारूचे बॉक्स खेड्यापाड्यांमध्ये सेलिंग करून दिलें जातात.परंतु कार्यवाही संबंधित अधिकाऱ्यांकडून होत नसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या लोकांच्या निर्देशनामध्ये अवैद्य वाहतूक करताना भरपूर वेळेस आढळून आलेले.

महाराष्ट्राचा डंका उडीसा पश्चिम बंगाल मध्ये वारकरी संप्रदायाचा दुसऱ्या राज्यातील लोकांपुढे आदर्श /Maharashtranews

 

त्यामुळे आता लोकांच्या उत्तम जीवनाचा आणि चांगले जगण्याचा प्रश्न निर्माण झाले आहे? Avedhadaru

चारमळी आदीवासी भागात अधिकारी वर्गाकडून मतदान केंद्र पाहणी व मतदान ओळखपत्र वाटत /voter id

0

 

यावल ( प्रतिनिधी ) विकी वानखेडे

यावल तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागात असलेल्या चार मळी याठिकाणी प्रत्येक्ष जाऊन आदिवासी बांधवांशी संवाद साधून तेथील आदीवासी बांधवाना मतदानाचे हक्क अधिकार याविषयी मार्गदर्शन करून चारमळी येथिल विधानसभा रावेर मतदारसंघ 11 मतदान केंद्र पाहणी दौरा केला असता त्याठिकाणी राहत असलेल्या आदीवासी बांधवाना मतदान यादीचे वाचन व नविन मतदारांना मतदान ओळखपत्र वाटप करण्यात आले.

यावल तालुक्यातील अतिदुर्गम आदिवासी भागात असलेल्या चारमळी या पाड्यावर राहत असलेल्या आदिवासी बांधवांना मतदानाचा हक्क व अधिकार यांची जाणीव करून देण्यासाठी त्याच प्रमाणे मतदान हक्कापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी प्रत्येक्षरित्या सहा. जिल्हाधिकारी तथा फैजपूर उपविभागीय अधिकारी देवयानी यादव, यावल तहसीलदार मोहनमाला माझीरकर, यांच्या कडुन चारमळी येथिल मतदान केंद्राची पाहणी करून मतदार यादीचे वाचन केले व नविन मतदारांना ओळखपत्र वाटप करण्यात आले यावेळी मतदार यादीचे वाचन नायब तहसीलदार रशीद तडवी यांनी केले.

महाराष्ट्राचा डंका उडीसा पश्चिम बंगाल मध्ये वारकरी संप्रदायाचा दुसऱ्या राज्यातील लोकांपुढे आदर्श /Maharashtranews

 

तर वनविभागाचे अधिकारी बावणे, चारमळी येथिल मतदार यादीचे काम पाहणारे कर्मचारी व चारमळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. voter id

महाराष्ट्राचा डंका उडीसा पश्चिम बंगाल मध्ये वारकरी संप्रदायाचा दुसऱ्या राज्यातील लोकांपुढे आदर्श /Maharashtranews

0

 

रत्नाताई डिक्कर खामगाव प्रतिनिधी

ओडिसा पुरी जगन्नाथ धाम सोहळा हरिभक्त परायण कैलास महाराज मोरखडे माऊली महाराज गावंडे श्याम महाराज यांच्या मार्गदर्शना खाली शेगाव ते जगन्नाथ पुरी यात्रा व गंगासागर यात्रा 170 भावी भक्तांनी आनंदात पार पाडली आपला आपल्या बुलढाणा जिल्ह्याचे नाव उडीसा पश्चिम बंगाल येथे रोशन केलेला आहे.

लोकांनी पावली भारुड भजन सांस्कृतिक कार्यक्रम पाहून दुसऱ्याही राज्यातील लोकांनी आनंद लुटला त्याचे पूर्ण सिंह श्री शेत्र अटाळी येथील हरिभक्त परायण कैलास महाराज मरखडे निपाणा येथील माऊलीमहाराज गावंडे मलकापूर येथील श्याम महाराज यांचे पूर्ण श्रेय आहे.

यात्रेकरूंना कोणतीच चिंता नसल्यामुळे या त्रिपुरुष सुद्धा सर्व सुदृढ आणि आंदयात वेळेवर नाष्टा चहापाणी जेवण गाडीची व्यवस्था या सर्व व्यवस्था पाहून भक्तांनी आनंद लुटला सोबतच अटाळी येथील रतन राठी डॉक्टर साहेब यांनी संपूर्ण यात्रिक रून दर्शन देऊन वेळेवर तब्येत बिघडण्या लोकांना दुरुस्त करून त्यांना व्यवस्थित रित्या औषध गोळ्या देऊन ती जबाबदारी त्यांनी पार पाडली..

अटाळी मधून श्री क्षेत्र रामदास काटोले यांनी पूर्ण स्वयंपाक नाष्टा चहापाणी यांची जबाबदारी घेतली होती आणि त्यांनी ती जबाबदारी मोठ्या जबाबदारीने पार पाडली. Maharashtranews