Home Blog Page 146

गरिबीची जान आणि श्रीमंतीची आन घेऊन सर्वसामान्य ते यशस्वी उद्योजक असा प्रवास करणारे भंवरलाल जैन:bhavarlaljain 

0

 

अनिल सिंग चव्हाण (मुख्य संपादक )

bhavarlaljain :जळगाव, 01 जानेवारी 2024: गरिबीतून यशाचा शिखर गाठणारे भवरलाल जैन यांची कहाणी सर्वसामान्य कुटुंबातील तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. केवळ 7 हजार रुपयांच्या भांडवलातून सुरुवात केलेल्या त्यांच्या कंपनीने आज 9 हजार 700 कोटी रुपयांचा टप्पा गाठला आहे.

जळगाव जिल्ह्यातील साधारण शेतकरी कुटुंबातील भवरलाल जैन यांनी लहानपणापासूनच कष्टाची शिदोरी घेतली. शेतीच्या कामात मदत करत असताना त्यांना शेतकऱ्यांच्या समस्या जाणवू लागल्या. शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पन्न कसे मिळवता येईल याचा विचार त्यांनी केला.

जैन यांनी शेतीच्या नवनवीन पद्धतींचा अभ्यास करण्यासाठी जंगलात राहण्यास सुरुवात केली. त्यांनी शेतीसाठी लागणारे उपकरणे आणि पद्धतींवर संशोधन केले. त्यातून त्यांना शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवण्याची एक नवीन पद्धत सापडली.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

जैन यांनी 1986 मध्ये “जैन पाईप” कंपनीची स्थापना केली. या कंपनीतून त्यांनी शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवण्यासाठी आवश्यक असणारे उपकरणे आणि पद्धती विकसित केल्या. या उपकरणांमुळे शेतकऱ्यांना कमी पाणी आणि खते वापरून जास्त उत्पादन मिळू लागले.

जैन यांच्या कंपनीच्या उपकरणांनी शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवून आणली आहे. या उपकरणांमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळाले आहे. जैन यांच्या कंपनीचे उत्पादन आता भारतातच नव्हे तर जगभरात पोहोचले आहे. जैन यांनी आपल्या यशाचा आनंद शेतकऱ्यांशी शेअर केला आहे.

त्यांनी शेतकऱ्यांसाठी अनेक शैक्षणिक आणि आर्थिक योजना सुरू केल्या आहेत. अजित जैन हे गरिबीतून यशाची शिखर गाठणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत.
जैन यांच्या कहाणीतून आपल्याला अनेक गोष्टी शिकवल्या जातात. गरिबीतून यशाची शिखर गाठण्यासाठी कठोर परिश्रम आणि निष्ठा आवश्यक आहे.

bhavarlaljain : नवनवीन गोष्टींचा अभ्यास करून नवीन संधी निर्माण केल्या पाहिजेत. शेतकऱ्यांच्या विकासासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहिले पाहिजेत.

Agriculture Loan : मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी नवीन वर्षात खुशखबर 

0

 

Agriculture Loan | mumbai यंदाच्या2023 वर्षात खराब वातावरणामुळे खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामातील पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले. असून त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे वर्ष फारच वेदनादायी होतं. मात्र, नवीन येणारं वर्ष आता नक्की शेतशकऱ्यांना काहीसा दिलासा देणारं ठरणार आहे. तर शेतीशी संबंधित कर्ज (Agriculture Loan) वसुलीस स्थगिती देण्यात आली आहे.

या सर्व कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश सरकारच्या सहकार आणि पणन विभागाकडून देण्यात आले आहेत. तर या राज्यभरातील ४० दुष्काळी तालुक्यांमधील तब्बल १०२१ महसुली मंडळांना सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

तर या शासनाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत सरासरी ७५ टक्के पर्जन्यमानापेक्षा कमी आणि एकूण पर्जन्यमान ७५० मि.मि. पेक्षा कमी झाले, अशा एकूण १०२१ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून दुष्काळी भागात उपाययोजना आणि सवलती लागू करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

तर त्या अनुषंगाने, व्यापारी बँकांनी यामध्ये सार्वजनिक बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामिन बँका, लघुवित्त बैंका या बँकांसह, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. आणि संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांनी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात पण आल्या आहेत.

तर या खरीप २०२३ हंगामातील पीक कर्जाच्या परतफेडीचा दिनांक ३१ मार्च २०२४ असल्याने दुष्काळबाधित तालुक्यातील जे शेतकरी विहीत मुदतीत पीक कर्जाची परतफेड करू शकणार नाहीत, ते पण अशा शेतकऱ्यांची लेखी संमती घेऊन खरीप २०२३ च्या हंगामातील पीक कर्जाचे व्याजासह भारतीय रिर्जव्ह बँकेच्या निर्देशानुसार पुनर्गठन करण्यात यावे,

Agriculture Loan :तर या सर्व माहिती सूचना परिपत्रकात देण्यात आली आहे. तर या शिवाय ही कारवाई सर्व बँकांनी २० एप्रिल २०२४ पर्यंत पूर्ण करावी आणि अशा शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी नवीन पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, असं परिपत्रकात नमूद केले आहे. तर आता सर्व शेतकऱ्यांसाठी खुशखबर आहे.

Crimenews | रामटेक येथील एका महिलेचा विनयभंग! माना पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

0

 

मुर्तीजापुर प्रतिनिधी
शाम वाळस्कर

Crimenews :मुर्तिजापूर तालुक्यातील माना येथून जवळच असलेल्या रामटेक येथील एका महिलेचा बपोरी येथील विकी गणेश ठाकरे या युवकाने विनयभंग केल्याची तक्रार पीडित महिलेने दिली.

मिळालेल्या माहितीनुसार रामटेक येथील महिला तिच्या घरी एकटीच असतांना पाहून बपोरी येथील विकी गणेश ठाकरे या युवकाने पीडित महिलेच्या घराजवळ जाऊन त्या महिलेला आवाज देऊन अश्लीश इशारे केले.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

 

Crimenews यावरून या महिलेने थेट माना पोलीस स्टेशन गाठून विकी गणेश ठाकरे या आरोपीच्या विरोधात तक्रार दाखल केली.यावरून माना पोलिसांनी ३५४/२३ नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे करीत आहेत.

विकृत चाळे करणाऱ्या इसमास गावकऱ्यांनी केलें पोलिसांच्या स्वाधिन crimenews 

0

 

पोलिसांच्या उदासीन धोरणामुळे घडली घटना.

सप्टेंबर महिन्यातील तक्रारीवर पोलिसांनी केले दुर्लक्ष…

सिंदी रेल्वे….. मागील १ महिन्यापासून आरोपी प्रितम सहारे हा शहरातील नगर विद्यालय समोर शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेवर शाळेतील विद्यार्थ्यांनीना पाहून अश्लील चाळे करायचा. या बाबतची तक्रार २ दिवस आधी शाळेचे मुख्याध्यापक हे पोलिस स्टेशन ला गेले असतां त्यांची तक्रार पोलिसांनी नोदवून घेतली नाही.

व त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र शुक्रवार सकाळीं आरोपींनी सदर चा प्रकार करताना विद्यार्थिनीच्या पालकांनी व नागरिकांनी पाहले व त्याला पकडून पोलिस स्टेशन ला नेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.

पोलिस स्टेशन वर जमलेला जमाव पाहून पोलिस त्वरित अँक्शन मोड वर येत. पिडीत विद्यार्थिनी कडून तक्रार घेऊन आरोपीवर भादवी कलम ३५४ अ व पोस्को कलम १२ अंतर्गत आरोपी विरुद्ध गुन्हे दाखल केले.

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

याबाबत सविस्तर वृत्त असे की सदर शहरत मुलींच्या छेडखानीचे प्रकार वाढले असून याबाबत सप्टेंबर महिन्यामध्ये नागो परतेकी यांनी शहरातील नेहरू विद्यालय, नगर विद्यालय व विजय विद्यालयाच्या परिसरात टवाळखोर मुलांची वर्दळ वाढली असून शाळेच्या रस्त्याने जाता येताना मुलींना फिल्मी स्टाईलने आकर्षित करून त्यांना फसविण्याचे प्रकार सुरू असल्याची तक्रार सिंदी पोलीस स्टेशनला दिली होती.

परंतु सदर तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस स्टेशनच्या वतीने कोणतीही उचित कारवाई करण्यात आली नाही. दोन दिवसाआधी नगर विद्यालयाच्या मुख्याध्यापकाने शाळेसमोर विद्यार्थिनीना पाहून हा आरोपी घाणेरडे कृत्य करत असल्याबाबतची तक्रार बुधवारी देण्यासाठी गेले असता तक्रार न घेता त्यांना हुसकावून लावले. जर वेळीच तक्रार

घेतली असती तर या सदर घटनेला आळा बसला असता.

crimenews सदर घटनेच्या वेळी जनतेचा पोलिसानं बद्दल रोष पाहायला मिळाला. सदर घटना पुन्हा घडू नये याकरता पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाकडे विशेष लक्ष देण्याची मागणी सिंदी वासियांच्या वतीने करण्यात आली आहे…

viral recording |अँड सतीशचंद्र रोठे यांच्या हत्येचा कट उघडकीस.कुख्यात गुंड गणेश परसे कडून हत्येचा कट रचण्याची रेकॉर्डिंग व्हायरल.

0

 

viral recording :बुलढाणा:अवैध व्यवसायिकांच्या विरोधातील आंदोलन तथा पीडित महिलेला मदत केली म्हणून कुख्यात गुंड गणेश परसे यांच्याकडून आझाद हिंद संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड.सतीशचंद्र रोठे यांना जीवे मारन्याचा कट उघडकीस आला आहे.

आज 30 डिसेंबर 2023 सांयकाळी बुलढाणा जिल्हा सत्र न्यायालया समोर कुख्यात गुंड गणेश परसे हा त्याच्या वरली मटका अवैध व्यवसाय करणाऱ्या गुंड साथीदारांसह आला असता त्या ठिकाणी त्याने अँड सतीशचंद्र रोठे यांना जिवे मारण्याचा कट रचला.

यासह अँड रोठेंना बनावट गुन्हात अडकविण्याचा संवाद आझाद हिंद च्या कार्यकर्त्यांनी रेकॉर्ड केल्यामुळे हत्तेचा कट उघडकीस आला आहे.

हेही सविस्तर वाचा

👇👇👇👇👇👇👇👇👇

https://www.suryamarathinews.com/?p=24302

हत्येच्या कट कारस्थानाची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांसह संबंधित तपास यंत्रणेला देण्यात आल्याची माहिती अँड.रोठें दिली आहे.

viral recording  तीस वर्षापासून आझाद हिंद च्या माध्यमातून सामाजिक क्षेत्रात जनहितार्थ आंदोलन उभारणारे अँड सतीशचंद्र रोठे यांच्यावर यापूर्वीही पाच वेळा प्राण घातक हल्ला झालेला आहे.

त्यातून ते सुदैवाने बचावले तर यावेळी हत्त्येचाकट उघडकीस झाल्याने अँड रोठेंच्या जीवीत्वास धोका असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे.

Crime News विवाहितेचा विनयभंग युवका विरुद्ध गुन्हा दाखल..

0

 

प्रतिक कुऱ्हेकर सूर्या मराठी न्युज अकोला.

Crime News अकोला जिल्हातील मूर्तिजापूर :-तालुक्यात येत असलेल्या माना पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या रामटेक येथील ३० वर्षिय युवकाने विनयभंग केल्याची तक्रार रामटेक वरुन हाकेच्या अंतरावर असलेल्या एका गावातील महिलेने माना पोलीसात दाखल केली आहे.

माना पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रामटेक येथील विक्की गणेश ठाकरे (३०) हा रामटेक पासून हाकेवर असलेल्या नवरंगपूर येथील शिवारात नेहमी प्रमाणे २४ डिसेंबर रोजी बकऱ्या चारण्यासाठी गेला होता, तहानेने व्याकुळ झालेल्या विक्कीने सदर महिलेला पाणी मागीतले आणि तो पाणी पिऊन निघून गेला होता.

press reporter |दैनिक प्रतिदिन वार्ता चे कार्यकारी संपादक जफर खान यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड.

परंतु महिलेच्या तक्रारी नुसार आरोपी पाणी पिऊन गेल्यानंतर महिला घरकाम करीत असताना आरोपीने परत येऊन घरात अश्लील चाळे केले.

Crime News  यावरुन माना पोलीसांनी आरोपी विरुद्ध भादवी ३५४ अ, ४४८, व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास मूर्तिजापूर उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे करीत आहेत.

———————-

accidentnews | ट्रक गॅस टँकरची धडक;मोठा अनर्थ टळला

0

 

मुर्तीजापुर प्रतिनिधी

शाम वाळस्कर

 

accidentnews: ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील बालाजी पेट्रोलपंपासमोर गॅस टँकरला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली.मात्र सुदैवाने मोठी घटना टळल्याची घटना गुरुवारी सायंकाळी ८ वाजताच्या दरम्यान घडली.

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वर बालाजी पेट्रोल पंपाजवळ सायंकाळी गॅस टँकरला ट्रक चालकाने जबर धडक दिली.जर या धडकेत गॅस टँकरचा स्फोट झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला.

press reporter |दैनिक प्रतिदिन वार्ता चे कार्यकारी संपादक जफर खान यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड.

या अपघाताची माहिती मिळताच घटनेचे गांभीर्य ओळखत तहसीलदार शिल्पा बोबडे,ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र राऊत आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले.

 

 

accidentnews: त्यांनी अपघाताची प्रत्यक्ष पाहणी करून गॅस टँकरमधून कोणत्याच प्रकारचा गॅसचा रिसाव होत नसल्याची खात्री करून घेतली.

Scheme money | 4 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आणखीन या 5 योजनेचे पैसे

0

 

 

महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे! या वर्ष अखेरीस राज्यातील सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पैसे जमा करण्याचा शासन निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तर आता वाट कशली पाहता तर सर्व शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घ्यावा.

नवीन वर्षात आपल्यासाठी पुढील 8 दिवसांत प्रत्येक शेतकऱ्याला 5 वेगवेगळ्या योजनांतर्गत 50,000 ते 60,000 रुपये मिळणार आहेत. तर ते कसे जाणून घेऊया त्यामुळे आपल्याला नवीन वर्षाचा पहिला आठवडा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खूप खास असणार आहे तर त्यासाठी आपण नवीन वर्षाचे वाट पाहणार आहे.

 

तर ते कोणते पाच योजना आहेत ते जाणून घेऊया

press reporter |दैनिक प्रतिदिन वार्ता चे कार्यकारी संपादक जफर खान यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड.

तर सर्व शेतकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना – 2017 मध्ये 44 लाख शेतकऱ्यांना या योजनेअंतर्गत 18,762 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ झाला होता. मात्र, सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे ६.५६ लाख शेतकरी मुकले. मुख्यमंत्र्यांनी आता या उर्वरित 6.56 लाख शेतकऱ्यांनाही कर्जमाफी जाहीर केली आहे तरी सर्व शेतकऱ्यांनी हा लाभ नक्की घ्यावा.

तर सर्व शेतकरी यांनी या योजनेचा म्हणजेच पंडित दीनदयाळ उपाध्याय व्‍याज सावलत योजना – शेतक-यांनी 3 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज पूर्ण फेडल्‍यास 3% व्याज अनुदान मिळते. मात्र यावर्षी या योजनेसाठी 72 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

 

शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण योजना महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना – 2019 मध्ये, सरकारने नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपयांचे प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला. 14.31 लाख शेतकऱ्यांना 5,190 कोटी रुपयांची देयके आधीच देण्यात आली आहेत. तरी शेतकऱ्यांनी आपले उर्वरित रक्कम लवकरच जमा केली जाईल.

सर्व शेतकऱ्यांनी या वर्षाचे खरीप 2023 मध्ये 1.7 कोटी आणि रब्बीमध्ये 66 लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत नावनोंदणी केली. प्रिमियमची रक्कम सरकार भरते. या योजनेचे यंदाचे बजेट ५,१७४ कोटी रुपये इतके आहे.

Scheme money | मात्र शेतकऱ्यांनी त्यामुळे थोडक्यात, नवीन वर्षाची सुरुवात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अतिशय सकारात्मकतेने होत आहे, ज्याचा थेट लाभ त्यांच्या बँक खात्यात पोहोचणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ नक्की घ्यावा.

press reporter |दैनिक प्रतिदिन वार्ता चे कार्यकारी संपादक जफर खान यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड.

0

 

 निवडी बद्दल जळगाव जामोद येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने स्वागत.

इस्माईल शेख बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी

 

जळगाव जा. दैनिक प्रतिदिन वार्ता चे कार्यकारी संपादक मा. श्री जफर खान यांनी आपल्या पत्रकारितेच्या लेखणीतून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासनाच्या प्रत्येक योजनांची माहिती प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातून प्रसिद्धीस देत असल्याबद्दल व ओबीसी बहुजन महासंघाच्या लोकहिताच्या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतल्याबद्दल ,

त्यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाली आहे. निवडी बद्दल जळगाव जामोद येथे पोलीस प्रशासनाच्या वतीने पुष्पगुच्छाने स्वागत व अभिनंदन करण्यात आले

स्वागतप्रसंगी पोलीस प्रशासनातील मान्यवर
ठाणेदार निलेश झांबरे साहेब, एपीआय पांडुरंग इंगळे साहेब, पी.एस.आय. नारायण सरकटे, पी.एस.आय. अमोल पंडित, पी.एस.आय. शशिकांत दोडके, पीएसआय रंजना आवारे, पोलीस कॉन्स्टेबल शांतीलाल धीरबस्सी, पोलीस कॉन्स्टेबल रणजीत व्यवहारे, पोलीस हेडकॉन्स्टेबल शेगोकार, पोलीस कॉन्स्टेबल निशिकांत कळस्कार, ए. एस. आय. निलेश पुंडे, सचिन राजपूत, मंगेश सोळंके, सैय्यद तय्यब अली, शेख इरफान, सतीश पातोळे, प्रेमसिंग पवार, अतुल मोहाळे यांची उपस्थिती होती.

शासनाची बदनामी केल्याप्रकरणी GST चे असिस्टंट कमिशनर चेतनसिंह राजपूत यांच्यावर होणार कारवाई.GST

दैनिक प्रतिदिन वार्ता चे कार्यकारी संपादक जफर खान पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करून त्यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाली असून मंगळवार दिनांक ०२ जानेवारी २०२४ रोजी नागपूर येथे होणाऱ्या कलावंतांच्या महामेळाव्याप्रसंगी त्यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल ‌ ओबीसी बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा.राजकुमार घुले, राष्ट्रीय सचिव दर्शना घुले, राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्वेता रहागंडले ,राष्ट्रीय प्रसिद्धीप्रमुख सुभाष तगाळे ,ओबीसी बहुजन महासंघ महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष बाबाराव दुपारे, उपाध्यक्ष बालाजी सुवर्णकार यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले असून.

 

 

press reporter जाफर खान यांची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.

Anand Mahindra viral Post : आनंद महिंद्रांकडे व्यक्तीची पैशांची मागणी; मजेशीर उत्तर देत म्हणाले…सर मला एक लाख रुपये द्याल का?

0

 

Anand Mahindra viral Post : उद्योगपती आनंद महिंद्रा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. पण अनेकदा ते त्यांच्या फॉलोअर्ससाठी प्रेरणादायी आणि मजेशीर पोस्ट शेअर करत असतात. व त्यांच्या अनेक पोस्ट लोकांनाही खूप आवडतात.

पण अनेकदा आनंद महिंद्रा आपल्या पोस्टद्वारे लोकांना सामाजिक समस्यांची जाणीव करुन देतात, व आज तसेच जीवनासंबंधित चांगल्या गोष्टींची जाणीव करून देतात.

पण अनेकदा त्यांच्या पोस्ट ट्विटरवरही व्हायरल होतात. व आता नुकतीच अशीच आणखी एक मजेशीर घटना समोर आली आहे. तर ते कोणती पोस्ट तर पाहू या.

शासनाची बदनामी केल्याप्रकरणी GST चे असिस्टंट कमिशनर चेतनसिंह राजपूत यांच्यावर होणार कारवाई.GST

व त्याचे झाले असे की, एक्सवरील (पूर्वीचे ट्विटर) एका युजरने आनंद महिंद्रांकडे पैशांची मागणी केली होती. व ती युजरने आनंद महिंद्रांना एक ट्विट करत चक्क एक लाख रुपयांची मागणी केली आहे.

व पण, ज्या कामासाठी व्यक्तीने हे पैसे मागितले आहेत ते जाणून घेतल्यावर कोणीही म्हणेल की यासाठी धैर्य लागते. पण ही मजेशीर गोष्ट आपण जाणून घेऊया.

पण त्या व्यक्तीने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, सर, मला महिंद्राचे शेअर्स खरेदी करण्यासाठी एक लाख रुपये हवे आहेत. तर मग काय, आनंद महिंद्रा यांनी त्याला असे काही उत्तर दिले की, जे आता सोशल मीडियावर व्हायरल हे पोस्ट खूप व्हायरल होत आहे पाहूया.

या दरम्यान @R41534672 नावाच्या एका युजरने आनंद महिंद्रांना एक्सवर टॅग केले आणि लिहिले की, सर, मला महिंद्राचे शेअर्स खरेदी करण्यासाठी एक लाख रुपये हवे आहेत.

व यावर आनंद महिंद्रा यांनी उत्तर देत लिहिले की; काय कल्पना आहे सर, तुमच्या धाडसासाठी टाळ्या! विचारण्यात काय हरकत आहे? पण असेच पोस्ट या युजरने आनंद महिंद्रा यांना ट्विट केले आहे.

आता ही पोस्ट खूप चर्चेत आहे तर आता हे पोस्ट खूप मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. तर ज्यावर युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.

एका युजरने लिहिले की, काय आत्मविश्वास आहे. दुसऱ्या युजरने लिहिले की, सांगू शकत नाही कोण कोणत्या मूडमध्ये असेल आणि तो सहमत झालाच तर.

Anand Mahindra viral Post : अशाप्रकारे अनेकांनी मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. तर या पोस्टमुळे हाय गुजर खूप चर्चेत राहिला आहे या पोस्टमुळे आनंद महिंद्रा यांनी प्रत्युत्तर दिले.